Friday, 1 December 2017

उत्तर प्रदेश स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतही भाजपाची बाजी

यूपी: पालिका निवडणुकांमध्ये भाजप लाट कायम


उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्षासह काँग्रेसलाही पराभवाची धूळ चारून सत्तेत आलेल्या भाजपची लाट स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही कायम आहे. महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत, पंचायत निवडणुकांच्या आतापर्यंत हाती आलेल्या निकालांनुसार अनेक ठिकाणी भाजपची विजयी घोडदौड सुरू आहे. महापौरपदाच्या १६ जागांपैकी भाजपने मथुरा, अयोध्येसह १४ जागांवर विजय मिळवला आहे तर २ ठिकाणी बसपाचे महापौर विराजमान होणार आहेत. समाजवादी पक्ष आणि काँग्रेसचा मात्र यावेळीही धुव्वा उडाला आहे.भाजपने कानपूर, झांसी, मेरठ, वाराणसी, लखनऊ, आग्रा, गोरखपूर-मुरादाबाद, अलीगढ आदी महापालिकांमध्ये आपला झेंडा फडकवला आहे. तर बरेलीमध्ये बसपा, आणि गाझीयाबादमध्ये समाजवादी पक्षाने समर्थन दिलेला अपक्ष उमेदवार महापौरपदाच्या निवडणुकीत विजयी झाला आहे.काँग्रेसची दयनीय अवस्था झालेली असताना दुसरीकडे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रभागातही भाजप उमेदवाराचा पराभव झाला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या गोरखपूर महापालिकेतील वॉर्ड क्रमांक 68 मधून अपक्ष उमेदवार नादिरा खातून यांनी भाजपच्या माया त्रिपाठींचा पराभव केला.नगरसेवक निवडीमध्येही भाजपनेच बाजी मारली आहे. भाजपचे एकूण 552, काँग्रेसचे 96, समाजवादी पक्षाचे 186, बसपाचे 137, आणि अपक्ष 214 नगरसेवक निवडणून आले आहेत.
राज्यातील नगरपालिकांच्या १९८ नगराध्यक्षपदांसाठी निवडणूक घेण्यात आली.

सर्व १६ जागांवरील नवनियुक्त महापौरांच्या नावांची यादी 

आग्रा – नवीन जैन (भाजप)
अलीगढ़ – मोहम्मद फुरकान (बसपा)
वाराणसी – मृदुला जैयसवाल (भाजप)
गोरखपूर – सीताराम जैयसवाल (भाजप)
कानपूर – प्रमिला पांडे (भाजप)
फिरोजाबाद – नूतन राठोड (भाजप)
गाजियाबाद – आशा शर्मा (भाजप)
लखनऊ – संयुक्ता भाटिया (भाजप)
सहारनपूर – संजीव वालिया (भाजप)
मथूरा – मुकेश आर्य बंधू (भाजप)
अयोध्या – ऋषिकेश उपाध्याय (भाजप)
अलाहाबाद – अभिलाषा गुप्ता (भाजप)
मुरादाबाद – विनोद अग्रवाल (भाजप)
झांसी – रामतीर्थ सिंघल (भाजप)
बरेली – उमेश गौतम (भाजप) आघाडीवर
मेरठ – सुनीता वर्मा (बसपा) आघाडीवर

नगरपालिका:
पक्षनिकाल (198/198)
भाजप100
सपा37
बसपा35
काँग्रेस03
अन्‍य23
नगर पंचायत:
पक्षनिकाल (74/438)
भाजप32
सपा24
बसपा13
काँग्रेस03
अन्‍य02

एकूण किती जागांवर निवडणूक

- 16 महापालिका: एकूण 1300 वॉर्ड
- 198 नगरपालिका: एकूण 5261 वॉर्ड
- 438 नगर पंचायत: एकूण 5446 वॉर्ड
3 टप्‍प्‍यांमध्‍ये 53% मतदान
- पहिल्‍या टप्‍प्‍यामध्‍ये 52.59%, दुस-या टप्‍प्‍यात 49.3% तर तिस-या टप्‍प्‍यामध्‍ये 58.65% मतदान झाले.
- तिनही टप्‍प्‍यात एकूण 53% मतदान झाले.

गुजरात निवडणुकीपूर्वी योगींची परीक्षा

- गुजरात विधानसभा निवडणुकीपूर्वी उत्‍तर प्रदेशची पालिका निवडणूक मुख्‍यमंत्री योगी आदित्‍यनाथ यांच्‍यासाठी प्रतिष्‍ठेची लढाई बनली आहे. या निवडणुकीसाठी योगी आदित्‍यनाथ यांनी 14 दिवसांत 32 सभा घेतल्‍या होत्‍या. त्‍यांनी फक्‍त लखनऊमध्‍ये 9 सभा घेतल्‍या होत्‍या. आपल्‍या निवडणूक प्रचाराची सुरुवात त्‍यांनी अयोध्‍येपासून केली होती.

लखनऊला 100 वर्षांनंतर मिळाली पहिली महिला महापौर

भाजपच्‍या संयुक्‍ता विजयी
लखनऊ-नवाबांच्‍या शहराला 100 वर्षांनंतर महिला महापौर मिळाली आहे. महापौर पदासाठीच्‍या जागेवर भाजपच्‍या संयुक्‍ता भाटीया विजयी झाल्‍या आहेत. या जागेसाठी समाजवादी पक्षातर्फे मीरा वर्धन आणि बसपातर्फे बुलबुल गोडियाल देखील मैदानात होते. त्‍यांना संयुक्‍ता यांनी धुळ चारली आहे.

उत्तर प्रदेशात अलाहाबादमध्ये शिवसेनेचा नगरसेवक

शिवसेनेने या निवडणुकांमध्ये खाते उघडले आहे. अलाहाबादमध्ये शिवसेनेचा एक उमेदवार निवडून आला आहे. शिवसनेच्या युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनीच ट्विटरवरून याची माहिती दिली आहे. शिवसेना उत्तर प्रदेशातील स्थानिक स्वराज संस्थांमध्ये  काही महापालिकांमध्ये रिंगणात उतरली होती. त्यात अलाहाबादमध्ये वॉर्ड क्रमांक ४० मधून त्यांचे दीपेश यादव विजय झाले आहेत. उत्तर भारतातील स्थानिक स्वराज संस्थांमध्ये शिवसेनेने असा विजय मिळविण्याची ही बहुदा पहिलीच वेळ आहे. शिवसेनेने उत्तर प्रदेशात आज झालेल्या 16 शहरातील सर्व महापालिका निवडणुकीत उमेदवार उभे केले होते. मात्र, केवळ एकच नगरसेवक निवडून आला आहे. याआधी मार्च महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीतही शिवसेनेने उमेदवार उभे केले होते. मात्र, बहुतेक उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले होते. शिवसेनेला भाजपने दूर केल्यापासून उद्धव ठाकरे यांनी बाहेरील राज्यात स्वबळावर पक्षाचा जम बसविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मात्र, अद्याप यश आलेले नाही.
2015 मध्ये बिहारमध्ये शिवसेनेने उमेदवार उभे केले होते. तेथेही सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले होते. आता गुजरातमध्ये भाजपला अपशकून घडविण्यासाठी गुजरातमध्ये विधानसभेच्या 182 जागांपैकी सुमारे 50 ठिकाणी उमेदवार उभे केले आहेत.

एमआयएमनंही खातं उघडलं

उत्तर प्रदेशातल्या या निवडणुकींमध्ये एमआयएमनंही खातं उघडलं आहे. उत्तर प्रदेशामध्ये एमआयएमचे १२ नगरसेवक, ५ नगर पालिका परिषद सदस्य, एक नगर पंचायत अध्यक्ष आणि ३ नगर पंचायत सदस्य निवडून आले आहेत.

'आप'नंही जिंकल्या जागा

या निवडणुकांमध्ये आपनंही काही जागा जिंकण्यात यश मिळवलं आहे. संध्याकाळी ४ वाजेपर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार आपचे महापालिकांमध्ये दोन, नगर पालिकेमध्ये सहा, नगर पंचायत अध्यक्ष एक आणि नगर पंचायतीचे १४ सदस्य निवडून आले आहेत.

कुल जनपदकुल निकायमहापौर पदनिर्वाचन परिणामपार्षद पदनिर्वाचन परिणामन0पा0परि0 अध्यक्षनिर्वाचन परिणामन0पा0परि0 सदस्यनिर्वाचन परिणामन0पं0 अध्यक्षनिर्वाचन परिणामन0पं0 सदस्यनिर्वाचन परिणाम
756521616130012991981985261526043843854345433
क्रमांकपार्टी का नामनगर निगम महापौरजीते महापौर का %नगर निगम पार्षदजीते पार्षद का %नगर पालिका परिषद अध्यक्षजीते नगर पालिका परिषद अध्यक्ष का %नगर पालिका परिषद सदस्यजीते नगर पालिका परिषद सदस्य का %नगर पंचायत अध्यक्षजीते नगर पंचायत अध्यक्ष का %नगर पंचायत सदस्यजीते नगर पंचायत सदस्य का %
1आम आदमी पार्टी0030.2300170.3220.46190.35
2ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन00120.920070.1310.2360.11
3ऑल इण्डिया फारवर्ड ब्लाक00000020.0410.23130.24
4जनता दल (सेक्यूलर)000000000000
5जनता दल(यूनाईटेड)000000000000
6नेशनलिस्ट कांग्रेस पार्टी000000000010.02
7बहुजन समाज पार्टी212.514711.312914.652624.984510.272184.01
8भारत की कम्युनिस्ट पार्टी (मा0ले0) (लिवरेशन)000000000000
9भारत की कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी)000000000010.02
10भारतीय कम्युनिस्ट पार्टी000010.5170.130000
11भारतीय जनता पार्टी1487.559645.857035.3592217.5310022.8366412.22
12भारतीय राष्ट्रीय कांग्रेस001108.4694.551583173.881262.32
13राष्ट्रीय जनता दल0000000020.4660.11
14राष्ट्रीय लोक दल0040.3100110.2130.68340.63
15लोक जनशक्ति पार्टी000000000000
16शिव सेना0010.080020.040010.02
17समता पार्टी000000000000
18समाजवादी पार्टी0020215.544522.734779.078318.954538.34


क्रमांक जनपद महापौर पद पार्षद पद अध्यक्ष सदस्य न.पं. अध्यक्ष न.पं. सदस्य
1 सहारनपुर 1 70 4 100 6 77
2 मुज़फ्फरनगर 0 0 2 75 8 115
3 शामली 0 0 3 75 7 95
4 मेरठ 1 90 2 50 13 176
5 बागपत 0 0 3 75 5 60
6 गाजियाबाद 1 100 4 140 4 46
7 गौतमबुद्ध नगर 0 0 1 25 5 59
8 बुलंदशहर 0 0 9 237 8 98
9 हापुड़ 0 0 3 91 1 10
10 बिजनौर 0 0 12 300 6 85
11 अमरोहा 0 0 5 134 3 42
12 मुरादाबाद 1 70 2 50 7 108
13 रामपुर 0 0 5 143 3 45
14 सम्भल 0 0 3 87 5 64
15 बरेली 1 80 4 100 15 192
16 पीलीभीत 0 0 3 77 6 67
17 शाहजहांपुर 0 0 4 119 6 76
18 बदायूं 0 0 7 179 13 149
19 अलीगढ़ 1 70 2 50 9 104
20 हाथरस 0 0 2 52 7 84
21 एटा 0 0 4 100 5 53
22 कासगंज 0 0 3 75 7 83
23 मथुरा 1 70 1 25 13 143
24 आगरा 1 100 5 125 7 85
25 फिरोज़ाबाद 1 70 3 75 3 36
26 मैनपुरी 0 0 1 32 8 102
27 फ़र्रुखाबाद 0 0 2 67 4 56
28 कन्नौज 0 0 3 75 5 63
29 इटावा 0 0 3 90 3 33
30 औरैया 0 0 1 25 6 79
31 कानपुर नगर 1 110 2 50 2 21
32 कानपुर देहात 0 0 2 50 7 85
33 जालौन 0 0 4 109 6 64
34 ललितपुर 0 0 1 26 3 32
35 झांसी 1 60 5 125 7 77
36 महोबा 0 0 2 50 3 40
37 हमीरपुर 0 0 3 75 4 49
38 बांदा 0 0 2 56 6 65
39 चित्रकूट 0 0 1 25 2 24
40 फतेहपुर 0 0 2 59 5 66
41 कौशाम्बी 0 0 0 0 6 70
42 इलाहाबाद 1 80 0 0 9 121
43 प्रतापगढ़ 0 0 1 25 8 99
44 रायबरेली 0 0 1 34 8 93
45 उन्नाव 0 0 3 85 15 166
46 हरदोई 0 0 7 176 6 67
47 लखनऊ 1 110 0 0 8 96
48 सीतापुर 0 0 6 155 5 67
49 लखीमपुर खीरी 0 0 4 105 6 77
50 अमेठी 0 0 2 50 2 22
51 बाराबंकी 0 0 1 29 12 152
52 सुलतानपुर 0 0 1 25 3 31
53 अम्बेडकर नगर 0 0 3 75 2 28
54 फैजाबाद 1 60 1 25 3 34
55 बहराइच 0 0 2 56 2 24
56 श्रावस्ती 0 0 1 25 1 12
57 बलरामपुर 0 0 2 50 2 27
58 गोंडा 0 0 3 77 4 45
59 बस्ती 0 0 1 25 4 51
60 सिद्धार्थ नगर 0 0 2 50 4 53
61 सन्त कबीर नगर 0 0 1 25 3 38
62 गोरखपुर 1 70 0 0 8 101
63 महराजगंज 0 0 2 50 5 63
64 कुशीनगर 0 0 3 77 4 55
65 देवरिया 0 0 2 50 9 116
66 आजमगढ़ 0 0 2 50 11 122
67 मऊ 0 0 1 42 9 131
68 बलिया 0 0 2 50 8 117
69 गाज़ीपुर 0 0 3 75 5 61
70 चन्दौली 0 0 1 25 3 40
71 वाराणसी 1 90 1 25 1 10
72 जौनपुर 0 0 3 89 6 79
73 भदोही 0 0 2 50 5 63
74 मीरजापुर 0 0 3 88 1 12
75 सोनभद्र 0 0 1 25 7 83

                    

 POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) 

                                      पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब)



No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.