गुजरात निवडणूक निकाल - २०१७
GUJARAT RESULT STATUS
अंतिम निकाल
2017 विधानसभा निकाल | गुजरात | हिमाचल |
एकूण जागा | 182 | 68 |
भाजप | 99 | 44 |
काँग्रेस | 77 | 21 |
इतर/अपक्ष | 6 | 3 |
भाजपने गुजरात राखले; हिमाचल जिंकले
दरम्यान, हिमाचल प्रदेशात भाजपने जोरदार मुसंडी मारत काँग्रेसची आणखी एका राज्यातील सत्ता उलथवून टाकली आहे. ६८ पैकी ३० जागा भाजपने जिंकल्या असून १४ जागी भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत तर काँग्रेसचे १७ उमेदवार विजयी झाले असून ४ उमेदवार आघाडीवर आहेत. अद्याप अंतिम निकाल जाहीर झालेले नाहीत.
गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपने सत्ता राखण्यात यश मिळवलं आहे. मात्र पक्षासाठी चिंता वाढवणारी बाब म्हणजे 2014 च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत मतांची टक्केवारी घसरली आहे. भाजपने 2014 ला 60 टक्के मतं मिळवली होती, तर यावेळी विधानसभा निवडणुकीत 49.1 टक्के मतं मिळाली आहेत.काँग्रेसनेही 2014 च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत जवळपास 10 टक्के मतं जास्त मिळवली आहेत. मात्र लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने ही मतं काँग्रेसला पुरेशी नाहीत. 2014 साली काँग्रेसने 33 टक्के मतं मिळवली होती, हा आकडा आता 41.4 टक्क्यांवर गेला आहे. दुसरीकडे 2012 च्या गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत काँग्रेस आणि भाजपच्या मतांची टक्केवारी वाढली आहे. 2012 साली भाजपला 48 टक्के मतं मिळाली होती, तर यंदा हा आकडा 49.1 टक्क्यावर गेला आहे. शिवाय काँग्रेसला 2012 साली 39 टक्के मतं मिळाली होती, तो आकडा आता 41.4 टक्क्यांवर गेला आहे.भाजप आणि काँग्रेस यांच्यातील मतांच्या टक्केवारीत जवळपास 7.7 टक्क्यांचा फरक आहे. 2007 च्या निवडणुकीनंतर पश्चिम गुजरातच्या मतांमध्ये मोठा फरक पाहायला मिळाला आहे. 2007 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या मतांची टक्केवारी 49.12 टक्के, तर काँग्रेसच्या मतांची टक्केवारी 39.63 टक्के होती. म्हणजेच दोन्ही पक्षांच्या मतांच्या टक्केवारीत 9.49 टक्क्यांचा फरक होता, जो 2012 सालच्या विधानसभा निवडणुकीत 9 टक्क्यांवर आला.दरम्यान, 2002 सालच्या दंगलीनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि काँग्रेस यांच्यात 10.4 टक्क्यांचा फरक होता. मात्र इथे लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे, 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने 60 टक्के मतं घेत सर्व जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला एकाही जागेवर विजय मिळवता आला नव्हता. मात्र यावेळी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या मतांमध्ये वाढ झाली आहे.गुजरात विधानसभा निवडणुकीत इतर पक्ष आणि अपक्षांनी मिळून 4.3 टक्के मतं मिळवली आहेत. तर 1.08 टक्के मतदारांना नोटाचा पर्याय निवडला.
भाजपने काँग्रेस मुक्त भारत करण्याचा नारा दिल्यानंतर एकापाठोपाठ एक विजय मिळविण्यास सुरवात केली. 2014 लोकसभा निवडणुकीत भाजपने मोदींच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवत केंद्रात सत्ता स्थापन केली होती. त्यावेळी भाजपकडे 7 राज्यांची सत्ता होती. आता ही संख्या वाढून 19 झाली आहे. तर, काँग्रेसकडे 13 राज्ये होती आता ती संख्या अवघ्या 4 वर आली आहे. त्यामुळे काँग्रेसला मोठा फटका बसल्याचे दिसत आहे. लोकसभा निवडणुकीत देशात मोदी लाटेत भाजपचे 282 खासदार निवडून आले होते. भाजपने अनेक राज्यांमध्ये स्थानिक पक्षांशी आघाडी करून सत्ता मिळविलेली आहे. यामध्ये प्रमुख्याने जम्मू काश्मीर, बिहार, महाराष्ट्र या राज्यांचा समावेश आहे. भाजप आणि काँग्रेस व्यतिरिक्त पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस, तमिळनाडूत अण्णा द्रमुक आणि केरळमध्ये डाव्या पक्षांचे सरकार आहे. कर्नाटक, पंजाब, मेघालय आणि मिझोराममध्ये काँग्रेसचे सरकार आहे. पुढील वर्षी मेघालय, नागालँड, त्रिपूरा, कर्नाटक, राजस्थान आणि मिझोराममध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांमध्ये विजय मिळवून काँग्रेसची वाढ करण्याचे आव्हान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यापुढे आहे.
गुजरात विधानसभा निवडणुकीचे निकाल लागण्यास सोमवारी सकाळपासूनच सुरुवात झाली. यावेळी निवडणुकीच्या रिंगणात 122 महिला उमेदवार आहेत. त्यापैकी 12 महिला उमेदवार भाजपने उतरवल्या. त्यापैकी 11 निवडून आल्या आहेत. उल्लेखनीय बाब म्हणजे, 2012 च्या गुजरात विधानसभा निवडणुकीत एकूण 15 महिला उमेदवार निवडून आल्या होत्या. त्यामध्ये 12 ह्या भाजपच्या महिला आमदार बनल्या होत्या. हाच आकडा 2007 मध्ये 15 होता.
2017 च्या गुजरात विधानसभा निवडणुकीत 1815 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यामध्ये महिलांचा वाटा 7 टक्के (122 उमेदवार) असा आहे.पक्षनिहाय आकडेवारी पाहिल्यास 'आप' ने 2, काँग्रेसने 10 आणि भाजपने 12 महिला उमेदवार दिल्या. तसेच 54 महिलांनी स्वतंत्र उमेदवारी अर्ज दाखल केले.
मोदींच्या जन्मगावातच भाजपचा पराभव
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपने गुजरात विधानसभा निवडणुकीत अपेक्षित यश मिळवलं असलं तरी त्यांना स्वतःच्या बालेकिल्ल्यातच अनपेक्षित धक्का बसला आहे. मोदींचे जन्मगाव वडनगर हे उंझा मतदारसंघात येतं. त्याच मतदारसंघात भाजपला पराभवाचा सामना करावा लागला. या जागेवर काँग्रेसच्या आशा पटेल या निवडून आल्या आहेत.गुजरातमध्ये भाजपने विजयी दिशेने वाटचाल केली आहे. सत्ता खेचून आणण्यात काँग्रेसला अपयश मिळाले असले तरी भाजपला त्यांनी जोरदार धक्का दिला आहे. मोदींचे जन्मगाव वडनगरचा समावेश असलेल्या उंझा मतदारसंघातच भाजपच्या नारायण पटेल यांना पराभूत व्हावे लागले. काँग्रेसच्या आशा पटेल यांनी जवळपास १९ हजार मतांनी विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे प्रचारसभांमध्ये मोदींनी भूमिपूत्र असल्याचे सांगत मतदारांना भावनिक आवाहन केले होते. तरीही स्वतःच्याच बालेकिल्ल्यात मोदींची जादू चालू शकली नाही, असे या निकालावरून स्पष्ट होते. दरम्यान, २०१२ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या आशा पटेल आणि भाजपच्या नारायण पटेल यांच्यात चुरशीची लढत झाली होती. त्यात भाजपच्या नारायण पटेल यांनी बाजी मारली होती.
गुजरातमधील दलित आंदोलनचा चेहरा असलेला युवा नेता जिग्नेश मेवानी यांनी 21 हजार मतांनी दणदणीत विजय मिळवला आहे. बनासकंठा जिल्ह्यातील वडगाम-११ या विधानसभा मतदारसंघातून जिग्नेश मेवानी निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. जिग्नेशने ट्विट करत आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे जाहीर केले होते. काँग्रेससाठी आशेचे किरण असणारे जिग्नेश मेवानी आणि अल्पेश ठाकोर यांनी सुरुवातीपासून आघाडी घेतली होती. जिग्नेश मेवानीला आपचाही पाठिंबा होता.
नोटाच्या आकड्यांवर नजर टाकल्यास १.८ टक्के म्हणजेच सुमारे चार लाखांहून अधिक मतदारांनी कोणत्याही उमेदवाराला मत दिले नाही. ४,४५,०३७ मतदारांनी भाजप किंवा काँग्रेस उमेदवारांना मत न देता NOTA चे बटण दाबले आणि निश्चितच हा मोठा आकडा आहे.
गुजरात विधानसभा निवडणुकीत ज्या मतदारांवर सर्वात जास्त लक्ष होते, ते होते पाटीदार. याचे एक कारणही आहे. गुजरातेत पाटीदारांचा प्रभाव असलेले 83 मतदारसंघ आहेत. 5 वर्षांपूर्वी 2012 च्या निवडणुकीत 59 म्हणजेच 71% जागा भाजपने जिंकल्या होत्या. परंतु, या वेळी काँग्रेसची साथ दिल्यामुळे सर्व लक्ष पाटीदार आंदोलनाचे मुख्य हार्दिक पटेलकडे लागले. तथापि, दोन टप्प्यांतील मतदानादरम्यान पाटीदारांचा प्रभाव असणाऱ्या मतदारसंघात मतांमध्ये लक्षणीय घट पाहायला मिळाली. तथापि, गुजरातेत 9 आणि 14 डिसेंबर असे दोन टप्प्यांत मतदान झाले आणि निकाल सुरू आहेत.
पाटीदारांच्या मतदानामध्ये घट आल्याचा परिणाम कुणावर?
- 20% पाटीदार मतदार 19 वर्षांपासून भाजपचे सरकार निवडण्यात निर्णायक राहिले आहेत. परंतु, या वेळी त्यांचे मतदान प्रभाव असणाऱ्या जागांमध्ये कमी झाल्याचे आढळले. जे 11% पर्यंत आहे. या निकालानंतर ठरले की, मतदानात घट झाल्याचा परिणाम कुणावर पडेल.
प्रभाव असणाऱ्या जागा
|
किती मतदान
|
2012मधील मतदान
|
2017 मध्ये किती मतदान?
|
घट
|
बोटाड
|
20.02%
|
79.26%
|
67.56%
|
-11.69%
|
कामरेज
|
60.84%
|
72.21%
|
64.72%
|
-7.48%
|
वाराच्छा रोड
|
60.62%
|
68.7%
|
62.95%
|
-5.75%
|
मेहसाणा
|
28.27%
|
75.56%
|
69.99%
|
-5.57%
|
विसनगर
|
32.93%
|
75.15%
|
73.68%
|
-1.46%
|
बापूनगर
|
20%
|
67.56%
|
64.31%
|
-3.25%
|
निकोल
|
26%
|
67.78%
|
66.87%
|
-0.91%
|
गुजरात निवडणुकीत भाजपला ४९.१ टक्के मते मिळाली. तर, २०१२मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला ४७.९ टक्के मते मिळाली होती. तीन वर्षांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला ५९.१ टक्के मते मिळाली. लोकसभेला मिळालेल्या मतांशी तुलना केल्यास या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या मतांच्या टक्केवारी मोठी घसरण झाली असल्याचे स्पष्ट होते. दुसरीकडे, काँग्रेसने मागील निवडणुकीच्या तुलनेत यंदा मतांची टक्केवारी वाढवण्यात यश मिळवले आहे. पाच वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसला ३८.९ टक्के मतदान झाले होते. तर यावेळी यात वाढ होऊन ४१.४ टक्के मतदान मिळाले आहे. मिळालेल्या मतदानाची टक्केवारी अधिक असूनही भाजपला कमी जागा का मिळाल्या याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत.भाजपला शहरी भागात चांगले यश मिळाले. तर, ग्रामीण भागात काँग्रेसने यश मिळवले. शहरी भागात भाजपने अनेक जागांवर भाजपने मोठ्या मताधिक्याने काँग्रेसचा पराभव केला. शहरी भागातील ३३ जागांवर भाजप उमेदवारांनी सरासरी ४७,४०० मतांच्या फरकाने विजय मिळवला. तर, ग्रामीण भागात २६ हजार मतांच्या फरकाने विजय मिळवला. त्यामुळे भाजपला मतदान चांगले झाले मात्र त्या प्रमाणात जागा जिंकता आल्या नाहीत. काँग्रेसच्या विजयी उमेदवारांना मोठ्या फरकाने विजय मिळवता आला नाही. सौराष्ट्रमध्ये भाजपला २३ जागा आणि काँग्रेसला ३० जागांवर विजय मिळाला. मात्र, भाजपला ४५.९ टक्के आणि काँग्रेसला ४५.५ टक्के मते मिळाली.
देशातील 29 पैकी 19 राज्यात भाजप-एनडीएची सत्ता
भाजप आणि एनडीची सध्या देशातील 29 पैकी 19 राज्यांमध्ये सत्ता आहे. यापैकी 14 राज्यांमध्ये भाजपचा मुख्यमंत्री आहे. त्यामुळे 2014 च्या लोकसभा निवडणुकीपासून विजयरथावर सवार झालेल्या भाजपची विजयी घोडदौड सुरुच आहे.देशातील विधानसभा निवडणुकांत एकापाठोपाठ एक राज्ये पादाक्रांत करणाऱ्या भारतीय जनता पक्षाला सोमवारी, नाताळच्या आधीच गुजरात व हिमाचल प्रदेश निवडणुकांतील विजयाची भेट मिळाली. या पक्षाने गुजरातेत सलग सहावा विजय मिळवला, तर काँग्रेसकडून हिमाचलची सत्ता खेचून घेतली. मात्र, काँग्रेसने दिलेल्या कडव्या लढतीमुळे गुजरातेत सत्ता राखताना भाजपची चांगलीच दमछाक झाली असून, त्यांचे संख्याबळ ११५वरून ९९पर्यंत घसरले आहे. तर ६१वरून ७७ जागांपर्यंतच्या वाढीव बळाच्या रूपाने, काँग्रेसचे अध्यक्षपद नुकतेच हाती घेणारे राहुल गांधी यांनाही नाताळभेट मिळाली आहे.
देशात भाजप -
गुजरात
राजस्थान
छत्तीसगड
मध्यप्रदेश
महाराष्ट्र
हरियाणा
गोवा
मणिपूर
झारखंड
अरुणाचल प्रदेश
उत्तराखंड
उत्तर प्रदेश
हिमाचल प्रदेश
आसाम
भाजप आणि एनडीएची राज्य
नागालँड
आंध्र प्रदेश
बिहार
सिक्कीम
जम्मू आणि काश्मीर
काँग्रेसच्या हातात केवळ 4 राज्य
हिमाचल प्रदेश हातातून गेल्यानंतर काँग्रेसकडे आता केवळ 4 राज्य उरली आहेत. यापैकी मिझोराम, मेघालय आणि कर्नाटकमध्ये पुढच्या वर्षी निवडणूक होत आहे. तर मोठ्या राज्यांपैकी केवळ पंजाब काँग्रेसकडे आहे. त्यामुळे उर्वरित तीन राज्य वाचवण्याचं आव्हान येत्या काळात काँग्रेसपुढे असेल.
कर्नाटक
पंजाब
मेघालय
मिझोराम
12 जागांवर काँग्रेसचा निसटता पराभव -
1. गोध्रा - गोध्रा हत्याकांडानंतर प्रकाशझोतात आलेल्या या मतदारसंघात काँग्रेसचा अगदी निसटता पराभव झाला आहे. केवळ 258 मतांनी या जागेवर भाजपच्या सी. के. राऊलजी यांचा काँग्रेसच्या राजेंद्रसिंह परमार यांचा पराभव केला. विशेष म्हणजे, सी. के. राऊलजी हे आधी काँग्रेसमध्येच होते. मात्र, या विधानसभेआधी ते भाजपच्या गोटात सामिल झाले. राऊलजी यांना रोखण्यात काँग्रेसला यश आले असते, तर गोध्राची जागा काँग्रेसच्या खात्यात असती.
2. धोलका - या जागेवर भाजपच्या भूपेंद्रसिंह मनुभा चुडासमा यांनी काँग्रेसच्या अश्विनभाई राठोड यांचा पराभव केला. मात्र भाजपच्या विजयी उमेदवाराने काँग्रेसच्या उमेदवारापेक्षा केवळ 327 जास्त जागा मिळवल्या आहेत.
3. बोटाद - भाजपचे सौरभ पटेल यांनी या जागेवर बाजी मारली. काँग्रेसच्या धीरजलाल कठथीया यांचा पराभव केला आहे. दोघांच्या मतांमधील फरक केवळ 906 एवढा आहे. या मतदारसंघातून एकूण 17 अपक्ष उमेदवार उभे राहिले होते. त्यांचा फटका काँग्रेसला बसला.
4. विजापूर - पाटीदार समाजाचं वर्चस्व असलेल्या या मतदारसंघात भाजपने विजय मिळवला आहे. विजापुरात भाजपचे रमणभाई पटेल यांनी काँग्रेसच्या नाथाभाई पटेल यांचा 1164 जागांनी पराभव केला.
5. हिमतनगर - भाजपच्या राजेंद्रसिंह चावडा यांनी काँग्रेसच्या कमलेशभाई पटेल यांचा 1712 मतांनी पराभव केला. इथे काँग्रेसने मेहनत घेतली असता, विजय मिळवता आला असता.
6. गारियाधार - केशुभाई नाकराणी या भाजप उमेदवाराने काँग्रेसच्या परेशभाई खेनी यांचा केवळ 1876 मतांनी पराभव केला.
7. उमरेठ - भाजपच्या गोविंदभाई परमार यांनी काँग्रेसच्या कपीलाबेन चावडा यांचा 1883 मतांनी पराभव केला. इथेही काँग्रेसने फार लक्ष न दिल्याचे बोलले जाते. त्यामुळे जागा हातून निसटली.
8. राजकोट ग्रामीण - या जागेवर केवळ 2179 मतांनी भाजपच्या उमेदवाराचा विजय झाला. भाजपच्या लाखाभाई सागठीयांना 92 हजार 114, तर काँग्रेसच्या वश्रामभाई सागठीयांना 89 हजार 935 मतं मिळाली.
9. खंभात - भाजपच्या महेशकुमार रावल यांनी काँग्रेसच्या खुशमनभाई पटेल यांना 2 हजार 318 मतांनी पराभूत केले.
10. वागरा - 2 हजार 628 मतांनी भाजपच्या अरुणसिंह रणा यांनी काँग्रेसच्या सुलेमानभाई पटेल यांचा पराभव केला.
11. फतेहपुरा - भाजपच्या रमेशभाई कटारा यांनी काँग्रेसच्या रघूभाई मच्छर यांचा 2 हजार 711 मतांनी पराभव केला.
12. विसनगर - ऋषिकेश पटेल हे भाजपचे उमेदवार 2 हजार 869 मतांनी विजयी झाले. इथे काँग्रेसच्या महेंद्रकुमार पटेल पराभूत झाले.
गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकांतील दुहेरी विजयांमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आणखी वेगाने आर्थिक सुधारणा करण्याची प्रेरणा मिळणार आहे, तर या दोन्ही निवडणुकांमध्ये पराभूत होऊनही काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना या निकालाने देशाच्या राजकारणात प्रस्थापित केले आहे. घसघशीत बहुमताऐवजी निसटत्या फरकाने सरकार स्थापन करण्याची संधी देत गुजराती जनतेने पंतप्रधान मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना एकप्रकारे आपल्या रोषाची जाणीवच करून दिली आहे. पुढच्या वर्षी सात राज्यांमध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला संघर्ष करावा लागणार, याचे संकेत या निकालांनी दिले आहेत.
गुजरातमध्ये २०१२ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत भाजपला सव्वा टक्का मतांचा लाभ झाला असला, तरी काँग्रेसविरुद्ध सोळा जागा गमवाव्या लागल्या आहेत. २२ वर्षांमध्ये प्रथमच भाजपचे संख्याबळ शंभराखाली घसरले. दुसरीकडे काँग्रेसने भाजपपेक्षा दुप्पट, म्हणजे अडीच टक्के मतांची कमाई करीत मागच्या तुलनेत १९ जागा जास्त जिंकल्या. पुढच्या वर्षी कर्नाटक, मिझोराम, मेघालय, त्रिपुरा, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ या सात राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला संघर्ष करावा लागणार याचे संकेत या निकालांनी दिले आहेत.हिमाचल प्रदेशात बुजूर्ग वीरभद्र सिंह यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस सरकारने भाजपचा फारसा प्रतिकारच केला नाही. राहुल गांधी यांनीही हिमाचल प्रदेशऐवजी सारी ताकद गुजरातवरच केंद्रीत केली होती. त्यामुळे हिमाचल प्रदेशात भाजपचा एकतर्फी विजय होणार, हे अपेक्षितच होते. गुजरातमध्ये मात्र समाजातील सर्वच स्तरांमध्ये पंतप्रधान मोदी आणि अमित शहांविरुद्ध असंतोष जाणवत होता. पाटीदार आंदोलनाचे नेते हार्दिक पटेल, दलित नेते जिग्नेश मेवानी, काँग्रेसमध्ये परतलेले ओबीसी नेते कल्पेश ठाकोर या तरुण नेत्यांशी हातमिळवणी करून राहुल गांधींनी मोदी-शहांना शह देण्याची रणनीती आखली. दोन टप्प्यांमध्ये झालेल्या या निवडणुकीत हिंदू-मुस्लीम ध्रुवीकरणाला वाव मिळणार नाही, अशी परिस्थिती निर्माण करताना राहुल गांधींनी राफेल विमान सौदा, जय शहांची नफेखोरी, नोटाबंदी, जीएसटी, पाटीदारांचे आरक्षण, बेरोजगारी, महागाई या मुद्द्यांवर प्रचार करीत पंतप्रधान मोदी आपल्या पसंतीच्या मूठभर उद्योगपतींना सढळ हस्ते मदत करीत असल्याचे आरोप केले.
विजयी उमेदवार -
भाजपचे मुकेशभाई पटेल (ओलपाड)
भाजपचे नरेशभाई पटेल (गंदेवी)
भाजपचे प्रदिपसिंह भागवतसिंह जडेजा (वाटवा)
भाजपचे सुरेशभाई पटेल (मनिनगर)
भाजपचे राकेशभाई शाह (एलिस ब्रिज)
भाजपचे किशोर चौहान (वेजालपुर)
भाजपचे पुर्णेश मोदी (पश्चिम सुरत)
भाजपचे विनोदभाई मोरडीया (कतारगाम)
भाजपचे राजेंद्र त्रिवेदी (रावपुरा)
भाजपचे सीमाबेन मोहीले (अकोटा)
भाजपचे सुमाबेन चौहान (कलोल)
भाजपचे कौशिकभाई पटेल (नरनपुरा)
भाजपचे भारतभाई पटेल (वलसद)
भाजपचे पियुषभाई देसाई (नवसारी)
भाजपचे जितेंद्र सुखदिया (सयाजीगुंज)
काँग्रेसचे जेनीबेन ठाकोर (वाव)
भाजपचे योगेश पटेल (मंजलपुर)
भाजपचे कनुभाई देसाई (परडी)
भाजपचे शंभुजी ठाकोर (गांधीनगर)
काँग्रेसचे किर्तीकुमार पटेल (पाटन)
काँग्रेसचे आनंदभाई चौधरी (मंडवी)
काँग्रेसचे विमलभाई चौदसमा (सोमनाथ)
अपक्ष जिग्नेश मेवाणी (वाडगाम)
भाजपचे अरविंद रायानी (राजकोट)
काँग्रेसचे परेश धनानी (अम्रेली)
भाजपचे बाबुभाई बोखीरिया (पोरबंदर)
भाजपचे भुपेंद्र सिंग चुदस्मा (ढोलका)
पराभूत उमेदवार -
काँग्रेसचे शशिकांत पटेल (घटलोदीया)काँग्रेसचे योगेंद्रसिंह बक्रोला (ओलपाड)
काँग्रेसचे सुरेशभाई मगनभाई हलपती (गंदेवी)
काँग्रेसचे बिपीनचंद्र पटेल (वाटवा)
काँग्रेसचे श्वेताबेन ब्राहमभट (मनिनगर)
काँग्रेसचे विजयकुमार दवे (एलिस ब्रिज)
काँग्रेसचे मिहीरभाई शाह (वेजालपुर)
काँग्रेसचे इक्बाल पटेल (पश्चिम सुरत)
काँग्रेसचे जिग्नेश जिवानी (कतारगाम)
काँग्रेसचे चंद्रकांत श्रीवास्तव (रावपुरा)
काँग्रेसचे रणजित चौहान (अकोटा)
काँग्रेसचे प्रद्युमसिंह परमार (कलोल)
काँग्रेसचे नितीनभाई पटेल (नरनपुरा)
काँग्रेसचे नरेंद्रकुमार तंडेल (वलसद)
काँग्रेसचे भावनाबेन पटेल (नवसारी)
काँग्रेसचे नरेंद्र रावत (सयाजीगुंज)
भाजपचे शंकरभाई चौधरी (वाव)
काँग्रेसचे चिराग झवेरी (मंजलपुर)
काँग्रेसचे भारतभाई मोहनभाई पटेल (परडी)
काँग्रेसचे गोविंदजी सोलंकी (गांधीनगर)
भाजपचे रंछोडभाई देसाई (पाटन)
भाजपचे प्रविणभाई चौधरी (मंडवी)
भाजपचे जशाभाई बराड (सोमनाथ)
भाजपचे विजयकुमार चक्रवर्ती (वाडगाम)
काँग्रेसचे मितुल डोंगा (राजकोट)
भाजपचे बावकुभाई उन्हाड (अम्रेली)
काँग्रेसचे अर्जुनभाई मोधवाडीया (पोरबंदर)
काँग्रेसचे शक्तीसिंह सिसोदीया (ढोलका)
शिवसेनेच्या सर्व उमेदवारांचं डिपॉझिट जप्त
राज्यासह केंद्रात सत्तेत असूनही शिवसेना सातत्याने विरोधकाची भूमिका बजावत आहे. इतकंच नाहीतर गुजरातमध्ये भाजपची डोकेदुखी वाढवण्यासाठी शिवसेनेने विधानसभा निवडणुकीसाठी 36 जागांवर पक्षाचे उमेदवार उभे केले होते.परंतु या निवडणुकीत शिवसेनेला जबर फटका बसला. सर्वच उमेदवारांचं डिपॉझिट जप्त होण्याची वेळ शिवसेनेवर आली आहे. महत्त्वाचं म्हणजे 36 उमेदवारांना मिळून जवळपास फक्त 28 हजार 660 मतं मिळाली आहेत. ही मतं एकूण मतदानाच्या 0.08 टक्के आहेत.तर शिवसेनेच्या केवळ आठ उमेदवारांनाच एक हजार मतांचा ओलांडता आला. यापैकी लिंबायत मतदारसंघातील सम्राट पाटील यांना सर्वाधिक 4 हजार 75 मतं पडली आहेत. इथे भाजपच्या संगीता पाटील यांचा विजय झाला.शिवसेनेच्या या उमेदवारांची डिपॉझिट जप्त
उमेदवार मतं मतदारसंघ
दीपकभाई पाटील 1308 आमराईवाडी
विरलकुमार गोहिल 419 भरुच
संजयभाई मकवाना 1674 भावनगर पश्चिम
कल्पेशकुमार पटेल 963 बोरसड
सुराभाई खांबालिया 815 बोताड
अरविंद राजपूत 1104 चोरयासी
जयदीपभाई वाला 270 धारी
रनमलभाई गोधम 295 द्वारका
हितेश ठाकर 278 एलिसब्रीज
संजयकुमार चौहान 465 गांधीनगर दक्षिण
दीपक अहिर 245 जामनगर उत्तर
ओतमचंद हरनिया 287 जामनगर ग्रामीण
ब्रिजेश नंदा 415 जामनगर दक्षिण
हसमुखभाई शकोरिया 360 जसदान
नरेंद्र सोराठिया 431 कामरेज
बळवंतभाई वारिया 395 कतरगाम
नथुभाई माळदे 308 खंभालिया
सम्राट पाटील 4075 लिंबायत
मयुर पांचाळ 504 मांजलपूर
योगेशकुमार पटेल 203 मतर
दीपकभाई गोगरा 768 मोरबी
राहुलसिंह राजपूत 957 नरोदा
विजयकुमार पटेल 289 ओलपाड
आबाजी जाधव 620 परडी
मुकेशभाई जोशी 1097 पाटन
राजेश पंड्या 209 पोरबंदर
अश्विनकुमार चंदी 344 राधनपूर
निशांतभाई पटेल 230 राजकोट दक्षिण
केतन चंदरना 578 राजकोट पश्चिम
जोरुभाई पटेल 966 सनांद
विजयसिंह महिदा 1343 सावली
वाल्मिक पाटील 378 सयाजीगुंज
लालाभाई गढवी 2268 शेहरा
प्रशांत लोकरे 208 सूरत पश्चिम
विलास पाटील 2901 उधना
रणजी गोहिल 691 वाव
===================================
भाजपची वाढती शक्ती -काँग्रेसची घटती ताकद
गुजरातेत २५ वर्षांत प्रथमच भाजप शंभरीही गाठू शकला नाही. ९९ जागांवर थांबला. तथापि, गुजरातेत २०१२ च्या तुलनेत त्यांची मते १ टक्के वाढली आहे, ही त्यांच्यासाठी समाधानाची बाब. मात्र त्यांना १५ जागा गमवाव्या लागल्या. १९९५ पासून आजवर भाजप व काँग्रेसमधील मतांचे अंतर हे सर्वात कमी म्हणजे केवळ ७.७% इतकेच उरले आहे. २०१२ मध्ये ते सुमारे ९% होते. इंदिरांनंतर माेदी पहिले पंतप्रधान ज्यांनी कार्यकाळातील पहिल्या ३ वर्षांत १८ पैकी १२ निवडणुका जिंकल्या. इंदिराजींनी १९६७ मध्ये पंतप्रधान झाल्यानंतर ३ वर्षांत १७ पैकी १३ निवडणुका जिंकल्या.भाजपची वाढती शक्ती - ७०% खासदार भाजप-शासित १८ राज्यांतून आहेत. १९९३ मध्ये काँग्रेस, आघाडीची १८ राज्यांत सत्ता होती. ४८% खासदार काँग्रेसशासित राज्यांचे होते.
काँग्रेसची घटती ताकद - काँग्रेसचे ७६६ आमदार उरलेत,इतिहासात सर्वात कमी.
दुसरीकडे, २४ वर्षांत भाजपचे १४२८ आमदार झाले आहेत. कोणत्याही पक्षाचे आजवरचे सर्वाधिक.
भाजपचा कमकुवत विजय - ५६% जागा जिंकल्यात भाजपने गुजरातेत.जागांच्या हिशेबाने १४ भाजपशासित राज्यांत आठव्या स्थानावर.यूपीच्या तुलनेत २१% जागा कमी जिंकल्या आहेत. हिमाचलात ६३% जागा जिंकून सहाव्या स्थानावर.
गुजरात आणि हिमाचल प्रदेशमध्ये विजयानंतर भाजपचे आता देशातील १४ राज्यांत स्वत:चे मुख्यमंत्री असतील. ५ राज्यांत त्यांची आघाडी सरकारे आहेत. हिमाचल प्रदेशमध्ये भाजपने ६८ पैकी ४४ आणि गुजरातमध्ये १८२ पैकी ९९ जागा जिंकल्या आहेत. भाजपला हिमाचल प्रदेशमध्ये ६५% आणि गुजरातमध्ये ५४% जागा मिळाल्या आहेत. जागांच्या हिशेबाने पाहिले तर गेल्या पाच वर्षांत भाजपशासित राज्यांत हिमाचलमधील ६ वा आणि गुजरातमधील ८ वा मोठा विजय आहे. सर्वात मोठा विजय या वर्षी उत्तराखंडमध्ये मिळाला होता. तेथे भाजपने ७० पैकी ५७ जागा जिंकल्या होत्या, म्हणजे ८१% जागा जिंकून सरकार बनवले. दुसऱ्या क्रमांकावर राजस्थान आहे. तेथे भाजपने २०० पैकी १६१ जागा जिंकल्या होत्या, म्हणजे ८०% जागा. उ. प्र.त भाजपने ४०३ पैकी ३११ जागा जिंकल्या. म्हणजे ७७% जागा. ज्या राज्यांत भाजपचे मुख्यमंत्री आहेत, त्यात गुजरात हे विधानसभा जागांच्या हिशेबाने पाचवे मोठे राज्य आहे. त्यापेक्षा जास्त विधानसभा जागा असणारी उ. प्र., महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान ही राज्ये आहेत. महाराष्ट्रात भाजपला २८८ पैकी १२२ जागा मिळाल्या होत्या, म्हणजे ४२% जागांसह सरकार बनवले. मध्य प्रदेशमध्ये भाजपने २३० पैकी १६५ जागा जिंकल्या, म्हणजे ७२%. आसाममध्ये भाजपने १२८ पैकी ६१ जागा जिंकल्या, म्हणजे ४८%. ज्या १४ राज्यांत भाजपचे मुख्यमंत्री आहेत, त्यापैकी ८ राज्यांत १०० पेक्षा कमी विधानसभा जागा आहेत. त्यात हरियाणा, छत्तीसगड, उत्तराखंड, अरुणाचल प्रदेश, हिमाचल प्रदेश, गोवा, मणिपूर ही राज्ये. सर्वात कमी ४० जागा गोव्यात आहेत. तेथे भाजपने १३ जागा जिंकल्या होत्या, म्हणजे ३२% जागा जिंकून सरकार बनवले. ही भाजपशासित राज्यांत जागांच्या हिशेबाने विजयाची सर्वात कमी सरासरी आहे. मणिपूरमध्ये ६० विधासनभा जागा आहेत. तेथे भाजपचे ३१ आमदार आहेत, म्हणजे ५२% जागा भाजपकडे आहेत. अरुणाचल प्रदेशमध्ये ६० विधानसभा जागा आहेत. तेथे भाजपकडे ४७ आमदार आहेत. म्हणजे ७८% जागा आहेत.
६ भाजपशासित राज्ये अशी आहेत, जेथे १०० पेक्षा जास्त विधानसभा जागा आहेत.
८ भाजपशासित राज्यांत १०० पेक्षा कमी विधानसभा जागा आहेत.
विजयी-पराभूत उमेदवारांच्या मतांमधील फरकापेक्षा जास्त नोटा वापरलेले निवडक मतदारसंघ
12 जागांवर काँग्रेसचा निसटता पराभव
काँग्रेसला बहुमताचा आकडा गाठण्यासाठी 12 जागा कमी पडल्या. मात्र, गुजरातमध्ये 12 जागांवर 3 हजारहून कमी मतांनी भाजपने विजय मिळवला. या जागांवर काँग्रेस दुसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे इथे काँग्रेसने आणखी थोडी मेहनत घेतली असती, तर त्या जागा पदरात पाडून घेता आल्या असत्या आणि सत्ता काबीज करता आली असती.गोध्रा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराचा 258 मतांनी, धोलका मतदारसंघात 327 मतांनी पराभव झाला. त्याचसोबत, बोटाद, विजापूर, हिमतनगर, गारियाधार, उमरेठ, राजकोट ग्रामीण, खंभात, वागरा, फतेहपुरा आणि विसनगर या मतदारसंघातही काँग्रेसला 3 हजारहून कमी मतांनी पराभवाला सामोरं जावं लागलं.
काही मतदार संघात नोटा निर्णायक
गुजरातमधील नोटा पर्यायाचे महत्त्व अधिक ठरते. कारण अनेक जागांवर भाजप व काँग्रेसमध्ये काट्याची टक्कर होऊन अल्प मताने उमेदवार विजयी झाले आहेत. कपराडा विधानसभा मतदार संघात काँग्रेसच्या जीतूभाई चौधरी यांनी भाजपच्या मधुभाई राऊत यांचा १७० मतांनी पराभव केला. जिथे नोटा हा पर्याय ३८६८ लोकांनी निवडला आहे.
हिमाचलमध्ये नोटा पाचव्या स्थानी
हिमाचल प्रदेश निवडणुकीतही नोटा हा पर्याय मतदारांनी निवडला आहे. त्या ठिकाणी पाचव्या क्रमांकाची पसंती नोटा या पर्यायाला मिळाली आहे. भाजप, काँग्रेस, अपक्ष आणि माकप यांनाच अधिक मते आहेत. या ठिकाणी ०.९ टक्के लोकांनी नोटा निवडले आहे.
काय आहे 'नोटा'?
निवडणुकीच्या रणांगणातील उमेदवार पसंत नसतील तर मतदारांसाठी ईव्हीएम मशीनमध्ये नोटा हा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. याद्वारे मतदार निवडणूक लढविणारा कोणताही उमेदवार आपला प्रतिनिधी बनण्यास लायक नाही हे ठरवू शकतो. सर्वोच्च न्यायालाच्या आदेशानुसार २०१३ मध्ये नोटा या पर्यायाचा समावेश करण्यात आला आहेत. पहिल्यांदा याचा वापर छत्तीसगड, राजस्थान, मध्य प्रदेश, दिल्ली आणि मिझोराम विधानसभा निवडणुकीत करण्यात आला होता. त्यानंतर प्रथमच नोटाला एकूण मतदानाच्या १.८ टक्के मते मिळाली आहेत.
'नोटा'चा राष्ट्रीय विक्रम
गुजरात व हिमाचल प्रदेश निवडणुकीत गुजरात सहाव्यांदा ताब्यात घेत भाजपने हिमाचलही काँग्रेसकडून घेतला आहे. या निवडणुकीत मतदारांनी कोणताही उमेदवार पसंत नाही म्हणजेच 'नोटा'ला मोठी पसंती दिली आहे. एखाद्या राज्याच्या निवडणुकीत १.८ टक्के लोकांनी 'नोटा' हा पर्याय निवडणे हे देशात विक्रमी ठरले आहे. नोटा हा पर्याय उपलब्ध झाल्यापासून एवढ्या मोठ्या प्रमाणात मतदारांना उमेदवार पसंतीस न येणारे गुजरात पहिलेच राज्य आहे. निवडणूक मैदानातील कोणताही उमेदवार पसंत नसणे हे चिंताजनक आहे. मात्र, तरीही गुजरातमध्ये भाजप व काँग्रेस वगळता इतर राजकीय पक्षांपेक्षा 'नोटा'ला अधिक मतदारांनी निवडले आहे. हे राजकीय समीकरणे बिघडवणारे ठरत आहे. गुजरातमध्ये ५ लाख ५१ हजार ६१५ मतदारांनी नोटाला मत दिले आहे. अर्थात भाजपला ४९.१, काँग्रेस ४१.४ आणि अपक्षांना ४.३ टक्के मते मिळाली आहेत. त्यानंतर नोटाला १.८ टक्के मते मिळाली आहेत. विशेष म्हणजे नोटापेक्षा आम आदमी पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, बहुजन समाज पक्ष आणि इतर स्थानिक पक्षांना कमी जनादेश मिळाला आहे. 'आप'ने गुजरातमध्ये २९ जागांवर उमेदवार दिले होते. पक्षाला एकूण २९ हजार ५१७ मते मिळाली. याच २९ मतदार संघात ७५ हजार ८८० मतदारांनी नोटा हा पर्याय निवडला. नोटा पर्याय निवडणार्यांचे प्रमाण २.५ पट अधिक आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला ०.६, बसपाला ०.७ टक्के मते मिळाली आहेत. तिथे नोटाला मात्र १.८ टक्के मतदारांनी निवडले.काही मतदार संघात नोटा निर्णायक
गुजरातमधील नोटा पर्यायाचे महत्त्व अधिक ठरते. कारण अनेक जागांवर भाजप व काँग्रेसमध्ये काट्याची टक्कर होऊन अल्प मताने उमेदवार विजयी झाले आहेत. कपराडा विधानसभा मतदार संघात काँग्रेसच्या जीतूभाई चौधरी यांनी भाजपच्या मधुभाई राऊत यांचा १७० मतांनी पराभव केला. जिथे नोटा हा पर्याय ३८६८ लोकांनी निवडला आहे.
हिमाचलमध्ये नोटा पाचव्या स्थानी
हिमाचल प्रदेश निवडणुकीतही नोटा हा पर्याय मतदारांनी निवडला आहे. त्या ठिकाणी पाचव्या क्रमांकाची पसंती नोटा या पर्यायाला मिळाली आहे. भाजप, काँग्रेस, अपक्ष आणि माकप यांनाच अधिक मते आहेत. या ठिकाणी ०.९ टक्के लोकांनी नोटा निवडले आहे.
काय आहे 'नोटा'?
निवडणुकीच्या रणांगणातील उमेदवार पसंत नसतील तर मतदारांसाठी ईव्हीएम मशीनमध्ये नोटा हा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. याद्वारे मतदार निवडणूक लढविणारा कोणताही उमेदवार आपला प्रतिनिधी बनण्यास लायक नाही हे ठरवू शकतो. सर्वोच्च न्यायालाच्या आदेशानुसार २०१३ मध्ये नोटा या पर्यायाचा समावेश करण्यात आला आहेत. पहिल्यांदा याचा वापर छत्तीसगड, राजस्थान, मध्य प्रदेश, दिल्ली आणि मिझोराम विधानसभा निवडणुकीत करण्यात आला होता. त्यानंतर प्रथमच नोटाला एकूण मतदानाच्या १.८ टक्के मते मिळाली आहेत.
Gujarat
| ||||||||||||||||||
Status Known For 182 out of 182 Constituencies
|
Assembly Election Result 2012
| |||||||||||||||||
Constituency | Const. No. | Leading Candidate | Leading Party | Trailing Candidate | Trailing Party | Margin | Status | Winning Candidate | Winning Party | Margin | ||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
Abdasa | 1 | JADEJA PRADHYUMANSINH MAHIPATSINH |
|
|
| 9746 | Result Declared | CHHABILBHAI NARANBHAI PATEL | Indian National Congress | 7613 | ||||||||
Akota | 143 | SEEMABEN AKSHAYKUMAR MOHILE |
| RANJIT SHARADCHANDRA CHAVAN |
| 57139 | Result Declared | SAURABH PATEL | Bharatiya Janata Party | 49867 | ||||||||
Amraiwadi | 50 | PATEL HASMUKHBHAI SOMABHAI ( H. S. PATEL ) |
| CHAUHAN ARVINDSINH VISHVANATHSINH ( ARVIND CHAUHAN ) |
| 49732 | Result Declared | PATEL HASMUKHBHAI SOMABHAI | Bharatiya Janata Party | 65425 | ||||||||
Amreli | 95 |
|
| BAVKUBHAI UNDHAD |
| 12029 | Result Declared | PARESH DHANANI | Indian National Congress | 29893 | ||||||||
Anand | 112 |
|
| YOGESH PATEL (BAPAJI) |
| 5286 | Result Declared | DILIPBHAI MANIBHAI PATEL | Bharatiya Janata Party | 987 | ||||||||
Anjar | 4 |
|
|
|
| 11313 | Result Declared | AHIR VASANBHAI GOPALBHAI | Bharatiya Janata Party | 4728 | ||||||||
Anklav | 110 |
|
| HANSAKUVARBA JANAKSINH RAJ |
| 33629 | Result Declared | AMIT CHAVDA | Indian National Congress | 30319 | ||||||||
Ankleshwar | 154 |
|
| ANILKUMAR CHHITUBHAI BHAGAT |
| 46912 | Result Declared | ISHWARSINH THAKORBHAI PATEL | Bharatiya Janata Party | 31443 | ||||||||
Asarwa | 56 | PARMAR PRADIPBHAI KHANABHAI |
| VAGHELA KANUBHAI ATMARAM |
| 49264 | Result Declared | RAJANIKANT MOHANLAL PATEL (R.M.PATEL) | Bharatiya Janata Party | 35045 | ||||||||
Balasinor | 121 | AJITSINH PARVATSINH CHAUHAN |
|
|
| 10602 | Result Declared | CHAUHAN MANSINH KOHYABHAI | Indian National Congress | 17171 |
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.