Thursday, 14 December 2017

एक्झिट पोलः भाजप पुन्हा सत्तेवर येण्याची शक्यता !

एक्झिट पोलः गुजरात मोदींचेच, काँग्रेसला अपयश!


गुजरात विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि अखेरच्या टप्प्याचे आज मतदान संपताच एक्झिट पोल जाहीर झाले आहेत. या एक्झिट पोलमध्ये भाजपला गुजरात निवडणुकीत स्पष्ट बहुमत तर काँग्रेसला पुन्हा पराभवाचा झटका बसेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
 गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत काँग्रेसला १३ जागांचा फायदा होईल. गेल्या निवडणुकीत काँग्रेसला ६१ तर स्पष्ट बहुमत मिळवत भाजपने११५ जागा जिंकल्या होत्या. यावेळी भाजपला ७ जागांचे नुकसान होऊ शकते, असा अंदाज आहे.

विधानसभा  निवडणूक एक्झिट पोल

एबीपी-सीएसडीएस एक्झिट पोल

  • भाजप – 117

  • काँग्रेस – 64

  • इतर – 1

सी व्होटर एक्झिट पोल

  • भाजप – 108

  • काँग्रेस – 74

टाइम्स नाऊ-व्हीएमआर

  • भाजप – 109

  • काँग्रेस – 70

  • इतर – 3

इंडिया टुडे-अॅक्सिस एक्झिट पोल

  • भाजप – 107

  • काँग्रेस – 74

  • इतर – 1

जन की बात

  • भाजप – 115

  • काँग्रेस – 65

  • इतर – 2

सहारा समय एक्झिट पोल

  • भाजप – 112

  • काँग्रेस – 68

  • इतर – 2

हिमालचलमध्ये भाजपच


एकूण 68 जागा असलेल्या हिलाचल प्रदेश विधानसभेत भाजपला 55 च्या आसपास जागा मिळणार असल्याचं चाणक्यने आपल्या एक्झिट पोलमध्ये म्हटलं आहे. तर काँग्रेसच्या हातातून आणखी एक राज्य जाताना दिसतंय. निम्म्यापेक्षा जास्त म्हणजे एकूण 51 टक्के मतं भाजपच्या पारड्यात पडणार असल्याचं चाणक्यच्या एक्झिट पोलमध्ये म्हटलं आहे.

हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक एक्झिट पोल

एबीपी-सीएसडीएस एक्झिट पोल

भाजप – 38

काँग्रेस – 29

इतर – 1

सी व्होटर एक्झिट पोल

भाजप – 41

काँग्रेस – 25

इतर - 2

इंडिया टुडे-अक्सिस एक्झिट पोल

भाजप – 51

काँग्रेस – 16

इतर – 1


हिमाचलमधील 2012 चा निकाल


           पक्ष            मतं                    जागा


  • भाजप        38.5 टक्के            26

  • काँग्रेस       42.8 टक्के            36

  • इतर           18.7 टक्के            6

2019 च्या लोकसभा निवडणुकीवर परिणाम होणारा निकाल असेल


2018 मध्ये होणाऱ्या 8 राज्यांच्या निवडणुकांमध्ये गुजरात आणि हिमाचलच्या विजयाचा परिणाम दिसून येईल.  2018 मध्ये भाजपशासित तीन राज्य राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड आणि कर्नाटकसह चार राज्यांमध्ये निवडणूक होणार आहे.

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB)



No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.