Thursday, 26 April 2018

गोंदिया, पालघर लोकसभा मतदारसंघांमध्ये 28 मे रोजी पोटनिवडणूक ; 31 मे रोजी मतमोजणी ; पलूस-कडेगाव मतदारसंघात विधानसभेसाठी पोटनिवडणूक

गोंदिया, पालघर लोकसभा मतदारसंघांमध्ये 28 मे रोजी पोटनिवडणूक 





गोंदिया आणि पालघर लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची तारीख निवडणूक आयोगाने जाहीर केली असून या दोन्ही मतदारसंघात २८ मे रोजी मतदान होणार आहे, तर ३१ मे रोजी निकाल जाहीर होईल. त्यासोबतच, पलूस विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूकही २८ मे रोजीच होणार आहे. पालघरमधील भाजप खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनामुळे लोकसभेची जागा रिक्त झाली होती. तसंच भंडारा-गोंदिया मतदारसंघात नाना पटोलेंच्या राजीनाम्यामुळे लोकसभेची जागा रिक्त झाली होती. या दोन्ही मतदारसंघात 28 मे रोजी पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे. पोट निवडणुकीसंबंधी अधिसूचना ३ मे रोजी जाहीर होणार असून उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख १० मे रोजी आहे. अर्ज मागे घेण्याचा अंतिम तारीख १४ मे रोजी असून निवडणूक निकाल ३१ मे रोजी होणार आहे. या निवडणुकीत इव्हीएम मशीन आणि व्हीव्हीपी एटी अर्थात स्थापीत कागद रेकॉड पद्धती वापरली जाणार आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या आधी राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारची ही पहिली कसोटी असणार आहे. पालघर आणि गोंदिया या दोन्ही जागांवर भाजपने विजय मिळवला होता. त्यामुळे या पोटनिवडणुकीत विजय मिळवणे त्यांच्यासाठी प्रतिष्ठेचे ठरणार आहे. 


सांगलीमधील पलूस विधानसभा पोटनिवडणूक जाहीर

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री पतंगराव कदम यांच्या निधनामुळे सांगली जिल्ह्यातील पलूस-कडेगाव मतदारसंघातील विधानसभेची जागाही रिक्त झाली आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील पलूस मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे. या जागेसाठीही 28 मे रोजी मतदान होणार आहे.कॉंग्रेसच्यावतीने प्रदेश युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष विश्‍वजीत कदम ही निवडणूक लढविणार आहेत. येत्या दोन दिवसात पक्षाकडून विश्‍वजीत कदम यांच्या नावाची अधिकृत घोषणा होण्याची शक्‍यता आहे.  या निवडणुकीच्या माध्यमातून विश्‍वजीत कदम पहिल्यांदाच विधानसभेची निवडणूक लढविणार आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत विश्‍वजीत कदम यांनी पुण्यातून लोकसभा निवडणूक लढविली होती. यावेळी ते सांगली लोकसभा मतदारसंघातून इच्छुक होते. मात्र पतंगराव कदम यांच्या आकस्मिक निधनाने विश्‍वजीत यांना वडिलांच्या रिक्त जागेवर म्हणजे विधानसभेची निवडणूक लढवावी लागणार आहे.


वनगांच्या घरात उमेदवारी दिल्यास शिवसेना लढवणार नाही


दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांनी 2014 च्या पालघर लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसला धूळ चारली होती. वनगा यांचा कार्यकाळ संपायला 15 महिन्यांचा कालावधी उरला असताना त्यांचे आकस्मिक निधन झाले. वनगा यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक होत आहे. पोटनिवडणुकीसाठी प्रत्येक पक्षाने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. काँग्रेसने या पोटनिवडणुकीवर लक्ष केंद्रीत केले आहे. भाजपने वनगांच्या घरात उमेदवारी दिल्यास शिवसेना निवडणूक लढवणार नाही, असा निर्णय उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. शिवसेनेची भूमिकेवर भाजप या पोटनिवडणुकीचा उमेदवार कोण देते, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

=================================

भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात पुन्हा नाना पाटोले?


मतदारसंघातील भाजपचे खासदार नाना पटोले यांनी खासदारकीचा राजीनामा दिला मात्र कोणत्याही पक्षात प्रवेश अद्याप केला नाही. गेल्या लोकसभा निवडणूकीत कोंग्रेस व राष्ट्रवादी आघाडी मुळे राष्ट्रवादीला जागा देण्यात आली होती. राष्ट्रवादीचे प्रफ्फुल पटेल यांनी निवडणूक लढवली होती. आघाडी केली तर या जागेवर राष्ट्रवादीचा दावा असेल यामुळेच नाना पटोले यांनी कॉंग्रेसमधील प्रवेश करणे तूर्तास टाळले असावे. गेल्या लोकसभा निवडणूकीत २६ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. पोट निवडणुकीसाठी देखील इच्छुक उमेदवाराबाबत खलबते सुरु झाली आहेत. शेतक-यांच्या प्रश्नांवरून केंद्र सरकारसह राज्यातील फडणवीस सरकारविरोधात आंदोलनाचे हत्यार उपसत पक्षविरोधी भूमिका घेणारे भंडारा- गडचिरोली लोकसभा मतदारसंघातील भाजपचे खासदार नाना पटोले यांनी खासदारकीचा राजीनामा दिला होता. विदर्भातील ओबीसींचे नेते अशी ओळख असलेले पटोले २००८ पर्यंत काँग्रेसमध्ये होते. तिथेही त्यांचे पक्षनेत्यांशी मतभेद होते. विलासराव देशमुख यांच्याशी मतभेद झाल्यानंतर पटोले भाजपत गेले. विदर्भात ओबीसी चेहरा हवा असल्याने भाजपनेही त्यांना तात्काळ प्रवेश दिला. भंडारा व गोंदिया जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांनी भाजपला एकहाती विजय मिळवून दिला. २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत ते खासदार म्हणून निवडून आले. मात्र केंद्रात मंत्रिपदही न मिळाल्याने पटोले यांच्या पदरी निराशा पडली. यात भर म्हणजे दोन वर्षांपूर्वीच्या जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपचा पराभव झाला व पक्षात पटोलेंचे वजन कमी होत गेले. ही खदखद त्यांच्या मनात होती आणि यामुळेच त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला आहे.

काँग्रेस प्रवेशानंतरही पटोलेंपुढे अनेक आव्हाने


खासदारकीचा राजीनामा देऊन काँग्रेसवासी झालेले नाना पटोले यांच्यासमोर जिल्ह्य़ातील काँग्रेसच्या प्रस्थापित नेत्यांचे आव्हाने  उभे राहण्याची शक्यता आहे. काँग्रेस-भाजप आणि पुन्हा काँग्रेस असा प्रवास करणारे पटोले यांचे पक्षश्रेष्ठींनी स्वागत केले असले तरी स्थानिक नेत्यांना ते फारसे पचनी पडले नाही. पेटोल यांनी थेट काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्याशी संपर्कात राहून पक्षात प्रवेश केला. परंतु भंडारा आणि गोंदिया जिल्ह्य़ातील काँग्रेसचे प्रस्थापित नेते त्यांना कितीपत साथ देतात. यावर त्यांची पुढची वाटचाल सुकर होणार आहे. काँग्रेसमध्ये असताना त्यांचा थेट संबंध तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याशी होता. परंतु भंडारा जिल्ह्य़ातील साकोली विधानसभा मतदार संघातील उमेदवारीवरून मतभेद झाले होते. जिल्ह्य़ात शाळा-महाविद्यालयाच्या माध्यमातून तगडे ‘नेटवर्क’ असलेले काँग्रेस नेते व माजी आमदार सेवक वाघाये यांना साकोलीची उमेदवारी निश्चित होणार हे स्पष्ट झाल्यानंतर पटोले यांनी काँग्रेसमधून बाहेर पडण्याचा मार्ग निवडला होता. जिल्हा राजकारणात वाघाये हे पटोले यांना ‘सिनिअर’ आहेत. ते दोनदा पराभूत झाले आहेत. परंतु त्यांनी काँग्रेस सोडली नाही. पटोले यांचा प्रवास काँग्रेस, भाजप आणि पुन्हा काँग्रेस असा आहे. तेव्हा पक्ष त्यांना जिल्ह्य़ात किती पाठबळ देईल यावरच त्यांचे स्थानिक राजकारणाचे भवितव्य ठरणार आहे.माजी आमदार सेवक वाघाये यांची साकोली मतदार संघावर दावेदारी आहे तर पटोले यांचाही कल विधानसभा निवडणूक लढण्याकडे आहे. जातीच्या समीकरणाचा विचार केल्यास हे दोघेही एकाच समाजाचे (ओबीसी)आहेत. या दोन्ही नेत्यांचा मतदारसंघ एकच असल्याने पेटोले यांना स्वपक्षीय नेत्यांची जिल्ह्य़ातील आव्हाने पेलावी लागणार आहे. पटोले आणि वाघाये यांच्यात जिल्ह्य़ातील वर्चस्वावरून याआधीही संघर्ष झाला आहे. जिल्ह्य़ात आणखी एक प्रस्थापित नेते आहेत. माजी मंत्री बंडू सावरबांधे. त्यांचीही जिल्ह्य़ावर चांगली पकड आहे. त्यांचा मतदार संघ आरक्षित झाला आहे.भंडारा जिल्ह्य़ांचा विचार करता पक्ष प्रस्थापित नेत्यांना प्राधान्य देतात की, नव्याने पक्षात आलेल्या नेत्यांना महत्व देतात. यावर सारेकाही अवलंबून आहे. हे दोन्ही नेते जिल्हा परिषदेच्या जागावाटपासून तर पक्षीय राजकारणात वजन ठेवून आहेत. भंडारा-गोदिंया लोकसभा मतदार संघाचा विचार करता वरिष्ठ आमदार गोपालदास अग्रवाल हे पक्षाचे दुसरे नेते आहेत. त्यांना जिल्ह्य़ातील राजकारणात कुणाचा हस्तक्षेप नको आहे.विदर्भात मुकुल वासनिक, विलास मुत्तेमवार, विजय वडेट्टीवार, नरेश पुगलिया आदी नेते पेटोले यांना पटोलेंच्या पक्ष प्रवेशाने आनंद झाल्याचे दिसत नाहीत. पक्षात वरचे स्थान मिळाले नसल्यास पटोले यांच्या राजकीय महत्वाकांक्षेला मर्यादा येतील. आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी होण्याची दिसत आहे. अशावेळी जागा वाटपात पटोले यांना पक्षाने महत्व न दिल्यास राष्ट्रवादी काँग्रेस वरचढ होण्याची शक्यता आहे. भंडारा-गोंदिया जिल्ह्य़ातील काँग्रेसचे प्रस्थापित नेते पटोले यांना सहकार्य करण्याची शक्यता कमी आहे. शिवाय प्रफुल पटेल सारखे स्थान पटोले यांना काँग्रेस देण्याची शक्यता दिसत नाही. त्यामुळे स्थानिक राजकारणात पटोले यांच्यासमोर भविष्यात अडचणींचा डोंगर उभा राहणार आहे.दरम्यान पटोले यांच्यासाठी साकोलीची जागा मोकळी करण्यासाठी सेवक वाघाये यांना लोकसभेची पोटनिवडणूक लढवण्यास सांगण्यात येत आहेत. परंतु वाघाये यासाठी फारसे इच्छुक नाहीत. त्यांना आपला मतदार संघ सोडायचे नाही. मात्र पक्षश्रेष्ठीकडून आदेश आल्यास ते निवडणूक लढतील. पण पटोले यांना मतदारसंघात संघर्षांची स्थिती कायम राहणार आहे.

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) pune

Monday, 23 April 2018

654 ग्रामपंचायतींसाठी 27 मे रोजी मतदान

महाराष्ट्रातल्या 25 जिल्ह्यातल्या 654 ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर, 27 मे रोजी होणार मतदान

4,771 रिक्तपदांसाठीही मतदान




राज्यातील विविध 25 जिल्ह्यांमधील 654 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक आणि 33 जिल्ह्यांतील सुमारे 2 हजार 812 ग्रामपंचायतींमधील 4 हजार 771 रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी 27 मे 2018 रोजी मतदान होणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयोगाने केली आहे. आयोगाच्या प्रसिद्धिपत्राकात म्हटले आहे की, यात सदस्यपदांबरोबरच सरपंचपदाच्या थेट निवडणुकांचाही समावेश आहे. ग्रामपंचायतींच्या या निवडणुकांसाठी 7 ते 12 मे 2018 या कालावधीत नामनिर्देशनपत्रे स्वीकारले जातील. त्यांची छाननी 14 मे 2018 रोजी होईल. नामनिर्देशनपत्रे 16 मे 2018 पर्यंत मागे घेता येतील व त्याच दिवशी चिन्ह वाटप होईल. मतदान 27 मे 2018 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल. गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी मात्र सकाळी 7.30 पासून दुपारी केवळ 3.00 पर्यंतच मतदानाची वेळ असेल. मतमोजणी 28 मे 2018 रोजी होईल.

सार्वत्रिक निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या: ठाणे- 5, पालघर- 3, रायगड- 187, सिंधुदुर्ग- 2, नाशिक- 20, धुळे- 7, जळगाव- 8, अहमदगनर- 77, पुणे- 90, सोलापूर- 3, सातारा- 23, सांगली- 82, कोल्हापूर- 74, औरंगाबाद- 4, बीड- 2, नांदेड- 7, परभणी- 1, उस्मानाबाद- 3, लातूर- 5, अकोला- 2, यवतमाळ- 29, वर्धा- 14, भंडारा- 4 आणि गडचिरोली- 2. एकूण- 654.

पोटनिवडणूक होणाऱ्या रिक्तपदांची जिल्हानिहाय संख्या (कंसात ग्रामपंचायतींची संख्या): ठाणे (90)- 167, पालघर (73)- 144, रायगड (93)- 158, रत्नगिरी (202)- 299, सिंधुदुर्ग (74)- 104, नाशिक (200)- 318, धुळे (34)- 49, जळगाव (57)- 96, नंदुरबार (32)- 36, अहमदगनर (78)- 124, पुणे (258)- 456, सोलापूर (93)- 154, सातारा (409)- 777, सांगली (40)- 81, कोल्हापूर (87)- 126, औरंगाबाद (34)- 41, बीड (24)- 35, नांदेड (106)- 177, परभणी (28)- 40, उस्मानाबाद (48)- 65, जालना (21)- 28, लातूर (79)- 94, हिंगोली (41)- 55, अमरावती (80)- 121, अकोला (23)- 31, यवतमाळ (110)- 167, वाशीम (20)- 23, बुलडाणा (39)- 72, वर्धा (49)- 72, चंद्रपूर (74)- 106, भंडारा (6)- 48, गोंदिया (35)- 43  आणि गडचिरोली (175)- 464. एकूण (2,812)- 4,771.




पुणे जिल्ह्यातील 90 ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहिर

निवडणुक आयोगाने केलेल्या घोषणेनुरुप थेट सरपंच पदासह सदस्य पदासाठीच्या जिल्ह्यातील 90 ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा फड रंगणार आहे. यामध्ये 27 एप्रिल रोजी तहसिलदार यांनी निवडणुकीची नोटीस प्रसिध्द करणे, सोमवार (ता.07 मे) ते शनिवार (12 मे ) या कलावाधीत अर्ज दाखल करणे, सोमवार (ता.14 मे) रोजी अर्ज छाननी, बुधवार (16 मे ) अर्ज माघारी घेणे, व त्याच दिवशी चिन्ह वाटप, तर रविवार (ता.27 मे) रोजी मतदान होणार आहे. यामध्ये सर्वाधिका बारामती तालुक्यातील 15 ग्रामपंचायतींचा समावेश आहे.तर पुरंदर मधिल नव्याने स्थापन झालेल्या वाल्हे, आडाचीवाडी, सुकलवाडी, वागदरवाडी यांसह इतर 13 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. तर जिल्ह्यातील 258 ग्रामपंचायतींच्या 456 रिक्त पदांच्या निवडणुका सुध्दा याच कालावधीत पार पडणार आहेत.

निवडणुका जाहिर होणारा तालुका, ग्रामपंचायत संख्या, ग्रामपंचायतीचे नाव खालील प्रमाणे - 
1) वेल्हा - 1
साईव बु.
2) मावळ - 7
ओवळे, दिवड, कल्हाट, सुद्रुंब्रे, सुदवडी, कोंडीवडे अ.मा., जांबवडे
3) भोर - 6
रायरी, अशिंपी, करंजे, नाटंबी, शिळींब, वारवंड,
4) जुन्नर - 3
बेल्हा, गुंजाऴवाडी, तांबेवाडी,
5) मुळशी - 1
मुळशी खर्द,
6) पुरंदर - 13
एखतपुर-मंजवडी, राजूरी, माळशिरस, वनपुरी, उदाचीवाडी, वीर, कोथळे, रानमळा, भोसलेवाडी, वाल्हे, आडाचीवाडी, सुकलवाडी, वागदरवाडी, 
7) खेड - 13
सुपे, कोहिनकरवाडी, सातकरस्थळ, सांडभोरवाडी, वाहागांव, मोरोशी, डेहणे, आडगाव,वाळुद, वाघु, एकलहरे, तिफनवाडी, धुवोली,
8) आंबेगाव - 10
पारगाव त.अवसरी बु., टाव्हरेवाडी, कानसे, चपटेवाडी, सुपेधर, अवसरी बु., फुलवडे, डिंभे बु., तांबडेमळा, लोणी,  
9) बारामती - 15
वंजारवाडी, कोऱ्हाळे खुर्द, करंजे, सुपे, शिर्सुफळ, चांदगुडे वाडी, भोंडवेवाडी, साबळेवाडी,मगरवाडी, काळखैरेवाडी, जराडवाडी, उंडवडी क.प.,दंडवाडी, पानसरेवाडी, कुतवळवाडी, 
10) शिरुर - 6
आण्णापूर,शिरुर ग्रामीण, सरदवाडी, कर्डेलवाडी, तार्डोबाचीवाडी, वाजेवाडी, 
11) इंदापूर - 5
लाकडी, बावडा, वकिलवस्ती, काझड, शिंदेवाडी, 
12) दौंड - 10
कुरकुंभ, वाटलुज, नायगांव, वडगाव बांडे, पानवली, केडगाव, वाखारी, पारगांव, खोपोडी, पांढरेवाडी,

एकूण - 90 
=====
भोर तालुक्यातील ५ ग्रामपंचायती
भोर : भोर तालुक्यातील ५ ग्रामपंचायतींचा व ७१ ग्रामपंचायतींचा पोट निवडणुक होत आहे. माहे जून ते सप्टेंबर २०१८ मध्ये मुदत संपणाºया व नव्याने स्थापित झालेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत सरपंचपदासह सर्व सदस्य तसेच रिक्तपदांच्या पोटनिवडणुकीसाठी निवडणुक कार्यक्रम जहिर झाला आहे. ग्रामपंचायत निवडणुक लागलेली गावे व सरपंच आरक्षण व निवडणुक कार्यक्रम खालील प्रमाणे ग्रामपंचायत रायरी सरपंच आरक्षण (सर्वसाधारण स्त्री), वारवंड (सर्वसाधारण), शिळींब (सर्वसाधारण), अशिंपी (नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री), नाटंबी (सर्वसाधारण स्त्री), करंजे (अनुसूचित जामाती स्त्री). भटक्या विमुक्त रिक्त १०९ प्रभागातील अनेक गावातील एक पासुन ५ सदस्यांपर्यत रिक्त असलेल्या १२६ जागांसाठी पोटनिवडणूक होत आहे. सर्वाधीक रिक्त ७ जागा वाढाणे ग्रामपंचायतीच्या आहेत.

इंदापूर तालुक्यात ५ ग्रामपंचायती

इंदापूर : तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व पाच ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. बावडा, वकीलवस्ती, काझड, शिंदेवस्ती, लाकडी या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. वरकुटे खुर्द, गिरवी, भिगवण, पिठेवाडी, थोरातवाडी रुई ग्रुप ग्रामपंचायत या ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुका होणार आहेत.
============================================

सांगली जिल्ह्यातील 82 ग्रामपंचायतींची निवडणूक 

सांगली - निवडणूक आयोगाने आज राज्यातील ग्रामपंचायत निवडणूका जाहीर केल्या. राज्यातील 25 जिल्ह्यातील 654 ग्रामपंचायतींसाठी एकाच वेळी निवडणूक होत असून, यामध्ये सांगली जिल्ह्यातील 82 ग्रामपंचायतींच्या निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झाला. 27 मे 2018 ला मतमोजणी होणार असल्याचेही जाहिर करण्यात आले आहे.  सांगली जिल्ह्यातील 82 गावे. मिरज- 3, कवठेमहांकाळ- 19, शिराळा -27, पलुस- 2, कडेगाव- 2, खानापूर(विटा)- 4, आटपाडी- 20 व जत- 5 अशा तालुकानिहाय ग्रामपंचायती आहेत.  25 जिल्ह्यांतील 654 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक आणि 33 जिल्ह्यांतील सुमारे 2 हजार 812 ग्रामपंचायतींतील 4 हजार 771 रिक्त जागांच्या पोटनिवडणुकांसाठी 27 मे 2018 रोजी मतदान आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयोगाने केली. 
निवडणूक जाहीर झालेली जिल्ह्यातील गावे 
मिरज - कावजी खोतवाडी, निलजी बामणी व वाजेगाव. कवठेमहांकाळ - बसाप्पाचीवाडी, दुधेभावी, गर्जेवाडी, करलहट्टी, पिंपळवाडी, रामपूरवाडी, देशिंग, अग्रण धुळगाव, घोरपडी, करोली (टी), कोकळे, शिंदेवाडी, ढोलेवाडी, घोगांव, कदमवाडी, कुंडलापूर, मोरगाव, जाधववाडी, झुरेवाडी. जत - गुलगुंजनाळ, कोंत्येवबोबलाद, कोणबगी, बिळुर, खिलारवाडी. खानापूर - देवनगर, भेंडवडे, राजधानी भेंडवडे, साळशिंगे. आटपाडी - नेलकरंजी, वाक्षेवाडी, काळेवाडी, मानेवाडी, मासाळवाडी, मिटकी, पिंपरी खूर्द, आंबेवाडी, खाजोडवाडी, आटपाडी, बनपूरी, भिंगेवाडी, करगणी, मापटेमळा, गुंडेवाडी, निंबवडे, पुजारवाडी, विभूतवाडी, औटेवाडी, कानकारेवाडी. पलुस - आमणापूर व विठ्ठलवाडी. कडेगाव - वाजेगाव, चिंचणी. शिराळा - वाकुर्डे बु., भाटशिरगाव, धसवाडी, खुजगाव, मादळगाव, रांजणवाडी, रिळे, शिरसी, आंबेवाडी, बेलेवाडी, फकीरवाडी, खराळे, कुसाईवाडी, सावंतवाडी, शिरसटवाडी, चिखलवाडी, अस्वलेवाडी, चिंचेवाडी, इंगरूळ, कुसळेवाडी, मराठेवाडी, मेणे, मोरेवाडी, पं. तं. वारूण, पाचगणी, मानेवाडी. 

निवडणूक होणारी गावे तालुकानिहाय अशी :

1) मिरज- कावजी खोतवाडी, निलजी बामणी, वाजेगांव.

2) कवठेमहांकाळ : बसाप्पाचीवाडी, दुधेभावी, गर्जेवाडी, करलहट्टी, पिंपळवाडी, रामपूरवाडी, देशिंग, अग्रण धूळगाव, घोरपडी, करोली टी, कोकळे, शिदेवाडी, ढालेवाडी, ढालगाव, कदमवाडी, कुंडलापूर, मोरगाव, जाधववाडी, झुरेवाडी. 

3) जत : गुलगुंजनाळ, कोंत्याव बोबलाद, कोणबगी, बिळूर, खिलारवाडी. 

4) खानापूर : देवनगर, भेंडवडे, राजधानी भेंडवडे, साळशिंगे.

5) आटपाडी : नेलकरंजी, वाकसेवाडी, काळेवाडी, मानेवाडी, मासाळवाडी, मिटकी, पिंपरी खुर्द, आंबेवाडी, खाजोडवाडी, आटपाडी, बनपुरी, भिंगेवाडी, करगणी, मापटेमळा, मुढेवाडी, निंबवडे, पुजारवाडी, विभूतवाडी, औटेवाडी, कानकात्रेवाडी.

6) पलूस : अमणापूर, विठ्ठलवाडी.

7) कडेगाव : वाजेगाव, चिंचणीवांगी.

8) शिराळा : वाकुर्डे बु., भाटशिरगाव, धसवाडी, करुंगली, खुजगाव, मादळगाव, रांजणवाडी, रिळे, शिरसी, आंबेवाडी, बेलेवाडी, फकीरवाडी, खराळे, कुसाईवाडी, सावंतवाडी, शिरसटवाडी, चिखलवाडी, अस्वलेवाडी, चिंचेवाडी, इंगरुळ, कुसळेवाडी, मराठेवाडी, मेणी, मोरेवाडी, पं.त. वारुण, पाचगणी, मानेवाडी. 


नऊ सरपंच, 72 जागांसाठी पोटनिवडणूक 
जिल्ह्यातील 9 गावातील सरपंच पदासाठी व 72 सदस्यांच्या जागासाठी पोटनिवडणूका होत आहेत. 40 गावांत या पोटनिवडणूक आहे. मिरज- 9 सदस्य, 2 सरपंच, तासगाव- 6 सदस्य, जत- 24 सदस्य 1 सरपंच, आटपाडी- 3 सदस्य, खानापूर(विटा)8 सदस्य, कडेगाव- 4 सदस्य 1 सरपंच, पलुस- 4 सदस्य, 1 सरपंच, वाळवा- 7 सदस्य, 3 सरपंच, शिराळा- 8 सदस्य व 1 सरपंच.  दरम्यान, जिल्ह्यातील 40 ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांचाही कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यात मिरज 6, तासगाव 6, खानापूर 3, वाळवा 7, शिराळा 6, पलूस 3, आटपाडी 2, जत 7 आणि कडेगाव तालुक्यातील 3 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या गावांतील 58 प्रभागांत ही पोटनिवडणूक होणार आहे. 

============================================

सातारा; २३ ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर

जून ते सप्टेंबर या कालावधीत मुदत संपणार्‍या व नव्याने स्थापन झालेल्या ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासह सदस्यांसाठी सातारा जिल्ह्यातील 23 ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक दि. 27 मे रोजी होत आहे. निवडणुकीसाठी दि. 7 मेपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. सार्वत्रिक निवडणुकीसोबत  409 ग्रामपंचायतींमधील 777 रिक्‍त जागांसाठीही निवडणूक घेतली जाणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने नुकताच निवडणूक कार्यक्रम जाहीर केला.जून ते सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यातील 23 ग्रामपंचायतींची मुदत संपत आहे. त्यामध्ये कोरेगाव तालुक्यातील तडवळे सं. कोरेगाव, कोंबडवाडी, चोरगेवाडी, चांदवडी, कण्हेरखेड, आसरे, बोबडेवाडी; जावली तालुक्यातील कुंभारगणी, कुरळोशी, गाढवली (पुनर्वसन); पाटण तालुक्यातील नारळवाडी, जमदाडवाडी, कळकेवाडी, मरळी, रामिष्टेवाडी, मल्हारपेठ, येराडवाडी, गव्हाणवाडी, नवसरवाडी, मंद्रुळ कोळे, मंद्रुळ कोळे खुर्द; माण तालुक्यातील सत्रेवाडी या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या निवडणुकीसाठी दि. 27 रोजी तहसीलदार निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करणार आहेत. दि. 7 ते 12 मेपर्यंत सकाळी 11 ते दुपारी 4.30 वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्रे मागवणे व सादर करण्याची मुदत आहे. त्यानंतर दि. 14 मे रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे. दि. 16 मे रोजी  दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज माघार घेता येणार असून त्यानंतर उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करून त्यांना चिन्हवाटप केले जाणार आहे. दि. 27 मे रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 पर्यंत मतदान होणार आहे. तहसीलदारांनी निश्‍चित केलेल्या ठिकाणी दि. 28 मे रोजी सकाळपासून मतमोजणी होणार आहे.दरम्यान, सार्वत्रिक तसेच पोटनिवडणूक होत असलेल्या ठिकाणी आचारसंहिता लागू झाली आहे. ही आचारसंहिता निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत कायम राहणार असून कुठल्याही नेत्यांना संबंधित ग्रामपंचायतींच्या क्षेत्रातील मतदारांवर प्रभाव पडेल, अशी कृती किंवा घोषणा करता येणार नाही. या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर दि. 27 एप्रिलपर्यंत प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या प्रसिध्द केल्या जाणार आहेत. 

============================================

अहमदनगर जिल्ह्यातील ७७ गावांत ग्रामपंचायत रणधुमाळी

माहे जून ते सप्टेंबर 2018 मध्ये मुदत संपणार्‍या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे.जिल्ह्यातील  कान्हूरपठार, बारागाव नांदूर, चितळी, लोणी व्यंकनाथ, मुकिंदपूर, वडगाव गुप्‍ता, ब्राम्हणी व देसवंडी आदींसह 77 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा बिगूल वाजला असून, 27 मे 2018 रोजी निवडणूक होणार आहे. त्यामुळे ऐन उन्हाळयात 77 गावांतील राजकीय वातावरण अधिकच तापणार आहे. अहमदनगर जिल्हाभरातील 77 ग्रामपंचायतींची प्रभागरचना व आरक्षणाची अंतिम यादी  नुकतीच जाहीर झाली आहे.या ग्रामपंचायतींची प्रारुप मतदार यादी जाहीर झाली असून, यावर हरकती देखील मागविल्या आहेत. मे महिन्यात जून व जुलै महिन्यात मुदत संपणार्‍या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईल, अशी अपेक्षा होती. परंतु राज्य निवडणूक आयोगाने सप्टेंबर महिन्यात मुदत संपणार्‍या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. काही ग्रामपंचायतींची मुदत संपण्यास तब्बल तीन महिन्यांचा अवधी बाकी असतानाच आयोगाने या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा बिगूल वाजविला आहे. अकोले तालुक्यातील घोटीसह 10, संगमनेर तालुक्यातील घारगावसह दोन, कोपरगाव तालुक्यातील दहिगाव बोलका, सुरेगावसह नऊ, श्रीरामपूर तालुक्यातील नाऊर,दिघीसह पाच, राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर, देसवंडी, ब्राम्हणी आदींसह अकरा, नेवासा तालुक्यातील मुकिंदपूरसह पाच, शेवगाव तालुक्यातील गोळेगाव,लाडजळगावसह तेरा,पाथर्डी तालुक्यातील गितेवाडी,चिंचोडीसह सात, जामखेड तालुक्यातील मुंजेवाडीसह दोन, पारनेर तालुक्यातील कान्हूरपठार,वाडेगव्हाणसह पाच, नगर तालुक्यातील वडगाव गुप्‍ता, राहाता तालुक्यातील चितळी आदींसह जिल्हाभरातील 77 ग्रामपंचायतींच्या 27 मे रोजी निवडणुका होणार आहेत.त्यामुळे या गावांतील राजकीय वातावरण अधिकच तापणार आहे.
तालुकानिहाय ग्रा.पं. संख्या 
अकोले 10, संगमनेर 2, कोपरगाव 9, श्रीरामपूर 5, राहाता 1, राहुरी 11, नेवासा 5, नगर 1, पारनेर 5, पाथर्डी 7, शेवगाव 13, कर्जत 5, जामखेड 2, श्रीगोंदा 1.

============================================




POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे


Saturday, 21 April 2018

विधान परिषदेच्या ६ जागांसाठी २१ मे रोजी मतदान

नाशिकसह सिंधुदुर्ग, वर्धा, परभणी, अमरावती, उस्मानाबाद जिल्ह्यांमधील (स्थानिक स्वराज्य संस्था) विधान परिषद मतदारसंघ निवडणूक - २०१८

२१ मे रोजी रिक्त होणाऱ्या विधान परिषदेच्या ६ जागांसाठी मतदान


यंदा जून, जुलैअखेर विधान परिषदेच्या सहा सदस्यांचा कालावधी संपुष्टात येत असल्यामुळे निवडणूक आयोगाने या रिक्त होणाऱ्या जागांसाठीचा कार्यक्रम घोषित केला. मतदान २१ मे रोजी असून २४ मे रोजी मतमोजणी होणार आहे. कोकण स्वराज्य संस्थांमधून निवडून आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल तटकरे, परभणी पदवीधरमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे अब्दुल्ला खान दुर्राणी, अमरावती स्वराज्य संस्था मतदारसंघातून निवडून आलेले भाजपचे मंत्री प्रवीण पोटे पाटील, भाजपचे वर्ध्यातून निवडून आलेले मितेश भांगडिया, नाशिक स्वराज्य संस्थेतून निवडून आलेले राष्ट्रवादीचे जयंतराव जाधव, लातूरचे काँग्रेस नेते दिलीपराव देशमुख यांच्या जागेवर ही निवडणूक होत आहे. रिक्त होत असलेल्या या सहा जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असल्याने संबंधित क्षेत्रात आचारसंहिता लागू झाली असल्याचे निवडणूक आयोगातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. महाराष्ट्र विधान परिषदेच्या एकूण ७८ जागा असून त्यामध्ये राष्ट्रवादीचे २३ सदस्य, त्यानंतर काँग्रेसचे १९, भाजप १८, शिवसेना ९, अपक्ष ५, शेकाप २, पीआरपी आणि लोकभारती प्रत्येकी १ असे पक्षीय बलाबल आहे. भाजप, सेनेचे विधानसभेत बहुमत असले तरी परिषद विरोधकांची असल्यामुळे सभापतिपद राष्ट्रवादीकडे, तर उपसभापतिपद काँग्रेसकडे आहे.


विधान परिषदेसाठी आचारसंहिता लागू

निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये राज्यातील सहा विधान परिषद मतदारसंघांमध्ये शुक्रवारपासून (२० एप्रिल) आचारसंहिता जारी करण्यात आली आहे. नाशिकसह सिंधुदुर्ग, वर्धा, परभणी, अमरावती, उस्मानाबाद जिल्ह्यांमधील विधान परिषद मतदारसंघासाठी २१ मे २०१८ रोजी मतदानप्रक्रिया राबविण्यात येणार असून, आचारसंहिता लागू झाली आहे. अन्य विधान परिषद सदस्यांचा कार्यकाळही ३१ मे २०१८ पर्यंत पूर्ण होणार असून, या जागांसाठी निवडणूकप्रक्रिया राबवावी लागणार आहे. आयोगाने शुक्रवारी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. अर्ज भरण्यासाठी ३ मेपर्यंत मुदत देण्यात आली असून, ४ मे रोजी अर्ज छाननी होणार आहे. ७ मे ही अर्जमाघारीची तारीख आहे. २१ मे रोजी सकाळी आठ ते दुपारी चार या वेळेत मतदानप्रक्रिया राबविण्यात येणार असून, २४ मे रोजी मतमोजणी होणार आहे. २९ मेपर्यंत ही आचारसंहिता लागू राहील. 


राजकीय हालचालींना वेग

आचारसंहिता लागू होताच निवडणूक लढविण्यासाठी विविध पक्षातील इच्छुकांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. विधान परिषद निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच शिवसेनेतील गृहकलह चव्हाट्यावर आला. सध्याचे संख्याबळ शिवसेनेकडे अधिक असल्याने शिवसेनेच्या उमेदवार निवडीवर विरोधकांच्या नजरा आहेत. सेनेपाठोपाठ भाजपकडेही दुसऱ्या क्रमांकाचे संख्याबळ आहे. शिवसेना-भाजपची युती न झाल्यास भाजपकडूनही उमेदवार दिला जाण्याची शक्यता आहे. सोबतच काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडूनही उमेदवार दिला जाण्याची शक्यता असल्याने निवडणुकीतील चुरस वाढणार आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या शासकीय निवासस्थानी दोन्ही काँग्रेस नेत्यांची बैठक यापूर्वीच पार पडली आहे. या बैठकीत  जून आणि जुलै महिन्यात होऊ घातलेल्या विधान परिषदेच्या 21 जागांबाबत चर्चा करण्यात आली होती. बैठकीला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधानपरिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, प्रवक्ते नवाब मलिक आदी उपस्थित होते. येत्या जून आणि जुलै महिन्यात विधानपरिषदेच्या 21 सदस्यांची मुदत संपत आहे. या निवडणुकीत आघाडी करण्याबाबत बैठकीत प्राथमिक चर्चा करण्यात आली होती. स्थानिक प्राधिकारी संस्थेतून निवडून गेलेले दिलीप देशमुख (काँग्रेस), जयवंत जाधव, बाबाजानी दुर्राणी (राष्ट्रवादी काँग्रेस), प्रवीण पोटे-पाटील,  मितेश भांगडिया(भाजप) यांची 21 जूनला तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल तटकरे यांची मुदत येत्या 31 मे रोजी संपत आहे. कोकण आणि मुंबई पदवीधर मतदारसंघातून निवडून गेलेले अनुक्रमे निरंजन डावखरे, डॉ. दीपक सावंत यांची मुदत 7 जुलै रोजी संपुष्टात येत आहे. तसेच शिक्षक मतदारसंघातून निवडून गेलेले कपिल पाटील, डॉ. अपूर्व हिरे यांचीही मुदत 7 जुलै रोजी संपत आहे.विधानसभेतील सदस्यांद्वारे निवडून गेलेल्या 11 सदस्यांची मुदत 27 जुलै रोजी संपत आहे. या 11 सदस्यांमध्ये काँग्रेसचे माणिकराव ठाकरे, शरद रणपिसे, संजय दत्त, राष्ट्रवादीचे सुनील तटकरे, जयदेव गायकवाड, नरेंद्र पाटील, अमरसिंह पंडित, भाजपचे विजय गिरकर, महादेव जानकर, शिवसेनेचे अनिल परब आणि शेकापचे जयंत पाटील यांचा समावेश आहे. यंदाचे २०१८ हे वर्ष राजकारणाच्या फडात चांगलेच तापणारे असणार आहे. येत्या काही महिन्यांत विधान परिषदेच्या २२ जागांसाठी निवडणूक होणार असून सत्ताधार्‍यांसह विरोधकही जोर लावण्याच्या तयारीत आहेत. ही निवडणूक शेकाप नेते जयंत पाटील, राष्‍ट्रवादीचे सुनील तटकरे, शिवसेनेचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत आणि काँग्रेस नेते व विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे अशा मातब्‍बरांसाठी महत्त्‍वाची ठरणार आहे. याशिवाय शिवसेना उपनेते अॅड. अनिल परब, कॉंग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते शरद रणपिसे यांनाही उमेदवारीसाठी झगडावे लागणार आहे.


विधान परिषदेतील हे सदस्य होणार निवृत्त

येत्या मे, जून, जुलै २०१८ या तीन विधान सभा मतदार संघातून व स्‍थानिक स्‍वराज्य, पदवीधर मतदार संघातून निवडून आलेल्या विधान परिषद आमदारांचा कार्यकाळ संपणार आहे. या निवृत्त होणाऱ्या सदस्यांमध्ये अनुक्रमे जयंत पाटील (शेकाप), सुनील तटकरे (राष्ट्रवादी), अनिल परब (शिवसेना), माणिकराव ठाकरे (कॉंग्रेस), पशुसंवर्धन दुग्धविकास खात्याचे मंत्री महादेव जानकर, शरद रणपिसे (कॉंग्रेस), विजय गिरकर (भाजप),  संजय दत्त (कॉंग्रेस), जयदेव गायकवाड (राष्ट्रवादी), नरेंद्र पाटील (राष्ट्रवादी), अमरीश पंडीत (राष्ट्रवादी), गोपीकिशन बजोरीया (शिवसेना) हे विधानसभा मतदार संघातून निवडून आलेले सदस्य आहेत. तर कोकण स्वराज्य संस्थांमधून निवडून आलेले अनिल तटकरे (राष्ट्रवादी), मुंबई पदवीधरमधून निवडून आलेले डॉ. दीपक सावंत, परभणी पदवीधरमधून आलेले राष्ट्रवादीचे अब्दुल्ला खान, अमरावती स्वराज्य संस्था मतदार संघातून निवडून आलेले भाजपचे मंत्री प्रविण पोटे, भाजपचे वर्ध्यातून निवडून आलेले नितेश भंगाडिया, शिक्षक आमदार कपिल पाटील, कोणक पदवीधरमधून निवडून आलेले निरंजन डावखरे (राष्ट्रवादी), नाशिक स्वराज्य संस्थेतील जयंतराव जाधव, लातूरचे दिलीप देशमुख (कॉंग्रेस) हे सर्व सदस्य निवृत्त होत आहेत. राष्ट्रवादी आणि शेकाप आघाडी असल्याने एकाच वेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि शेकापचे जयंत पाटील यांना निवडून आणण्याचे आव्हान या दोन पक्षांवर आहे. या दोघांचे विधानसभेत ४३ आमदार आहेत. दोन जागांच्या विजयासाठी ५० आमदारांची गरज लागणार आहे. 


भाजपला फायदा, र्कॉग्रेस, राष्‍ट्रवादीला फटका

२०१८ मध्ये निवडणूक होणार्‍या विधान परिषदेच्या जागांवर भाजपला फायदा होण्याची शक्यता आहे. एकूण २२ जागांसाठी होणार्‍या निवडणुकीचा लाभ होऊन भाजपचा सध्याचा असणार्‍या १८ जागांमध्ये वाढ होऊन ते २३ पर्यंत जाणार आहेत. तर काँग्रेस आणि राष्‍ट्रवादी काँग्रेसच्या जागांमध्ये घट होणार आहे. सध्या महाराष्ट्र विधान परिषदेच्या ७८ जागांमध्ये राष्‍ट्रवादी काँग्रेसचे सर्वाधिक २३ आमदार आहेत. तर त्यानंतर काँग्रेसचे १९, भाजप १८, शिवसेना ९, अपक्ष ६, लोकभारती १ आणि इतर २ असे आमदार आहेत. 
स्वराज्य संस्था मतदार संघात कोकणात १ हजार मतदार आहेत. नारायण राणे आणि भाजप यांच्याकडे यातील ३०० मते आहेत. कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शेकापकडे जवळपास ५०० मते आहेत. तर शिवसेनेकडे जवळपास २०० पेक्षा जास्त मते आहेत. त्यामुळे या मतदारसंघात आघाडी-युतीमध्ये जोरदार रस्सीखेच होईल. याशिवाय कोकण पदवीधर  मधील आमदार निरंजन डावखरे यांचीही निवडणूक याचवेळी होत आहे. कोकण स्वराज्य मतदार संघातील राष्ट्रवादीचे आमदार आणि सुनील तटकरेंचे बंधू अनिल तटकरे यांना पुन्हा तिकीट मिळण्याची शक्यता कमी असल्याने या जागेवर वेगळा उमेदवार येईल. कोकणात या विधान परिषद निवडणूकीचा सर्वाधिक परिणाम जाणवणार आहे. भाजपला या ठिकाणी सर्वाधिक आशा असणार आहेत. सध्याच्या संख्या बळाप्रमाणे भाजपचे ६ आमदार निवडून येऊ शकतात. तर शिवसेनेचे २, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसचे ३ व अन्य १ आमदार निवडून येऊ शकतात. यामध्ये शिवसेनेकडे १२ मते ज्यादा तर कॉंग्रस व राष्ट्रवादीकडे ५ मते ज्यादा आहेत. अन्य ७ मते असल्याने एकत्रितपणे एक आमदार निवडून येवू शकेल.


विधान परिषदेचे १२ आमदार २०२० ला निवृत्त

मागील आघाडी सरकारने जाता जाता नेमलेले १२ राज्यपाल नियुक्‍त आमदार आहेत. त्यांची मुदत २०२० ला संपणार आहे. यामध्ये राष्‍ट्रवादी ६, काँग्रेस ५ आणि इतर एक अशा १२ आमदारांचा कार्यकाल संपत आहे.  या नॉमिनेटेड आमदारांमध्ये प्रकाश सूर्यभान गाजभिये, विद्या चव्हाण, राहूल नार्वेकर, ख्वाजा बैग, रामराव वाडकुटे, जग्गनाथ शिंदे, हूस्नबानू निझामुद्दीन खालीफे, अनंत गाडगीळ, जनार्दन चांदूरकर, आनंदराव रघोजी पाटील, रामहरी गोविंदराव रूपानवर, जोगेंद्र कवाडे यांचा समावेश आहे. हे सर्व आमदार २०२० ला निवृत्त झाल्यानंतर नव्याने येणाऱ्या सरकारला नवे आमदार नियुक्त करता येतील.


POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे



==================================
=================================


चंद्रकांत भुजबळ लिखित आणि पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) निर्मित "महाराष्ट्रातील राजकारण" पुस्तक

चंद्रकांत भुजबळ लिखित आणि पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) निर्मित

"महाराष्ट्रातील राजकारण" पुस्तक आगामी निवडणुकांसाठी उपयुक्त




अनुक्रमणिका


अ.क्र. तपशिल                      पान क्र.

1 महाराष्ट्र मतदार संघ पुर्नरचना  25
2 आजची संसद रचना व स्वरूप 27
3 निवडणूक संबंधीचे गुन्हे व त्यांची माहिती 31
4 लोकप्रतिनिधी कायद्यात महत्वपूर्ण सुधारणा 34
5 भारतातील निवडणूक कायदे 36
6 नकारात्मक मतदान अधिकार 39
7 निवडणूक लढविण्याची पुर्वतयारी व प्रभावी प्रचारतंत्र 40
8 हंगामी सरकार 1947 ते 1952 42
9 पहिली लोकसभा 1952 ते 1957 43
10 दूसरी लोकसभा 1957 ते 1962 46
11 तिसरी लोकसभा 1962 ते 1967 49
12 चवथी लोकसभा 1967 ते 1971 53
13 पाचवी लोकसभा 1971 ते 1977 56
14 सहावी लोकसभा 1977 ते 1980 58
15 सातवी लोकसभा 1980 ते 1984 61
16 आठवी लोकसभा 1984 ते 1988 63
17 नववी लोकसभा 1989 ते 1991 65
18 दहावी लोकसभा 1991 ते 1996 67
19 अकरावी लोकसभा 1996 ते 1998 69
20 बारावी लोकसभा 1998 ते 1999 72
21 तेरावी लोकसभा 1999 ते 2004 74
22 चौदावी लोकसभा 2004 ते 2009 77
23 पंधरावी लोकसभा 2009 ते 2014 80
24 सोळावी लोकसभा 2014 ते 2019 82
25 संयुक्त महाराष्ट्राची वाटचाल 85
26 पहिली विधानसभा 1960 विधानसभा अस्तित्वात 87
27 दूसरी विधानसभा 1962 ते 1967 नवनिर्मिती राज्याच्या राजकारणास प्रारंभ 88
28 तिसरी विधानसभा 1967 ते 1972 काँग्रेसला बहूमत 90
29 चौथी विधानसभा 1972 ते 1978 पुन्हा काँग्रेसला कौल 92
30 पाचवी विधानसभा 1978 ते 1980 काँग्रेसमध्ये फुट : पुलोदचे सरकार 95
31 सहावी विधानसभा 1980 ते 1985 इंदिरा काँग्रेसला बहुमत 97
32 सातवी विधानसभा 1985 ते 1990 काँग्रेसच्या मताधिक्यात घट 99
33 आठवी विधानसभा 1990 ते 1995 काँग्रेसला काठावरचे बहुमत 101
34 नववी विधानसभा 1995 ते 1999 भाजप-शिवसेना युतीचे सरकार 104
35 दहावी विधानसभा 1999 ते 2004 राष्ट्रवादीचा उदय 107
36 अकरावी विधानसभा 2004 ते 2009 काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे सरकार 109
37 बारावी विधानसभा 2009 ते 2014 मनसेचा उदय व आघाडीचे राजकारण 113
38 तेरावी विधानसभा 2014 ते 2019 भाजपला सर्वाधिक जागा 117
39 महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष 120
40 महाराष्ट्र विधानपरिषद सदस्यांची यादी 125
41 वृत्तपत्रांसाठी प्रेस कौन्सिलची मार्गदर्शिका 128
42 सोशल मिडियाचा प्रचारातील वापर व सूचना  130
43 पेड न्युज म्हणजे काय? व नियंत्रण 131
44 निवडणूक काळात होणारी फसवणूक 134
45 महाराष्ट्रातील जातवास्तव 144
46 महाराष्ट्रातील राखीव मतदारसंघ 147
47 गडचिरोली जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 148
48 भंडारा जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 151
49 गोंदिया जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 154
50 सिंधदुर्ग जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 157
51 नांदेड जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 160
52 चंद्रपूर जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 163
53 रत्नागिरी जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 166
54 लातूर जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 169
55 उस्मानाबाद जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 172
56 बीड जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 175
57 परभणी जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 178
58 नंदूरबार जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 181
59 अमरावती जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 184
60 यवतमाळ जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 187
61 सातारा जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 190
62 वर्धा जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 193
63 हिंगोली जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 196
64 बुलढाणा जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 199
65 रायगड जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 202
66 जालना जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 206
67 नागपूर जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 209
68 अकोला जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 212
69 धुळे जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 215
70 नाशिक जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 217
71 जळगाव जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 220
72 सोलापूर जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 223
73 वाशिम जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 226
74 औरंगाबाद जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 229
75 अहमदनगर जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 232
76 पुणे जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 235
77 ठाणे जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 238
78 सांगली जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 241
79 मुंबई उपनगर जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 244
80 कोल्हापूर जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 245
81 मुंबई जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 248
82 मतदान पद्धत-मतदानात झालेले तीन बदल.. 249
83 लोकसभा निवडणुक 2014; महाराष्ट्रातील दृष्टीक्षेप 250
84 राज्यातील लोकसंख्येनुसार प्रमाण व सद्यस्थिती 251
85 राज्यातील लोकसभा व विधानसभा 2014 मधील पक्षनिहाय स्थिती व प्रमाण 252
86 महाराष्ट्र राज्यातील वयोगटाप्रमाणे मतदार संख्या व प्रमाण 253
87 विधानसभेच्या 234 मतदारसंघात महायुतीला आघाडी (निवडणूक-2014) 254
88 लोकसभा निवडणूक 2014; उमेदवारांची सामाजिक स्थिती 255
89 लोकसभा व विधानसभा मतदारसंघ दर्शविणारा महाराष्ट्र राज्याचा नकाशा 256
90 लोकसभा मतदार संघातील रचना, निवडणूक विश्‍लेषण, जातीय प्रमाण व प्रभाव, राजकीय सद्यस्थिती,             विधानसभा स्थिती, मतदारांची वर्गवारी (अनुक्रमे 1 ते 48 मतदारसंघ) 
91 1. नंदूरबार लोकसभा मतदारसंघ  259
92 2. धुळे लोकसभा मतदारसंघ 264
93 3. जळगाव लोकसभा मतदारसंघ 269
94 4. रावेर लोकसभा मतदारसंघ 274
95 5. बुलढाणा लोकसभा मतदारसंघ 279
96 6. अकोला लोकसभा मतदारसंघ 284
97 7. अमरावती लोकसभा मतदारसंघ 289
98 8. वर्धा लोकसभा मतदारसंघ 294
99 9. रामटेक लोकसभा मतदारसंघ 299
100 10. नागपूर लोकसभा मतदारसंघ 304
101 11. भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघ 309
102 12. गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघ 314
103 13. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ 319
104 14. यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघ 324
105 15. हिंगोली लोकसभा मतदारसंघ 329
106 16. नांदेड लोकसभा मतदारसंघ 334
107 17. परभणी लोकसभा मतदारसंघ 339
108 18. जालना लोकसभा मतदारसंघ 344
109 19. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ 349
110 20. दिंडोरी लोकसभा मतदारसंघ 354
111 21. नाशिक लोकसभा मतदारसंघ 359
112 22. पालघर लोकसभा मतदारसंघ 364
113 23. भिवंडी लोकसभा मतदारसंघ 369
114 24. कल्याण लोकसभा मतदारसंघ 374
115 25. ठाणे लोकसभा मतदारसंघ 379
116 26. मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघ 384
117 27. मुंबई उत्तर पश्‍चिम लोकसभा मतदारसंघ 389
118 28. मुंबई उत्तर पुर्व लोकसभा मतदारसंघ 394
119 29. मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघ 399
120 30. मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ 404
121 31. मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघ 409
122 32. रायगड लोकसभा मतदारसंघ 414
123 33. मावळ लोकसभा मतदारसंघ 419
124 34. पुणे लोकसभा मतदारसंघ 424
125 35. बारामती लोकसभा मतदारसंघ 429
126 36. शिरूर लोकसभा मतदारसंघ 434
127 37. अहमदनगर लोकसभा मतदारसंघ 439
128 38. शिर्डी लोकसभा मतदारसंघ 444
129 39. बीड लोकसभा मतदारसंघ 449
130 40. उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ 454
131 41. लातूर लोकसभा मतदारसंघ 459
132 42. सोलापूर लोकसभा मतदारसंघ 464
133 43. माढा लोकसभा मतदारसंघ 469
134 44. सांगली लोकसभा मतदारसंघ 474
135 45. सातारा लोकसभा मतदारसंघ 479
136 46. रत्नागिरी-सिंधुदूर्ग लोकसभा मतदारसंघ 484
137 47. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ 489
138 48. हातकणंगले लोकसभा मतदारसंघ 494
139 थोडक्यात महत्वाचे 
 लोकसभेत राज्यातील केवळ 5 महिला उमेदवार विजयी,लोकसभेत महिला खासदारांच्या प्रमाणात वाढ,लोकसभा निवडणुकीत 1,652 पक्षांना अपयश,आता मतदान यंत्रावर  उमेदवारांचा फोटो,मतदानाची मिळणार पोचपावती,राजकीय पक्षाप्रमाणेच आता नोटाचं स्वतंत्र चिन्ह!, 16व्या लोकसभेत केवळ तीनच अपक्ष उमेदवारांना संधी 
140 महाराष्ट्र राज्यातील राज्यसभेतील खासदार 499
141 लोकसभा, विधानसभेचा कार्यकाल व आगामी निवडणूका 502
142 देशभरातील सर्व विधानसभांचा कार्यकाल व आगामी निवडणूका 503
143 राज्यातील आगामी काळातील महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुका 505
144 महाराष्ट्रातील विभागानुसार स्थानिक स्वराज्य संस्था दृष्टीक्षेप/आरक्षण स्थिती 507
145 राज्यातील महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांचे पक्षनिहाय निकाल 508
146 राज्यातील नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणुकांचे पक्षनिहाय निकाल 510
147 नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुक 2016 नगराध्यांची पक्षनिहाय संख्या 520
148 राज्यातील जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणुकांचे पक्षनिहाय निकाल 521
149 राज्यातील पंचायत समितींच्या सार्वत्रिक निवडणुकांचे पक्षनिहाय निकाल 523
150 निवडणूक आयोगाने उमेदवारांसाठी निर्धारित केलेली निवडणूक खर्च मर्यादा 525
151 नोंदणीकृत राजकीय पक्ष व निवडणूक चिन्ह, संक्षिप्त नावे 526
152 संदर्भ, तळ टिपा 529
153 पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब) संस्थेची माहिती व कार्य 531




अधिक माहितीसाठी संपर्क :
श्री.चंद्रकांत भुजबळ
पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब)823/24, सदाशिव पेठ, गाडगीळ स्ट्रीट, पुणे 411030फोन नं- 020-24481671 ई.मेल.- prab.election@gmail.comवेबसाईट- prabindia.com / prabindia.org


================================================

"महाराष्ट्रातील राजकारण" पुस्तक घरपोच मिळण्यासाठी पुस्तकाचे व पोस्ट/कुरियर खर्च रक्कम बँकेत जमा करा. BOOK PURCHASE REQUEST FORM भरून बँकेत रक्कम जमा केलेली RECEIPT UPLOAD करा. खात्री केल्यानंतर ८ दिवसात नमूद केलेल्या पत्यावर पुस्तक मिळेल.


"महाराष्ट्रातील राजकारण" पुस्तक सवलतीत (१२००/-) मिळावा (सवलत मर्यादित कालावधीसाठी)

BOOK PURCHASE REQUEST FORM

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSeMHI34OXJrVYCuis1nEYo7dRJiBphz75UN404lS5ObXUmrnQ/viewform



पत्रव्यवहार पत्ता

श्री. चंद्रकांत भुजबळ
अध्यक्षपॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब)
८२३/२४पुण्याई अपार्टमेंटऑफीस नं. २,
गाडगीळ स्ट्रीटसदाशिव पेठ,
पुणे-४११०३०फोन-०२०-२४४८१६७१


 आर्थिक मदतीसाठी बँकविषयक तपशील

A/C. NAME : POLITICAL RESEARCH AND ANALYSIS BUREAU

BANK A/C. NO. 113004180000015

IFS CODE - SVCB 0000130

BANK NAME : SVC BANK LTD. 

BRANCH NAME : SADASHIV PETH, PUNE 411030

(THE SHANMRAO VITHAL CO-OPRTATIVE BANK LTD.)


टिप : १. धनादेश पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो“ या नावाने काढावा. अथवा आरटीजीएस ने अदा करावे.
२. पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) या संस्थेने कोणत्याही व्यक्तिला आर्थिक व्यवहार करण्यासाठी नियुक्त केलेले नाही.
             पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) या संस्थेच्या अधिक माहितीसाठी