Monday 23 April 2018

654 ग्रामपंचायतींसाठी 27 मे रोजी मतदान

महाराष्ट्रातल्या 25 जिल्ह्यातल्या 654 ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर, 27 मे रोजी होणार मतदान

4,771 रिक्तपदांसाठीही मतदान




राज्यातील विविध 25 जिल्ह्यांमधील 654 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक आणि 33 जिल्ह्यांतील सुमारे 2 हजार 812 ग्रामपंचायतींमधील 4 हजार 771 रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी 27 मे 2018 रोजी मतदान होणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयोगाने केली आहे. आयोगाच्या प्रसिद्धिपत्राकात म्हटले आहे की, यात सदस्यपदांबरोबरच सरपंचपदाच्या थेट निवडणुकांचाही समावेश आहे. ग्रामपंचायतींच्या या निवडणुकांसाठी 7 ते 12 मे 2018 या कालावधीत नामनिर्देशनपत्रे स्वीकारले जातील. त्यांची छाननी 14 मे 2018 रोजी होईल. नामनिर्देशनपत्रे 16 मे 2018 पर्यंत मागे घेता येतील व त्याच दिवशी चिन्ह वाटप होईल. मतदान 27 मे 2018 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल. गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी मात्र सकाळी 7.30 पासून दुपारी केवळ 3.00 पर्यंतच मतदानाची वेळ असेल. मतमोजणी 28 मे 2018 रोजी होईल.

सार्वत्रिक निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या: ठाणे- 5, पालघर- 3, रायगड- 187, सिंधुदुर्ग- 2, नाशिक- 20, धुळे- 7, जळगाव- 8, अहमदगनर- 77, पुणे- 90, सोलापूर- 3, सातारा- 23, सांगली- 82, कोल्हापूर- 74, औरंगाबाद- 4, बीड- 2, नांदेड- 7, परभणी- 1, उस्मानाबाद- 3, लातूर- 5, अकोला- 2, यवतमाळ- 29, वर्धा- 14, भंडारा- 4 आणि गडचिरोली- 2. एकूण- 654.

पोटनिवडणूक होणाऱ्या रिक्तपदांची जिल्हानिहाय संख्या (कंसात ग्रामपंचायतींची संख्या): ठाणे (90)- 167, पालघर (73)- 144, रायगड (93)- 158, रत्नगिरी (202)- 299, सिंधुदुर्ग (74)- 104, नाशिक (200)- 318, धुळे (34)- 49, जळगाव (57)- 96, नंदुरबार (32)- 36, अहमदगनर (78)- 124, पुणे (258)- 456, सोलापूर (93)- 154, सातारा (409)- 777, सांगली (40)- 81, कोल्हापूर (87)- 126, औरंगाबाद (34)- 41, बीड (24)- 35, नांदेड (106)- 177, परभणी (28)- 40, उस्मानाबाद (48)- 65, जालना (21)- 28, लातूर (79)- 94, हिंगोली (41)- 55, अमरावती (80)- 121, अकोला (23)- 31, यवतमाळ (110)- 167, वाशीम (20)- 23, बुलडाणा (39)- 72, वर्धा (49)- 72, चंद्रपूर (74)- 106, भंडारा (6)- 48, गोंदिया (35)- 43  आणि गडचिरोली (175)- 464. एकूण (2,812)- 4,771.




पुणे जिल्ह्यातील 90 ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहिर

निवडणुक आयोगाने केलेल्या घोषणेनुरुप थेट सरपंच पदासह सदस्य पदासाठीच्या जिल्ह्यातील 90 ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा फड रंगणार आहे. यामध्ये 27 एप्रिल रोजी तहसिलदार यांनी निवडणुकीची नोटीस प्रसिध्द करणे, सोमवार (ता.07 मे) ते शनिवार (12 मे ) या कलावाधीत अर्ज दाखल करणे, सोमवार (ता.14 मे) रोजी अर्ज छाननी, बुधवार (16 मे ) अर्ज माघारी घेणे, व त्याच दिवशी चिन्ह वाटप, तर रविवार (ता.27 मे) रोजी मतदान होणार आहे. यामध्ये सर्वाधिका बारामती तालुक्यातील 15 ग्रामपंचायतींचा समावेश आहे.तर पुरंदर मधिल नव्याने स्थापन झालेल्या वाल्हे, आडाचीवाडी, सुकलवाडी, वागदरवाडी यांसह इतर 13 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. तर जिल्ह्यातील 258 ग्रामपंचायतींच्या 456 रिक्त पदांच्या निवडणुका सुध्दा याच कालावधीत पार पडणार आहेत.

निवडणुका जाहिर होणारा तालुका, ग्रामपंचायत संख्या, ग्रामपंचायतीचे नाव खालील प्रमाणे - 
1) वेल्हा - 1
साईव बु.
2) मावळ - 7
ओवळे, दिवड, कल्हाट, सुद्रुंब्रे, सुदवडी, कोंडीवडे अ.मा., जांबवडे
3) भोर - 6
रायरी, अशिंपी, करंजे, नाटंबी, शिळींब, वारवंड,
4) जुन्नर - 3
बेल्हा, गुंजाऴवाडी, तांबेवाडी,
5) मुळशी - 1
मुळशी खर्द,
6) पुरंदर - 13
एखतपुर-मंजवडी, राजूरी, माळशिरस, वनपुरी, उदाचीवाडी, वीर, कोथळे, रानमळा, भोसलेवाडी, वाल्हे, आडाचीवाडी, सुकलवाडी, वागदरवाडी, 
7) खेड - 13
सुपे, कोहिनकरवाडी, सातकरस्थळ, सांडभोरवाडी, वाहागांव, मोरोशी, डेहणे, आडगाव,वाळुद, वाघु, एकलहरे, तिफनवाडी, धुवोली,
8) आंबेगाव - 10
पारगाव त.अवसरी बु., टाव्हरेवाडी, कानसे, चपटेवाडी, सुपेधर, अवसरी बु., फुलवडे, डिंभे बु., तांबडेमळा, लोणी,  
9) बारामती - 15
वंजारवाडी, कोऱ्हाळे खुर्द, करंजे, सुपे, शिर्सुफळ, चांदगुडे वाडी, भोंडवेवाडी, साबळेवाडी,मगरवाडी, काळखैरेवाडी, जराडवाडी, उंडवडी क.प.,दंडवाडी, पानसरेवाडी, कुतवळवाडी, 
10) शिरुर - 6
आण्णापूर,शिरुर ग्रामीण, सरदवाडी, कर्डेलवाडी, तार्डोबाचीवाडी, वाजेवाडी, 
11) इंदापूर - 5
लाकडी, बावडा, वकिलवस्ती, काझड, शिंदेवाडी, 
12) दौंड - 10
कुरकुंभ, वाटलुज, नायगांव, वडगाव बांडे, पानवली, केडगाव, वाखारी, पारगांव, खोपोडी, पांढरेवाडी,

एकूण - 90 
=====
भोर तालुक्यातील ५ ग्रामपंचायती
भोर : भोर तालुक्यातील ५ ग्रामपंचायतींचा व ७१ ग्रामपंचायतींचा पोट निवडणुक होत आहे. माहे जून ते सप्टेंबर २०१८ मध्ये मुदत संपणाºया व नव्याने स्थापित झालेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत सरपंचपदासह सर्व सदस्य तसेच रिक्तपदांच्या पोटनिवडणुकीसाठी निवडणुक कार्यक्रम जहिर झाला आहे. ग्रामपंचायत निवडणुक लागलेली गावे व सरपंच आरक्षण व निवडणुक कार्यक्रम खालील प्रमाणे ग्रामपंचायत रायरी सरपंच आरक्षण (सर्वसाधारण स्त्री), वारवंड (सर्वसाधारण), शिळींब (सर्वसाधारण), अशिंपी (नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री), नाटंबी (सर्वसाधारण स्त्री), करंजे (अनुसूचित जामाती स्त्री). भटक्या विमुक्त रिक्त १०९ प्रभागातील अनेक गावातील एक पासुन ५ सदस्यांपर्यत रिक्त असलेल्या १२६ जागांसाठी पोटनिवडणूक होत आहे. सर्वाधीक रिक्त ७ जागा वाढाणे ग्रामपंचायतीच्या आहेत.

इंदापूर तालुक्यात ५ ग्रामपंचायती

इंदापूर : तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व पाच ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. बावडा, वकीलवस्ती, काझड, शिंदेवस्ती, लाकडी या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. वरकुटे खुर्द, गिरवी, भिगवण, पिठेवाडी, थोरातवाडी रुई ग्रुप ग्रामपंचायत या ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुका होणार आहेत.
============================================

सांगली जिल्ह्यातील 82 ग्रामपंचायतींची निवडणूक 

सांगली - निवडणूक आयोगाने आज राज्यातील ग्रामपंचायत निवडणूका जाहीर केल्या. राज्यातील 25 जिल्ह्यातील 654 ग्रामपंचायतींसाठी एकाच वेळी निवडणूक होत असून, यामध्ये सांगली जिल्ह्यातील 82 ग्रामपंचायतींच्या निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झाला. 27 मे 2018 ला मतमोजणी होणार असल्याचेही जाहिर करण्यात आले आहे.  सांगली जिल्ह्यातील 82 गावे. मिरज- 3, कवठेमहांकाळ- 19, शिराळा -27, पलुस- 2, कडेगाव- 2, खानापूर(विटा)- 4, आटपाडी- 20 व जत- 5 अशा तालुकानिहाय ग्रामपंचायती आहेत.  25 जिल्ह्यांतील 654 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक आणि 33 जिल्ह्यांतील सुमारे 2 हजार 812 ग्रामपंचायतींतील 4 हजार 771 रिक्त जागांच्या पोटनिवडणुकांसाठी 27 मे 2018 रोजी मतदान आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयोगाने केली. 
निवडणूक जाहीर झालेली जिल्ह्यातील गावे 
मिरज - कावजी खोतवाडी, निलजी बामणी व वाजेगाव. कवठेमहांकाळ - बसाप्पाचीवाडी, दुधेभावी, गर्जेवाडी, करलहट्टी, पिंपळवाडी, रामपूरवाडी, देशिंग, अग्रण धुळगाव, घोरपडी, करोली (टी), कोकळे, शिंदेवाडी, ढोलेवाडी, घोगांव, कदमवाडी, कुंडलापूर, मोरगाव, जाधववाडी, झुरेवाडी. जत - गुलगुंजनाळ, कोंत्येवबोबलाद, कोणबगी, बिळुर, खिलारवाडी. खानापूर - देवनगर, भेंडवडे, राजधानी भेंडवडे, साळशिंगे. आटपाडी - नेलकरंजी, वाक्षेवाडी, काळेवाडी, मानेवाडी, मासाळवाडी, मिटकी, पिंपरी खूर्द, आंबेवाडी, खाजोडवाडी, आटपाडी, बनपूरी, भिंगेवाडी, करगणी, मापटेमळा, गुंडेवाडी, निंबवडे, पुजारवाडी, विभूतवाडी, औटेवाडी, कानकारेवाडी. पलुस - आमणापूर व विठ्ठलवाडी. कडेगाव - वाजेगाव, चिंचणी. शिराळा - वाकुर्डे बु., भाटशिरगाव, धसवाडी, खुजगाव, मादळगाव, रांजणवाडी, रिळे, शिरसी, आंबेवाडी, बेलेवाडी, फकीरवाडी, खराळे, कुसाईवाडी, सावंतवाडी, शिरसटवाडी, चिखलवाडी, अस्वलेवाडी, चिंचेवाडी, इंगरूळ, कुसळेवाडी, मराठेवाडी, मेणे, मोरेवाडी, पं. तं. वारूण, पाचगणी, मानेवाडी. 

निवडणूक होणारी गावे तालुकानिहाय अशी :

1) मिरज- कावजी खोतवाडी, निलजी बामणी, वाजेगांव.

2) कवठेमहांकाळ : बसाप्पाचीवाडी, दुधेभावी, गर्जेवाडी, करलहट्टी, पिंपळवाडी, रामपूरवाडी, देशिंग, अग्रण धूळगाव, घोरपडी, करोली टी, कोकळे, शिदेवाडी, ढालेवाडी, ढालगाव, कदमवाडी, कुंडलापूर, मोरगाव, जाधववाडी, झुरेवाडी. 

3) जत : गुलगुंजनाळ, कोंत्याव बोबलाद, कोणबगी, बिळूर, खिलारवाडी. 

4) खानापूर : देवनगर, भेंडवडे, राजधानी भेंडवडे, साळशिंगे.

5) आटपाडी : नेलकरंजी, वाकसेवाडी, काळेवाडी, मानेवाडी, मासाळवाडी, मिटकी, पिंपरी खुर्द, आंबेवाडी, खाजोडवाडी, आटपाडी, बनपुरी, भिंगेवाडी, करगणी, मापटेमळा, मुढेवाडी, निंबवडे, पुजारवाडी, विभूतवाडी, औटेवाडी, कानकात्रेवाडी.

6) पलूस : अमणापूर, विठ्ठलवाडी.

7) कडेगाव : वाजेगाव, चिंचणीवांगी.

8) शिराळा : वाकुर्डे बु., भाटशिरगाव, धसवाडी, करुंगली, खुजगाव, मादळगाव, रांजणवाडी, रिळे, शिरसी, आंबेवाडी, बेलेवाडी, फकीरवाडी, खराळे, कुसाईवाडी, सावंतवाडी, शिरसटवाडी, चिखलवाडी, अस्वलेवाडी, चिंचेवाडी, इंगरुळ, कुसळेवाडी, मराठेवाडी, मेणी, मोरेवाडी, पं.त. वारुण, पाचगणी, मानेवाडी. 


नऊ सरपंच, 72 जागांसाठी पोटनिवडणूक 
जिल्ह्यातील 9 गावातील सरपंच पदासाठी व 72 सदस्यांच्या जागासाठी पोटनिवडणूका होत आहेत. 40 गावांत या पोटनिवडणूक आहे. मिरज- 9 सदस्य, 2 सरपंच, तासगाव- 6 सदस्य, जत- 24 सदस्य 1 सरपंच, आटपाडी- 3 सदस्य, खानापूर(विटा)8 सदस्य, कडेगाव- 4 सदस्य 1 सरपंच, पलुस- 4 सदस्य, 1 सरपंच, वाळवा- 7 सदस्य, 3 सरपंच, शिराळा- 8 सदस्य व 1 सरपंच.  दरम्यान, जिल्ह्यातील 40 ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांचाही कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यात मिरज 6, तासगाव 6, खानापूर 3, वाळवा 7, शिराळा 6, पलूस 3, आटपाडी 2, जत 7 आणि कडेगाव तालुक्यातील 3 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या गावांतील 58 प्रभागांत ही पोटनिवडणूक होणार आहे. 

============================================

सातारा; २३ ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर

जून ते सप्टेंबर या कालावधीत मुदत संपणार्‍या व नव्याने स्थापन झालेल्या ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासह सदस्यांसाठी सातारा जिल्ह्यातील 23 ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक दि. 27 मे रोजी होत आहे. निवडणुकीसाठी दि. 7 मेपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. सार्वत्रिक निवडणुकीसोबत  409 ग्रामपंचायतींमधील 777 रिक्‍त जागांसाठीही निवडणूक घेतली जाणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने नुकताच निवडणूक कार्यक्रम जाहीर केला.जून ते सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यातील 23 ग्रामपंचायतींची मुदत संपत आहे. त्यामध्ये कोरेगाव तालुक्यातील तडवळे सं. कोरेगाव, कोंबडवाडी, चोरगेवाडी, चांदवडी, कण्हेरखेड, आसरे, बोबडेवाडी; जावली तालुक्यातील कुंभारगणी, कुरळोशी, गाढवली (पुनर्वसन); पाटण तालुक्यातील नारळवाडी, जमदाडवाडी, कळकेवाडी, मरळी, रामिष्टेवाडी, मल्हारपेठ, येराडवाडी, गव्हाणवाडी, नवसरवाडी, मंद्रुळ कोळे, मंद्रुळ कोळे खुर्द; माण तालुक्यातील सत्रेवाडी या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या निवडणुकीसाठी दि. 27 रोजी तहसीलदार निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करणार आहेत. दि. 7 ते 12 मेपर्यंत सकाळी 11 ते दुपारी 4.30 वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्रे मागवणे व सादर करण्याची मुदत आहे. त्यानंतर दि. 14 मे रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे. दि. 16 मे रोजी  दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज माघार घेता येणार असून त्यानंतर उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करून त्यांना चिन्हवाटप केले जाणार आहे. दि. 27 मे रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 पर्यंत मतदान होणार आहे. तहसीलदारांनी निश्‍चित केलेल्या ठिकाणी दि. 28 मे रोजी सकाळपासून मतमोजणी होणार आहे.दरम्यान, सार्वत्रिक तसेच पोटनिवडणूक होत असलेल्या ठिकाणी आचारसंहिता लागू झाली आहे. ही आचारसंहिता निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत कायम राहणार असून कुठल्याही नेत्यांना संबंधित ग्रामपंचायतींच्या क्षेत्रातील मतदारांवर प्रभाव पडेल, अशी कृती किंवा घोषणा करता येणार नाही. या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर दि. 27 एप्रिलपर्यंत प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या प्रसिध्द केल्या जाणार आहेत. 

============================================

अहमदनगर जिल्ह्यातील ७७ गावांत ग्रामपंचायत रणधुमाळी

माहे जून ते सप्टेंबर 2018 मध्ये मुदत संपणार्‍या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे.जिल्ह्यातील  कान्हूरपठार, बारागाव नांदूर, चितळी, लोणी व्यंकनाथ, मुकिंदपूर, वडगाव गुप्‍ता, ब्राम्हणी व देसवंडी आदींसह 77 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा बिगूल वाजला असून, 27 मे 2018 रोजी निवडणूक होणार आहे. त्यामुळे ऐन उन्हाळयात 77 गावांतील राजकीय वातावरण अधिकच तापणार आहे. अहमदनगर जिल्हाभरातील 77 ग्रामपंचायतींची प्रभागरचना व आरक्षणाची अंतिम यादी  नुकतीच जाहीर झाली आहे.या ग्रामपंचायतींची प्रारुप मतदार यादी जाहीर झाली असून, यावर हरकती देखील मागविल्या आहेत. मे महिन्यात जून व जुलै महिन्यात मुदत संपणार्‍या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईल, अशी अपेक्षा होती. परंतु राज्य निवडणूक आयोगाने सप्टेंबर महिन्यात मुदत संपणार्‍या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. काही ग्रामपंचायतींची मुदत संपण्यास तब्बल तीन महिन्यांचा अवधी बाकी असतानाच आयोगाने या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा बिगूल वाजविला आहे. अकोले तालुक्यातील घोटीसह 10, संगमनेर तालुक्यातील घारगावसह दोन, कोपरगाव तालुक्यातील दहिगाव बोलका, सुरेगावसह नऊ, श्रीरामपूर तालुक्यातील नाऊर,दिघीसह पाच, राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर, देसवंडी, ब्राम्हणी आदींसह अकरा, नेवासा तालुक्यातील मुकिंदपूरसह पाच, शेवगाव तालुक्यातील गोळेगाव,लाडजळगावसह तेरा,पाथर्डी तालुक्यातील गितेवाडी,चिंचोडीसह सात, जामखेड तालुक्यातील मुंजेवाडीसह दोन, पारनेर तालुक्यातील कान्हूरपठार,वाडेगव्हाणसह पाच, नगर तालुक्यातील वडगाव गुप्‍ता, राहाता तालुक्यातील चितळी आदींसह जिल्हाभरातील 77 ग्रामपंचायतींच्या 27 मे रोजी निवडणुका होणार आहेत.त्यामुळे या गावांतील राजकीय वातावरण अधिकच तापणार आहे.
तालुकानिहाय ग्रा.पं. संख्या 
अकोले 10, संगमनेर 2, कोपरगाव 9, श्रीरामपूर 5, राहाता 1, राहुरी 11, नेवासा 5, नगर 1, पारनेर 5, पाथर्डी 7, शेवगाव 13, कर्जत 5, जामखेड 2, श्रीगोंदा 1.

============================================




POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे


No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.