Friday 29 December 2017

8 राज्यांमध्ये 474 मुस्लिम बहुल विधानसभा मतदारसंघातील जागांचे समीकरण

474 मुस्लिम बहुल मतदारसंघातील राजकारण;

8 राज्यांच्या 9 प्रादेशिक पक्षांचा तीन तलाकविरोधी विधेकाला विरोध


केंद्र सरकारने तीन तलाक थांबवण्याच्या उद्देशाने एक विधेयक लोकसभेत सादर केले. हे विधेयक लोकसभेत मंजूरही करण्यात आले आहे. चर्चेदरम्यान 8 राज्यांच्या 9 प्रादेशिक पक्षांनी या विधेयकाला किंवा त्यातील तरतुदींना विरोध केला. त्याचे कारण या राज्यांमधील मुस्लीम बहुल मतदारसंघ हे आहे. या 8 राज्यांमध्ये 474 मुस्लिम बहुल विधानसभा मतदारसंघ आहेत.


====================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा

* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

CLICK HERE PAY NOW- 


=====================================================================

विरोधकांनी केला तरतुदींना विरोध

* तेलंगणाच्या हैदराबादमधून एमआयएमच्या खासदारपदी निवडून आलेल्या असदुद्दीन ओवेसींनी म्हटले की, हे विधेयक मुलभूत अधिकारांचे (फंडामेंटल राइट्स) हनन करते.

* बिहारच्या आरजेडी आणि ओडिशाच्या बीजू जनता दलानेही विरोध केला. केरळमधील मुस्लीम ली, पश्चिम बंगालमधील तृणमूल कांग्रेस आणि सीपीएमनेही विरोध केला.

* महाराष्ट्रातून एनसीपी, युपीतील सपा आणि तमिळनाडूच्या एआयएडीएमकेनेही विधेयकातील कमतरता मोजून दाखवल्या आणि विधेयक स्थायी समितीकडे पाठवण्याची मागणी केली. तर एनडीएतील शिवसेना, तेलगू देसम पार्टी आणि अकाली दल अशा पक्षांनी पाठिंबा दिला आहे.


====================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा

* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

CLICK HERE PAY NOW- 


=====================================================================

8 राज्यांत असे आहे मुस्लीम जागांचे समीकरण


राज्यएकूण जागामुस्लीम आमदारमुस्लीमबहुल मतदारसंघ
युपी40325124
प. बंगाल29459100
केरळ1402940
बिहार2432480
तमिळनाडू2350540
महाराष्ट्र2881050
तेलंगणा1190930
ओडिशा1470310


====================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा

* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

CLICK HERE PAY NOW- 


=====================================================================

8 राज्यांतील मुस्लीम वोट बँक

राज्यमुस्लीम मतदारहिंदू मतदार
प. बंगाल27.01%70.54%
युपी19.26%79.73%
ओडिशा2.17%93.63%
बिहार16.87%82.69%
केरळ26.56%54.73%
तमिळनाडू5.86%87.58%
महाराष्ट्र11.54 %79.83%
तेलंगणा12%86%


====================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा

* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

CLICK HERE PAY NOW- 


=====================================================================

मुस्लीमबहुल 218 जागांवर नजर

* देशात 145 लोकसभा जागांवर 11 ते 20% मुस्लिम मतदार आहेत. 38 जागांवर मुस्लिम मतदार 21 ते 30% आहे. 35 जागांवर 30% ते त्यापेक्षा अधिक मतदार आहेत. तीन तलाक कायदा बनल्याने या जागांवर भाजपला 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मुस्लीम महिलांची मते मिळू शकतात.

* 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीबरोबरच किंवा आधी 13 राज्यांत विधानसभा निवडणुका आहेत. त्याठिकाणी 130 विधानसभा मतदारसंघ मुस्लीमबहुल आहेत. एकट्या कर्नाटकात 40 मुस्लिम बहुल मतदारसंघ आहेत. त्याठिकाणी 2018 च्या सुरुवातीलाच विधानसभा निवडणुका होणार आहेत. 2018 मध्ये इतर 7 राज्यांतही निवडणुका आहेत.

2008 मध्ये होते 31 मुस्लिम खासदार
* 2014 मध्ये लोकसभेत 22 मुस्लिम खासदार निवडून आले होते. 2009 मध्ये मुस्लीम खासदारांची संख्या 31 होती.
सध्या सर्वाधिक 7 मुस्लीम खासदार पश्चिम बंगालमधून आहेत. बिहारमधील 4, जम्मू-काश्मीर आणि केरळमधील प्रत्येकी 3 खासदार मुस्लीम आहेत. आसाममधील 2 मुस्लीम खासदार आहेत.


पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब)

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB)

Thursday 28 December 2017

बीडमध्ये मंजरथ गावच्या सरपंचपदाची कमान ऐरोनॉटीकल इंजिनिअर ऋतुजाच्या हाती

बीडमध्ये मंजरथ गावच्या सरपंचपदाची कमान ऐरोनॉटीकल इंजिनिअर ऋतुजाच्या हाती


माजलगांव तालुक्यातील मंजरथ गावच्या सरपंचपदी तालुक्यात सर्वात कमी वय 25 वर्षे असलेली एरोनाॅटीकल इंजिनिअर तरूणी ऋतुजा राजेंद्र आनंदगांवकर ही दोन मातब्बर उमेदवारांचा पराभव करत सरपंच बनली आहे. तालुक्यातील मंजरथ हे गाव धाकटी काशी म्हणून राज्यात ओळखले जाते. मागील तीस वर्षांपासून राजेंद्र आनंदगांवकर हे सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन असून, मंजरथ गावाच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील असतात. राजेश्री आनंदगांवकर यांची मुलगी ऋतुजा आनंदगांवकर ही उच्चशिक्षित असून, तिने इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ ऐरोनॉटिकल सायन्समध्ये शिक्षण पूर्ण करून ती इंजिनिअर झाली आहे. तिने एमटेकचे शिक्षण पूर्ण केले आहे. सरपंचपदासाठी झालेल्या अटीतटीच्या निवडणुकीत दोन मातब्बर उमेदवारांचा पराभव करत ऋतुजा आनंदगांवकर मंजरथच्या सरपंच बनल्या आहेत. विशेष म्हणजे विद्यमान सरपंच तुकाराम चोरमले यांचा पराभव करत ऋतुजा आनंदगांवकर विजयी झाल्या आहेत. ऋतुजा उच्च शिक्षित आहे. तिने इंडियन इन्स्टिट्युट ऑफ ऐरोनॉटिकल सायन्समध्ये शिक्षण पूर्ण केले असून ती इंजिनीअर आहे. तिने ‘एम टेक’चे शिक्षणही पूर्ण केले आहे. अवघ्या पंचवीसाव्या वर्षी सरपंच झालेल्या ऋतुजाचे स्वप्न गावचा विकास करण्याचे आहे. तिच्या विजयाने गावात आनंदाचे वातावरण आहे.

शेवगाव तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसने मारली बाजी !

शेवगाव तालुक्यात दुसर्‍या टप्यात झालेल्या दहा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मोठी लोकसंख्या असलेल्या तीन गावांवर भाजपने वर्चस्व मिळवले असून जनशक्ती मंचनेही एका गावात विजय मिळवत खाते उघडले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने सहा ठिकाणी बाजी मारली आहे. या निवडणुकीत आपआपले गड राखण्यात प्रस्थापितांना बर्‍याच प्रमाण यश मिळवले असले तरी बोधेगाव व मुंगीमध्ये सत्तांतर झाले आहे. बोधेगाव येथे निवडणुकीच्या कारणामुळे कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाल्याने बंद पाळण्यात आला. तेथे मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून तणावपूर्ण वातावरण आहे. बोधेगाव व बालमटाकळीत भाजपने निर्विवाद वर्चस्व मिळविले. माजी जि. प. सदस्य नितीन काकडे गटाने सरपंचपदासह 11 जागा जिंकल्या. बालमटाकळीत भाजप किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष व विद्यमान सरपंच तुषार वैद्य यांच्या गटाला सरपंचपदासह 11 जागा मिळाल्या. शहरटाकळीत राष्ट्रवादीच्या दोन गटातच लढत झाली. तेथे शिवाजी गवळी यांच्या गटाने सरपंचपदासाह आठ जागा मिळविल्या. खरडगाव येथे बाजार समितीचे माजी उपसभापती विष्णू बोडखे यांच्या गटाकडे सरपंच पदासह पाच जागा मिळाल्या. कर्‍हेटाकळीत एकाकी लढत देत आपला बालेकिल्ला राखण्यात माजी सरपंच शफीक सय्यद यांना यश मिळाले. ढोरसडे-अंत्रे व हिंगणगाव ने या ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीच्या दोन गटांतच लढती झाल्या. मुंगीत राष्ट्रवादीचे निशिकांत राजेभोसले व भाजपच्या एका गटाने युती केली होती. त्यांच्या गटाला सरपंचपदासह 9 जागा मिळाल्या. वरुरमध्ये विद्यमान सरपंच भागवत लव्हाट यांच्या पत्नी मनिषा लव्हाट विजयी झाल्या. भगुरला जनशक्ती मंचच्या कार्यकर्त्यांतच लढत झाली. तेथे जनशक्तीचे वैभव प्रदीप पुरनाळे निवडून आले. ग्रामपंचायत व विजयी उमेदवार असे : बोधेगाव - सरपंच - सुभाष पवळे, ग्रा.पं. सदस्य - प्रकाश गर्जे, महादेव घोरतळे, मनिषा काशिद, सुनिल काशिद, उषा घोरतळे, विश्‍वनाथ कुढेकर, प्रिती अंधारे, विद्या ढवन, फिरोजखान पठाण,  स्नेहल खंडागळे, इंदूबाई मिसाळ, सदानंद गायकवाड, रमजू उस्मान पठाण, अश्‍विनी गुंजाळ, नितीन काकडे, ललिता चव्हाण व छबुबाई अकोलकर. बालमटाकळी-सरपंच-कौसल्या माणिक कवडे. सदस्य- तुषार वैद्य, हिराबाई घोरपडे, सुनंदा बामदळे, शहानजबी शेख, संतोष घोरपडे, अरुण बामदळे, रमा भोंगळे, धनंजय देशमुख, दुर्योधन काळे, शितल घुले, सारीका धाडगे, योगेश गरड, आशा घरजने व शोभा सौंदर. मुंगी - सरपंच - दादासाहेब भुसारी. सदस्य - गुलाब गव्हाणे, विठ्ठल रक्टे, शकुंतला कटारीया, प्रदीप काटे, गयाबाई गरड, हिराबाई अदमाने, अहमद चाँद, अनिता सुरवसे, भागवत देवढे, भैय्यासाहेब दसपुते, बेबीताई गायकवाड, नितीन घोरपडे, अंजना बल्लाळ, मिराबाई घोरपडे व मंगल जाधव. वरुर - सरपंच - मनिषा लव्हाट. सदस्य - बाबासाहेब म्हस्के, गोपाळ खांबट, शारदा म्हस्के, अर्जुन तुजारे, गयाबाई गरुड, रमेश वावरे, गोदावरी सोनटक्के, निर्मला म्हस्के, सुरेश वावरे, दामिनी कर्डीले व शमिना पठाण. भगुर - सरपंच - वैभव पुरनाळे. सदस्य - बेबीताई गंगावणे, दीपक पुरनाळे, प्रसाद गरुड, शिवाजी जायभाये, शारदा साबळे व शुभांगी साबळे आणि लताबाई मुरदारे दोघी बिनविरोध. शहरटाकळी - सरपंच - अलका शिंदे. सदस्य - छाया मिसाळ, रामआप्पा गिरम, उषाबाई मडके, महेश भालेराव, राजेंद्र खंडागळे, हिराबाई राऊत, राजेंद्र चव्हाण, शांता कोल्हे, सुनंदा गवळी, सुनिल गवळी व हिराबाई खंडागळे. खरडगाव - सरपंच - योगिता बोडखे. सदस्य - मल्हारी लवांडे, सुनिता बोडखे, जया लबडे, मच्छिंद्र आमटे, दिनकर सरसे, परविन शेख, सुनिल बोडखे, अंतिका घोरपडे, संगिता झिरपे, विक्रम लबडे व भाग्यश्री बोडखे.  कर्‍हेटाकळी - सरपंच - सय्यद शफीक. सदस्य - विजय ससाणे, सरस्वती ससाणे, शारदा ससाणे, विष्णू राठोड, विनायक गटकळ, ज्योती गटकळ तसेच छाया अंधारे, कमल कटे, संतोष लेंडाळ (तिघे बिविरोध). ढोरसडे - अंत्रे - सरपंच - सारीका वाघमारे. सदस्य - निवृत्ती ढोंबरे, जनार्दन माळवदे, गोकुळदास निकम, ज्ञानदेव निमसे, मधुरा खिलारे, तसेच रुख्मिनी पवार, सरस्वती ठोंबळ, सुनिता ठोंबळ व शांदाबाई माळवदे (चार बिनविरोध). हिंगणगाव- ने - सरपंच - वर्षा पवार. सदस्य - बबन पवार, रुपाली आहेर, विनोद पवार, अनिता पवार, अजित पवार, रेखा पवार व मंदाबाई म्हस्के.

निंबोडी, हिवरेझरे आणि देऊळगावात सत्तांत्तर

सहा ग्रामपंचायतींच्या निकालाने नगर तालुक्यातील राजकीय समीकरण बदलू लागले आहेत. मेहेकरी व अरणगाव येथील सरपंचपद एका गटाला आणि सदस्याचे बहुमत मात्र दुसर्‍या गटाला देत, नव्याने निवडून आलेल्या सरपंचाची डाकेदुखी मात्र वाढविली आहे.  माहे जानेवारी महिन्यात मुदत संपणार्‍या मेहेकरी, निंबोडी, देऊळगाव सिध्दी, अरणगाव, बारदरी व हिवरेझरे या ग्रामपंचायतींची मुदत संपणार आहे. बारदरी ग्रामपंचायतींच्या सदस्यपदाच्या सात जागा बिनविरोध झालेल्या आहेत. त्यामुळे सरपंचपदाचीच निवडणूक झाली होती. सरपंचपदासाठी दुरंगी लढत झाली. या लढतीत नितीन मलिकार्जुन जंगम यांनी बाजी मारली. त्यांनी प्रतिस्पर्धी संतोष विश्‍वनाथ वाकचौरे यांचा  पराभव केला आहे. जंगम यांना 389 तर वाकचौरे यांना 103 मते पडली आहेत.गावकर्‍यांनी बारादरी ग्रामपंचायत पुन्हा सुधीर पोटे व अशोक पोटे यांच्या हाती सोपविली आहे.
अरणगावच्या सरपंचपदी स्वाती मोहन गहिले विजयी झाल्या आहेत. त्यांनी जिजाबाई ज्ञानेव शेळके याचा पराभव केला आहे.गहिले यांना 432 तर शेळके यांना 331 मते मिळाली आहेत. सदस्यपदी पोपट शिंदे, बबन शिंदे,मनिषा गहिले, संपत कांबळे,महेश पवार, शितल ससाणे, गणेश दळवी,वैशाली पुंड,लता शिंदे,सागर कल्हापुरे,मिरा कांबळे,नंदा करांडे व वर्षा कांबळे विजयी झाल्या आहेत. कांबळे केवळ दोन मतांनी विजयी झाल्या आहेत.  निंबोडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शंकर बाबासाहेब बेरड हे 992 मते घेवून बाजी मारली आहे. त्यांनी जयराम बेरड यांचा पराभव केला आहे. जयराम बेरड यांना 903 मते मिळाली आहेत. या ग्रामपंचायतीच्या सदस्यपदी विद्या भिंगारदिवे, शेख रेश्मा, पांडुरंग शेंडगे, शिवाजी बेरड,संगीता बेरड,भिमा बेरड, पारुबाई आवारे, शैलेश भोसले, संदीप पानसरे,जयश्री तडके विजयी झाले आहेत. देऊळगाव सिध्दी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी हरिभाऊ केरु बुलाखे विजयी झाले आहेत. त्यांना 1 हजार 404 मते पडली आहेत. त्यांचे प्रतिस्पर्धी बुलागे स्वप्नील यांना 1 हजार 96 मते पडली आहेत. सदस्यपदी नाना बोरकर, भीमराज सरगर, विद्या इंगळे, रींद्र कंडकर, संजय वाघमोडे, बाजीराव धायमुक्ते, आशा सुलाखे, मुक्ताबाई बोरकर, रामदास गिरवले, पार्वती देविकर हे विजयी झाले आहेत. 
मेहेकरी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी संतोष पालवे निवडून आले आहेत. त्यांनी 750 मते घेत बाजी मारली आहे.त्यांचे प्रतिस्पर्धी शंकर पालवे यांना 593 मते पडली आहेत. सदस्यपदी छगन कानडे, सोपान पालवे,मंगल पंडित, शरद बडे, अश्‍विनी आंधळे, सोनाली आंधळे, पांडुरंग वनवे, लहानुबाई पालवे व सुरेखा पालवे विजयी झाल्या आहेत.  हिवरेझरे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचा मान अनुजा मयुर काटे यांना मिळाला आहे. त्यांना 595 मते मिळाली असून, मंदाबाई काळे यांना फक्त 588 मते पडली आहेत. सदस्यपदी साहेबराव टकले, नाथा काळे, संगिता काळे,भाऊसाहेब काळे, नेहा काळे, गणेश साळवे, प्रतीक्षा आनंदकर, शिला पवार आदी विजयी झाले आहेंत.

सोलापूर ग्रा.पं.चा संमिश्र निकाल

सोलापूर यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपशी संबंधित गटांना संमिश्र यश मिळाल्याचे स्पष्ट झाले. दुसर्‍या टप्प्यात माढा तालुक्यातील 12, करमाळा तालुक्यातील 13, तर बार्शी तालुक्यातील 3 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक झाली होती.
 माढ्यात संमिश्र कौल 
माढा तालुक्यातील बारा ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत मतदारांनी संमिश्र स्वरूपाचा कौल दिला. कन्हेरगाव, अंजनगाव, वडशिंगे, मुंगशी या ग्रामपंचायतींत सत्तांतर झाले. टेंभुर्णी, आढेगाव, पिंपळखुंटे या ठिकाणी सरपंच एकाचा, तर बहुमत विरोधकांकडे, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. वडोली ग्रामपंचायत वगळता इतर सर्व ग्रामपंचायतींत शिंदे बंधूंचीच सत्ता आली आहे.
करमाळ्यात पाटील गटाचे वर्चस्व
तालुक्यातील 13 ग्रामपंचायतींत  आ. नारायण पाटील यांच्या गटाने घवघवीत यश संपादन केले आहे. 13 पैकी 8 ग्रामपंचायतींची सत्ता आ. पाटील गटाकडे मोठ्या मताधिक्क्याने मतदारांनी दिली आहे. जि.प. अध्यक्ष संजयमामा शिंदे गटाकडे 4 ग्रा.पं.ची सत्ता आली आहे. माजी आ. शामल बागल गटाकडे रामवाडी, भगतवाडी, गुलमोहरवाडी या ग्रामपंचायतीची सत्ता आली असून, मौजे उंदरगाव, राजुरी, केत्तूर या ग्रामपंचायतींमध्ये ग्रामपंचायत सदस्यपदांवर आमच्या गटाचे  बहुमत असल्याचा दावा बागल गटाकडून करण्यात आलेला आहे.
बार्शीत राष्ट्रवादी, भाजपचे यश
तालुक्यातील दोन ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसने, तर एका ग्रामपंचायतीवर भाजपने दावा केला आहे.  उंडेगावच्या सरपंचपदी शामलताई साहेबराव सलगर, अंबाबाईचीवाडी ग्रामपंचायत सरपंचपदी सत्यवती भारत माळी, तर मुंगशी (वा.) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी दिनेश रामचंद्र राक्षे हे निवडून आले आहेत. विजयाबाबत दावे प्रतिदावे करण्यात आले. उंडेगाव व अंबाबाईचीवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी राष्ट्रवादी समर्थक निवडून  आल्याचा दावा आ. सोपल गटाकडून करण्यात आला आहे. मुंगशी (वा) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या गटाचे समर्थक सरपंचपदावर विराजमान झाल्याचे सांगण्यात आले. अंबाबाईचीवाडी येथे स्थानिक आघाडीचे सदस्य निवडून आले आहेत.

आ. भालके १० आ. परिचारक ३ आवताडेंचेे ६ ग्रामपंचायतींवर वर्चस्व

मंगळवेढा - दुसर्‍या टप्प्यात झालेल्या 19 गावांच्या ग्रामपंचायती निवडणुकीत आ. भारत भालके, आ. प्रशांत परिचारक आणि समाधान आवताडे गटाला संमिश्र यश मिळाले आहे. यात आ. भालके गटाने 10 जागी आघाडी घेतली आहे, तर आ. परिचारक गटाला 3 जागी चांगले यश मिळाले आहे.  मुंढेवाडी या अगोदरच अविरोध झालेल्या ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भालके गटाने बाजी मारली. भारत बेदरे यांनी बठाण येथे वजन कायम ठेवले आहे. सभापती प्रदीप खांडेकर यांनी हिवरगाव येथे वर्चस्व अबाधित ठेवले, तर तालुक्याचे नेते स्व. दत्ताजी भाकरे यांच्या पत्नी शांताबाई भाकरे सरपंच म्हणून  निवडून आल्या आहेत.  आ. भालके यानी शेलेवाड़ी, बठाण, चिक्कलगी, शिरसी, खुपसंगी, नंदुर, उचेठान, मुंढेवाड़ी येथे तर परिचारक गटाने भाळवणी, जंगलगी  निंबोणी , या गावात आपले सरपंच निवडून आणले आहेत.  तसेच आवताडे गटाने ब्रम्हपुरी, हिवरगाव, आंधळगाव, खड़की, अकोले, जुनोनी येथे सत्ता मिळवली.
गावनिहाय विजयी  सरपंच   बठाण सरपंच- संजय गुंडोंपंत बळवंतराव, उचेठान सरपंच- दत्तात्रय रावसो गडदे, चिक्कलगी सरपंच- दिनेश मल्लेशा पाटील, नंदुर सरपंच- गुरैया शकरया स्वामी, शिरसी सरपंच- सुरेखा बाबासो गायकवाड़, खुपसंगी सरपंच-संभाजी ज्ञानदेव हेगड़े, शेलेवाड़ी सरपंच-विमल जोतिराम चव्हाण, मुंढेवाड़ी  सरपंच-सविता शिवाजी पाटील, अकोले सरपंच-सुखदेव इंगळे, खड़की सरपंच-सविता बेलदार, जुनोनी सरपंच-मालन जाधव, हिवरगाव सरपंच- रवि खांडेकर, आंधळगाव सरपंच- शांताबाई दत्तात्रय भाकरे, ब्रम्हपुरी सरपंच- मनोज पुजारी, जंगलगी सरपंच-  शशिकला चंद्रकांत चौखंडे, महमदाबाद सरपंच-रतन सुरेश हत्तिकर, जालिहाळ सरपंच-सचिन तमन्ना चौगुले, निंबोनी सरपंच- वंदना आप्पा शिंदे, भाळवणी सरपंच-कमल दामाजी चव्हाण.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेनेचे वर्चस्व

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड, कुडाळ, वेंगुर्ले व कणकवली तालुक्यांतील दुसर्‍या टप्प्यातील काही ग्रा. पं. च्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या.  यात वेंगुर्ले, कुडाळ व देवगड तालुक्यांत शिवसेनेने बाजी मारल्याचे दिसून आले. तर भाजप व स्वाभिमान पक्ष यांना संमिश्र यश मिळाले. काही ग्रा. पं. वर गाव पॅनेलने विजय मिळविला आहे.देवगड व  कुडाळ तालुक्यांतील काही गावे दिग्गज लोकप्रतिनिधींची असल्याने या निवडणुका लक्षवेधी ठरल्या होत्या. अनेक ठिकाणी युतीतील मित्रपक्ष शिवसेना व भाजप या निवडणुकांसाठी एकमेकांसमोर उभे ठाकले होते. तर काही ठिकाणी स्वाभिमान पक्षाने भाजपला छुपे समर्थन दिले होते.

देवगडमध्ये सेनेची अनपेक्षित घोडदौड 

देवगडातील सात ग्रामपंचायतींच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेने सर्वाधिक चार, तर भाजप, समर्थ विकास पॅनेल व गाव विकास पॅनेलने प्रत्येकी एका ग्रामपंचायतीवर वर्चस्व प्रस्थापित केले. दिग्गजांसाठी प्रतिष्ठेच्या ठरलेल्या  या निवडणुकीमध्ये राज्याचे आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत यांनी वळीवंडे ग्रामपंचायत, माजी आमदार प्रमोद जठार यांनी शिरवली ग्रामपंचायत स्वत:कडे राखली, तर सभापती जयश्री आडिवरेकर यांचे होम पिच असलेल्या फणसगाव ग्रामपंचायतीमध्ये भाजप पुरस्कृत पॅनलला पराभवाचा झटका बसला. माजी उपसभापती नासीर मुकादम हे रामेश्‍वर सरपंचपदाच्या निवडणुकीत पराभूत झाले. वळीवंडे, वानिवडे, पावणाई व विठ्ठलादेवी या चार ग्रामपंचायतींवर  शिवसेनेने दावा केला आहे. रामेश्‍वरमध्ये स्वाभिमान, फणसगावमध्ये गाव पॅनेल, तर शिरवलीमध्ये भाजपचे उमेदवार विजयी झाले.

मोखाड्यात अटीतटीच्या लढतीत भाजपची सरशी

मोखाडा : मोखाड्यातील सायदे आणि किनिस्ते या दोन्ही ग्रामपंचायतींची निवडणूक भाजप आणि शिवसेनेने प्रतिष्ठेच्या केल्या होत्या. यामध्ये सायदे ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी भाजपचे दिलीप झुगरे 18 तर किनिस्ते सरपंच पदी भारती शिंदे 21 मतांनी विजयी झाल्या आहेत. दोन्ही ठिकाणी शिवसेनेला धोबीपछाड देत पूर्ण बहुमतात भाजपने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. सायदे ग्रामपंचायती मध्ये 11 सदस्य संख्या आहे. त्यामध्ये   4 जागा बिनविरोध निवडून आल्या होत्या. त्यामध्ये सेना आणि भाजपचे प्रत्येकी दोन सदस्य निवडून आले होते. आज झालेल्या मतमोजणीत उर्वरीत 7   जागांपैकी 4 जागी भाजपचे उमेदवार निवडून आले आहेत. तर सरपंच पदाच्या झालेल्या अटीतटीच्या लढतीत भाजपचे दिलीप झुगरे यांनी शिवसेनेचे देवराम कामडी यांच्या वर 18 मतांची आघाडी घेऊन विजय मिळवत पूर्ण बहुमत सिद्ध केले आहे. दिलीप झुगरे यांना 390 तर देवराम कामडी यांना 372 मते मिळाली आहेत.किनिस्ते ग्रामपंचायतीची निवडणूक ही अटीतटीचीच झाली आहे. येथे भाजपच्या सरपंच पदाच्या उमेदवार भारती शिंदे यांनी शिवसेनेच्या कविता मडके यांच्यावर 21 मतांची आघाडी घेऊन विजय मिळविला आहे. भारती शिंदे यांना 323 तर सेनेच्या कविता मडके यांना  302 मते मिळाली आहेत. किनिस्ते ग्रामपंचायती मध्ये 7 सदस्य संख्या आहे. त्यामध्ये भाजपचे 3 सदस्य अगोदरच बिनविरोध निवडून आले आहेत. तर आज झालेल्या मतमोजणीत पुन्हा 2 सदस्य निवडून आणत भाजपने एकूण 5 उमेदवार निवडून आणत सरपंच पदासह किनिस्ते ग्रामपंचायतीवर पूर्ण बहुमत मिळविले आहे.

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब)

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB)


Wednesday 27 December 2017

पुणे जिल्ह्यातील ८५ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी-कॉंग्रेसचे वर्चस्व

पुणे जिल्ह्यातील ८५ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी-कॉंग्रेसचे वर्चस्व



====================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा

* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

CLICK HERE PAY NOW- 


=====================================================================

पुणे जिल्ह्यातील ८५ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी, तर ९७ ग्रामपंचायतींच्या सदस्यपदासाठी मतदान घेण्यात आले होते.  निवडणूक झालेल्या एकूण ग्रामपंचायतींपैकी निम्म्यापेक्षा अधिक ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ता काबीज केली आहे. काँग्रेस दुसऱ्या तर, केंद्रात आणि राज्यात सत्तेवर असलेला भारतीय जनता पक्ष तिसऱ्या क्रमांकावर आहे. दरम्यान, अनेक ठिकाणी सरपंच एका गटाचा आणि ग्रामपंचायत सदस्यांचे बहुमत दुसऱ्या गटाकडे, असे चित्र निर्माण झाले आहे. पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकीत राज्य आणि जिल्हा पातळीवरील नेत्यांना आपापल्या गावाची सत्ता राखण्यात यश आले आहे. परंतु गेल्या अनेक वर्षांपासून गावाची सूत्रे सातत्याने स्वतःच्या हातात कायम ठेवणाऱ्या प्रस्थापित गावपुढाऱ्यांना मतदारांनी सपशेल नाकारले आहे. अनेक गावांमध्ये प्रस्थापितांना झिडकारून सत्तेची सूत्रे तरुणांच्या हातात दिली आहेत. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार (काटेवाडी, ता. बारामती), माजी विधानसभा अध्यक्ष, आमदार दिलीप वळसे पाटील आणि जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील (निरगुडसर, ता. आंबेगाव), भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब गावडे (पारवडी, ता. बारामती), राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषदेतील गटनेते आणि माजी उपाध्यक्ष शरद लेंडे व आमदार शरद सोनवणे (पिंपळवंडी, ता. जुन्नर) आणि शिवसेनेच्या जिल्हा परिषदेतील गटनेत्या आशा बुचके (बुचकेवाडी, ता. जुन्नर) आदी नेत्यांना आपापल्या गावाची सत्ता कायम राखण्यात किंवा नव्याने मिळविण्यात यश आले आहे. पिंपळवंडी ग्रामपंचायतीत लेंडे आणि आमदार सोनवणे यांनी एकत्र येत, सर्वपक्षीय पॅनेल स्थापन केला होता. या पॅनेलला यश आले आहे. त्यामुळे या दोन्ही नेत्यांची पिंपळवंडीत संयुक्त सत्ता असणार आहे.   पुणे जिल्ह्यातील १२ तालुक्यांतील ८९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये काही दिग्गजांना आपले गड राखण्यात यश आले असले तरी काहींच्या हातातून सत्ता गेली आहे. नारायणगावमध्ये सर्वपक्षीय सत्ता आली असून काटेवाडीत राष्ट्रवादीने पुन्हा एकदा वर्चस्व सिद्ध केले आहे. तर पुरंदर तालुक्यातील दोन्ही ग्रामपंचायती सत्ताधारयांच्या हातून गेल्या आहेत. बारामती तालुक्यातील १५ ग्रामपंचायतीसाठी झालेल्या निवडणुकीचे आज जाहीर झाले.यामध्ये काटेवाडी ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रस, पारवडी ग्रामपंचायतीवर भाजपचे वर्चस्व कायम राखण्यात यश आले आहे.या निकालामुळे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजपाचे नेते बाळासाहेब गावडे या बड्या नेत्यांच्या समर्थकांना गड राखण्यात यश आले आहे. आंबेगाव तालुक्यात ९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी मतमोजणी झाली. यामध्ये ७ ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रसने, तर ४ ग्रामपंचायतींवर शिवसेनेने व २ ग्रामपंचायतींवर भाजपाने दावा केला आहे. यातील सर्वांचे लक्ष लागलेल्या निरगुडसर ग्रामपंचायतीमध्ये सर्वच्या सर्व जागांवर राष्टवादी काँग्रेसने विजय मिळविला.


====================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा

* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

CLICK HERE PAY NOW- 


=====================================================================

जिल्ह्यातील ८५ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी - ८५ जागा होत्या त्यासाठी २१२ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. तर एकूण सदस्य - ५१३ जागासाठी १,१३३ उमेदवार उमेदवार निवडणूक रिंगणात होते.सरपंचपदाच्या २१२ उमेदवारांचे आणि ग्रामपंचायत सदस्यपदाच्या १ हजार १३३ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. जिल्ह्यातील ९९ ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला होता. यापैकी दोन ग्रामपंचायती अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी पूर्णपणे बिनविरोध झाल्या. उर्वरित ९७ ग्रामपंचायतींपैकी ११ गावांचे सरपंच बिनविरोध झाले आहेत. जुन्नर तालुक्‍यातील एका ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी एकही अर्ज दाखल होऊ न शकल्याने, येथील पद रिक्त राहिले आहे. त्यामुळे उर्वरित ८५ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी आणि ९७ ग्रामपंचायतीच्या सदस्यपदासाठी मतदान घेण्यात आले होते. या सर्व ग्रामपंचायतींचे सरपंच पहिल्यांदाच थेट जनतेतून निवडले आहेत. हाती आलेल्या निकालामध्ये सरपंचपदासाठी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी-कॉंग्रेसला मानणाऱ्याचे वर्चस्व असल्याचे दिसून येत आहे.

राष्ट्रवादीची सत्ता आलेल्या ग्रामपंचायतीची तालुकानिहाय संख्या- भोर व मावळ प्रत्येकी - ५, पुरंदर - २ (दोन्ही ठिकाणी आघाडी), दौंड व शिरूर प्रत्येकी - १, हवेली - ६, बारामती - १५, वेल्हे - ३, जुन्नर - १६, आंबेगाव - ७, खेड - २, मुळशी - १३. 
=========================

वाघोलीच्या सरपंचपदी वसुंधरा उबाळे; ग्रामविकास पॅनेलला बहुमत

वाघोली ग्रामपंचायत निवडणुकीत 17 पैकी ग्रामविकास पॅनलने नउ जागांवर विजय मिळविला. मात्र सरपंचद त्यांना गमवावे लागले. सरपंचपदी वाघेश्वर पॅनलच्या वसुंधरा उबाळे यांनी 50 मतांची आघाडी घेत ग्रामविकास पॅनलच्या मिना सातव यांचा पराभव केला. उबाळे यांना 8766 मते तर सातव यांना 8716 मते मिळाली.सरपंचपदाच्या उमेदवार मीना सातव यांचा केवळ 50 मतानी पराभव झाल्याने त्यांचे पती व विद्यमान सदस्य संजय सातव यांनी फेर मतमोजणीची मागणी केली होती. फेर मतमोजणीत वसुंधरा उबाळे याच 50 मतानी विजयी ठरल्या. वाघेश्वर पॅनलने सात जागांवर विजय मिळविला. कविता दळवी या विद्यमान सदस्या विजयी झाल्या तर मच्छींद्र सातव व स्वाती सातव हे विद्यमान सदस्य पराभुत झाले. अपक्ष उमेदवार श्रीकांत वाघमारे हा विजयी झाला. तर काळभैरवनाथ पॅनेलचा दारुण पराभव झाला. वाघेश्वर पॅनल, वाघोली ग्रामविकास पॅनल व काळभैरवनाथ पॅनल मध्ये लढत झाली. सरपंचपदासाठी वाघोली ग्रामविकास पॅनलच्या मीना सातव, वाघेश्वर पॅनलच्या वसुंधरा उबाळे व काळभैरवनाथ पॅनलच्या साधना व्यवहारे यांच्यात चुरस होती. पहील्या तीन वार्डमधील मतमोजणीत उबाळे यांनी 1400 मतांची आघाडी घेतली होती. त्यानंतर उर्वरीत तीन वॅार्डमधील मतमोजणीत सातव यानी मतांची आघाडी तोडली. मात्र तरीही त्यांना 50 मतानी पराभुत व्हावे लागले. तिसर्या उमेदवार साधना व्यवहारे यांना केवळ 336 मते मिळाली.माजी जिल्हा परीषद सदस्या अर्चना कटके या वॅर्डक्रमांक पाच मधुन विजयी झाल्या. तर विद्यमान सदस्य समीर भाडळे यांच्या पत्नी पूजा भाडळे क्रमांक एकमधुन तर माजी सरंपच रामदास दाभाडे यांच्या वहीनी वंदना दाभाडे क्रमांक दोन मधुन विजयी झाल्या. पोलिस पाटील पदाचा राजीनामा देउन निवडणुक लढविलेले रामकृष्ण सातव हे  क्रमांक तीन मधुन विजयी झाले. सदस्यामध्ये सर्वाधिक पुजा भाडळे यांना 2900 मते मिळाली. तर अपक्ष उमेदवार गणेश पवार यांना सर्वात कमी 41 मते मिळाली.सर्वाधिक चुरस सरपंचपदासाठी व क्रमांक सहा मध्ये होती. सहामध्ये ग्रामविकास पॅनेलच्या तीन्ही उमेदवारांनी विजय मिळविला. निवडून आलेल्या उमेदवारांमध्ये विद्यमान सदस्या कविता दळवी व माजी सरपंच शिवदास उबाळे वगळता सर्व चेहरे ग्रामपंचायतीवर प्रथमच निवडुन आले आहेत. सरपंचपदी विजयी झालेल्या वसुंधरा उबाळे या हवेली पंचायत समितीच्या माजी सभापती आहे. त्यांचे पती माजी सरपंच शिवदास उबाळे हे ही विजयी झाले.काळभैरवनाथ पॅनलच्या सरपंचपदाच्या उमेदवार साधना व्यवहारे व त्यांचे पती दत्तात्रय व्यवहारे दोघही पराभूत झाले. वाघोलीत निकालापूर्वीच ग्रामविकास पॅनेलच्या मिनाकाकी सातव यांच्या विजयाचे होर्डींग लागले होते. मात्र ऐनवेळी वसुंधरा उबाळे या सरपंचपदी विजयी झाल्या तर मिनाकाकी सातव यांना 49 मतांनी पराभवास सामोरे जावे लागले .

विजयी उमेदवार-
सरपंचपदी वसुंधरा शिवदास उबाळे. ( 8766 )
विजयी सदस्य- शिवदास मनोहर उबाळे ( 2503 ), पुजा समीर भाडळे ( 2900 ), महेंद्र परशुराम भाडळे ( 2567 ) विजय रामचंद्र भाडळे ( 1316 ), वंदना संजय दाभाडे ( 1381 ), रामकृष्ण हेमचंद्र सातव ( 2026 ), रेश्मा गणेश पाचारणे ( 2092 ), रेाहीणी सागर गेारे ( 2214 ), कविता सुधीर दळवी ( 1530 ), सुनिता अनिल सातव ( 1643 ), श्रीकांत भगवान वाघमारे ( 1189 ), मारुती भगवंता गाडे ( 1448 ), जयप्रकाश सुभाष सातव ( 1185 ), अर्चना शांताराम कटके ( 1350 ), संदीप सोमनाथ सातव ( 2160 ), मालती गणेश गोगावले ( 2273 ), जयश्री सुनिल काळे ( 1981 )

=========================


'माळेगाव बुद्रुक'वर भाजपची सत्ता!

बारामती तालुक्यातील सर्वात मोठ्या असलेल्या माळेगाव बुद्रुक ग्रामपंचायतीवर अखेर भाजपने आपला झेंडा फडकविला. सोमवारी (दि. 22) झालेल्या सरपंचपदाच्या निवडणुकीत जयदीप विलास तावरे यांनी एका मताने बाजी मारत सरपंचपदाची खुर्ची पटकावली. तावरे यांना 9, तर त्यांचे प्रतिस्पर्धी राजेंद्र चव्हाण यांना 8 मते मिळाली. सरपंचपदाच्या निवडीमुळे गेला महिनाभर चाललेली राजकीय उलथापालथ सोमवारी थांबली. हा निकाल राष्ट्रवादीसाठी धक्‍कादायक मानला जातो. माळेगावचे यापूर्वीचे सरपंच जयदीप दिलीप तावरे यांनी ठरलेल्या कालावधीत राजीनामा न दिल्याने त्यांच्यावर अविश्‍वास ठराव दाखल करण्याच्या उद्देशाने 12 सदस्य अज्ञातस्थळी रवाना झाले होते. जयदीप दिलीप तावरे यांना कोणत्याही परिस्थितीत खुर्चीवरून हटविण्याचा चंगच काही सदस्यांनी बांधला होता. त्यातून माळेगावच्या राजकीय क्षेत्रात मोठा भूकंप झाला होता. या सगळ्या घडामोडीत सरपंचपद भाजपकडे जात असल्याची चाहूल राष्ट्रवादीला लागल्यानंतर राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच याप्रश्‍नी लक्ष घालत जिल्हा परिषदेच्या सदस्या रोहिणी तावरे यांचे पती रविराज व माळेगाव कारखान्याचे माजी अध्यक्ष बाळासाहेब तावरे यांचे पुतणे रणजित अशोकराव तावरे यांचे मनोमिलन घडवून आणले होते. त्यामुळे राष्ट्रवादीच्या ताब्यातून ही ग्रामपंचायत जाणार नाही, अशी चिन्हे दिसत होती. 
===========================================

काटेवाडीत राष्ट्रवादीचे वर्चस्व

संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या काटेवाडी (ता. बारामती) ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत भवानीमाता पॅनेलने एकतर्फी विजय मिळवत १५ पैकी १४ जागा पटकावल्या. सरपंचपदी राष्ट्रवादीचे विद्याधर श्रीकांत काटे हे १५९२ मताधिक्‍याने निवडून आले. संरपचपदाचे उमेदवार विद्याधर श्रीकांत काटे यांनी पांडुरंग मारुती कचरे यांचा १,५०२ मतानी दणदणीत पराभव केला. काटे यांना ३०५५, तर कचरे याना १५५३ मते मिळाली. भाजप- रासप पुरस्कृत लोकशाही परिवर्तनवादी पॅनेलला मात्र एकही जागा मिळाली नाही. काटेवाडी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सरपंचपदासाठी सहा उमेदवार उभे होते. लढत मात्र राष्ट्रवादीच्या विद्याधर काटे व भाजप- रासप युतीच्या पांडुरंग कचरे यांच्यात झाली. यामध्ये कचरे यांना १४६३ मते मिळाली, तर काटे यांना ३ हजार ५५ मते मिळाली. या निवडणुकीत विरोधकांच्या पॅनेलला एकही जागा मिळवता आली नाही. या निवडणुकीत राष्ट्रवादी पुरस्कृत भवानीमाता पॅनेलचे विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे- राजू लक्ष्मण भिसे, हेमलता अमोल जगताप, प्रियांका प्रदीप देवकाते, समीर अजमुद्दीन मुलाणी, राहुल विलास काटे, शीतल अमोल काटे, नितीन लव्हा भिसे, धीरज लक्ष्मण घुले, रंजना लक्ष्मण लोखंडे, संजीवनी दत्तात्रेय गायकवाड, स्वाती संतोष लकडे, श्रीधर आनंद घुले, स्वाती अजित गडदरे व पद्मिनी पोपट देवकर.
बारामती तालुक्यातील सोळा ग्रामपंचायतींपैकी बिनविरोध झालेली सायंबाचीवाडी ग्रामपंचायत वगळता उर्वरित 15 ग्रामपंचायतीच्या मंगळावरी (ता.26) झालेल्या मतदानात सरासरी 85.52 टक्के मतदान झाले होते यामध्ये सर्वाधिक 96.69 टक्के मतदान गाडीखेल ग्रामपंचायतीसाठी तर सर्वात कमी मतदान डोर्लेवाडी येथे 78.39 टक्के झाले होते. एकुण 44 हजार 909 मतदारांपैकी 38 हजार 407 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. यामध्ये राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती तालुक्यातील काटेवाडी या गावामध्ये 5635 मतदारांन पैकी 4740 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. यामध्ये अजित पवार यांनीही आपल्या कुटुंबासह मतदान केले होते. तर भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब गावडे यांच्या पारवडी गावातही 4056 मतदारांपैकी 3628 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता.
बारामती तालुक्यातील मतदान झालेल्या ग्रामपंचायती, मतदार संख्या, झालेले मतदान, टक्केवारी
1) काटेवाडी - (5635) - (4740)  - (84.12)
2) डोर्लेवाडी - (5480) -  (4296) - (78.39)
3) पारवडी - (4056) - (3628) - (89.45)
4) कऱ्हावागज - (2691) - (2378) - ( 88.37)
5) धुमाळवाडी - (2343) -( 1854) - ( 79.13)
6) करंजेपुल - (2230) - (1912) - (85.74)
7) आंबी ब्रु. - (1100) - ( 953) -( 86.64)
8) गुणवडी - (6408) - ( 5355) - (83.57)
9) गाडीखेल - (756) - ( 731) - ( 96.69)
10) पवईमाळ - (1481) - ( 1324) -( 89.40)
11) मान्नापावाडी - (3023) - ( 2712) - ( 89.71)
12) सि. निंबोडी - (1742) - (1639) - (94.09)
13) मुढाळे - (4047)  - ( 3435) - ( 84.88)
14) चौधरवाडी - (720) - ( 642) - ( 89.17)
15) मेडद - (3197) - ( 2808) - ( 87.83)
एकुण - (44909) - ( 38407)- ( 85.52)

=========================

मानाप्पावाडीत 25 वर्षांनी सत्तापरिवर्तन 

बारामती तालुक्‍यात लक्षवेधी ठरलेल्या मानाप्पावाडी ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत "मानाप्पावाडी ग्रामविकास पॅनेल'चे प्रमुख ऍड. केशवराव जगताप यांच्या तब्बल 25 वर्षांच्या सत्तेचा पाडाव झाल्याचे आजच्या निकालावरून स्पष्ट झाले. येथे भैरवनाथ परिवर्तन पॅनेलच्या सरपंचपदाच्या उमेदवार योगिता विक्रम जगताप यांनी तब्बल 459 इतके मताधिक्‍य घेत मानाप्पावाडी पॅनेलच्या उमेदवार वैशाली सुनील जगताप यांचा पराभव केला. विशेषतः मानाप्पावाडी येथील निवडणुकीत म्होसोबावाडी येथील मतदारांची निर्णायक भूमिका ठरल्याने सत्ताधाऱ्यांचा दारुण पराभव झाल्याचे उघड झाले.म्हसोबावाडी येथील गावकऱ्यांना विभक्त ग्रामपंचायत करण्याचे नियोजन होते, परंतु सत्ताधाऱ्यांनी त्या प्रक्रियेला विरोध केल्याचा आरोप या निवडणुकीत कळीचा मुद्दा ठरला. एका बाजूला म्हसोबावाडीकरांची सत्ताधाऱ्यांविरुद्ध निर्णायक भूमिका आणि दुसऱ्या बाजूला येथील पणदरे पंचक्रोशीतील नेतेमंडळींनी दाखविलेला एकोपा विचारात घेता ऍड. केशवराव जगताप यांचा या निवडणुकीत टिकाव लागला नाही.जगताप यांना केवळ 5 जागांवर विजयी मिळविता आला. विशेषतः सत्ताधाऱ्यांच्या पराभव करण्यासाठी कुलभूषण कोकरे, ऍड. एस. एन. जगताप, योगेश जगताप, अमरसिंग जगताप, तानाजी कोकरे, शिवाजी टेंगले, विलास टेंगले, भुजंगराव टेंगले, गेणबापू कोकरे, संतोष टेंगले, अनिल जगताप, बी. के. जगताप, काका पाटील, योगेश लकडे, उत्तम चौगुले आदी नेतेमंडळींची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली.भैरवनाथ परिवर्तन पॅनेलचे विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे - राजेंद्र टेंगले, कृष्णराव टेंगले, सविता टेंगले, अनिता वैभव कोकरे, जितेंद्र जगताप, धनसिंग लक्ष्मण जगताप (अपक्ष), तर मानाप्पावाडी ग्रामविकास पॅनेलचे विजयी उमेदवार ः अनिता पवार, मंदाकिनी कुदळे, पुष्पाताई मुळीक, अनिल आवाडे, अश्विनी लकडे.
ग्रामपंचायतीची सूत्रे नव्या पिढीच्या हातात करंजेपूल ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या लढतीत मतदारांनी प्रस्थापितांना सपशेल नाकारत नव्या पिढीच्या हातात सत्तेची सूत्रे सोपविली. युवकांचे उमेदवार वैभव अशोक गायकवाड यांनी मातब्बरांच्या गावकरी पॅनेलचे उमेदवार बबन आण्णा पवार यांचा तब्बल 315 मतांनी पराभव केला. करंजेपूल हे पश्चिम भागातील प्रमुख गाव असल्याने येथील लढतीकडे राजकीय धुरीणांचे लक्ष होते.ग्रामपंचायतीचे करंजेपूल एक, करंजेपूल दोन व गायकवाडमळा या तीन प्रभागातील आठपैकी सात जागांवर गावकरी पॅनेलचे उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. तर शेंडकरवाडी प्रभागात मात्र बिनविरोधचा मेळ न बसल्याने तीन जागांसाठी दोन गटात लढत सरळ लढत झाली. गावकरी पॅनेलने सरपंचपद इतर मागासप्रवर्गासाठी राखीव असल्याने बबन पवार यांना पहिली अडीच वर्षे आणि विजय कोळपे यांना उर्वरीत कालावधीसाठी सरपंच करण्याचा निर्णय घेतला. परंतु इतर मागास प्रवर्गातूनच उपसरपंच वैभव गायकवाड यांनीही सरपंचपदासाठी बंड करत दंड थोपटले. शेंडकरवाडी प्रभागातून उद्योजक राजकुमार धुर्वे, माजी सदस्य दिलीप कुंभार यांनीही सरपंचपदासाठी उडी घेतल्याने रंगत निर्माण झाली होती. वैभव गायकवाड यांच्यासोबत गावातील युवकांसोबत सोमेश्वर कारखान्याचे संचालक विशाल गायकवाड, माजी सरपंच बंडा गायकवाड, बाळू गायकवाड, सागर गायकवाड, विजय गायकवाड आदी उघडपणे मैदानात उतरले. सुरवातीला बबन पवार यांचेच वर्चस्व दिसत होते. परंतु हळूहळू गायकवाड यांना सर्वच प्रभागात पाठिंबा वाढत गेला आणि त्यांनी प्रस्थापितांना धक्का दिला. वैभव गायकवाड यांना 874, बबन पवार यांना 559, राजकुमार धुर्वे यांना 341 तर दिलीप कुंभार यांना अवघी 145 मते मिळाली. तर प्रभाग तीन (शेंडकरवाडी) येथे दोन गटात झालेल्या सरळ लढतीतही युवकांनी उभ्या केलेल्या पॅनेलच्या तिन्ही उमेदवारांचा मोठ्या फरकाने पराभव केला. काही ज्येष्ठांनीही त्यांना साथ दिली. येथे गीतांजली समीर शेंडकर यांनी सर्वाधिक 368 मते मिळविली. प्रभाग दोनमध्ये गावकरी पॅनलच्या निखिल गायकवाड यांना निवृत्त मुख्याध्यापक संभाजी गायकवाड यांनी आव्हान दिले होते. परंतु निखील गायकवाड यांनी 25 मतांनी विजय मिळविला.

निवडून आलेले सदस्य व त्यांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे -
प्रभाग क्रमांक एक -
निलेश विठ्ठल गायकवाड, लतीफ गफूर मुलाणी, सुनिता गणेश गायकवाड (तिन्ही बिनविरोध)
प्रभाग क्रमांक दोन -
सारिका नानासाहेब गायकवाड, सविता जयराम लकडे (दोन्ही बिनविरोध), निखिल रमेश गायकवाड (232)
प्रभाग क्रमांक तीन -
सोनलकुमार उत्तम शेंडकर (321), गीतांजली समीर शेंडकर (368), राणी बिरू महानवर (330)
प्रभाग क्रमांक चार -
अजित अप्पासाहेब गायकवाड, निलम प्रमोद गायकवाड (दोन्ही बिनविरोध)

=========================

पारवडी ग्रामपंचायतीवर भाजपचे वर्चस्व कायम 

बारामती तालुक्यामध्ये असून पवारांचे पारंपारिक विरोधक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब गावडे यांनी पारवडी ग्रामपंचतीवर आपले वर्चस्व कायम राखले आहे. तेथे सरपंच म्हणून बाळासाहेब गावडे यांचे पुतणे जिजाबा अशोक गावडे यांच्यासह संपूर्ण 13 सदस्य भरघोस मतांनी निवडून आले आहेत. पारवडीमधील वियजानंतर पारवडी कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षाचे ध्वज फडकावीत एकच जल्लोष केला. या निकालाने ग्रामपंचायतीवर आपलेच वर्चस्व असल्याचे गावडे यांनी पुन्हा सिध्द केले आहे.यंदाच्या थेट सरपंच पदाच्या पहिल्याच निवडणुकीसाठी येथील सरपंचपद सर्वसाधारण जागेसाठी असल्याने मोठी रस्सीखेच होती. भारतीय जनता पक्षाच्या वतीने श्री भैरवनाथ विकास पॅनल व राष्ट्रावादी काँग्रेस पक्षाच्या वतीने श्री भैरवनाथ जनसेवा पॅनल यांच्या मध्ये थेट लढत झाली. यामध्ये सरपंच पदासाठी बाळासाहेब गावडे यांचे पुतणे जिजाबा अशोक गावडे यांनी 2351 मते मिळवून विजयी झाले. त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार देविदास गावडे यांचा 1128 मतांनी पराभव केला. तर सदस्यांच्या सर्वच्या सर्व 13 जागा जिंकत निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पारवडी गावावर विशेष लक्ष देत बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक पदाच्या रुपाने विद्यमान ग्रामपंचायत सदस्य असलेले वसंत गावडे, तसचे पंचायत समिती सदस्या लिलाबाई गावडे यांच्या माध्यमातून पदे देत ताकद देण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रत्यक्ष निवडणुकीमध्ये बाळासाहेब गावडे यांनी आपला करिष्मा कायम राखला.

विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते खालील प्रमाणे -
प्रभाग 1
अ) जिजाबा अशोक गावडे - (2351)
ब) अनिल सोपान आटोळे (556)
क) सोनाली विशाल गावडे (557)
प्रभाग 2
अ) नवनाथ दादाराम लांडगे (521)
ब) मंगल अशोक होले (550)
प्रभाग 3
अ) अंबादास झिंगोबा गवंड (568)
ब) देवईबाई धोंडिराम गावडे (515)
क) निर्मला दत्तात्रय पोंदकुले (563)
प्रभाग 4
अ) वंदना बाळु पाळेकर (407)
ब) संगिता कोंडिराम गवंड (368)
क) युवराज मच्छिंद्र गावडे (419)
प्रभाग 5
अ) संजय सोमनाथ गावडे (311)
ब) हरिभाऊ सोमनाथ गावडे (237)
क) सुनंदा युवराज पवार (278)

=========================

मुढाळे सरपंचपदासाठी समान मते, शोभा वाबळे ठरल्या लकी

बारामती तालुक्यातील मुढाळे गावच्या सरपंचपदाची अखेरपर्यंत चुरशीची ठरली. सरपंच पदासाठी उभे असलेल्या शोभा अशोक वाबळे व शरयू देवेंद्र वाबळे यांना प्रत्येकी ८०५ समसमान मते पडली. चिठ्या टाकून सरपंचपद देण्याचा निर्णय घेतला. यामधे शोभा वाबळे यांची चिठ्ठी निघाल्याने त्या येथील लकी सरपंच ठरल्या आहेत. सरपंच पदासाठी सात महिला उमेद्वार आपले नशीब अजमावण्यासाठी निवडणूक रिंगणात होत्या. यामधे बारामती पंचायत समितीचे माजी सभापती मनोहर वाबळे यांच्या सूनबाई शरयू वाबळे, सरपंच संगीता पोपट वाबळे, उपसरपंच लालासो जायपत्रे यांच्या पत्नी संगीता जायपत्रे यांचा समावेश होता. तिसऱ्या क्रमांकाची ५२५ मते स्वाती अशोक निंबाळकर यांना मिळाली आहेत. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या कुटुंबातील सरपंच पदाच्या उमेदवार शोभा यांना मतदारांनी मते देत गावची सूत्रे हाती सोपवली आहेत. उपसरपंच लालासो जायपत्रे यांना सदस्य पदाच्या जागेवरही पराभव पत्कारावा लागला आहे. गेल्या पाच वर्षाचा कारभार सदस्यांमधील वादावादीत झाला. सदस्य संख्येचे बळ मिळवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न होत होते. यावेळी गट तट नसल्याने फक्त सरपंच पदाच्या जागेसाठी मत मागण्याची चुरस होती. यामधे मतदारांनी समान मते देउन टांगती तलवार कायम ठेवली होती.चिठ्ठी टाकुन झालेल्या निवडीत शोभा वाबळे यांची चिठ्ठी निघताच कार्यकर्त्यांनी जल्लोश केला. तेरा सदस्य संख्येच्या ग्रामपंचायतीच्या पाच जागा बिनविरोध झाल्या होत्या आठ जागांसाठी २५ उमेद्वार निवडणूक लढवीत होते. यामधून राणी संदीप बर्गे, गोरख रामभाउ कदम, पुनम प्रविण दळवी, बापूराव किसन साळवे, संतोषी तात्यासो थोरात, ढगु नवाजी जायपत्रे, नितिन बाळासो जायपत्रे, सुलोचना रामभाउ शिंदे, विजयी झाले आहेत.

=========================

नारायणगावच्या सरपंचपदी योगेश पाटे

नारायणगाव ग्रामपंचायत निवडणुकीत सर्व राजकीय अंदाज मोडीत ठरवून ग्रामपंचायतीवर सर्वपक्षीय पुरस्कृत योगेश ऊर्फ बाबू नामदेव पाटे २ हजार ९८८ विक्रमी मताधिक्याने विजयी झाले़ पाटे यांच्या श्री मुक्ताबाई हनुमान ग्रामविकास पॅनलचे १७ पैकी १५ सदस्य विजयी झाले़ सर्वपक्षीय पुरस्कृत मुक्ताई हनुमान जनसेवक पॅनलचे २ उमेदवार विजयी झाले़ यामध्ये उपसरपंच संतोष पाटे व ज्येष्ठ ग्रामपंचायत सदस्य रामदास अभंग यांचा समावेश आहे.गेली २३ वर्षे नारायणगाव ग्रामपंचायतीवर वर्चस्व असलेले चंद्रशेखर कोरहाळे यांच्या मुक्ताई ग्रामविकास पॅनलला एकही जागा मिळाली नाही़ वॉर्ड क्ऱ ६ मध्ये तीनही जागा पाटे यांच्या पॅनलला मिळाल्या आहेत़ मतदारांनी हातात घेतलेल्या या निवडणुकीत गेली २० वर्षे ग्रामपंचायतीवर वर्चस्व असलेल्या व ४ वेळा उपसरपंच राहिलेल्या संतोष वाजगे यांना सरपंचपदाच्या निवडणुकीत तिसरया स्थानावर जावे लागले आहे़  पहिल्या फेरीपासूनच योगेश ऊर्फ बाबू पाटे आघाडीवर राहिले.

=========================

मावळात भाजप आणि राष्ट्रवादी 

मावळ तालुक्यातील 8 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीमध्ये भाजपने साळुंबे्र व उढेवाडीमध्ये तर राष्ट्रवादीने बेबडओहोळ व आढले बु. ग्रामपंचायतींवर एकहाती सत्ता काबीज केली असून, या दोन्ही प्रमुख पक्षांनी 5 ग्रामपंचायतींवर वर्चस्व मिळवले आहे. निवडणूक निकालानंतर आमदार संजय भेगडे, भाजपचे तालुकाध्यक्ष प्रशांत ढोरे यांनी बिनविरोध झालेल्या उढेवाडी ग्रामपंचायीसह साळुंब्रे, डोणे, शिळींब, मळवंडी ढोरे या 5 ग्रामपंचायतींवर वर्चस्व मिळवले आहे ; तसेच राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गणेश आप्पा ढोरे यांनीही बेबडओहोळ, आढले बु., मळवंडी ढोरे, शिळींब, डोने या 5 ग्रामपंचायतींवर वर्चस्वाचा दावा केला आहे. दरम्यान, दोन्ही पक्षांनी दावा केला असला तरी बेबडओहोळ व आढले बु. येथे  राष्ट्रवादीने व साळुंब्रे, उढेवाडी येथे भाजपने सरपंच पदासह एकहाती सत्ता काबीज केली आहे. आंबळे व शिळींबमध्ये सरपंचपद राष्ट्रवादीकडे तर बहुमत भाजपकडे, डोणे येथे सरपंचपद भाजपकडे व बहुमत भाजपकडे आहे.
मावळ तालुक्यातील नुकत्याच पार पडलेल्या आठ ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप व राष्ट्रवादीला समसमान यश मिळाल्याचे दिसते; परंतु बेबडओहोळ, आंबळे व आढले बु. या महत्त्वाच्या ग्रामपंचायतींमध्ये मात्र भाजपला हार पत्करावी लागली असून, साळुंबे्रमध्ये राष्ट्रवादीला हार पत्करावी लागली आहे.
ग्रामपंचायत व प्रभागनिहाय बिनविरोध व विजयी झालेले उमेदवार : 
बेबडओहोळ -  प्रभाग 1 : कमल रोहिदास गराडे(बिनविरोध), जालिंदर गराडे (190 मते), लता गायकवाड (236 मते), प्रभाग 2 : तुषार बारमुख (बिनविरोध), नम्रता घारे (392 मते), प्रभाग 3 : सेवक घारे (295 मते), मनीषा घारे(308 मते), भीमा अढाळगे (306 मते),प्रभाग 4 : बाळू ठाकर व संध्या शिंदे(दोघे बिनविरोध), कविता ढमाले (227 मते).
साळुंब्रे - प्रभाग 1 : सुहास विधाटे (227 मते), द्वारका राक्षे (221 मते),  प्रभाग 2 : सगुणा राक्षे (118 मते), नलिनी विधाटे (150 मते),  प्रभाग 3 : वर्षा राक्षे, अजय दवणे (दोघे बिनविरोध), समीर थोरवे(234 मते)
आंबळे - प्रभाग 1 : वर्षा शरद पवार, संदिप गोविंद गायकवाड, सुरेखा संजय नखाते (सर्व बिनविरोध), प्रभाग 2 : रामदास शेटे (375 मते), अंजनाबाई पिलाणे(266 मते), नवनाथ मोढवे(299 मते), प्रभाग 3 : पुनम हांडे (383 मते), नवनाथ आंभोरे(358 मते), कमल चतूर(362 मते).
मळवंडी ढोर- - प्रभाग 1 : नवनाथ शिंदे(नामाप्र स्त्री), सुवर्णा सुनिल ढोरे(दोघी बिनविरोध), प्रभाग 2 : सविता ढोरे(118 मते), शंकर ढोरे(109 मते), प्रभाग 3 :संदिप खरात(166 मते), अनिता ढोरे, सावित्राबाई मोरे(दोघी बिनविरोध)
आढले बु॥ -  प्रभाग 1 : संगिता सावंत(334 मते), जालिंदर म्हस्के(332 मते), प्रताप घोटकुले(315 मते), प्रभाग 2 : अश्‍विनी सपकाळ(256 मते), सुनिता सावळे(263 मते), नितीन घोटकुले(252 मते), प्रभाग 3 : सुमन घोटकुले(162 मते), नितेश वाघमारे(170 मते), नंदिनी कटके(164 मते).
डोणे - प्रभाग 1 : सुलभा वाडेकर(141 मते), नामदेव सुतार(144 मते), प्रभाग 2 : श्रीरंग खिलारी(132 मते),मनिषा सुतार(125 मते), प्रभाग 3 : पुनम वाघमारे(198 मते), कुंदा घारे(196 मते), प्रसाद घारे(209 मते).
शिळींब - प्रभाग 1 : लिलाधर धनवे(306 मते), पुनक दरेकर(335 मते), प्रभाग 2 : धोंडाबाई घोगरे(208 मते), भाऊ आखाडे(195 मते), प्रभाग 3 : यशवंत शिंदे(216 मते), सुभद्रा कडू(221 मते), सिताबाई धनवे(बिनविरोध).

=========================

निरगुडसरवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता

विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या निरगुडसर येथील गावात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने सरपंच पदासह सर्व सदस्य विजयी करून एकहाती सत्ता राखली आहे. माजी उपसरपंच रवींद्र वळसे पाटील यांच्या धर्मराज परिवर्तन पॅनेलचा पराभव झाला.सरपंचपदासाठी उर्मिला संतोष वळसे आणि मनिषा रवींद्र वळसे यांच्यामध्ये लढत होऊन उर्मिला वळसे विजयी झाल्या आहेत. निवडून आलेले सदस्य-प्राजक्‍ता अनिल वळसे, शरद नारायण वळसे, वैशाली संजय राऊत, तेजल सुधीर गावडे, शांताराम रामभाऊ उमाप, कैलास सुडके, जयश्री नवनाथ थोरात, सपना राहुल हांडे, दादाभाऊ जयराम टाव्हरे याप्रमाणे आहे. बिनविरोध सदस्य तृप्ती सुरेश टाव्हरे आणि आनंदराव निवृत्ती वळसे या प्रमाणे आहे.

काले ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी पानसरे

वडज- काले (ता. जुन्नर) ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी जनार्धन सदाशिव पानसरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. काले ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध पार पडली होती. सरपंचपदी मालिता मारुती नायकोडी यांची निवड करण्यात आली होती. उपसरपंच पदासाठी एकमेव अर्ज आल्याने पानसरे यांची बिनविरोध केली.

कुरुळीच्या उपसरपंचपदी अमित मुऱ्हे

कुरूळी (ता. खेड) येथील ग्रामपंचायतीच्या उपसंरपचपदी अमित ज्ञानेश्‍वर मुऱ्हे यांची बिनविरोध निवड झाली. कुरूळी येथील ग्रामपंचायतीच्या उपसंरपच नगिना मेदनकर यांनी स्वखुशीने पदाचा राजीनामा दिल्याने रिक्‍त झालेल्या जागेसाठी सरपंच चंद्रकांत बधाले यांच्या अध्यक्षस्तेखाली घेण्यात आलेल्या उपसंरपचपदासाठी अमित मुऱ्हे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने कुरूळी ग्रामपंचायतीच्या उपसंरपचपदी त्यांची बिनविरोध निवड झाल्याचेजाहिर केले.

खराबवाडीच्या सरपंचपदी सागर खराबी

खराबवाडी (ता. खेड) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सागर पांडुरंग खराबी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तर उपसरपंचपदी रोहिदास बबन शिळवणे यांची बहुमताने निवड झाली.
खराबवाडीच्या सरपंच दिपाली संतोष खराबी व उपसरपंच माधुरी शंकर खराबी यांनी आपापल्या पदाचा नियोजित कालावधी पूर्ण केल्याने इतरांना या पदावर काम करण्याची संधी मिळावी, म्हणून स्वखुशीने राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त झालेल्या सरपंच व उपसरपंच या पदासाठी खराबवाडी ग्रामपंचायतीच्या कार्यालयात दोन्ही पदासाठी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. सरपंचपदासाठी सागर खराबी यांचाच एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मात्र, उपसरपंच पदासाठी मच्छिंद्र बचुटे, मावळत्या उपसरपंच माधुरी खराबी व सदस्य रोहिदास शिळवणे या तिघांचे उमेदवारी अर्ज आल्याने मतदान घेण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, ऐनवेळी माधुरी खराबी यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने बुचडे आणि शिळवणे या दोघांसठी हातवर करून मतदान घेण्यात आले. यात शिळवणे यांना 14, तर बचुटे यांना अवघी दोनच मते पडल्याने शिळवणे हे बहुमताने निवडून आल्याने त्यांची उपसरपंच पदी वर्णी लागली.

=========================

पुणे जिल्ह्यातील निवडणुका  झालेल्या ग्रामपंचायतीचा तालुका व गावे खालील प्रमाणे..

1) हवेली - (9 गावे) - भिलारवाडी, फुलगाव, गुजर निंबाळकरवाडी, कोलवडी साष्टे, जांबुळवाडी- कोडवाडी, खामगाव मावळ, मांगडेवाडी, वाडेबोल्हाई, वाघोली
2) मावळ - (7 गावे) - साळुंब्रे, आढले बुद्रुक, डोणे, मळवंडी ढोरे, बेबड ओव्हळ, आंबळे, शिंळींब,
3) आंबेगाव - (9 गावे) - चांडोली खुर्द, जारकरवाडी, पहाडदरा, कुशीरे बुद्रुक, निरगुडसर, जाधववाडी, कोलतावडे, पिंपरगणे, चास
4) दौंड (1 गाव) -  मलठण
5) वेल्हे ( 4 गावे) - आंबवणे, कांदवे, करण बुद्रुक, मानगाव
6) बारामती (15 गावे) - मानाप्पाची वाडी, धुमाळवाडी, डोर्लेवाडी, पारवडी, मुढाळे, सिध्देश्वर निंबोडी, मेडद, पवईमाळ, काटेवाडी, आंबी बुद्रुक, गुणवडी, कऱ्हावागज, करंजेपुल, गाडीखेल, चौधरवाडी
7) मुळशी - (15 गावे) - वांतुडे, भांबर्डे, शेडाणी, जामगाव, बेलावडे, भादस बुद्रुक, जातेडे, धामण ओव्हळ, आंबवणे, मुगाव, डावजे, वाद्रे, खुबवली, कोंढावळे, वडगाव,
8) भोर ( 10 गावे) - कांबरे बुद्रुक, जयतपाड, नांदगाव, वडतुंबी, टिटेघर, पळसोशी, वरोडी बुद्रुक, वरोडी डायमुख, कुरुंजी, माळेगाव,
9) शिरुर (1 गाव) - राजंणगाव सांडस,
10) खेड (2 गावे) - होलेवाडी, निघोज,
11) पुरंदर (2 गावे) - गुळुंचे, कर्नलवाडी
12) जुन्नर (22 गावे) - पांगरी त.मढ., आंबेगव्हाण, बांगरवाडी, बुचकेवाडी, धालेवाडी, डुंबरवाडी, गुळुंचवाडी, कांदळी, खामगाव, खटकाळे, नारायणगाव, निमगिरी, पाडळी, पिंपळवंडी, पिंपरी कावळा, राळेगण, सागणोरे, शिरोली तर्फे आळे, सुकाळवेढे, उंब्रज नं 1, मानमळा, वडगाव आनंद..


पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब)

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB)

Tuesday 26 December 2017

जिग्नेश मेवाणींचा 31 डिसेंबरला पुण्यात ; प्रस्थापितांना आव्हान

जिग्नेश मेवाणींचा 31 डिसेंबरला पुण्यात शनिवारवाड्यावर 'एल्गार'


गुजरातचा दलित युवक अशी ओळख असलेले जिग्नेश मेवाणी हे नव्या वर्षात महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. 31 डिसेंबरला पुण्यात शनिवारवाड्यावर 'एल्गार परिषद'चे आयोजन करण्यात आले असून या परिषदेस जिग्नेश मेवाणी आणि उमर खालिद उपस्थित राहणार आहे. आमदार जिग्नेश मेवाणी यांचा हा दौरा राज्यातील प्रस्थापित दलित नेत्यांना आव्हान देणारा ठरणार का, याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. देशांतल्या सर्वाधिक राजकीय ताकदीच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गुजरात येथे आव्हान देणारा तरूण आमदार झालेला जिग्नेश मेवानी राज्यात येणार असल्याने तरुणांमध्ये उत्सुकता आहे. प्रस्थापित दलित नेते मात्र त्यास फारसे महत्त्व देत नसल्याचे सांगत आहेत. जिग्नेश आला तर त्याचे स्वागत आहे, पण तेढ निर्माण होऊ नये ही खबरदारी घ्यावी लागेल, अशी प्रतिक्रिया केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली आहे. राज्यात रामदास आठवले, प्रकाश आंबेडकर, आनंद आंबेडकर, जोगेंद्र कवाडे असे अनेक नेते सध्या दलितांचे नेतृत्त्व करतात. या सर्वांनाच जिग्नेशचे हे  प्रस्थापितांना मोठे नवे आव्हान असणार आहे.


गुजरात : दुसऱ्यांदा मुख्यमंत्री बनले रुपाणी

सोहळ्यात मुख्यमंत्री रूपाणी (61) आणि उपमुख्यमंत्री नितिन पटेल यांच्यासह 20 मंत्र्यांनी शपथ घेतली. त्यात एक महिला मंत्री आहेत. रुपाणींशिवाय 19 मंत्र्यांपैकी 9 कॅबिनेट रँकचे आणि 10 राज्यमंत्री रँकचे आहेत. दक्षिण गुजरातमधून 5 आणि कच्छ-सौराष्ट्रमधील 7 मंत्री आहेत. पाच पटेल समाजाचे मंत्री आहेत. आनंदीबेन पटेलांना हटवल्यानंतर 2016 मध्ये रुपाणी सर्वात आदी मुख्यमंत्री बनले तेव्हा त्यांच्या मंत्रिमंडळात 25 मंत्री होते. त्यावेळी 9 मंत्र्यांची हकालपट्टी करण्यात आली होती. या शपथविधी सोहळ्यात भाजपच्या मार्गदर्शक मंडळातील लालकृष्ण अडवाणींचीही उपस्थिती होती. तसेच नीतिश कुमारही उपस्थित होते. ते 15 वर्षांनंतर गुजरातमध्ये आले. 2013 मध्ये मोदींबरोबर मतभेद झाल्यानेच नितीशकुमार एनडीएमधून बाहेर पडले होते. पण याचवर्षी ते पुन्हा एनडीएमध्ये आले आहेत. 18 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची उपस्थिती असे म्हटले जात आहे की, प्रथमच एखाद्या राज्याच्या शपथविधी सोहळ्यासाठी 18 राज्यांचील मुख्यमंत्री उपस्थित होते. हे सर्व मुख्यमंत्री भाजप आणि एनडीएची सत्ता असलेल्या राज्यातील होते. सोहळ्यात केशुभाई पटेल आणि शंकरसिंह वाघेलाही उपस्थित होते. पण काँग्रेस आणि शिवसेनेचा एकही मोठा नेता उपस्थित नव्हता.

नव्या मंत्रिमंडळातील जातीय समीकरण 

1) पटेल-पाटीदार समाजाचे 8 मंत्री - रूपाणींच्या नव्या टीममध्ये पटेल-पाटीदार समाजाच्या 8 आमदारांना मंत्री बनवण्यात आले आहे. नितिन पटेल, आरसी फलदू, सौरभ पटेल, कौशिक पटेल, जयेश रादडिया, परबतभाई पटेल, ईश्वर सिंह पटेल आणि किशोर कनाणी हे 8 मंत्री आहेत. गुजरातमध्ये पटेल-पाटीदार मतदारांची संख्या 20% आहे. फलदू लेवा पटेल आणि सौरभ कडवा पटेल समाजाचे आहेत. तर पाटीदार नेते रादडिया जेतपूर आणि दलित नेते ईश्वरभाई परमार बारडोलीतून निवडून आले आहेत. ईश्वर सिंह पटेल अंकलेश्वर आणि कनाणी सूरतच्या वराछामधून विजयी झाले आहेत.
2) ओबीसीतील 5 मंत्री - ओबीसी समाजातून विजयी झालेल्या पाच आमदारांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे. दिलीप ठाकोर, बचुभाई खाबड, जयद्रथसिंह परमार, वासनभाई अहीर आणि पुरुषोत्तमभाई सोलंकी अशी नावे आहेत.
3) राजपूत समाजाचे 2 मंत्री - भूपेंद्र सिंह चुडास्मा आणि प्रदीप जाडेजा राजपूत समाजातील नेते आहेत. त्यांना मंत्री बनवले आहे.
4) दलित-आदिवासी समाजाचे 3 मंत्री - आदिवासी समाजातील असलेले गणपत भाई वासवा आणि रमणलाल पाटकर यांवा रूपाणींच्या टीममध्ये स्थान मिळाले आहे. तर दलित समाजातून मंत्री बनणारे एकमेव नेते आहेत, ईश्वरभाई परमार.
5) सवर्ण समाजातील एकमेव महिला मंत्री - विभावरी दवे यांनाही रुपाणींच्या टीममध्ये स्थान मिळाले आहे. रूपाणी स्वतः जैन समाजाचे आहेत. रूपाणींच्या टीममध्ये त्यांच्याशिवाय अल्पसंख्याक समाजातील इतर कोणीही मंत्री नाही.

Monday 25 December 2017

पुणे जिल्ह्यातील 97 ग्रामपंचायतींसाठी आज मतदान

पुणे जिल्ह्यातील 97 ग्रामपंचायतींसाठी आज मतदान

पुणे जिल्ह्यातील बारा तालुक्यांमधील 99 ग्रामपंचायतीपैकी बारामती तालुक्यातील सायंबाचीवाडी व मावळ तालुक्यातील उढेवाडी या बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायती वगळता उर्वरित 97 ग्रामपंचायतीच्या सन 2017 ते 2022 च्या सरपंच व सदस्य पदाच्या निवडीसाठी मंगळवार (ता.26) रोजी मतदानाला सुरवात झाली.
या ग्रामपंचायतीमध्ये राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे काटेवाडी (ता. बारामती), माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील व जिल्हा परिषद उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांचे निरगुडसर (ता. आंबेगाव), जुन्नरचे आमदार शरद सोनवणे व जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते शरद लेंडे यांचे पिंपळवंडी (ता. जुन्नर), जिल्हा परिषदेतील शिवसेनेच्या गटनेत्या आशा बुचके यांचे बुचकेवाडी (ता. जुन्नर),  भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब गावडे यांचे पारवडी( ता.बारामती) आदी नेत्यांच्या गावांच्या ग्रामपंचायतीसाठी मतदान होत आहे. यात आपापल्या गावाचा गड राखण्यासाठी या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. राज्य निवडणुक आयोगाने जाहिर केल्या प्रमाणे जानेवारी-फेब्रुवारी 2018 मध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुक कार्यक्रमात जिल्ह्यातील इंदापूर तालुका वगळता उर्वरित बारा तालुक्यातील 99 ग्रामपंचायतींचा समावेश आहे..यामध्ये बारामती तालुक्यातील सायंबाचीवाडी व मावळमधील उढेवाडी या दोन ग्रामपंचायती संपूर्ण बिनविरोध झाल्या आहेत. तर उर्वरित 97 ग्रामपंचायतीपैकी 13 गावाच्या सरपंच पदाच्या तर सदस्य पदाच्या 304 जागा बिनविरोध झाल्या आहेत. या भागांमध्ये काही ठिकाणी फक्त सदस्य पदासाठी तर काही ठिकाणी फक्त सरपंच पदासाठी मतदान होत आहे.



====================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा

* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

CLICK HERE PAY NOW- 


=====================================================================

मतदान होत असलेल्या ग्रामपंचायतीचा तालुका व गावे खालील प्रमाणे..

1) हवेली - (9 गावे) - भिलारवाडी, फुलगाव, गुजर निंबाळकरवाडी, कोलवडी साष्टे, जांबुळवाडी- कोडवाडी, खामगाव मावळ, मांगडेवाडी, वाडेबोल्हाई, वाघोली
2) मावळ - (7 गावे) - साळुंब्रे, आढले बुद्रुक, डोणे, मळवंडी ढोरे, बेबड ओव्हळ, आंबळे, शिंळींब,
3) आंबेगाव - (9 गावे) - चांडोली खुर्द, जारकरवाडी, पहाडदरा, कुशीरे बुद्रुक, निरगुडसर, जाधववाडी, कोलतावडे, पिंपरगणे, चास
4) दौंड (1 गाव) -  मलठण
5) वेल्हे ( 4 गावे) - आंबवणे, कांदवे, करण बुद्रुक, मानगाव
6) बारामती (15 गावे) - मानाप्पाची वाडी, धुमाळवाडी, डोर्लेवाडी, पारवडी, मुढाळे, सिध्देश्वर निंबोडी, मेडद, पवईमाळ, काटेवाडी, आंबी बुद्रुक, गुणवडी, कऱ्हावागज, करंजेपुल, गाडीखेल, चौधरवाडी
7) मुळशी - (15 गावे) - वांतुडे, भांबर्डे, शेडाणी, जामगाव, बेलावडे, भादस बुद्रुक, जातेडे, धामण ओव्हळ, आंबवणे, मुगाव, डावजे, वाद्रे, खुबवली, कोंढावळे, वडगाव,
8) भोर ( 10 गावे) - कांबरे बुद्रुक, जयतपाड, नांदगाव, वडतुंबी, टिटेघर, पळसोशी, वरोडी बुद्रुक, वरोडी डायमुख, कुरुंजी, माळेगाव,
9) शिरुर (1 गाव) - राजंणगाव सांडस,
10) खेड (2 गावे) - होलेवाडी, निघोज,
11) पुरंदर (2 गावे) - गुळुंचे, कर्नलवाडी
12) जुन्नर (22 गावे) - पांगरी त.मढ., आंबेगव्हाण, बांगरवाडी, बुचकेवाडी, धालेवाडी, डुंबरवाडी, गुळुंचवाडी, कांदळी, खामगाव, खटकाळे, नारायणगाव, निमगिरी, पाडळी, पिंपळवंडी, पिंपरी कावळा, राळेगण, सागणोरे, शिरोली तर्फे आळे, सुकाळवेढे, उंब्रज नं 1, मानमळा, वडगाव आनंद..

====================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा

* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

CLICK HERE PAY NOW- 


=====================================================================

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB)


भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात फेब्रुवारीत पोट निवडणूक

भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात फेब्रुवारीत पोट निवडणूक
भंडारा-गोंदियासह ८ जागांसाठी पोट निवडणूक

भंडारा-गोंदियासह गोरखपूर, फुलपूर (उत्तर प्रदेश), अजमेर व अलवर (राजस्थान), अनंतनाग (काश्‍मीर), अरारिया (बिहार) व उलुबेरिया (प. बंगाल) या जागांवर होणार फेब्रुवारी २०१८ मध्ये पोट निवडणूक होणार आहे. 2014 नंतर लोकसभेसाठी होणारी ही पहिलीच पोटनिवडणूक असेल. नियमांनुसार कोणतीही जागा रिक्त झाल्यावर सहा महिन्यांच्या आत तेथे पोटनिवडणुका घ्याव्याच लागतात. काश्‍मीरमधील दहशतवादाच्या पार्श्‍वभूमीवर अनंतनागची निवडणूक टाळली तरी आठपैकी सात जागांवर फेब्रुवारी 2018 पर्यंत आयोगास निवडणुका घ्याव्याच लागतील. साहजिकच नोटाबंदी व जीएसटीनंतर मोदी सरकारला जनतेचा कौल किवा 2019ची छोटी उपांत्य फेरी या दृष्टीनेही या निवडणुकांकडे पाहिले जात आहे. भाजपमधून बाहेर पडून मूळ काँग्रेस पक्षाकडे वळलेले नाना पटोले यांच्या भंडारा-गोंदिया जागेचाही यात समावेश आहे. उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ व के. पी. मौर्य यांना भाजप नेतृत्वाने राज्यात पाठविल्याने गोरखपूर व फुलपूर या जागा रिक्त झाल्या आहेत. यातील गोरखपूरची जागा भाजप परत मिळवेल. मात्र फुलपूरमध्ये बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावतींचे कडवे आव्हान भाजपला पेलावे लागेल. नुकत्याच झालेल्या पालिका निवडणुकांत फुलपूरमध्ये भाजपचा जबरदस्त पराभव झाला होता. अजमेरमधून काँग्रेसतर्फे सचिन पायलट उभे राहण्याची चिन्हे असल्याने त्यांच्यासमोर दिवंगत मंत्री सावरलाल जाट यांचे पुत्र रामस्वरूप लांबा यांचा तरुण चेहरा भाजप पुढे करू शकते, तर वसुंधराराजे यांचे निकटवर्तीय व राजस्थानातील मंत्री डॉ. जसवंत यादव यांना अलवरमधून संधी मिळू शकते.
5 पैकी 3 ठिकाणी भाजपला विजय
अरुणाचल प्रदेशच्या पक्के-केसांग जागेवर भाजपचे बीआर वानखेडे यांनी काँग्रेस उमेदवार आणि उपमुख्यमंत्री राहिलेले कमेंग दोलो यांचा पराभव केला. तर लिकाबली जागेवर भाजपचे उमेदवार करदो नीग्योर यांनी पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचलच्या गुमके रिबा यांचा पराभव केला. त्याशिवाय उत्तर प्रदेशच्या सिकंदरा मतदारसंघावरही भाजपने ताबा मिळवला. येथे भाजपचे अजित पाल सिंह यांनी समाजवादी पक्षाच्या सीमा सचान यांना 7 हजारहून अधिक मतांनी पराभूत केले.तमिळनाडूच्या के आरके नगर पोटनिवडणउकीत अपक्ष उमेदवार टीटीव्वी दिनाकरण यांनी मोठ्या फरकाने विजय मिळवला. पश्चिम बंगालच्या सबंग विधानसभा मतदारसंघात तृणमूल काँग्रेसच्या गीता राणी भुनिया यांनी माकपच्या रीता मोंडल यांचा पराभव केला.

भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात पुन्हा नाना पाटोले?


मतदारसंघातील भाजपचे खासदार नाना पटोले यांनी खासदारकीचा राजीनामा दिला मात्र कोणत्याही पक्षात प्रवेश अद्याप केला नाही. गेल्या लोकसभा निवडणूकीत कोंग्रेस व राष्ट्रवादी आघाडी मुळे राष्ट्रवादीला जागा देण्यात आली होती. राष्ट्रवादीचे प्रफ्फुल पटेल यांनी निवडणूक लढवली होती. आघाडी केली तर या जागेवर राष्ट्रवादीचा दावा असेल यामुळेच नाना पटोले यांनी कॉंग्रेसमधील प्रवेश करणे तूर्तास टाळले असावे. गेल्या लोकसभा निवडणूकीत २६ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. पोट निवडणुकीसाठी देखील इच्छुक उमेदवाराबाबत खलबते सुरु झाली आहेत. शेतक-यांच्या प्रश्नांवरून केंद्र सरकारसह राज्यातील फडणवीस सरकारविरोधात आंदोलनाचे हत्यार उपसत पक्षविरोधी भूमिका घेणारे भंडारा- गडचिरोली लोकसभा मतदारसंघातील भाजपचे खासदार नाना पटोले यांनी खासदारकीचा राजीनामा दिला होता. विदर्भातील ओबीसींचे नेते अशी ओळख असलेले पटोले २००८ पर्यंत काँग्रेसमध्ये होते. तिथेही त्यांचे पक्षनेत्यांशी मतभेद होते. विलासराव देशमुख यांच्याशी मतभेद झाल्यानंतर पटोले भाजपत गेले. विदर्भात ओबीसी चेहरा हवा असल्याने भाजपनेही त्यांना तात्काळ प्रवेश दिला. भंडारा व गोंदिया जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांनी भाजपला एकहाती विजय मिळवून दिला. २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत ते खासदार म्हणून निवडून आले. मात्र केंद्रात मंत्रिपदही न मिळाल्याने पटोले यांच्या पदरी निराशा पडली. यात भर म्हणजे दोन वर्षांपूर्वीच्या जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपचा पराभव झाला व पक्षात पटोलेंचे वजन कमी होत गेले. ही खदखद त्यांच्या मनात होती आणि यामुळेच त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला आहे.

काँग्रेस प्रवेशानंतरही पटोलेंपुढे अनेक आव्हाने


खासदारकीचा राजीनामा देऊन काँग्रेसवासी झालेले नाना पटोले यांच्यासमोर जिल्ह्य़ातील काँग्रेसच्या प्रस्थापित नेत्यांचे आव्हाने  उभे राहण्याची शक्यता आहे. काँग्रेस-भाजप आणि पुन्हा काँग्रेस असा प्रवास करणारे पटोले यांचे पक्षश्रेष्ठींनी स्वागत केले असले तरी स्थानिक नेत्यांना ते फारसे पचनी पडले नाही. पेटोल यांनी थेट काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्याशी संपर्कात राहून पक्षात प्रवेश केला. परंतु भंडारा आणि गोंदिया जिल्ह्य़ातील काँग्रेसचे प्रस्थापित नेते त्यांना कितीपत साथ देतात. यावर त्यांची पुढची वाटचाल सुकर होणार आहे. काँग्रेसमध्ये असताना त्यांचा थेट संबंध तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याशी होता. परंतु भंडारा जिल्ह्य़ातील साकोली विधानसभा मतदार संघातील उमेदवारीवरून मतभेद झाले होते. जिल्ह्य़ात शाळा-महाविद्यालयाच्या माध्यमातून तगडे ‘नेटवर्क’ असलेले काँग्रेस नेते व माजी आमदार सेवक वाघाये यांना साकोलीची उमेदवारी निश्चित होणार हे स्पष्ट झाल्यानंतर पटोले यांनी काँग्रेसमधून बाहेर पडण्याचा मार्ग निवडला होता. जिल्हा राजकारणात वाघाये हे पटोले यांना ‘सिनिअर’ आहेत. ते दोनदा पराभूत झाले आहेत. परंतु त्यांनी काँग्रेस सोडली नाही. पटोले यांचा प्रवास काँग्रेस, भाजप आणि पुन्हा काँग्रेस असा आहे. तेव्हा पक्ष त्यांना जिल्ह्य़ात किती पाठबळ देईल यावरच त्यांचे स्थानिक राजकारणाचे भवितव्य ठरणार आहे.माजी आमदार सेवक वाघाये यांची साकोली मतदार संघावर दावेदारी आहे तर पटोले यांचाही कल विधानसभा निवडणूक लढण्याकडे आहे. जातीच्या समीकरणाचा विचार केल्यास हे दोघेही एकाच समाजाचे (ओबीसी)आहेत. या दोन्ही नेत्यांचा मतदारसंघ एकच असल्याने पेटोले यांना स्वपक्षीय नेत्यांची जिल्ह्य़ातील आव्हाने पेलावी लागणार आहे. पटोले आणि वाघाये यांच्यात जिल्ह्य़ातील वर्चस्वावरून याआधीही संघर्ष झाला आहे. जिल्ह्य़ात आणखी एक प्रस्थापित नेते आहेत. माजी मंत्री बंडू सावरबांधे. त्यांचीही जिल्ह्य़ावर चांगली पकड आहे. त्यांचा मतदार संघ आरक्षित झाला आहे.भंडारा जिल्ह्य़ांचा विचार करता पक्ष प्रस्थापित नेत्यांना प्राधान्य देतात की, नव्याने पक्षात आलेल्या नेत्यांना महत्व देतात. यावर सारेकाही अवलंबून आहे. हे दोन्ही नेते जिल्हा परिषदेच्या जागावाटपासून तर पक्षीय राजकारणात वजन ठेवून आहेत. भंडारा-गोदिंया लोकसभा मतदार संघाचा विचार करता वरिष्ठ आमदार गोपालदास अग्रवाल हे पक्षाचे दुसरे नेते आहेत. त्यांना जिल्ह्य़ातील राजकारणात कुणाचा हस्तक्षेप नको आहे.विदर्भात मुकुल वासनिक, विलास मुत्तेमवार, विजय वडेट्टीवार, नरेश पुगलिया आदी नेते पेटोले यांना पटोलेंच्या पक्ष प्रवेशाने आनंद झाल्याचे दिसत नाहीत. पक्षात वरचे स्थान मिळाले नसल्यास पटोले यांच्या राजकीय महत्वाकांक्षेला मर्यादा येतील. आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी होण्याची दिसत आहे. अशावेळी जागा वाटपात पटोले यांना पक्षाने महत्व न दिल्यास राष्ट्रवादी काँग्रेस वरचढ होण्याची शक्यता आहे. भंडारा-गोंदिया जिल्ह्य़ातील काँग्रेसचे प्रस्थापित नेते पटोले यांना सहकार्य करण्याची शक्यता कमी आहे. शिवाय प्रफुल पटेल सारखे स्थान पटोले यांना काँग्रेस देण्याची शक्यता दिसत नाही. त्यामुळे स्थानिक राजकारणात पटोले यांच्यासमोर भविष्यात अडचणींचा डोंगर उभा राहणार आहे.दरम्यान पटोले यांच्यासाठी साकोलीची जागा मोकळी करण्यासाठी सेवक वाघाये यांना लोकसभेची पोटनिवडणूक लढवण्यास सांगण्यात येत आहेत. परंतु वाघाये यासाठी फारसे इच्छुक नाहीत. त्यांना आपला मतदार संघ सोडायचे नाही. मात्र पक्षश्रेष्ठीकडून आदेश आल्यास ते निवडणूक लढतील. पण पटोले यांना मतदारसंघात संघर्षांची स्थिती कायम राहणार आहे.

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB)