Thursday 14 December 2017

मुंबई महापालिकेच्या पोटनिवडणुकीत भाजपच्या उमेदवार प्रतिभा गिरकर विजयी

भाजपची ताकद वाढली


मुंबई महापालिकेतील भाजपच्या नगरसेविका शैलजा गिरकर यांच्या निधनाने रिक्त झालेल्या प्रभाग २१ मधील पाेटनिवडणुकीत गिरकर यांच्या सून प्रतिभा (९५९१ मते) विजयी झाल्या. त्यांनी काँग्रेसच्या उमेदवार नीलम मधाले- मकवाणा (१९८४ मते) यांचा पराभव केला. या प्रभागात गिरकर यांच्या समर्थनार्थ काँग्रेस वगळता अन्य पक्षांनी उमेदवार उभा केला नव्हता. या विजयामुळे मुंबईत भाजपच्या नगरसेवकांची संख्या आता ८३ झाली आहे.  त्यांनी काँग्रेसच्या उमेदवार निलम मधाळे यांचा ७६०७ मताधिक्याने पराभव केला. या विजयामुळे भाजपची पालिकेतील राजकीय ताकद वाढली असून भाजप नगरसेवकांची संख्या आता ८३ झाली आहे. भाजपच्या नगरसेविका आणि माजी उपमहापौर शैलजा गिरकर यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली होती. प्रतिभा गिरकर यांना शिवसेनेनेही पाठिंबा दिल्याने त्यांचा विजय निश्चित मानला जात होता. गुरुवारी या पोटनिवडणुकीची मतमोजणी पार पडली. या निवडणुकीत गिरकर यांना ९५९१ मते मिळाली, तर प्रतिस्पर्धी उमेदवार निलम मधाळे यांना १९८४ मते मिळाली. २२९ मतदारांनी नोटाचा वापर केला. अपक्षांच्या पाठिंब्याने तूर्तास सेनेच्या सत्तेला कोणताही धोका नसला तरी सेनेला गाफील राहाता येणार नाही, असा इशाराच भाजपने भांडुप आणि कांदिवलीच्या पोटनिवडणुकीत विजय मिळवून दिला आहे.


POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB)

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब)

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.