Thursday 28 May 2020

भाजपमध्ये पक्षांतर केलेल्या नेत्यांमध्ये नैराश्य; राजकीय संन्यास घेण्याकडे कल

माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांता पाटील यांचा राजकीय संन्यास

पक्षांतर केलेल्या बहुतांश नेत्यांमध्ये सत्ता,पद नाही, पक्षात किंमत व प्रतिष्ठा नसल्याची भावना  

विधानसभा व लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठ्याप्रमाणावर भाजप पक्षामध्ये राष्ट्रवादीसह काँग्रेस पक्षातील बहुसंख्य राजकीय नेत्यांनी राजकीय वारे पाहून सत्तेच्या अपेक्षेने अथवा अनुकूल लाटेत निवडून येण्याच्या आशेने पक्षांतर केले होते. केंद्रातील सत्ता भाजपने राखली त्यामुळे राज्यातही सत्ता हमखास येऊ शकेल या भ्रमात अनेकांनी पक्ष प्रवेश करून राजकीय भविष्य पणाला लावले मात्र विधानसभा निवडणुकांचा निकाल या पक्षनेत्यांना बुचकळ्यात टाकणारा होता. स्वप्नातही वाटणार नाही अशी महाविकास आघाडी स्थापन होऊन शिवसेनेने राष्ट्रवादी व काँग्रेसशी हातमिळवणी करून गेल्या विधानसभा निवडणुकीत ऐनवेळी युती तोडणाऱ्या भाजपचा या वेळी वचपा काढला. राज्यातील सत्ता गेल्याने हताश झालेल्या पक्षांतरीत नेत्यांना महाविकास आघाडी सरकार या ना त्या कारणाने कोसळेल या आशावादात नेतेमंडळीनी ठेवले मात्र आता सहनशीलता ढळू लागली आहे. जो पर्यंत राष्ट्रवादीचे अध्यक्ष व राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे जनक शरद पवार राजकीयदृष्ट्या सक्रीय राजकारणात आहेत तो पर्यंत तरी सत्तेच्या वाटा या नेत्यांना धुसर वाटत आहेत. ज्या प्रमाणे भाजपमध्ये पक्षांतर केलेल्या नेत्यांचा आत्मविश्वास ढळत आहे त्याप्रमाणे शिवसेनेत राष्ट्रवादीतून प्रवेश केलेल्या नेत्यांमध्ये देखील नैराश्याची भावना पहावयास मिळत आहे. विधानसभा व लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप खालोखाल शिवसेनेतही काही नेत्यांनी प्रवेश केलेला होता. अशा नेत्यांना राजकीय भवितव्य अंधारात असल्याचे भासत आहे त्यामुळे पक्षांतर केलेल्या नेत्यांमध्ये नैराश्य आले असून राजकीय संन्यास घेण्याकडे काहींचा कल दिसून येत आहे. सत्ता नाही त्यामुळे पद नाही, पक्षात अपेक्षेप्रमाणे किंमत व प्रतिष्ठा नसल्याची भावना अशा नेत्यांमध्ये निर्माण झालेली आहे. त्यामुळे काही नेते सोशल मिडीयावरून निराशजनक मत, प्रतिक्रिया व्यक्त करीत असल्याचे दिसून येत आहे. गेली अनेक दशके काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षात कार्य केल्याने या पक्षांमधील कार्यप्रणाली आणि भाजपमधील पक्षकार्य पद्धत परस्परविरोधी असल्याने पक्ष कार्य समजून घेणे आणि कार्यरत राहणे अजूनही अनेक नेत्यांना शक्य झाले नाही. भाजप पक्षात शिस्तबद्ध कार्याचा इतका बोलबाला आहे कि अशा भाजपमध्ये पक्षांतर केलेल्या नेत्यांना काय करावे, कसे करावे यामध्ये गोंधळून गेल्याची स्थिती आहे. त्यामुळे सद्यस्थिती यांच्या कार्यकर्त्यांना देखील राजकीय भवितव्याचा प्रश्न पडला आहे. पक्षाचे कार्यक्रम संकल्पना जाहीर होते व त्याप्रमाणे शिस्तीत कार्य पार पाडणे या प्रक्रियेत देखील अशा नेत्यांना सामावून घेतले जात नसल्याची खंत व्यक्त केली जात आहे. निवडणुकीस वातावरण अनुकूल असल्याचे हेरून काही आमदारांनी भाजप-शिवसेनेत प्रवेश केला होता. निवडणुकीपूर्वी तब्बल ३५ आयारामांनी भाजप-सेनेत प्रवेश केला होता. त्यापैकी १९ आयारामांचा पराभव झाला होता. तर १६ आयारामांचा विजय झाला होता. पराभूत झालेल्या आयारामांपैकी शिवसेनेत आलेल्या १९ आणि भाजपमध्ये आलेल्या ८ आयारामांचा समावेश आहे. ३५ आयरामांपैकी १० आयाराम निवडणून आल्याने भाजपच्या जागा वाढल्या होत्या. या बरोबरच अनेक माजी आमदार व स्थनिक नेत्यांनी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप-शिवसेनेत प्रवेश केला होता. अनेक वर्षे सतरंज्या उचलण्यापासून पक्ष संघटन मजबूत करणारे अनेक निष्ठावंत कार्यकर्ते कामच करीत असताना निवडणूक आली की त्यांना केवळ आश्वासने दिली जातात आणि ऐनवेळेवर नव्याने पक्षांतर केलेल्या नेत्याला उमेदवारी देऊन निष्ठावंतांवर अन्याय केला जातो. सतरंज्या उचलणारे अनेक कार्यकर्ते त्याच जागी आहे अशी भावना देखील व्यक्त होत असते. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपमध्ये पक्षांतर केलेले अनेक आमदार निवडून आलेले होते पण त्यांना पुढे मंत्री पद अथवा इतर संधी मिळाली नव्हती. अनेक वर्षे काँग्रेस आणि राष्ट्रवादीत काम करत असताना मोदी लाटेच्या भीतीने निवडून येण्याची शक्यता न वाटलेल्या अनेकांनी २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत पक्षबदल केला होता. त्यापैकी २७ जण निवडून आले होते. यापैकी एकालाही मंत्रिमंडळ वाढीत भाजपने त्यावेळी स्थान दिले नव्हते. उलट जे भाजपामध्ये नाहीत, पण मित्रपक्ष म्हणून असलेले महादेव जानकर आणि सदाभाऊ खोत यांना कॅबिनेट आणि राज्यमंत्रीपद देऊन फडणवीस यांनी टीकेचा रोख कमी केलेला होता. कालांतराने यांचे राजकीय अस्तित्व त्यांच्या नावापुरते उरेल अशी स्थिती निर्माण करण्यात मात्र भाजपला यश आले आहे.  

राष्ट्रवादीतून भाजपमध्ये पक्षांतर केलेले नेते-

प्रवीण दरेकर
भारती लव्हेकर
संजय सावकारे
किसन कथोरे 
लक्ष्मणराव जगताप
शिवाजी कर्डिले
मंदा म्हात्रे
बबनराव पाचपुते
रमेश कराड
सुरेश धस
विनायक मेटे
राहुल नार्वेकर
वैभव पिचड, मधुकर पिचड
रमेश आडसकर
शिवेंद्रराजे भोसले
संदीप नाईक, गणेश नाईक
राणा जगजितसिंह पाटील
रणजितसिंह मोहिते-पाटील
विजयसिंह मोहिते-पाटील
नमिता मुंदडा
जालिंदर कामठे
प्रदीप कंद
राजेंद्र कोरेकर
महेश भागवत
आनंद थोरात
सूर्यकांता पाटील
अशोक भांगरे
संजय काकडे
धनंजय महाडिक
निरंजन डावखरे
नरेंद्र पाटील
सतीश पाटील
अन्य

राष्ट्रवादीतून शिवसेनेत पक्षांतर केलेले नेते-

संजय दिना पाटील
जयदत्त क्षीरसागर
सचिन अहिर
भास्कर जाधव
पांडुरंग बरोरा
शेखर गोरे
सुरेश गोरे
रश्मी बागल
दिलीप सोपल
अवधूत तटकरे 
निवेदिता माने
अन्य

काँग्रेसमधून भाजपमध्ये पक्षांतर केलेले नेते-

नारायण राणे
राधाकृष्ण विखे पाटील
हर्षवर्धन पाटील
भरत गावित
गोपालदास अग्रवाल
कालीदास कोळंबकर
जयकुमार गोरे
रमेश सिंह
मुन्ना कुरणे
नितेश राणे
प्रशांत ठाकूर
शिवाजीराव नाईक
विजयकुमार गावित
डॉ. हीना गावित
प्रकाश भारसाखळे
डॉ. सुनील देशमुख
अन्य

काँग्रेसमधून शिवसेनेत पक्षांतर केलेले नेते-

अब्दुल सत्तार
निर्मला गावित
भाऊसाहेब कांबळे
अन्य

इतर पक्षातील शिवसेनेत पक्षांतर 

विलास तरे (बविआ)
शरद सोनावणे (मनसे)
अन्य

इतर पक्षातून भाजपमध्ये पक्षांतर 

राम कदम (मनसे)
गोपीचंद पडळकर (वंचित)
मोहन माधवराव (अपक्ष)
अन्य

पक्षांतरानंतर पुन्हा भाजपमधून बाहेर पडलेले नेते

आशिष देशमुख
अनिल गोटे
नाना पटोले
अन्य
===============================================

माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांता पाटील यांचा राजकीय संन्यास

ज्येष्ठ नेत्या आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांता पाटील यांनी राजकारणातून संन्यास घेतला आहे. फेसबुकच्या माध्यमातून भावनिक पोस्ट लिहून सूर्यकांता पाटील यांनी आपला निर्णय जाहीर केला. 43 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीला त्यांनी रामराम ठोकला. 43 वर्ष राजकारणात होते एखाद्या राजकुमारीसारखी राहिले. 400 रुपयांची साडी 4000 हजाराच्या थाटात नेसली, मिळालेले काम मन लावून केले, आता आजूबाजूला असणारे लोक अनोळखी वाटत आहेत आणि अश्या अनोख्या प्रांतात माझ्यासारखी मनस्वी रमू शकत नाही. राजीनामा लिहून तयार होता पण मी आहेच कोण म्हणून एवढा शो करायचा” असे त्यांनी फेसबुकवर लिहिले आहे. सूर्यकांता पाटील सुरुवातीला काँग्रेसमध्ये होत्या, त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 2014 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र भाजपमध्ये त्यांचे मन रमताना दिसत नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये त्यांनी अनेक पदं भूषवली आहेत. पाटील यांनी चार वेळा खासदार, एक वेळा आमदार म्हणून हिंगोली-नांदेड मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलेले आहे. त्या ग्रामविकास मंत्रालयात राज्यमंत्री होत्या. त्यानंतर संसदीय कार्य मंत्रालयाचे राज्यमंत्रीपदही त्यांनी भूषवले होते. 1980 मध्ये त्या हदगाव मतदारसंघातून पहिल्यांदा आमदारपदी निवडून आल्या होत्या. 1986 मध्ये सूर्यकांता पाटील काँग्रेसकडून राज्यसभेवर गेल्या होत्या. 1991, 1998 आणि 2004 असे तीन वेळा त्या लोकसभेत खासदारपदी निवडून आल्या. सूर्यकांता पाटील यांनी भाजपात प्रवेश करताना पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यावर आरोप केला होता. तूर्तास त्यांनी आपल्या राजकीय संन्यासावर काही बोलण्यास नकार दिला आहे. मात्र समाजसेवा सुरुच राहील, असे त्यांनी जाहीर केले आहे. हिंगोली मतदारसंघ काँग्रेसला सोडून दिल्याने त्या नाराज होत्या. राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत देखील मुखेड मतदारसंघातून त्यांचे इच्छुकांमध्ये नाव चर्चेत होते मात्र उमेदवारी मिळाली नव्हती. १९७० च्या दशकात वृत्तपत्र काढून त्याचे प्रकाशन ग. वा. बेहरेंच्या हस्ते करणारी व काँग्रेस विचारसरणीने पूर्णत: भारलेली महिला कार्यकर्ता आता सत्तरीच्या उंबरठय़ावर भाजपकडे झुकल्याची चर्चा पक्षांतर केल्यावर केली गेली. पक्षातील अंतर्गत वादामुळे भाजपातील अनेक दिग्गज नेते नाराज आहेत. या पार्श्वभूमीवर माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपच्या नेत्या सूर्यकांता पाटील यांनी भाजपला अनेकदा टीका करून घरचा आहेर दिला होता. राजकारणात फक्त पैशाला महत्त्व आहे. केवळ तोंडात जोर असणाऱ्यांनाच राज्यसभेची ऑफर मिळते. यासंदर्भात त्यांना फेसबूकवरही पोस्ट लिहिली होती आणि नाव न घेता नारायण राणेंवर टीका देखील केली होती. सध्याचे संपर्क मंत्री कोण्या एखाद्या कार्यकर्त्याच्या घरी जेवायला येतात. त्या पलीकडे त्यांचा फारसा संपर्क नसतो अशी देखील भाजप पक्षश्रेष्ठींवर काही दिवसांपूर्वी टीका केली होती.
=======================================
नवनिर्वाचित आमदारांच्या यादी पहा आणि नेत्यांचे राजकीय स्थित्यंतर आठवण करा. 
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 संपूर्ण आमदार यादी
नंदुरबार : 04

1) अक्कलकुवा
अॅड. के. सी पाडवी(काँग्रेस)
2) शहादा
राजेश पाडवी (भाजप)
3) नंदुरबार
विजयकुमार गावित (भाजप)
4) नवापूर
शिरीष नाईक (काँग्रेस)
धुळे : 05

5) साक्री
मंजुषा गावित (अपक्ष)
6) धुळे ग्रामीण
कुणाल पाटील (काँग्रेस)
7) धुळे शहर
फारुक शाह (एमआयएम)
8) सिंदखेडा
जयकुमार रावल (भाजप)
9 ) शिरपूर
काशिराम पावरा (भाजप)
जळगाव : 11

10) चोपडा
लता सोनावणे (शिवसेना)
11) रावेर
हरिभाऊ जावळे (भाजप)
12) भुसावळ
संजय सावकारे (भाजप)
13) जळगाव शहर
सुरेश भोळे (भाजप)
14) जळगाव ग्रामीण
गुलाबराव पाटील (शिवसेना)
15) अमळनेर
अनिल पाटील (राष्ट्रवादी)
16) एरंडोल
चिमणराव पाटील (शिवसेना)
17) चाळीसगाव
मंगेश चव्हाण (भाजप)
18) पाचोरा
किशोर पाटील (शिवसेना)
19) जामनेर
गिरीष महाजन (भाजप)
20) मुक्ताईनगर
चंद्रकांत पाटील (अपक्ष)
बुलडाणा : 07

21) मलकापूर
राजेश एकाडे (काँग्रेस)
22) बुलडाणा
संजय गायकवाड (शिवसेना)
23) चिखली
श्वेता महाले (भाजप)
24) सिंदखेड राजा
राजेंद्र शिंगणे (राष्ट्रवादी)
25) मेहकर
संजय रायमूलकर (शिवसेना)
26) खामगाव
आकाश फुंडकर (भाजप)
27) जळगाव जामोद
संजय कुटे (भाजप)
अकोला : 05

28) अकोट
प्रकाश भारसाकळे (भाजप)
29) बाळापूर
नितीनकुमार तळे (शिवसेना)
30) अकोला पश्चिम
गोवर्धन शर्मा (भाजप)
31) अकोला पूर्व
रणधीर सावरकर (भाजप)
32) मूर्तिजापूर
हरीश पिंपळे (भाजप)
वाशिम : 03

33) रिसोड
अमित झनक (काँग्रेस)
34) वाशिम
लखन मलिक (भाजप)
35) कारंजा
राजेंद्र पाटनी (भाजप)
अमरावती : 08

36) धामणगाव रेल्वे
प्रताप अरुण अडसड (भाजप)
37) बडनेरा
रवी राणा (अपक्ष)
38) अमरावती
सुलभा खोडके (काँग्रेस)
39) तिवसा
यशोमती ठाकूर (काँग्रेस)
40) दर्यापूर
बळवंत वानखेडे (काँग्रेस)
41) मेळघाट
राजकुमार पटेल (प्रहार जनशक्ती)
42) अचलपूर
बच्चू कडू (प्रहार जनशक्ती)
43) मोर्शी
देवेंद्र भुयर (स्वाभिमानी)
वर्धा : 04

44) आर्वी
दादाराव केचे (भाजप)
45) देवळी
रणजित कांबळे (काँग्रेस)
46) हिंगणघाट
समीर कुणावार (भाजप)
47) वर्धा
पंकज भोयर (भाजप)
नागपूर : 12

48) काटोल
अनिल देशमुख (राष्ट्रवादी)
49) सावनेर
सुनील केदार (काँग्रेस)
50) हिंगणा
समीर मेघे (भाजप)
51) उमरेड
राजू पारवे (काँग्रेस)
52) नागपूर दक्षिण-पश्चिम
देवेंद्र फडणवीस (भाजप)
53) नागपूर दक्षिण
मोहन माटे (भाजप)
54) नागपूर पूर्व
कृष्णा खोपडे (भाजप)
55) नागपूर मध्य
विकास कुंभारे (भाजप)
56) नागपूर पश्चिम
विकास ठाकरे (काँग्रेस)
57) नागपूर उत्तर
नितीन राऊत (काँग्रेस)
58) कामठी
टेकचंद सावरकर (भाजप)
59) रामटेक
आशिष जयस्वाल (अपक्ष)
भंडारा : 03

60) तुमसर
राजेंद्र कारेमोरे (राष्ट्रवादी)
61) भंडारा
नरेंद्र भोंडेकर (अपक्ष)
62) साकोली
नाना पटोले (काँग्रेस)
गोंदिया : 04

63) अर्जुनी मोरगाव
मनोहर चंद्रिकापुरे (राष्ट्रवादी)
64) तिरोरा
विजय रहांगदळे (भाजप)
65) गोंदिया
विनोद अग्रवाल (अपक्ष)
66) आमगाव
मारुती कारोटे (काँग्रेस)
गडचिरोली : 03

67) आरमोरी
कृष्णा गजबे (भाजप)
68) गडचिरोली
डॉ. देवराव होळी (भाजप)
69) अहेरी
धर्मरावबाबा आत्राम (राष्ट्रवादी)
चंद्रपूर : 06

70) राजुरा
सुभाष धोटे (काँग्रेस)
71) चंद्रपूर
गजानन जोर्गेवार (अपक्ष)
72) बल्लारपूर
सुधीर मुनगंटीवार (भाजप)
73) ब्रह्मपुरी
विजय वडेट्टीवार (काँग्रेस)
74) चिमुर
कीर्तीकुमार भांगडिया (भाजप)
75) वरोरा
प्रतिभा धानोरकर (काँग्रेस)
यवतमाळ : 07

76) वणी
संजीव रेड्डी बोदकुलवार (भाजप)
77) राळेगांव
अशोक उईके (भाजप)
78) यवतमाळ
मदन येरावार (भाजप)
79) दिग्रस
संजय राठोड (शिवसेना)
80) आर्णी
संदीप धुर्वे (भाजप)
81) पुसद
इंद्रनिल मनोहर नाईक (राष्ट्रवादी)
82) उमरखेड
नामदेव ससाणे (भाजप)
नांदेड : 09

83) किनवट
भीमराव केरम (भाजप)
84) हदगाव
माधवराव पाटील जवळकर (काँग्रेस)
85) भोकर
अशोक चव्हाण (काँग्रेस)
86) नांदेड उत्तर
बालाजी कल्याणकर (शिवसेना)
87) नांदेड दक्षिण
मोहन हंबर्डे (काँग्रेस)
88) लोहा
श्यामसुंदर शिंदे (अपक्ष)
89) नायगाव
राजेश पवार (भाजप)
90) देगलूर
रावसाहेब अनंतपूरकर (काँग्रेस)
91) मुखेड
तुषार राठोड (भाजप)
हिंगोली : 03

92) वसमत
चंद्रकांत नवघरे (राष्ट्रवादी)
93) कळमनुरी
संतोष बांगर (शिवसेना)
94) हिंगोली
तानाजी मुटकुळे (भाजप)
परभणी : 04

95) जिंतूर
मेघना बोर्डीकर (भाजप)
96) परभणी
राहुल पाटील (शिवसेना)
97) गंगाखेड
रत्नाकर गुट्टे (रासप)
98) पाथरी
सुरेश वर्पूरडकर (काँग्रेस)
जालना : 05

99) परतूर
बबन लोणीकर (भाजप)
100) घनसावंगी
राजेश टोपे (राष्ट्रवादी)
101) जालना
कैलास गोरंटियाल (काँग्रेस)
102) बदनापूर
नारायण कुचे (भाजप)
103) भोकरदन
संतोष दानवे (भाजप)
औरंगाबाद : 09

104) सिल्लोड
अब्दुल सत्तार (शिवसेना)
105) कन्नड
उदयसिंग राजपूत (शिवसेना)
106) फुलंब्री
हरिभाऊ बागडे (भाजप)
107) औरंगाबाद मध्य
प्रदीप जयस्वाल (शिवसेना)
108) औरंगाबाद पश्चिम
संजय शिरसाठ (शिवसेना)
109) औरंगाबाद पूर्व
अतुल सावे (भाजप)
110) पैठण
संदीपान भुमरे (शिवसेना)
111) गंगापूर
प्रशांत बंब (भाजप)
112) वैजापूर
रमेश बोरनारे (शिवसेना)
नाशिक : 15

113) नांदगाव
सुहास कांदे (शिवसेना)
114) मालेगाव मध्य
मोहम्मद इस्माईल (MIM)
115) मालेगाव बाह्य
दादा भुसे (शिवसेना)
116) बागलान
दिलीप बोरसे (भाजप)
117) कळवण
नितीन पवार (राष्ट्रवादी)
118) चांदवड
राहुल आहेर (भाजप)
119) येवला
छगन भुजबळ (राष्ट्रवादी)
120) सिन्नर 
माणिकराव कोकाटे (राष्ट्रवादी)
121) निफाड
दिलीप बनकर (राष्ट्रवादी)
122) दिंडोरी
नरहरी झिरवळ (राष्ट्रवादी)
123) नाशिक पूर्व
राहुल ढिकळे (भाजप)
124) नाशिक मध्य
देवयानी फरांदे (भाजप)
125) नाशिक पश्चिम
सीमा हिरे (भाजप)
126) देवळाली
सरोज अहिरे (राष्ट्रवादी)
127) इगतपुरी
हिरमान होस्कार (काँग्रेस)
पालघर : 06

128) डहाणू
विनोद निकोले (माकप)
129) विक्रमगड
सुनिल भुसारा (राष्ट्रवादी)
130) पालघर
श्रीनिवास वनगा (शिवसेना)
131) बोईसर
राजेश पाटील (बविआ)
132) नालासोपारा
क्षितिज ठाकूर (बविआ)
133) वसई
हितेंद्र ठाकूर (बविआ)
ठाणे : 18

134) भिवंडी ग्रामीण
शांताराम मोरे (शिवसेना)
135) शहापूर
दौलत दरोडा (राष्ट्रवादी)
136) भिवंडी पश्चिम
महेश प्रभाकर चौगुले (भाजप)
137) भिवंडी पूर्व
रईस शेख (समाजवादी पक्ष)
138) कल्याण पश्चिम
विश्वनाथ भोईर (शिवसेना)
139) मुरबाड
किसन कथोरे (भाजप)
140) अंबरनाथ
बालाजी किणीकर (शिवसेना)
141) उल्हासनगर
कुमार आयलानी (भाजप)
142) कल्याण पूर्व
गणपत गायकवाड (भाजप)
143) डोंबिवली 
रवींद्र चव्हाण (भाजप)
144) कल्याण ग्रामीण
प्रमोद पाटील (मनसे)
145) मीरा-भाईंदर
गीता जैन (अपक्ष)
146) ओवळा-माजीवडा
प्रताप सरनाईक (शिवसेना)
147) कोपरी-पाचपाखाडी
एकनाथ शिंदे (शिवसेना)
148) ठाणे
संजय केळकर (भाजप)
149) मुंब्रा-कळवा
जितेंद्र आव्हाड (राष्ट्रवादी)
150) ऐरोली
गणेश नाईक (भाजप)
151) बेलापूर
मंदा म्हात्रे (भाजप)
मुंबई : 36

152) बोरीवली 
सुनिल राणे (भाजप)
153) दहिसर 
मनिषा चौधरी (भाजप)
154) मागाठणे
प्रकाश सुर्वे (शिवसेना)
155) मुलुंड
मिहीर कोटेचा (भाजप)
156) विक्रोळी
सुनील राऊत (शिवसेना)
157) भांडुप पश्चिम
सुरेश कोपरकर (काँग्रेस)
158) जोगेश्वरी पूर्व
रविंद्र वायकर (शिवसेना)
159) दिंडोशी
सुनील प्रभू (शिवसेना)
160) कांदिवली पूर्व
अतुल भातखळकर (भाजप)
161) चारकोप
योगेश सागर (भाजप)
162) मालाड पश्चिम
अस्लम शेख (काँग्रेस)
163) गोरेगाव
विद्या ठाकूर (भाजप)
164) वर्सोवा
भारती लवेकर (भाजप)
165) अंधेरी पश्चिम
अमित साटम (भाजप)
166) अंधेरी पूर्व
रमेश लटके (शिवसेना)
167) विलेपार्ले
पराग अळवणी (भाजप)
168) चांदिवली
दिलीप लांडे (शिवसेना)
169) घाटकोपर पश्चिम
राम कदम (भाजप)
170) घाटकोपर पूर्व
पराग शाह (भाजप)
171) मानखुर्द शिवाजीनगर
अबू आझमी (समाजवादी पक्ष)
172) अणूशक्तिनगर
नवाब मलिक (राष्ट्रवादी)
173) चेंबुर
प्रकाश फातर्पेकर (शिवसेना)
174) कुर्ला
मंगेश कुडाळकर (शिवसेना)
175) कलिना
संजय पोतनीस (शिवसेना)
176) वांद्रे पूर्व
झिशान सिद्दीकी (काँग्रेस)
177) वांद्रे पश्चिम
आशिष शेलार (भाजप)
178) धारावी
वर्षा गायकवाड (काँग्रेस)
179) सायन कोळीवाडा
कॅप्टन तमिळ सेलवन (भाजप)
180) वडाळा
कालिदास कोळंबकर (भाजप)
181) माहिम
सदा सरवणकर (शिवसेना)
182) वरळी 
आदित्य ठाकरे (शिवसेना)
183) शिवडी
अजय चौधरी (शिवसेना)
184) भायखळा
यामिनी जाधव (शिवसेना)
185) मलबार हिल
मंगल प्रभात लोढा (भाजप)
186) मुंबादेवी
अमीन पटेल (काँग्रेस)
187) कुलाबा
राहुल नार्वेकर (भाजप)
रायगड : 07

188) पनवेल
प्रशांत ठाकूर (भाजप)
189) कर्जत
महेंद्र थोरवे (शिवसेना)
190) उरण
महेश बालदी (अपक्ष)
191) पेण
रवीशेठ पाटील (भाजप)
192) अलिबाग
महेंद्र दळवी (शिवसेना)
193) श्रीवर्धन
अदिती तटकरे (राष्ट्रवादी)
194) महाड
भरत गोगावले (शिवसेना)
पुणे : 21

195) जुन्नर
अतुल बेणके (राष्ट्रवादी)
196) आंबेगाव
दिलीप वळसे पाटील (राष्ट्रवादी)
197) खेड आळंदी
दिलीप मोहिते (राष्ट्रवादी)
198) शिरुर
अशोक पवार (राष्ट्रवादी)
199) दौंड
राहुल कुल (भाजप)
200) इंदापूर
दत्ता भरणे (राष्ट्रवादी)
201) बारामती 
अजित पवार (राष्ट्रवादी)
202) पुरंदर
संजय जगताप (काँग्रेस)
203) भोर
संग्राम थोपटे (काँग्रेस)
204) मावळ
सचिन शेळके (राष्ट्रवादी)
205) चिंचवड
लक्ष्मण जगताप (भाजप)
206) पिंपरी
अण्णा बनसोडे (राष्ट्रवादी)
207) भोसरी
महेश लांडगे (भाजप)
208) वडगाव शेरी
सुनिल टिंगरे (राष्ट्रवादी)
209) शिवाजीनगर
सिद्धार्थ शिरोळे (भाजप)
210) कोथरुड
चंद्रकांत पाटील (भाजप)
211) खडकवासला
भीमराव तपकीर (भाजप)
212) पर्वती
माधुरी मिसाळ (भाजप)
213) हडपसर
चेतन तुपे (राष्ट्रवादी)
214) पुणे कॅन्टोन्मेंट
सुनिल कांबळे (भाजप)
215) कसबा पेठ
मुक्ता टिळक (भाजप)
अहमदनगर : 12

216) अकोले
किरण लहामटे (राष्ट्रवादी)
217) संगमनेर
बाळासाहेब थोरात (काँग्रेस)
218) शिर्डी
राधाकृष्ण विखे पाटील (भाजप)
219) कोपरगाव
आशुतोष काळे (राष्ट्रवादी)
220) श्रीरामपूर
लहू कानडे (काँग्रेस)
221) नेवासा
शंकरराव गडाख (क्रांतिकारी पक्ष)
222) शेवगाव पाथर्डी
मोनिका राजळे (भाजप)
223) राहुरी
प्राजक्त तनपुरे (राष्ट्रवादी)
224) पारनेर
निलेश लंके (राष्ट्रवादी)
225) अहमदनगर शहर
संग्राम जगताप (राष्ट्रवादी)
226) श्रीगोंदा
बबनराव पाचपुते (भाजप)
227) कर्जत जामखेड 
रोहित पवार (राष्ट्रवादी)
बीड : 06

228) गेवराई
लक्ष्मण पवार (भाजप)
229) माजलगाव
प्रकाश सोळंखे (राष्ट्रवादी)
230) बीड
संदीप क्षीरसागर (राष्ट्रवादी)
231) आष्टी
बाळासाहेब आजबे (राष्ट्रवादी)
232) केज
नमिता मुंदडा (भाजप)
233) परळी
धनंजय मुंडे (राष्ट्रवादी)
लातूर : 06

234) लातूर ग्रामीण
धीरज देशमुख (काँग्रेस)
235) लातूर शहर
अमित देशमुख (काँग्रेस)
236) अहमदपूर
बाबासाहेब पाटील (राष्ट्रवादी)
237) उदगीर
संजय बनसोडे (राष्ट्रवादी)
238) निलंगा
संभाजी पाटील निलंगेकर (भाजप)
239) औसा
अभिमन्यू पवार (भाजप)
उस्मानाबाद : 04

240) उमरगा
ज्ञानराज चौगुले (शिवसेना)
241) तुळजापूर
राणा जगजितसिंह पाटील (भाजप)
242) उस्मानाबाद
कैलास पाटील (शिवसेना)
243) परांडा
तानाजी सावंत (शिवसेना)
सोलापूर : 11

244) करमाळा
संजय शिंदे (अपक्ष)
245) माढा
बबन शिंदे (राष्ट्रवादी)
246) बार्शी
राजेंद्र राऊत (अपक्ष)
247) मोहोळ
यशवंत माने (राष्ट्रवादी)
248) सोलापूर शहर उत्तर
विजयकुमार देशमुख (भाजप)
249) सोलापूर शहर मध्य
प्रणिती शिंदे (काँग्रेस)
250) अक्कलकोट
सचिन शेट्टी (भाजप)
251) सोलापूर दक्षिण
सुभाष देशमुख (भाजप)
252) पंढरपूर
भारत भालके (राष्ट्रवादी)
253) सांगोला
शहाजी बापू पाटील (शिवसेना)
254) माळशिरस
राम सातपुते (भाजप)
सातारा : 08

255) फलटण
दीपक चव्हाण (राष्ट्रवादी)
256) वाई
मकरंद जाधव (राष्ट्रवादी)
257) कोरेगाव
महेश शिंदे (शिवसेना)
258) माण
जयकुमार गोरे (भाजप)
259) कराड उत्तर
बाळासाहेब पाटील (राष्ट्रवादी)
260) कराड दक्षिण
पृथ्वीराज चव्हाण (काँग्रेस)
261) पाटण
शंभूराजे देसाई (शिवसेना)
262) सातारा
शिवेंद्रराजे भोसले (भाजप)
रत्नागिरी : 05

263) दापोली
योगेश कदम (शिवसेना)
264) गुहागर
भास्कर जाधव (शिवसेना)
265) चिपळूण
शेखर निकम (राष्ट्रवादी)
266) रत्नागिरी
उदय सामंत (शिवसेना)
267) राजापूर
राजन साळवी (शिवसेना)
सिंधुदुर्ग : 03

268) कणकवली
नितेश राणे (भाजप)
269) कुडाळ
वैभव नाईक (शिवसेना)
270) सावंतवाडी
दीपक केसरकर (शिवसेना)
कोल्हापूर : 10

271) चंदगड
राजेश नरसिंग पाटील (राष्ट्रवादी)
272) राधानगरी
प्रकाश आबिटकर (शिवसेना)
273) कागल
हसन मुश्रीफ (राष्ट्रवादी)
274) कोल्हापूर दक्षिण
ऋतुराज पाटील (काँग्रेस)
275) करवीर
पी एन पाटील सडोलीकर(काँग्रेस)
276) कोल्हापूर उत्तर
चंद्रकांत जाधव (काँग्रेस)
277) शाहुवाडी
विनय कोरे (जनसुराज्य)
278) हातकणंगले
राजू आवळे (काँग्रेस)
279) इचलकरंजी
प्रकाश आव्हाडे (अपक्ष)
280) शिरोळ
उल्हास पाटील (शिवसेना)
सांगली : 08

281) मिरज
सुरेश खाडे (भाजप)
282) सांगली
सुधीर गाडगीळ (भाजप)
283) इस्लामपूर
जयंत पाटील (राष्ट्रवादी)
284) शिराळा
मानसिंग नाईक (राष्ट्रवादी)
285) पलुस कडेगाव
डॉ. विश्वजीत कदम (काँग्रेस)
286) खानापूर
अनिल बाबर (शिवसेना)
287) तासगाव-कवठेमहाकाळ
सुमनताई पाटील (राष्ट्रवादी)
288) जत
विक्रम सावंत (काँग्रेस)

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

==========================================================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1000/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
==============================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
=============================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
============================