Friday, 1 May 2020

अखेर 21 मे रोजी विधानपरिषदेच्या रिक्त जागांसाठी निवडणूक जाहीर; उद्धव ठाकरे यांच्यासह 9 जागांची निवड बिनविरोध होणार!

इच्छुकांच्या आशा पल्लवित; यांची होऊ शकते निवड 

विधान परिषदेसाठी हे आहेत इच्छुक उमेदवार 

भाजप – एकनाथ खडसे, योगेश गोगावले, हर्षवर्धन पाटील, विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे, गोपीचंद पडळकर, पृथ्वीराज देशमुख, माधव भंडारी, विनय नातू, डॉ. अजित गोपछेडे, प्रमोद जठार, विजयसिंह मोहिते पाटील, रणजितसिंह मोहिते - पाटील, अतुल भोसले, प्रवीण दटके, संजय काकडे व इतर 
शिवसेना – उद्धव ठाकरे, डॉ. नीलमताई गोऱ्हे, अन्य 
राष्ट्रवादी –  शशिकांत शिंदे, प्रकाश गजभिये, रुपाली चाकणकर, हेमंत टकले, किरण पावस्कर, राजन पाटील, शिवाजीराव गर्जे, अदिती नलावडे, सदाशिव पाटील, उमेश पाटील, अमोल मिटकरी व इतर 
काँग्रेस –  सचिन सावंत, अतुल लोंढे, नसिम खान, चारुलता टोकस, राजेंद्र मुळक, माणिकराव ठाकरे, डॉ. बबनराव तायवाडे,  डॉ. आशिष देशमुख, मोहन जोशी व इतर.
===============================
कोरोनामुळे रखडलेल्या महाराष्ट्र विधानपरिषदेच्या रिक्त 9 जागांसाठी अखेर निवडणूक जाहीर झाली आहे. येत्या 21 मे रोजी महाराष्ट्र विधानपरिषदेच्या रिक्त जागांसाठी निवडणूक होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीचा पेच संपुष्टात आलेला आहे.  निवडणुकीसाठी ४ मे पासून नामांकन प्रक्रिया सुरू होणार असून ११ मेपर्यंत उमेदवारी अर्ज स्वीकारता येणार आहे. १२ मे रोजी अर्जांची छाननी होणार आहे. तर १४ मे रोजी उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. त्यानंतर २१ मे रोजी सकाळी ९ वाजल्यापासून सायंकाळी ४ वाजेपर्यंत मतदान होईल. त्यानंतर त्याच दिवशी मतमोजणी होणार असून निकाल जाहीर करण्यात येणार आहे. विधानपरिषद निवडणूक लढविताना पहिल्यांदाच उद्धव ठाकरे यांना संपत्ती जाहीर करावी लागणार आहे. महाराष्ट्रात विधानपरिषद निवडणूक घेण्यास केंद्रीय निवडणूक आयोगाने अटी-शर्तींसह परवानगी दिली आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेची आवश्यक ती काळजी घेऊन निवडणूक घेण्याची सूचना आयोगाने केली आहे. विधानपरिषदेतील नऊ सदस्यांची मुदत २४ एप्रिल रोजा संपली असून आता या निवडणुका २१ मे रोजी होणार असल्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे २७ मे पूर्वी विधिमंडळाच्या दोन्ही पैकी एका सभागृहाचे सदस्य होणे अपेक्षित असल्याने निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकारवरील अनिश्चितता संपुष्टात आली आहे. आता येत्या २१ मे रोजी निवडणूक होणार असून या जागा भरल्या जातील. रिक्त जागांमध्ये भाजपच्या स्मिता वाघ, अरुण अडसड, पृथ्वीराज देशमुख, काँग्रेसचे चंद्रकांत रघुवंशी, हरिभाऊ राठोड, राष्ट्रवादीचे हेमंत टकले, आनंद ठाकूर, किरण पावसकर आणि शिवसेनेच्या डॉ. नीलमताई गोऱ्हे यांचा समावेश आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २८ नोव्हेम्बर २०१९ रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार सत्तेवर आले होते. ठाकरे विधिमंडळाच्या कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसल्याने सहा महिन्यांच्या आत (२७ मे २०२०) त्यांना सदस्य होणे बंधनकारक होते. विधानपरिषदेत या नऊ जागांच्या निवडणुका नियोजित वेळेत झाल्या असत्या तर कोणतीही अडचण नव्हती. परंतु, कोरोना संकटामुळे निवडणुका होण्यावर अनिश्चितता होती. त्यामुळे राज्य सरकारने ठाकरे यांची राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून नियुक्ती करण्याचा प्रस्ताव राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांना दिला होता. तरीही ठाकरे यांची नियुक्ती रखडल्याने सरकार अडचणीत आले होते. दरम्यान, हे प्रकरण उच्च न्यायालयात गेले असतानाच काल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या गटनेत्यांनी नऊ जागांची निवडणूक तातडीने घेण्याची मागणी केंद्रीय निवडणूक आयोगाला केली होती. काल सायंकाळी राज्यपालांनी देखील ही मागणी निवडणूक आयोगाला केली असता, आयोगाने निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर अनेक दिवसांपासून सरकारच्या भवितव्य बाबतच्या चर्चेला पूर्ण विराम मिळाला आहे. भाजपच्या सहकार्याच्या भूमिकेमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह 9 जागांची निवड बिनविरोध होण्याची शक्यता देखील निर्माण झालेली आहे. विधानपरिषदेच्या रिक्त 9 जागांसाठी निवडणूक जाहीर झाल्याने इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्या असून अनेक इच्छुकांनी निवड होण्यासाठी लॉबिंग करण्याचे काम सुरु केले आहे. सदस्य संख्येच्या प्रमाणत जागांची निवड होणार असल्याने यावेळी संधी मिळाली नाही तर आगामी अल्पावधीत होणाऱ्या रिक्त जागांवर निवड होऊ शकते या अपेक्षेने देखील इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. दरम्यान या जागांसाठी विधानसभा निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले त्यांना देखील संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

विधानपरिषदेच्या 9 जागांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

- 4 मेपासून 11 मे पर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार

- 12 मे – उमेदवार अर्जांची छाननी

- अर्जमाघारीसाठी 14 मे पर्यंतची मुदत

- 9 जागांसाठी 21 मे रोजी मतदान

- मतदानाच्या दिवशीच मतमोजणी

- 26 मे पर्यंत संपूर्ण प्रक्रिया पूर्ण

24 एप्रिलला विधानपरिषदेचे 8 सदस्य निवृत्त झाले आहेत, तर एक जागा 24 एप्रिलपूर्वीपासूनच रिक्त आहे. त्यामुळे विधानपरिषदेच्या 9 जागांवर निवडणूक होणार आहे. राष्ट्रवादी आणि भाजपचे प्रत्येकी 3 सदस्य 24 एप्रिलला निवृत्त झाले आहेत, तर शिवसेना आणि काँग्रेसचा प्रत्येकी 1 सदस्य निवृत्त झाले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सदस्य होण्याची संधी आहे. 27 मे पूर्वी उद्धव ठाकरेंना विधिमंडळाच्या कोणत्याही एका सदनाचे सदस्य होणे बंधनकारक आहे. विधानपरिषदेच्या नऊ जागांसाठी निवडणूक होणार आहे. प्रत्येक सदस्याला जिंकण्यासाठी 29 मते हवी आहेत. आघाडीकडे 173, तर भाजपकडे 115 आमदारांची संख्या आहे. त्यामुळे आघाडीचे उमेदवार 5 जागी जिंकणार, हे निश्चित आहे. दरम्यान, विधानसभेतील प्रत्येक पक्षाची सदस्यसंख्या आणि मतांच्या समीकरणांनुसार प्रत्येक पक्षाला विधान परिषद निवडणुकीत ९ पैकी किती जागा मिळतील याची आकडेवारी समोर आली आहे. सध्या विधानसभेमध्ये भाजपाचे १०५ आमदार आहेत. तर महाविकास आघाडीत सहभागी असलेल्या शिवसेनेचे ५६, राष्ट्रवादीचे ५४ आणि काँग्रेसचे ४४ आमदार आहेत. इतर पक्षांकडे १६ तर १३ अपक्ष आमदार आहेत. विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक होणार असल्याने प्रत्येक सदस्याला निवडून येण्यासाठी २९ मते मिळवणे आवश्यक आहेत. २९ मतांचा कोटा असेल त्यानुसार काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना प्रत्येकी दोघे निवडून येतील, भाजपकडून तीन जण आमदार होतील. सर्व पक्षांच्या संभाव्य उमेदवारांचा विचार केल्यास शिवसेनेमधून उद्धव ठाकरे यांच्यासोबत डॉ नीलमताई गोऱ्हे यांचे नाव असू शकते असे सांगितले जात आहे. भाजपकडून विनोद तावडे, पंकजा मुंडे, एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे, यांना प्राधान्य दिले जाऊ शकते अशी चर्चा आहे तर राज्यसभेसाठी भागवत कराड यांना उमेदवारी दिल्यामुळे, पुन्हा त्याच समाजातून पंकजा मुंडे यांना उमेदवारी मिळेल का? याबाबत शाशंका देखील व्यक्त केली जात आहे. माजी खासदार संजय काकडे यांचे देखील नाव येऊ शकते. राष्ट्रवादी मधून हेमंत टकले आणि किरण पावस्कर इच्छुक आहेत. ज्या ९ जागांसाठी निवडणूक घेण्याबाबतची सुचना केली आहे त्याबाबत रिक्त झालेल्या जागा भाजप – ३, राष्ट्रवादी काँग्रेस – ३, काँग्रेस – २, शिवसेना – १ असा रिक्त जागांचा तपशील आहे. या जागांवरून रिक्त म्हणजेच निवृत्त झालेले सदस्य पुढीलप्रमाणे - शिवसेना- १. डॉ नीलम गोऱ्हे (उपसभापती, विधान परिषद), भाजप- १. श्रीमती स्मिता वाघ, २. अरुण अडसड, ३. पृथ्वीराज देशमुख, राष्ट्रवादी- १. हेमंत टकले, २. आनंद ठाकूर, ३. किरण पावसकर, काँग्रेस- १. हरिभाऊ राठोड, २. चंद्रकांत रघुवंशी (निवडणूक आधी राजीनामा दिला आहे). पक्षीय बलाबल असे आहे कि, भाजप – १०५, शिवसेना – ५६, राष्ट्रवादी काँग्रेस – ५४, काँग्रेस – ४४, बहुजन विकास आघाडी – ३, समाजवादी पार्टी – २, एम आय एम – २, प्रहार जनशक्ती – २, मनसे – १, माकप – १, शेतकरी कामगार पक्ष – १, स्वाभिमानी पक्ष – १, राष्ट्रीय समाज पक्ष – १, जनसुराज्य पक्ष – १, क्रांतिकारी शेतकरी पक्ष – १, अपक्ष – १३ निवडून येण्यासाठी प्रत्येकाला आवश्यक असेल  {२८८/(९+१) = २८.८} म्हणजेच २९ मते. याप्रमाणे निवड होणार असल्याने रिक्त झालेल्या जागांवर भाजपा आपल्या जागा राखेल तर शिवसेनेची जागा वाढणार आहे. 

यापूर्वी अनुषंगिक वृत्त प्रसिद्ध झालेले ब्लॉग खालीलप्रमाणे -

राज्यपालांच्या निर्णयाच्या दिरंगाईवर महाविकास आघाडीची चाल!
http://prabindia.blogspot.com/2020/04/blog-post_28.html
'या' कारणामुळे मुख्यमंत्र्यांच्या सदस्य नियुक्तीची शिफारस प्रलंबित!
मुख्यमंत्र्यांना विधान परिषदेवर नियुक्त करण्याच्या शिफारशीला हायकोर्टात आव्हान देणारी याचिका फेटाळली
रिक्त जागांवर दुसऱ्यांदा केलेली शिफारस राज्यपाल मान्य करणार काय? मुख्यमंत्रीपदाचा निर्णय राज्यपालांच्या हाती!
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विधानपरिषदेच्या निवडणुका अनिश्चित काळासाठी स्थगित
कोरोनामुळे महाविकास आघाडीचे भवितव्य टांगणीला! ; उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाची 28 मे 2020 डेडलाईन

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

==========================================================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1000/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
==============================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
=============================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
============================
 

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.