उमेदवारी डावलल्याने भाजप असंतुष्टांमध्ये खदखद
विधानपरिषदेसाठी भाजपकडून मार्च मध्येच उमेदवारांची नावे निश्चित झाल्याचे दाखल नामनिर्देशनपत्र सोबत शपथपत्रावरील माहितीतून स्पष्ट झाले असून भाजपच्या चारही उमेदवारांनी आज अर्ज दाखल केले आहेत. भाजपने माजी खासदार रणजीतसिंह मोहिते पाटील, गोपीचंद पडळकर, नागपूरचे माजी महापौर प्रवीण दटके आणि नांदेडचे डॉ. अजित गोपछेडे यांना उमेदवारी दिली आहे. हर्षवर्धन पाटील यांच्यासह पंकजा मुंडे, एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे, प्रकाश मेहता यासारख्या नेत्यांना डावलण्यात आल्याने या नेत्यांकडून पक्ष नेतृवांबद्दल खदखद व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्र विधानपरिषद द्विवार्षिक निवडणूक २०२० करीता उमेदवारी नामांकन अर्ज (Form 2-D Nomination Form) व मालमत्ता, गुन्हे विषयक प्रतिज्ञापत्र (Form 26 Affidavit Form) ची पूर्वतयारी मार्च महिन्यातच करण्यात आलेली असून राज्यसभा आणि विधानपरिषद उमेदवारांची छाननी करण्यासाठी भाजपच्या प्रदेश संसदीय समितीची बैठक 3 मार्चला मुंबईत पार पडली होती. 40 पेक्षा जास्त इच्छुकांनी अर्ज केले होते सदर बैठकीनंतर इच्छुकांची नावे संसदीय निवड समितीला पाठवण्यात आल्यानंतर राज्यसभेबरोबर विधानपरिषद करिता संभाव्य उमेदवारांची नावे देखील निश्चित करण्यात आली होती कारण संबंधितांना उमेदवारी अर्जाबाबत तयारी करण्याची सूचना केली असल्याची माहिती पुढे आली असून भाजप उमेदवारांनी आज दाखल केलेल्या अर्जासोबतच्या प्रतिज्ञापत्रातील स्टम्प पेपरवरील तारखेवरून स्पष्ट झाले आहे.भाजपने जेष्ठ नेत्यांना डावलून नवख्यांना संधी दिली आहे. तर काहींना आगामी राज्यपाल नियुक्त जागांचे आश्वासन दिले आहे. आज उमेदवारी जाहीर केलेल्यांमध्ये राष्ट्रवादीतून लोकसभा निवडणूकपूर्वी पक्षांतर केलेले माजी खासदार रणजीतसिंह मोहिते पाटील (प्रतिज्ञापत्र स्टम्प पेपरवरील तारीख 12 मार्च 2020 तर थकबाकी नसल्याचे विविध दाखल्यांवर मार्च, एप्रिल महिन्यातील तारखा असून काही पत्रांवर 2 मेच्या तारखा आहेत.), निवडणूकपूर्वी पक्षांतर केलेले धनगर नेते गोपीचंद पडळकर (प्रतिज्ञापत्र स्टम्प पेपरवरील तारीख 20 मार्च 2020), नागपूरचे माजी महापौर प्रवीण दटके (प्रतिज्ञापत्र स्टम्प पेपरवरील तारीख 19 मार्च 2020), आणि नांदेडचे डॉ. अजित गोपछेडे (प्रतिज्ञापत्र स्टम्प पेपरवरील तारीख 22 एप्रिल 2020), यांना उमेदवारी दिली आहे. विधानपरिषदेच्या 9 जागांसाठी 21 तारखेला निवडणूक होत असून विधानसभेतील संख्याबळानुसार आघाडीच्या पाच व भाजपच्या चार जागा निवडून येतील अशी स्थिती आहे.
दरम्यान विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत भाजपच्या विधान परिषदेच्या चारही उमेदवारांनी शुक्रवारी मुंबईत विधान भवनात निवडणूक अर्ज दाखल केले. भाजप उमेदवार प्रवीण दटके, रणजितसिंह मोहिते-पाटील, डॉ. अजित गोपछेडे व गोपीचंद पडळकर यांनी अर्ज दाखल केले.यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, माजी मंत्री विनोद तावडे व आशिष शेलार, भाजप प्रदेश उपाध्यक्ष आ. प्रसाद लाड आणि मुंबई भाजप अध्यक्ष आ. मंगलप्रभात लोढा उपस्थित होते. विधानपरिषदेसाठी उमेदवारी नाकारल्यामुळे माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी तीव्र शब्दात आपली नाराजी व्यक्त केली. पक्षासाठी आयुष्यभर खस्ता खाणार्या लोकांना डावलून आत्ता पक्षात आलेल्या लोकांना संधी दिली जात आहे. यामुळे पक्ष कुठे जातोय हे स्पष्ट दिसते आहे, अशी टीका खडसे यांनी केली. एकनाथ खडसे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता कमीच होती. पण पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे यांना विधान परिषदेवर पाठवून त्यांचे राजकीय पुनर्वसन केले जाईल, अशी शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात होती. मात्र दिल्लीचे नेतृत्व अजूनही त्यांच्यावर नाराज असल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आहे. यानिमित्ताने राजकीय विरोधकांवर कुरघोडी करण्यात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यशस्वी झाल्याचे दिसून आले आहे. एकनाथ खडसेंना उमेदवारी डावलून पक्षाने खडसेंच्या राजकारणाला जवळपास पूर्णविराम दिल्याचे स्पष्ट होत आहे. उमेदवारी मिळण्याच्या आशेने माजी मंत्री व विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या नेत्या पंकजा मुढे यांनी नामनिर्देशनपत्राची सर्व पूर्वतयारी केली होती मात्र त्यांच्या अपेक्षांवर पाणी पडले आहे. त्यांच्या देखील राजकीय कारकीर्दवर मानलेले भाऊ रासप नेते महादेव जानकर यांच्यामुळे ब्रेक लागला असल्याची चर्चा होत आहे. काही दिवसांपूर्वीच भाजपचे नेते व माजी प्रदेशध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याबरोबर राष्ट्रवादीचे नेते व सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंढे यांच्या डाळ संदर्भातील भेटीत काय शिजले होते हे आता स्पष्ट होत असल्याची देखील चर्चा सोशल मिडीयावर होत आहे. दरम्यान भाजपने उमेदवारांची नावे निश्चित करताना सामाजिकदृष्ट्या संतुलन राखले असून राज्यातील 5 महिन्यांपूर्वी रात्रीचे घडलेले शपथविधी नाट्य आणि अजितदादा यांच्याशी केलेली हातमिळवणी अनेक पक्षांतर केलेल्यांना खटकलेली होती. या घटनेनंतर भाजपमध्ये पक्षांतर्गत मोठ्याप्रमाणत नैराश्यची भावना निर्माण झालेली होती. माजी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या प्रतिमेला तडा गेला आहे. ज्यांना विरोध करण्यासाठी राजकीय कारकीर्द पणाला लावून अथक परिश्रम व विरोध करून पक्षासाठी कार्य केले अशा राजकीय प्रतिस्पर्धी बरोबर केलेल्या हातमिळवणीच्या घटनेला दुरुस्त करण्यासाठी पवार विरोधकांना बळ देण्याची रणनीती भाजपने राबवलेली असल्याने इतर इच्छुकांना डावलले आहे.
सध्या रिक्त झालेल्या जागेत भाजपच्या 3, राष्ट्रवादी काँग्रेसच्या 3, काँग्रेसच्या 2 आणि शिवसेनेची 1 अशा एकूण 9 जागांचा समावेश आहे. संख्याबळाचा विचार केला तर महाविकासआघाडीच्या 5 आणि भाजपच्या 3 जागा सहज निवडून येतील. पक्षीय बलाबल पाहता, भाजपकडे 105, शिवसेनेकडे 56, राष्ट्रवादी काँग्रेसकडे 54, काँग्रेसचे 44, बहुजन विकास आघाडी 3, समाजवादी पार्टी 2, एमआयएम 2, प्रहार जनशक्ती 2, मनसे 1, माकप 1, शेतकरी कामगार पक्ष 1, स्वाभिमानी पक्ष 1, राष्ट्रीय समाज पक्ष 1, जनसुराज्य पक्ष 1, क्रांतिकारी शेतकरी पक्ष 1, अपक्ष 13 आमदारांचा समावेश आहे. त्यातून निवडून येण्यासाठी एका जागेसाठी 29 मतांची गरज आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्य विधिमंडळातील कोणत्याही सभासदाचे सदस्य नसल्यामुळे त्यांना 27 मे 2020 पूर्वी विधानपरिषदेची निवडणूक होणे आवश्यक आहे. कोरोना संकटानंतर या 9 जागांसाठी निवडणूक आयोगाने निवडणूक प्रक्रिया रोखली होती. राज्यातील सद्यस्थितीतील अनिश्चितता संपुष्टात आणण्याच्या उद्देशाने राज्यपालांनी निवडणूक आयोगाला 24 एप्रिलपासून रिक्त असलेल्या विधानपरिषदेतील 9 जागा भरण्याची विनंती केली होती. प्रत्येक सदस्याला जिंकण्यासाठी 29 मते हवी आहेत. आघाडीकडे 173, तर भाजपकडे 115 आमदारांची बेगमी आहे. त्यामुळे आघाडीचे उमेदवार 5 जागी जिंकणार, हे निश्चित आहे. भाजपला तीन जागा सहज जिंकणे शक्य आहे. अपक्षांच्या साथीने चौथी जागाही भाजपकडेच जाण्याची शक्यता आहे.
POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब)
==========================================================================================================
पुस्तक घर पोहोच मिळावा!
मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1000/-रु.मध्ये
CLICK HERE -
==============================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा!
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.
ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा-
=============================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा!
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.
ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा-
============================
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.