Monday 18 May 2020

मुख्यमंत्रिपद कायम; उद्धव ठाकरे यांच्यासह 9 उमेदवारांनी घेतली आमदारकीची शपथ

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विधानपरिषदेच्या सदस्यत्वाची शपथ

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमदारकीची शपथ घेतली आहे. विधीमंडळात हा शपथविधी पार पडला. उद्धव ठाकरे यांच्यासोबत बिनविरोध निवडून आलेल्या इतर आठ उमेदवारांनाही आमदारकीची शपथ घेतली. शपथविधीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात यांच्यासह अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीवरुन राज्य सरकारसमोर मोठा पेच उभा राहिला होता. पण उद्धव ठाकरे यांची विधानपरिषदेवर बिनविरोध निवड झाल्याने महाविकास आघाडीने सुटकेचा निश्वास सोडला होता. विधानपरिषदेच्या नऊ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत अर्ज मागे घेण्याच्या अंतिम मुदतीमध्ये १३ पैकी ४ उमेदवारांनी आपली माघार घेतल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह सर्व नऊ अधिकृत उमेदवारांची बिनविरोध निवड झाल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली होती.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज आमदार बनले आहेत. मुख्यमंत्र्यांसह विधानपरिषदेच्या उर्वरित नवनिर्वाचित आमदारांनी आज सदस्यत्वाची शपथ घेतली. यावेळी त्यांच्यासोबत पत्नी रश्मी ठाकरे या देखील उपस्थित होत्या. विशेष म्हणजे आमदार म्हणून शपथ घेणारे उद्धव ठाकरे हे ठाकरे घराण्यातील दुसरे व्यक्ती ठरले आहेत.  आदित्य ठाकरे हे ठाकरे घराण्यातील पहिले असतील ज्यांनी निवडणूक लढवली. दिवगंत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या राजकीय कारर्किदीत एकदाही निवडणूक लढवली नव्हती. त्यानतर आता उद्धव ठाकरेंची विधानपरिषदेवर बिनविरोध झाली आणि ते सुद्धा आमदार झाले. त्यामुळे ठाकरेंच्या घरात दोन व्यक्ती ते सुद्धा पितापुत्र एकाचवेळी विधीमंडळाचे सदस्य झाल्याने ठाकरे घराण्यात एका वेगळ्या इतिहासाची नोंद झाली आहे. शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीच्या मागणीनुसार विधान परिषदेच्या नऊ रिक्त जागांसाठी लवकरात लवकर निवडणूक घेण्याची विनंती राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी निवडणूक आयोगाला केली होती. म्हणजेच मंत्रिमंडळाने दोनदा शिफारस करूनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधान परिषदेवर नियुक्ती केली जाणार नाही हे राज्यपालांनी स्पष्ट संकेत दिले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे विधिमंडळाच्या उभय सभागृहाचे सदस्य नाहीत. तसेच त्यांची २७ मेपूर्वी निवड होणे आवश्यक असल्याने नऊ रिक्त जागांसाठी लवकरात लवकर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करावा, अशी विनंती राज्यपालांनी निवडणूक आयोगाला केली होती. करोनाच्या संकटकाळात विधान परिषद निवडणूक बिनविरोध व्हावी अशी शिवसेना-राष्ट्रवादीची इच्छा असतानाही काँग्रेसने दुसऱ्या उमेदवाराची घोषणा केल्याने महाविकास आघाडीत राजी-नाराजीचे नाटय़ रंगलं होतं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केल्यानंतर आघाडीच्या नेत्यांची बैठक होऊन काँग्रेसने एकच उमेदवार उभा करण्याचा निर्णय घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला होता. शिवसेनेमधून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि डॉ. नीलम दिवाकरराव गोऱ्हे, राष्ट्रवादी काँग्रेसमधून शशिकांत जयवंतराव शिंदे आणि अमोल रामकृष्ण मिटकरी, काँग्रेसमधून राजेश धोंडीराम राठोड, तर भाजपमधून गोपीचंद कुंडलिक पडळकर, प्रवीण प्रभाकरराव दटके, रणजितसिंह विजयसिंह मोहिते-पाटील आणि रमेश काशिराम कराड यांनी आज आमदारकीची शपथ घेतली आहे. विधान परिषदेच्या सभागृहात हा शपथविधी सोहळा पार पडला. या शपथविधी सोहळ्याला तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते उपस्थितीत होते.

शपथ घेणारे सदस्य

* शिवसेना – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व नीलमताई गोऱ्हे

* भाजप – गोपीचंद पडळकर, प्रवीण दटके, रणजितसिंह मोहिते-पाटील, रमेश कराड

* राष्ट्रवादी – शशिकांत शिंदे, अमोल मिटकरी

* काँग्रेस – राजेश राठोड

राज्यपालांनी केले मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राज भवन येथे सदिच्छा भेट घेतली. मुख्यमंत्री ठाकरे विधानपरिषदेचे सदस्य म्हणून निवडून आल्याबद्दल राज्यपालांनी त्यांचे अभिनंदन केले. यावेळी रश्मी ठाकरे, राजशिष्टाचार व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे व मुख्य सचिव अजोय मेहता हे देखील उपस्थित होते.

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

==========================================================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1000/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
==============================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
=============================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
============================
 

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.