मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आहे ऐवढी संपत्ती
बॉन्ड शेअर्स - 21 कोटी 68 लाख 51 हजार 100
पोस्ट इ. - 3 लाख
दागिने- 23 लाख 20 हजार 736
इतर - 58 लाख 57 हजार 259
एकूण (जंगम) - 24 कोटी 14 लाख 99 हजार 593
एकूण (स्थावर मालमत्ता) - 52 कोटी 44 लाख 57 हजार 984
एकूण संपत्ती (उद्धव ठाकरे) - 76 कोटी 59 लाख 57 हजार 577
उद्धव ठाकरे यांनी प्रोफेशन सर्विस करीत असल्याचे म्हंटले आहे तर उत्पन्नाचे स्तोत्र पगार, व्याज, लाभांश, गुंतवणुकीतून लाभ (कपिटल गेन) हे असल्याचे प्रतिज्ञापत्रात म्हंटले आहे तर पत्नी सौ. रश्मीताई ठाकरे यांचे प्रोफेशन व्यवसायिक असल्याचे म्हंटले आहे तर उत्पन्नाचे स्तोत्र व्याज, भाडे, व्यवसायिक फर्म मधून मिळणारा नफा, लाभांश, गुंतवणुकीतून लाभ (कपिटल गेन) हे असल्याचे प्रतिज्ञापत्रात म्हंटले आहे.
चंद्रकांत भुजबळ
https://imojo.in/1gdby2
==============================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा!
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.
https://imojo.in/coopebook
=============================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा!
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.
https://imojo.in/prabindiaEBook
============================
अशी आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची संपत्ती
बँक ठेवी - 1 कोटी 60 लाख 93 हजार 675बॉन्ड शेअर्स - 21 कोटी 68 लाख 51 हजार 100
पोस्ट इ. - 3 लाख
दागिने- 23 लाख 20 हजार 736
इतर - 58 लाख 57 हजार 259
एकूण (जंगम) - 24 कोटी 14 लाख 99 हजार 593
एकूण (स्थावर मालमत्ता) - 52 कोटी 44 लाख 57 हजार 984
एकूण संपत्ती (उद्धव ठाकरे) - 76 कोटी 59 लाख 57 हजार 577
उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबाची
एकूण जंगम मालमत्ता
61 कोटी 89 लाख 57 हजार 443 इतकी आहे
जंगम मालमत्ता तपशील
|
|||
जंगम मालमत्ता तपशील
|
Self स्वतः
(उद्धव ठाकरे)
|
Spouse
पत्नी (सौ. ठाकरे)
|
HUF
एकत्र कुटुंब
|
रोख
रक्कम
|
76,922
|
89,679
|
39124
|
ठेवी
|
16093675
|
3486559
|
5621439
|
शेअर्स, बाँड इत्यादी
गुंतवणूक
|
216851001
|
337962460
|
2958149
|
पोस्टल
बचत, विमा
इ. गुंतवणूक
|
300000
|
300000
|
0
|
कर्जे
/ आगाऊ रक्कम इ.
|
0
|
666112
|
0
|
मोटार वाहने
|
0
|
0
|
0
|
दागिने
इ. मौल्यवान
वस्तू
|
2320736
|
13520929
|
5348305
|
इतर
कोणत्याही मालमत्ता
|
5857259
|
5617716
|
1847378
|
एकूण
मूल्य
|
241499593
|
361643455
|
15814395
|
स्थावर मालमत्ता व कर्ज/देणे इ. तपशील
|
|||
स्थावर
मालमत्ता तपशील
|
Self स्वतः
|
Spouse
|
HUF एकत्र कुटुंब
|
अचल मालमत्ता एकूण मुल्य
|
241499593
|
361643455
|
15814395
|
स्वत:ची प्राप्त स्थावर मालमत्ता
|
101656600
|
129954210
|
0
|
खरेदीनंतर विकसन बांधकाम खर्च/गुंतवणूक
|
107483012
|
70095645
|
0
|
स्व-अधिग्रहण केलेली मालमत्ता (एकूण बाजार मूल्य)
|
379372262
|
289259336
|
0
|
वारसा मालमत्ता (एकूण मूल्य)
|
145085722
|
0
|
0
|
देणे/कर्ज इ. उत्तरदायित्व
|
40603624
|
114433109
|
0
|
उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबाची एकूण जंगम मालमत्ता 61 कोटी 89 लाख 57 हजार 443 इतकी दर्शविण्यात आहे.
उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबाची एकूण स्थावर मालमत्ता 82 कोटी 95 लाख 531 हजार 715 इतकी दर्शविण्यात आहे.
ठाकरे यांच्या कुटुंबाची एकूण जंगम व स्थावर मालमत्ता 144 कोटी 84 लाख 89 हजार 158 इतकी प्रतिज्ञापत्रात दर्शविण्यात आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात महत्वपूर्ण भुमिका बजावणाऱ्या शिवसेना पक्षाचे प्रमुख ठाकरे घराण्यातील कुणीही व्यक्ती गेल्या ५० वर्षांत प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरली नव्हती. या परंपरेला छेद देत शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे नातू, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे चिरंजीव पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी वरळी मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक २०१९ लढवली त्यावेळी प्रथमच ठाकरे घराण्यातील एका व्यक्तीच्या संपत्तीची माहिती सार्वजनिक झाली होती. उमेदवारी अर्जासोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार आदित्य ठाकरेंची 11 कोटी 38 लाख रुपयांची संपत्ती प्रथमच जाहीर केलेली आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळाले नाही आणि भाजप व शिवसेनेने फारकत घेतल्याने राज्यात महाविकास आघाडी स्थापन होऊन अनपेक्षितपणे मुख्यमंत्रीपद शिवसेना पक्षाचे कार्याध्यक्ष व प्रमुख उद्धव ठाकरें यांच्याकडे आले. ६ महिन्यांच्या आत विधिमंडळ सदस्य होण्यासाठी विधानपरिषद निवडणूक लढवीत असून त्याकरिता त्यांनी उमेदवारी अर्जासोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार संपत्तीचा तपशील जाहीर केलेला आहे.निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रश्मी ठाकरे यांच्याकडून कंपन्यांच्या संचालकपदाचे राजीनामे
उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रश्मी ठाकरे यांच्याकडून 3 कंपन्याचे संचालकपद सोडले आहे तर आदित्य ठाकरे यांनी देखील 2 कंपन्यांचे संचालकपद सोडले आहे. निवडणूक प्रतिज्ञापत्रात उमेदवार व अवलंबून असणाऱ्या कुटुंब सदस्यांची गुंतवणूक व संपत्ती विषयक माहिती द्यावी लागते. किती व कोणती संपत्ती दाखवावी आणि कशाप्रकारे दाखवावी म्हणून चार्टड अकाऊंट याविषयी सल्ला देत असतात किंबहुना तेच स्वतः अशा कंपन्यांचे संचालक होतात व संबंधिताचा राजीनामा दर्शवतात जेणेकरून त्या कंपन्यांचे हितसंबंध, गुंतवणूक जाहीर करणे टाळता येऊ शकते. अगदी असेच काही निवडणूक प्रतिज्ञापत्रात ठाकरे परिवाराने देखील इतर राजकीय नेत्यांचा आदर्श घेण्याचा प्रयत्न केला आहे. रश्मी ठाकरे यांनी 3 कंपन्याच्या संचालक पदाचा राजीनामा अनुक्रमे दिनांक 28 मार्च 2020, 31 मार्च 2020, 31 मार्च 2020 रोजी दिलेला आहे. तर गुंतागुंत नको म्हणून कि काय पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील 2 कंपन्याच्या संचालक पदाचा राजीनामे दिनांक 31 मार्च 2020 रोजी दिलेला असल्याचे कंपनी रजिस्टर कार्यालयातील नोंदीवरून दिसून येते. शिवसेनेचे मुखपत्र सामना या वृत्तपत्राच्या मुख्य संपादिका असून प्रबोधन प्रकाशन प्रा.लि. या कंपनीची मालकी आहे सद्यस्थितीत प्रबोधन प्रकाशन प्रा.लि. या कंपनीचे शेअर्स रश्मी ठाकरे यांच्याकडे 2 लाख 45 हजार इतके शेअर्स आहेत. संचालक मात्र इतर राजकीय नेतेमंडळीं सारखे नोकरदार अथवा अन्य आहेत. फुलोरा प्रिंटर्स या भागीदारी फर्म मध्ये 7 लाख ७० हजार 628 येणे दर्शवलेले आहे या फर्म मध्ये काही वर्षापूर्वी व्यवस्थापक राहिलेली व्यक्ती आता प्रबोधन प्रकाशन कंपनीचे संचालक असल्याची देखील माहिती व्यक्त केली जात आहे. साधारण काही दिवसांपूर्वी ठाकरे कुटुंब संचालक असलेल्या 13 कंपन्या होत्या त्यातील काही दिवसांपूर्वी 2 बंद केल्या तर उर्वरित सुरु आहेत या ११ कंपन्यामध्ये उद्धव ठाकरे तर काही कंपन्यांमध्ये इतर सदस्य रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे व तेजस ठाकरे संचालक होते. काळाच्या ओघात आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बहुतांश कंपन्याचे संचालक पद कागदोपत्री तरी सोडावे लागले आहे. ठाकरे कुटुंबातील कोणत्याही सदस्यांनी निवडणूक यापूर्वी लढवली नसल्याने त्यांच्या संपत्ती व आर्थिक हितसंबंध कायदेशीरदृष्ट्या सामान्यांना स्पष्ट होत नव्हते व ते जाणून घेण्यात अडसर होता तो आता काही प्रमाणात का होईना नाहीसा झालेला आहे. राज्यातील जनतेला ठाकरे कुटुंबाची संपत्तीबाबत उत्सुकता होती ती तपशीलवार आता जाणून घेण्यात येत आहे. राजकीय हितसंबंधा बरोबर आर्थिकदृष्ट्या हितसंबंध देखील या निवडणुकीच्या निमित्ताने उघड झालेलं आहेत. दरम्यान रश्मी ठाकरे यांची 4 LLP (एलएलपी) कंपन्यांमध्ये गुंतवणूक असून या कंपन्यांमध्ये COMO STOCKS & PROPERTIES LLP (संचालक- दिनांक 20/03/2014 पासून 28/03/2020 पर्यंत)., HIBISCUS FOOD LLP(संचालक- दिनांक 14/07/2015 पासून 31/03/2020 पर्यंत)., ELIORA SOLAR LLP (संचालक- दिनांक 26/04/2016 पासून 31/03/2020 पर्यंत)., SAMVED REAL ESTATE LLP. यांचा समावेश आहे. तर प्रायव्हेट कंपनी SAHYOG DEALERS PRIVATE LIMITED च देखील शेअर्स गुंतवणुकीत समावेश आहे. सद्यस्थितीत रश्मी ठाकरे SAMVED REAL ESTATE LLP (दिनांक 25/07/2019 पासून) आणि SAHYOG DEALERS PRIVATE LIMITED (दिनांक 05/11/2003 पासून) या कंपन्यांच्या संचालक म्हणून कार्यरत आहेत. तर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर COMO STOCKS & PROPERTIES LLP., HIBISCUS FOOD LLP., ELIORA SOLAR LLP., SAMVED REAL ESTATE LLP. या तीन कंपन्यांच्या संचालक पदाचा राजीनामा मार्च महिन्यात दिलेला आहे. दरम्यान रश्मी ठाकरे यांची COMO STOCKS & PROPERTIES LLP आणि SAHYOG DEALERS PRIVATE LIMITED या कंपन्यांची शेअर्स गुंतवणुकीची माहिती उद्धव ठाकरे यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात दिसून येत नाही.
उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी दिलेल्या HUF एचयुएफ (हिंदू एकत्रित कुटुंब) शेअर्स गुंतवणुकीतील तपशिलात तफावत
उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी दिलेल्या HUF एचयुएफ एकत्रित कुटुंब शेअर्स गुंतवणुकीतील तपशिलात तफावत असल्याचे आढळून आले आहे. एकूण 5 कंपन्यांचे शेअर मध्ये गुंतवणूक केली आहे त्यामध्ये Bctala Global Securities Ltd., Mis. Bio Green Paper Limited.,Mis. GTL Limited., Mis. Meuse Kara & Sungrace Mafatlal Ltd.,Maruli Suzuki India Lid. ( Maruti Udyog )., यांचा समावेश आहे. एकत्रित कुटुंब शेअर्स गुंतवणुकीचा तपशील देण्यात आलेला आहे त्यामध्ये 1 लाख 89 हजार 947 इतके शेअर्स असून उद्धव ठाकरे यांनी या शेअर्सचे चालू मुल्य 29 लाख 58 हजार 149 इतके दर्शवले असून आदित्य ठाकरे यांनी सहा महिन्यांपूर्वी या शेअर्सचे चालू मुल्य 37 लाख 72 हजार 090 इतके दर्शवले आहे. एकत्रित कुटुंब शेअर्स गुंतवणुकीतील तपशिलात शेअर्स संख्येत तफावत नसून शेअर्समध्ये गुंतवणूक कधी केली या तपशिलामध्ये तफावत आढळून येत आहे. उद्धव ठाकरे यांच्या म्हणण्यानुसार Bctala Global Securities Ltd या कंपनीमध्ये शेअर्स गुंतवणूक 07.07.2002 रोजी केली आहे तर आदित्य ठाकरे यांच्या म्हणण्यानुसार सन 2001 पूर्वी शेअर्स गुंतवणूक केली आहे. तसेच उद्धव ठाकरे यांच्या म्हणण्यानुसार Mis. Meuse Kara & Sungrace Mafatlal Ltd. या कंपनीमध्ये शेअर्स गुंतवणूक 11.03.2011 रोजी केली आहे तर आदित्य ठाकरे यांच्या म्हणण्यानुसार दिनांक 21.12.2006 रोजी शेअर्स गुंतवणूक केली आहे. यामध्ये 5 वर्षांची तारखेतील तफावत दिसून येत आहे. तर Mis. GTL Limited. या कंपनीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या म्हणण्यानुसार दिनांक 30.07.2007 रोजी गुंतवणूक केली आहे तर आदित्य ठाकरे यांच्या म्हणण्यानुसार दिनांक 30.07.2003 रोजी शेअर्स गुंतवणूक केली आहे. यामध्ये सुमारे 4 वर्षांची तारखेतील तफावत दिसून येत आहे. तर Maruli Suzuki India Lid. ( Maruti Udyog ) या कंपनीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या म्हणण्यानुसार दिनांक 23.06.2003 रोजी गुंतवणूक केली आहे तर आदित्य ठाकरे यांच्या म्हणण्यानुसार दिनांक 14.07.2003 रोजी शेअर्स गुंतवणूक केली आहे. यामध्ये देखील तफावत दिसून येत आहे.
आदित्य ठाकरे यांनी LLP (एलएलपी) कंपन्यांमधील गुंतवणूक उघड केली नाही
आदित्य ठाकरे यांनी LLP (एलएलपी) कंपन्यांमधील गुंतवणूक उघड केली नसल्याची दाखल प्रतिज्ञापत्रा वरून दिसून आले. आदित्य ठाकरे COMO STOCKS & PROPERTIES LLP., HIBISCUS FOOD LLP., ELIORA SOLAR LLP., ASHAR PROJECTS DM LLP. या चार कंपन्याचे संचालक होते. निवडणूक आयोगाला दिनांक 3 ऑक्टोबर 2019 रोजी दिलेल्या प्रतिज्ञापत्रात संचालक पद असल्याची माहिती देखील त्यांनी उघड केली नव्हती. अनुक्रमे कंपन्यानुसार दिनांक 20/03/2014, दिनांक 14/07/2015, दिनांक 26/04/2016, दिनांक 29/03/2019 रोजी त्यांनी उपरोक्त 4 कंपन्याचे भागीदार म्हणून संचालक पद स्वीकारले होते. HIBISCUS FOOD LLP., ELIORA SOLAR LLP या कंपन्यांची येणे गुंतवणूक रक्कम मात्र दर्शवलेली होती. तथापि या दोन्ही कंपन्यांच्या संचालक पदाचा राजीनामा 31/03/2020 रोजी दिलेला आहे. COMO STOCKS & PROPERTIES LLP आणि ASHAR PROJECTS DM LLP या दोन्ही कंपन्यांच्या संचालक पदाचा राजीनामा अनुक्रमे दिनांक 03/09/2019 व दिनांक 15/07/2019 रोजी दिलेला असल्याचे कंपनी रजिस्टर कार्यालयातील नोंदीवरून दिसून येत आहे. मात्र या 2 कंपन्यांमधील गुंतवणूक प्रतिज्ञापत्रात उघड केली नसल्याची आढळून येत आहे. एलएलपी कंपन्यां म्हणजे limited liability partnership (LLP) is a partnership in which some or all partners मर्यादित दायित्व भागीदारी (एलएलपी) एक भागीदारी असते ज्यात काही किंवा सर्व भागीदार (कार्यक्षेत्रानुसार) मर्यादित दायित्वे असतात. यामुळे भागीदारी आणि कंपन्यांचे घटक प्रदर्शित होऊ शकतात. एलएलपीमध्ये, प्रत्येक पार्टनर दुसर्या पार्टनरच्या गैरवर्तन किंवा दुर्लक्षासाठी जबाबदार किंवा जबाबदारी नसते.
उद्धव ठाकरे यांचे उत्पन्न कमी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा मिसेस मुख्यमंत्र्यांचे उत्पन्न दुप्पट असल्याचे दिसून येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लिस्टेड सेबी नोंदणीकृत कंपन्यांचे शेअर मध्ये गुंतवणूक केली आहे अशा शेअर घेतलेल्या कंपन्यांमध्ये Ambalal Sarabhai Enterprise Ltd, Bio Green Paper Ltd., HCL Technologies Ltd., Mahanagar Telephone Nigam., Meuse Kara & Swigrace Mafatlal Ltd आणि रिलायन्स ग्रुपमधील Reliance Capital, Communication, Industries, Infarastructurc, Power, व Reliance Home Finance या कंपन्यांचा समावेश आहे. तर प्रायव्हेट अनलिस्टेड सेबीमध्ये अनोंदणीकृत कंपन्यांचे शेअर मध्ये गुंतवणूक केली आहे अशा भागधारक असलेल्या कंपन्यांमध्ये Classic Cicy Jnfopadc Pvt Ltd.., Classic City lnfopadc Pvt Ltd., Rabul Executive I nfratech Pvt. Ltd. यांचा समावेश आहे. तर भवानी सहकारी बँकेचे देखील शेअर असल्याचे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात नमूद केलेले आहे. तर रश्मी ठाकरे यांनी लिस्टेड सेबी नोंदणीकृत कंपन्यांचे शेअर मध्ये गुंतवणूक केली आहे अशा ३८ कंपन्यांचा गुंतवणूक तपशील यादी दिलेली आहे त्यामध्ये 31 कंपन्यांचा समवेश आहे. तर प्रायव्हेट अनलिस्टेड सेबीमध्ये अनोंदणीकृत कंपन्यांचे शेअर मध्ये गुंतवणूक केली आहे अशा भागधारक असलेल्या कंपन्यांमध्ये Almighty Freight Station Private Limited., Classic City lnfopark Pvt. Ltd.., Prabodhan Prakashan Private Limited., Rahul Executive lnfratech Pvt. Ltd. यांचा समावेश आहे. २ लाख ८६ हजार ८०७ शेअर्सची संख्या प्रतिज्ञापत्रात नमूद केलेले आहे. तसेच आदित्य ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात 13 कंपन्यामध्ये शेअर्स खरेदी केली असून त्याचे सद्यस्थितीत मुल्य 18 लाख 14 हजार 986 इतके नमूद केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी वेगवेगळ्या कंपनीच्या शेअरमध्ये केलेल्या गुंतवणुकीमधील ९० टक्के गुंतवणूक टॉपच्या पाच कंपन्यांमध्ये केली आहे. विधानपरिषद निवडणुकीसाठी ठाकरे यांनी दाखल केलेल्या अर्जासोबतच्या प्रतिज्ञापत्रातून ही बाब समोर आली आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी केलेल्या गुंतवणुकीत एचसीएल टेक्नालॉजी या कंपनीत सर्वाधिक गुंतवणूक आहे. या शिवाय रिलायन्स इंडस्ट्रीज, मारूती सुझुकी इंडिया, बिर्ला कार्पोरेशन, एचसीएल टेक्नालॉजी व कोटक महिंद्रा या कंपन्यांचा यात समावेश आहे. शेअर बाजाराचा विचार करता या सर्व पाच कंपन्यांचे शेअर सध्या टॉपला असून या कंपन्यांची शेअर बाजारातील कामगिरी गेल्या काही महिन्यात सातत्याने वाढलेली आहे. कंपन्यांमध्ये केलेली गुंतवणूक नेहमीच फायद्यात राहत नाही. बऱ्याचवेळा त्यात नुकसान होण्याचीच शक्यता अधिक असते. मात्र, मुख्यमंत्री ठाकरे यांचा गुंतवणुकीतील पोर्टफोलिओ पाहता त्यांची संपूर्ण गुंतवणूक स्मार्ट ठरलेली आहे. ठाकरे यांनी शेअरमध्ये केलेल्या एकून गुंतवणुकीपैकी ६६.१ टक्के गुंतवणूक एचसीएल टेक्नालॉजी या कंपनीत आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये गुंतवणुकीपैकी १४ टक्के, मारूती सुझुकी इंडिया कंपनीच्या शेअरमध्ये ९.३ टक्के, बिर्ला कार्पोरेशन १.५ टक्के व कोटक महिंद्रा कंपनीत १.४ टक्के शेअर गुंतवणूक केलेली आहे. ठाकरे कुटुंबाच्या संपत्तीबद्दल साऱ्या महाराष्ट्राला नेहमीच कुतूहल असते. ठाकरे कुटुंबातील कुणीही कधी निवडणूक लढविली नव्हती. निवडणुकीतील प्रतिज्ञापत्राच्या माध्यमातून नेमकी माहिती बाहेर येण्याची संधी असते. मात्र, ठाकरे निवडणूक लढवत नव्हते, त्यामुळे त्यांच्याबाबत ही शक्यता नव्हती. सहा महिन्यापूर्वी परिस्थिती बदलली. मुख्यमंत्री ठाकरे यांचे चिरंजीव अदित्य ठाकरे यांनी पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढविल्याने त्यांच्या नावावर असलेल्या संपत्तीची माहिती समोर आली. विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने मुख्यमंत्री ठाकरे यांची संपत्तीची माहिती समजली आहे. त्यांच्या चल-अचल संपत्तीची माहिती प्रतिज्ञापत्रात स्पष्ट करण्यात आली. त्यातील शेअरमधील गुंतवणुकीत वरील पाच कंपन्यांमधील त्यांची गुंतवणूक स्मार्ट गुंतवणूक ठरली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबाची एकूण संपत्ती 184 कोटी रुपयांची आहे. उद्धव यांच्याकडे 97 कोटी आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याकडे 85 कोटी रुपयांची मालमत्ता आहे. वांद्रे येथील मातोश्री निवासस्थानाची 50 टक्के मालकी उद्धव ठाकरे आणि 50 टक्के मालकी रश्मी ठाकरे यांची आहे. जवळील एका बंगल्याची 75 टक्के मालकी उद्धव ठाकरे यांच्याकडे आहे. रायगड जिल्ह्यातील खालापूर येथील शेतजमीन आणि अकोले येथील भूखंडाचा त्यांच्या मालमत्तांमध्ये समावेश आहे. उद्धव ठाकरे यांची चल-अचल मिळून 97 कोटी 50 लाखांची संपत्ती आहे. रश्मी ठाकरे यांची 85 कोटी नऊ लाख रुपयांची संपत्ती आहे. हिंदू अविभक्त कुटुंब म्हणून त्यांच्याकडे एक कोटी 58 लाखांची संपत्ती आहे. वेतन, व्याज, लाभांश आणि भांडवली उत्पन्न असे उत्पन्नाचे स्रोत असल्याची माहिती उद्धव ठाकरे यांच्या प्रतिज्ञापत्रात आहे. उद्धव ठाकरे यांच्यावर चार कोटी सहा लाखांचे; तर रश्मी ठाकरे यांच्यावर 11 कोटी 44 लाखांचे कर्ज आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध मुंबईतील विविध पोलिस ठाण्यात एकूण 23 तक्रारी असून ज्यामधील 12 रद्द झाल्या असून बाकीच्या खासगी तक्रारी आहेत. केवळ एकच प्रकरण सध्या त्यांच्या नावावर आहे. नारायण राणे यांनी शिवसेना सोडल्यानंतर सामना कार्यालयाबाहेर राडा झाला होता. आजही त्याची नोंद ठाकरेंच्या नावावर आहे. उद्धव ठाकरे यांनी प्रतिज्ञापत्रात आपण नोकरी करत असून पत्नी रश्मी व्यवसाय करीत असल्याचे म्हटले आहे. विविध कंपन्यांचे समभाग, विविध कंपन्यांमध्ये भागीदारी आणि त्यांचे डिव्हिडंड असे ठाकरे यांच्या उत्पन्नाचे विविध स्रोत आहेत. इतके जरी असले तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याप्रमाणे उद्धव ठाकरे यांच्याकडे स्वतःच्या मालकीचे एकही वाहन नाही. उद्धव ठाकरे यांनी प्रतिज्ञापत्रात आपण नोकरी करत असून पत्नी रश्मी व्यवसाय करीत असल्याचे म्हटले आहे. विविध कंपन्यांचे समभाग, विविध कंपन्यांमध्ये भागीदारी आणि त्यांचे डिव्हिडंड असे ठाकरे यांच्या उत्पन्नाचे विविध स्रोत आहेत. उद्धव ठाकरे यांच्यावर एचडीएफसी बँकेचे ४ लाखांचे कर्ज आहे. रश्मी यांच्यावर सारस्वत बँकेचे ८ लाखांचे कर्ज आहे. दोघांकडेही मुंबईत दोन बंगले, एक फार्म हाऊस, ठाणे येथे दुकाने नावावर असून विविध कंपन्यांच्या शेअर्सवर मिळणारा डिव्हिडंड हे उत्पन्नाचे स्रोत असल्याचे उद्धव ठाकरे यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. रोख रकमेच्या बाबतीत मात्र मुख्यमंत्र्यांच्या तुलनेत रश्मी यांच्याकडे अधिक पैसे (कॅश इन हँड) आहेत. खालापूर येथे उद्धव यांच्या नावावर शेतजमिनीची किंमत ९५,००० रुपये आहे. रश्मी ठाकरे यांच्या नावावर कर्जतमधील जमिनीची किंमत ६,४७,६७,६३५ रुपये आहे. अकोले येथे उद्धव ठाकरे यांच्या नावावर गैरशेती जमीन असून त्याची किंमत १३,६४,९४,८४६ रुपये आहे. रश्मी ठाकरे यांच्या नावावर ठाणे येथे एक दुकान असून त्याची किंमत ३,१५,,६४,१८५ रुपये आहे. कलानगर, वांद्रे पूर्व येथे मातोश्री आणि मातोश्रीच्या समोरच असलेला मातोश्री २ हे बंगले आहेत. उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे या दोन्ही बंगल्यांचे ५० आणि ७५ टक्क्यांचे मालक आहेत. बाजारभावाप्रमाणे या बंगल्यांची किंमत ८१ कोटी ३७ लाख १७,३२० रुपये आहे. दरम्यान आदित्य ठाकरेंनी वरळी विधानसभा निवडणुकीत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्याकडे एकूण ११ कोटी ३८ लाखांची संपत्ती आहे. यामध्ये १० कोटी ३६ लाखांच्या बँक ठेवींचा समावेश आहे. आदित्य यांच्याकडे ६४ लाख ६५ हजार रुपयांचे दागिने आणि २० लाख ३९ हजार रुपयांचे बॉन्ड्स आहेत. याशिवाय आदित्य यांच्याकडे एक बीएमडब्ल्यू कारदेखील आहे. या कारची किंमत ६ लाख ५० हजार असल्याची माहिती आदित्य यांनी प्रतिज्ञापत्रात दिली आहे.
आदित्य ठाकरेंच्या नावे 11 कोटी 38 लाखांची संपत्ती केली होती जाहीर
उमेदवारी अर्जासोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार आदित्य ठाकरेंची 11 कोटी 38 लाख रुपयांची संपत्ती प्रथमच जाहीर केली होती. त्यामध्ये त्यांनी आपल्या संपत्तीचे तपशील दिले होते. आदित्य ठाकरेंच्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्याकडे स्थावर आणि जंगम मिळून 16 कोटी रुपयांची संपत्ती आहे. आदित्य यांची जंगम मालमत्ता 11 कोटी 38 लाख रुपयांची संपत्ती आहे. तर शेती आणि गाळे मिळून स्थावर मालमत्तेची किंमत 4 कोटी 67 लाख रुपयांची आहे. आदित्य ठाकरे यांच्याकडे 13 हजार 344 रुपये रोख रक्कम आहे. आदित्य ठाकरेंच्या बँकांमधील वेगवेगळ्या ठेवींची किंमत 10 कोटी 36 लाख इतकी आहे. आदित्य ठाकरेंकडे जवळपास 64 लाख रुपयांचे दागिने आणि मौल्यवान वस्तू आहेत. आदित्य ठाकरेंच्या मालकीची एक BMW कारही आहे. या गाडीची बाजारभावाने किंमत साडे सहा लाख रुपये आहे. आदित्य ठाकरे यांच्याकडे 2010 चं मॉडेल असलेली एक बीएमडब्ल्यू कंपनीची आलिशान कार आहे. या गाडीचं पासिंग कोल्हापूरचं (MH -09) आहे. बँकेत दहा कोटींपेक्षा अधिक ठेवी असून 64 लाखांचे दागिने आहेत. याशिवाय दोन व्यावसायिक प्रॉपर्टी, शेत जमिनीचा प्लॉट अशी मालमत्ता आहे. आदित्य ठाकरे यांच्याविरोधात एकाही गुन्ह्याची नोंद नाही. आदित्य ठाकरेंची मालमत्ता आणि किंमत- बँक ठेवी – 10 काेटी 36 लाख रुपये, बॉन्ड शेअर्स– 20 लाख 39 हजार रुपये, वाहन – BMW कार (MH -09 CB -1234) 2010 – किंमत अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये, दागिने– 64 लाख 65 हजार, इतर – 10 लाख 22 हजार, एकूण – 11 काेटी 38 लाख, दोन व्यावसायिक प्रॉपर्टी – अंदाजे साडेतीन कोटी रुपये, कर्जत खालापूरला एक शेतजमिनीचा प्लॉट – अंदाजे 44 लाख रुपये अशी आहे.यापूर्वी (विधान परिषद निवडणुक 2020) अनुषंगिक वृत्त प्रसिद्ध झालेले ब्लॉग खालीलप्रमाणे -
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे अर्ज दाखल; 9 जागांसाठी 14 उमेदवारांचे अर्ज दाखल
9 जागांसाठी 10 उमेदवार; उमेदवार मागे घेण्यासाठी काँग्रेसवर दबाव; ...तर निवडणुक न लढवण्याचा मुख्यमंत्र्यांचा गर्भित इशारा
-विधान परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे उमेदवार जाहीर
विधानपरिषदेसाठी भाजपकडून मार्च मध्येच उमेदवारांची नावे निश्चित! चारही उमेदवारांचे अर्ज दाखल; असंतुष्टांमध्ये खदखद
राज्यपालांच्या निर्णयाच्या दिरंगाईवर महाविकास आघाडीची चाल!
http://prabindia.blogspot.com/2020/04/blog-post_28.html
http://prabindia.blogspot.com/2020/04/blog-post_28.html
'या' कारणामुळे मुख्यमंत्र्यांच्या सदस्य नियुक्तीची शिफारस प्रलंबित!
मुख्यमंत्र्यांना विधान परिषदेवर नियुक्त करण्याच्या शिफारशीला हायकोर्टात आव्हान देणारी याचिका फेटाळली
रिक्त जागांवर दुसऱ्यांदा केलेली शिफारस राज्यपाल मान्य करणार काय? मुख्यमंत्रीपदाचा निर्णय राज्यपालांच्या हाती!
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विधानपरिषदेच्या निवडणुका अनिश्चित काळासाठी स्थगित
कोरोनामुळे महाविकास आघाडीचे भवितव्य टांगणीला! ; उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाची 28 मे 2020 डेडलाईन
POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब)
==========================================================================================================
पुस्तक घर पोहोच मिळावा!
मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1000/-रु.मध्ये
CLICK HERE -
==============================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा!
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.
ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा-
=============================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा!
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.
ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा-
============================
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.