Wednesday 13 May 2020

उमेदवाराची स्टॅम्प पेपर खरेदी मार्च महिन्यातीलच

भाजप उमेदवाराची स्टॅम्प पेपर खरेदी मार्च महिन्यातीलच!

विधानपरिषदेत तिकिट नाकारल्यामुळे नाराज झालेले माजी मंत्री एकनाथराव खडसे हे दोन दिवसांपासून पक्षाच्या भूमिकेवर जोरदार टीकास्त्र सोडत आहेत. या पार्श्वभूमिवर, आज झी न्यूज टिव्हीला दिलेल्या विशेष मुलाखतीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खडसे यांना प्रत्युत्तर देत या प्रकरणी पक्षाची भूमिका स्पष्ट करताना त्यांच्या आरोपांचे खंडन केले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आरोपांचे खंडन करताना म्हंटले की, स्टॅम्प पेपर वरील दिनांक मार्च महिन्यातील आहे म्हणून मार्च महिन्यात उमेदवारी निश्चित झाल्याचा कोणी जावई शोध लावला हे मला माहित नाही. संबंधित स्टॅम्प पेपर वरील दिनांक स्टॅम्प व्हेंडर कोषागारमधून घेतो ती असते असा खुलासा केला मात्र उमेदवाराने स्टॅम्प व्हेंडर कडून स्टॅम्प पेपर खरेदी केल्याची दिनांक वेगळी आहे व ती उमेदवाराने घेतल्याचीतारीख व कारण स्पष्ट त्यावर लिहिले असल्याच्या वास्तव्य स्वीकारले नाही. दिशाभूलकारक खुलासा त्यांनी केल्याचे दिसून आले. माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी म्हंटले होते कि, पक्षाच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत ज्यांच्या नावाची साधी चर्चाही झाली नाही, अशा लोकांना उमेदवारी देण्यात आली. आमची नावं फायनल होऊनही आमचा पत्ता कापण्यात आला. ज्यांना तिकीट देण्यात आले त्यांनी रात्रभरात उमेदवारी अर्जासोबत लागणारी कागदपत्रं आली कशी? त्यांच्या प्रतिज्ञापत्रावर मार्च महिन्याच्या तारखा आल्या कशा? याचा अर्थ त्यांना उमेदवारी मिळणार हे मार्चमध्येच निश्चित झाले होते. आम्हाला मात्र मूर्ख बनवून आमची फसवणूक करण्यात आली, असेही ते म्हणाले होते. 

करोना संपल्यावर काँग्रेसमध्ये भूकंप होणार; चंद्रकांत पाटील यांचा गौप्यस्फोट

सध्या राज्यावर करोनाचं सावट आहे. मात्र करोनाचं संकट संपल्यानंतर काँग्रेसमध्ये भूकंप होणार असल्याचा गौप्यस्फोट भाजपा नेते आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. विविध वृत्तवाहिनीवर मुलाखतीमध्ये हा दावा केला आहे. करोनाचे संकट संपल्यानंतर देशामध्ये तसेच राज्यातही काँग्रेसमध्ये अनेक भूकंप होणार असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला. करोना संकट संपल्यानंतर देशात तीन तर महाराष्ट्रात असंख्य भूकंप होणार आहेत, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. यावेळी त्यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्यावरही टीका केली. वृत्तवाहिनीशी संवाद साधताना चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप येणार असल्याचा दावा केला. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी भाजप नेते एकनाथ खडसे यांना विधानपरिषदेची ऑफर दिली होती आणि खडसेंसाठी भाजपचे सात आमदार क्रॉस व्होटिंग करायला तयार होते, यात कितपत तथ्य आहे? असा सवाल पाटील यांना करण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना पाटील यांनी हा गौप्यस्फोट केला. करोनाचं संकट जाऊ द्या. त्यानंतर पाहा काँग्रेसमध्येच मोठा भूकंप होणार आहे. थोरात तुम्ही काय खडसेंचं घेऊन बसलात? महाराष्ट्र काँग्रेसमध्येच असंख्य भूकंप येणार आहेत. देशपातळीवर तीन भूकंप होणार आहेत. काँग्रेसचे दोन तरूण नेते आणि एक ज्येष्ठ नेता भाजपमध्ये यायला तयार आहे, असं पाटील म्हणाले. काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप होणार असल्याची थोरात यांनाही कुणकुण असल्याचा दावाही त्यांनी केला. दरम्यान नाथाभाऊ हे भाजपचे ज्येष्ठ नेते असून पक्ष वाढीत त्यांचा मोलाचा वाटा असला तरी पक्षाने त्यांना आजवर बरेच काही दिले असून त्यांनी नाराज होण्याचे कोणतेही कारण नसल्याचे वक्तव्य करत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यावरून पक्षाची अधिकृत भूमिका जाहीर केली आहे. विधानपरिषदेसाठी अनेक जण स्पर्धेत होते. खरं तर जागा चार असल्या तरी ४० जण स्पर्धेत होते. यामुळे पक्षासाठी काम करणार्यांना तिकिट देण्याचे धोरण श्रेष्ठींनी अंमलात आणले असून यानुसारच उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. एकनाथराव खडसे अथवा पंकजा मुंडे यांनी या प्रकरणी नाराज होण्याचे काहीही कारण नसल्याची पुस्ती देखील त्यांनी जोडली. दरम्यान भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी वृत्तवाहिन्यांवर केलेल्या वक्तव्यावर भाष्य करताना म्हंटले आहे कि, अनेक वेळा उमेदवारी दिली म्हणजे काही उपकार केले नाही तो आमचा हक्क व अधिकार व निवडून येण्याची क्षमता होती असे म्हंटले आहे.  

यापूर्वी अनुषंगिक वृत्त प्रसिद्ध झालेले ब्लॉग खालीलप्रमाणे -

पक्षांतर्गत विरोधामुळे भाजपकडून घुमजाव विधान परिषदेचा उमेदवार बदलला; भाजप पाठोपाठ काँग्रेस पक्षातही नाराजी
विधानपरिषदेसाठी भाजपकडून मार्च मध्येच उमेदवारांची नावे निश्चित! चारही उमेदवारांचे अर्ज दाखल; असंतुष्टांमध्ये खदखद

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

==========================================================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1000/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
==============================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
=============================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
============================
 

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.