Tuesday 27 February 2024

SANMITRA SAHAKARI BANK CO OP ELECTION 2024- सन्मित्र सहकारी बँक निवडणुकीत एकहाती पुन्हा सत्ता; सभासदांच्या विश्वासाचा विजय - मा.बाळासाहेब शिवरकर

सन्मित्र प्रगती पॅनलचे निर्विवाद वर्चस्व; सर्वच उमेदवार विजयी


सन्मित्र सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची सन 2024-2029 करीता पंचवार्षिक निवडणूकीत पुन्हा सत्ताधारी संचालकांचे सन्मित्र प्रगती पॅनलने निर्विवाद वर्चस्व मिळवले असून सर्वच उमेदवार भरघोस मताने विजयी झाले आहेत. यामध्ये विद्यमान चेअरमन सुनिल गायकवाड यांचा देखील समावेश आहे. दरम्यान सन्मित्र सहकारी बँकेच्या निवडणुकीत माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर आणि माजी आमदार जगन्नाथ शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखालील सन्मित्र प्रगती पॅनलने दणदणीत विजय मिळवला आहे. सभासदांनी दाखवलेल्या विश्वासाचा हा विजय असल्याची प्रतिक्रिया बाळासाहेब शिवरकर यांनी व्यक्त केली.

सन्मित्र सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी रविवारी 25 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 9 ते 5 या वेळेत 11 मतदान केंद्रावर मतदान झाले होते. 13 हजार 640 मतदारांपैकी झालेल्या मतदानात सर्वाधिक मते सन्मित्र प्रगती पॅनलच्या उमेदवारांना प्राप्त झाली. सन्मित्र सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या एकूण 17 जागांवर सन्मित्र प्रगती पॅनलने निर्विवाद वर्चस्व मिळवले आहे. बँकेच्या चेअरमन पदावर पुन्हा प्रबळ दावेदारी विद्यमान चेअरमन सुनिल गायकवाड यांची असल्याने अन्य संचालकांना चेअरमन पदाची संधी देतील का याबाबत माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. 
 
सन्मित्र सहकारी बँकेच्या निवडणुकीत माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर आणि माजी आमदार जगन्नाथ शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखालील सन्मित्र प्रगती पॅनलने निर्विवाद वर्चस्व स्थापन केले. या पॅनलचे सर्व १७ उमेदवार विजयी झाले आहेत. सोमवारी महर्षी नगर कटारे हायस्कूल येथे मतमोजणी पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक दिगंबर हौसारे यांनी कामकाज पाहिले.

सन्मित्र प्रगतीचे विजयी झालेले उमेदवार व कंसात मिळालेली मते सर्वसाधारण मतदारसंघातून विजय रामचंद्र कोद्रे -(३३१९), हेमंत दामोदर गाढवे -(३२४१), सुनील रामचंद्र गायकवाड -(३२७४), योगेश जयसिंग गोंधळे-(३३०९), दिलीप रामदास टकले -(३२२०), प्रशांत वसंतराव तुपे-(३१७५), अमोल भरतलाल धर्मावत-(३२२७), विजय कृष्णाजी राऊत -(३२८४), अभिजीत चंद्रकांत शिवरकर -(३२८५), संजय जयवंतराव शेवाळे-(३२२९), चंद्रकांत अर्जुन ससाणे -(३२७५), यशवंत शिवराम साळुंखे-(३२१८),तसेच महिला राखीव गटातून सविता दिनेश गिरमे-(३१६९), रेश्मा दत्तात्रेय हिंगणे-(३०५७), अनुसूचित जाती-जमाती विभागातून रमेश बाबुराव काकडे-(३४३३), इतर मागासवर्गीय विभागातून गणेश सुदाम फुलारे -(३४१७), भटक्या विमुक्त राखीव विभागातून विशाल संभाजी हाके-(३४१६) असे सन्मित्र प्रगती पॅनलचे सर्वच्या सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत.

प्रगती पॅनल च्या विरोधात एकूण सहा उमेदवार निवडणूक रिंगणात उभे होते. प्रतिस्पर्धी उमेदवारांना अवघ्या ३६५ मतांवर समाधान मानावे लागले. सन्मित्र सहकारी बँकेच्या निवडणुकीत अॅड. प्रभाकर शेवाळे, शिवाजी केदारी, बाळासाहेब कोद्रे, दामोदर राऊत, सुनिल बनकर, योगेश ससाणे, सोपान गोंधळे, मुनीर सय्यद, उत्तमराव रायकर यांचा सिहांचा वाटा असल्याचे बँकेचे मार्गदर्शक बाळासाहेब शिवरकर यांनी सांगितले. सभासद मतदारांनी सन्मित्र प्रगती पॅनलच्या उमेदवारांना सुमारे साडेतीन हजार मतांचे मताधिक्य देवून जो विश्वास दाखवला आहे. तो यापुढेही अधिक सक्षमपणे काम करण्याची प्रेरणा देणारा आहे असे मत त्यांनी व्यक्त केले.


Mr. Chandrakant Bhujbal

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब

============================

"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

==============================

     New Book

"महाराष्ट्रातील रणसंग्राम" पुस्तक घरपोच मिळविण्यासाठी-    

=============================
"महाराष्ट्रातील राजकारण" 


============================

Tuesday 20 February 2024

SANMITRA SAHAKARI BANK CO OP ELECTION 2024- सन्मित्र सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी 25 फेब्रुवारीला मतदान; विजयाची फक्त औपचारिकता बाकी

प्रखर विरोधकांची निवडणुकीकडे पाठ; विद्यमान संचालकांचे एकमेव प्रगती पॅनेल




पुणे- सन्मित्र सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी 25 फेब्रुवारीला मतदान होत असून पारंपारिक विरोधकांनी निवडणुकीकडे पाठ फिरवल्याने तसेच प्रमुख विरोधक उमेदवारांनी माघार घेतल्याने सत्ताधारी संचालकांच्या पॅनेलच्या विरोधात केवळ 5 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत त्यामुळे विजयाची फक्त औपचारिकता बाकी राहिलेली आहे. विद्यमान संचालकांनी एकमेव पॅनेल तयार करून त्यामध्ये युवकांना प्राधान्य देण्यात येऊन सभासदांना पुन्हा कार्य करण्याची संधी देण्याचे आवाहन करण्यात येत आहे. त्यांच्या आवाहनाला सभासद मतदारांचा भरघोष पाठींबा मिळत आहे. प्रबळ विरोधक निवडणूक रिंगणात नसल्याने सत्ताधारी संचालकांचे प्रगती पॅनेलला सभासदांचा प्रतिसाद मिळत असल्याने केवळ विजयाची औपचारिकता बाकी राहिलेली आहे. 

पुणे शहरातील अग्रगण्य सहकारी बँक म्हणून नावलौकिकता प्राप्त केलेल्या सन्मित्र सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची सन 2024-2029 करीता पंचवार्षिक निवडणूक जाहीर झालेली असून रविवारी 25 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 9 ते 5 या वेळेत 11 मतदान केंद्रावर मतदान घेण्यात येणार आहे. या निवडणुकीत 13 हजार 640 मतदार मतदानासाठी पात्र आहेत. सन्मित्र सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या एकूण 17 जागांसाठी 22 अर्ज दाखल झाल्याने ही निवडणूक होत असून विद्यमान संचालकांनी प्रगती पॅनेल तयार केले असून त्यामाध्यमातून निवडणुकांना सामोरे जात आहेत.

सन्मित्र सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची सन 2024-2029 करीता पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम 22 जानेवारीला जाहीर करण्यात आला. संचालक मंडळाच्या 17 जागांसाठी ही निवडणूक होत असून यामध्ये सर्वसाधारण गटासाठी 12 जागा आहेत. अनुसुचित जाती-जमातीसाठी एक जागा, भटक्या विमुक्त जाती-जमातीसाठी एक जागा, इतर मागासवर्गीय साठी एक जागा, तसेच महिलांसाठी राखीव 2 जागा याप्रमाणे मतदारसंघ आहेत. सत्ताधारी संचालकांच्या माध्यमातून प्रगती पॅनेल तयार केले असून यामध्ये काही संचालकांच्या कुटुंबातील युवकांना यामध्ये सामावून घेतले आहे त्यामुळे युवकांना प्राधान्य देण्याचे धोरण सन्मित्र सहकारी बँकेचे मार्गदर्शक व माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर यांनी अवलंबविले आहे. त्यांच्या या भूमिकेचे देखील सभासद मतदारांकडून स्वागत केले जात आहे.       

नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची मुदत 22 ते 29 जानेवारी पर्यंत होती. तर नामनिर्देशनपत्राची छाननी 30 जानेवारीला झाली असून 31 जानेवारी ते 14 फेब्रुवारी पर्यंत माघार घेण्याची मुदत होती. 14 फेब्रुवारी पर्यंत 17 जागांसाठी केवळ 22 अर्ज राहिल्याने निवडणूक नियमाप्रमाणे घेण्यात येत आहे. निवडणूक निर्णय अधिकारी श्री दिगंबर हौसारे उपनिबंधक सहकारी संस्था, पुणे शहर (4) पुणे यांच्या देखरेखीखाली निवडणूक प्रक्रिया राबविली जात आहे.

सन्मित्र सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या सन 2024-2029 करीता पंचवार्षिक निवडणूकीसाठी प्रगती पॅनेलमध्ये सर्वसाधारण गटातून कोद्रे विजय रामचंद्र, डॉ. गाढवे हेमंत दामोदर, गायकवाड सुनिल रामचंद्र, गोंधळे योगेश जयसिंग, टकले दिलीप रामदास, तुपे प्रशांत उर्फ मामा वसंतराव, धर्मावत अमोल भरत, अॅड. राऊत विजय कृष्णाजी, शिवरकर अभिजीत चंद्रकांत, शेवाळे संजय जयवंतराव, ससाणे चंद्रकांत अर्जुनराव, साळुंखे यशवंतराव शिवराम यांचा समावेश असून महिला राखीव २ जागांसाठी सौ. गिरमे सविता दिनेश व सौ. हिंगणे रेश्मा यांचा समावेश आहे. अनुसुचित जाती-जमाती १ जागेसाठी काकडे रमेश बाबुराव तर इतर मागासवर्गीय १ जागेसाठी फुलारे गणेश सुदाम आणि भटक्या विमुक्त जाती-जमाती एका जागेसाठी हाके विशाल संभाजी यांचा प्रगती पॅनेलमध्ये समावेश आहे. माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर व माजी आमदार जगन्नाथ बापू शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक लढवली जात आहे.

सन्मित्र सहकारी बँकेच्या सताधारी संचालकांच्या विरोधात पारंपारिक विरोधकांचा सूर प्रगतीमुळे मावळला असून ज्यांच्यावर विरोधी नेतृत्वाची आस होती ते महाशय ऐन निवडणुकीच्या वेळी अयोध्या येथे श्री रामाच्या दर्शनासाठी रवाना झाले होते. ही संधी साधून निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्याची विरोधकांची ओरड होती तरीही बहुतांश जणांनी अखेरच्या दिवशी नामनिर्देशन पत्र दाखल केले होते. श्री रामाचे दर्शन घेऊन येईपर्यंत केवळ एकच दिवस नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी उरला असल्याने विरोधकांना तुल्यबळ पॅनेल उभारण्यासाठी वेळेची संघीच मिळाली नाही याची खमंग चर्चा सभासद करीत असून त्यांच्या फजितीचा आस्वाद देखील घेत आहेत. सत्ताधारी संचालकांच्या प्रगती पॅनेल विरुद्ध 5 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. प्रगती पॅनेलच्या सर्व उमेदवारांचे निवडणूक चिन्ह विमान असून विमानाने विरोधांना मतदानापूर्वीच अस्मान दाखवल्याने विरोधकांना नेहमीप्रमाणे हरेराम करण्याची वेळ आली असून निवडणुकीची केवळ औपचारिकता बाकी राहिलेली आहे.  

सन्मित्र सहकारी बँकेचे विद्यमान चेअरमन श्री. सुनिल गायकवाड यांनी गेल्या पंचवार्षिक कालावधीत बँकेच्या प्रगतीत आमुलाग्र बदल घडवून यशस्वी भरभराटीची वाटचाल केल्याने विद्यमान संचालक व सभासदांचा त्यांना व त्यांच्या धोरणांना पाठींबा मिळत आहे. त्यांच्या कारकीर्दीत सन्मित्र सहकारी बँकेला उल्लेखनीय कार्याबद्दल अनेक पुरस्कार प्राप्त झाले. सन 2018 मध्ये पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक्स् असोसिएशन लि. पुणे यांच्या तर्फे सर्वाधिक सेवकांना प्रशिक्षण देणारी बँक म्हणून आपल्या सन्मित्र सहकारी बँकेला केंद्रीय मंत्री मा. नितीन गडकरी साहेब  यांच्या हस्ते गौरविण्यात आले होते. तर केरळ राज्यातील आपतग्रस्तांच्या मदतीकरीता, सन्मित्र सहकारी बँकेच्यावतीने रु.५१,०००/- ची देणगी “मुख्यमंत्री सहाय्यता निधी’ ला देण्यात आली होती. सन 2019 मध्ये उत्कृष्ट कामगिरी बद्दल सन्मित्र सहकारी बँकेला ‘बँको’ पुरस्कार देवून गौरवण्यात आले होते. 

सर्वात महत्वाचे व उल्लेखनीय कार्य म्हणजे बँकेला स्थेर्य मिळवून देण्यासाठी मुख्यालयासाठी स्व-मालकीची भव्य वास्तू उभारण्यात आली. तसेच  सन्मित्र सहकारी बँकेच्या सासवड शाखेचे स्व-मालकीच्या जागेत स्थलांतर त्यांच्या कारकीर्दीत झाल्याने विश्वसनीय नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. सन्मित्र सहकारी बँकेचे मार्गदर्शक व माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर यांनी तसेच विद्यमान संचालक श्री. चंद्रकांत ससाणे सर यांच्यासह सर्व संचालकांनी विद्यमान चेअरमन श्री.सुनिल गायकवाड यांना एकहाती काम करण्याची संधी देऊन विश्वास ठाकला तो त्यांनी सार्थ करून दाखवला असल्याचे समाधान श्री. सुनिल गायकवाड यांनी व्यक्त केले.

Mr. Chandrakant Bhujbal

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब

============================

"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

==============================

     New Book

"महाराष्ट्रातील रणसंग्राम" पुस्तक घरपोच मिळविण्यासाठी-    

=============================
"महाराष्ट्रातील राजकारण" 


============================





Monday 12 February 2024

co-op society elections पूना डिस्ट्रीक्ट पोलिस को-ऑप क्रेडीट सोसायटी संचालक मंडळाच्या निवडणुकीत चुरस; 13 जागांसाठी 57 उमेदवारांचे अर्ज दाखल; 5 मार्चला मतदान

परिवर्तन विरुद्ध नवपरिवर्तन पॅनेलमध्ये प्रमुख लढत




स्वातंत्र्यपूर्व काळात म्हणजेच 20 जून 1920 रोजी स्थापन झालेल्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या दि पूना डिस्ट्रिक्ट पोलीस को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या संचालक मंडळ सन 2024 ते 2029 या कालावधीकरिता निवडणूक कार्यक्रम नुकताच जाहीर झालेला असून या निवडणुकीत पोलिस कर्मचाऱ्यांनी उत्साहाने सहभाग दर्शविल्यामुळे चुरस निर्माण झालेली आहे. 13 जागांसाठी 57 उमेदवारांचे अर्ज दाखल झालेले असून उमेदवारी माघार घेण्याची अंतिम तारीख 20 फेब्रुवारी असून त्यानंतर खरी लढतीचे चित्र स्पष्ट होईल. मात्र प्रामुख्याने दोन पॅनेल निर्माण झाले असून विद्यमान पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वातील सहभागाने परिवर्तन पॅनेल तर विरुद्ध नवनिर्वाचित उमेदवारांनी नवपरिवर्तन पॅनेल तयार करून प्रचारात आघाडी घेतली आहे. खरी लढत परिवर्तन विरुद्ध नवपरिवर्तन पॅनेलमध्ये होत असून निवडणूक प्रचारार्थ विरोधी पॅनेलकडून विद्यमान पदाधिकाऱ्यांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फेरी झाडल्या जात असल्याने पोलीस कर्मचाऱ्यांच्या या सोसायटी निवडणुकीत चांगलाच राजकीय रंग भरला आहे. 

नवपरिवर्तन पॅनेल व परिवर्तन पॅनेलच्या उमेदवार निवडी झालेल्या आहेत. काही अपक्ष उमेदवार देखील स्वतंत्रपणे प्रचारात मग्न आहेत. पुणे शहर व जिल्ह्यातील पोलीस कर्मचाऱ्यांची दि पूना डिस्ट्रीक्ट पोलिस को-ऑप क्रेडीट सोसायटी एकमेव क्रेडिट सोसायटी असून एकूण 13 जागांसाठी 11 हजार 206 मतदार मतदानासाठी पात्र आहेत. संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार सोसायटीचे एकूण सभासद संख्या साधारण 12 हजार 355 असुन एकुण भागभांडवल (काटकसर निधीसह) 141 कोटी रुपये इतके आहे.

दि पूना डिस्ट्रीक्ट पोलिस को-ऑप क्रेडीट सोसायटीच्या संचालक मंडळ सन 2024 ते 2029 या कालावधीकरिता निवडणूक कार्यक्रम 29 जानेवारी 2024 रोजी निवडणूक अधिकारी तथा उपनिबंधक, सहकारी संस्था, पुणे शहर-2  मा. निलम पिंगळे यांनी जाहीर केला असून 2 फेब्रुवारी 2024 पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत होती तर नामनिर्देशन पत्र माघार घेण्याचा कालावधी 20 फेब्रुवारी 2024 तारखेपर्यंत असून चिन्ह वाटप व निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी 21 फेब्रुवारीला जाहीर करण्यात येणार आहे. आवश्यकतेनुसार 5 मार्च 2024 रोजी मतदान घेण्यात येणार असून मतदानाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच 6 मार्च 2024 रोजी मतमोजणी करण्यात येऊन निकाल जाहीर करण्यात येणार आहे. एकूण 11 हजार 206 मतदार पुणे शहर व जिल्ह्यातील 44 मतदान केंद्रावर मतदान घेण्यात येणार असून सर्व मतदान केंद्र पोलीस स्टेशन मध्येच आहेत.    

दि पूना डिस्ट्रीक्ट पोलिस को-ऑप क्रेडीट सोसायटीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीच्या माध्यमातून आरोप-प्रत्यारोप होत असल्याने सोसायटीच्या कारभाराच्या सुरेल कथा चर्चिल्या जात आहेत. विशेषतः सोसायटीच्या मालकीच्या चारचाकी वाहन आरोपांच्या केंद्र स्थानी आहे. त्या वाहनावर वाहतूक नियमांचा भंग व दंडात्मक कारवाई, वाहनाची आवश्यकता होती का? तसेच सोसायटीकडून बंदोबस्तासाठी देण्यात येणाऱ्या जेवण त्याचे असमान वाटप, यासह अन्य मुद्यांच्या प्रश्नांचे काहूर प्रचाराच्या वादळात घुमत आहे. विद्यमान पदाधिकाऱ्यांनी देखील प्रचारात कंबर कसली असून आरोपांना चोख प्रत्युत्तरादाखल संबंधितांना कायदेशीररीत्या नोटीसा पाठवण्याचा इशारा देखील दिला आहे. 2017 मध्ये एका सभासद पोलीस उपनिरीक्षकाने सोसायटीच्या विरोधात बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये चक्क फसवणुकीची तक्रार दिलेली होती त्यावेळी देखील सोसायटीच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केल्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आणला जात आहे. दरम्यान मागील निवडणुकीतील आकडेवारी पाहता अपक्ष उमेदवारांना मतदारांकडून डावलण्यात गेलेले होते आहे.परंतु पॅनल मधील उमेदवारीच्या निवडीला त्यांचा फटका बसू शकतो.मागील निवडणुकीत एकूण चार पॅनल मध्ये लढत झालेने मत विभागणी झालेली होती. या निवडणुकीत विद्यमान काही पदाधिकऱ्यांच्या पॅनल विरोधात ३ पॅनलने एकत्र मिळून नवनिर्माण पॅनल उभारले असून त्याला विद्यमान संचालक श्री नामदेव आप्पा रेणुसे व श्री.सचिन उगले यांनी सुद्धा पाठिंबा दिल्याने नवपरिवर्तन पॅनलचे पारडे सरस असल्याचे दिसून येते. 

श्री.संपतराव जाधव, अध्यक्ष शिखर संस्था मा.व्हाईस चेअरमन पोलीस सोसा. व दत्तात्रय गिरमकर (अण्णा) मा.संचालक पोलीस सोसा. यांच्या मार्गदर्शनाखाली श्री.महेश (पितांबर) गंबरे यांची पॅनेल प्रमुख व श्री.महेश गायकवाड यांची प्रचार प्रमुख म्हणून एकमताने निवड करून सर्वांच्या मान्यतेने पॅनेल मधील उमेदवारांची निवड केली आहे. दि पूना डिस्ट्रीक्ट पोलिस को-ऑप क्रेडीट सोसायटीचा नावलौकिकता वाढविण्यासाठी व सभासदांच्या हक्कांसाठी नवपरिवर्तन पॅनेलच्या माध्यमातून विकासात्मक जाहीरनामा घेऊन आम्ही मतदारांपर्यंत जात आहोत. आम्हाला विद्यमान संचालकांवर केवळ आरोप करण्यासाठी नव्हे तर प्रामाणिक, गतिमान प्रशासन देण्यासाठी नवपरिवर्तन पॅनेलच्या माध्यमातून निवडणूक लढवीत आहोत. मतदारांचा आमच्या  पॅनेलच्या उमेदवारांना भरघोस पाठींबा मिळत असल्याने निश्चितपणे यश मिळेल असा निर्धार नवपरिवर्तन पॅनलचे मार्गदर्शक दत्तात्रय गिरमकर यांच्यासह पदाधिकारी यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान सोसायटीचे विद्यमान अध्यक्ष श्री. प्रशांत लक्ष्मण शिंदे यांच्या पुढाकाराने व कैलास गावडे सरांच्या मार्गदर्शनाखाली परिवर्तन पॅनेलच्या माध्यमातून या निवडणुकीस सामोरे जात आहेत. या परिवर्तन पॅनेलमध्ये विद्यमान उपाध्यक्ष राजेंद्र पालांडे आणि विद्यमान संचालक दिपक वर्पे व विनायक जाधव यांचा समावेश आहे. अन्य नवनिर्वाचित उमेदवार परिवर्तन पॅनेलमध्ये आहेत. एकाच ध्यास सर्व सभासदांचा सर्वांगीण विकास या उद्घोषणेने परिवर्तन पॅनेल प्रचार करीत आहे. परिवर्तन विरुद्ध नवपरिवर्तन पॅनेलमध्ये प्रमुख लढतीने प्रचारातील रंगत आली असून शहर व जिल्ह्यातील सभासदांच्या अर्थातच पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये निवडणुकीबाबत उत्कंठा दिसून येत आहे.    
       
दि पुना डिस्ट्रिक्ट पोलीस को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या 5 मतदारसंघातील 13 जागांसाठी एकूण 57 नामनिर्देशनपत्र निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे दाखल झालेले आहेत

१. सर्वसाधारण या मतदारसंघासाठी 8 जागांसाठी 28 उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत यामध्ये खालीलप्रमाणे उमेदवारांची नावे आहेत- 1.जाधव विनायक एकनाथ, 2.शिंदे प्रशांत कलक्ष्मण, 3.गावडे अनिल बाळासाहेब, 4.पालांडे राजेंद्र आत्माराम, 5.गायकवाड अमोल अरुण, 6.मोमिन इम्तियाज दस्तगीर, 7.वर्पे दिपक विठठल , 8.डोळस सुधीर हरिश्चंद्र, 9.काळभोर उदयकुमार सुदाम, 10.घोरपडे विठ्ठल अनिल, 11.गडांकुश दिनेश प्रल्हाद, 12.दावणे महावीर म-याप्पा, 13.नरुटे शशिकांत हरीदास, 14.भोंग अनिल मनोहर, 15.कदम सुमित लहू, 16.भोकरे मनोज सोमेश्वर, 17.तांबोळी जमीर बाबालाल, 18.गायकवाड महेश वसंत, 19.गोरे गणपत धोंडीबा, 20.सरोदे गणेश रामदास, 21.भाटे विलास एकनाथ, 22.खोमणे रक्मिणी गुलाब, 23.जठार रमेश पांडुरंग, 24.ताठे अनिल तुकाराम, 25.गवळी गणेश शिवाजी, 26.जगताप गणेश अशोक, 27.भोसले सुशांत राजेंद्र, 28. राजेंद्र बाळकृष्ण मारणे यांचा समावेश आहे. 

२. महिलांसाठी राखीव या मतदारसंघासाठी 2 जागांसाठी 6 उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत यामध्ये खालीलप्रमाणे उमेदवारांची नावे आहेत- 29.थोरात उषा राहूल 30.काळे अनुपमा दिपक, 31.तायडे अर्चना राहुल, 32.राठोड आशा चुनीलाल, 33.गोडगे वैशाली अशोक, 34.शिदे सीमा शंकरराव यांचा समावेश आहे. 

३. अनुसूचित जाती- जमाती प्रवर्ग या मतदारसंघासाठी 1 जागेसाठी 6 उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत यामध्ये खालीलप्रमाणे उमेदवारांची नावे आहेत- 35.बगाड संतोष काशिनाथ, 36.गडांकुश दिनेश प्रल्हाद, 37.फ़ासगे आकाश नारायण, 38.भाटे विलास एकनाव, 39.तिटकारे दिनेश मंगल, 40.शिवशरण अविनाश श्रीमंत यांचा समावेश आहे. 

४. इतर मागासवर्ग या मतदारसंघासाठी 1 जागांसाठी 6 उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत यामध्ये खालीलप्रमाणे उमेदवारांची नावे आहेत- 41.ताठे अनिल तुकाराम, 42.भोग अनिल मनोहर, 43.नदाफ इम्रानखान सिकंदर, 44.शिंदे प्रशांत लक्ष्मण, 45.तांबोळी जमीर बाबालाल, 46.जगताप गणेश अशोक यांचा समावेश आहे. 

५. भटक्या विमुक्त जाती/जमाती व विशेष मागासवर्ग या मतदारसंघासाठी 1 जागेसाठी 11 उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत यामध्ये खालीलप्रमाणे उमेदवारांची नावे आहेत- 47.माने राहूल रामचंद्र, 48.पांढरे गोविंद हेबंत, 49.गंबरे पितांबर सदाशिव, 50.गोरे गणपत धोंडीबा, 51.पवार बळीराम वामन, 52.हांगे दादासाहेब विष्णू, 53.सामसे महावीर लक्ष्मण, 54.गवळी गणेश शिवाजी, 55.खुणवे राकेश शिवाजी, 56.शिंदे गणेश दत्ता, 57.म्हेत्रे धनेश नागनाथ यांचा समावेश आहे. 

केंद्र निहाय मतदान पाहिल्यास सर्वाधिक मतदान 20 क्रमांकाच्या केंद्रावर 1868 असून सर्वाधिक कमी मतदान 6 क्रमांकाच्या केंद्रावर 39 इतके आहे. निवडणुकीसाठी केंद्र क्र. व मतदार संख्या खालीलप्रमाणे- 1-102, 2-108, 3-178, 4-164, 5-122, 6-39, 7-125, 8-252, 9-207, 10-709, 11-158, 12-35, 13-226, 14-118, 15-151, 16-393, 17-709, 18-447, 19-214, 20-1868, 21-50, 22-220, 23-313, 24-190, 25-74, 26-433, 27-94, 28-89, 29-105, 30-142, 31-252, 32-242, 33-137, 34, 260, 35-67, 36-92, 37-100, 38-393, 39-85, 40-86, 41-173, 42-168, 43-839, 44-277, एकूण मतदार संख्या- 11206 अशा प्रकारे आहे.

Mr. Chandrakant Bhujbal

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब

============================

"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

==============================

     New Book

"महाराष्ट्रातील रणसंग्राम" पुस्तक घरपोच मिळविण्यासाठी-    

=============================
"महाराष्ट्रातील राजकारण" 


============================





Thursday 8 February 2024

ईव्हीएम मशीनच्या चोरी प्रकरणामुळे स्थानिक प्रशासनाचा कारभार चव्हाट्यावर; 5 अधिकाऱ्यांवर गडांतर

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कारवाईने खळबळ


पुरंदर तालुक्याचे मुख्यालय असलेल्या सासवड तहसील कार्यालयाच्या आवारातील गोदामातून ईव्हीएम मशीन चोरीच्या प्रकरणामुळे स्थानिक प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला असून केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कारवाईने प्रशासनात खळबळ माजली आहे. ईव्हीएम मशीन चोरी प्रकरणी 5 अधिकाऱ्यांवर गडांतर आले आहे तर आणखीन दोषींवर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान चोरट्यांकडून दारूच्या नशेत चोरी झाल्याचे कारण समोर येत असून चोरी केलेले ईव्हीएम मशीन व कागदपत्रे जेजुरीतून हस्तगत केलेली आहेत २ संशयित आरोपींना अटक केली असून अन्य संशयितांचा शोध सुरु आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने याप्रकरणी तहसीलदार, उपविभागीय अधिकारी आणि डीवायएसपी यांना निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. 
सासवड शहरातील तहसील कार्यालयातील स्ट्रॉंगरूममध्ये ईव्हीएम मशीन ठेवण्यात आलेल्या आहेत. शनिवार आणि रविवारी अशी दोन दिवस तहसील कार्यालयास सुट्टी होती. सोमवारी सकाळी आकरा वाजता तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांना स्ट्रॉंग रूमचं कुलूप तोडण्यात आलेले आढळून आले. या ठिकाणी असलेल्या 40 पैकी 1 ईव्हीएम डेमो मशीन चोरीला गेल्याचे उघडकीस आल्याने खळबळ माजली होती.
 सासवड, जि.पुणे येथील तहसील कार्यालयात जनजागृतीसाठी ठेवलेल्या आणि चोरीस गेलेले ईव्हीएम कंट्रोल युनिट पोलिसांना सापडले आहे. याप्रकरणी दोन संशयितांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती अपर मुख्य सचिव तथा राज्याचे निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जिल्हाधिकारी, पुणे आणि पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांच्याकडून प्राप्त अहवालानुसार ३ फेब्रुवारी २०२४ रोजीच्या सायंकाळी सहा ते ५ फेब्रुवारी २०२४ रोजीच्या सकाळी १० वाजेदरम्यान जनजागृतीसाठी ठेवलेल्या ईव्हीएमपैकी एक कंट्रोल युनिट (BCUEL४१६०१) चोरीला गेल्याचे निदर्शनास आले होते. या अनुषंगाने निवासी नायब तहसीलदार, पुरंदर यांनी सासवड पोलिस स्टेशनमध्ये ५ फेब्रुवारी २०२४ रोजी तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिस स्टेशनकडून गुन्हा दाखल करुन तपास कामाला सुरवात करण्यात आली असून जिल्हाधिकारी, पुणे यांनी दि. ७ फेब्रवारी २०२४ रोजी सादर केलेल्या अहवालानुसार चोरीस गेलेले एक कंट्रोल युनिट पुणे ग्रामीण पोलिसांनी चोरट्यांकडून हस्तगत केले आहे. दोन संशयित भय्या ऊर्फ शिवाजी रामदास बंडगर, वय २१ व  अजिंक्य राजू साळुंखे, वय २१ रा. माळशिरस ता.पुरंदर, जिल्हा पुणे यांना अटक करण्यात आली आहे. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून, त्यांच्याकडून १ कंट्रोल युनिट, ५ पेपर रीम आणि स्टेशनरी हस्तगत करण्यात आली आहे.
भारत निवडणूक आयोगाने याची गंभीर दखल घेतली असून, सुरक्षा व्यवस्थेतील कमतरता विचारात घेऊन, पुणे जिल्हयातील उपविभागीय अधिकारी, पुरंदर, तहसीलदार, पुरंदर तसेच संबंधित उपविभागीय पोलिस अधिकारी यांना तत्काळ निलंबित करुन पुढील चौकशी करण्याचे आदेश ६ फेब्रुवारी २०२४ रोजी दिले आहेत. तसेच या प्रकरणाची सविस्तर चौकशी करण्यासाठी समिती नेमण्याचे सुध्दा निर्देश दिले आहेत. त्याप्रमाणे कार्यवाही सुरु असल्याची माहिती श्री. देशपांडे यांनी दिली.
भारत निवडणूक आयोगाच्या दि. १४.११.२०२३ रोजीच्या पत्रातील निर्देशांनुसार राज्यात दि.१०.१२.२०२३ ते दि.२८.०२.२०२४ या कालावधीत ईव्हीएम जनजागृती व प्रसिध्दीचा कार्यक्रम सर्व जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येत आहे. या प्रयोजनार्थ जिल्ह्यातील एकूण मतदान केंद्रांच्या १० टक्के इतक्या संख्येत ईव्हीएम व व्हीव्हीपॅट केवळ या कार्यक्रमासाठी जिल्हास्तरावरील मुख्य सुरक्षा कक्षातून (Strong room) बाहेर काढण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील विविध मतदारसंघांमध्ये जनजागृती तसेच प्रसिध्दीसाठी वापरावयाच्या ईव्हीएम त्या मतदारसंघातील उपविभागीय अधिकारी यांच्या मुख्यालयाच्या ठिकाणी सुरक्षा कक्षात योग्य त्या सुरक्षेसह ठेवण्यात येतात. दिवसभरात प्रचार प्रसिध्दी झाल्यानंतर त्या पुन्हा सुरक्षा कक्षात आणण्यात येतात. त्यासाठी स्थानिक पोलिस स्टेशनकडून बंदोबस्त पुरविण्यात येतो.
या घटनेबाबत राज्यस्तरावर मुख्य निवडणूक अधिकारी तसेच जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांनी सर्व मान्यता प्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक 6 फेब्रुवारी 2024  रोजी घेऊन सुरु असलेल्या कार्यवाहीची सविस्तर माहिती दिली. त्याचप्रमाणे भारत निवडणूक आयोगाला याबाबत सविस्तर अहवाल सादर करण्यात आला असल्याचे श्री.देशपांडे यांनी यावेळी सांगितले.
सासवड येथील तहसील कार्यालयाच्या स्ट्रॉंगरूम मधून तीन चोरट्यांनी ईव्हीएम मशीन लंपास केली होती. यावेळी सहायक फौजदार डी. एल. माने आणि होमगार्ड जवान राहुल जरांडे हे ड्यूटीवर होते. सोमवारी सर्व जण कामावर आले असता, त्यांना स्ट्रॉंग रूमचा दरवाजा उघडा दिसला. दरम्यान, ईव्हीएम चोरल्याचे कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले. तहसीलदार विक्रम राजपूत यांनी देखील पाहणी करून ईव्हीएम चोरीबाबत प्रांताधिकारी वर्षा लांडगे यांना कळविले. पोलिसांनी घटनास्थळी येत पंचनामा केला. मतदान करण्याच्या डेमो (प्रात्यक्षिक) मशिनसह काही कागदपत्रांची चोरी झाल्याचे उघड झाले.
पोलिसांनी याची गंभीर दखल घेत सहायक फौजदार डी. एल. माने आणि होमगार्ड जवान राहुल जरांडे यांना मंगळवारी निलंबित केले होते. मात्र, या घटनेची दाखल थेट केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतली. त्यांनी या प्रकरणी पुरंदर प्रांताधिकारी- वर्षा लांडगे -खत्री, तहसीलदार विक्रम राजपूत, उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बर्डे यांना निलंबित करण्याचे आदेश दिले आहे. तसेच पोलिस आधीक्षकांनी १२ फेब्रुवारी दुपारी ३ पर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश देखील देण्यात आले आहे. 

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब

============================

"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

==============================


     New Book

"महाराष्ट्रातील रणसंग्राम" पुस्तक घरपोच मिळविण्यासाठी-    

=============================
"महाराष्ट्रातील राजकारण" 


============================

Wednesday 7 February 2024

Sugar Factory Election 2024 बंद असलेल्या सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूकीतही रंगत!

थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याची 9 मार्चला निवडणूक



पूर्व हवेलीतील बंद असलेल्या सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूकीतही रंगत आली असून अनेक इच्छुक उमेदवारी दाखल करण्यासाठी सरसावले आहेत. थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या सन 2024 ते 2029 या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, 21 संचालकांच्या जागांसाठी येत्या सोमवार (दि. 5) पासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. तर, आवश्यकता असेल, तर ‘यशवंत’च्या निवडणुकीसाठी 9 मार्च रोजी मतदान घेतले जाणार आहे. 

राज्य सहकारी निवडणूक प्रान्याच्या निवडणूक प्रक्रियेवर शिक्कामोर्तब केले असून, सहकार उपनिबंधक डॉ. शीतल पाटील यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. कारखान्याची अंतिम मतदार यादी 17 जानेवारी 2024 रोजी अंतिम करण्यात आलेली आहे.  

शिवाजीनगर येथील साखर संकुल येथील चौथ्या मजल्यावरील सभागृह हे निवडणूक निर्णय अधिकार्‍यांचे कार्यालय असणार आहे. उमेदवारी अर्ज सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत दाखल करता येतील. 5 फेब्रुवारीपासून उमेदवारी अर्ज दाखल करता येतील आणि 9 फेब्रुवारी रोजी सायंकाळी चार वाजेपर्यंत ते दाखल करून घेतले जाणार आहेत. दिनांक 12 फेब्रुवारी रोजी दुपारी साडेबारा वाजता उमेदवारी अर्जांची छाननी होईल. पात्र उमेदवारी अर्ज 13 फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता घोषित केले जातील, तर 13 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारी रोजी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची वेळ आहे.

अंतिम उमेदवारी अर्ज 28 फेब्रुवारी रोजी प्रसिध्द होऊन पात्र उमेदवारांना निशाणी वाटप केले जाणार आहे. तर, आवश्यकता असेल तर 9 मार्च रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदान होईल. मतदान स्थळ नंतर कळविण्यात येणार आहे. तर, 10 मार्च रोजी सकाळी 9 वाजल्यापासून मतमोजणी सुरू होईल आणि मतमोजणीनंतर निकाल जाहीर करण्यात येईल.

मुंबई उच्च न्यायालयातील दाखल याचिका क्रमांक ४७६२ दिनांक २८ ऑगस्ट २०२३ रोजीचा आदेश आणि राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या ११ ऑक्टोबर २०२३ रोजीच्या पत्रान्वये यशवंत कारखान्याच्या प्राथमिक मतदार यादी नंतर अंतिम यादी तयार करण्यात आली. त्यानुसार ऊस उत्पादक शेतकरी आणि संस्था सभासद मिळून एकूण २१ हजार ४१४ सभासदांचा प्राथमिक यादीत समावेश आहे.

याचिकाकर्त्यांनी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार तात्पुरत्या मतदार यादीवर आक्षेप घेतला होता. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने विचार करून दिनांक १२ जानेवारी २०२४ रोजी हरकती नाकारल्या, त्यामुळे, याबाबत चौकशी होत नसल्याबाबत याचिकाकर्त्यांचा आक्षेप गैरलागू आहे. महाराष्ट्र सहकारी संस्था (निवडणूक) नियम २०१४ च्या नियम ११ अन्वये कारवाई करण्यात आली आहे. त्या निर्णयाला आव्हान न देता सोसायटीकडून मृत सदस्यांबाबत उपाययोजना होईपर्यंत निवडणुका पुढे ढकलण्यात याव्यात, अशी विनंती याचिकाकर्त्यांनी केलेली मागणी अवाजवी असल्याचे न्यायालयाने म्हंटले होते. 

राज्य सहकारी निवडणूक असली तरी प्राधिकरणाने आपली अधिसूचना २६/१२/२०२३ रोजी प्रसिद्ध केली, आता अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्यामुळे भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद २२६ अन्वये विवेकाधीन अधिकारक्षेत्राचा वापर या टप्प्यावर करणे योग्य वाटत नाही त्यामुळे उपरोक्त कारणांमुळे रिट याचिका फेटाळत असल्याचे न्यायालयाने निकालपत्रात म्हंटले होते.

या निवडणुकीच्या निमित्ताने लोणी काळभोर येथील सहकारातील दोन कडव्या विरोधी गटांचे मनोमिलन झाले असून अशोक काळभोर व माधव काळभोर हे गेल्या चाळीस वर्षांपासून राजकीय विरोधक होते. ते आता या निवडणुका एकत्र लढणार आहेत. सहकारातील तालुक्याचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय अशोक काळभोर यांचे चिरंजीव सागर काळभोर यांनी निवडणूक लढविण्याचा निर्धार केला आहे. तर हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप काळभोर म्हणाले की, अनेक वर्षांचा राजकीय संघर्ष संपवून आम्ही मनापासून एकत्र आलो आहोत. या पुढील सर्व निवडणुका एकत्रित विचारविनिमय करून समान न्याय भावनेने काम करणार आहोत. या पुढील काळातही गावच्या व तालुक्याच्या विकासासाठी योग्य निर्णय घेणार आहोत.

दरम्यान लोकनेते अण्णासाहेब मगर आणि पू. मणिभाई देसाई यांच्या पुढाकारातून यशवंत सहकारी साखर कारखान्याची स्थापना 1968 साली करण्यात आली. थेऊर व हवेलीच्या पूर्व भागात या कारखान्यामुळे गतवैभव प्राप्त झाले होते. कारखान्याच्या स्थापनेनंतर सलग 2009 पर्यंत वैभवाचे दिवस होते मात्र कालांतराने स्वार्थी प्रवृत्तीच्या आर्थिक राजकारणाने शिरकाव केला त्याचा परिणामामुळे चांगल्या स्थितीतील कारखान्याचा ऱ्हासानंतर व्यवस्था कोलमडून पडल्याने 2011 पासून पूर्णतः बंद अवस्थेत कारखाना उभा आहे.

शहरीकरणामुळे शेती नाहीशी होऊन वसाहतीला चालना मिळाली आणि कारखान्याच्या जागेवर सर्वांकडून मोह झडला. कारखान्याच्या मालकीची 248 एकर शेतजमीन आहे. त्यामधील काही जागा एनए केलेली आहे. आर्थिक दृष्ट्या तोटा आणि कर्जामुळे अडचणीत आलेल्या कारखाना पुन्हा सुरु करण्यासाठी 2013 मध्ये 110 एकर जागा ‘म्हाडा’ला देण्याचा निर्णय तत्कालीन राज्य सरकारने घेतला होता. कारखान्याची 110 एकर जागा एकरी एक कोटी सात लाख रुपये दराने ‘म्हाडा’ला देण्याच्या या व्यवहारातून कारखान्याला ११७ कोटी रुपये मिळणार होते मात्र न्यायालयात प्रकरणे दाखल झाली आणि अजून कोर्टकचेरी सुरूच आहे. 

प्रदीर्घ 18 वर्षांच्या कालखंडानंतर हवेली तालुक्यातील यशवंत कारखान्याच्या निवडणुकीला कोर्टाने संमती दिली आहे. कारखान्याच्या संबंधित आजपर्यंत एकुण १२ याचिका दाखल असून त्यातील एका याचिकेवर न्यायालयाने निवडणुकीबाबत आदेश दिला आहे. कारखान्यातील गैरव्यवस्थापनामुळे 2 एप्रिल 2011 रोजी संचालक मंडळ बरखास्त केले होते आणि त्यानंतर जवळपास हा कारखाना बंद अवस्थेतच आहे. या कारखान्याच्या निवडणुकीसाठी शेतकरी सभासदांनी निवडणूक निधी गोळा केलेला आहे. निवडणुकीनंतर बंद पडलेल्या कारखान्याला ऊर्जितावस्थेत आणण्यास महत्त्वाचे पाऊल पडणार आहे.

Mr. Chandrakant Bhujbal

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब

============================

"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

==============================


     New Book

"महाराष्ट्रातील रणसंग्राम" पुस्तक घरपोच मिळविण्यासाठी-    

=============================
"महाराष्ट्रातील राजकारण" 


============================

Saturday 3 February 2024

Sugar Factory Election 2024 श्री शंकर सहकारी साखर कारखाना संचालक मंडळ निवडणुक; 25 फेब्रुवारीला मतदान

विरोधी गटाचे अर्ज बाद झाल्याने मोहिते पाटलांना आव्हान देण्याचा प्रयत्न फोल; राखीव गटातील 3 जागा बिनविरोध


सोलापूर जिल्ह्यातील सदाशिवनगर (ता. माळशिरस) येथील श्री शंकर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीतील कौल स्पष्ट होत असून विरोधी गटाचे बहुतांश अर्ज बाद झाल्याने सत्ताधारी मोहिते पाटिल गटाला आव्हान देण्याचा प्रयत्न फोल ठरला आहे. सत्ताधारी मोहिते पाटील गटातील सर्व उमेदवारांचे उमेदवारी अर्ज वैध ठरले असून एकूण २१ जागांसाठी २९ जण रिंगणात राहिले आहेत. राखीव गटातील 3 जागा बिनविरोध होणार आहेत याठिकाणी प्रत्येकी 2 उमेदवारांपैकी एक अर्ज बाद झाला आहे. २१ संचालक निवडीसाठी एकूण ४० उमेदवारांचे ४२ अर्ज दाखल झाले होते. बुधवारी छाननीत १२ विरोधी उमेदवारांचे अर्ज बाद झाले. मागच्या पंचवार्षिक निवडणुकीतही सालगुडे पाटील यांनी मोहिते पाटलांना आव्हान दिले होते. त्यानंतर यंदाही त्यांनी ताकदीनिशी लढत देण्याचा निर्णय घेतला. पण त्यांचा अर्जच अवैध ठरल्याने बलाढ्य असा विरोधी गट उरलेला नाही अशी स्थिती निर्माण झालेली आहे.

श्री शंकर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम नुकताच जाहीर झाला असून 25 फेब्रुवारी मतदान होणार असून 26 फेब्रुवारीला निकाल जाहीर केला जाणार आहे. यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत २२ ते २९ जानेवारी यादरम्यान होती. शंकर साखर कारखान्याच्या सन २०२३-२४ ते २०२८-२९ पंचवार्षिक निवडणुकीसाठी ४० उमेदवारांनी ४२ नामनिर्देशन पत्रे दाखल केली होती. बुधवारी निवडणूक निर्णय अधिकारी नामदेव टिळेकर यांनी दाखल अर्जांची छाननी केली. छाननी 30 जानेवारी 2024 रोजी झाली यामध्ये सत्ताधारी मोहिते पाटील गटातील सर्व उमेदवारांचे उमेदवारी अर्ज वैध ठरले. तर विरोधी गटाचे नेते भानुदास सालगुडे पाटील यांच्यासह त्यांच्या पत्नी सौ. सालगुडे-पाटील यांच्यासह अन्य यामध्ये लालासाहेब रणनवरे, आप्पा माळी, आनंदा मुळीक, सुभाष सूळ, मधुकर वाघमोडे, रामहरी गोडसे, नारायण वाघमोडे, नागरबाई पालवे, शरद फुले, नारायण वाघमोडे या १२ जणांचे उमेदवारी अर्ज बाद ठरविण्यात आले. त्यामुळे मोहिते पाटलांना विरोधकांचे असणारे आव्हान काहीसे संपुष्टात आल्याचे चित्र आहे.

उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत 14 फेब्रुवारी 2024 ला दुपारी तीन वाजेपर्यंत असून 15 फेब्रुवारी रोजी उमेदवारांना निशाणी किंवा चिन्हाचे वाटप केले जाणार आहे. मतदान 25 फेब्रुवारी असून 26 तारखेला निकाल घोषित केला जाणार आहे. शंकर सहकारी साखर कारखान्याच्या 21 संचालक यांच्या जागे करता ही निवडणूक होत असून पंधरा संचालक हे उत्पादक मतदारसंघ प्रतिनिधी आहेत. 

माळशिरस, इस्लामपूर, नातेपुते, फोंडशिरस, बोरगाव या गटातून प्रत्येकी तीन संचालक निवडले जाणार आहेत, संस्था मतदारसंघातून एक, अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती प्रतिनिधी एक, महिला राखीव प्रतिनिधी दोन ,इतर मागासवर्ग प्रतिनिधी एक , भटक्या विमुक्त जाती व जमाती विशेष मागास प्रवर्ग एक, अशा 21 जागांकरता निवडणूक होत आहे. एकूण २१ जागांसाठी २९ जण रिंगणात राहिले आहेत. या आठ उमेदवारांपैकी या प्रक्रियेत शेवटपर्यंत किती उमेदवार राहतात, हे पाहणे औत्सुक्याचे आहे.
 
वैध ठरलेल्या उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे : माळशिरस उत्पादक गट- मिलिंद कुलकर्णी, सुरेश पाटील, महादेव शिंदे, गोपाळ गोरे, इस्लामपूर गट- बाळासाहेब माने, दत्तात्रय रणनवरे, कुमार पाटील, भीमराव दुधाळ, शिवाजी पवार, उत्तम बाबर.
नातेपुते उत्पादक गटातून - मालोजीराव देशमुख, सुधाकर पोळ, प्रफुल्ल कुलकर्णी, फोंडशिरस उत्पादक गट.- सदाशिव वाघमोडे-पाटील, शिवाजी गोरे, रणजीतसिंह मोहिते पाटील, रणजीत पाटील, बोरगाव उत्पादक गट - दत्तात्रय मिसाळ, सचिन लोकरे, बलभीम पाटील सहकारी संस्था : रणजीतसिंह मोहिते पाटील, मधुकर वाघमोडे, अर्जुनसिंह मोहिते पाटील अनुसूचित जाती किंवा जमाती प्रतिनिधी गट- अर्जुन धाईंजे, महिला राखीव प्रतिनिधी- लिलावती देवकर, लिलावती खराडे, यमुनाबाई निंबाळकर इतर मागासवर्गीय जाती प्रतिनिधी गट- रामदास कर्णे भटक्या विमुक्त जाती जमाती विशेष मागास प्रवर्ग प्रतिनिधी गट-सुनील माने यांचा समावेश आहे.
अवैध ठरलेल्या उमेदवारांचे अर्ज : माळशिरस उत्पादक गट- भानुदास सालगुडे-पाटील, इस्लामपूर गट - लालासो रणनवरे, अप्पा माळी. नातेपुते गट - आनंदा मुळीक, सुभाष सुळ, फोंडशिरस उत्पादक गट - रामहरी गोडसे, मधुकर वाघमोडे, नारायण वाघमोडे, महिला राखीव प्रतिनिधी - नीलम सालगुडे पाटील, नागरबाई पालवे. इतर मागास वर्गीय जातीचा प्रतिनिधी : शरद फुले भटक्या विमुक्त जाती जमाती विशेष मागास प्रवर्ग प्रतिनिधी : नारायण वाघमोडे. 21 जागांसाठी 44 जणांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. कारखान्याचे चेअरमन रणजितसिंह मोहिते पाटील यांनी स्वतःचे तीन अर्ज दाखल केले होते.  
 

गटनिहाय उमेदवार याप्रमाणे-

माळशिरस उत्पादक गट- मिलिंद कुलकर्णी, सुरेश पाटील, महादेव शिंदे, (भानुदास सालगुडे पाटील, अर्ज बाद) गोपाळ गोरे
इस्लामपूर उत्पादक गट- बाळासाहेब माने, दत्तात्रेय रणवरे, कुमार पाटील, (लालासाहेब रणवरे,अर्ज बाद) भीमराव दुधाळ, शिवाजी पवार, उत्तम बाबर, (अप्पा माळी,अर्ज बाद)
नातेपुते उत्पादक गट- मालोजीराव देशमुख, सुधाकर पोळ, प्रफुल्ल कुलकर्णी, (आनंदा मुळीक,अर्ज बाद) (सुभाष सूळ.अर्ज बाद) 
फोंडशिरस उत्पादक गट- सदाशिव वाघमोडे, शिवाजी गोरे, (रामहरी गोडसे,अर्ज बाद) (भानुदास वाघमोडे,अर्ज बाद) रणजितसिंह मोहिते पाटील, रणजित पाटील, (नारायण वाघमोडे,अर्ज बाद)
बोरगाव उत्पादक गट- दत्तात्रेय मिसाळ, सचिन लोकरे, बलभीम पाटील
उत्पादक सहकारी संस्था- रणजितसिंह मोहिते-पाटील (दोन अर्ज), गारेख रूपनवर, रामचंद्र पाटील. 
अनुसूचित जाती-जमाती प्रतिनिधी गट- अर्जुन धाईंजे
महिला प्रतिनिधी- लीलावती देवकर, लीलावती खराडे, (नीलम सालगुडे पाटील,अर्ज बाद) (नागरबाई पालवे,अर्ज बाद) यमुनाबाई निंबाळकर.
इतर मागास प्रवर्ग- रामदास कणो, (शरद फुले,अर्ज बाद)
भटक्या जाती-जमाती गट- सुनील माने, (नारायण वाघमोडे,अर्ज बाद)
उत्पादक सहकारी संस्था- मधुकर वाघमोडे, अर्जुनसिंह मोहिते-पाटील


श्री शंकर सहकारी साखर कारखाना सध्या आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील यांच्या ताब्यात असून त्यांनी मागील निवडणुकीत हा कारखाना ताब्यात घेतला आहे. विस्तीर्ण कार्यक्षेत्र असणाऱ्या या कारखान्याची निवडणूक अत्यंत चुरशीची झाली होती. यंदाही विरोधक आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या गटासमोर आव्हान उभे करणार हे निश्चित होते मात्र अर्ज सुध्दा योग्य पद्धतीने दाखल करता आले नाहीत त्यामुळे विरोधकांचे आव्हान फोल ठरले आहे. शंकर कारखाना सुस्थितीत यावा, यासाठी आमदार मोहिते पाटील यांनी मागील पाच वर्षात अनेक प्रयत्न केले असून केंद्र सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात मदत मिळवली आहे. रणजितसिंह यांनी गेल्या तीन वर्षांत कारखान्याला पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानंतर मुदत संपल्याने आता पुन्हा कारखान्याची निवडणूक जाहीर झाली आहे.
श्री शंकर सहकारी साखर कारखान्याची पार्श्वभूमी पाहिल्यास सहकारमहर्षी शंकरराव मोहिते यांनी स्वतःची जमीन गहाण ठेवून शंकर कारखाना शेतकऱ्यांच्या मालकीचा केला होता. चितळेंचा खासगी साखर कारखाना ३७ लाख ५० हजार रुपयांत शंकरराव मोहिते यांनी खरेदी केला होता. अनंत अडचणींचा सामना करत कारखान्याने ४८ वर्षे शेतकरी, कामगारांचे हित जोपासले आहे. या कारखाना सुरू झाल्यामुळे सदाशिवनगर, नातेपुते, शिंदेवाडी, धर्मपुरी, फोंडशिरस, माळशिरस आणि माण तालुक्‍यातही आर्थिक उलाढालीला चालना मिळत आहे. केंद्र सरकारकडून ‘एनसीडीसी’च्या माध्यमातून मंजूर झालेल्या ११३ कोटी रुपयांच्या निधीतून कारखाना पूर्ववत करण्याचा पर्यंत सुरु आहे.
श्री शंकर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची मागील निवडणूक होऊनगत संचालक मंडळ दि. 10/12/2018 रोजी अस्तित्वात आलेले होते. एकूण 21 संचालक होते त्यापैकी 12 संचालक कार्यरत होते. सात संचालक हे दि. 14/03/2020 च्या महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 78 (अ)(१)(b) अंतर्गत च्या आदेशाअन्वये अपात्र ठरविण्यात आले होते तेव्हापासून सदर पदे रिक्त होती. 2 संचालक मयत झाले होते. मागील निवडणुकीला पाच वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्याने संचालक मंडळाची निवडणूक सर्व जागांवर होत आहे.  

उत्पादक सहकारी संस्था, बिगर उत्पादक संस्था व पणन संस्था यामधून रणजितसिंह मोहिते पाटील, अर्जुनसिंह मोहिते पाटील, मधुकर पाटील तीन अर्ज वैध झालेले आहेत. एकूण मतदान 38 आहे. त्यापैकी तीन संस्थांचे ठराव अप्राप्त असल्याने 35 मतदानामध्ये निवडणूक होणार आहे. 
संस्था आणि संस्थेमधून ठरावाने मतदानाचा प्रतिनिधी- 
१. अध्यक्ष, शिक्षण प्रसारक मंडळ कर्मवीर बाबासाहेब पाटील विद्यार्थी वस्तीगृह जाधव वसंत पांडुरंग
२. अध्यक्ष, बाबासो पाटील स्थानिक स्कूल कमिटी खराडे पाटील हर्षवर्धन दीपकराव
३. रयत शिक्षण संस्था कर्मवीर भाऊराव पाटील कृषी प्रत माने तुकाराम श्रीमंत
४. ट्रस्टी, आण्णासो गाडगीळ श्रीरामदेव संस्थान गोंदवले बु. परांजपे जयंत रघुनाथ
५. अध्यक्ष, जीवन शिक्षण मंदिर ठराव अप्राप्त
६. महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ सदाशिवनगर ठराव अप्राप्त
७. सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील प्रतिष्ठान (टणू) ठराव अप्राप्त
८. पळसमंडळ वि. का. स. (विकास) सो. लि. चव्हाण नामदेवराव विश्वनाथ
९. पुरंदावडे वि. का. स. (विकास) सो. लि. ढोपे देविदास महादेव
१०. गुरसाळे वि. का. स. (विकास) सो. लि. गायकवाड गुलाब मारुती
११. कोथळे वि. का. स. (विकास) सो. लि. जाधव विजय सोपान
१२. दहिवडी वि. का. स. (विकास) सो. लि. जाधव संजय दिनकर
१३. श्री शंकर सहकारी साखर कारखाना सेवकांची पतसंस्था कदम कैलास पोपट
१४. सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखाना मोहिते पाटील विजयसिंह शंकरराव
१५. फोंडशिरस वि. का. स. (विकास) सो. लि. मोहिते पाटील रणजितसिंह विजयसिंह
१६. मांडवे वि. का. स. (विकास) सो. लि. मोहिते पाटील अर्जुनसिंह मदनसिंह
१७. लोणंद वि. का. स. (विकास) सो. लि. मोहिते पोपट भगवान
१८. प्रतापसिंह मोहिते पाटील वि. का. सं. म. मिसाळ माणिकराव ज्ञानोबा
१९. वाघोली वि. का. स. (विकास) सो. लि. वाघोली मिसाळ बिभीषण जनार्दन
२०. गिरझणी वि. का. स. (विकास) सो. लि. गिरझणी मोहिते पाटील धवलसिंह प्रतापसिंह
२१. नारळाचीवाडी वि. का. स. (विकास) सो. लि. मगर चंद्रकांत विश्वनाथ
२२. मे. शेतकरी स. ख. वि. संघ लि. निंबाळकर नितीन रावसो
२३. इस्लामपूर (श्री संभाजी बाबा) वि. का. स. (विकास) सो. लि. पवार लक्ष्मण आगतराव
२४. अहिल्यादेवी वि. का. स. (विकास) सो. लि. पाटील संदीप शामदत्त
२५. नातेपुते वि. का. स. (विकास) सो. लि. पाटील अतुल राजेंद्र
२६. कारुंडे वि. का. स. (विकास) सो. लि. पाटील तानाजी सायाप्पा
२७. दहिगाव वि. का. स. (विकास) सो. लि. पाटील रामचंद्र दशरथ
२८. बोरगाव वि. का. स. (विकास) सो. लि. पाटील धीरज प्रकाशराव
२९. माळेवाडी (विजयकुमार उर्फ बाबासाहेब पाटील) वि. का. स. (विकास) सो. लि. पाटील राजकुमार विजयकुमार
३०. माणकी वि. का. स. (विकास) सो. लि. रणनवरे यशवंत भानुदास
३१. यशवंत वि. का. स. (विकास) सो. लि. रणवरे नंदकुमार सूर्यकांत
३२. एकशीव वि. का. स. (विकास) सो. लि. रुपनवर गोरख नामदेव
३३. कुरबावी वि. का. स. (विकास) सो. लि. रूपनवर संभाजी तुकाराम
३४. मोरोची वि. का. स. (विकास) सो. लि. साळुंखे सुधीर भिमराव
३५. माळखांबी वि. का. स. (विकास) सो. लि. शेळके मनोज भिमराव
३६. भांबुर्डी वि. का. स. (विकास) सो. लि. वाघमोडे शंकर यशवंत
३७. कळंबोली वि. का. स. (विकास) सो. लि. वाघमोडे संजय भीमराव
३८. शेंडेवाडी वि. का. स. (विकास) सो. लि. वाघमोडे मधुकर भानुदास असे 35 मतदार आहेत. 

Mr. Chandrakant Bhujbal

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब

============================

"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

==============================


     New Book

"महाराष्ट्रातील रणसंग्राम" पुस्तक घरपोच मिळविण्यासाठी-    

=============================
"महाराष्ट्रातील राजकारण" 


============================

"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
=============================