प्रखर विरोधकांची निवडणुकीकडे पाठ; विद्यमान संचालकांचे एकमेव प्रगती पॅनेल
पुणे- सन्मित्र सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी 25 फेब्रुवारीला मतदान होत असून पारंपारिक विरोधकांनी निवडणुकीकडे पाठ फिरवल्याने तसेच प्रमुख विरोधक उमेदवारांनी माघार घेतल्याने सत्ताधारी संचालकांच्या पॅनेलच्या विरोधात केवळ 5 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत त्यामुळे विजयाची फक्त औपचारिकता बाकी राहिलेली आहे. विद्यमान संचालकांनी एकमेव पॅनेल तयार करून त्यामध्ये युवकांना प्राधान्य देण्यात येऊन सभासदांना पुन्हा कार्य करण्याची संधी देण्याचे आवाहन करण्यात येत आहे. त्यांच्या आवाहनाला सभासद मतदारांचा भरघोष पाठींबा मिळत आहे. प्रबळ विरोधक निवडणूक रिंगणात नसल्याने सत्ताधारी संचालकांचे प्रगती पॅनेलला सभासदांचा प्रतिसाद मिळत असल्याने केवळ विजयाची औपचारिकता बाकी राहिलेली आहे.
पुणे शहरातील अग्रगण्य सहकारी बँक म्हणून नावलौकिकता प्राप्त केलेल्या सन्मित्र सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची सन 2024-2029 करीता पंचवार्षिक निवडणूक जाहीर झालेली असून रविवारी 25 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 9 ते 5 या वेळेत 11 मतदान केंद्रावर मतदान घेण्यात येणार आहे. या निवडणुकीत 13 हजार 640 मतदार मतदानासाठी पात्र आहेत. सन्मित्र सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या एकूण 17 जागांसाठी 22 अर्ज दाखल झाल्याने ही निवडणूक होत असून विद्यमान संचालकांनी प्रगती पॅनेल तयार केले असून त्यामाध्यमातून निवडणुकांना सामोरे जात आहेत.
सन्मित्र सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची सन 2024-2029 करीता पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम 22 जानेवारीला जाहीर करण्यात आला. संचालक मंडळाच्या 17 जागांसाठी ही निवडणूक होत असून यामध्ये सर्वसाधारण गटासाठी 12 जागा आहेत. अनुसुचित जाती-जमातीसाठी एक जागा, भटक्या विमुक्त जाती-जमातीसाठी एक जागा, इतर मागासवर्गीय साठी एक जागा, तसेच महिलांसाठी राखीव 2 जागा याप्रमाणे मतदारसंघ आहेत. सत्ताधारी संचालकांच्या माध्यमातून प्रगती पॅनेल तयार केले असून यामध्ये काही संचालकांच्या कुटुंबातील युवकांना यामध्ये सामावून घेतले आहे त्यामुळे युवकांना प्राधान्य देण्याचे धोरण सन्मित्र सहकारी बँकेचे मार्गदर्शक व माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर यांनी अवलंबविले आहे. त्यांच्या या भूमिकेचे देखील सभासद मतदारांकडून स्वागत केले जात आहे.
नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची मुदत 22 ते 29 जानेवारी पर्यंत होती. तर नामनिर्देशनपत्राची छाननी 30 जानेवारीला झाली असून 31 जानेवारी ते 14 फेब्रुवारी पर्यंत माघार घेण्याची मुदत होती. 14 फेब्रुवारी पर्यंत 17 जागांसाठी केवळ 22 अर्ज राहिल्याने निवडणूक नियमाप्रमाणे घेण्यात येत आहे. निवडणूक निर्णय अधिकारी श्री दिगंबर हौसारे उपनिबंधक सहकारी संस्था, पुणे शहर (4) पुणे यांच्या देखरेखीखाली निवडणूक प्रक्रिया राबविली जात आहे.
सन्मित्र सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या सन 2024-2029 करीता पंचवार्षिक निवडणूकीसाठी प्रगती पॅनेलमध्ये सर्वसाधारण गटातून कोद्रे विजय रामचंद्र, डॉ. गाढवे हेमंत दामोदर, गायकवाड सुनिल रामचंद्र, गोंधळे योगेश जयसिंग, टकले दिलीप रामदास, तुपे प्रशांत उर्फ मामा वसंतराव, धर्मावत अमोल भरत, अॅड. राऊत विजय कृष्णाजी, शिवरकर अभिजीत चंद्रकांत, शेवाळे संजय जयवंतराव, ससाणे चंद्रकांत अर्जुनराव, साळुंखे यशवंतराव शिवराम यांचा समावेश असून महिला राखीव २ जागांसाठी सौ. गिरमे सविता दिनेश व सौ. हिंगणे रेश्मा यांचा समावेश आहे. अनुसुचित जाती-जमाती १ जागेसाठी काकडे रमेश बाबुराव तर इतर मागासवर्गीय १ जागेसाठी फुलारे गणेश सुदाम आणि भटक्या विमुक्त जाती-जमाती एका जागेसाठी हाके विशाल संभाजी यांचा प्रगती पॅनेलमध्ये समावेश आहे. माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर व माजी आमदार जगन्नाथ बापू शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक लढवली जात आहे.
सन्मित्र सहकारी बँकेच्या सताधारी संचालकांच्या विरोधात पारंपारिक विरोधकांचा सूर प्रगतीमुळे मावळला असून ज्यांच्यावर विरोधी नेतृत्वाची आस होती ते महाशय ऐन निवडणुकीच्या वेळी अयोध्या येथे श्री रामाच्या दर्शनासाठी रवाना झाले होते. ही संधी साधून निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्याची विरोधकांची ओरड होती तरीही बहुतांश जणांनी अखेरच्या दिवशी नामनिर्देशन पत्र दाखल केले होते. श्री रामाचे दर्शन घेऊन येईपर्यंत केवळ एकच दिवस नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी उरला असल्याने विरोधकांना तुल्यबळ पॅनेल उभारण्यासाठी वेळेची संघीच मिळाली नाही याची खमंग चर्चा सभासद करीत असून त्यांच्या फजितीचा आस्वाद देखील घेत आहेत. सत्ताधारी संचालकांच्या प्रगती पॅनेल विरुद्ध 5 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. प्रगती पॅनेलच्या सर्व उमेदवारांचे निवडणूक चिन्ह विमान असून विमानाने विरोधांना मतदानापूर्वीच अस्मान दाखवल्याने विरोधकांना नेहमीप्रमाणे हरेराम करण्याची वेळ आली असून निवडणुकीची केवळ औपचारिकता बाकी राहिलेली आहे.
सन्मित्र सहकारी बँकेचे विद्यमान चेअरमन श्री. सुनिल गायकवाड यांनी गेल्या पंचवार्षिक कालावधीत बँकेच्या प्रगतीत आमुलाग्र बदल घडवून यशस्वी भरभराटीची वाटचाल केल्याने विद्यमान संचालक व सभासदांचा त्यांना व त्यांच्या धोरणांना पाठींबा मिळत आहे. त्यांच्या कारकीर्दीत सन्मित्र सहकारी बँकेला उल्लेखनीय कार्याबद्दल अनेक पुरस्कार प्राप्त झाले. सन 2018 मध्ये पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक्स् असोसिएशन लि. पुणे यांच्या तर्फे सर्वाधिक सेवकांना प्रशिक्षण देणारी बँक म्हणून आपल्या सन्मित्र सहकारी बँकेला केंद्रीय मंत्री मा. नितीन गडकरी साहेब यांच्या हस्ते गौरविण्यात आले होते. तर केरळ राज्यातील आपतग्रस्तांच्या मदतीकरीता, सन्मित्र सहकारी बँकेच्यावतीने रु.५१,०००/- ची देणगी “मुख्यमंत्री सहाय्यता निधी’ ला देण्यात आली होती. सन 2019 मध्ये उत्कृष्ट कामगिरी बद्दल सन्मित्र सहकारी बँकेला ‘बँको’ पुरस्कार देवून गौरवण्यात आले होते.
सर्वात महत्वाचे व उल्लेखनीय कार्य म्हणजे बँकेला स्थेर्य मिळवून देण्यासाठी मुख्यालयासाठी स्व-मालकीची भव्य वास्तू उभारण्यात आली. तसेच सन्मित्र सहकारी बँकेच्या सासवड शाखेचे स्व-मालकीच्या जागेत स्थलांतर त्यांच्या कारकीर्दीत झाल्याने विश्वसनीय नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. सन्मित्र सहकारी बँकेचे मार्गदर्शक व माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर यांनी तसेच विद्यमान संचालक श्री. चंद्रकांत ससाणे सर यांच्यासह सर्व संचालकांनी विद्यमान चेअरमन श्री.सुनिल गायकवाड यांना एकहाती काम करण्याची संधी देऊन विश्वास ठाकला तो त्यांनी सार्थ करून दाखवला असल्याचे समाधान श्री. सुनिल गायकवाड यांनी व्यक्त केले.
Mr. Chandrakant Bhujbal
POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब
============================
============================
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.
Online E-Book Download करा.
ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा-
==============================
New Book
"महाराष्ट्रातील रणसंग्राम" पुस्तक घरपोच मिळविण्यासाठी-
============================="महाराष्ट्रातील राजकारण"
============================
=============================
"महाराष्ट्रातील राजकारण"
============================
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.