Tuesday 31 May 2022

सोलापूर महापालिका निवडणुक-2022; 57 जागा महिलांसाठी राखीव

सोलापूर महापालिका निवडणुक-2022; 57 जागा महिलांसाठी राखीव

महानगरपालिकेच्या निवडणूक 2022 अनुषंगाने आज महिला आरक्षण सोडत काढण्यात आली. सोलापूर महापालिकेसाठी एकूण 38 प्रभागामार्फत 113 जागांसाठी निवडणूक होणार आहे. यामध्ये 57 जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. या 57 पैकी 8 जागा अनुसूचित जाती आणि 1 जागा अनुसूचित जमातीमधील महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्यात तर उर्वरीत 48 जागा या महिला सर्वसाधारण प्रवर्गासाठी असणार आहेत. महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 113 जागांसाठी आरक्षणाची सोडत मंगळवारी शिवछत्रपती रंगभवन सभागृहात काढण्यात आली. आयुक्त पी शिवशंकर, अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे, उपायुक्त विक्रम पाटील, नगरसचिव प्रवीण दंतकाळेयांच्यासह इतर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही आरक्षण सोडत निघाली.मूकबधिर विद्यार्थ्यांच्या हस्ते चिट्ठी काढून आरक्षण काढण्यात आले.  

- एकूण सदस्य संख्या : 113
- एकूण प्रभाग : 38 
- एकूण महिला राखीव जागा : 57
- 57 पैकी सर्वसाधारण महिला प्रवर्ग : 48
- 57 पैकी महिला अनुसुचीत जाती : 8 
- 57 पैकी महिला अनुसुचीत जमाती : 1 
अनुसुचित जाती महिलांसाठी राखीव जागा (एकूण - 8 जागा)-5 अ,  9 अ, 10 अ, 23 अ, 24 अ, 28 अ , 33 अ, 36 अ,
अनुसुचित जमाती महिलांसाठी राखीव जागा (एकूण - 1)- 35 अ
सर्वसाधारण महिला राखीव जागा (एकूण - 48)- 1ब, 2अ, 2ब, 3अ, 4अ, 4 ब, 5ब, 6अ, 6ब, 7ब , 8ब,  9ब, 10ब, 11अ, 12अ, 13अ, 13ब, 14अ, 14ब, 15अ, 15ब, 16अ, 17अ, 17ब, 18अ, 19अ, 19ब, 20अ, 21ब, 22ब, 23ब, 25अ, 25ब, 26ब, 27ब,  28ब, 29अ, 30अ, 31अ, 31ब, 32अ, 32ब, 33ब, 34अ, 35ब, 36ब, 37अ, 38ब 

असे आहे प्रभाग निहाय आरक्षण- 

प्रभाग 1 अ-अनुसूचित जाती ओपन ब-महिला ओपन क-सर्वसाधारण
प्रभाग 5 अ-अनुसूचित जाती महिला ब-महिला ओपन क-सर्वसाधारण
प्रभाग 7 अ-अनुसूचित जाती ओपन ब-महिला ओपन क-सर्वसाधारण
प्रभाग 8 अ-अनुसूचित जाती ओपन ब-महिला ओपन क-सर्वसाधारण
प्रभाग 9 अ-अनुसूचित जाती महिला ब-महिला ओपन क-सर्वसाधारण
प्रभाग 10 अ-अनुसूचित जाती महिला ब-महिला ओपन क-सर्वसाधारण
प्रभाग 21अ-अनुसूचित जाती ब-सर्वसाधारण महिला क-सर्वसाधारण
प्रभाग 22 अ-अनुसूचित जाती ओपन ब-महिला ओपन क-सर्वसाधारण
प्रभाग 23 अ-अनुसूचित जाती महिला ब-महिला ओपन क-सर्वसाधारण
प्रभाग 24 अ-अनुसूचित जाती महिला ब-सर्वसाधारण क-सर्वसाधारण
प्रभाग 26 अ-अनुसूचित जाती ओपन ब-महिला ओपन क-सर्वसाधारण
प्रभाग 27 अ-अनुसूचित जाती ब-महिला ओपन क-सर्वसाधारण
प्रभाग 28 अ-अनुसूचित जाती महिला ब-महिला ओपन क-सर्वसाधारण
प्रभाग 33 अ-अनुसूचित जाती महिला ब-महिला ओपन क-सर्वसाधारण
प्रभाग 36 अ-अनुसूचित जाती महिला ब-महिला ओपन क-सर्वसाधारण
प्रभाग 38 अ-अनुसूचित जाती ओपन ब-सर्वसाधारण महिला
प्रभाग 24 अ-अनुसूचित जाती महिला ब-अनुसूचित जमाती ओपन क-सर्वसाधारण
प्रभाग 35 अ-अनुसूचित जमाती महिला ब-महिला ओपन क-सर्वसाधारण
प्रभाग 2 अ-सर्वसाधारण महिला ब-सर्वसाधारण महिला क-सर्वसाधारण
प्रभाग 3 अ-महिला ओपन ब-सर्वसाधारण क-सर्वसाधारण
प्रभाग 4 अ-महिला ओपन ब-सर्वसाधारण महिला क-सर्वसाधारण
प्रभाग 6 अ-महिला ओपन ब-सर्वसाधारण महिला क-सर्वसाधारण
प्रभाग 11 अ-महिला ओपन ब-सर्वसाधारण क-सर्वसाधारण
प्रभाग 12 अ-महिला ओपन ब-सर्वसाधारण क-सर्वसाधारण
प्रभाग 13 अ-महिला ओपन ब-सर्वसाधारण महिला क-सर्वसाधारण
प्रभाग 14 अ-महिला ओपन ब-सर्वसाधारण महिला क-सर्वसाधारण
प्रभाग 15 अ-महिला ओपन ब-सर्वसाधारण क-सर्वसाधारण
प्रभाग 16 अ-महिला ओपन ब-सर्वसाधारण क-सर्वसाधारण
प्रभाग 17 अ-महिला ओपन ब-सर्वसाधारण महिला क-सर्वसाधारण
प्रभाग 18 अ-महिला ओपन ब-सर्वसाधारण क-सर्वसाधारण
प्रभाग 19 अ-महिला ओपन ब-सर्वसाधारण महिला क-सर्वसाधारण
प्रभाग 20 अ-महिला ओपन ब-सर्वसाधारण क-सर्वसाधारण
प्रभाग 25 अ-महिला ओपन ब-सर्वसाधारण महिला क-सर्वसाधारण
प्रभाग 29 अ-महिला ओपन ब-सर्वसाधारण क-सर्वसाधारण
प्रभाग 30 अ-महिला ओपन ब-सर्वसाधारण क-सर्वसाधारण
प्रभाग 31 अ-महिला ओपन ब-सर्वसाधारण महिला क-सर्वसाधारण
प्रभाग 32 अ-महिला ओपन ब-सर्वसाधारण महिला क-सर्वसाधारण
प्रभाग 34 अ-महिला ओपन ब-सर्वसाधारण क-सर्वसाधारण
प्रभाग 37 अ-महिला ओपन ब-सर्वसाधारण क-सर्वसाधारण
Mr. Chandrakant Bhujbal

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

उल्हासनगर महापालिका निवडणुक-2022 करीता आरक्षण जाहीर

उल्हासनगर पालिका निवडणुकीसाठी महिला आरक्षण जाहीर

आगामी उल्हासनगर महापालिका निवडणुकीसाठी महिलांसाठीचे आरक्षण जाहीर झाले असून यामध्ये अनुसूचित जातीसाठी 8, अनुसूचित जमातीसाठी 1 तर सर्वसाधारण खुल्या गटासाठी 36 जागा राखीव झाल्या आहेत. पालिकेच्या टाऊन हॉलमध्ये शालेय विद्यार्थ्यांकडून चिठ्ठी काढून ही सोडत जाहीर करण्यात आली. अनुसूचित जाती, जमाती तसेच सर्वसाधारण महिला खुला वर्ग असे मिळून एकूण 30 प्रभागांमधून 15 प्रभागांमध्ये प्रत्येकी दोन महिला नगरसेविका निवडून जाणार आहे. विशेष म्हणजे यामध्ये या आरक्षणामुळे दिग्गजांना यामध्ये कुठेही फटका बसलेला नाही. उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ. राजा दयानिधी यांच्या अध्यक्षतेखाली अतिरिक्त आयुक्त जमिर लेंगरेकर, मनिष हिवरे, श्रद्धा सकपाळ यांनी सोडत काढून मंगळवारी सकाळी टाऊन हॉल येथे आरक्षण जाहीर करण्यात आले. ही निवडणूक तीन सदस्यीय पॅनल पद्धतीने होणार असून 89 नगरसेवक निवडून जाणार आहेत. 50 टक्के आरक्षणानुसार 45 जागा या महिलांसाठी राखीव आहेत. उल्हासनगर मध्ये प्रभाग 1 अ ही एकच जागा अनुसूचित जमातीसाठी आरक्षित असून मागील निवडणुकीत ही जागा सर्वसाधारण होती, यंदा ती महिलेसाठी राखीव करण्यात आली.एकूण जागांपैकी अनुसूचित जातींसाठी 15 जागा राखीव आहेत. त्यातील महिलांच्या अनुसूचित जातींसाठी 8 जागांसाठी आरक्षण सोडत काढण्यात आली. निवडणूक आयोगाने अनूसुचित जातींसाठी 3, 4, 5, 10, 11, 13, 14, 15, 18, 19, 20, 21, 25, 27, 30 या प्रभागातील ‘अ’ जागा आरक्षित केल्या होत्या. त्यापैकी 4, 5, 13, 14, 18, 21, 25, 30 या प्रभागातील ‘अ’ जागा महिलांसाठी राखीव झाल्या आहेत. 89 पैकी 45 जागांवर महिला निवडून येणार आहेत. 36 जागा महिलांच्या सर्वसाधारण गटासाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. त्यापैकी 30 जागा थेट राज्य निवडणूक आयोगाने नेमून दिल्या होत्या. या जागा 1ब, 2अ, 3ब, 4ब, 5ब, 6अ, 7अ, 8अ, 9अ, 10ब, 11ब, 12अ, 13ब, 14ब, 15ब, 16अ, 17अ, 18ब, 19ब, 20ब, 21ब, 22अ, 23अ, 24अ, 25ब, 26अ, 27ब, 28अ, 29अ आणि 30ब ह्या जागा आयोगाने आरक्षित केल्या होत्या. सर्वसाधारण महिलांकरिता ब  वर्गाच्या 6 जागांसाठी चिठ्ठीद्वारे आरक्षण  निश्चित करण्यात आले. यामध्ये प्रभाग क्रमांक 8ब, 12ब, 22ब, 26ब, 28ब, 29ब हे प्रभाग महिलांसाठी राखीव झाले आहेत. त्यामुळे प्रभाग क्रमांक 12, 22, 26, 28, 29 या प्रभागांमध्ये सर्वसाधारण प्रवर्गातील दोन नगरसेविका निवडून येणार आहेत. तर अनु. जाती, जमाती प्रवर्गासह 10 प्रभागांमध्ये दोन नगरसेविका निवडून येणार आहेत. दोन सदस्यीय पॅनल 16 मध्ये एक महिला सर्वसाधारण आणि एक सर्वसाधारण असे आरक्षण आहे.

उल्हासनगर महापालिका निवडणुक-2022

प्रभागांची संख्या-30
सदस्य संख्या-89
अनुसूचित जमाती एकूण जागांची संख्या-०1 (महिला)
अनुसूचित जाती एकूण जागा- 15 (8 महिला)
सर्वसाधारण (ओपन कॅटेगिरी) सर्वसाधारण महिला-36
सर्वसाधारण खुल्या जागा-37
अनुसूचित जाती आरक्षित प्रभाग- 3 अ, 10 अ, 11 अ, 15 अ, 19 अ, 20 अ, 27 अ
अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव प्रभाग- 4 अ, 5 अ, 13 अ, 14 अ, 18 अ, 21 अ, 25 अ, 30 अ
अनुसूचित जमाती राखीव प्रभाग- 1 अ
सर्वसाधारण महिलांसाठी राखीव एकूण जागा- प्रभाग क्रमांक- 1 ब, 2 अ, 3 ब, 4 ब, 5 ब, 6 अ, 7 अ, 8 अ ब, 9 अ, 10 ब, 11 ब, 12 अ ब, 13 ब, 14 ब, 15 ब, 16 अ, 17 अ, 18 ब, 19 ब, 20 ब, 21 ब, 22 अ ब, 23 अ, 24 अ, 25 ब, 26 अ ब, 27 ब, 28 ब, 29 अ ब, 30 ब. वरील आरक्षण सोडून उर्वरित जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुल्या आहेत.

सध्याची पक्षीय बळ संख्या (निवडणूक 2017

भाजप-32
शिवसेना-25
काँग्रेस-1
राष्ट्रवादी-4
मनसे-0
इतर – 16

Mr. Chandrakant Bhujbal

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

नाशिक महापालिका निवडणूक - 2022 : नाशिकमध्ये 133 जागांपैकी 67 जागांवर महिला आरक्षण

नाशिकमध्ये 133 जागांपैकी 67 जागांवर महिला आरक्षण

नाशिक महापालिकेच्या सातव्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज आरक्षण सोडत निघाली. त्यात ​​​​४४ प्रभागातील १३३ पैकी ६७ जागांवर महिला आरक्षण जाहीर झाल्यामुळे बड्या - बड्या प्रस्थापित राजकारण्याची दांडी गुल झाली आहे. त्यामुळे १२२ नगरसेवकांपैकी पंधरा ते वीस प्रमुख नगरसेवकांच्या राजकीय अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. नाशिक महापालिकेसाठीची आरक्षण सोडत महापालिका आयुक्त तथा प्रशासक रमेश पवार, उपायुक्त मनोज घोडे-पाटील यांच्या उपस्थितीत पार पडली. महत्त्वाच्या जागांवर महिला आरक्षण पडल्यामुळे पंचवटी विभागात अरुण पवार, गणेश गीते, उद्धव निमसे, मच्छिंद्र सानप, जगदीश पाटील, रूची कुंभारकर, सरिता सोनवणे, रवींद्र धिवरे, वर्षा भालेराव, संतोष गायकवाड, सुनीता धनगर, पूनम सोनवणे यांची कोंडी झाली आहे. नाशिक रोड विभागात राहुल दिवे, प्रशांत दिवे, सिडकोमध्ये राकेश दोंदे ,भगवान दोंदे, सातपुरमध्ये शशिकांत जाधव, मनसेचे सलीम शेख यांना समोरासमोर लढावे लागणार आहे. महापालिकेच्या निवडणुकीसाठी यंदा 133 जागांसाठी 67 जागा या महिलांसाठी राखीव आहे. त्याचबरोबर अनुसूचित जातीसाठी 19 जागा राखीव, तर अनुसूचित जमातीसाठी 10 जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. त्यानुसार अनुसूचित जातीसाठी 19 पैकी 10 जागा महिलांसाठी राखीव, तर अनुसूचित जमातीसाठी 10 पैकी 5 जागा महिलांसाठी राखीव राहणार आहेत. उर्वरित 52 सर्वसाधारण महिला राखीव आहे. अनुसूचित जाती महिला राखीव गटासाठी चिठ्ठी या सोडतीसाठी टाकण्यात आल्यानंतर महापालिकेच्या शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते एक एक चिठ्ठी काढून अनुसूचित जाती महिलांचे आरक्षण जाहीर करण्यात आले. यामध्ये प्रभाग क्रमांक 12 अ, 14 अ, 26 अ, 41 अ, 43 अ, 35 अ, 34 अ, 44 अ, 22 अ व 27 अ अशाप्रकारे अनुसूचित जाती महिला राखीवचे आरक्षण काढण्यात आले. अनुसूचित जमाती महिला राखीवसाठी 10 जागांपैकी पाच जागांवर महिलांचे आरक्षण करण्यात आले. यामध्ये प्रभाग क्रमांक 7 ब, 11 ब, 34 ब, 4अ, 2 अ अशाप्रकारे महिला अनुसूचित जमातीच्या जागांचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. ही आरक्षण सोडत पहिल्या टप्प्यातील असून, उर्वरित टप्प्यातील आरक्षण सोडतीची प्रक्रिया सुरू होती. सर्वसाधारण महिला गटाचे आरक्षण जाहीर करण्यात आले. त्यामध्ये 1 ब, 2 ब, 3 ब, 4 ब, 5 अ, 6 अ, 8 अ, 8 ब, 9 अ, 10 अ, 12 ब, 13 अ, 14 ब, 15 ब, 16 अ, 17 अ, 18 अ, 19 अ, 20 ब, 21 अ, 22 ब, 23 ब, 24 ब, 25 ब, 26 ब, 28 ब, 29 अ, 30 अ, 31 अ, 32 अ, 23 अ, 25 ब, 26 अ, 37 अ, 38 अ, 39 ब, 40 अ, 41 ब, 42 ब व 43 ब अशा एकूण 40 सर्वसाधारण महिलांचे आरक्षण काढण्यात आले.

प्रवर्गनिहाय महिला व सर्वसाधारण आरक्षण-

१) प्रभाग क्रमांक १
अ - अनुसूचित जमाती
ब - सर्वसाधारण महिला
क - सर्वसाधारण
२) प्रभाग क्रमांक २
अ - अनुसूचित जमाती(महिला)
ब - सर्वसाधारण महिला
क - सर्वसाधारण
३) प्रभाग क्रमांक ३
अ- अनुसूचित जाती ( खुला)
ब. - सर्वसाधारण महिला
क - सर्वसाधारण
४) प्रभाग क्रमांक ४
अ - अनुसूचित जमाती (महिला)
ब - सर्वसाधारण महिला
क - सर्वसाधारण
५) प्रभाग क्रमांक ५
अ - सर्वसाधारण महिला
ब - सर्वसाधारण महिला
क - सर्वसाधारण
६) प्रभाग क्रमांक ६
अ - सर्वसाधारण महिला
ब - सर्वसाधारण
क - सर्वसाधारण
७) प्रभाग क्रमांक ७
अ - अनुसूचित जाती
ब - अनुसूचित जमाती (महिला)
क - सर्वसाधारण
८) प्रभाग क्रमांक ८
अ - सर्वसाधारण महिला
ब - सर्वसाधारण महिला
क - सर्वसाधारण
ड - सर्वसाधारण
९) प्रभाग क्रमांक ९
अ - सर्वसाधारण महिला
ब - सर्वसाधारण
क - सर्वसाधारण
१०) प्रभाग क्रमांक १०
अ - सर्वसाधारण महिला
ब - सर्वसाधारण महिला
क - सर्वसाधारण
११) प्रभाग क्रमांक ११
अ- अनुसूचित जाती
ब- अनुसूचित जमाती(महिला)
क- सर्वसाधारण
१२) प्रभाग क्रमांक १२
अ - अनुसूचित जाती ( महिला)
ब - सर्वसाधारण महिला
क - सर्वसाधारण
१३) प्रभाग क्रमांक १३
अ - सर्वसाधारण महिला
ब - सर्वसाधारण
क - सर्वसाधारण
१४) प्रभाग क्रमांक १४
अ - अनुसूचित जाती( महिला)
ब - सर्वसाधारण महिला
क - सर्वसाधारण
१५) प्रभाग क्रमांक १५
अ - अनुसूचित जाती
ब - सर्वसाधारण महिला
क - सर्वसाधारण
१६) प्रभाग क्रमांक १६
अ - सर्वसाधारण महिला
ब - सर्वसाधारण महिला
क - सर्वसाधारण
१७) प्रभाग क्रमांक १७
अ - सर्वसाधारण महिला
ब - सर्वसाधारण
क - सर्वसाधारण
१८) प्रभाग क्रमांक १८
अ - सर्वसाधारण महिला
ब - सर्वसाधारण महिला
क - सर्वसाधारण
१९) प्रभाग क्रमांक १९
अ - सर्वसाधारण महिला
ब - सर्वसाधारण
क - सर्वसाधारण
२०) प्रभाग क्रमांक २०
अ - अनुसूचित जाती ( खुला)
ब - सर्वसाधारण महिला
क - सर्वसाधारण महिला
२१) प्रभाग क्रमांक २१
अ - सर्वसाधारण महिला
ब - सर्वसाधारण महिला
क - सर्वसाधारण
२२) प्रभाग क्रमांक २२
अ - अनुसूचित जाती(महिला)
ब - सर्वसाधारण महिला
क - सर्वसाधारण
२३) प्रभाग क्रमांक २३
अ. अनुसूचित जाती
ब. सर्वसाधारण महिला
क - सर्वसाधारण
२४) प्रभाग क्रमांक २४
अ - अनुसूचित जाती
ब - सर्वसाधारण महिला
क - सर्वसाधारण
२५) प्रभाग क्रमांक २५
अ - अनुसूचित जाती
ब - सर्वसाधारण महिला
क - सर्वसाधारण
२६) प्रभाग क्रमांक २६
अ - अनुसूचित जाती ( महिला)
ब - सर्वसाधारण महिला
क - सर्वसाधारण
२७) प्रभाग क्रमांक २७
अ - अनु जाती (महिला)
ब - अनु जमाती
क - सर्वसाधारण
२८) प्रभाग क्रमांक २८
अ - अनु जमाती
ब - सर्वसाधारण महिला
क - सर्वसाधारण
२९) प्रभाग क्रमांक २९
अ. सर्वसाधारण महिला
ब. सर्वसाधारण महिला
क. सर्वसाधारण
३०) प्रभाग क्रमांक ३०
अ - सर्वसाधारण महिला
ब - सर्वसाधारण महिला
क - सर्वसाधारण
३१) प्रभाग क्रमांक ३१
अ - सर्वसाधारण महिला
ब - सर्वसाधारण महिला
क - सर्वसाधारण
३२) प्रभाग क्रमांक ३२
अ - सर्वसाधारण महिला
ब - सर्वसाधारण महिला
क - सर्वसाधारण
३३) प्रभाग क्रमांक ३३
अ - सर्वसाधारण महिला
ब - सर्वसाधारण महिला
क - सर्वसाधारण
३४) प्रभाग क्रमांक ३४
अ - अनुसूचित जाती (महिला)
ब - अनुसूचित जमाती(महिला)
क - खुला
३५) प्रभाग क्रमांक ३५
अ - अनुसूचित जाती (महिला)
ब - सर्वसाधारण महिला
क - सर्वसाधारण
३६) प्रभाग क्रमांक ३६
अ - सर्वसाधारण महिला
ब - सर्वसाधारण महिला
क - सर्वसाधारण
३७) प्रभाग क्रमांक ३७
अ - सर्वसाधारण महिला
ब - सर्वसाधारण महिला
क - सर्वसाधारण
३८) प्रभाग क्रमांक ३८
अ - सर्वसाधारण महिला
ब - सर्वसाधारण
क - सर्वसाधारण
३९) प्रभाग क्रमांक ३९
अ - अनुसूचित जाती
ब - सर्वसाधारण महिला
क - सर्वसाधारण
४०) प्रभाग क्रमांक ४०
अ - सर्वसाधारण महिला
ब - सर्वसाधारण
क - सर्वसाधारण
४१) प्रभाग क्रमांक ४१
अ -  अनुसूचित जाती (महिला)
ब - सर्वसाधारण महिला
क - सर्वसाधारण
४२) प्रभाग क्रमांक ४२
अ - अनुसूचित जाती
ब - सर्वसाधारण महिला
क - सर्वसाधारण
४३) प्रभाग क्रमांक ४३
अ - अनु जाती( महिला)
ब - सर्वसाधारणमहिला
क - सर्वसाधारण
४४) प्रभाग क्रमांक ४४
अ - अनु जाती. ( महिला)
ब - अनु जमाती
क - सर्वसाधारण

Mr. Chandrakant Bhujbal

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक-2022 करीता आरक्षण सोडत जाहीर; 26 प्रभागांमध्ये महीलांचे वर्चस्व

आरक्षण सोडतीचा दिग्गज उमेदवारांना फटका; पर्यायांवर खल 

पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने आज आरक्षण सोडत जाहीर केली आहे. आरक्षण सोडतीचा दिग्गज उमेदवारांना फटका बसला असून प्रभाग बदलणे अथवा कुटुंबातील महिलेला प्राधान्य देणे अशा पर्यायांवर खल व चर्चेला उधान आले आहे. यामध्ये एकूण 46 प्रभागांमध्ये 26 प्रभागांमध्ये प्रत्येकी 2 जागांवर महीलांकरीता जागा राखीव झाल्याने या प्रभागांमध्ये महीलांचे वर्चस्व राहणार आहे. 70 जागा महीलांसाठी राखीव आहेत. या 26 प्रभागांमध्ये एका जागेवर पुरुष उमेदवारांना समाधान मानावे लागणार आहे. त्यामुळे उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागणार आहे. 11 प्रभागांमध्ये प्रत्येकी 2 जागांवर सर्वसाधारण गटातून पुरुष उमेदवारांना संधी मिळणार आहे. अन्य प्रभागांमध्ये अनुसूचित जाती राखीव आरक्षण असल्याने त्या प्रभागांमध्ये राखीव गटातील पुरुष उमेदवारांना संधी मिळणार आहे. आरक्षण सोडत करीता शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते चिठ्ठ्या काढण्यात आल्या. पिंपरी महापालिकेच्या नगरसेवकांची संख्या 139 असून एकूण 46 प्रभागांसाठी आरक्षण सोडत काढण्यात आली.

पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक-2022; आरक्षण व दृष्टीक्षेप-

* एकूण - 139 जागा (एकूण प्रभाग - 46)
* लोकसंख्या (2011) : 17 लाख 27 हजार 692
* अनुसूचित जातीची लोकसंख्या : 2 लाख 73 हजार 810 (15.84टक्के)
* अनुसूचित जातीसाठी आरक्षण 16 टक्के : एकूण 22 जागा (पैकी 11 महिला)
* अनुसूचित जातीसाठी राखीव प्रभाग : 29, 19, 20, 22, 43, 11, 37, 18, 29, 34, 16, 35, 17, 44, 39, 32, 46, 41, 14, 25, 38, 33
* अनुसूचित जमातीची लोकसंख्या : 36 हजार 535 (2.11 टक्के)
* अनुसूचित जमातीसाठी आरक्षण 3 टक्के : 3 जागा (पैकी 2 महिला)
* अनुसूचित जमातीसाठी राखीव प्रभाग : 41, 5 आणि 6
* सर्वसाधारण प्रभाग : 114 (पैकी 57 महिला)
* एकूण नगरसेवक संख्या : 139

पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक-2022 करीता असे आहे प्रभाग निहाय आरक्षण- 

प्रभाग क्र. 1- तळवडे-रुपीनगर-त्रिवेणीनगर
अ - सर्वसाधारण (महिला)
ब - सर्वसाधारण (महिला)
क - सर्वसाधारण
प्रभाग क्र. 2- चिखली गावठाण-मोरेवस्ती-कुदळवाडी
अ - अनुसूचित जाती
ब - सर्वसाधारण (महिला)
क - सर्वसाधारण
प्रभाग क्र. 3- मोशी, बोऱ्हाडेवाडी-जाधववाडी
अ - सर्वसाधारण (महिला)
ब -  सर्वसाधारण
क - सर्वसाधारण
प्रभाग क्र. 4- मोशी गावठाण-गंधर्वनगरी-डुडूळगाव
अ - सर्वसाधारण (महिला)
ब -  सर्वसाधारण
क - सर्वसाधारण
प्रभाग क्र. 5 चऱ्होली-चोविसावाडी-वडमुखवाडी
अ - सर्वसाधारण (महिला)
ब -  सर्वसाधारण
क - सर्वसाधारण
प्रभाग क्र. 6 दिघी-बोपखेल
अ - अनुसुचित जमाती महिला
ब - सर्वसाधारण (महिला)
क - सर्वसाधारण
प्रभाग क्र. 7 भोसरी सॅण्डविक कॉलनी
अ - सर्वसाधारण (महिला)
ब - सर्वसाधारण (महिला)
क - सर्वसाधारण
प्रभाग क्र. 8 भोसरी गावठाण-गवळीनगर-शितलबाग
अ - सर्वसाधारण (महिला)
ब - सर्वसाधारण (महिला)
क - सर्वसाधारण
प्रभाग क्र. 9 भोसरी, धावडेवस्ती-चक्रपाणी वसाहत
अ - सर्वसाधारण (महिला)
ब -  सर्वसाधारण
क - सर्वसाधारण
प्रभाग क्र. 10 भोसरी, इंद्रायणीनगर-लांडेवाडी-गव्हाणेवस्ती
अ - सर्वसाधारण (महिला)
ब -  सर्वसाधारण
क - सर्वसाधारण
प्रभाग क्र. 11 भोसरी, बालाजीनगर-लांडेवाडी-स्पाइन रस्ता
अ - अनुसूचित जाती महिला
ब - सर्वसाधारण (महिला)
क - सर्वसाधारण
प्रभाग क्र. 12 चिखली,घरकुल-नेवाळेवस्ती
अ - सर्वसाधारण (महिला)
ब - सर्वसाधारण (महिला)
क - सर्वसाधारण
प्रभाग क्र. 13 चिखली, मोरेवस्ती-म्हेत्रेवस्ती
अ - सर्वसाधारण (महिला)
ब - सर्वसाधारण (महिला)
क - सर्वसाधारण
प्रभाग क्र. 14 निगडी, यमुनानगर
अ - अनुसूचित जाती महिला
ब - सर्वसाधारण (महिला)
क - सर्वसाधारण
प्रभाग क्र. 15 संभाजीनगर-पूर्णानगर-शाहूनगर
अ - सर्वसाधारण (महिला)
ब -  सर्वसाधारण
क - सर्वसाधारण
प्रभाग क्र. 16 नेहरूनगर-विठ्ठलनगर-यशवंतनगर
अ - अनुसूचित जाती
ब - सर्वसाधारण (महिला)
क - सर्वसाधारण
प्रभाग क्र. 17 संत तुकारामनगर-महात्मा फुलेनगर
अ - अनुसूचित जाती
ब - सर्वसाधारण (महिला)
क - सर्वसाधारण
प्रभाग क्र. 18 मोरवाडी-अजमेरा कॉलनी-गांधीनगर-खराळवाडी
अ - अनुसूचित जाती महिला
ब - सर्वसाधारण (महिला)
क - सर्वसाधारण
प्रभाग क्र. 19 चिंचवड स्टेशन-मोहननगर-आनंदनगर
अ - अनुसूचित जाती महिला
ब - सर्वसाधारण (महिला)
क - सर्वसाधारण
प्रभाग क्र. 20 काळभोरनगर-रामनगर-अजंठानगर
अ - अनुसूचित जाती महिला
ब - सर्वसाधारण (महिला)
क - सर्वसाधारण
प्रभाग क्र. 21 आकुर्डी गावठाण-दत्तवाडी
अ - सर्वसाधारण (महिला)
ब - सर्वसाधारण (महिला)
क - सर्वसाधारण
प्रभाग क्र. 22 निगडी गावठाण-ओटास्किम
अ - अनुसूचित जाती 
ब - सर्वसाधारण (महिला)
क - सर्वसाधारण
प्रभाग क्र. 23 निगडी, भक्ती शक्ती-वाहतूकनगरी
अ - सर्वसाधारण (महिला)
ब -  सर्वसाधारण
क - सर्वसाधारण
प्रभाग क्र. 24 रावेत-किवळे-मामुर्डी
अ - अनुसूचित जाती महिला
ब - सर्वसाधारण (महिला)
क - सर्वसाधारण
प्रभाग क्र. 25 वाल्हेकरवाडी
अ - अनुसूचित जाती
ब - सर्वसाधारण (महिला)
क - सर्वसाधारण
प्रभाग क्र. 26 चिंचवडेनगर-बिजलीनगर-दळवीनगर
अ - सर्वसाधारण (महिला)
ब -  सर्वसाधारण
क - सर्वसाधारण
प्रभाग क्र. 27 उद्योनगर-रामकृष्ण मोरे सभागृह
अ - सर्वसाधारण (महिला)
ब - सर्वसाधारण (महिला)
क - सर्वसाधारण
प्रभाग क्र. 28 चिंचवड, केशवनगर-श्रीधरनगर
अ - सर्वसाधारण (महिला)
ब -  सर्वसाधारण
क - सर्वसाधारण
प्रभाग क्र. 29 भाटनगर-पिंपरी कॅम्प-मिलिंनदगर
अ - अनुसूचित जमाती
ब - सर्वसाधारण (महिला)
क - सर्वसाधारण
प्रभाग क्र. 30 पिंपरीगाव-वैभवनगर
अ - सर्वसाधारण (महिला)
ब - सर्वसाधारण (महिला)
क - सर्वसाधारण
प्रभाग क्र. 31 काळेवाडी-विजयनगर-नढेनगर
अ - सर्वसाधारण (महिला)
ब - सर्वसाधारण (महिला)
क - सर्वसाधारण
प्रभाग क्र. 32 काळेवाडी, तापकीरनगर-ज्योतीबानगर
अ - अनुसूचित जाती
ब - सर्वसाधारण (महिला)
क - सर्वसाधारण
प्रभाग क्र. 33 रहाटणी-तापकीरनगर
अ - सर्वसाधारण (महिला)
ब -  सर्वसाधारण
क - सर्वसाधारण
प्रभाग क्र. 34 थेरगाव, बापुजीबुवानगर-शिवतीर्थनगर
अ - अनुसूचित जाती महिला
ब - सर्वसाधारण (महिला)
क - सर्वसाधारण
प्रभाग क्र. 35 थेरगाव, बेलठिकानगर-पडवळनगर-पवारनगर
अ - अनुसूचित जाती महिला
ब - सर्वसाधारण (महिला)
क - सर्वसाधारण
प्रभाग क्र. 36 थेरगाव, गणेशनगर-संतोषनगर-पद्मजी पेपर मिल
अ - सर्वसाधारण (महिला)
ब - सर्वसाधारण (महिला)
क - सर्वसाधारण
प्रभाग क्र. 37 ताथवडे-पुनावळे
अ - अनुसूचित जाती महिला
ब - सर्वसाधारण (महिला)
क - सर्वसाधारण
प्रभाग क्र. 38 वाकड अ - अनुसूचित जाती
ब - सर्वसाधारण (महिला)
क - सर्वसाधारण
प्रभाग क्र. 39 पिंपळे निलख-वाकड
अ - अनुसूचित जाती 
ब - सर्वसाधारण (महिला)
क - सर्वसाधारण
प्रभाग क्र. 40 पिंपळे सौदागर
अ - सर्वसाधारण (महिला)
ब - सर्वसाधारण (महिला)
क - सर्वसाधारण
प्रभाग क्र. 41 पिंपळेगुरव गावठाण-वैदुवस्ती-जवळकरनगर
अ - अनुसूचित जाती महिला
ब - अनुसूचित जमाती महिला
क - सर्वसाधारण
प्रभाग क्र. 42 कासारवाडी-फुगेवाडी
अ - सर्वसाधारण (महिला)
ब - सर्वसाधारण (महिला)
क - सर्वसाधारण
प्रभाग क्र. 43 दापोडी अ - अनुसूचित जाती महिला
ब - सर्वसाधारण (महिला)
क - सर्वसाधारण
प्रभाग क्र. 44 पिंपळेगुरव-काशिदनगर-मोरया पार्क
अ - अनुसूचित जाती
ब - अनुसूचित जमाती महिला
क - सर्वसाधारण
प्रभाग क्र. 45 नवी सांगवी
अ - सर्वसाधारण (महिला)
ब -  सर्वसाधारण
क - सर्वसाधारण
प्रभाग क्र. 46 जुनी सांगवी
अ - अनुसूचित जाती
ब - सर्वसाधारण (महिला)
क - सर्वसाधारण (महिला)
ड - सर्वसाधारण

Mr. Chandrakant Bhujbal

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)




पुणे महापालिका निवडणूक-2022 करीता आरक्षण जाहीर; 29 प्रभागांमध्ये महिलाराज

16 प्रभागांमध्ये प्रत्येकी 2 जागांवर सर्वसाधारण खुला प्रवर्गामुळे पुरुषांची मक्तेदारी



पुणे महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचना अंतिम झाल्यानंतर प्रभागनिहाय ओबीसी आरक्षणाशिवाय अन्य आरक्षीत जागांसाठी सोडत काढण्यात आली. यामध्ये 16 प्रभागांमध्ये प्रत्येकी 2 जागांवर (32) सर्वसाधारण खुला प्रवर्गामुळे पुरुषांची मक्तेदारी तर 29 प्रभागांमध्ये प्रत्येकी 2 जागांवर (58) निवडणुकीनंतर महिलाराज पहावयास मिळणार आहे. ५८ प्रभागांत १७३ नगरसेवक निवडून दिले जाणार आहेत. पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी महिला आरक्षणाच्या ८७, अनुसूचित जातींसाठीच्या २३ आणि अनुसूचित जमातींसाठीच्या दोन जागांच्या आरक्षणाची सोडत काढण्यात आली. या सोडतीनंतरच ५८ पैकी ५७ प्रभागांतील आगामी लढतीचे स्वरूप स्पष्ट झाले आहे. महापालिकेतील ५८ प्रभागांत किमान एक महिला आरक्षण आहे याशिवाय उर्वरित २९ जागांसाठी ५७ प्रभागांमध्ये सोडत काढण्यात आली. दोन सदस्यांच्या प्रभागाचा महिला आरक्षणाच्या सोडतीमध्ये विचार केला नाही. त्यामुळे तीन सदस्यांच्या ५७ प्रभागांपैकी २९ ठिकाणी महिला आरक्षणाची सोडत काढण्यात आली. या व्यतिरिक्त अनुसूचित जातींसाठी २३ आणि अनुसूचित जमातींसाठी दोन जागांचे आरक्षण आहे. आरक्षणाच्या सोडतीनंतर पुरुष उमेदवारांचे भवितव्य कुठल्या प्रभागांमध्ये ठरणार, किती पुरुष माजी नगरसेवकांना पुन्हा एकदा 'माजी'च राहावे लागणार हे स्पष्ट होत आहे. अनुसूचित जातींसाठी २३ ठिकाणी आरक्षण आहे. यामधील १२ जागा या महिलांसाठी राखीव असणार आहे; तसेच अनुसूचित जमातींसाठी दोन जागा आरक्षित असून, त्यापैकी एक जागेवर महिलेला आरक्षण मिळणार आहे. महिलांसाठी एकूण ८७ जागांवर आरक्षण आहे. त्यापैकी १३ जागा अनुसूचित जाती आणि जमातींसाठी आरक्षित आहेत. अनसूचित जमातींसाठी दोन जागा आरक्षित असून, त्यामध्ये प्रभाग क्रमांक एक (धानोरी-विश्रांतवाडी) आणि प्रभाग क्रमांक १४मध्ये (पाषाण-बावधन बुद्रूक) हे आरक्षण असणार आहे. प्रभाग क्रमांक एक (धानोरी-विश्रांतवाडी) या प्रभागात अनुसूचित जाती आणि जमातींसाठी दोन आरक्षणे आहेत. पुणे महापालिकेच्या निवडणुकीत 'ओबीसीं'साठी ४७ जागा राखीव ठेवल्या जाणार होत्या. या ४७ जागांपैकी २४ जागा 'ओबीसी' महिलांसाठी आरक्षित होत्या. हे आरक्षण रद्द झाल्याने या जागा सर्व वर्गांसाठी खुल्या झाल्या आहेत. आगामी महापालिकेत 'ओबीसीं'ना या ४७ जागांवर फटका बसणार आहे. त्यामुळे 'ओबीसीं'साठीच्या जागांवर त्यांना प्रतिनिधित्व देण्याची जबाबदारी सर्वच राजकीय पक्षांवर आली आहे. महाविकास आघाडी, तसेच भारतीय जनता पक्षाने ओबीसांनी पुरेसे प्रतिनिधीत्व देण्याची घोषणा केली असली तरी प्रत्येक प्रभागात 'ओबीसी'विरोधात 'ओबीसी'च उमेदवार असेलच असे नाही. त्यामुळे ओबीसींना पुरेसे प्रतिनिधीत्व देण्याची राजकीय पक्षांची घोषणा कितपत यशस्वी होईल याबाबत शंका उपस्थित होते आहे.

पुणे महापालिका असे आहे आरक्षण?
एकूण जागा : १७३
महिला आरक्षण (५० टक्के) : ८७
अनुसूचित जाती : २३
अनुसूचित जमाती : २

अ गट

ब गट

क गट

सर्वसाधारण (महीला) 34

सर्वसाधारण (महीला) 40

सर्वसाधारण 57

अनुसूचित जाती (महिला) 12

अनुसूचित जमाती महिला 1

अनुसूचित जमाती 1

सर्वसाधारण 17

अनुसूचित जाती 11

एकूण-  58

एकूण-  58

एकूण-  57

एकूण जागा- 173

असे आहे आरक्षण?
प्रभाग क्र. 1 धानोरी-विश्रांतवाडी
अ-अनु. जाती 
ब-अनु. जमाती महिला
क -सर्वसाधारण 
प्रभाग क्र. 2 टिंगरेनगर-संजय पार्क
अ -सर्वसाधारण महिला
ब -सर्वसाधारण महिला
क -सर्वसाधारण 
प्रभाग क्र. 3 लोहगाव- विमाननगर
अ -अनु. जाती महिला
ब -सर्वसाधारण 
क -सर्वसाधारण 
प्रभाग क्र. 4 खराडी-वाघोली
अ -अनु. जाती महिला
ब -सर्वसाधारण 
क -सर्वसाधारण 
प्रभाग क्र. 5 खराडी-वडगाव शेरी
अ -सर्वसाधारण महिला
ब -सर्वसाधारण 
क -सर्वसाधारण
प्रभाग क्र. 6 वडगाव शेरी-रामवाडी
अ -सर्वसाधारण महिला
ब -सर्वसाधारण 
क -सर्वसाधारण 
प्रभाग क्र. 7  कल्याणी नगर -नागपूर चाळ
अ -अनु. जाती 
ब -सर्वसाधारण 
क -सर्वसाधारण 
प्रभाग क्र. 8 कळस-फुलेनगर
अ -अनु. जाती 
ब -सर्वसाधारण
क -सर्वसाधारण 
प्रभाग क्र. 9 येरवडा
अ -अनु. जाती महिला
ब -सर्वसाधारण
क -सर्वसाधारण 
प्रभाग क्र. 10  शिवाजीनगर गावठाण-संगमवाडी
अ -अनु. जाती महिला
ब -सर्वसाधारण 
क -सर्वसाधारण 
प्रभाग क्र. 11  बोपोडी-सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
अ -अनु. जाती 
ब -सर्वसाधारण 
क -सर्वसाधारण
प्रभाग क्र. 12 औंध-बालेवाडी
अ -अनु. जाती 
ब -सर्वसाधारण 
क -सर्वसाधारण 
प्रभाग क्र. 13 बाणेर-सुस-म्हाळुंगे
अ- सर्वसाधारण महिला
ब- सर्वसाधारण
प्रभाग क्र. 14  पाषाण-बावधन बु
अ -सर्वसाधारण 
ब -अनु. जमाती
क -सर्वसाधारण 
प्रभाग क्र. 15 गोखलेनगर- वडारवाडी
अ -सर्वसाधारण महिला
ब -सर्वसाधारण
क -सर्वसाधारण
प्रभाग क्र. 16  फर्गसन कॉलेज-एरंडवणे
अ -सर्वसाधारण महिला
ब -सर्वसाधारण 
क -सर्वसाधारण
प्रभाग क्र. 17 शनिवार पेठ-नवी पेठ
अ -सर्वसाधारण महिला
ब -सर्वसाधारण महिला
क -सर्वसाधारण
प्रभाग क्र. 18  शनिवारवाडा-कसबा पेठ
अ -सर्वसाधारण महिला
ब -सर्वसाधारण 
क -सर्वसाधारण 
प्रभाग क्र. 19  छ. शिवाजी म. स्टेडियम-रास्ता पेठ
अ -अनु. जाती 
ब -सर्वसाधारण महिला
क -सर्वसाधारण
प्रभाग क्र. 20 पुणे स्टेशन-मा. रमाबाई आंबेडकर रोड
अ- अनु. जाती महिला
ब -सर्वसाधारण 
क -सर्वसाधारण 
प्रभाग क्र. 21 कोरेगाव पार्क-मुंढवा
अ -अनु. जाती महिला
ब -सर्वसाधारण 
क -सर्वसाधारण
प्रभाग क्र. 22 मांजरी बु.-शेवाळेवाडी
अ -अनु. जाती 
ब -सर्वसाधारण महिला
क -सर्वसाधारण
प्रभाग क्र. 23 साडेसतरा नळी-आकाशवाणी
अ -सर्वसाधारण महिला
ब -सर्वसाधारण महिला
क -सर्वसाधारण
प्रभाग क्र. 24 मगरपट्टा-साधना विद्यालय
अ -सर्वसाधारण महिला
ब -सर्वसाधारण महिला
क -सर्वसाधारण 
प्रभाग क्र. 25 हडपसर गावठाण-सातववाडी
अ -सर्वसाधारण महिला
ब -सर्वसाधारण महिला
क -सर्वसाधारण 
प्रभाग क्र. 26 वानवडी गावठाण-वैदूवाडी
अ -अनु. जाती महिला
ब -सर्वसाधारण
क -सर्वसाधारण 
प्रभाग क्र. 27 कासेवाडी-लोहियानगर
अ -अनु. जाती 
ब -सर्वसाधारण महिला
क -सर्वसाधारण 
प्रभाग क्र. 28  महात्मा फुले स्मारक-भवानी पेठ
अ -सर्वसाधारण महिला
ब -सर्वसाधारण 
क -सर्वसाधारण 

प्रभाग क्र. 29 घोरपडे उद्यान-महात्मा फुले मंडई
अ - सर्वसाधारण महिला
ब - सर्वसाधारण महिला
क - सर्वसाधारण 
प्रभाग क्र. 30 जय भवानी नगर-केळेवाडी
अ - सर्वसाधारण महिला
ब - सर्वसाधारण
क - सर्वसाधारण
प्रभाग क्र. 31 कोथरूड गावठाण-शिवतीर्थनगर
अ - सर्वसाधारण महिला
ब - सर्वसाधारण 
क - सर्वसाधारण 
प्रभाग क्र. 32 भुसारी कॉलनी-बावधन खु.
अ - सर्वसाधारण महिला
ब - सर्वसाधारण महिला
क - सर्वसाधारण
प्रभाग क्र. 33 आयडियल कॉलनी- महात्मा सोसायटी
अ - सर्वसाधारण महिला
ब - सर्वसाधारण 
क - सर्वसाधारण
प्रभाग क्र. 34 वारजे-कोंढवे धावडे
अ - सर्वसाधारण महिला
ब - सर्वसाधारण 
क - सर्वसाधारण 
प्रभाग क्र. 35 रामनगर-उत्तमनगर
अ - सर्वसाधारण महिला
ब - सर्वसाधारण महिला
क - सर्वसाधारण
प्रभाग क्र. 36 कर्वेनगर
अ - सर्वसाधारण महिला
ब - सर्वसाधारण महिला
क - सर्वसाधारण 
प्रभाग क्र. 37 जनता वसाहत-दत्तवाडी
अ - अनु. जाती 
ब - सर्वसाधारण महिला
क - सर्वसाधारण 
प्रभाग क्र. 38 शिवदर्शन-पद्मावती
अ - अनु. जाती 
ब - सर्वसाधारण महिला
क - सर्वसाधारण 
प्रभाग क्र. 39 मार्केटयार्ड-महर्षीनगर
अ - अनु. जाती महिला
ब - सर्वसाधारण
क - सर्वसाधारण
प्रभाग क्र. 40  बिबवेवाडी-गंगाधम
अ - सर्वसाधारण महिला
ब - सर्वसाधारण महिला
क - सर्वसाधारण 
प्रभाग क्र. 41 कोंढवा खु.-मिठानगर
अ - सर्वसाधारण महिला
ब - सर्वसाधारण
क - सर्वसाधारण 
प्रभाग क्र. 42 रामटेकडी-सय्यदनगर
अ - अनु. जाती महिला
ब - सर्वसाधारण
क - सर्वसाधारण 
प्रभाग क्र. 43 वानवडी-कौसरबाग
अ - सर्वसाधारण महिला
ब - सर्वसाधारण महिला
क - सर्वसाधारण 
प्रभाग क्र. 44 काळे बोराटेनगर-ससाणेनगर
अ - सर्वसाधारण महिला
ब - सर्वसाधारण
क - सर्वसाधारण 
प्रभाग क्र. 45 फुरसुंगी
अ - सर्वसाधारण महिला
ब - सर्वसाधारण
क - सर्वसाधारण 
प्रभाग क्र. 46 मोहमंदवाडी-उरुळी देवाची
अ - अनु. जाती महिला
ब - सर्वसाधारण
क - सर्वसाधारण
प्रभाग क्र. 47 कोंढवा बु.-येवलेवाडी
अ - अनु. जाती महिला
ब - सर्वसाधारण
क - सर्वसाधारण
प्रभाग क्र. 48 अप्पर सुपर इंदिरानगर
अ - अनु. जाती महिला
ब - सर्वसाधारण 
क - सर्वसाधारण
प्रभाग क्र. 49 बालाजी नगर-शंकर महाराजमठ
अ - सर्वसाधारण महिला
ब - सर्वसाधारण महिला
क - सर्वसाधारण
प्रभाग क्र. 50  सहकारनगर-तळजाई
अ - अनु. जाती
ब - सर्वसाधारण 
क - सर्वसाधारण 
प्रभाग क्र. 51 वडगाव बु.- माणिकबाग
अ - सर्वसाधारण महिला
ब - सर्वसाधारण 
क - सर्वसाधारण
प्रभाग क्र. 52 नांदेड सिटी-सनसिटी
अ - सर्वसाधारण महिला
ब - सर्वसाधारण महिला
क - सर्वसाधारण 
प्रभाग क्र. 53 खडकवासला-नर्हे
अ - सर्वसाधारण महिला
ब - सर्वसाधारण महिला
क - सर्वसाधारण
प्रभाग क्र. 54 धायरी-आंबेगाव
अ - सर्वसाधारण महिला
ब - सर्वसाधारण
क - सर्वसाधारण
प्रभाग क्र. 55 धनकवडी-आंबेगाव पठार
अ - सर्वसाधारण महिला
ब - सर्वसाधारण महिला
क - सर्वसाधारण
प्रभाग क्र. 56 चैतन्यनगर-भारती विद्यापीठ
अ - सर्वसाधारण महिला
ब - सर्वसाधारण महिला
क - सर्वसाधारण
प्रभाग क्र. 57 सुखसागरनगर-राजीव गांधीनगर
अ - सर्वसाधारण महिला
ब - सर्वसाधारण महिला
क - सर्वसाधारण
प्रभाग क्र. 58 कात्रज-गोकुळनगर
अ - सर्वसाधारण महिला
ब - सर्वसाधारण
क - सर्वसाधारण 

Mr. Chandrakant Bhujbal

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

Saturday 21 May 2022

समर्पित आयोगाच्या भेटीकडे नागरीकांचा अत्यल्प प्रतिसाद

मध्यप्रदेशच्या धर्तीवर सर्वेक्षण करा- 'प्राब' ची मागणी

(ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी नियुक्त समर्पित आयोगाने पुणे विभागातील नागरिकांची मते जाणून घेतली. यावेळी पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब) या संस्थेतर्फे संचालक चंद्रकांत भुजबळ यांनी निवेदन व पुस्तक दिले, सदर निवेदन स्वीकारताना समर्पित आयोगाचे सदस्य मा.श्री. एच. बी. पटेल (सेवानिवृत्त प्रधान सचिव, न्याय व विधी विभाग) सदस्य मा.श्री. नरेश गीते (सेवानिवृत्त आयएएस अधिकारी), यावेळी मा.श्री. रवि चौधरी, मा.श्री.पंढरीनाथ बनकर उपस्थित होते.)

मार्गदर्शनासाठी मध्यप्रदेशच्या आयोगाचा अहवाल अभ्यासावा...

पुणे- समर्पित आयोगाच्या भेटीकडे नागरीकांचा अत्यल्प प्रतिसाद मिळाला असून प्रमुख राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी पाठ फिरवली आहे. दरम्यान राज्यातील ओबीसींचे स्थगित झालेले स्थानिक स्वराज्य संस्थांचे राजकीय आरक्षण पुन्हा पूर्ववत होण्यासाठी ट्रिपल टेस्ट साठी नियुक्त केलेले समर्पित आयोगाने मध्यप्रदेशच्या धर्तीवर अहवालाचे काम करावे यासाठी मा. सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेला अहवाल प्रत मार्गदर्शनासाठी समर्पित आयोगाने अभ्यासावी असे आवाहन केले. मध्यप्रदेशच्या धर्तीवर समर्पित आयोगाने कार्यपद्धती अवलंबावी असे देखील आवाहन पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब) या संस्थेतर्फे करण्यात आलेले आहे. समर्पित आयोगाचे नकारार्थी पद्धतीचे काम सुरु असल्याने ओबीसी संघटनांनी आवाज उठवला त्यानंतर नागरिकांची मते जाणून घेण्यासाठी आयोग 2 महिन्यानंतर राज्यभरात धावता दौरा करीत आहे. ओबीसी मंत्री विजय वड्डेटीवार परदेशात तर समर्पित आयोगाची धावती सहल अशाप्रकारे राज्यातील ओबीसी संघटनांनी टीका देखील केली होती. समर्पित आयोगाकडून राज्यव्यापी 4 दिवसांचा 'मेरेथॉन' दौरा असून अवघ्या 12 तासांच्या वेळेत राज्यातील नागरिकांची मते जाणून घेणार आहे. ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी नियुक्त समर्पित आयोगाने महाराष्ट्रातील विभागानुसार नागरिकांची मते जाणून घेण्यासाठी आजपासून पुण्यातून प्रारंभ केला. पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात सकाळी 9.30 ते 11.30 ही वेळ निश्चित करण्यात आलेली होती. भेटीपूर्वी नोंदणी करण्याचे आवाहन देखील केले होते मात्र पुणे विभागातील 5 जिल्ह्यांमधून निवडक राजकीय पक्ष व ओबीसी संघटनांनी उपस्थिती दर्शवून निवेदनाद्वारे प्रत्यक्ष भेटीत मते मांडली. समर्पित आयोगाच्या भेटीकडे नागरीकांचा अत्यल्प प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. प्रमुख राजकीय पक्षांनी तसेच काही ओबीसी संघटनांकडून समर्पित आयोगाच्या भेटीकडे दुर्लक्ष केले आहे. सोलापूर, सातारा, कोल्हापूर, सांगली आणि पुणे जिल्ह्यातील नागरिकांसाठी 2 तासांचा वेळ समर्पित आयोगाकडून देण्यात आलेला होता. भेटी पूर्व नोंदणी केवळ 100 ते 125 नागरिकांनी प्रतिसाद दिला तर 5 जिल्ह्यांमधील 3 जिल्ह्यातून एकही निवेदन अथवा नागरिक उपस्थित नव्हते. यावरून समर्पित आयोगाच्या धावत्या दौऱ्यातून काही निष्पन्न होईल अशी साशंका ओबीसी संघटनांचे प्रतिनिधी व्यक्त करीत होते. रासप व कॉंग्रेस वगळता अन्य राजकीय पक्ष प्रतिनिधी समर्पित आयोगाकडे मत मांडण्यासाठी आले नाहीत त्यांनी पाठ फिरवली आहे. अन्य विभागांच्या दौऱ्यात देखील कसा प्रतिसाद मिळतो हे देखील पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. पुणे येथील विभागीय कार्यालयात समर्पित आयोगाच्या सहा सदस्यांची स्वतंत्रपणे तीन पथके तयार करून नागरिकांची मते जाणून घेतली यामध्ये ओबीसी संघटनांच्या प्रतिनिधींचा समावेश होता.

समर्पित आयोगाकडून भेटीचे वेळापत्रक

विभाग

दिनांक

भेटीची वेळ

कालावधी

पुणे

21 मे 2022

सकाळी 9.30 ते 11.30

तास

औरंगाबाद

22 मे 2022

सकाळी 9.30 ते 11.30

तास

नाशिक

सायं. 5.30 ते 7.30

कोकण भवन

25 मे 2022

दुपारी 2.30 ते 4.30

तास

अमरावती

28 मे 2022

सकाळी 9.30 ते 11.30

तास

नागपूर

सायं. 4.30 ते 6.30

भेटीचे ठिकाण- विभागीय आयुक्त कार्यालय-   भेटीसाठी दिनांकपूर्व नोंदणी आवश्यक

     ओबीसी राजकीय आरक्षणासाठी नियुक्त केलेल्या समर्पित आयोगाने महाराष्ट्रातील नागरिकांची मते जाणून घेण्यासाठी राज्यातील विभाग निहाय 6 विभागीय कार्यालयात प्रत्येकी 2 तासांचा वेळ दिलेला असून त्या दिनांकास तमाम ओबीसी, भटके-विमुक्त जातीच्या बांधवानी आपापल्या संस्था, संघटना, वैयक्तीकरीत्या राजकीय आरक्षण मिळण्याकामी निवेदने, म्हणणे मांडावे असे आवाहन ओबीसी वेल्फेअर फौंडेशन संस्थेने केलेले आहे. ओबीसी वेल्फेअर फौंडेशन तर्फे श्री. मृणाल ढोलेपाटील व अॅॅड  मंगेश ससाणे यांनी निवेदन दिले.
      राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नागरिकांच्या मागास प्रवर्गातील आरक्षणासाठी जनतेची मते जाणून घेण्यासाठी आणि या क्षेत्रात काम करणा-या विविध सामाजिक संघटना यांची निवेदने स्वीकारण्यासाठी या समर्पित आयोगाने विभागावर कार्यक्रम जाहीर केला आहे. या समर्पित आयोगाच्या भेटीच्या वेळी आपली मते नागरिकांना वेळेत मांडता यावीत आणि निवेदन देता यावेत यासाठी संबंधित विभागीय आयुक्त कार्यालयात आपल्या नावाची नोंदणी भेटीच्या दिनांकापूर्वी करावी असे आयोगातर्फे प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे. यासाठी पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात २१ मे रोजी सकाळी ९.३० ते ११.३० या वेळेत, औरंगाबाद विभागीय कार्यालयात २२ मे रोजी ९.३० ते ११.३० या वेळेत, नाशिक विभागीय कार्यालयात २२ मे रोजी ५.३० ते ७.३० या वेळेत, कोकण भवन विभागीय आयुक्त कार्यालयात २५ मे रोजी २.३० ते ४.३० या वेळेत, अमरावती विभागीय कार्यालयात २८ मे रोजी ९.३० ते ११.३० या वेळेत, नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयात २८ मे रोजी ४.३० ते ६.३० या वेळेत नागरिकांना आपली मते आयोगापुढे मांडता येतील.
----------------------------
Mr. Chandrakant Bhujbal

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)