मध्यप्रदेशच्या धर्तीवर सर्वेक्षण करा- 'प्राब' ची मागणी
(ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी नियुक्त समर्पित आयोगाने पुणे विभागातील नागरिकांची मते जाणून घेतली. यावेळी पॉलिटीकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) या संस्थेतर्फे संचालक चंद्रकांत भुजबळ यांनी निवेदन व पुस्तक दिले, सदर निवेदन स्वीकारताना समर्पित आयोगाचे सदस्य मा.श्री. एच. बी. पटेल (सेवानिवृत्त प्रधान सचिव, न्याय व विधी विभाग) सदस्य मा.श्री. नरेश गीते (सेवानिवृत्त आयएएस अधिकारी), यावेळी मा.श्री. रवि चौधरी, मा.श्री.पंढरीनाथ बनकर उपस्थित होते.)मार्गदर्शनासाठी मध्यप्रदेशच्या आयोगाचा अहवाल अभ्यासावा...
पुणे- समर्पित आयोगाच्या भेटीकडे नागरीकांचा अत्यल्प प्रतिसाद मिळाला असून प्रमुख राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी पाठ फिरवली आहे. दरम्यान राज्यातील ओबीसींचे स्थगित झालेले स्थानिक स्वराज्य संस्थांचे राजकीय आरक्षण पुन्हा पूर्ववत होण्यासाठी ट्रिपल टेस्ट साठी नियुक्त केलेले समर्पित आयोगाने मध्यप्रदेशच्या धर्तीवर अहवालाचे काम करावे यासाठी मा. सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेला अहवाल प्रत मार्गदर्शनासाठी समर्पित आयोगाने अभ्यासावी असे आवाहन केले. मध्यप्रदेशच्या धर्तीवर समर्पित आयोगाने कार्यपद्धती अवलंबावी असे देखील आवाहन पॉलिटीकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) या संस्थेतर्फे करण्यात आलेले आहे. समर्पित आयोगाचे नकारार्थी पद्धतीचे काम सुरु असल्याने ओबीसी संघटनांनी आवाज उठवला त्यानंतर नागरिकांची मते जाणून घेण्यासाठी आयोग 2 महिन्यानंतर राज्यभरात धावता दौरा करीत आहे. ओबीसी मंत्री विजय वड्डेटीवार परदेशात तर समर्पित आयोगाची धावती सहल अशाप्रकारे राज्यातील ओबीसी संघटनांनी टीका देखील केली होती. समर्पित आयोगाकडून राज्यव्यापी 4 दिवसांचा 'मेरेथॉन' दौरा असून अवघ्या 12 तासांच्या वेळेत राज्यातील नागरिकांची मते जाणून घेणार आहे. ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी नियुक्त समर्पित आयोगाने महाराष्ट्रातील विभागानुसार नागरिकांची मते जाणून घेण्यासाठी आजपासून पुण्यातून प्रारंभ केला. पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात सकाळी 9.30 ते 11.30 ही वेळ निश्चित करण्यात आलेली होती. भेटीपूर्वी नोंदणी करण्याचे आवाहन देखील केले होते मात्र पुणे विभागातील 5 जिल्ह्यांमधून निवडक राजकीय पक्ष व ओबीसी संघटनांनी उपस्थिती दर्शवून निवेदनाद्वारे प्रत्यक्ष भेटीत मते मांडली. समर्पित आयोगाच्या भेटीकडे नागरीकांचा अत्यल्प प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. प्रमुख राजकीय पक्षांनी तसेच काही ओबीसी संघटनांकडून समर्पित आयोगाच्या भेटीकडे दुर्लक्ष केले आहे. सोलापूर, सातारा, कोल्हापूर, सांगली आणि पुणे जिल्ह्यातील नागरिकांसाठी 2 तासांचा वेळ समर्पित आयोगाकडून देण्यात आलेला होता. भेटी पूर्व नोंदणी केवळ 100 ते 125 नागरिकांनी प्रतिसाद दिला तर 5 जिल्ह्यांमधील 3 जिल्ह्यातून एकही निवेदन अथवा नागरिक उपस्थित नव्हते. यावरून समर्पित आयोगाच्या धावत्या दौऱ्यातून काही निष्पन्न होईल अशी साशंका ओबीसी संघटनांचे प्रतिनिधी व्यक्त करीत होते. रासप व कॉंग्रेस वगळता अन्य राजकीय पक्ष प्रतिनिधी समर्पित आयोगाकडे मत मांडण्यासाठी आले नाहीत त्यांनी पाठ फिरवली आहे. अन्य विभागांच्या दौऱ्यात देखील कसा प्रतिसाद मिळतो हे देखील पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. पुणे येथील विभागीय कार्यालयात समर्पित आयोगाच्या सहा सदस्यांची स्वतंत्रपणे तीन पथके तयार करून नागरिकांची मते जाणून घेतली यामध्ये ओबीसी संघटनांच्या प्रतिनिधींचा समावेश होता.
समर्पित आयोगाकडून भेटीचे वेळापत्रक
विभाग | दिनांक | भेटीची वेळ | कालावधी |
पुणे | 21 मे 2022 | सकाळी 9.30 ते 11.30 | 2 तास |
औरंगाबाद | 22 मे 2022 | सकाळी 9.30 ते 11.30 | 4 तास |
नाशिक | सायं. 5.30 ते 7.30 |
कोकण भवन | 25 मे 2022 | दुपारी 2.30 ते 4.30 | 2 तास |
अमरावती | 28 मे 2022 | सकाळी 9.30 ते 11.30 | 4 तास |
नागपूर | सायं. 4.30 ते 6.30 |
भेटीचे ठिकाण- विभागीय आयुक्त कार्यालय- भेटीसाठी दिनांकपूर्व नोंदणी आवश्यक |
ओबीसी राजकीय आरक्षणासाठी नियुक्त केलेल्या समर्पित आयोगाने महाराष्ट्रातील नागरिकांची मते जाणून घेण्यासाठी राज्यातील विभाग निहाय 6 विभागीय कार्यालयात प्रत्येकी 2 तासांचा वेळ दिलेला असून त्या दिनांकास तमाम ओबीसी, भटके-विमुक्त जातीच्या बांधवानी आपापल्या संस्था, संघटना, वैयक्तीकरीत्या राजकीय आरक्षण मिळण्याकामी निवेदने, म्हणणे मांडावे असे आवाहन ओबीसी वेल्फेअर फौंडेशन संस्थेने केलेले आहे. ओबीसी वेल्फेअर फौंडेशन तर्फे श्री. मृणाल ढोलेपाटील व अॅॅड मंगेश ससाणे यांनी निवेदन दिले. राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नागरिकांच्या मागास प्रवर्गातील आरक्षणासाठी जनतेची मते जाणून घेण्यासाठी आणि या क्षेत्रात काम करणा-या विविध सामाजिक संघटना यांची निवेदने स्वीकारण्यासाठी या समर्पित आयोगाने विभागावर कार्यक्रम जाहीर केला आहे. या समर्पित आयोगाच्या भेटीच्या वेळी आपली मते नागरिकांना वेळेत मांडता यावीत आणि निवेदन देता यावेत यासाठी संबंधित विभागीय आयुक्त कार्यालयात आपल्या नावाची नोंदणी भेटीच्या दिनांकापूर्वी करावी असे आयोगातर्फे प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे. यासाठी पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात २१ मे रोजी सकाळी ९.३० ते ११.३० या वेळेत, औरंगाबाद विभागीय कार्यालयात २२ मे रोजी ९.३० ते ११.३० या वेळेत, नाशिक विभागीय कार्यालयात २२ मे रोजी ५.३० ते ७.३० या वेळेत, कोकण भवन विभागीय आयुक्त कार्यालयात २५ मे रोजी २.३० ते ४.३० या वेळेत, अमरावती विभागीय कार्यालयात २८ मे रोजी ९.३० ते ११.३० या वेळेत, नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयात २८ मे रोजी ४.३० ते ६.३० या वेळेत नागरिकांना आपली मते आयोगापुढे मांडता येतील.
----------------------------
Mr. Chandrakant Bhujbal
POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब)
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.