Tuesday, 31 May 2022

उल्हासनगर महापालिका निवडणुक-2022 करीता आरक्षण जाहीर

उल्हासनगर पालिका निवडणुकीसाठी महिला आरक्षण जाहीर

आगामी उल्हासनगर महापालिका निवडणुकीसाठी महिलांसाठीचे आरक्षण जाहीर झाले असून यामध्ये अनुसूचित जातीसाठी 8, अनुसूचित जमातीसाठी 1 तर सर्वसाधारण खुल्या गटासाठी 36 जागा राखीव झाल्या आहेत. पालिकेच्या टाऊन हॉलमध्ये शालेय विद्यार्थ्यांकडून चिठ्ठी काढून ही सोडत जाहीर करण्यात आली. अनुसूचित जाती, जमाती तसेच सर्वसाधारण महिला खुला वर्ग असे मिळून एकूण 30 प्रभागांमधून 15 प्रभागांमध्ये प्रत्येकी दोन महिला नगरसेविका निवडून जाणार आहे. विशेष म्हणजे यामध्ये या आरक्षणामुळे दिग्गजांना यामध्ये कुठेही फटका बसलेला नाही. उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ. राजा दयानिधी यांच्या अध्यक्षतेखाली अतिरिक्त आयुक्त जमिर लेंगरेकर, मनिष हिवरे, श्रद्धा सकपाळ यांनी सोडत काढून मंगळवारी सकाळी टाऊन हॉल येथे आरक्षण जाहीर करण्यात आले. ही निवडणूक तीन सदस्यीय पॅनल पद्धतीने होणार असून 89 नगरसेवक निवडून जाणार आहेत. 50 टक्के आरक्षणानुसार 45 जागा या महिलांसाठी राखीव आहेत. उल्हासनगर मध्ये प्रभाग 1 अ ही एकच जागा अनुसूचित जमातीसाठी आरक्षित असून मागील निवडणुकीत ही जागा सर्वसाधारण होती, यंदा ती महिलेसाठी राखीव करण्यात आली.एकूण जागांपैकी अनुसूचित जातींसाठी 15 जागा राखीव आहेत. त्यातील महिलांच्या अनुसूचित जातींसाठी 8 जागांसाठी आरक्षण सोडत काढण्यात आली. निवडणूक आयोगाने अनूसुचित जातींसाठी 3, 4, 5, 10, 11, 13, 14, 15, 18, 19, 20, 21, 25, 27, 30 या प्रभागातील ‘अ’ जागा आरक्षित केल्या होत्या. त्यापैकी 4, 5, 13, 14, 18, 21, 25, 30 या प्रभागातील ‘अ’ जागा महिलांसाठी राखीव झाल्या आहेत. 89 पैकी 45 जागांवर महिला निवडून येणार आहेत. 36 जागा महिलांच्या सर्वसाधारण गटासाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. त्यापैकी 30 जागा थेट राज्य निवडणूक आयोगाने नेमून दिल्या होत्या. या जागा 1ब, 2अ, 3ब, 4ब, 5ब, 6अ, 7अ, 8अ, 9अ, 10ब, 11ब, 12अ, 13ब, 14ब, 15ब, 16अ, 17अ, 18ब, 19ब, 20ब, 21ब, 22अ, 23अ, 24अ, 25ब, 26अ, 27ब, 28अ, 29अ आणि 30ब ह्या जागा आयोगाने आरक्षित केल्या होत्या. सर्वसाधारण महिलांकरिता ब  वर्गाच्या 6 जागांसाठी चिठ्ठीद्वारे आरक्षण  निश्चित करण्यात आले. यामध्ये प्रभाग क्रमांक 8ब, 12ब, 22ब, 26ब, 28ब, 29ब हे प्रभाग महिलांसाठी राखीव झाले आहेत. त्यामुळे प्रभाग क्रमांक 12, 22, 26, 28, 29 या प्रभागांमध्ये सर्वसाधारण प्रवर्गातील दोन नगरसेविका निवडून येणार आहेत. तर अनु. जाती, जमाती प्रवर्गासह 10 प्रभागांमध्ये दोन नगरसेविका निवडून येणार आहेत. दोन सदस्यीय पॅनल 16 मध्ये एक महिला सर्वसाधारण आणि एक सर्वसाधारण असे आरक्षण आहे.

उल्हासनगर महापालिका निवडणुक-2022

प्रभागांची संख्या-30
सदस्य संख्या-89
अनुसूचित जमाती एकूण जागांची संख्या-०1 (महिला)
अनुसूचित जाती एकूण जागा- 15 (8 महिला)
सर्वसाधारण (ओपन कॅटेगिरी) सर्वसाधारण महिला-36
सर्वसाधारण खुल्या जागा-37
अनुसूचित जाती आरक्षित प्रभाग- 3 अ, 10 अ, 11 अ, 15 अ, 19 अ, 20 अ, 27 अ
अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव प्रभाग- 4 अ, 5 अ, 13 अ, 14 अ, 18 अ, 21 अ, 25 अ, 30 अ
अनुसूचित जमाती राखीव प्रभाग- 1 अ
सर्वसाधारण महिलांसाठी राखीव एकूण जागा- प्रभाग क्रमांक- 1 ब, 2 अ, 3 ब, 4 ब, 5 ब, 6 अ, 7 अ, 8 अ ब, 9 अ, 10 ब, 11 ब, 12 अ ब, 13 ब, 14 ब, 15 ब, 16 अ, 17 अ, 18 ब, 19 ब, 20 ब, 21 ब, 22 अ ब, 23 अ, 24 अ, 25 ब, 26 अ ब, 27 ब, 28 ब, 29 अ ब, 30 ब. वरील आरक्षण सोडून उर्वरित जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुल्या आहेत.

सध्याची पक्षीय बळ संख्या (निवडणूक 2017

भाजप-32
शिवसेना-25
काँग्रेस-1
राष्ट्रवादी-4
मनसे-0
इतर – 16

Mr. Chandrakant Bhujbal

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.