Tuesday 31 January 2023

विधानपरिषद निवडणुकीत अवैध मतदानामुळे भाजप वर्चस्व राखण्यास असमर्थ

विधानपरिषदेच्या 5 जागांसाठी 83 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद
पुणे- विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ द्विवार्षिक निवडणुकीसाठी 5 जागांसाठी 83 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. या 83 उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला 2 फेब्रुवारीला होणार आहे. पदवीधर मतदारसंघासाठी मतदानात घट झाली असून शिक्षक मतदारसंघामध्ये उत्स्फूर्तपणे मतदारांनी सहभाग नोंदविला असल्याचे मतदानाच्या प्रमाणावरून दिसून येत आहे. विधानपरिषद निवडणुकीत भाजपचेच वर्चस्व राहणार असल्याचा अंदाज वर्तविला मात्र अवैध मतदानामुळे भाजप वर्चस्व राखण्यास असमर्थ ठरला आहे. शेकापला कोकण शिक्षक मतदारसंघाची जागा राखणे कठीण असून नाशिक पदवीधरच्या निवडणुकीत कॉंग्रेसची जागा हिसकावण्यात भाजपला यश मिळणार आहे. तर औरंगाबादला राष्ट्रवादीला जागा राखून ठेवण्यास झगडावे लागले आहे. एकंदरीत सत्ताधारी भाजप-सेना शिंदे गट युतीचा या निवडणुकीत प्रभावी कामगिरी असेल असा निकाल मतदारांचा मतदानोत्तर कल व्यक्त केला होता. नागपूर शिक्षक मतदारसंघात भाजप प्रणित उमेदवार व अमरावती पदवीधर मतदारसंघात भाजपला यश मिळणार असून नाशिक पदवीधर मतदारसंघात भाजप समर्पित अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांचा विजय निश्चित होईल असा अंदाज मतदानानंतर चाचणीतून व्यक्त केला होता. दरम्यान विधानपरिषद निवडणुकीत सत्ताधारी पक्षांचा शिक्षक संघटनांवर प्रभाव असल्याचे दिसून आले. मात्र जुनी पेन्शन योजना प्रश्नच कळीचा मुद्दा ठरणार आहे. याचा फटका सत्ताधारी भाजपला बसू शकतो असाही अंदाज व्यक्त केला जात आहे. कोकण शिक्षक विधान परिषद मतदारसंघातील निवडणुकीत राज्याच्या राजकारणात एकेकाळी महत्त्वाची भूमिका बजाविलेल्या शेकापसाठी अस्तित्वाची लढाई ठरणार आहे. महाविकास आघाडीचे शेतकरी कामगार पक्षाचे बाळाराम पाटील आणि भाजप व बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचे ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्यात दुरंगी लढत होत आहे. या निवडणुकीतील निकालाचा सर्वाधिक परिणाम शेकापच्या भवितव्यावर होणार असून या निवडणुकीमुळे पनवेल पालिका, रायगड जिल्ह्यात होऊ घातलेल्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीवर याचे परिणाम होणार आहेत. शेकापचा रायगड जिल्ह्यातून एकही आमदार निवडून आला नव्हता. रायगड जिल्हा परिषदेतही पक्षाचे अस्तित्व कमी झाले. रायगड म्हणजे शेकाप हे एकेकाळचे समीकरण जवळपास संपुष्टात येऊ लागले. या पार्श्वभूमीवर कोकण शिक्षक मतदारसंघाची निवडणूक महत्त्वाची आहे. शेकापचे माजी आमदार विवेक पाटील हे गेले अनेक महिने कारागृहात आहेत. त्यांच्याशिवाय शेकापला निवडणुकीला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे सहज यश मिळणे कठीण आहे. कोकण शिक्षक मतदारसंघात प्रामुख्याने ज्ञानेश्वर म्हात्रे (भाजप), धनाजी नानासाहेब पाटील (जदयू), बाळाराम दत्तात्रय पाटील (अपक्ष) यांच्या मध्ये लढत आहे. तर नाशिक पदवीधर मतदारसंघात प्रामुख्याने सत्यजित तांबे, शुभांगी पाटील, अ‍ॅड. सुभाष जंगले (सर्व अपक्ष), रतन बनसोडे (वंचित बहुजन आघाडी) यांच्या मध्ये लढत आहे. तर औरंगाबाद शिक्षक मतदारसंघात प्रामुख्याने विक्रम काळे (राष्ट्रवादी काँग्रेस), किरण पाटील (भाजप), कालिदास माने (वंचित बहुजन आघाडी), प्रदीप सोळुंके (अपक्ष) यांच्या मध्ये लढत आहे. आणि नागपूर शिक्षक मतदारसंघात प्रामुख्याने नागो गाणार, राजेंद्र झाडे, सुधाकर आडबाले, सतीश इटकेलवार, दीपककुमार खोब्रागडे यांच्या मध्ये लढत आहे. तसेच अमरावती पदवीधर मतदारसंघात प्रामुख्याने रणजित पाटील (भाजप), धीरज लिंगाडे (काँग्रेस), अनिल अमलवार (वंचित बहुजन आघाडी) यांच्या मध्ये लढत आहे. या 5 मतदारसंघातून यापूर्वी निवडणूक आलेले श्री. सुधीर तांबे (काँग्रेस) यांनी मुलाला अपक्ष निवडणूक रिंगणात उतरवले आहे. तर नाशिक पदवीधर मतदारसंघ, श्री. विक्रम काळे (राष्ट्रवादी) औरंगाबाद शिक्षक मतदारसंघात पुन्हा लढत देत आहेत. श्री. बाळाराम पाटील (शेतकरी कामगार पक्ष) कोकण शिक्षक मतदारसंघात पुन्हा लढत देत आहेत. तसेच श्री. रणजित पाटील (भाजप) अमरावती पदवीधर मतदारसंघात पुन्हा लढत देत आहेत. श्री. नागो गाणार (महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे भाजप समर्थित) नागपूर शिक्षक मतदार मतदारसंघात पुन्हा लढत देत आहेत.
नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघात 16 उमेदवार निवडणूक रिंगणात
भाजप प्रणित सत्यजित सुधीर तांबे, संगमनेर, अपक्ष, महाविकास आघाडीच्या शुभांगी भास्कर पाटील, धुळे अपक्ष, रतन कचरु बनसोडे, नाशिक वंचित बहुजन आघाडी, सुरेश भिमराव पवार, नाशिक नॅशनल ब्लॅक पँथर पार्टी, अनिल शांताराम तेजा, अपक्ष, अन्सारी रईस अहमद अब्दुल कादीर, धुळे अपक्ष, अविनाश महादू माळी, नंदूरबार अपक्ष, इरफान मो इसहाक, मालेगाव जि.नाशिक अपक्ष, ईश्वर उखा पाटील, धुळे अपक्ष, बाळासाहेब रामनाथ घोरपडे, नाशिक, अपक्ष, अॅड. जुबेर नासिर शेख, धुळे अपक्ष, अॅड.सुभाष राजाराम जंगले, श्रीरामपुर, अपक्ष,  नितीन नारायण सरोदे, नाशिक अपक्ष, पोपट सिताराम बनकर, अहमदनगर, अपक्ष, सुभाष निवृत्ती चिंधे, अहमदनगर, अपक्ष, संजय एकनाथ माळी, जळगाव, अपक्ष असे एकूण १६ उमेदवार निवडणुक रिंगणात आहेत.

नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघ

विभाग

मतदार संख्या

झालेले मतदान

मतदानाचे प्रमाण

नाशिक

69652

31933

45.85

अहमदनगर

115638

58283

50.40

धुळे

23412

11822

50.50

जळगाव

35058

18033

51.44

नंदूरबार

18918

9385

49.61

एकूण

262678

129456

49.28

अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघात 23 उमेदवार निवडणूक रिंगणात
अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघात धीरज रामभाऊ लिंगाडे (इंडियन नॅशनल काँग्रेस), डॉ. रणजीत विठ्ठलराव पाटील (भारतीय जनता पार्टी), अनिल ओंकार अमलकार (वंचित बहुजन आघाडी), डॉ. गौरव रामदास गवई (बहुजन भारत पार्टी), तर अपक्ष म्हणून अनिल वकटूजी ठवरे, अनंतराव राघवजी चौधरी, अरुण रामराव सरनाईक, ॲड. आनंद रविंद्र राठोड, धनराज किसनराव शेंडे, ॲड. धनंजय मोहनराव तोटे, निलेश दिपकपंत पवार (राजे), उपेंद्र बाबाराव पाटील, शरद प्रभाकर झांबरे पाटील, श्याम जगमोहन प्रजापती, डॉ. प्रविण रामभाऊ चौधरी, प्रविण डिगांबर बोंद्रे, भारती ख. दाभाडे, माधुरी अरुणराव डाहारे, संदेश गौतमराव रणवीर, लक्ष्मीकांत नारायण तडसे, विकेश गोकुलराव गवाले, सुहास विठ्ठलराव ठाकरे, संदीप बाबुलाल मेश्राम आदी २३ उमेदवारांचा समावेश आहे.

अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघ

विभाग

मतदार संख्या

झालेले मतदान

मतदानाचे प्रमाण

अमरावती

57064

24749

43.37

अकोला

44506

20878

46.91

यवतमाळ

33249

19574

58.87

बुलढाणा

36497

19358

53.04

वाशिम

15044

8244

54.80

एकूण

186360

92565

49.67

औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघात 14 उमेदवार निवडणूक रिंगणात 
औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रम काळे, भाजपचे किरण पाटील, वंचित बहुजन आघाडीचे कालिदास माने यांच्यासह अपक्ष उमेदवार अनिकेत वाघचवरे पाटील, प्रा. अश्विनकुमार क्षीरसागर (के. सागर), आशिष देशमुख, कादरी शाहेद अब्दुल गफुर, नितीन कुलकर्णी, प्रदीप सोळुंके, मनोज पाटील, विशाल नांदरकर, सूर्यकांत विश्वासराव, संजय तायडे, ज्ञानोबा डुकरे असे एकूण १४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ

जिल्हा

मतदारसंख्या

मतदान

पुरुष

महिला

एकुण

प्रमाण

औरंगाबाद

8686

5157

13853

79.46

जालना

4186

851

5037

83.18

परभणी

3867

701

4568

90.17

हिंगोली

2580

480

3060

91.34

नांदेड

7083

1884

8967

86.45

लातूर

8555

2741

11296

86.88

उस्मानाबाद

4254

959

5213

92.38

बीड

7754

1954

9708

90.27

एकुण

46965

14737

61702

86.31

नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघात 22 उमेदवार निवडणूक रिंगणात
नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत सहा जिल्ह्यातील २२ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यामध्ये नागो गाणार (अपक्ष), सतिश जगताप (महाराष्ट्र विकास आघाडी पक्ष), प्रा.दीपकुमार खोब्रागडे (वंचित बहुजन आघाडी पक्ष), डॉ. देवेंद्र वानखडे (आमआदमी पक्ष), राजेंद्र झाडे (समाजवादी पक्ष (युनायटेड)), अजय भोयर (अपक्ष), सुधाकर अडबाले (अपक्ष), सतिश इटकेलवार (अपक्ष), बाबाराव उरकुडे (अपक्ष), रामराव चव्हाण (अपक्ष), रविंद्रदादा डोंगरदेव (अपक्ष), नरेश पिल्ले (विश्व हिंदू जनसत्ता बहुमत पक्ष), निमा रंगारी (बहुजन समाज पक्ष), नरेंद्र पिपरे (अपक्ष), प्रा. प्रवीण गिरडकर (अपक्ष), इंजि. प्रो. सुषमा भड (अपक्ष), राजेंद्र बागडे (अपक्ष), डॉ. विनोद राऊत (अपक्ष), उत्तम प्रकाश शहारे (अपक्ष), श्रीधर साळवे (अपक्ष), प्रा. सचिन काळबांडे (अपक्ष) आणि संजय रंगारी(अपक्ष) यांचा समावेश आहे. 

नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघ

जिल्हा

मतदार

मतदान झालेली संख्या

मतदान

संख्या

पुरुष

महिला

एकुण

प्रमाण

गडचिरोली

3211

2376

563

2939

91.53

नागपूर

16480

6338

7082

6710

81.43

भंडारा

3797

2332

1053

3385

89.15

गोंदिया

3881

2410

989

3399

87.58

वर्धा

4894

2638

1611

4249

86.82

चंद्रपूर

7571

4569

2388

6957

91.53

एकुण

22704

34349

13686

20663

88.00

कोकण विभाग शिक्षक मतदारसंघात 8 उमेदवार निवडणूक रिंगणात 
कोकण शिक्षक मतदारसंघातून 8 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यामध्ये म्हात्रे ज्ञानेश्वर बारकु (भाजप), धनाजी नानासाहेब पाटील (जदयु), उस्मान इब्राहिम रोहेकर (अपक्ष), तुषार वसंतराव भालेराव (अपक्ष), देवरुखकर रमेश नामदेव (अपक्ष), बाळाराम दत्तात्रेय पाटील (अपक्ष), प्रा.सोनवणे राजेश संभाजी (अपक्ष), संतोष मोतीराम डामसे (अपक्ष) यांचा समावेश आहे.

कोकण विभाग शिक्षक मतदारसंघ

विभाग

मतदार संख्या

पालघर

9000

ठाणे

15736

रायगड

10000

रत्नागिरी

4328

सिंधुदूर्ग

2456

एकुण

41520

झालेले मतदान

35075

मतदानाचे प्रमाण

91.02

आता दोन फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. त्यामुळे आता सर्व राजकीय पक्षांचे लक्ष 2 फेब्रुवारीला होणाऱ्या मतमोजणीकडे लागले आहेत. यामध्ये उमेदवार पहिल्या पसंतीने जिंकून येतो की दुसऱ्या पसंतीवर निकाल अवलंबून ठरतो, हे देखील पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दुसऱ्या पसंतीवर निकाल लागल्यास मतमोजणीसाठी खूप वेळ लागण्याची शक्यता आहे.

Mr. Chandrakant Bhujbal

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

"महाराष्ट्रातील राजकारण"