२९ एप्रिलला पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक
पुणे - तब्बल 24 वर्षांनी पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीला मुहूर्त मिळाला आहे. 29 एप्रिल रोजी 18 जागांसाठी मतदान होणार आहे. त्याची मतमोजणी 30 एप्रिल रोजी होऊन निकाल जाहीर करण्यात येणार आहे. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव डॉ. पी. एल. खंडागळे यांनी याबाबत परिपत्रक काढले आहे. 1999 मध्ये शेवटची निवडणूक झाली होती. सध्या मधुकांत गरड हे प्रशासकीय अधिकारी बाजार समितीचे प्रशासक आहेत.निवडणुकीसाठी मतदार यादी तयार करण्याची प्रक्रिया 16 जानेवारीपासून सुरू करण्यात येणार आहे. 15 मार्च रोजी संकेतस्थळावर अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. 2003 मध्ये निवडून आलेले प्रशासकीय मंडळ बरखास्त करण्यात आले होते. त्यानंतर निवडणूक लांबविली होती. या कालावधीत सत्तेवर आलेल्या विविध राज्य सरकारकडून ही निवडणूक लांबविण्यात आली. दरम्यान, राजकीय नेते आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय मंडळांमार्फत बाजार समितीचा कारभार सुरू आहे. निवडणूक घेण्याची मागणी विविध घटकांमधून होत होती. मात्र आता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. लवकरच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नेमणूक केली जाणार आहे. राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणाने बाजार समितीची निवडणूक घेण्याचा आदेश दिला आहे. त्यानुसार १६ जानेवारीपासून मतदार याद्या तयार करण्याचे काम सुरू होणार आहे. त्यानंतर २९ एप्रिलला मतदान घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे बाजार समितीवर लोकनियुक्त प्रशासकीय मंडळ येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडून राज्यातील निवडणुकीस पात्र २८१ कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा निवडणूक कार्यक्रम यापूर्वीच जाहीर करण्यात आला आहे. त्यात पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचा समावेश नाही. सन २००३ पासून पुणे बाजार समितीवर लोकनियुक्त संचालक मंडळ नाही. त्यामुळे प्रशासकीय मंडळासाठी निवडणूक घेण्याच्या मागणीबाबत दाखल याचिका उच्च न्यायालयात सुरू होती. या सुनावणीदरम्यान पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक घेण्यात येईल, असे राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणाने अधोरेखित केले होते. त्याअनुषंगाने आता प्राधिकरणाने निवडणुकीची घोषणा केली आहे. जानेवारी अखेरपासून १५ मार्चपर्यंत टप्प्याटप्याने मतदार याद्यांची कामे केली जणार आहेत. दरम्यान, आर्थिक अनियमितता आणि गैरव्यवहारामुळे पुणे (हवेली) कृषी उत्पन्न बाजार समितीचे तत्कालीन संचालक मंडळ जिल्हा उपनिबंधकांनी सन २००३ मध्ये बरखास्त केले होते. त्यानंतर राज्यात लोकनियुक्त संचालक मंडळ अस्तित्वात आणण्याऐवजी प्रशासक, प्रशासकीय मंडळ, पुन्हा प्रशासक आणून निवडणुका लांबविण्यात आल्या होत्या. दरम्यान महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ व त्याखालील नियम १९६७ मधील तरतूदीनुसार बाजार समितीचा कारभार निवडून आलेले संचालक मंडळ, त्यांचेमधील सभापती, उपसभापती, सदस्य व बाजार समितीचा सचिव अशा संचालक मंडळाकडून केला जातो, परंतु दि १/९/२०२० पासून श्री. मधुकांत विनायकराव गरड हे प्रशासक म्हणून कार्यरत आहेत. पुणे कृषि उत्पन्न बाजार समिती मध्ये प्रशासकीय कामकाजाच्या अनुषंगाने सर्वसाधारण वरील प्रमाणे विभाग असून, उपसचिव दर्जाचा एक अधिकारी व सहाय्यक सचिव दर्जाचे ४ अधिकारी आहेत. या व्यतिरिक्त बाजार अधीक्षक, बाजार पर्यवेक्षक, बाजार निरिक्षक,जेष्ठ लिपिक व कनिष्ठ लिपिक अशा प्रकारे निरनिराळ्या विभागात विविध अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. बाजार समिती मध्ये सद्यस्थितीत एकूण ३४८ कर्मचारी आहेत. कृषि उत्पन्न बाजार समिती पुणेची स्थापना १ मे १९५७ रोज़ी झाली व १ एप्रिल १९५९ रोजी प्रत्यक्ष कामकाजास सुरवात झाली. दिनांक १० जानेवारी २००८ रोज़ी प्रादेशिक कृषि उत्पन्न बाजार समिती पुणे या नावाने प्रादेशिक बाजार समिती म्हणून घोषित करण्यात आली आणि दिनांक ३० जानेवारी २००८ पासून कामकाजास सुरवात झाली.पुणे जिल्हा कृषि उत्पन्न बाजार समिती पुणेचे दिनांक १० मे २०१२ रोजी विभाजन होऊन पुणे कृषि उत्पन्न बाजार समिती पुणे असे घोषित करण्यात आले व त्याचा प्रत्यक्ष कामकाजास प्रारंभ दिनांक ११ मे २०१२ रोजी झाला. पुणे कृषि उत्पन्न बाजार समिती पुणे चा ,मुख्य बाजार आवार हा मार्केट यार्ड, गुलटेकडी, पुणे ३७ येथे १९० एकर जागेवर व्यापलेला आहे. पुणे कृषि उत्पन्न बाजार समिती पुणेची स्थापना महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ मधील तरतूदी नुसार झालेली आहे. बाजार समितीचा मूळ उद्देश् शेतकर्यांच्या शेतीमालांच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारात न्यायव्यवस्था प्रस्थापित करणे, व त्या अनुषंगाने गरजा पूर्ण करणे, त्याच बरोबर शेतकर्यांच्या शेतीमालाची विक्री व्यवस्था निर्माण करून शेतीमालास योग्य भाव मिळवून देणे हा आहे. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या एकूण 18 पैकी 11 उमेदवार हवेली तालुक्यातील विविध कार्यकारी सोसायटी सदस्यांच्या मतदानातून, चार उमेदवार ग्रामपंचायत सदस्यांच्या मतदानातून, दोन व्यापारी प्रतिनिधी आणि एक हमाल, तोलणार प्रतिनिधी असणार आहे.
एकूण जागा- 18
हवेली तालुका विविध कार्यकारी सोसायटी सदस्यांतून- 11
ग्रामपंचायत सदस्यांच्या मतदानातून- 04
व्यापारी प्रतिनिधीच्या मतदानातून- 02
हमाल, तोलणार प्रतिनिधीच्या मतदानातून-01
बाजार समिती निवडणूक कार्यक्रम
निवडणूक कार्यक्रम जाहीर-: २७ मार्च,
उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत-: २७ मार्च ते ३ एप्रिल,
उमेदवारी अर्जांची छाननी-: ५ एप्रिल,
वैध उमेदवारी अर्जांची यादी-: ६ एप्रिल,
अर्ज माघारीची मुदत-: ६ ते २० एप्रिल,
अंतिम यादी आणि चिन्हवाटप-: २१ एप्रिल,
मतदान-: २९ एप्रिल
मतमोजणी व निकाल-: ३० एप्रिल.
Mr. Chandrakant Bhujbal
POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब)
"महाराष्ट्रातील राजकारण"
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.