Monday, 16 January 2023

तांबेंची बंडखोरी पूर्वनियोजितच; उमेदवारीचा बेबनाव; कॉंग्रेसची जागा खेचण्यात भाजपला यश मिळणार

नाशिक पदवीधर निवडणुकीमध्ये 16 उमेदवार रिंगणात; सत्यजित तांबे आणि शुभांगी पाटील यांच्यात लढत


काँग्रेसचे मावळते आमदार डॉ. सुधीर तांबे आणि त्यांचे पुत्र सत्यजित तांबे यांची बंडखोरी पूर्वनियोजितच असल्याचे राजकीय डावपेचावरून स्पष्ट आले असून महाविकास आघाडी व भाजपकडून नाशिक पदवीधर मतदारसंघात अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यास बेबनाव केला आणि कॉंग्रेसची जागा खेचण्यात भाजपला निश्चित यश मिळेल अशी राजकीय सद्यस्थिती निर्माण झालेली आहे. ठाकरे गटाने पाठींबा दिलेल्या पाटील यांना कॉंग्रेसने नाईलाजाने पाठींबा देऊन महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून जाहीर केले आहे. नाशिक विभागाच्या पदवीधर मतदार संघासाठी 29 उमेदवारांनी 42 नामनिर्देशन पत्र दाखल केले होते. त्यापैकी 22 उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र वैध ठरले असुन आज सोमवारी (दि.16) माघारीचा दिवस असून दुपारी 3 वाजेनंतर 16 अंतिम उमेदवार निश्चित झाले आहे. काँग्रेसचे मावळते आमदार डॉ. सुधीर तांबे यांना काँग्रेसने अधिकृत उमेदवारी देऊनही त्यांनी ऐनवेळी माघार घेतल्यावर त्यांचे पुत्र सत्यजित तांबे यांनी नाट्यमयरीत्या अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता. भाजपने त्यांना पाठींबा देण्याची घाई केली नाही. दरम्यान राजकीय पक्षांकडून उमेदवारीचा बेबनाव केला तरीही नाशिक पदवीधर निवडणुकीत सत्यजीत तांबेंचेच पारडे जड असून मतदारांची नोंदणीच विजयास कारणीभूत ठरणार आहे. कारण नगर जिल्ह्यातील मतदारांवर विजयाची मदार असणार आहे. या मतदारसंघात सर्वाधिक मतदारनोंदणी तांबे यांनी केलेली आहे. त्यांना कॉंग्रेसपक्ष पाठीशी नाही म्हणून मतदानात खूप अडसर ठरेल अशी शक्यता नाही त्यामुळे त्यांचा विजय सुकर समजण्यात येत आहे. पदवीधर मतदारसंघासाठी एकूण दोन लाख ५८ हजार ३५१ उमेदवारांनी नोंदणी केलेली आहे. त्यात नगर जिल्ह्यातून एक लाख १६ हजार मतदार आहेत, तर नाशिक जिल्ह्यातून अवघे ६६ हजार ७०९ मतदार आहेत. जळगाव जिल्ह्यातून ३३ हजार, धुळे जिल्ह्यातून २२ हजार, तर नंदुरबारमधून सुमारे १९ हजार मतदारांची नोंदणी झालेली आहे. नाशिक जिल्ह्याच्या तुलनेत नगर जिल्ह्यात सुमारे ४७ हजार मतदार जास्त आहेत. यामध्ये नंदुरबार - 36 (यादी भाग 1 ते 36), धुळे - 39 (यादी भाग 37 ते 75), जळगाव - 124 (यादी भाग 76 ते 199), नाशिक - 146 (यादी भाग 297 ते 443), अहमदनगर - 98 (यादी भाग 200 ते 296) अशी यादीची स्थिती आहे. नाशिक विभागाच्या पदवीधर मतदार संघासाठी 29 उमेदवारांनी 42 नामनिर्देशन पत्र दाखल केले होते. त्यापैकी 22 उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र वैध ठरले असुन आज सोमवारी (दि.16) माघारीचा दिवस असून दुपारी 3 वाजेनंतर 16 अंतिम उमेदवार निश्चित झाले आहेत. भाजपचे उमेदवार म्हणून 4 जणांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले होते त्यांनी अपक्ष म्हणूनही नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे. यामध्ये धनंजय कृष्णा जाधव, शुभांगी भास्कर पाटील, धनराज देविदास विसपुते, घोरपडे बाळासाहेब रामनाथ यांचा समावेश आहे. पाटील यांनी बंडखोरी केली तर अन्य तिघांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. तर कॉंग्रेसचे उमेदवार म्हणून सत्यजित तांबे यांनी देखील नामनिर्देशन पत्र दाखल केले होते तसेच त्यांनी अपक्ष म्हणूनही नामनिर्देशन पत्र दाखल केले होते. तसेच अन्य राजकीय पक्ष आम आदमी पार्टी, बहुजन वंचित पार्टी, प्रहार, बसप, नशनल ब्लॉक पंथर पार्टी, हिंदुस्थान जनता पार्टीच्या नावाने देखील नामनिर्देशन पत्र दाखल केले आहेत. अपक्ष सत्यजीत तांबे यांच्या विरोधात शुभांगी पाटील यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसने पांठिबा दिल्याने यांच्यात सरळ लढत होणार आहे. दरम्यान आज माघारीच्या दिवशी सहा उमेदवारांनी निवडणुकीतून काढता पाय घेतला आहे. यामध्ये मालेगावचे राजेंद्र दौलत निकम, अहमदनगरचे अमोल बाबासाहेब खाडे, पनवेलचे सुधीर सुरेश तांबे, अहमदनगरचे धनंजय कृष्णा जाधव, पनवेलचे धनराज देविदास विसपुते, देवळा नाशिकचे दादासाहेब हिरामण पवार यांनी माघार घेतली आहे. त्यामुळे आता नाशिक पदवीधर निवडणुकीत आता 16 उमेदवार रिंगणात नशीब अजमावणार आहेत. मात्र सत्यजित तांबे, शुभांगी पाटील, ऍड. सुभाष जंगले यांच्यात खरी लढत होण्याची शक्यता आहे.

सत्यजित तांबे यांच्या पदवीवरच प्रश्नचिन्ह


सत्यजित तांबे यांनी सन २०१४ साली २२५-अहमदनगर शहर या विधानसभा मतदारसंघातून निवडणूक प्रतिज्ञापत्र दाखल केले होते. तर सन २०२३ रोजी पदवीधर मतदारसंघातून निवडणूक प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. आहे मात्र या दोन्ही प्रतिज्ञापत्रांमध्ये मोठी तफावत दिसून येत आहे. सत्यजित तांबे यांच्या प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आलेल्या माहितीबाबत डॉ अभिषेक हरिदास यांनी काही दावे केले आहेत. सत्यजित तांबेचे कोणते प्रतिज्ञापत्र खरे? सत्यजित तांबेची कोणती पदवी खरी? सत्यजित तांबेनी दिली निवडणूक आयोगाला खोटी माहिती दिला का असे अनेक प्रश्न डॉ अभिषेक हरिदास यांच्या दाव्यामुळे उपस्थित झाले आहेत. सत्यजित तांबे यांनी सन 2014 साली अहमदनगर शहर या विधानसभा मतदारसंघातून निवडणूक प्रतिज्ञापत्र भरले होते. तर, सन 2023 मध्ये त्यांनी पदवीधर मतदारसंघातून निवडणूक प्रतिज्ञापत्र सादर केले. मात्र, या दोन्ही प्रतिज्ञापत्रात मोठी तफावत दिसून येत असल्याचा दावा डॉ अभिषेक हरिदास यांनी केला आहे. सन 2014 मध्ये सत्यजित तांबे यांनी BBA(VMRF),DEC 2005 , MBA(MIT SCHOOL OF MANG PUNE )PUNE UNIVERSITY , BA(POLITICAL SCI )TECNO GLOBAL UNIV , MA(POLITICAL SCI) PUNE UNIVERSITY , 2014 (APP), ECX EDU FOR IMARGING LIDERS (HAWARD UNIVERSITY),2014 अशा सर्व शैक्षणिक गुणवत्ता नमूद केल्या. मात्र, 2019 साली सत्यजित तांबे यांनी तो BBA VMU university , DEC 2005 असे स्पष्ट नमूद केले आहे. मात्र, सत्यजित तांबे यांनी सन 2019 साली BBA वगळता त्याचे इतर शैक्षणिक गुणवत्ता का लपवली असा प्रश्न पडतो. तसेच सत्यजित तांबे यांच्या दोन्ही प्रतिज्ञापत्रात त्याने BBA दोन वेग वेगळ्या विद्यापीठातून झाल्याचे नमूद केले आहे. तसेच जमीन खरेदीचा मुद्दा आणि ने म्युचुअल फंड मधील युनिटचा तपशील लपविल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. सन 2014 मध्ये सत्यजित तांबे यांनी मौजे पिंपरणे ता संगमनेर येथील स.नं.७२ ही शेतजमीन दि: 4/4/2009 रोजी 4,80,000 रुपयात खरेदी केली होती असे नमूद केले आहे. तर, सन 2019 मध्ये त्यांनी हीच शेतजमीन दि: 4/4/2009 रोजी रोजी 5,12,000 रुपयात खरेदी केली आहे असे नमूद केले आहे. त्यामुळे जर सत्यजित तांबे यांनी 2014 च्या प्रतिज्ञापत्रात खरी माहिती दिली असे मानले तर त्यांनी 2019 च्या प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिल्याचे समजते असा दावा डॉ अभिषेक हरिदास यांनी केला. वास्तविकपणे दस्त क्र.1862/2009 अन्वये सत्यजित तांबे व हर्षल सुधीर तांबे यांनी मौजे पिंपरणे ता संगमनेर येथील स.नं.७२ ही शेतजमीन दि: 4/4/2009 रोजी 9,60,000/- रुपयात खरेदी केली होती. तर अन्य नमूद मिळकतीबाबत देखील दिशाभूलकारक माहिती नमूद असल्याचे स्पष्ट होत आहे कि, रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यात चिखली भोम या गावातील स.नं. 17/2 व 15/2 या शेतजमीन मिळकत दि.15/11/2022 रोजी खरेदी केल्याचे नमूद केले आहे मात्र प्रत्यक्षात 7/12 मालकी हक्कात नाव आढळून येत नाही तसेच सदर उतारावर दि. 5/11/2022 रोजी फेरफार क्र.५६३ अन्वये सदरील जागा प्रस्तावित विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गीकेसाठी संपादनासाठी अधिसूचित केली असल्याची नोंद 7/12 उताऱ्यावर आहे तर सदरील जागेची खरेदी व्यवहार दि.15/11/2022 रोजी कसा होऊ शकतो हा प्रश्न असून सदरील दिशाभूलकारक माहिती सत्यजित तांबे यांनी नुकत्याच दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात केली आहे. दरम्यान सत्यजित तांबे यांनी म्युचुअल फंड मधील युनिटचा तपशील लपविला असल्याचाही दावा केला आहे. नाशिक विभागातील पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केलेले सत्यजित तांबे व त्यांची पत्नी मैथिलीकडे १५.८५ कोटींची जंगम व स्थावर मालमत्ता आहे. उमेदवारी शपथपत्रात सत्यजित यांनी आपले वार्षिक उत्पन्न ४९.१८ लाख रुपये आणि पत्नी मैथिलीचे ५२.२३ लाख रुपये असल्याचे जाहीर केले आहे. त्यांच्याकडे २५ हजार रुपये आणि पत्नीकडे ४० हजार रुपये रोख आहेत. सत्यजित यांच्याकडे ६० तोळे (३० लाख) व पत्नीकडे ३०० तोळे (मूल्य रु. १.५० कोटी) सोने आहे.

डमी डॉ. सुधीर तांबे यांची माघार


सत्यजित तांबे यांच्या वडिलांच्या नावाशी साधर्म्य असलेले पनवेल येथील डॉ. सुधीर सुरेश तांबे यांनी आज माघार घेतली आहे. पनवेलच्या डॉ. सुधीर सुरेश तांबे यांनी नामनिर्देशन पत्र दाखल करुन आमदार डॉ सुधीर भास्करराव तांबे यांचे मतदान विखुरले जाण्यासाठी बनावट नाव धारण करून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेला होता. पनवेल येथील डॉ. सुधीर सुरेश तांबे यांचे खरे नाव आशिष सुरेश जैन असे आहे. त्यांचे मतदार यादीतील देखील आशिष सुरेश जैन असे खरे नाव असल्याचे दिसून येते मग सत्यजित तांबे यांच्या वडिलांच्या नावाशी साधर्म्य असलेले बनावट नाव धारण करून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची उठाठेव का केला याबाबत उलटसुलट चर्चा केली जात आहे. 

शुभांगी पाटील यांचा 'मविआ'चा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न

शुभांगी पाटील म्हणाल्या, मविआची उमेदवारी मिळवण्यासाठी माझा प्रयत्न आहे. ठाकरे गटाचा पाठिंबा मला आहे. मविआची उमेदवारी मला मिळावी असा माझा प्रयत्न आहे. उद्धव ठाकरेंवर विश्वास आहे, त्यांनी माझ्यासाठी प्रयत्न केले. माझी उमेदवारी कायम असून ठाकरे गटाचा पाठिंबा आहे. कुणी काय सांगावे हे ज्याचे त्याचे प्रश्न आहे. मी उद्धव ठाकरे यांचे आशीर्वाद घेतले आहे. वरिष्ठ नेते उद्धव ठाकरे, अजित पवार, जयंत पाटील, नाना पटोले हे माझ्याबाबत निर्णय घेतील. मला शिक्षक संघटनांचा पाठिंबा आहे. ते मला पाठिंबा देतील हा विश्वास आहे. पदभरती, पेन्शन, विद्यार्थ्यांचे प्रश्न अनेक गोष्टींबाबत मी काम केले आहे. त्यामुळे मला त्यांच्यावर विश्वास आहे. भाजपने मला एबी फार्म दिला नाही. त्यांनी काम करणाऱ्या व्यक्तीचा थोडा वेगळा विचार केला असेल. मी अवघ्या तीन महिन्यांपूर्वी भाजपमध्ये गेले. त्यांनी पक्षात या आम्ही विचार करू असे मला आश्वासन भाजपकडून दिले गेले होते परंतु, माझा विचार झाला नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे.

Mr. Chandrakant Bhujbal

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

"महाराष्ट्रातील राजकारण" 

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.