Tuesday 27 December 2022

सिरम कंपनीचा कामगार बनला गावचा कारभारी!

सरपंचपदासह दहिटणेवाडी ग्रामपंचायतीवर मोहन सुरवसे पॅनेलचा ताबा

अक्कलकोट- नामांकित लस निर्मिती करणाऱ्या सिरम कंपनीत गेली अनेक वर्ष कार्यरत असणाऱ्या श्री मोहन सुरवसे यांनी नोकरी सांभाळून मिळालेल्या सुट्टीच्या कालावधीत कार्यमग्न राहून मूळ गावचा विकास करण्याचा ध्यास घेतला. त्यांनी थेट ग्रामपंचायत निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आणि कार्याच्या जोरावर सरपंचपदासह दहिटणेवाडी ग्रामपंचायतीवर त्यांच्या पॅनेलनी ताबा मिळवला. सहकारी रोहित जाधव यांच्या वतीने ग्रामपंचायत निवडणुकीसाठी पॅनल उभे केले. त्यांनी प्रतिस्पर्धी बलभीम माने यांचे पॅनलला पराभूत केले. या ठिकाणी सात पैकी चार जागा जिंकत रोहित जाधव यांच्या पॅनलने सरपंच पदावर कब्जा मिळविला तर विरोधी माने गटाला दोन जागा मिळाल्या. यामध्ये सिरम कंपनीचे श्री मोहन सुरवसे यांना 154 मते मिळाली. तर जनतेतून थेट सरपंच पदाच्या झालेल्या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत सरपंच पदी स्वाती रोहित जाधव यांनी प्रतिस्पर्धी उमेदवाराचा 8 मतांनी रुक्मिणी बलभीम माने यांचा पराभव केला. त्यांना एकूण 294 मते मिळाली. श्री मोहन सुरवसे यांच्या विजयाने सिरम कंपनीतील कामगारांनी जल्लोष व्यक्त केला आहे. आपल्यातील सहकारयाने निवडणुकीत विजय संपादन केल्याने त्यांच्यावर कंपनीतील कर्मचारी व अधिकारी वर्गाकडून अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे. दहिटणेवाडी ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत स्वाती जाधव (सरपंच), मोहन सुरवसे, आरती सुरवसे, नागिणी शिंदे, शिवलिंगप्पा व्हनचेंजे, छबुबाई जाधव, गंगाराम कदम, नागाबाई व्हनचेंजे यांनी विजय मिळवला आहे. दहिटणेवाडी ग्रामपंचायतींसाठी 668 मतदारांपैकी 583 मतदारांनी मतदानात सहभाग नोंदवला या ठिकाणी 87 टक्के इतके मतदान झाले होते.  
सर्वसाधारण स्त्री प्रवर्गासाठी राखीव 27 जानेवारी 2021 रोजी सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत काढण्यात आलेली होती त्यामध्ये दहिटणेवाडीचे सरपंच पद सर्वसाधारण स्त्री प्रवर्गासाठी राखीव झाले होते. राज्यातील सत्तांतरानंतर पुन्हा जनतेतून थेट सरपंच पदाच्या निवडीचा निर्णय घेण्यात आल्याने पूर्वीचे आरक्षण सोडत पुन्हा काढण्यात येईल असा कयास व्यक्त केला जात होता मात्र आरक्षण सोडत कायम ठेवून निवडणुका घेण्यात आल्या. या निवडणुकीत  जनतेतून थेट सरपंच पदाच्या झालेल्या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत सरपंच पदी स्वाती रोहित जाधव यांनी प्रतिस्पर्धी उमेदवाराचा 8 मतांनी पराभव करून त्यांनी 294 मते प्राप्त केली. तर वार्ड क्र. १अ- ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत सदस्य पदासाठी सुरवसे आरती संतोष यांना एकूण 181 मते मिळाली. त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवारावर 48 मतांनी मात केली. तसेच वार्ड क्र. १अ- ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत सदस्य पदासाठी शिंदे नागिनी केदारनाथ यांना एकूण १७२ मते मिळाली. त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवारावर ३९ मतांनी मात केली. वार्ड क्र. 1ब- ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत सदस्य पदासाठी सुरवसे मोहन परमेश्वर यांना एकूण 154 मते मिळाली. त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवारावर 21 मतांनी मात केली. वार्ड क्र. 2अ- ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत सदस्य पदासाठी वांछनजे शिवलिंगप्पा नागप्पा यांना एकूण 103 मते मिळाली. त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवारावर 36 मतांनी मात केली. वार्ड क्र. 2ब- ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत सदस्य पदासाठी जाधव छबुबाई दगडू यांना एकूण 100 मते मिळाली. त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवारावर 33 मतांनी मात केली. वार्ड क्र. 3अ- ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत सदस्य पदासाठी वांचनजे नागबाई शिवलिंगप्पा यांना एकूण 107 मते मिळाली. त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवारावर 66 मतांनी मात केली.वार्ड क्र. 3ब- ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत सदस्य पदासाठी कदम गंगाराम बाबू यांना एकूण 83 मते मिळाली. त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवारावर 42 मतांनी मात केली.
सोलापुर जिल्ह्यातील 189 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी १८ डिसेंबर रोजी मतदान घेण्यात आले होते त्याचा निकाल २० डिसेंबर रोजी जाहीर करण्यात आला. थेट जनतेतून सरपंचपदासाठी १०६८, तर ग्रामपंचायत सदस्यांसाठी ५८७९ अर्ज दाखले झाले होते. सोलापूर जिल्ह्यातील १८९ ग्रामपंचायतींमधील ६४६ वॉर्डांसाठी ही निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांपूर्वी ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत, त्यामुळे ग्रामपंचायतींच्या निवडणुका म्हणजे झेडपी, पंचायत समिती निवडणुकीची लिट्‌मस टेस्ट समजली जात आहे. राजकीय पक्षांनी केलेल्या दाव्यानुसार या निवडणुकीत भाजप  - 75, शिंदे गट - 26,  राष्ट्रवादी - 41, काँग्रेस -  12,  ठाकरे गट -  12,  इतर - 23 (एकूण 189) असे निकालाचे पक्षीय बलाबल आहे. अक्कलकोट तालुक्यात २० ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल जाहीर झाला यामध्ये बहुतांश ठिकाणी परिवर्तन झाले आहे. या निवडणुकीत २० पैकी बारा गावात नवे कारभारी आले असून पाच गावात मात्र पुन्हा सत्ताधार्‍यांच्या बाजूने जनतेने कौल दिला आहे. या निवडणुकीत ७९.३० टक्के मतदान झाले होते.

अक्कलकोट तालुक्‍यातील गावनिहाय विजयी सरपंच व उमेदवार पुढीलप्रमाणे-:

दर्शनाळ : सुनिल बिराजदार (सरपंच), सदस्य : अदिल बिराजदार, गुलशन चौधरी, प्रियंका माने, श्रीशैल व्हनमुर्गे.
सलगर : ज्योती डोंगराजे (सरपंच), सदस्य : यशोदाबाई चव्हाण, रेवण्णा म्हेत्रे, महानंदा पोतेनबाद, परशुराम भगळे, परवीन बिराजदार, शांताबाई झिंगाडे, काशिनाथ कुंभार, पार्वती पाटील, समरीन बिराजदार, चंदव्वा शेळके, अमोगसिध्द पुटगे, गुंडप्पा कोळी, निकीता धसाडे.
खानापूर : सैपन पटेल (सरपंच), सदस्य : खंडप्पा बसरगी,महानंदा मडसनाळ, लक्ष्मीबाई बसरगी, सुधाकर आंदेवाडी, सुनिता बनसोडे, महादेवी बिराजदार.
हालचिंचोळी : श्रीशैल माशाळे (सरपंच), सदस्य : सागर खांडेकर, शालुबाई बनसोडे, नागम्मा संभुभैरे, श्रीशैल माशाळे, भुताळी संभुभैरे, रुकसाना नागुरे, विक्रम जमादार, कलावती मणुरे.
कोन्हाळी : चिदानंद उण्णद (सरपंच), सदस्य : दिलीप गायकवाड, प्रतिका बनसोडे, वैशाली बनसोडे, मल्लिनाथ ढब्बे, मलम्मा हिरेमठ, कमलाकर जाधव, मंगल वाघमारे, नागाबाई पाटील.
अंकलगे : वैशाली कोळी (सरपंच), सदस्य : शोभा कोळी, भारता साबणे, संगीता साबणे, इरेशा मांग, बसवराज कोळी, अशोक जाधव, शिवशरण विजापुरे, सावित्री कोणदे, सुनंदा पुजारी.
रुद्देवाडी : तुकाराम पाटील (सरपंच), सदस्य : यशवंत शेरी, श्रीदेवी कोतली, भिमबाई हिरोळी, लक्ष्मीबाई शिंगे, काशिनाथ पाटील, लक्ष्मीपुत्र जमादार, सुस्मिता शाखापुरे.
हत्तीकणबस : श्रीशैल माळी (सरपंच), सदस्य : श्रीशैल गायकवाड, पद्मावती म्हेत्रे, संगम्मा बिराजदार, शिवानंद मेळकुंदे, रेश्मा धडके, परव्वा पाटील, संतोष नंदर्गी, गुरप्पा उण्णद, संगीता हिरापुरे.
आंदेवाडी ज : जगदेवी धोडमनी (सरपंच), सदस्य : रुकमोद्दीन नदाफ, ज्योती कलमनी, शिवम्मा जमादार, संजय पुजारी, रियाना मुजावर, कस्तुरी सोनकांबळे, सिधाबाई पुजारी.
घोळसगाव : राजशेखर किवडे (सरपंच), सदस्य : लक्ष्मण आजुरे, सलीमाबी फकीर, ताराबाई गायकवाड, प्रदिप कोतले, शशिकला सुतार, इंदुबाई गायकवाड, बालाजी कांबळे, राचव्वा स्वामी, पार्वती पालापुरे.
शिरवळवाडी : स्नेहा शहाणे (सरपंच), सदस्य : हणमंत घोदे, पार्वतीबाई दर्शनाळे, रुकिया होटगी, श्रीशैल स्वामी, निर्मला होदलुरे, सुर्यकांत शहाणे, उषादेवी हत्तरकी.
सदलापूर : शिवानंद पटणे (सरपंच), सदस्य : लक्ष्मण भोसगी, अनिता कोरे, हाफिजा शेख, साखरुबाई बनसोडे, मंगल घोडके, सुनिल बनसोडे, राजश्री भोसगी.
दहिटणेवाडी : स्वाती जाधव (सरपंच), मोहन सुरवसे, आरती सुरवसे, नागिणी शिंदे, शिवलिंगप्पा व्हनचेंजे, छबुबाई जाधव, गंगाराम कदम, नागाबाई व्हनचेंजे.
बोरेगांव : जगदेवी स्वामी (सरपंच), सदस्य : नवनाथ जग्गे, विजयालक्ष्मी चिकलंडे, सिध्दाराम माने, उमाकांत गाढवे, रेश्मा औरसंग, कलप्पा आलुरे, शांताबाई जांभळे, गौराबाई बंडगर.
सुलतानपूर : मल्लम्मा स्वामी (सरपंच), सदस्य : विनोद बोरकर, सुशिला इटकर, मल्लम्मा स्वामी, वषर्ज्ञ होटकर, वैजिनाथ काळे, निर्मला पाटील.
अरळी : अजय सकट (सरपंच), दस्य : अतुल काळे, सुरेखा धुम्मा, शहजाद चौधरी, प्रकाश हांडगे, इंदुबाई गायकवाड, खाजामा कलिखान, गामाजी इरसंग, सुरेखा स्वामी, केसरबाई कुंभार.
पालापूर : बाबन जमादार (सरपंच), सदस्य : संतोष जगताप, कस्तुरा कलकुटगे, फरीदा जमादार, अंकुश देडे, छायाबाई पाटील, मलय्या बिळंबे, विठाबाई जगताप.
बोरगाव दे : विद्या स्वामी (सरपंच), सदस्य : अब्दुल पठाण, गिरजाबाई बिराजदार, बाळकृष्ण बनसोडे, श्रीकांत जिरगे, बेगम नदाफ, अविनाश बंदीछोडे, रुपाली जिरगे, मदार जमादार, जयश्री गावडे, महानंदा व्हदरगुंडे.
नाविंदगी : पंडित राठोड (सरपंच), सदस्य : चंद्रकांत फुलारी, महानंदा तंबाके, मुतप्पा तंबाके, प्रभावती पवार, शरणप्पा गायचोडे, मुबारक मुल्ला, स्वाती जवळगी, भाग्यश्री थारु, शेटप्पा दुर्ग, इनजातबी बागवान, शालुबाई राठोड.
शिरवळ : आशाबाई बिराजदार (सरपंच), सदस्य : हमीदा पठाण, मलकव्वा पाताळे, रुपाली गायकवाड, कांताबाई निंबाळे, मंगलाबाई थोरात, पुजा कवडे, सत्यभामा कोरे, निर्मला तानवडे, मनिषा जोगदनकर, शैलजा माने-पाटील, मनिषा दुधभाते आदी उमेदवार विजयी झाले आहेत.

Mr. Chandrakant Bhujbal

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

"महाराष्ट्रातील राजकारण" 





Tuesday 20 December 2022

ग्रामपंचायत निवडणूक-2022; पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीचेच वर्चस्व

राज्यात ग्रामपंचायत निवडणुक निकालाचा धुराळा; लोकशाही उत्सवात तगडे उमेदवार विजयी


 राज्यातील ७ हजाराहून अधिक ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल आज जाहीर होत आहेत. राज्यातील दिग्गज नेत्यांची स्थानिक पातळीवर प्रतिष्ठा यात पणाला लागली असून आतापर्यंत अनेक धक्कादायक निकाल पाहायला मिळत आहेत. आटपाडी तालुक्यातील पडळकरवाडीमध्ये भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांची एकतर्फी सत्ता आली आहे. सरपंच पदाच्या उमेदवार असलेल्या पडळकर यांच्या मातोश्री हिराबाई पडळकर सरपंच पदावर विजयी झाल्या आहेत. संगमनेर तालुक्यात निळवंडे ग्रामपंयाचत निवडणुकीत कीर्तनकार ह.भ.प निवृत्ती महाराज देशमुख-इंदोरीकर यांच्या सासूबाई शशिकला शिवाजी पवार या सरंपचपदी निवडून आल्या आहेत. आमदार बच्चू कडू यांचे मोठे बंधू भैय्या कडू बेलोरा ग्रामपंचायतमध्ये सरपंच पदाच्या निवडणूकीत विक्रमी ११०० पेक्षा अधिक मतांनी विजयी झाले. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेर मतदार संघातील मोहाडी या ग्रामपंचायतीत गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील यांची कन्या भाविनी पाटील यांचे पॅनल पराभूत झाले.भाजपचे दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची जन्मभूमी असणाऱ्या नाथ्रात (ता. परळी) येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांचे चुलत भाऊ अभय मुंडे विजयी झालेत. उस्मानाबाद जिल्ह्यातील कावळेवाडी आणि पूर्वी ग्रामपंचायतीवर आम आदमी पक्षाने आपला झंडा फडकावला आहे. पालघरमध्ये मनसेने खाते उघडले असून गुंडले ग्रामपंचायतीवर मनसेचा झेंडा फडकला आहे. स्वराज्य संघटनेचे धाराशिव येथील सरपंचासह 13 सदस्य निवडून आले आहेत. तर, नाशिकमध्ये सरपंचासह सदस्यपदी कार्यकर्ते निवडून आले आहेत.राज्यातील 7,751 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक घेण्यात आली. 590 ग्रामपंचायतींमध्ये बिनविरोध निवडणूक झाली आहे. कोल्हापूरमधील 43, सांगलीत 28, रायगडमध्ये 50, बीडमध्ये 34 तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 44, औरंगाबाद जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली आहे. ग्रामपंचायत निवडणुका पक्षाच्या चिन्हावर लढवल्या जात नसल्याने स्थानिक पातळीवर आघाडी, गट करून लढवल्या जात असतात त्यामुळे विशिष्ट राजकीय पक्षाचे सदस्य व सरपंच आले असा दावा करणे अयोग्य असल्याची टीका शिवसेनेने केली आहे. सात हजार ६८२ ग्रामपंचायतीत एकूण ६५ हजार ९१६ सदस्य तसेच थेट सरपंच पदासाठी निवडणूक झाली. त्यापैकी १४ हजार २८ ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. तर ६९९ सरपंच बिनविरोध निवडून आले. ६३ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी एकही अर्ज दाखल झाला नाही, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगामार्फत देण्यात आली. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी रविवारी मतदान झाले होते. प्रमुख पक्षाच्या नेत्यांनी केलेल्या दाव्यानुसार भाजपने २०२३, राष्ट्रवादी काँग्रेसने १२१५, शिंदे गटाने ७७२, काँग्रेसने ८६१, ठाकरे गटाने ६३९ तर अन्य पक्षांनी ११३५ ग्रामपंचायतींवर विजय मिळविला आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुका राजकीय पक्षांच्या चिन्हावर होत नाहीत. राज्य निवडणूक आयोगाकडे उपलब्ध असलेल्या मुक्त चिन्हातून संबंधित उमेदवारांना निवडणूक चिन्ह दिले जाते. काही ठिकाणी प्रमुख राजकीय पक्ष स्थानिक गटांशी आघाड्या करतात. स्थानिक राजकारणात जातपात आणि नात्यागोत्यांना महत्त्व दिले जाते. यामुळे राजकीय पक्षाचे नेते अधिकच्या ग्रामपंचायती मिळाल्याचा दावा करत आहेत. विविध पक्षांच्या नेत्यांनी केलेल्या दाव्यांच्या आधारे ही माहिती आहे. राज्यात दोन हजार ४८२ ग्रामपंचायती जिंकून पुन्हा एकदा भाजप क्रमांक एकचा पक्ष ठरला आहे, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेसने ९०० पेक्षा जास्त ठिकाणी विजय मिळवला. राज्यात प्रथम क्रमांकावर महाविकास आघाडीच आहे, असे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या जिल्ह्यात भाजपचा दारुण पराभव झाल्याचा आरोप करून भाजपचे विजयाचे दावे खोटे आहेत, अशी टीका पटोले यांनी केली. नागपूर जिल्ह्यात २३६ पैकी २०० ग्रामपंचायतींवर काँग्रेसने दणदणीत विजय मिळविला असून, भाजपला नागपूर जिल्ह्यात ३६ जागाही मिळाल्या नाहीत, असे पटोले यांचे म्हणणे आहे.

निवडणूक झालेल्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या

अ.क्र.

जिल्हा

ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या

निवडणूक जाहीर

प्रत्यक्षात मतदान

बिनविरोध

1

पुणे

221

176

40 (5)

2

सोलापूर

189

169

20

3

सातारा

319

259

60

4

सांगली

452

416

36

5

कोल्हापूर

475

429

46

6

ठाणे

42

35

7

7

पालघर

63

62

1

8

रायगड

240

191

49

9

रत्नागिरी

222

163

59

10

सिंधुदुर्ग

325

291

34

11

नाशिक

196

188

8

12

धुळे

128

118

10

13

जळगाव

140

122

18

14

अहमदनगर

203

195

8

15

नंदुरबार

123

117

6

16

औरंगाबाद

219

208

11

17

बीड

704

671

33

18

नांदेड

181

160

21

19

उस्मानाबाद

166

165

1

20

परभणी

128

119

9

21

जालना

266

254

12

22

लातूर

351

338

13

23

हिंगोली

62

61

1

24

अमरावती

257

252

5

25

अकोला

266

265

1

26

यवतमाळ

100

93

7

27

बुलडाणा

279

261

18

28

वाशीम

287

280

7

29

नागपूर

237

234

3

30

वर्धा

113

111

2

31

चंद्रपूर

59

58

1

32

भंडारा

363

304

59

33

गोंदिया

348

345

3

34

गडचिरोली

27

25

2

एकूण

7751

7135

616

बिनविरोध

590 (26)

ग्रामपंचायत निवडणूक-2022; पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीचेच वर्चस्व

पुणे जिल्ह्यातील २२१ पैकी १७६ ग्रामपंचायतींच्या झालेल्या निवडणुकांची मतमोजणी आज पार पडली यामध्ये सर्वाधिक जागांवर राष्ट्रवादीला मानणारे उमेदवार विजयी झाले असल्याने पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीचेच वर्चस्व ग्रामपंचायत निवडणुकीतून स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यातील दौंड तालुक्यात भाजप तर भोर तालुक्यात कॉंग्रेसने वर्चस्व राखले आहे. या निवडणुकीत पुणे जिल्ह्यातील २२१ पैकी १७६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी रविवारी मतदान झाले होते. थेट १६७ सरपंचाच्या आणि सदस्यपदाच्या १०६२ जागांसाठी ८०.७९ टक्के मतदान झाले होते. ग्रामपंचायतींच्या झालेल्या मतदानासाठी एकूण तीन लाख तीन हजार ४५२ एवढे मतदार होते. त्यापैकी एक लाख ४६ हजार ९६७ स्त्री, तर पुरुष मतदार एक लाख ५६ हजार ४८५ एवढे आहेत. त्यापैकी दोन लाख ४५ हजार १६६ म्हणजेच ८०.७९ टक्के मतदान झाले. मतदानामध्ये एक लाख १८ हजार २४४ स्त्री तर १ लाख २६ हजार ९२१ हजार पुरुष मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. जिल्ह्यातील २२१ ग्रामपंचायतींपैकी ४0 ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्या. तर १७६ ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले यात सदस्यपदाच्या १ हजार ६२ जागांसाठी ३ हजार ३१३ उमेदवार तर सरपंचपदाच्या १६७ जागांसाठी ५१९ उमेदवार रिंगणात होते. दुसरीकडे ७९ जागांसाठी एकही उमेदवारी अर्ज न आल्याने ही पदे रिक्त राहिली आहेत. तर काहींचे अर्ज बाद झाले. यामुळे ही पदे रिक्त राहिले आहेत, तसेच ५ ठिकाणी सरपंचपदांसाठी एकही अर्ज आला नाही. आता या पोटनिवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाकडून लवकरच जाहीर होईल. सरपंचपद रिक्त राहिलेली गावांमध्ये भोर तालुक्यातील २ गावे, दौंडमधील १, जुन्नरमधील १ गाव आणि मुळशीमधील एका गावाचा समावेश आहे. तर ग्रामपंचायत सदस्यपद रिक्त असलेली गावांमध्ये वेल्हा तालुक्यातील १८ ग्रामपंचायत सदस्य पद रिक्त आहेत. भोरमधील २२, दौंडमधील १, जुन्नरमधील १६, आंबेगावमधील ८, खेडमधील २, मावळमधील १ आणि मुळशीमधील ११ ग्रामपंचायत सदस्य पदे रिक्त आहेत. पुणे जिल्ह्यामध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालात 221 ग्रामपंचायतींपैकी 131 ग्रामपंचायतींवरवर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे वर्चस्व आल्याची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. बारामतीतील 13 पैकी 13, मुळशी तालुक्‍यात 11 पैकी 11, खेड तालुक्‍यामध्ये 23 पैकी 18 जागेवर राष्ट्रवादी कॉंग्रेस व 4 ग्रामपंचायती संमिश्र, आंबेगाव तालुक्‍यात 21 पैकी 17 जागेवर राष्ट्रवादी तर 3 ग्रामपंचायती संमिश्र लागल्या आहेत. शिरूर तालुक्‍यात चार पैकी दोन राष्ट्रवादी,वेल्हा तालुक्‍यामध्ये 28 पैकी 13 राष्ट्रवादीच्या तर 6 ग्रामपंचायती संमिश्र, भोर तालुक्‍यामध्ये 54 पैकी 24 राष्ट्रवादी आणि 7 ग्रामपंचायती या कॉंग्रेस राष्ट्रवादीच्या विचाराच्या, जुन्नर तालुक्‍यामध्ये 16 पैकी 10 राष्ट्रवादी व 1 संमिश्र, मावळ तालुक्‍यामध्ये 9 पैकी 7 , इंदापूर तालुक्‍यामध्ये 26 पैकी 12 आणि संमिश्र तीन, हवेली तालुक्‍यामध्ये 7 पैकी 3 , दौंड तालुक्‍यामध्ये 7 पैकी 1 ग्रामपंचायत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या विचाराच्या आल्या आहेत असे त्यांनी नमूद केले.

कदमवाकवस्ती ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंचपदी भाजपचा उमेदवार

पुणे जिल्ह्याचे लक्ष वेधून घेणाऱ्या कदमवाकवस्ती ग्रामपंचायत निवडणुकीत नवपरिवर्तन पॅनलने राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष नंदकुमार काळभोर यांच्या जनसेवा पॅनलच्या १६ उमेदवारांना चितपट करून सरपंच पदाच्या खुर्चीवर शिक्कामोर्तब केला आहे. नवपरिवर्तन पॅनलचे चित्तरंजन गायकवाड यांनी जनसेवा पॅनलच्या सरपंच पदाच्या उमेदवार कल्पना काळभोर यांना २५२० मतांनी पराभूत करून विजय मिळवला आहे. या निकालामुळे पूर्व हवेलीत भाजपचे वर्चस्व दिसून आले आहे. नवपरिवर्तन पॅनलमधून सहा प्रभागातून १७ पैकी १६ उमेदवार भरघोस मताने विजयी झाले आहेत. तर एक उमेदवार शुल्लक मतांवरून पराभूत झाला आहे. तर जनसेवा पॅनल मधून नंदकुमार काळभोर हे एकमेव उमेदवार निवडून आले आहेत. भारतीय जनता पक्षाच्या माजी कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष चित्तरंजन गायकवाड यांनी सरपंच पदाच्या उमेदवार कल्पना काळभोर यांचा तब्बल २५२० मतांनी पराभव केला आहे. चित्तरंजन गायकवाड यांच्या नवपरिवर्तन पॅनलला पराभूत करण्यासाठी जनसेवा पॅनलमध्ये कदमवाकवस्तीसह लोणी काळभोरमधील काही नेते मंडळीं सरसावले होते. नवपरिवर्तन पॅनलचे १६ विजयी उमेदवार प्रभाग १ - आकाश धनंजय काळभोर, लोंढे सिमिता आगतराव, कोमल सुहास काळभोर. प्रभाग २-बिना तुषार काळभोर, मंदाकिनी सूर्यकांत नामुगडे, राजश्री उदय काळभोर. प्रभाग ३-दिपक नवनाथ आढाळे, सुनंदा देविदास काळभोर. प्रभाग ४-नंदकुमार कैलास काळभोर,नासिरखान मनूलाखान पठाण, रुपाली सतीश काळभोर. प्रभाग ५- स्वप्नेश शिवाजी कदम,अविनाश विजय बडदे, सोनाबाई अशोक शिंदे, प्रभाग ६ -योगेश भाऊराव मिसळ,सलीमा कलंदर पठाण, राणी प्रीतम गायकवाड.

पेरणे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी उषा वाळके

पेरणे (ता. हवेली) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी श्री सिद्धेश्वर पाचपीर महाराज ग्रामविकास पॅनेलच्या उषा दशरथ वाळके यांची निवड झाली. तर, श्री सिद्धेश्वर पाचपीर महाराज ग्रामविकास पॅनेलला सात, श्री सिद्धेश्वर पाचपीर महाराज पॅनेलला सात मिळाल्याने उर्वरित तीन जागा मिळालेल्या श्री खंडोबा ज्योतिबा महाविकास आघाडीच्या भूमिकेलाही महत्त्व आले आहे. पेरणे ग्रामपंचायतीत एकूण १७ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत सरपंचपदासाठी पाच जण; तर सदस्यपदासाठी ३६ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. अशोक कदम व अलका मोहन वाळके हे बहीण भाऊ; तर भाची सारिका दीपक वाळके हे तिघेही विजयी झाल्याने कुटुंबीयांनी एकत्रितपणे आनंद साजरा केला. विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे- वॉर्ड क्र. १ : अश्विनी रूपेश ठोंबरे, गणेश हिरामण येवले (श्री सिद्धेश्वर पाचपीर महाराज ग्रामविकास पॅनेल). वॉर्ड क्र.२ : अंकिता हनुमंत सरडे, अक्षय ज्ञानेश्वर वाळके, शैला दत्तात्रेय ढेरंगे (श्री सिद्धेश्वर पाचपीर महाराज ग्रामविकास पॅनेल). वॉर्ड क्र. ३ : विश्वास दिलीप वाळके, कल्पना जगन्नाथ वाळके, सुनील दौलत अवचार (श्री सिद्धेश्वर पाचपीर महाराज पॅनेल). वॉर्ड क्र.४ : दिनेश जालिंदर वाळके, दीपक सीताराम वाघमारे, मंगल नीलेश वामने (श्री सिद्धेश्वर पाचपीर महाराज पॅनेल). वॉर्ड क्र. ५ : अलका मोहन वाळके, सुजय सुदाम वाळके (श्री सिद्धेश्वर पाचपीर महाराज ग्रामविकास पॅनेल), माधुरी नवनाथ वाळके (श्री सिद्धेश्वर पाचपीर महाराज पॅनेल). वॉर्ड क्र.६ : नंदा रमेश ढवळे, अशोक रामदास कदम, सारीका दीपक वाळके (श्री खंडोबा ज्योतिबा महाविकास आघाडी).

पुणे जिल्ह्यातील २२१ ग्रामपंचायत निवडणुक दृष्टिक्षेप

अ.क्र.

तालुका

ग्रामपंचायत

सदस्य

सरपंच

सदस्य

 संख्या

 संख्या

उमेदवार संख्या

1

भोर

54

382

155

475

2

वेल्हे

28

196

64

257

3

इंदापूर

26

246

72

511

4

खेड

23

193

61

313

5

आंबेगाव

21

201

43

335

6

जुन्नर

17

140

35

210

7

बारामती

13

137

36

301

8

मावळ

9

81

25

136

9

दौड

8

78

20

161

10

हवेली

7

81

22

175

11

शिरूर

4

40

4

100

एकूण

221

1863

562

3057

Political Research And Analysis Bureau (PRAB)


पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणूक दृष्टिक्षेप

तालुका

प्रत्यक्षात मतदान ग्रामपंचायत संख्या

एकूण मतदार

झालेले मतदान

टक्केवारी

भोर

30

22910

19942

85.08

इंदापूर

26

57760

48351

83.71

वेल्हे

25

15148

12745

84.9

खेड

21

25601

18381

72.11

आंबेगांव

16

41536

31523

75.89

बारामती

13

37023

31442

84.93

जुन्नर

13

19456

16657

83.52

दौड

8

15446

12966

83.94

मावळ

8

14577

11605

79.61

हवेली

7

37923

28657

75.56

मुळशी

5

2306

1979

85.82

शिरुर

4

13523

11368

84.06

एकूण

176

303213

45166

80.79

गोपीचंद पडळकरांच्या मातोश्री बनल्या सरपंच! पडळकरवाडीत दणदणीत विजय

आटपाडी तालुक्यातील पडळकरवाडीमध्ये भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांची एकतर्फी सत्ता आली आहे. सरपंच पदाच्या उमेदवार असलेल्या पडळकर यांच्या मातोश्री हिराबाई पडळकर सरपंच पदावर विजयी झाल्या आहेत. निवडणूक लागल्यावर पडळकरवाडी गावामध्ये आधी हिराबाई पडळकर यांना बिनविरोध सरपंच करण्याचा ठराव केला होता. मात्र तालुक्यातील निवडणूका चुरशीच्या बनल्याने पडळकरवाडी मध्येही सरपंच पदासाठी देखील निवडणूक लागली होती. यात हिराबाई पडळकर विजयी झाल्या आहेत. गोपीचंद पडळकर हे भाजपाचे विधान परिषदेचे आमदार आहेत. त्यांचे बंधू ब्रह्मनंद पडळकर हे जिल्हा परिषद सदस्य आहेत आणि आता पडळकरवाडी या त्यांच्या गावामध्ये सरपंच म्हणून त्यांच्या मातोश्री हिराबाई कुंडलिक पडळकर विराजमान झाल्या आहेत. त्या ३०० मतांनी निवडून आल्या आहेत.

कीर्तनकार इंदोरीकर महाराजांच्या सासूबाई बनल्या सरपंच; निळवंडे ग्रामपंचायतीत मिळवला विजय!

संगमनेर तालुक्यात निळवंडे ग्रामपंयाचत निवडणुकीत कीर्तनकार ह.भ.प निवृत्ती महाराज देशमुख-इंदोरीकर यांच्या सासूबाई शशिकला शिवाजी पवार या सरंपचपदी निवडून आल्या आहेत. शशिकला पवार यांनी निळवंडे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली. शशिकला पवार यांनी सुशीला उत्तम पवार यांचा पराभव केले आहे. शशिकला या 227 मतांनी विजयी झाल्या आहेत. नारळ या चिन्हावर निवडणूक लढवत शशिकला पवार या निळवंडे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी विराजमान झाल्या आहेत.

माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांचे भाऊ भैया कडू बेलोरा ग्रामपंचायतच्या सरपंचपदी

आमदार बच्चू कडू यांचे मोठे बंधू भैय्या कडू बेलोरा ग्रामपंचायतमध्ये सरपंच पदाच्या निवडणूकीत विक्रमी ११०० पेक्षा अधिक मतांनी विजयी झाले. काँग्रेसचे सरपंच पदाचे उमेदवार दत्ता विधाते यांचा पराभव झाला. बच्चू कडू यांच्या प्रहारची सलग २५ वर्षापासून बेलोरा ग्रामपंचायत वर सत्ता आहे. काँग्रेसच्या दत्ता विधाते यांचा ११०० पेक्षा अधिक मतांनी केला भैय्या कडू यांनी पराभव केला. १३ पैकी १३ सदस्य विजयी झाले. बच्चू कडू यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. 

मोहाडीत भाविनी पाटील पराभूत

ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेर मतदार संघातील मोहाडी या ग्रामपंचायतीत गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील यांची कन्या भाविनी पाटील यांचे पॅनल पराभूत झाले. गेल्या पंचवार्षिकमध्ये त्या सरपंच होत्या. त्यांच्यासमोर प्रा. शरद पाटील यांचे पॅनल उभे होते. मात्र, या निवडणुकीत त्यांचा टिकाव लागला नाही. भाविनी पाटील यांच्या ग्रामविकास पॅनलला 10 पैकी 3 जागा मिळाल्या आहेत. भाविनी पाटील यांचे प्रतिस्पर्धी शरद पाटील यांच्या लोकशाही उन्नती पॅनलला दहा पैकी सात जागा मिळाल्या, त्यात लोकनियुक्त सरपंचपदही शरद पाटलांच्या पॅनलला मिळालं आहे.

राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांचे चुलत भाऊ अभय मुंडे नाथ्रात विजयी

भाजपचे दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची जन्मभूमी असणाऱ्या नाथ्रात (ता. परळी) येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांचे चुलत भाऊ अभय मुंडे विजयी झालेत. या ठिकाणी धनंजय मुंडे आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला. या निवडणुकीत भावा-बहिणीचे फोटोही एकाच बॅनवर पाहायला मिळाले. सरपंच पदासाठी मुंडेंचे चुलत भाऊ अभय मुंडे रिंगणात होते. त्यांच्यासमोर वंचित बहुजन आघाडी पुरस्कृत उमेदवार गौतम आदमाने आव्हान होते. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत नाथ्रा ग्रामपंचायत बिनविरोध झाली होती. त्यावेळी बीड जिल्हा परिषदेचे गटनेते अजय मुंडे यांच्या मातोश्री या सरपंच म्हणून बिनविरोध निवडून आल्या होत्या. त्यापूर्वी अजय मुंडे हे देखील सरपंच म्हणून निवडून आले आहेत. आता त्यांचे बंधू अभय मुंडे हे सरपंचपदी निवडून आल्याने सत्ता पुन्हा त्यांच्याच घरात राहिल्याचे दिसून येत आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यातील कावळेवाडी आणि पूर्वी ग्रामपंचायतीवर 'आप'चा सरपंच

उस्मानाबाद जिल्ह्यातील कावळेवाडी ग्रामपंचायतीवर आम आदमी पक्षाने आपला झंडा फडकावला आहे. येथे अ‌ॅड. अजित खोत विजयी सरपंचपदासाठी विजयी झाले आहेत. तसेच, जिल्ह्यातील एका ग्रामपंचायतीवर शिंदे गटाने ताबा मिळवला आहे. कावळेवाडी आणि पूर्वी ग्रामपंचायत आपकडे आली आहे. 

मनसेची पालघरमध्ये बाजी

पालघरमध्ये मनसेने खाते उघडले असून गुंडले ग्रामपंचायतीवर मनसेचा झेंडा फडकला आहे. मनसेचे जयेश आहाडी सरपंचपदी निवड झाली आहे. सातपाटीमध्येही मनसेचे आठ उमेदवार निवडून आले आहेत. 

संभाजीराजेंच्या स्वराज्य संघटनेने मिळवला 3 ग्रामपंचायत विजय 

स्वराज्य संघटनेचे धाराशिव येथील सरपंचासह 13 सदस्य निवडून आले आहेत. तर, नाशिकमध्ये सरपंचासह सदस्यपदी कार्यकर्ते निवडून आले आहेत. आतापर्यंतच्या निकालानुसार स्वराज्य संघटनेच्या 3 ग्रामपंचायत विजयी झाल्या आहेत. यामध्ये नाशिक जिल्ह्यातील गणेशगाव व वासोल गाव तसंच धाराशिव जिल्ह्यातील तडवला ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

'फॉरेन रिटर्न' लेकीकडे आता गावचा कारभार

उच्च शिक्षण सोडून थेट राजकारणात एन्ट्री केलेल्या या फॉरेन रिटर्न तरुणीने ग्रामपंचायत निवडणूक खऱ्या अर्थाने गाजवली आहे. मिरज तालुक्यातल्या वड्डी ग्रामपंचायत सरपंच पद निवडणुकीत यशोधरा राजे शिंदे ही तरुणी विजयी झाली. ग्रामपंचायतीमध्ये तिने रेणुका देवी ग्रामविकास सरकार पॅनल निवडून आले आहे. गावातल्याच शिवस्वराज्य ग्राम विकास पॅनलच्या झाकीर वजीर यांचा १४९ मतांनी पराभव करत वड्डी गावाच्या सरपंचपदी विजय झाला. नरवाडच्या शिंदे घराण्यातील यशोधरा हिला लहानपणापासून राजकारणाचे धडे घरातच मिळाले होते. पणजोबा नरवाड गावचे २५ वर्ष सरपंच, त्यानंतर त्यांच्या आजी मंदाकिनी राजे शिंदे गावच्या ५ वर्षे सरपंच होत्या. तसंच वडील महेंद्रसिंग राजे शिंदे यांनी देखील ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम पाहिले होते. त्यामुळे यशोधरा हिला राजकीय वारसा होता.

बँडवाला बनला सरपंच

जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यामध्ये अंतुर्ली खुर्द या ग्रामपंचायतीवर कुठल्याही पक्षाचा पाठिंबा न घेता चक्क एक बँड वाला सरपंचपदी म्हणून निवडून आला आहे. फक्त स्वतःच नाही तर बँड वाल्याने त्याचे संपूर्ण पॅनलही जिंकून आणत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. अंतुर्ली खुर्द येथे कांतीलाल गणसिंग सोनवणे हे कुटुंबासह वास्तव्यास आहेत. ते गायक असून त्यांचा बँडचा व्यवसाय आहे. लग्न सोहळे तसेच विविध कार्यक्रमात ते गायक म्हणून तसेच वाद्य व बँड व्यावसायिक म्हणून ते काम करतात. यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत बँड व्यावसायिक असलेले कांतीलाल सोनवणे यांनी आपले नशीब आजमावण्याचे ठरविले. त्यानुसार त्यांच्या जातीचे आरक्षणही निघाले आणि सरपंचपदासाठी कांतीलाल सोनवणे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले. एवढेच नव्हे तर कांतीलाल सोनवणे यांनी त्यांचे संपूर्ण पॅनलही या निवडणुकीच्या रिंगणात उभे केले. आणि भल्या भल्यांसमोर पहिल्यांदाच निवडणूक लढवली. ५१३ मतांनी कांतीलाल सोनवणे यांचा सरपंचपदी विजय झाला. तसेच त्यांच्या पॅनलमधील सदस्य गौरव गोकुळ पाटील, कविता रघुनाथ भिल, हर्षा गौरव पाटील, राहुल दिनकर पाटील, सोनाली गोविंदा पाटील, अनिल आधार जवरे, प्रतिभा महेंद्रसिंग पाटील हेही विजयी झाले आहेत.

लातूरच्या मुरुडमध्ये सहानुभूतीच्या लाटेत पत्नीच्या पॅनलचा दणदणीत विजय

लातूर जिल्ह्यात सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या मुरुड ग्राम पंचायतीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पत्नीच्या निवडणूक प्रचारात भाषण करून स्टेजवर बसले असताना छातीत कळ आली आणि पत्नी अमृता नाडे यांच्या खांद्यावर अखेरची मान टाकली. त्यानंतर गावात निवडणुकीचा प्रचारच बंद झाला. विरोधी पक्षांनीही अमृता नाडे यांना सरपंचपदासाठी उघड पाठिंबा दिला. मात्र ग्रामस्थांनी अमृता नाडे यांच्यासह त्यांच्या पॅनललाही पूर्ण पाठिंबा दिला अन् ३५ वर्षे सत्तेत असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित दिलीप नाडे पाटील यांना धक्का बसला. दिलीपदादा नाडे पाटील पॅनलचा केवळ एक उमेदवार निवडून आला आहे. तर अमृता नाडे पाटील यांच्या पॅनलचे १६ उमेदवार निवडून आले आहेत. अमृता नाडे यांच्यासह त्यांच्या पॅनलचे १७ उमेदवार विजयी झाले. तर दिलीप नाडे यांच्या पॅनलमधील केवळ एक महिला उमेदवार निवडून आली आहे. अमृता नाडे आणि त्यांचे पॅनल बहुमताने विजयी झाले आहेत. अमृता नाडे यांनी विजय आणि दिलीप नाडे यांनी पराजय शांतपणे स्वीकारला आहे.

ऊसतोड कामगार, मोलमजूरी करणारी महिला सरपंचपदी

नांदेडमध्ये लोहा तालुक्यातील पळशी येथील ग्रामस्थांनी एका ऊसतोड कामगार आणि मोलमजूरी करणाऱ्या महिलेला सरपंच म्हणून निवडून दिले आहे. राजश्री नामदेव गोटमुकले असे या महिलेचे नाव असून मोलमजूरी करून मुलांच्या शिक्षणास आणि घरासाठी हातभार लावताात. मात्र यंदा सरपंच पदाची निवडणूक थेट जनतेतून होणार असल्यानं त्यांनी नशीब आजमावले. राजश्री गोटमुकले यांना ३५० मते मिळाली. ग्रामस्थांनी राजश्री यांना भरघोस मतांनी सरपंच पदी निवडून दिले.

मातब्बरांना धूळ चारून गुराखी बनला सरपंच

चंद्रपूरमधील बल्लारपूर तालुक्यातील बामनी गावामध्ये ग्रामस्थांनी एका गुराख्याला सरपंच म्हणून निवडून दिले आहे. अपक्ष निवडणूक लढवत असलेल्या या उमेदवारासाठी ग्रामस्थांनी वर्गणी गोळा करून निधीही उभारला. तसेच त्याच्या विजयासाठी सायकलवरून प्रचारही केला. या नवनियुक्त सरपंचांचं नाव आहे प्रल्हाद बुधाजी आलाम.आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने ते गावातील लोकांची गुरे चरण्यासाठी घेऊन जातात. त्याशिवाय शेती आणि मोलमजुरी करून ते कुटुंबाचे पालन-पोषण करतात. प्रल्हाद आलाम यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंचपदासाठी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला होता. त्यांच्यासमोर भाजपा आणि काँग्रेसच्या उमेदवारांचे आव्हान होते. निवडणूक लढवण्यासाठी त्यांच्याकडे पैसे आणि समर्थकांचे पाठबळ नव्हते. तेव्हा त्यांनी सायकलवरून स्वत:चा प्रचार करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला लोकांनी त्यांची थट्टा केली. मात्र आलाम यांनी धीराने निवडणूक लढवली. अशा परिस्थितीत त्यांचा साधेपणा आणि प्रामाणिकपणा पाहून गावातील तरुण त्यांच्या मदतीस आले. त्यांनी काँग्रेस आणि भाजपाच्या मातब्बर उमेदवारांना टक्कर देत १०८५ मते मिळवून विजय मिळवला.

सासूने केला सूनेचा पराभव 

सेनगाव तालुक्यातील हाताळा ग्रामपंचायतीची निवडणूक सासू-सूनेच्या उमेदवारीने चांगलीच चर्चेत आली होती. या निवडणुकीकडे अवघ्या हिंगोली जिल्ह्याचे लक्ष लागले होते. आज झालेल्या मतमोजणीमध्ये शोभाबाई धामणकर यांनी सरपंचपदासाठी ५७१ मते घेऊन विजय मिळवला. त्यांनी त्यांच्या सून संगीता धामणकर यांचा पराभव केला आहे. पराभूत झालेल्या संगीता धामणकर यांनी यापूर्वी १० वर्षे सरपंचपद भूषवले आहे. यावेळीही त्यांनी सरपंचपदासाठी आपली उमेदवारी दाखल केली होती. त्यांच्या विरोधातच नवख्या असलेल्या त्यांच्या सासू शोभाबाई धामणकर निवडणूक रिंगणात उतरल्या होत्या. याशिवाय कोमल काळे, शारदा काळे यांनीदेखील सरपंचपदासाठी अर्ज दाखल केले होते.  सरपंचपदासाठी असलेल्या शोभाबाई धामणकर यांनी ५७१ मते घेऊन विजय मिळविला. तर त्यांच्या सूनबाई संगिता धामणकर यांना २५० मते मिळाली. कोमल काळे यांना ४७५ तर शारदा काळे यांना १७ मते मिळाल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. या निवडणुकीत सासू वरचढ ठरल्याचे स्पष्ट झाले आहे.

पालकमंत्र्याचा प्रचार दौरा ठरला अपयशी; सीमा झांबरे कोरेगावच्या लोकनियुक्त सरपंच 

पालकमंत्री तथा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोरेगाव खुर्द (ता.खेड) या गावात येऊन उमेदवार विजयी करण्याचे आवाहन केले होते. तरीदेखील त्यांच्या समर्थक उमेदवाराचा पराभव झाल्याने भाजपवर मोठी नामुष्की आली आहे. कोरेगाव खुर्द (ता.खेड) ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच म्हणून सीमा राजू झांबरे यांची मोठ्या मताधिक्याने निवड करण्यात आली आहे. त्यानीं प्रतिस्पर्धी उमेदवार आरती सुरेश काळे यांच्यावर तब्बल २८८ मताने पराभव केला. गावातील पहिल्या लोकनियुक्त महिला सरपंच होण्यासाठी काळे आरती सुरेश आणि झांबरे सीमा राजू यांच्यात सरळ सामना होता.यात काळे यांना ४३२ मते तर झांबरे यांना ७११ मते पडली. पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीत भाजपकडून निवडणूक लढविलेले आणि त्यात पराभूत झालेले रामदास मेंगळे यांनी ग्रामपंचायत निवडणूकीत विजय मिळविला. वॉर्डनिहाय विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे - * वॉर्ड क्रमांक एक (तीन जागा) - १) जाधव मिनल विनायक (१५४ मते) थोरात रंजना चिंधु (३८९ मते,विजयी ) विद्या सतीश कडूसकर (३५५ मते,विजयी) २) मेंगळे हॊना रामा (बिनविरोध) * वॉर्ड क्रमांक दोन (तीन जागा) - १) गावडे कैलास तुकाराम (१२१ मते) मेंगळे रामदास रघुनाथ (१७४ मते,विजयी) २) गावडे सहिंद्रा राजाराम ( १९३ मते,विजयी ) मेंगळे सीताबाई ज्ञानेश्वर (१०१ मते) ३) गाळव काळूराम नाना (२३० मते, विजयी) जाधव विनायक धर्माजी (६३ मते) * वॉर्ड क्रमांक तीन (तीन जागा) - १) कडूसकर जया साहेबराव (२३२ मते,विजयी) कडूसकर पूनम विकास (१४८ मते) २) कडूसकर प्रविण विलास (८८ मते) घनवट माधुरी सुनिल (१२२ मते) दोंद प्रकाश दत्तात्रय (१७० मते, विजयी) ३) मेंगळे जिजा भिवा (बिनविरोध). दरम्यान पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सभा घेतलेल्या साकुर्डी (ता. खेड) ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली. राष्ट्रवादीच्या जानकीमाता ग्रामविकास परिवर्तन पॅनेलने भाजप समर्थक पॅनेलचा सुफडा साफ करीत सरपंचपदासह नऊपैकी सात जागांवर विजय मिळवला. भाजपला मानणाऱ्या जानुबाई ग्रामविकास पॅनेलचा धुव्वा उडाला. राष्ट्रवादीच्या जानकीमाता ग्रामविकास परिवर्तन पॅनेलने सरपंचपदासह नऊपैकी सात जागांवर विजय मिळवला, तर विरोधी पॅनेलला दोन जागांवर समाधान मानावे लागले. मावळत्या सरपंच ज्योती सुपे या पुन्हा सरपंचपदासाठी निवडणूक रिंगणात होत्या, परंतु यात राष्ट्रवादीच्या रोहिणी शंकर गवारी यांनी एकतर्फी बाजी मारली. सुपे यांना ४१९; तर गवारी यांना ६३८ मते मिळाली. त्यांच्यात २१९ मतांचा फरक राहिला.

राष्ट्रवादीचे बारामतीत वर्चस्व कायम

बारामती तालुक्यातील वाणेवाडी, मुरूम, वाघळवाडी व पणदरे ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणुक अत्यंत चुरशीची ठरली. पणदरेत माळेगावचे माजी चेअरमन तानाजी कोकरे यांच्या पॅनेलने सरपंचपदाची बाजी मारली, मात्र सत्यजित जगताप व विक्रम कोकरे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी उभ्या  केलेल्या पॅनेलला गावकऱ्यांनी मोठी साथ दिल्याने त्यांच्या गटाचे ८ उमेदवार विजयी झाले. तर तानाजी कोकरे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने ७ जागा व सरपंचपदाची जागा अजित सोनवणे यांनी जिंकली.पळशी ग्रामपंचायतीत जिल्हा परीषदेचे माजी सभापती भाऊसाहेब करे व माजी उपसरपंच माणिक काळे, राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष तानाजी कोळेकर व त्यांच्या सहकाऱ्यांच्या नेतृत्वाखालील जय हनुमान ग्रामविकास परिवर्तन पॅनेलने बाजी मारली. सरपंचपदाच्या जागेसह १० पैकी १० जागा जिंकून एकतर्फी वर्चस्व प्रस्थापित केले.कुरणेवाडी गावात बारामती दूध संघाचे अध्यक्ष संदीप जगताप यांना मोठा धक्का बसला असून कुरणेवाडी काळभोर गटाने ६ विरूध्द २ जागांनी संदिप जगताप यांना काळभोर गटाने धक्का दिला आहे. हनुमंत काळभोर व सूर्यकांत काळभोर यांनी जगताप यांनी जगताप गटाला कडवे आव्हान दिल्याने गावच्या सरपंचपदी आशा किसन काळभोर या निवडून आल्या आहेत. येथे वारूळबाबा स्वाभिमान पॅनेलने बाजी मारली आहे.गडदरवाडीत सतिश काकडे, प्रमोद काकडे व सोमेश्वरचे संचालक अभिजित काकडे यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या श्री सोमेश्वर ग्रामविकास पॅनेलने बाजी मारत सरपंचपदासह सर्व जागा जिंकल्या आहेत. येथे सोमेश्वरचे संचालक शैलेश रासकर व लक्ष्मण गोफणे यांच्या पॅनेलचा येथे पराभव झाला आहे.वाणेवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या उमेदवार गीतांजली दिग्विजय जगताप यांनी गाव पॅनेलला धक्का देत अपक्ष म्हणून निवडून आल्या आहेत. गाव पॅनेल असलेला हनुमान ग्रामविकास पॅनेलच्या सरपंचपदाच्या उमेदवार विद्या भोसले यांचा पराभव झाला आहे. मुरूम येथे नंदकुमार शिंगटे हे सरपंचपदाचे उमेदवार निवडून आले आहेत. तर १३ पैकी ७ उमेदवार निवडून आले आहेत.

दौंड तालुक्यात भाजपाचा दणदणीत विजय

दौंड तालुक्यामध्ये ८ पैकी ६ ग्रामपंचायत मध्ये भाजपने दणदणीत यश मिळवले आहे. आमदार राहुल कुल समर्थकांना ६ ग्रामपंचायत वर राष्ट्रवादी १ ठिकाणी व काँग्रेस १ ठिकाणी विजयी झाले आहेत. पाटेठाण, नांदूर, दहिटणे, देवकरवाडी, बोरीभडक, लोणारवाडी ठिकाणी भाजपा विजयी झाला आहे.पाटेठाण ग्रामपंचायतचे सरपंच पद अनुसूचित जमातीसाठी असल्याने रिक्त राहिले असले तरी त्या ठिकाणी भाजपाची सत्ता आली आहे. तसेच नांदूर येथे युवराज बोराटे, दहीटणे आरती गायकवाड ,देवकरवाडी तृप्ती दिगंबर मगर, बोरीभडक कविता कोळपे व लोणारवाडी येथे प्रतीक्षा हिवरकर विजयी झाले आहेत. विशेष म्हणजे यापैकी पाटेठाण ,नांदूर ,देवकरवाडी, बोरीभडक या ४ ग्रामपंचायतीमध्ये यापूर्वी राष्ट्रवादीची सत्ता होती. या निवडणुकीमध्ये भाजपाने विजय मिळवल्याने सत्तांतर झाले आहे. दौंड तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील राहूबेट परिसरातील दहिटणे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भाजपचे आमदार राहुल कुल समर्थक उमेदवार आरती गायकवाड १६३ मतांनी विजयी तर देवकरवाडी ग्रामपंचायत सरपंचपदी भाजपच्या तृप्ती दिंगबर मगर यांनी ३६७ मतांनी दणदणीत विजयी मिळवला आहे. पाटेठाण ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीत सरपंचपदाचे अर्ज बाद झाल्याने सरपंचपद रिक्त राहणार असून ग्रामपंचायतवर सत्तांतर होत आमदार राहुल कुल समर्थक भैरवनाथ जनसेवा पॅनलने ८-० ने सत्ता खेचून आणली आहे. विजयानंतर कुल समर्थकांनी गुलालाची मुक्तपणे उधळण करत जल्लोष केला.दापोडी येथे भाजपाचे बहुमत असले तरी थोरात समर्थक राष्ट्रवादीचे आबा गुळमे यांचा विजयी झाला आहे. येथे भाजपाचे ८ व राष्ट्रवादीचे ५ उमेदवार निवडून आले आहेत. डाळिंब येथे काँग्रेसचे बजरंग मस्के विजयी झाले आहेत. येथे राष्ट्रवादी व भाजपा पराभूत झाले आहे. या संदर्भात आमदार राहुल कुल म्हणाले की केंद्रात व राज्या मध्ये असणारे भाजपाचे शासन व पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील त्यांच्या विचारांचा व विकास कामांचा हा विजय आहे.

खेड तालुक्यातील ७ ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपदाचे उमेदवार बिनविरोध

खेड तालुक्यातील २३ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत २३ पैकी ७ ग्रामपंचायतीमध्ये सरपंच पदाचे उमेदवार बिनविरोध निवडुन आले. वाडा, देवोशी भांबोली, मांजरेवाडी, अनावळे, आंभु, येलवाडी या गावचे सरपंच बिनविरोध निवडून आले. लोकनियुक्त सरपंच पदासाठी १६ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या निवडणुक रिगंणात ५४ उमेदवार उतरले आहे. २३ पैकी २ ग्रामपंचायती निवडणूक बिनविरोध झाली. एकूण ७५ प्रभागातील १९३ जागांपैकी ८१ जागा बिनविरोध झाल्या तर अवघ्या २ जागा रिक्त राहिल्या. २१ ग्रामपंचायतीच्या ६२ प्रभागातील ११० जागांसाठी २३३ उमेदवारांमध्ये निवडणूक झाली असून लोकनियुक्त सरपंच पदाच्या निवडीत महिलांनी बाजी मारत ६ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदावर महिलांची तर एका ग्रामपंचायतीवर पुरुष बिनविरोध निवड झाली. तालुक्यातील २३ ग्रामपंचायती पैकी अनिता मांजरे ( मांजरेवाडी ) आणि रणजित विठ्ठल गाडे ( येलवाडी ) या दोन ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंचासह सदस्यांची निवड बिनविरोध झाली. चासकमान धरणांतर्गत पश्चिम भागातील (देवोशी) ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी एकमेव नामनिर्देशन दाखल करण्यात आलेल्या लीलाबाई देवराम लव्हाळे यांची बिनविरोध निवड झाली. तर नामनिर्देशन पत्र माघारीच्या दिवशी समोपचाराने सरपंच पदाच्या निवडणुकीतून उमेदवारी अर्ज माघारी घेतल्यामुळे रुपाली शिवाजी मोरे (वाडा ) शीतल काळुराम पिंजण (भांबोली),अश्विनी भानुदास कुडेकर (अनावळे) ,वच्छला ज्ञानदेव काबंळे (आंभू), यांचा एकमेव नामनिर्देशन पत्र राहिल्याने बिनविरोध निवडून आले. तालुक्यातील २३ ग्रामपंचायतीच्या १९३ जागांसाठी ६०१ नामनिर्देशन पत्र दाखल झाली होती. छाननी नंतर ५ नामनिर्देशन पत्र अवैध ठरली होती. उर्वरित ५९६ उमेदवारांपैकी नामनिर्देशन पत्र अखेरच्या माघारीच्या दिवशी २८४ उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे ८१ सदस्य बिनविरोध निवडून आल्याने ११० जागांसाठी २३३ उमेदवार निवडणूक रिंगणात होते.

भोर तालुक्‍यात महाविकास आघाडीचे वर्चस्व

भोर तालुक्‍यातील 54 ग्रामपंचायतींच्या जाहीर झालेल्या निवडणुकांत 24 ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्या होत्या, तर 29 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा या निकालात महाविकास आघाडीच्या (कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना) उमेदवारांनी बाजी मारली असून, भाजपला एकाही ग्रामपंचायतीवर सत्ता मिळवता आली नाही. यांच्या ताब्यात ग्रामपंचायती आल्या आहेत. थेट जनतेतून निवडून आलेले सरपंच पुढीलप्रमाणे अंगसुळे- राणी शशिकांत किरवे, कर्नावड- सोनाली अविनाश राजीवडे, शिरवली तर्फे भोर- कोमल अमित झांजले, ब्राह्मणघर- रंजना सीताराम धुमाळ, पसुरे- प्रवीण विलास धुमाळ, कारी- सतीश रामचंद्र ढेबे, येवली- कल्पना आनंदा खंडाळे, सांगवी हिमा- संदीप सुदाम शेलार, राजघर - संगीता गणेश पडवळ, निगुडघर- मंगल मारुती कंक, आंबेघर- अश्विनी संदीप खोपडे, बारे खुर्द- सविता संदीप गायकवाड, सांगवीभिडे- सविता शत्रुघ्न घोलप, हर्णस- प्रतिभा विजय पानसरे, वागजवाडी- निकिता ज्ञानेश्वर आवाळे, भांबवडे- माधवी किरण सोनवणे, सांगवी बुद्रुक- सोनल गणेश घोरे, करंदी खे. बा.- नवनाथ गायकवाड, कासुर्डी गुं. मा- अजय तात्याबा मालुसरे, वाठार हिमा- सविता संजय खाटपे, कुरूंगवडी- अंजली सुभाष ननावरे, हरिश्‍चंद्री- सुनीता मारुती गाडे, तेलवडी- आरती किरण धावले, सांगवी निधान- मंगेश पालवे, करंदी बुद्रुक- अस्मिता गणेश वरखडे, म्हसर बुद्रुक- एकनाथ सदाशिव म्हसुरकर, वाठार हिंगे- मुरारी दत्तात्रय भालेराव, पारवडी- अमोल भाऊसो लिम्हण, म्हाकोशी- रजंना महादेव साळेकर.

वेल्ह्यात मनसेचे सर्वाधिक सदस्य पण सरपंचपदी काँग्रेस

वेल्हे तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये आमदार संग्राम थोपटे यांचे वर्चस्व कायम राहिले असून सर्वाधिक जागा काँग्रेसला (१२) मिळाल्या आहेत, तर राष्ट्रवादी १० ठिकाणी, शिवसेना ठाकरे गटाला ३ जागा, भारतीय जनता पार्टीला २ जागा आणि वंचित बहुजन विकास आघाडीला १ जागा तर सर्वाधिक ग्रामपंचायत सदस्य म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे निवडून आले आहेत. सर्वात चुरशीची लढत दापोडे ग्रामपंचायतीत झाली आहे. या ग्रामपंचायतमधील १५ वर्षाची राष्ट्रवादीची सत्ता गेली असून काँग्रेसने बाजी मारली आहे. गावाचे व सरपंचाचे नाव व त्यांना पडलेली मते पुढीलप्रमाणे १) सोंडे सरपाला - गायकवाड सोपान दिनकर १६६,२) सोंडे कार्ला - युवराज बबन कार्ले १४६, ३) शिरकोली - अमोल भीमराव पडवळ २२३, ४) हारपूड - कुमकर अंकुश दत्तू १९२, ५) वेल्हे खुर्द - जेधे प्रकाश मारुती ४४७, ६) कोशिमघर - रमेश किसन कडू १७५, ७) गोंडेखल - नीलेश विठ्ठल कडू १३२, ८) कोलंबी - शितल अंकुश कोडीतकर २३९, ९) बोरावळे - सुषमा बापू शिंदे - २०३, >१०) गुंजवणे - रसाळ लक्ष्मण म्हकाजी - ३०५, ११) केळद - आश्विनी ऋषिकेश भावळेकर - ६८०,१२) मोसे बुद्रुक - किसन बबन बावधने - ९१,१३) गिवशी- बाळासाहेब धाऊ मरगळे- १०४, १४) वाजेघर बुद्रुक - स्वाती संतोष काबदुले - ३३२, १५) सोंडे हिरोजी - निवृत्ती एकनाथ जाधव - १६७, १६) लव्ही बुद्रुक - शंकर कृष्णा रेणुसे -३७५, १७) पाल बुद्रुक - नीता किरण खाटपे - ३२६,१८) बालवड- विशाल तुळशीराम पारठे -१३९, १९) चिरमोडी - अलका विजय गिरंजे - ५३१,२०) सोंडे सरपाले - पूनम प्रकाश बढे - २९८, २१) दापोडे - संदीप चंद्रकांत शेंडकर ६७३,२२) कोंडगाव - पूनम पांडुरंग दारवटकर ३७३, २३) धानेप - राहुल सुरेश मळेकर -३७९,२४) टेकपाळे - मंगल दिनकर बामगुडे १७६, २५) आंबेगाव खुर्द - प्रियंका नवलेश पंडित बिनविरोध,२६) शेनवड - लक्ष्मण दगडू शिंदे बिनविरोध,२७) जाधववाडी - शीतल कृष्णा तुपे बिनविरोध, २८) वडघर - सुवर्णा नथुराम डोईफोडे - बिनविरोध.

आंबेगाव तालुक्यात 15 जागांवर राष्ट्रवादी विजयी

आंबेगाव तालुक्यातील २१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या. यामध्ये १५ ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीचा सरपंच झाला आहे तर २ ग्रामपंचायती शिवसेना शिंदे गटाकडे, २ ग्रामपंचायती शिवसेना उद्धव गटाकडे, १ ग्रामपंचायत राष्ट्रवादी व शिवसेना अशी एकत्रित तर एका ग्रामपंचायतीवर अपक्ष सरपंच निवडून आला आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने घोडेगाव, आंबेदरा, आमोंडी, गंगापूर खुर्द, चांडोली, पारगाव तर्फे खेड, मेंगडेवाडी, नारोडी, निघाेटवाडी, रांजणी, नागापूर, डिंभे खुर्द, आहुपे, तळेघर, चिखली आल्याचा दावा केला आहे.तर शिवसेना शिंदे गटाकडे चिंचोडी व भावडी, शिवसेना उद्धव गटाकडे साल व कळंब तर धामणी ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी व शिवसेना एकत्रित सरपंच निवडला गेला आहे. ग्रामपंचायतचे नाव, निवडून आलेला सरपंच व सदस्यांची नावे पुढीलप्रमाणे- घोडेगाव : सरपंच अश्विनी विक्रम तिटकारे, सदस्य कपिल गुलाब सोमवंशी, नंदा प्रकाश काळे, सुनील कोंडाजी इंदोरे, ज्योस्त्ना तुकाराम डगळे, रुपाली सोमनाथ जंबुकर, सोमनाथ वसंत काळे, ज्योती अर्जुन पानसरे, स्वप्नील हरिश्चंद्र घोडेकर, सारिका किरण घोडेकर, संगीता अशोक भागवत, संतोष लक्ष्मण भास्कर, कांचन सुदाम काळोखे, कविता महेंद्र घोडेकर, अमोल संजय काळे, प्रदीप विठ्ठल घोडेकर, दीपिका मनीष काळे, मनोज गजानन काळे,
आमोंडी: सरपंच आरती ज्ञानदेव कोतवाल, सदस्य ताराबाई कुशाभाऊ जाधव, दिलीप वसंत किर्वे, राम सोपान फलके, कृष्णाबाई ज्ञानदेव कोतवाल, अंकुश बबन काळे, विजया रोहिदास कुरणे, ताईबाई शिवाजी काळे, सुनीता अविनाश फलके, धनंजय यशवंत फलके
चांडोली बुद्रुक: सरपंच दत्तात्रय सोमा केदार, सदस्य संदिप दत्तात्रय थोरात, सोनाली विकास थोरात, उत्तम गेणभाऊ थोरात, चित्रांजली विक्रम चासकर, प्रिया राहुल थोरात, गोविंद तुकाराम थोरात, रेश्मा मारुती जाधव, तुशार भगत थोरात, प्रीती प्रवीण थोरात, सत्यभामा भीमाजी काळे, बाहू निवृत्ती थोरात
मेंगडेवाडी : सरपंच बाळासाहेब सावळेराम मेंगडे, सदस्य जनार्दन विष्णू मेंगडे, शुभांगी जयवंत मेंगडे, नीलेश तुकाराम रणपिसे, सुषमा अरुणराव गिरे, कविता परशुराम मेंगडे, विशाल बाळासाहेब मेंगडे, रेश्मा दत्तात्रय गवारी, सुजाता भाऊसाहेब टाव्हरे, विशाल राजाराम गवारी
नारोडी : सरपंच मंगल नवनाथ हुले, सदस्य ज्योती सोपान हुले, गणेश गणपत वाघमारे, संतोष वसंत हुले, श्वेता तेजस भुते, अनुराधा मनोज जंबुकर, अजित कांतीलाल हुले, वैशाली एकनाथ कदम, ज्ञानेश्वर महादू नाईक, वर्षा सोमनाथ हुले, भूमिका चंद्रकांत हुले, प्रसाद भीमराव काळे,
निघोटवाडी: सरपंच नवनाथ बबन निघोट, सदस्य उषा गजानन चव्हाण, कोमल विशाल थोरात, महेंद्र शंकर घुले, नीलेश बाबाजी निघोट, सीमा शिवाजी निघोट, विनोद शिवाजी निघोट, वर्षा सनद निघोट, चेतन भैरू निघोट, उषा संजय चिंचपुरे, कल्याणी पांडुरंग निघोट, निशा संजय निघोट, संदिप शंकर निघोट
पारगांव तर्फे खडे : सरपंच नंदा सचिन पानसरे, सदस्य प्रशांत किसन आचार्य, शीतल शिवाजी पठारे, सुरेश नथू अभंग, सुनीता शिवाजी भागडे, उषा विठ्ठल पालेकर, गणेश बाबजी चिखले, सुवर्णा सचिन पवार, प्रशांत दशरथ पवार, कल्पना विकास दुधावडे, रूपाली संदिप मनकर, अमोल कुंडलिक मनकर,
रांजणी : सरपंच छाया बंडू वाघ, सदस्य सविता दिलीप उबाळे, प्रतिभा गुलाब वाघ, विजय सुरेश वाघ, माधवी सुनील सोनवणे, रमेश सरदार भोर, मधुसूदन मुरलीधर भोर, संगीता अभिजित भोर, महेश गुलाब भोर, मनीषा रमेश भोर, हिराबाई विठ्ठल भोर, संतोष दशरथ भोर,
आंबेदरा: सरपंच वृशाली दिनेश वाजे, मंगल शरद वाजे, गुणाबाई गजानन वाजे, अनिल मोतीराम वाजे, लिला प्रभाकर वाजे, नवनाथ तुळशीराम वाजे, वृशाली दिनेश वाजे, सुमित चंद्रकांत ढोंगे,
गंगापूर खुर्द: सरपंच कविता भरत सातकर, सदस्य भामाबाई गंगाराम गवारी, वैशाली बाळू ढोसर, विशाल बाळशीराम नरवडे, सीता धवल काळे, राजू दशरथ गवारी, सविता बाळू येवले, अनिता शंकर मधे, राजेंद्र रामभाऊ सातकर, पांडुरंग नामदेव ठोसर
डिंभे खुर्द : सरपंच शीला राजेंद्र लोहकरे, सदस्य खंडू मारुती थोरात, उषा किसन भवसारी, बाबुराव कृष्णा माळी, कमल ठकसेन लोहकरे, दिगंबर भिकाजी गवारी, शुभांगी अमोल राक्षे, सुलोचना लक्ष्मण राक्षे,
चिखली : सरपंच जयराम गंगाराम जोशी, सदस्य सीता दुलाजी तिटकारे, स्वप्नील शंकर भोमाळे, अंजनाबाई शिवाजी केंगले, धर्मा लक्ष्मण आढारी, मंगेश सखाराम इश्टे

इंदापूर तालुक्यात राष्ट्रवादीचे वर्चस्व 

तालुक्यात २६ ग्रामपंचायतींपैकी  १३ ग्रामपंचायतींवर सत्ता आल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष हनुमंत कोकाटे यांनी केला आहे. १० ग्रामपंचायतीवर भाजपची तर ३ ग्रामपंचायतींवर संमिश्र सत्ता आल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे. लाखेवाडी ग्रामपंचायतीच्या  सरपंच पदाच्या निवडणुकीत चित्रलेखा ढोले विजयी झाल्या. त्या ग्रामपंचायतींवर सदस्यपदाच्या निवडणुकीत ६ राष्ट्रवादी काँग्रेस व ७ भाजपचे सदस्य निवडून आले. बेलवाडी ग्रामपंचायतींवर भाजपाची सत्ता आली. तेथे भाजपचे तालुकाध्यक्ष ॲड.शरद जामदार यांच्या पत्नी मयुरी जामदार सरपंच पदाच्या निवडणुकीत विजयी झाल्या. माळवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भाजपच्या मंगला बाळासाहेब व्यवहारे विजयी झाल्या. थोरातवाडी ग्रामपंचायतीवर निर्विवादपणे भाजपचा झेंडा फडकला. सरपंचपदाच्या निवडणुकीत भाजपच्या साधना संतोष निकम विजयी झाल्या. तर भाजपचे ७ सदस्य निवडून आले. इंदापूर तालुक्यातील २६ ग्रामपंचायतच्या निवडणुकीत विजयी झालेले सरपंच पदाचे उमेदवार पुढीलप्रमाणे- १) बिजवडी - कोमल कचरे, २) गंगावळण - प्रसन्न गलांडे, ३) सराटी - आनिसा अमीर तांबोळी, ४) न्हावी- आशा दीपक डोंबाळे, ५) डिकसळ - मनीषा गवळी, ६ कुरवली- राहुल चव्हाण, ७ रेडणी- हिरा खाडे, ८) म्हसोबावाडी - राजेंद्र राऊत, ९) मानकरवाडी- शिर्के महादेव हनुमंत, १०) रणमोडवाडी- योगेश खरात, ११) बोरी - मंदा डोंबाळे, १२) कळाशी- रूपाली राजेंद्र गोलांडे, १३) पिंपरी खुर्द - शिरसोडी – राजेंद्र चोरमले, १४) माळवाडी - मंगल बाळासाहेब व्यवहारे, १५) अजोती- सुगाव- अमित काटे, १६ हिंगणगाव- रसिका आरडे, १७) मदनवाडी - अश्विनी बंडगर, १८) पडस्थळ -वैशाली पांडुरंग मारकड, १९) बेलवाडी - मयुरी शरद जामदार, २०) डाळज ३- अमित अर्जुन जाधव, २१) झगडेवाडी- अतुल गौतम झगडे, २२) लाखेवाडी - चित्रलेखा श्रीमंत ढोले, २३) डाळज नं. १- माधुरी महेश जगताप, २४ ) थोरातवाडी - साधना संतोष निकम, २५) डाळज २- शकुंतला सुरेश राऊत, २६) जांब-समाधान गायकवाड.

मांडवगण फराटा ग्रामपंचायत भाजपाकडे

शिरूर तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या मांडवगण फराटा ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा फडकला. येथे सत्ता परिवर्तन झाले असून राष्ट्रवादीच्या ताब्यातील असलेली सत्ता खेचून आणण्यात भाजपला यश आले आहे. या निवडणुकीत भाजपचे दादा पाटील फराटे यांच्या पॅनेलने थेट सरपंचपद तसेच ११ विरुद्ध ६ अशा फरकाने दणदणीत विजय संपादन केला. दादा पाटील फराटे यांच्या सूनबाई समीक्षा मदन कुरुमकर (फराटे) यांची थेट जनतेतून सरपंचपदी वर्णी लागली आहे. सरपंच पद हे इतर मागासवर्गीय महिलेसाठी आरक्षित असल्याने प्रथमच महिलांमध्ये मोठी चुरस निर्माण झाली होती. थेट सरपंच पदासाठी घोडगंगाचे माजी उपाध्यक्ष दादा पाटील फराटे, घोडगंगाचे संचालक सुधीर फराटे इनामदार यांच्या नेतृत्वाखालील शिवशक्ती ग्रामविकास पॅनल कडून समीक्षा अक्षय फराटे कुरुमकर तर श्री वाघेश्वर ग्रामविकास आघाडी पॅनल कडून शीतल सचिन जगताप यांच्यामध्ये सरळ लढत झाली होती. दादा पाटील फराटे, सुधीर फराटे इनामदार यांनी प्रचाराची धुरा सांभाळत पॅनल ची बांधणी केली होती. सत्ताधारी पॅनल च्या उमेदवाराचा अक्षरशः धुव्वा उडाला असून किशोर फराटे, माजी उपसरपंच सुभाष फराटे या मातब्बर उमेदवाराना पराभवाचा सामना करावा लागला. 

करंजावणे ग्रामपंचायतच्या सरपंचपदी मंगल संतोष दौंडकर 

करंजावणे (ता. शिरूर) ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत मंगल संतोष दौंडकर यांचा प्रचंड मतांनी विजय झाला असून,आरती शांतीदेव शिंदे यांचा दारुण पराभव झाला आहे. सरपंचपदासाठी पाच उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी माजी सरपंच संतोष दौंडकर यांच्या पत्नी मंगल दौंडकर यांछा ७३९ मते मिळून विजय झाला तर माजी सरपंच शांतीदेव शिंदे यांच्या पत्नी आरती शिंदे यांचा ३९५ मते मिळाल्याने मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले.  प्रभाग व आरक्षणानुसार विजयी सदस्य व मते पुढीलप्रमाणे प्रभाग क्रमांक - १ (सर्वसाधारण) १ जागा :- रंगनाथ शहाजी शिंदे (२९३ मते).सर्वसाधारण स्त्री राखीव- २ जागा :- सुजाता प्रकाश काळकुटे २०३) व सुभद्रा निळकंठ माकर (२५१).प्रभाग क्रमांक-२ -नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री राखीव १ जागा :- स्वाती कैलास कुदळे (२७०).सर्वसाधारण स्त्री राखीव जागा :- मोहिनी किरण दौंडकर (२६८).सर्वसाधारण जागा १ :- श्रीराम संपत शेलार ( बिनविरोध).प्रभाग क्रमांक ३- सर्वसाधारण स्त्री राखीव जागा १:- अनुसया नामदेव इंगळे (२२१).सर्वसाधारण जागा १ - राजू खंडू पुणेकर ( बिनविरोध).नागरिकांचा मागास प्रवर्ग जागा १: बिरा चंदर कुलाळ (बिनविरोध).

जुन्नरला नऊ ग्रामपंचायती राष्ट्रवादीकडे

जुन्नर तालुक्यातील निवडणूक झालेल्या १७ पैकी ९ ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचाराचे सरपंच निवडून आल्याचा दावा प्रवक्ते भाऊसाहेब देवाडे यांनी केला आहे. यात आणे, पारगाव, झापवाडी, भिवाडे खुर्द, सोमतवाडी, शिंदे,काळवाडी,हिवरे तर्फे मिन्हेर व आंबे या नऊ ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसने दावा केला आहे. शिरोली सुलतानपूर,काले व विठ्ठलवाडी तीन ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडीचे सरपंच विजयी झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान काळवाडी ग्रामपंचायतीचा सरपंच पदाचा निकाल राखून ठेवण्यात आला आहे. हातवीज ग्रामपंचायतीवर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा उमेदवार विजयी झाला आहे. तर हातवीज तसेच हिवरे तर्फे मिन्हेर व आंबे या तीन ग्रामपंचायतीमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे प्राबल्य असल्याचा दावा विश्वनाथ निगळे यांनी केला आहे. भाजपाने सावरगाव,बोतार्डे व साकोरी तीन ग्रामपंचायतीवर वर्चस्व मिळविले असून भाजपानेत्या आशा बुचके यांचे समर्थक विजयी झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असणारी बोतार्डे ग्रामपंचायत भाजपाकडे आली आहे. वानेवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच व सदस्य पदासाठी सलग तिसऱ्या वेळी एकही अर्ज आला नाही. यामुळे वानेवाडीवर पुन्हा प्रशासकच कारभार पाहणार असल्याचे निश्चित झाले आहे. वानेवाडीचा समावेश पेसा मध्ये झाला आहे मात्र गावात एकही कुटुंब अनुसूचित जमातीचे नसल्याने २०१२ पासून उमेदवाराअभावी ग्रामपंचायत रिक्त राहिली आहे. दुर्गम आदिवासी भागातील हातवीज येथे किसान सभेचे सदस्य महादू निर्मळ विजयी झाले आहेत. तर सात सदस्यापैकी दोन बिनविरोध निवडून आले असून पाच जागा रिक्त आहेत. 

Mr. Chandrakant Bhujbal

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

"महाराष्ट्रातील राजकारण"