Wednesday 30 December 2020

मानीव अभिहस्तांतरणासाठी सहकार विभागाची खास मोहीम; डिम्ड कन्व्हेअन्ससाठी 'ही' कागदपत्रे लागणार

१ ते १५ जानेवारी २०२१ पर्यंत विशेष मोहीम

राज्यातील बहुतांश गृहनिर्माण संस्थांनी मानीव अभिहस्तांतरण (डीम्ड कन्व्हेअन्स) केलेले नाही. परिणामी या इमारती किं वा गृहनिर्माण संस्थांची जागा बांधकाम व्यावसायिकाच्याच नावावर आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये जनजागृती करून मालकी हक्काचा पुरावा मिळावा, या उद्देशाने सहकार विभागाने १ ते १५ जानेवारी या कालावधीत मानीव अभिहस्तांतरणासाठी खास मोहिमेचे आयोजन केले आहे. मोहिमेच्या अनुषंगाने राज्यातील सर्व जिल्हा उपनिबंधकांना सूचना देण्यात आल्या आहेत. बांधकाम विकसकाने इमारतीचे बांधकाम करून सोसायटीकडे हस्तांतरण करणे बंधनकारक आहे. ही प्रक्रिया केली जात असली, तरी व्यावसायिक मानीव हस्तांतरण करून दिले जात नाही. परिणामी भविष्यात सोसायटी पुनर्विकासात अडचणी येतात. पुनर्विकासात वाढीव चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआय) मिळण्यात अडचण येते. हक्काचा पुरावा म्हणून मिळणारी मिळकत पत्रिका किं वा सदनिके ची सहज खरेदी-विक्री व्यवहार होत नाही, तसेच इतरही लाभ मिळत नाहीत. मानीव अभिहस्तांतरण झाल्यास सदनिकाधारकांना सर्व हक्क प्राप्त होतातच, तसेच बांधकाम व्यावसायिकाचा हक्क संपुष्टात येतो. सद्य:स्थितीला राज्यातील तब्बल ६० हजारांहून अधिक गृहनिर्माण सोसायटय़ांनी हस्तांतरण केलेले नाही. महाराष्ट्र मालकी हक्काच्या सदनिकांबाबत अधिनियम १९६३ मधील तरतुदीनुसार बांधकाम व्यावसायिकाने मालकी हक्काचे हस्तांतरण करून देणे बंधनकारक आहे. हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण झाली नसल्यास मोफा कायद्यांतर्गत केलेल्या सुधारणान्वये एकतर्फी हस्तांतरण करण्याची तरतूद आहे. त्यानुसार ज्या संस्थांची नोंदणी झाली आहे, त्या संस्थेमधील सदनिकाधारकांसाठी खास मोहीम सहकार विभागाकडून राबवण्यात येणार आहे. दरम्यान, या कालावधीत मानीव हस्तांतरणासाठी पात्र असलेल्या सर्व सहकारी गृहनिर्माण संस्थांना याबाबतची माहिती देऊन संबंधित सर्व पात्र गृहनिर्माण संस्थांकडून आवश्यक प्रस्ताव प्राप्त करून घेण्यात येणार आहेत. तसेच हस्तांतरण करण्याबाबतचे प्रमाणपत्रही दिले जाणार आहे. मानीव हस्तांतरण करण्याची क्लिष्ट प्रक्रिया अधिक सोपी करण्यात आली आहे. यापूर्वी हस्तांतरणासाठी २० पेक्षा अधिक कागदपत्रांची आवश्यकता होती. त्यातील अनेक कागदपत्रे कमी करण्यात आली आहेत. सध्या के वळ आठ ते नऊ प्रकारच्या कागदपत्रांच्या आधारे हस्तांतरण करण्यात येत आहे.राज्यातील गृहनिर्माण संस्थांची ( Housing Society) संख्या विचारात घेता प्रत्यक्षात गृहनिर्माण  संस्थेचे मानीव अभिहस्तांतरण झालेल्या संस्थांची संख्या अल्प आहे. मानीव अभिहस्तांतरण प्रक्रियेची (Deemed Conveyance of a Co-operative Housing Society) माहिती सहज उपलब्ध व्हावी आणि ही प्रक्रिया सुलभ व्हावी म्हणून संस्थांसाठी १ ते १५ जानेवारी २०२१ पर्यंत मानीव अभिहस्तांतरण (डीम्ड कन्व्हेअन्स) ((Deemed Conveyance) विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. तसेच यासाठी आवश्यक कागदपत्रांची पुरतता करावी लागणार आहे. या मोहिमेद्वारे सहकारी गृहनिर्माण संस्थांना मानीव अभिहस्तांतरणाबाबतची माहिती देण्यात येणार आहे. गृहनिर्माण संस्था ज्या जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था तथा सक्षम प्राधिकारी यांच्या कार्यक्षेत्रामध्ये आहे. त्या कार्यालयाकडे संस्थेने मानीव अभिहस्तांतरणाबाबतचा अर्ज विहित नमुन्यात आवश्यक त्या कागदपत्रासह सादर करावा. यामुळे राज्यातील सर्व सहकारी गृहनिर्माण संस्थांना त्यांच्या जमिनीचे कायदेशीर हक्क, विकासकाकडून प्राप्त करून देण्याचा प्रयत्न आहे. 

आवश्यक कागदपत्र :-

[?] मानीव अभिहस्तांतरणाकरिता नमुना ७ मधील अर्ज
[?] सहकारी गृहनिर्माण संस्था नोंदणी प्रमाणपत्र/कंपनी नोंदणी प्रमाणपत्र, Deed of Declaration ची प्रत.
[?] संस्थेच्या, कंपनीच्या साधारण सभेतील मानीव अभिहस्तांतरण करण्याबाबत केलेल्या ठरावाची प्रमाणित प्रत.
[?] मिळकत पत्रिकांचा तीन महिन्याच्या आतील उतारा (मालमत्ता पत्रक, ७/१२ उतारा इ.)
[?] संस्थेतील सर्व कायदेशीर सदनिकाधारकांची,संचालकाची विहित नमुन्यातील यादी.
[?] सहकारी गृहनिर्माण संस्थेने, कंपनीने अभिहस्तांतरण करुन देण्यासाठी अधिनियम १९७० अन्वये प्रवर्तकाला बजावलेली कायदेशीर नोटीस, पत्रव्यवहाराचा तपशील व घटनाक्रम.
[?] नियोजन, सक्षम प्राधिकरणाने दिलेले बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र तसेच भोगवटा प्रमाणपत्र.

संबंधित संस्थेकडे,कंपनीकडे भोगवटा प्रमाणपत्र नसल्यास इमारतीचा प्रत्यक्ष ताबा घेण्यात आल्याचे तसेच इमारतीच्या संदर्भात असलेल्या सर्व जबाबदाऱ्या,दायित्वे स्विकारण्यास तयार असल्याचे तसेच मानीव अभिहस्तांतरण झाल्यानंतर संबंधित नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेकडे भोगवटा प्रमाणपत्रासाठी अर्ज करणार असल्याबाबत स्व-प्रमाणपत्र.
तसेच मानीव अभिहस्तांतरण संबंधातील शासन निर्णय व परिपत्रके आणि इतर माहिती http://housing.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
https://housing.maharashtra.gov.in/Sitemap/housing/Registration%20of%20Society%20and%20Deemed%20Conveyance_Marathi.htm

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

==========================================================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1000/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
==============================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
=============================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
============================

  

Thursday 24 December 2020

पुणे महापालिकेत अखेर २३ गावांचा समावेश

पुणे महापालिकेत अखेर २३ गावांचा समावेश

पुणे महापालिका हद्दीमध्ये २३ गावे समाविष्ट करण्याबाबतची प्रारूप अधिसूचना राज्य शासनाच्या नगर विकास विभागाने बुधवारी (दि. २३) जाहीर केली़ याद्वारे पुणे महापालिका हद्दीत शहरालगतची २३ गावे समाविष्ट करण्याबाबत महाविकास आघाडी सरकारने शिक्कामोर्तब केले. मात्र, ही गावे महापालिका हद्दीतील भाग बनावी की नाही, यासाठी हरकती व सूचना (आक्षेप) दाखल करण्यास पुढील महिन्याचा कालावधी दिला. राज्य शासनाच्या या अधिसूचनेस म्हणजेच पुणे महापालिकेत २३ गावे समाविष्ट करण्याच्या निर्णयास आक्षेप घेण्यासाठी महिनाभरात पुण्याचे विभागीय आयुक्त यांच्याकडे लेखी कारणे सादर करणे आवश्यक आहे़ या कालावधीत आलेल्या आक्षेपांवरच शासनाकडून विचार केला जाणार आहे़ तसेच, या कालावधीनंतर विभागीय आयुक्त कार्यालयाकडून आलेल्या हरकती व सूचनांचा अहवाल तयार करून तो राज्याच्या नगर विकास विभागाकडे पुढील निर्णयास पाठविणार आहे़ त्यानंतर सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन ही २३ गावे महापालिका हद्दीचा भाग बनणार की नाही, याचा अंतिम निर्णय होणार आहे़. पुणे महापालिकेने १८ डिसेंबर,२०१३ रोजी झालेल्या मुख्य सभेत पुणे शहरालगतची ३४ गावे समाविष्ट करण्याबाबतचा ठराव राज्य शासनाला पाठविला होता़ सन २०१४ मध्येही गावे पुणे महापालिका हद्दीत समाविष्ट न झाल्याने हवेली तालुक्यातील संबंधित गावांमधील नागरिकांनी कृती समिती स्थापन करून न्यायालयात धाव घेतली होती़ त्यावेळी न्यायालयाने निर्णय देताना राज्य शासनाचा अभिप्राय मागविला होता़ या अभिप्रायात राज्य शासनाने सदरची ३४ गावे आम्ही पुणे महापालिका हद्दीत टप्प्या-टप्प्याने घेऊ असे सांगितले होते़. 
नव्याने समाविष्ट होणारी गावे - म्हाळुंगे, सूस, बावधन बुद्रुक, किरकिटवाडी, पिसोळी, कोंढवे-धावडे, कोपरे, नांदेड, खडकवासला, मांजरी बुद्रुक, नऱ्हे, होळकरवाडी, औताडे-हांडेवाडी, वडाची वाडी, शेवाळेवाडी, नांदोशी, सणसनगर, मांगडेवाडी, भिलारेवाडी, गुजर निंबाळकरवाडी, जांभुळवाडी, कोळेवाडी, वाघोली़. 
पुणे शहरालगतच्या २३ गावांचा समावेश पुणे महापालिका हद्दीमध्ये होणार असल्याने, पुणे महापालिकेची हद्द क्षेत्रफळाच्या तलुनेत मुंबई शहरापेक्षा अधिक होणार आहे़ मुंबई महापालिका हद्दीचे क्षेत्रफळ ४५० चौरस किलोमीटर आहे, पण आता पुण्याचे क्षेत्र यापेक्षा जास्त म्हणजे ४८० चौरस किलोमीटर इतके होणार आहे़. हवेली तालुका नागरी कृती समितीने उच्च न्यायालयात याचिका दाखल करून शहरालगतची ३४ गावे महापालिकेत समाविष्ट करण्याची मागणी केली होती. न्यायालयाने ही गावे समाविष्ट करण्याचा निर्णय दिल्यानंतर राज्य सरकारने चार ऑक्टोबर २०१७ ला ३४ पैकी ११ गावांचा समावेश केला. उर्वरित २३ गावांचा टप्प्याटप्प्याने समावेश करण्याचा निर्णय घेतला होता. ही २३ गावे समाविष्ट करण्यासाठी तत्कालीन राज्य सरकारने तीन वर्षांची मुदत उच्च न्यायालयाकडे मागितली होती. ही मुदत ऑक्टोबर महिन्यात संपली होती. राज्यातील सत्तांतरानंतर ही गावे महापालिकेत समाविष्ट करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तातडीने निर्णय घेतला आहे. युती सरकारच्या काळात १९९७ साली ३८ गावे महापालिकेत समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्या ३८ गावांमध्ये बहुतांश सध्या समाविष्ट होणाऱ्या गावांचा समावेश आहे. २००१ साली यातील १५ पूर्ण आणि पाच अंशत: गावे महापालिका हद्दीतून वगळण्यात आली. त्यामुळे महापालिका हद्दवाढ २३ गावांपुरती मर्यादित राहिली होती. तर, त्यातही पाच गावे अंशत: होती. पुन्हा २०१२ साली येवलेवाडी गावाचा महापालिका हद्दीत समावेश करण्यात आल्यानंतर नव्याने २८ गावे समाविष्ट करण्याच्या चर्चा सुरू झाल्या. अखेरीस, २०१४ साली राहिलेली तसेच नवीन अशी ३४ गावे महापालिकेत समाविष्ट करण्यासाठी इरादा जाहीर केला होता. तर, त्याच वेळी ही गावे महापालिका हद्दीत समाविष्ट करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. फुरसुंगी आणि देवाची उरळी ही गावे पूर्ण आणि अशंत: असलेली नऊ गावे अशा ११ गावांचा ऑक्टोबर २०१७ साली करण्यात आला होता.

मंचर, माळेगावची निवडणूक होणारच

पुणे जिल्ह्यातील ७४६ ग्रामपंचायतींसाठी येत्या १५ जानेवारी रोजी मतदान होत असून, उमेदवारी अर्ज दाखल करण्यास काल बुधवार (दि. २३) डिसेंबर पासून सुरुवात झाली आहे. हवेली तालुक्यातील शेवाळवाडी, औताडे-हंडेवाडी आणि वडाचीवाडी या तीन ग्रामपंचायतीचा पुणे महापालिकेत समाविष्ट करण्याबाबत तर बारामती तालुक्यातील माळेगाव आणि आंबेगाव तालुक्यातील मंचर ग्रामपंचायतीच्या नगरपरिषद करण्याबाबत शासनाने प्राथमिक अद्यादेश काढला असला तरी अद्याप अंतिम निर्णय न झाल्याने या पाचही ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणारच असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. पुणे शहरालगतची २३ गावे महापालिका हद्दीत समाविष्ट करण्यासंदर्भात बुधवारी अद्यादेश देखील काढले. परंतु या संदर्भात अंतिम आदेश झालेला नाही. या २३ गावांपैकी हवेली तालुक्यातील शेवाळवाडी, औताडे-हंडेवाडी आणि वडाचीवाडी या तीन ग्रामपंचायतीची मुदत संपल्याने राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक जाहीर केली आहे. तसेच बारामती तालुक्यातील माळेगाव आणि आंबेगाव तालुक्यातील मंचर ग्रामपंचायतीच्या नगरपरिषद होणार आहे. परंतु, अद्याप या पाचही ग्रामपंचायती संदर्भात शासनाकडून कोणतेही स्पष्ट आदेश आले नाहीत. 

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

==========================================================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1000/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
==============================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
=============================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
============================

  


जम्मू-काश्मीरमधील निवडणूक 2020 - गुपकार आघाडीला सर्वाधिक 112 जागा, भाजप मोठा पक्ष

जिल्हा विकास परिषदेच्या निवडणुकीत भाजपला ७५ जागा

जम्मू-काश्मीरमध्ये जिल्हा विकास परिषद (डीडीसी) निवडणुकीत ७५ जागा जिंकून भाजप सर्वात माेठा पक्ष ठरला आहे. फारुख अब्दुल्ला यांच्या नेतृत्वाखालील सात पक्षांचे पीपल्स अलायन्स फाॅर गुपकार डिक्लेरेशनला ११२ जागा मिळवता आल्या. राज्य निवडणूक आयाेगाने निकाल जाहीर केला. त्यात नॅशनल काॅन्फरन्स-६७, पीपल्स डेमाेक्रॅटिक पार्टी-२७, जम्मू-काश्मीर पीपल्स डेमाेक्रॅटिक फ्रंट-२, भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी)-५, जम्मू-काश्मीर पीपल्स मूव्हमेंट-३, जम्मू-काश्मीर पीपल्स काॅन्फरन्स-८ जागांवर विजय मिळवला. काँग्रेसला २६ जागांवर विजय मिळाला.अल्ताफ बुखारी यांच्या जम्मू-काश्मीर पार्टीने १२ जागी विजय मिळवला. ४९ जागांवर अपक्ष निवडून आले. इतर पक्षांमध्ये जम्मू काश्मीर नॅशनल पँथर्स पार्टीला २ आणि बसपाला एका जागी विजय मिळाला. डीडीसीच्या २८० जागांसाठी आठ टप्प्यांत २८ नाेव्हेंबरपासून १९ डिसेंबरदरम्यान मतदान झाले हाेते. 
भाजप पक्षाला ४ लाख ८७ हजार ३६४ मते मिळाली. नॅशनल काॅन्फरन्सला २ लाख ८२ हजार ५१४, पीडीपी-५७ हजार ७८९, काँग्रेसला १ लाख ३९ हजार ३८२ मते मिळाली. केंद्रशासित प्रदेशातील प्रत्येक जिल्ह्यात 14 मतदारसंघ स्थापन करण्यात आले आहेत. त्यामुळे जम्मू-काश्मीरमधील एकूण 280 मतदारसंघांसाठी या निवडणुकांच्या माध्यमातून डीसीसी प्रतिनिधींची निवड करण्यात येत आहे. जम्मू अँण्ड काश्मीर अपनी पार्टीला (जेकेएपी) 12 जागेवर यश मिळाले आहे. त्यांच्या खात्यात आणखी एक जागा वाढण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या वाट्याला आतापर्यंत 26 जागा आल्या आहेत. जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटवण्याचा निर्णय झाल्यानंतरची ही पहिली निवडणूक आहे. 280 मध्ये 140 जागा या जम्मूतील तर 140 जागा या काश्मीरमधील आहेत. जिल्हा विकास परिषदेच्या निवडणुकीत भाजप विरोधात सात राजकीय पक्षांनी एकत्र येऊन 'गुपकार' नावाचा गट स्थापन केला. यात नॅशनल कॉन्फरन्स (Jammu and Kashmir National Conference - NC), पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (Jammu and Kashmir Peoples Democratic Party - PDP), काँग्रेस (Congress), पीपल्स काँग्रेस (Peoples Congress), अवामी नॅशनल कॉन्फरन्स (Jammu and Kashmir Awami National Conference) आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी (Communist Party of India - Marxist) यांचा समावेश आहे. 

पक्षनिहाय स्थिती- 
भाजपा ७४
नॅशनल कॉन्फरन्स ६७
पीडीपी २७
कॉंगे्रस २६
जेकेएपी १२
जेकेपीपी ८
माकप ५
भाकप ३
पीओएफ २
जेकेएनपीपी २
बसपा १
अपक्ष ४९

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

==========================================================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1000/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
==============================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
=============================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
============================

  

Tuesday 15 December 2020

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जासोबत कागदपत्रे व पात्रता

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जासोबत कागदपत्रे व पात्रता

[?] भारताचा नागरिक असावा.

[?] ग्रामपंच्यातचा कंत्राटदार नसावा. 

[?] उमेदवाराचे नाव ग्रामपंचायतच्या मतदार यादीमध्ये नाव असायला हवे. 

[?] उमेदवाराचे वय २१ वर्ष पूर्ण असावे. 

[?] सरकारी कर्मचारी निवडणुक लढवु शकत नाही.

[?] दोन पेक्षा जास्त मुलं असु नये.

[?] सरपंच ग्रामपंचायत उमेदवारी अर्जसोबत सादर कारवाईची कागद पत्रे:

[?] निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या समोरील शपत पत्र. 

[?] निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या समोरील घोषणा पत्र.

[?] ओळखपत्र - आधारकार्ड, पॅनकार्ड, आणि मतदान कार्ड इत्यादी. 

[?] ग्रामपंचातकडून थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र. 

[?] राखीव जागेसाठी आरक्षण असेल तर जातीचे प्रमाण पत्र. 

[?] आरक्षित असेल तर जात वैधता प्रमाण पत्र किंवा पोच पावतीची झेरॉक्स. 

[?] रहिवासी दाखला. 

[?] उमेदवार इतर वार्डमधून उमेदवारी अर्ज भरत असेल तर मतदार यादी जोडा. 

[?] वयाचा दाखला. 

[?] घरी शौचालय असल्याचा दाखला.

[?] मुलांच्या जन्म तारखा. 

[?] नवीन बँक पासबुक राष्ट्रीयकृत बँक.

-------------------------------------------------

खालील लिंकवर क्लिक करून उमेदवाराची नोंदणी रजिस्टर करा. 
https://panchayatelection.maharashtra.gov.in

[?] 1) आपले नाव, वडिलांचे / पतीचे नाव आणि आडनाव भरा.

[?] 2) तुमचा वैयक्तिक मोबाइल नंबर व ईमेल आयडी प्रविष्ट करा. विभाग नाव, जिल्हा, तालुका निवडा आणि त्यानुसार ग्रामपंचायत निवडा. 

[?] 3) तुमचा प्रभाग व आसन क्रमांक व आरक्षण श्रेणी निवडा. कृपया आपल्याकडे असल्याची पुष्टी करा. योग्य प्रभाग व जागा क्रमांक निवडलेला.

[?] 4) वापरकर्त्याचे नाव व पासवर्ड निवडा व एंटर करा. कृपया वापरकर्त्याची नोंद घ्यावी याची खात्री करा

[?] आपल्या भविष्यातील वापरासाठी नाव आणि संकेतशब्द

[?] 5) Verification Code प्रविष्ट करा. कोडानुसार योग्य अपरकेस, लोअरकेस आणि संख्यात्मक वापरण्याची काळजी घ्या.

[?] 6) 'सबमिट करा' बटण प्रविष्ट करण्यापूर्वी भरलेली माहिती तपासा. जेव्हा 'माहिती यशस्वीरित्या जतन केली जाते' संदेश दर्शविला जातो तेव्हा आपली नोंदणी पूर्ण होते.\

टीपः - ही नोंदणी तुम्हाला त्याच निवडलेल्या प्रभागातील चार उमेदवारी अर्ज भरण्यास सक्षम करेल. आपण दुसर्‍या प्रभागातून निवडणूक लढविण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी नवीन नोंदणी करा.

---------------------------------------

उमेदवाराला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून ‘युजरनेम’ आणि ‘पासवर्ड’ प्रविष्ट करावा लागेल आणि ‘लॉगिन’ बटणावर क्लिक करावे लागेल.
https://panchayatelection.maharashtra.gov.in/

[?] सदर मजकूर मंजूर असेल तर फॉर्म भरताना टिक मार्क करून पुढील फॉर्म भरावा. 

[?] विभाग, जिल्हा, तालुका, ग्रामपंचायतीचे नाव, प्रभाग क्रमांक व आसन क्रमांक आपोआप निवडले जाईल.

[?] 1) यूआयडी (आधार कार्ड क्रमांक) प्रविष्ट करा. तथापि हे वैकल्पिक आहे आणि यूआयडी कार्ड प्रवेश न केल्याने आपला नामांकन फॉर्म अवैध होणार नाही.

[?] 2) आपले आडनाव, नाव आणि वडिलांचे / पतीचे नाव प्रविष्ट करा. ही प्रणाली आपोआप मराठी नाव निर्माण करेल. आपणास जर मराठी शुद्धलेखन योग्य वाटत नसेल तर ते मराठी मजकूर निवडा आणि भविष्यवाणी करण्यासाठी त्यावर क्लिक करा. आपण या अंदाजांमधून नावाचे शुद्धलेखन निवडू शकता.

[?] 3) फॉर्ममध्ये विचारल्याप्रमाणे तुमची वैयक्तिक माहिती द्या. योग्य वय प्रतिबिंबित करण्यासाठी आपण योग्य तारीख निवडली पाहिजे हे सुनिश्चित करा. जर योग्य वय प्रतिबिंबित होत नसेल तर पुन्हा तपासा आणि आपली जन्मतारीख प्रविष्ट करा.

[?] 4) प्रभाग क्रमांक व अनुक्रमांकातील प्रवर्ग, जाती, मतदार निवडा.

[?] 5) एक जागा वूमनसाठी आरक्षित असेल तर 'होय' नाहीतर 'नाही' निवडा वुमन आरक्षित सीटवरुन निवडा.

[?] 6) घोषणा विभागात आवश्यक माहितीची नोंद घ्या. आपण निवड न केल्यास प्रत्येक घोषणेसाठी सिस्टम आपोआप ‘नाही’ पर्याय म्हणून निवडेल.

[?] 7) घोषणेमध्ये आपण आरक्षण श्रेणी निवडा.

[?] 8) कॅप्चा प्रविष्ट करा. कोडानुसार योग्य अपरकेस, लोअरकेस आणि संख्यात्मक वापरण्याची काळजी घ्या.

[?] 9) सर्व माहिती तपासा आणि नंतर सेव्ह करा.

[?] ‘सेव्ह’ बटणावर क्लिक केल्यानंतर आपल्या नामांकन क्रमांकासंबंधी संदेश प्रदर्शित होईल.

[?] कृपया निवडणूक प्रक्रियेच्या पुढील टप्प्यात ते आवश्यक असेल म्हणून ते सुरक्षितपणे ठेवा.

[?] एकाच प्रभागातील समान लॉगिन क्रेडेन्शियलद्वारे (Login ID) जास्तीत जास्त चार अर्ज भरले जाऊ शकतात.

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

==========================================================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1000/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
==============================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
=============================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
============================