Wednesday 30 December 2020

मानीव अभिहस्तांतरणासाठी सहकार विभागाची खास मोहीम; डिम्ड कन्व्हेअन्ससाठी 'ही' कागदपत्रे लागणार

१ ते १५ जानेवारी २०२१ पर्यंत विशेष मोहीम

राज्यातील बहुतांश गृहनिर्माण संस्थांनी मानीव अभिहस्तांतरण (डीम्ड कन्व्हेअन्स) केलेले नाही. परिणामी या इमारती किं वा गृहनिर्माण संस्थांची जागा बांधकाम व्यावसायिकाच्याच नावावर आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये जनजागृती करून मालकी हक्काचा पुरावा मिळावा, या उद्देशाने सहकार विभागाने १ ते १५ जानेवारी या कालावधीत मानीव अभिहस्तांतरणासाठी खास मोहिमेचे आयोजन केले आहे. मोहिमेच्या अनुषंगाने राज्यातील सर्व जिल्हा उपनिबंधकांना सूचना देण्यात आल्या आहेत. बांधकाम विकसकाने इमारतीचे बांधकाम करून सोसायटीकडे हस्तांतरण करणे बंधनकारक आहे. ही प्रक्रिया केली जात असली, तरी व्यावसायिक मानीव हस्तांतरण करून दिले जात नाही. परिणामी भविष्यात सोसायटी पुनर्विकासात अडचणी येतात. पुनर्विकासात वाढीव चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआय) मिळण्यात अडचण येते. हक्काचा पुरावा म्हणून मिळणारी मिळकत पत्रिका किं वा सदनिके ची सहज खरेदी-विक्री व्यवहार होत नाही, तसेच इतरही लाभ मिळत नाहीत. मानीव अभिहस्तांतरण झाल्यास सदनिकाधारकांना सर्व हक्क प्राप्त होतातच, तसेच बांधकाम व्यावसायिकाचा हक्क संपुष्टात येतो. सद्य:स्थितीला राज्यातील तब्बल ६० हजारांहून अधिक गृहनिर्माण सोसायटय़ांनी हस्तांतरण केलेले नाही. महाराष्ट्र मालकी हक्काच्या सदनिकांबाबत अधिनियम १९६३ मधील तरतुदीनुसार बांधकाम व्यावसायिकाने मालकी हक्काचे हस्तांतरण करून देणे बंधनकारक आहे. हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण झाली नसल्यास मोफा कायद्यांतर्गत केलेल्या सुधारणान्वये एकतर्फी हस्तांतरण करण्याची तरतूद आहे. त्यानुसार ज्या संस्थांची नोंदणी झाली आहे, त्या संस्थेमधील सदनिकाधारकांसाठी खास मोहीम सहकार विभागाकडून राबवण्यात येणार आहे. दरम्यान, या कालावधीत मानीव हस्तांतरणासाठी पात्र असलेल्या सर्व सहकारी गृहनिर्माण संस्थांना याबाबतची माहिती देऊन संबंधित सर्व पात्र गृहनिर्माण संस्थांकडून आवश्यक प्रस्ताव प्राप्त करून घेण्यात येणार आहेत. तसेच हस्तांतरण करण्याबाबतचे प्रमाणपत्रही दिले जाणार आहे. मानीव हस्तांतरण करण्याची क्लिष्ट प्रक्रिया अधिक सोपी करण्यात आली आहे. यापूर्वी हस्तांतरणासाठी २० पेक्षा अधिक कागदपत्रांची आवश्यकता होती. त्यातील अनेक कागदपत्रे कमी करण्यात आली आहेत. सध्या के वळ आठ ते नऊ प्रकारच्या कागदपत्रांच्या आधारे हस्तांतरण करण्यात येत आहे.राज्यातील गृहनिर्माण संस्थांची ( Housing Society) संख्या विचारात घेता प्रत्यक्षात गृहनिर्माण  संस्थेचे मानीव अभिहस्तांतरण झालेल्या संस्थांची संख्या अल्प आहे. मानीव अभिहस्तांतरण प्रक्रियेची (Deemed Conveyance of a Co-operative Housing Society) माहिती सहज उपलब्ध व्हावी आणि ही प्रक्रिया सुलभ व्हावी म्हणून संस्थांसाठी १ ते १५ जानेवारी २०२१ पर्यंत मानीव अभिहस्तांतरण (डीम्ड कन्व्हेअन्स) ((Deemed Conveyance) विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. तसेच यासाठी आवश्यक कागदपत्रांची पुरतता करावी लागणार आहे. या मोहिमेद्वारे सहकारी गृहनिर्माण संस्थांना मानीव अभिहस्तांतरणाबाबतची माहिती देण्यात येणार आहे. गृहनिर्माण संस्था ज्या जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था तथा सक्षम प्राधिकारी यांच्या कार्यक्षेत्रामध्ये आहे. त्या कार्यालयाकडे संस्थेने मानीव अभिहस्तांतरणाबाबतचा अर्ज विहित नमुन्यात आवश्यक त्या कागदपत्रासह सादर करावा. यामुळे राज्यातील सर्व सहकारी गृहनिर्माण संस्थांना त्यांच्या जमिनीचे कायदेशीर हक्क, विकासकाकडून प्राप्त करून देण्याचा प्रयत्न आहे. 

आवश्यक कागदपत्र :-

[?] मानीव अभिहस्तांतरणाकरिता नमुना ७ मधील अर्ज
[?] सहकारी गृहनिर्माण संस्था नोंदणी प्रमाणपत्र/कंपनी नोंदणी प्रमाणपत्र, Deed of Declaration ची प्रत.
[?] संस्थेच्या, कंपनीच्या साधारण सभेतील मानीव अभिहस्तांतरण करण्याबाबत केलेल्या ठरावाची प्रमाणित प्रत.
[?] मिळकत पत्रिकांचा तीन महिन्याच्या आतील उतारा (मालमत्ता पत्रक, ७/१२ उतारा इ.)
[?] संस्थेतील सर्व कायदेशीर सदनिकाधारकांची,संचालकाची विहित नमुन्यातील यादी.
[?] सहकारी गृहनिर्माण संस्थेने, कंपनीने अभिहस्तांतरण करुन देण्यासाठी अधिनियम १९७० अन्वये प्रवर्तकाला बजावलेली कायदेशीर नोटीस, पत्रव्यवहाराचा तपशील व घटनाक्रम.
[?] नियोजन, सक्षम प्राधिकरणाने दिलेले बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र तसेच भोगवटा प्रमाणपत्र.

संबंधित संस्थेकडे,कंपनीकडे भोगवटा प्रमाणपत्र नसल्यास इमारतीचा प्रत्यक्ष ताबा घेण्यात आल्याचे तसेच इमारतीच्या संदर्भात असलेल्या सर्व जबाबदाऱ्या,दायित्वे स्विकारण्यास तयार असल्याचे तसेच मानीव अभिहस्तांतरण झाल्यानंतर संबंधित नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेकडे भोगवटा प्रमाणपत्रासाठी अर्ज करणार असल्याबाबत स्व-प्रमाणपत्र.
तसेच मानीव अभिहस्तांतरण संबंधातील शासन निर्णय व परिपत्रके आणि इतर माहिती http://housing.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
https://housing.maharashtra.gov.in/Sitemap/housing/Registration%20of%20Society%20and%20Deemed%20Conveyance_Marathi.htm

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

==========================================================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1000/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
==============================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
=============================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
============================

  

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.