महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये चुरस; निकालाकडे लक्ष
महाविकास आघाडी पहिल्यांदाच एकत्र निवडणूक लढवित असल्याने त्यांच्या दृष्टीने इतिहास घडविणारी तर भाजपच्या दृष्टिकोनातून निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे त्यामुळे संपूर्ण राज्याचे या निवडणुकीच्या निकालाकडे लक्ष लागलेले आहे. पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणूक- 2020 मध्ये "एवढी" म्हणजेच ज्या उमेदवाराला पहिल्या पसंतीची 1 लाख 53 हजार 171 मते प्राप्त होतील तो उमेदवार पुणे विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूकीत विजयी होईल. तर ज्या उमेदवाराला पहिल्या पसंतीची 25 हजार 390 मते प्राप्त होतील तो उमेदवार पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूकीत विजयी होणार आहे. पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणूक- 2020 निवडणुकीत सर्वाधिक उमेदवार निवडणूक रिंगणात होते त्यामुळे मतदारांना मतदान करताना लक्ष विचलित करण्यात कारणीभूत ठरले असले तरी पदवीधर मतदार संघ निवडणूकीची मतमोजणी पद्धत क्लिष्ट असते. सर्वाधिक उमेदवार निवडणूक रिंगणात असल्याने त्याचा थेट फायदा प्रमुख पक्षांच्या उमेदवारांनाच होणार आहे. याची बहुतांश उमेदवारांना त्याची कल्पना नसल्याचे निकालांनंतरच्या विश्लेषणात त्यांना दिसून येईल.
* पुणे विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूक-2020
(अंतिम मतदानाच्या वैध मते आकडेवारीनुसार पहिल्या पसंती मतांचा कोठ्यामध्ये बदल होऊ शकतो.)
* पुणे विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूक-2020
मतदार संख्या- 426257
मतदान संख्या- 247050
उमेदवार संख्या- 62
पहिल्या पसंती मतांचा कोटा- 153171
(अंतिम मतदानाच्या वैध मते आकडेवारीनुसार पहिल्या पसंती मतांचा कोठ्यामध्ये बदल होऊ शकतो.)* पुणे विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूक-2020
मतदार संख्या- 72545
मतदान संख्या- 52987
उमेदवार संख्या- 35
पहिल्या पसंती मतांचा कोटा- 25390
( अंतिम मतदानाच्या वैध मते आकडेवारीनुसार पहिल्या पसंती मतांचा कोठ्यामध्ये बदल होऊ शकतो.)ज्या उमेदवाराला पहिल्या पसंतीची 1 लाख 53 हजार 171 मते प्राप्त होतील तो उमेदवार पुणे विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूकीत विजयी होईल. अंतिम मतदानाच्या आकडेवारीनुसार पहिल्या पसंती मतांचा कोटा मध्ये बदल होऊ शकतो. जर 62 उमेदवारांपैकी पहिल्या पसंती मतांचा कोटामध्ये विजयी न झाल्यास दुसऱ्या क्रमांकाचा कोटा निश्चित करून मतमोजणी केली जाते. म्हणजेच सर्व दुसऱ्या क्रमांकाच्या मतांची गणना होते. त्यामध्येही विजयाचा कोटा पूर्ण न झाल्यास सर्वाधिक कमी मते मिळालेल्या उमेदवाराची मते प्रमुख व प्रतिस्पर्धी उमेदवाराला अनुक्रमे मते अधिक समाविष्ट केली जातात व त्यानुसार मतमोजणीची गणती होत असते. या सर्व पद्धतीचा व उमेदवारांना मिळालेल्या मतदारांच्या प्रतिसादानुसार पुणे विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूक-2020 मध्ये भाजपचे पारडे जड असल्याचे दिसून येते. गेल्या निवडणुकीत पदवीधर मतदार संघासाठी २२ टक्के, तर शिक्षक मतदार संघासाठी अवघे तीन टक्के मतदान झाले होते. त्या तुलनेत या वेळी मतदानाचा टक्का वाढला आहे. पदवीधर मतदार संघासाठी चार लाख २६ हजार २५७ मतदार होते. शिक्षक मतदार संघासाठी ७२ हजार ५४५ मतदार होते. त्यापैकी अनुक्रमे ५०.३३ टक्के आणि ७०.४४ टक्के मतदारांनी मतदान केले. तर सकाळी दहापर्यंत पदवीधर मतदार संघात ८.५२ टक्के, तर शिक्षक मतदार संघासाठी ११.३८ टक्के मतदान झाले होते. सकाळी दहा ते दुपारी बारा या दरम्यान मतदानाचे प्रमाण वाढले. पदवीधरसाठी १९.४४, तर शिक्षक मतदार संघासाठी २६.२५ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला होता. दुपारी बारा ते दुपारी दोन या दरम्यान मतदानाचे प्रमाण पदवीधरसाठी ३७.१० टक्के, तर शिक्षक मतदार संघासाठी ५४ टक्के झाले. दुपारी दोन ते सायं. चार या वेळेत मतदानाचे प्रमाण तुलनेने कमी होते. त्यामुळे 'पदवीधर'चे मतदान ४९.५२ टक्के आणि 'शिक्षक'साठी ६७.३६ टक्क्यांपर्यंत पोहोचले. शेवटच्या एका तासात मतदार मोठ्या प्रमाणात बाहेर पडल्याने मतदानाची टक्केवारी उच्चांकी झाली. दरम्यान पदवीधर मतदारसंघासाठी ६२ उमेदवार असल्याने ही मतपत्रिका जम्बो मतपत्रिका झालेली होती. त्यामुळे मतदारांना पसंतिक्रम लिहिल्यानंतर मतपत्रिका मतपेटीत टाकताना कसरत करावी लागली. १०० मतपत्रिकांचे वजन सुमारे आठ किलो होते. त्यामुळे मतपत्रिकांच्या पेट्यांची संख्या वाढविण्यात आलेली होती. शिक्षक मतदारसंघामध्ये ३५ उमेदवार असल्याने तुलनेने कमी आकाराची मतपत्रिका होती. विभागात पदवीधर मतदारसंघासाठी १२०२; तर शिक्षक मतदारसंघासाठी ३६७ मतदान केंद्रे होती. मतदान प्रक्रियेसाठी पदवीधर मतदारसंघासाठी मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी, सूक्ष्म निरीक्षक यांच्यासह सात हजार ४१; तर शिक्षक मतदारसंघासाठी तीन हजार ११६ असे दहा हजार १५७ अधिकारी आणि कर्मचारी होते. तर दोन हजार ९१७ वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नेमणूक केलेली होती. निवडणूक आयोगाने ११ सप्टेंबर २०१८ रोजी दिलेल्या निर्देशानुसार विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मतपत्रिकेवरील (None Of The Above- NOTA) 'नोटा' हा पर्याय वगळण्यात आला आहे. त्यामुळे मतदारांना या पर्यायाचा अवलंब करता आलेला नाही. पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत प्रमुख राजकीय पक्षाचे उमेदवार- अरुण लाड, राष्ट्रवादी काँग्रेस (महाविकास आघाडी), संग्राम देशमुख, भाजप, शरद पाटील, जनता दल (सेक्युलर), रूपाली ठोंबरे- पाटील, मनसे तर शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत प्रमुख राजकीय पक्षाचे उमेदवार- जयंत आसगावकर, काँग्रेस (महाविकास आघाडी) जितेंद्र पवार , अपक्ष (भाजप पुरस्कृत), विद्यानंद मानकर, मनसे, गोरखनाथ थोरात, लोकभारती, दत्तात्रेय सावंत, अपक्ष, संतोष फाजगे, अपक्ष होते. दरम्यान मतदार यादीतील आठ हजार ८३४ मतदारांच्या नावासमोरील मोबाइल क्रमांक हे भाजपच्या कार्यकर्त्यांचे असल्याचे आणि दोन हजार २५७ मतदारांची नावे दुबार असून, त्यांची मतदार केंद्रे वेगवेगळी दाखविण्यात आल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून करण्यात आलेला होता तसेच मतदार नोंदणीत व यादीत गडबड असल्याचा देखील आरोप राष्ट्रवादीने केलेला होता. या निवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडी पहिल्यांदाच एकत्र निवडणूक लढवित असल्याने त्यांच्यादृष्टीने इतिहास घडविणारी तर भाजपच्या दृष्टिकोनातून निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. या निवडणुकीत पसंतीक्रमाने मतदान करण्याची प्रक्रिया आणि पदवीधरसाठी ६२, तर शिक्षकसाठी ३५ उमेदवार रिंगणात असल्याने मतमोजणी करण्यासाठी किमान दीड ते दोन दिवस लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणुकांचा निकाल ३ डिसेंबर रोजी रात्री किंवा ४ डिसेंबरला प्रशासनाकडून अधिकृत जाहीर होणार आहे. पुणे विभागाच्या पाचही जिल्ह्यांतील मतपत्रिका बालेवाडी येथे आणण्यात येणार आहेत. त्यानंतर ३ डिसेंबरला सकाळी प्रत्यक्ष मतमोजणीची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असून करोनाच्या पार्श्वभूमीवर शरीर अंतराचे पालन करूनच ही प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे. त्यामुळे मतमोजणीच्या अधिकाऱ्यांना टप्प्याटप्प्याने मतमोजणीचे काम वाटून देण्यात आले आहे. यंदा दोन्ही मतदारसंघांमध्ये जास्त उमेदवार, करोनामुळे वाढवण्यात आलेली मतदान केंद्रे आणि उच्चांकी झालेले मतदान या पार्श्वभूमीवर मतमोजणीच्या प्रक्रियेस वेळ लागणार आहे. दरम्यान औरंगाबाद पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीकडून सतीश चव्हाण तर भाजपकडून शिरीष बोराळकर हे रिंगणात असून याच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. तर नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत १९ उमेदवार रिंगणात आहेत. अभिजित वंजारी काँग्रेस, संदीप जोशी भाजप, राजेंद्रकुमार चौधरी (रिपब्लिक पार्टी ऑफ इंडीया), इंजिनियर राहुल वानखेडे (वंचित बहुजन आघाडी), नितीन रोघें (अपक्ष) हे प्रमुख उमेदवार आहेत. विधान परिषदेच्या अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी २७ जण रिंगणात आहेत. एकूण मतदार संख्या ३५ हजार ६२२ आहे. मावळते आमदार प्रा. श्रीकांत देशपांडे या वेळी शिवसेनेचे उमेदवार असले तरी महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांनी त्यांना पाठिंबा दिला होता. तर भारतीय जनता पक्षातर्फे विदर्भ यूथ वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष प्रा. नितीन धांडे, कपिल पाटील यांच्या लोकभारती पक्षातर्फे दिलीप निंभोरकर निवडणूक रिंगणात आहेत.
POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब)
==========================================================================================================
पदवीधर मतदारसंघ;
==========================================================================================================
पुस्तक घर पोहोच मिळावा!
मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1000/-रु.मध्ये
CLICK HERE -
==============================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा!
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.
ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा-
=============================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा!
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.
ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा-
============================
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.