Thursday, 24 December 2020

पुणे महापालिकेत अखेर २३ गावांचा समावेश

पुणे महापालिकेत अखेर २३ गावांचा समावेश

पुणे महापालिका हद्दीमध्ये २३ गावे समाविष्ट करण्याबाबतची प्रारूप अधिसूचना राज्य शासनाच्या नगर विकास विभागाने बुधवारी (दि. २३) जाहीर केली़ याद्वारे पुणे महापालिका हद्दीत शहरालगतची २३ गावे समाविष्ट करण्याबाबत महाविकास आघाडी सरकारने शिक्कामोर्तब केले. मात्र, ही गावे महापालिका हद्दीतील भाग बनावी की नाही, यासाठी हरकती व सूचना (आक्षेप) दाखल करण्यास पुढील महिन्याचा कालावधी दिला. राज्य शासनाच्या या अधिसूचनेस म्हणजेच पुणे महापालिकेत २३ गावे समाविष्ट करण्याच्या निर्णयास आक्षेप घेण्यासाठी महिनाभरात पुण्याचे विभागीय आयुक्त यांच्याकडे लेखी कारणे सादर करणे आवश्यक आहे़ या कालावधीत आलेल्या आक्षेपांवरच शासनाकडून विचार केला जाणार आहे़ तसेच, या कालावधीनंतर विभागीय आयुक्त कार्यालयाकडून आलेल्या हरकती व सूचनांचा अहवाल तयार करून तो राज्याच्या नगर विकास विभागाकडे पुढील निर्णयास पाठविणार आहे़ त्यानंतर सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन ही २३ गावे महापालिका हद्दीचा भाग बनणार की नाही, याचा अंतिम निर्णय होणार आहे़. पुणे महापालिकेने १८ डिसेंबर,२०१३ रोजी झालेल्या मुख्य सभेत पुणे शहरालगतची ३४ गावे समाविष्ट करण्याबाबतचा ठराव राज्य शासनाला पाठविला होता़ सन २०१४ मध्येही गावे पुणे महापालिका हद्दीत समाविष्ट न झाल्याने हवेली तालुक्यातील संबंधित गावांमधील नागरिकांनी कृती समिती स्थापन करून न्यायालयात धाव घेतली होती़ त्यावेळी न्यायालयाने निर्णय देताना राज्य शासनाचा अभिप्राय मागविला होता़ या अभिप्रायात राज्य शासनाने सदरची ३४ गावे आम्ही पुणे महापालिका हद्दीत टप्प्या-टप्प्याने घेऊ असे सांगितले होते़. 
नव्याने समाविष्ट होणारी गावे - म्हाळुंगे, सूस, बावधन बुद्रुक, किरकिटवाडी, पिसोळी, कोंढवे-धावडे, कोपरे, नांदेड, खडकवासला, मांजरी बुद्रुक, नऱ्हे, होळकरवाडी, औताडे-हांडेवाडी, वडाची वाडी, शेवाळेवाडी, नांदोशी, सणसनगर, मांगडेवाडी, भिलारेवाडी, गुजर निंबाळकरवाडी, जांभुळवाडी, कोळेवाडी, वाघोली़. 
पुणे शहरालगतच्या २३ गावांचा समावेश पुणे महापालिका हद्दीमध्ये होणार असल्याने, पुणे महापालिकेची हद्द क्षेत्रफळाच्या तलुनेत मुंबई शहरापेक्षा अधिक होणार आहे़ मुंबई महापालिका हद्दीचे क्षेत्रफळ ४५० चौरस किलोमीटर आहे, पण आता पुण्याचे क्षेत्र यापेक्षा जास्त म्हणजे ४८० चौरस किलोमीटर इतके होणार आहे़. हवेली तालुका नागरी कृती समितीने उच्च न्यायालयात याचिका दाखल करून शहरालगतची ३४ गावे महापालिकेत समाविष्ट करण्याची मागणी केली होती. न्यायालयाने ही गावे समाविष्ट करण्याचा निर्णय दिल्यानंतर राज्य सरकारने चार ऑक्टोबर २०१७ ला ३४ पैकी ११ गावांचा समावेश केला. उर्वरित २३ गावांचा टप्प्याटप्प्याने समावेश करण्याचा निर्णय घेतला होता. ही २३ गावे समाविष्ट करण्यासाठी तत्कालीन राज्य सरकारने तीन वर्षांची मुदत उच्च न्यायालयाकडे मागितली होती. ही मुदत ऑक्टोबर महिन्यात संपली होती. राज्यातील सत्तांतरानंतर ही गावे महापालिकेत समाविष्ट करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तातडीने निर्णय घेतला आहे. युती सरकारच्या काळात १९९७ साली ३८ गावे महापालिकेत समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्या ३८ गावांमध्ये बहुतांश सध्या समाविष्ट होणाऱ्या गावांचा समावेश आहे. २००१ साली यातील १५ पूर्ण आणि पाच अंशत: गावे महापालिका हद्दीतून वगळण्यात आली. त्यामुळे महापालिका हद्दवाढ २३ गावांपुरती मर्यादित राहिली होती. तर, त्यातही पाच गावे अंशत: होती. पुन्हा २०१२ साली येवलेवाडी गावाचा महापालिका हद्दीत समावेश करण्यात आल्यानंतर नव्याने २८ गावे समाविष्ट करण्याच्या चर्चा सुरू झाल्या. अखेरीस, २०१४ साली राहिलेली तसेच नवीन अशी ३४ गावे महापालिकेत समाविष्ट करण्यासाठी इरादा जाहीर केला होता. तर, त्याच वेळी ही गावे महापालिका हद्दीत समाविष्ट करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. फुरसुंगी आणि देवाची उरळी ही गावे पूर्ण आणि अशंत: असलेली नऊ गावे अशा ११ गावांचा ऑक्टोबर २०१७ साली करण्यात आला होता.

मंचर, माळेगावची निवडणूक होणारच

पुणे जिल्ह्यातील ७४६ ग्रामपंचायतींसाठी येत्या १५ जानेवारी रोजी मतदान होत असून, उमेदवारी अर्ज दाखल करण्यास काल बुधवार (दि. २३) डिसेंबर पासून सुरुवात झाली आहे. हवेली तालुक्यातील शेवाळवाडी, औताडे-हंडेवाडी आणि वडाचीवाडी या तीन ग्रामपंचायतीचा पुणे महापालिकेत समाविष्ट करण्याबाबत तर बारामती तालुक्यातील माळेगाव आणि आंबेगाव तालुक्यातील मंचर ग्रामपंचायतीच्या नगरपरिषद करण्याबाबत शासनाने प्राथमिक अद्यादेश काढला असला तरी अद्याप अंतिम निर्णय न झाल्याने या पाचही ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणारच असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. पुणे शहरालगतची २३ गावे महापालिका हद्दीत समाविष्ट करण्यासंदर्भात बुधवारी अद्यादेश देखील काढले. परंतु या संदर्भात अंतिम आदेश झालेला नाही. या २३ गावांपैकी हवेली तालुक्यातील शेवाळवाडी, औताडे-हंडेवाडी आणि वडाचीवाडी या तीन ग्रामपंचायतीची मुदत संपल्याने राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक जाहीर केली आहे. तसेच बारामती तालुक्यातील माळेगाव आणि आंबेगाव तालुक्यातील मंचर ग्रामपंचायतीच्या नगरपरिषद होणार आहे. परंतु, अद्याप या पाचही ग्रामपंचायती संदर्भात शासनाकडून कोणतेही स्पष्ट आदेश आले नाहीत. 

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

==========================================================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1000/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
==============================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
=============================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
============================

  


No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.