Monday 31 December 2018

खासदार श्रीरंग बारणे यांना "अनुभवलेल्या संसदेतून" भाजप-राष्ट्रवादीचे आकर्षण

"मी अनुभवलेली संसद" खासदार बारणे लिखित पुस्तक प्रकाशनाला शिवसेनेला बगल!



खासदार श्रीरंग बारणे यांना "अनुभवलेल्या संसदेतून" भाजप-राष्ट्रवादीचे आकर्षण वाढले आहे. "मी अनुभवलेली संसद" या त्यांनी लिहिलेल्या पुस्तक प्रकाशनाला शिवसेनेच्या राज्यातील प्रमुखांना डावलण्यात आलेले आहे. ३ जानेवारीला पुस्तकाचे प्रकाशन लोकसभा सभापती सुमित्रा महाजन यांच्या हस्ते होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, गृहराज्यमंत्री हंसराज अहीर आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आहेत तर सेनेचे केवळ औपचारिकता म्हणून केंद्रीय मंत्री अनंत गीते, लोकसभा व राज्यसभा नेते म्हणून खासदार संजय राऊत व खासदार अनंतराव आढसूळ यांचे नाव निमंत्रण पत्रिकेत टाकले आहे. शिवसेनेतील काही पदाधिकारी यांनी खासदार श्रीरंग बारणे यांच्या भूमिकांबद्दल प्रश्न उपस्थित केले आहेत. खासदार श्रीरंग बारणे यांनी गेल्या निवडणूकपूर्वी राजकीय कारकीर्दीत केलेल्या कामांचे फोटो व माहितीपर पुस्तक प्रचारासाठी प्रकाशित केले होते. त्याच धर्तीवर खासदार झाल्यावर कार्य अहवालाचे पुस्तकरुपी प्रकाशन नुकतेच केले. परंतु "मी अनुभवलेली संसद" या अनुभवाचे पुस्तक प्रकाशनाला शिवसेनेला पदाधिका-याना बगल दिल्याचा आरोप पक्षांतर्गत होत आहे. मावळ लोकसभा मतदारसंघातून पुन्हा निवडणूक लढवण्यास खासदार श्रीरंग बारणे इच्छुक असले तरी युती झाली तरच निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या पक्ष नेतृत्वाच्या भूमिकेच्या विरोधी त्यांचे मत सेनेतील पदाधिकारी यांना खटकते आहे. मावळ मधून आमदार नीलमताई गो-हे यांचा सेनेकडे पर्याय असल्याचे काही पदाधिका-यांना वाटते. खासदार श्रीरंग बारणे हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे पूर्वी कट्टर समर्थक होते त्यामुळे त्यांच्यात जुनाच स्नेह आहे. यामुळे त्यांना प्रकाशन कार्यक्रमाला निमंत्रित केले असावे. तर स्थानिक पातळीवर भाजप पदाधिकारी यांचा त्यांच्या संभाव्य उमेदवारीला विरोध आहे यामुळे भाजप नेतृत्वाशी साधण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचे देखील बोलले जात आहे. खासदार श्रीरंग बारणे यांना "अनुभवलेल्या संसदेतून" भाजप-राष्ट्रवादीचे आकर्षण वाढल्याने पिंपरी-चिंचवडमध्ये मात्र राजकीय चर्चांना उधान आले आहे. दरम्यान भाजप शहराध्यक्ष तथा आमदार लक्ष्मण जगताप यांना घरातूनच पुन्हा एकदा आव्हान निर्माण झाले आहे. भाजप आमदारांचे प्रतिस्पर्धी शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने फ्लेक्‍सबाजी करत “भावी आमदार’ म्हणून शुभेच्छा दिल्या आहेत. माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांच्यापाठोपाठ आता नवनाथ जगताप हेदेखील विरोधात गेल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय हालचाली वेग आला आहे. सर्व राजकीय चढ-उतारामध्ये राजेंद्र व नवनाथ हे दोन्ही चुलतबंधू लक्ष्मण जगताप यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे होते. मात्र त्यांच्या विरोधी भूमिका व सेनेतील आकर्षण चर्चेचा विषय झालेला आहे. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येथील राजकीय पदाधिकारी यांना दुस-या राजकीय पक्षांचे आकर्षण वाढल्याने घडामोडींवर चर्चा होत आहे. 


POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे

=============0===========0==========0==========
पुस्तक घर पोहोच मिळावा
* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये
Click here Pay Now- 
https://imojo.in/prabindia

=============0===========0==========0==========

अहमदनगर महापालिका ; राष्ट्रवादीकडून नगरसेवकांवर कारवाईचे ढोंग - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची टीका

सिंचन घोटाळ्याच्या बदल्यात कवचकुंडले ; विधानसभा निवडणुकीनंतर बिनशर्त पाठिंबा देणारे भाजपा-राष्ट्रवादीचे लफडे जुनेच


अहमदनगर महापालिकेत तिसऱ्या क्रमांकाच्या जागा मिळवूनही राष्ट्रवादीच्या मदतीने भाजपाचा महापौर झाला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भाजपावर निशाणा साधला आहे. अहमदनगर महापालिका महापौर निवडणुकीत राष्ट्रवादीने पाठींबा देऊन उघडे पडल्याने आता नगरसेवकांवर कारवाईचे ढोंग केले जात असल्याची टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरें यांनी केली आहे. तसेच सिंचन घोटाळ्याच्या बदल्यात कवचकुंडले घेतली आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर बिनशर्त पाठिंबा देणारे भाजपा-राष्ट्रवादीचे लफडे जुनेच असल्याचे म्हंटले आहे. सर्वाधिक जागा मिळूनही नगर महापालिकेत सत्ता स्थापन न करता आल्याने शिवसेनेमध्ये संतापाचे वातावरण आहे. उद्धव ठाकरे यांनी याच पार्श्वभूमीवर ‘सामना’ या मुखपत्रातून भाजपा-राष्ट्रवादीवर निशाणा साधला. नगरचे चित्र असे आहे की, सासरा भाजपात, तर जावई राष्ट्रवादीत, हे दोघे एकत्र आले. राष्ट्रवादी व भाजपचे लफडे नव्याने समोर आले. आता म्हणे राष्ट्रवादीच्या सर्व नगरसेवकांवर कारवाई होणार आहे. हे सर्व ढोंग आहे. आमचे कोणतेही अनैतिक संबंध नाहीत असे ते उगाच सांगत असतात. विधानसभा निवडणुकीनंतर बिनशर्त पाठिंबा जाहीर करून राष्ट्रवादीने सिंचन घोटाळ्यातील त्यांच्या पुढार्‍यांना कवचकुंडले मिळवली व आता नगर महापालिकेत पाठिंबा देऊन केडगाव खून प्रकरणातील स्वतःच्या आमदारांना साफ करून घेतले, असा गंभीर आरोप ठाकरे यांनी केला आहे. 'भाजप-राष्ट्रवादीचे अनैतिक संबंध जुनेच असून नगरमध्ये फक्त उफाळून आले आहे. नगरमध्ये भाजप-राष्ट्रवादीनं खेळलेल्या राजकारणाचा शिवसेनेला अजिबात धक्का बसलेला नाही. भाजप-राष्ट्रवादीचे अनैतिक राजकीय संबंध जुनेच असून महाराष्ट्रातील सध्याच्या सरकारचा जन्मच मुळात या संबंधांतून झाला आहे. भाजपची खरी युती हिंदुत्ववादाशी नसून भ्रष्टवादाशी आहे हे राष्ट्रवादीशी संबंध ठेवून त्यांनी सिद्ध केले आहे. अहमदनगरमधील नव्या पॅटर्नमुळं फक्त ते उफाळून आले इतकेच,' अशी जहरी टीका शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. 


काय म्हणाले उद्धव ठाकरे..

[?] शिवसेनेचा महापौर होऊ देणे हा कौल होता. एका बाजूला शिवसेना हाच भाजपचा नैसर्गिक मित्र असल्याचे म्हणायचे. दोघांची विचारधारा हिंदुत्ववादी आहे, त्यामुळे हिंदुत्ववादी मतांचे विभाजन होता कामा नये. व दुसर्‍या बाजूला राष्ट्रवादीशी अनैसर्गिक, अनैतिक संबंध ठेवून सत्ताभोग घ्यायचा. खरी युती हिंदुत्ववादाशी नसून भ्रष्टवादाशी आहे.

[?] या निवडणुकीत काँग्रेस पक्षही तटस्थ राहिला म्हणे. राधाकृष्ण विखे-पाटलांचा हा जिल्हा; पण त्यांचेही आतून कीर्तन वरून तमाशा असेच सुरू असते. राष्ट्रवादीच्या पायात त्यांचीही टांग आहेच. भाजपा-काँग्रेस-राष्ट्रवादी युतीचा हा नवा ‘नगर पॅटर्न’ कुठपर्यंत जातोय ते पाहायचे.

[?] महाराष्ट्रातील विद्यमान सरकारचा जन्मच मुळात राष्ट्रवादीसोबतच्या ‘अनैतिक’ संबंधातून झाला आहे. नगरमध्ये ते पुन्हा उफाळून आले आणि भाजपला तेथे महापौर-उपमहापौरपदाची प्राप्ती झाली.

[?] विधानसभा निवडणुकीनंतर बिनशर्त पाठिंबा जाहीर करून राष्ट्रवादीने सिंचन घोटाळ्यातील त्यांच्या पुढार्‍यांना कवचकुंडले मिळवली व आता नगर महापालिकेत पाठिंबा देऊन केडगाव खून प्रकरणातील स्वतःच्या आमदारांना साफ करून घेतले. ही एक प्रकारे सौदेबाजीच म्हणावी लागेल. 

[?] कोडगेपणाचा कळस असा की, भाजपचे (‘ईव्हीएम गडबड’ फेम) मंत्री गिरीश महाजन म्हणतात, राष्ट्रवादीचा पाठिंबा आम्ही विकासासाठी घेतला. मग तुमचे मुख्यमंत्री सिंचन घोटाळ्यातील आरोपींना ऊठसूट तुरुंगात पाठवण्याच्या धमक्या देतात ती सर्व जुमलेबाजीच म्हणावी काय? 

[?] नगरमध्ये त्यांना ईव्हीएम घोटाळे करणे जमले नाही. कारण हवा शिवसेनेची होती व ती स्पष्ट दिसत होती. भाजप खासदारांचे पुत्रही त्यांच्या घरच्या मैदानात शिवसेनेकडून पराभूत झाले. 

[?] नगरचे चित्र असे आहे की, सासरा भाजपात, तर जावई राष्ट्रवादीत, हे दोघे एकत्र आले. राष्ट्रवादी व भाजपचे लफडे नव्याने समोर आले. आता म्हणे राष्ट्रवादीच्या सर्व नगरसेवकांवर कारवाई होणार आहे. हे सर्व ढोंग आहे. 

[?] राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार किंवा त्या पक्षाच्या प्रदेश पातळीवरील नेत्यांना नगरमधील भाजप-राष्ट्रवादीच्या या ‘प्रकरणा’विषयी जराही कल्पना नव्हती असे आता सांगितले जात आहे. शरद पवार यांना माहिती होती की नाही हे त्यांचे त्यांनाच माहीत; पण नगरमधील ही ‘लोकशाही’ उद्या ‘बेबंदशाही’ होऊ शकते. 

[?] या निवडणुकीत काँग्रेस पक्षही तटस्थ राहिला म्हणे. राधाकृष्ण विखे-पाटलांचा हा जिल्हा; पण त्यांचेही आतून कीर्तन वरून तमाशा असेच सुरू असते. राष्ट्रवादीच्या पायात त्यांचीही टांग आहेच. भाजप-काँग्रेस-राष्ट्रवादी युतीचा हा नवा ‘नगर पॅटर्न’ कुठपर्यंत जातोय ते पाहायचे. 



POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे

=============0===========0==========0==========
पुस्तक घर पोहोच मिळावा
* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये
Click here Pay Now- 
https://imojo.in/prabindia

=============0===========0==========0==========


पक्षाचा आदेश झुगारुन भाजपाला पाठिंबा, 'त्या' नगरसेवकांवर कारवाई होणार-राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार


महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपाला पाठींबा दिल्याने अहमदनगरमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या १८ नगरसेवकांवर येत्या ४ ते ५ दिवसामध्ये कारवाई करणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अहमदनगर येथे पत्रकार परिषदेत सांगितले होते. नगरच्या झालेल्या निवडणुकीसंदर्भात सर्व माहिती मागितली आहे. पक्षाने आदेश देऊनही निर्णय धुडकावला आहे. ही बाब गंभीर आहे. त्यामुळे पक्षाची बैठक ४ किंवा ५ जानेवारी २०१९ होईल. या बैठकित कारवाईचा निर्णय  घेण्यात येईल. शहर जिल्हाध्यक्षांकडे अहवाल मागितल्याचेही त्यांनी सांगितले होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या १८ नगरसेवकांच्या पाठिंब्यावर अहमदनगर पालिकेत भाजपचा महापौर व उपमहापौर निवडून आला आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपची जाहीर युती दिसून आली. आगामी निवडणुकीत राष्ट्रवादीला या घटनेचा फटका बसण्याची शक्यता असल्याने नगरसेवकांवर कारवाई करण्यात आली आहे. पाठींबा देण्याचा निर्णय माझा व नगरसेवकांचा असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी काल जाहीर केले होते. महापौर निवडणुकांत स्थानिक नेत्यांनी पक्षाध्यक्ष झुगारुन निर्णय घेतल्याचे दिसून येत आहे. कारण, प्रदेशाध्यक्षांनी माझ्या झालेल्या चर्चेत त्यांनी असे कुठलेही आदेश पक्षाकडून देण्यात आले नसल्याचं सांगितलं. त्यामुळे, जर पक्षाला विचारत न घेता भाजपाला पाठींबा देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्यास संबंधित नगरसेवकांवर कारवाई केली जाईल, असे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे. महापौर निवडणुकांवेळी राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपाला पाठींबा दिल्यानंतर सर्वच स्तरातून राष्ट्रवादीला लक्ष्य करण्यात आले. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेतेही अवाक् झाले आहेत. मात्र, याबाबत आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर, याबाबत मी माहिती घेतली असून आमच्या राज्य पक्षाध्यक्षांनी असा कुठलाही आदेश दिला नव्हता. तसेच, याप्रकरणी संबंधित नगरसेवकांना नोटीस बजावली असून खुलासा मागविण्यात आला आहे. तर, स्थानिक आमदारांनी भेट घेऊन स्थानिक राजकारणाचं गणित सांगितले आहे. मात्र, तरीही पक्षाचा आदेश झुगारल्याने त्यांच्यावर कारवाई केली जाईलच, असे पवार यांनी स्पष्ट केले होते.

अहमदनगर महापालिका निवडणूक; राष्ट्रवादीकडून कारवाई केल्यास १८ नगरसेवकांसह 1 आमदार भाजपमध्ये जाणार!


महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपाला पाठींबा दिल्याने अहमदनगरमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या १८ नगरसेवकांवर येत्या ४ ते ५ दिवसामध्ये कारवाई करणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अहमदनगर येथे स्पष्ट केले होते. या पार्श्वभूमीवर कारवाई केल्यास संबंधित १८ नगरसेवकांसह 1 आमदार नववर्षात भाजपमध्ये जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राष्ट्रवादीकडून कारवाईची प्रतीक्षा असून हकालपट्टीची कारवाई केली तर सर्वजण भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादीपक्षाने कारवाई केली तर काहीही फरक पडणार नसून पक्षाचेच नुकसान होणार असल्याचे संबधित नगरसेवक मत व्यक्त करीत आहेत.

अहमदनगरमध्ये राष्ट्रवादीने दिलेल्या पाठिंब्याबाबत त्यांनाच विचारा- मुख्यमंत्री



शरद पवार काँग्रेसचे वकील असून त्यांना दुसरा पर्याय नाही नसल्याची टीका करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अहमदनगरमध्ये राष्ट्रवादीने दिलेल्या पाठिंबा बाबत उत्तर देणे टाळून तुम्ही त्यांनाच विचारा असे म्हंटले आहे तर शिवसेनेच्या आरोपांना आम्ही महत्व देत नसल्याचे त्यांनी सांगितले. अहमदनगरमध्ये राष्ट्रवादीने आम्हाला पाठिंबा दिला आहे, त्यामुळे तुम्ही त्यांनाच विचारा, असेही फडणवीस यावेळी म्हणाले. तर आगामी काळात आम्ही निवडणूक राष्ट्रवादी-काँग्रेसच्या विरोधात लढवणार आहोत असेही त्यांनी स्पष्ट केले. काँग्रेस पक्षाला पवारांसारखा मोठा वकील लाभला आहे. त्यांना काँग्रेसची वकिली करण्याशिवाय पर्याय नाही. सुप्रीम कोर्टाने निर्णय दिल्यानंतर जर कोण मान्य करत नसेल तर त्यांनी नेता म्हणवून घेऊ नये, असा घणाघाती आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत केला आहे. दरम्यान शिवसेनेच्या आरोपांना आम्ही महत्व देत नसून अहमदनगरमध्ये आम्ही शिवसेनेला बिनशर्त पाठिंबा द्यायला तयार होतो. याबाबत आमचे नेते बोलत होते, मी तसे सांगितलं होते. तरीही निवडणूकपूर्वी तीन दिवसापर्यंत शिवसेना बोलायला तयार नव्हती. आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत वाट पाहिली मग अधिकार स्थानिक नेत्यांना दिले. राष्ट्रवादीने आम्हाला पाठिंबा दिला आहे, त्यामुळे तुम्ही त्यांना विचारा, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले. 


नगरमध्ये सत्तेबाबत काँग्रेस-राष्ट्रवादीशी बोलणी- रामदास कदमांचा गौप्यस्फोट


अहमदनगरमध्ये आम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीशी सत्ता स्थापनेबाबत बोलणी केली होती. यासाठी मी स्वतः अजित पवार आणि विखे पाटील यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली होती, असा गौप्यस्फोट पर्यावरण मंत्री आणि शिवसेना नेते रामदास कदम यांनी केला आहे. मात्र, असे असतानाही राष्ट्रवादीने शिवसेनेऐवजी भाजपाला पाठींबा दिला. यावरुन राष्ट्रवादीचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे आहेत, असा आरोपही त्यांनी केला. शिवसेना कधी एकदा सत्तेतून बाहेर पडते आणि आम्ही सत्तेत बसतो याची घाई राष्ट्रवादीला झाली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीआधीच राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपाला पाठींबा दिला आहे, असा थेट आरोपही त्यांनी केला. अहमदनगर महानगरपालिका निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकूनही शिवसेनेला महापौरपद मिळवता आले नाही. भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेस, बसप आणि अन्य अपक्षाच्या मदतीने शिवसेनेला धोबीपछाड दिला. भाजपाचे उमेदवार बाबासाहेब वाकळे यांनी महापौरपदाच्या निवडणुकीत बाजी मारली. ३७ विरुद्ध शून्य मतांनी त्यांनी विजय मिळवला. शिवसेनेचे सर्वाधिक २४ जागा जिंकल्या आहेत. त्याखालोखाल राष्ट्रवादी काँग्रेस १८, भाजपा १४, बसप ४ आणि अपक्ष एक असे पक्षीय बलाबल आहे. शिवसेनेच्या २४ पैकी २३ नगरसेवक सभागृहात उपस्थित होते. आपला उमेदवार निवडून येणार नाही हे लक्षात आल्यावर शिवसेनेने मतदानावर बहिष्कार घालण्याची खेळी केली. राष्ट्रवादीचे नगरसेवक भाजपाचे महापौरपदाचे उमेदवार बाबासाहेब वाकळे यांच्यासोबत सभागृहात दाखल झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस भाजपाला साथ देणार हे स्पष्ट झाले होते.


शिवसेनेने भाजपसोबत संसार नीट चालतो का ते बघावे: नवाब मलिक


शिवसेनेचे मंत्री रामदास कदम यांनी आधी भाजपसोबतचा संसार नीट चालतो का ते बघावे आणि मग राष्ट्रवादी काँग्रेसवर टिका करावी असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी लगावला आहे. शिवसेनेचे मंत्री रामदास कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर असभ्य भाषेत टीका केली आहे. त्याला प्रत्युत्तर देताना नवाब मलिक यांनी सेनेचे मंत्री रामदास कदम यांचा आणि भाजपाचा चांगलाच समाचार घेतला.शिवसेनेचा भाजपसोबतचा मांडलेला संसार धड चालत नाही. अहमदनगरमध्ये ज्यांनी पक्षाचा आदेश पाळला नाही त्यांच्यावर कारवाई केली जाईलच परंतु आधी शिवसेनेने भाजपसोबतचा संसार नीट कसा चालेल की घटस्फोट होणार याचंही उत्तर जनतेला हवं आहे असेही नवाब मलिक म्हणाले.

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे

=============0===========0==========0==========
पुस्तक घर पोहोच मिळावा
* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये
Click here Pay Now- 
https://imojo.in/prabindia

=============0===========0==========0==========


धुळे महापालिकेत भाजपाचा महापौर, काँग्रेस राष्ट्रवादीच्या उमेदवाराची माघार

धुळे महापालिकेत भाजपाचा महापौर, काँग्रेस राष्ट्रवादीच्या उमेदवाराची माघार


धुळे महापालिकेत भाजपाची एकहाती सत्ता आली असून महापौरपदी चंद्रकांत सोनार यांची निवड झाली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवार मंगला अर्जुन यांनी महापौरपदाच्या निवडणुकीतून माघार घेतल्याने चंद्रकांत सोनार यांची बिनविरोध निवड झाली. महापौर, उपमहापौर निवडणुकीत आघाडीच्या उमेदवारांनी माघार घेतल्याने भाजपाचे महापौर, उपमहापौर निवडून आले आहेत.भाजपा आणि बंडखोर आमदार अनिल गोटे यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे प्रतिष्ठेच्या ठरलेल्या येथील महापालिका निवडणुकीत तीनवरून ५० जागांपर्यंत मुसंडी मारत भाजपाने आपले वर्चस्व प्रस्थापित केले. नाशिक, जळगाव या महापालिका ताब्यात घेणारे निवडणूक प्रभारी तथा जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी या निवडणुकीतही पर्यटनमंत्री जयकुमार रावल आणि संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्या जोडीने सर्व विरोधकांना चारीमुंडय़ा चीत केले. यानिमित्ताने महापालिका निवडणूक जिंकण्याचा ‘महाजन पॅटर्न’ पुन्हा यशस्वी झाला. धुळे महापालिका निवडणुकीत भाजपाने 50, काँग्रेसने सहा, राष्ट्रवादीने आठ आणि एमआयएमने चार जागा जिंकल्या. शिवसेना आणि समाजवादी पक्षाला प्रत्येकी दोन जागांवरच समाधान मानावं लागलं. लोकसंग्राम आणि बसपा प्रत्येकी एक जागा जिंकण्यात यशस्वी राहिले. दोन जागांवर अपक्ष उमेदवारांचा विजय झाला.

महापालिकेतील संख्याबळ

भाजप ५०
काँग्रेस ६
शिवसेना १
राष्ट्रवादी ८
लोकसंग्राम १
एमआयएम ४
समाजवादी पक्ष २
बसप १
अपक्ष १
एकूण जागा – ७४

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे

=============0===========0==========0==========
पुस्तक घर पोहोच मिळावा
* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये
Click here Pay Now- 
https://imojo.in/prabindia

=============0===========0==========0==========

Sunday 30 December 2018

पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघात ४ जानेवारीपासून ४५ दिवस ‘व्हीव्हीपॅट’वर जनजागृती कार्यक्रम

आगामी निवडणुकांमध्ये जिल्ह्यात (व्हीव्हीपॅट) यंत्रांचा प्रथमच वापर होणार

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) या संस्थेतर्फे देखील सर्व मतदारसंघात ‘व्हीव्हीपॅट’बाबत मतदारांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे. व्हीव्हीपॅट-ईव्हीएम प्रणालीबाबत जागृती करून 'ईव्हीएम यंत्रासोबत छेडछाड होऊच शकत नाही याबाबतही प्रबोधनात्मक उपक्रम राबविण्यात येत आहेत.


आगामी निवडणुकांमध्ये इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिनसोबत (ईव्हीएम) व्होटर व्हेरिफाइड पेपर ऑडिट ट्रेल (व्हीव्हीपॅट) यंत्रांचा प्रथमच वापर केला जाणार आहे. त्याची माहिती मतदारांना देण्यासाठी जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघात ४ जानेवारीपासून ४५ दिवस जनजागृती कार्यक्रम राबविला जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी दिली. व्हीव्हीपॅट-ईव्हीएम प्रणालीचे प्रशिक्षण देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या निवडणूक शाखेने खासदार, आमदार व राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींची बैठक आयोजित केली होती.उपजिल्हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंह, निवासी जिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, आमदार बाबूराव पाचर्णे, माजी महापौर मोहनसिंग राजपाल यांच्यासह राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीत ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यंत्राचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. व्हीव्हीपॅट हे मतदानाची पोचपावती देणारे यंत्र असून, त्यामुळे मतदारांचा संभ्रम दूर होणार आहे, असे स्पष्ट करून जिल्हाधिकाऱ्यांनी जनजागृती कार्यक्रमाची माहिती दिली. खडकवासला मतदारसंघातून ईव्हीएम-व्हीव्हीपॅट जनजागृती मोहिमेस प्रारंभ झाला आहे. याशिवाय जिल्हा परिषदेच्या सभागृहात, पंचायत समितीच्या सभांमध्ये आणि न्यायालयाच्या न्यायमूर्तींनाही या यंत्राचे प्रात्यक्षिक दाखविले जाणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. त्यानंतर मोबाइल जनजागृती व्हॅनचे उद्घाटन करण्यात आले. ईव्हीएमबाबत राजकीय पक्षांमधील संभ्रम दूर करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने गेल्या महिन्यात व्हीव्हीपॅट-ईव्हीएमचे प्रशिक्षण आयोजित केले होते. परंतु, अनेक राजकीय पक्षांनी व नेतेमंडळींनी त्याकडे पाठ फिरवली होती. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयाने शनिवारी पुन्हा प्रशिक्षणाचे आयोजन केले होते. मात्र, अपवाद वगळता बहुतांश आमदार-खासदारांनी केवळ प्रतिनिधी पाठवून प्रशिक्षणाबाबत पुन्हा उदासीनता दर्शवल्याचे दिसून आले. ईव्हीएम-व्हीव्हीपॅट प्रणालीअंतर्गत मतदारासमोर ईव्हीएम युनिट (मतदान यंत्र) आणि व्हीव्हीपॅट यंत्र ठेवलेले असेल. मतदाराने ईव्हीएमवर मतदान केल्यावर 'व्हीव्हीपॅट'वरील पारदर्शी स्क्रीनवर मुद्रित कागदी स्लीप दिसणार आहे. त्यावर अनुक्रमांक, मत दिलेल्या उमेदवाराचे नाव व चिन्ह सात सेकंदांसाठी मतदाराला पाहता येणार आहे. त्यानंतर ही स्लीप व्हीव्हीपॅट यंत्राच्या सीलबंद कप्प्यात पडणार आहे. त्यामुळे मतदाराला मतदानाची खात्री करता येणार आहे.

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे

=============0===========0==========0==========
पुस्तक घर पोहोच मिळावा
* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये
Click here Pay Now- 
https://imojo.in/prabindia

=============0===========0==========0==========

५० टक्क्यांहून अधिक जागांवर आरक्षण;निवडणुकांना स्थगिती;जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका पुढे ढकलल्या

वाशिम, अकोला, धुळे व नंदूरबार जिल्हा परिषद सदस्यांना मुदतवाढ 


जिल्हा परिषद व पंचायत समिती कायद्याच्या कलम १२ (२)(क) नुसार अकोला व वाशीम जिल्हा परिषदेतील जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत. परंतु, त्यामुळे एकूण जागांपेक्षा ५० टक्क्यांहून अधिक जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समिती कायद्यातील सदर तरतूद ही राज्यघटनेच्या कलम २४३ डी आणि २४३ टी यांचा भंग करणारा आहे. असे निदर्शनास आणून निवडणुकांना स्थगिती देण्याची मागणी केल्याने जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका पुढे ढकलल्या आहेत. जिल्हा परिषद निवडणुकीत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर मागासवर्गीयांकरिता ५० टक्के जागा आरक्षित असाव्या, असा निकाल सुप्रीम कोर्टाने दिला होता. न्यायालयाने स्थगिती दिल्याने मुदतीत निवडणुका घेता येऊ शकल्या नाहीत. आज ३० डिसेंबरला वाशिम, अकोला, धुळे व नंदूरबार जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांची मुदत संपुष्टात येत असल्याने राज्य सरकारने त्यांना मुदतवाढ दिली आहे. दरम्यान आगामी अधिवेशनात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या कायद्यात तीन महिन्यांत दुरुस्ती केल्यावरच निवडणुका होण्याची शक्यता आहे. पाच वर्षांचा कालावधी ३० डिसेंबरला संपुष्टात येण्यापूर्वी ग्रामविकास विभागाने मुदतवाढ देण्यासंदर्भातील निर्णय २७ डिसेंबर रोजी जाहिर केला असून, त्या अनुषंगाने वाशिम, अकोला, धुळे, नंदुरबार जिल्हा परिषद व त्या अंतर्गत असलेल्या पंचायत समित्याच यापुढे कार्यरत राहतील, असे स्पष्ट केले आहे. डिसेंबर २०१३ मध्ये उपरोक्त चारही जिल्हा परिषद आणि त्या अंतर्गत येत असलेल्या पंचायत समित्यांची सार्वत्रिक निवडणूक झाली होती. पाच वर्षांचा कार्यकाळ ३० डिसेंबर रोजी संपुष्टात येत असल्याचा पार्श्वभूमीवर निवडणुकीचा कार्यक्रमही घोषित झाला होता. परंतू, राखीव जागांची संख्या ५० टक्क्यांपेक्षा जास्त झाल्याचा मुद्दा उपस्थित करून जिल्हा परिषद सदस्य विकास गवळी यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात याचिका दाखल केली होती. विद्यमान न्यायालयाने २७ आॅगस्ट २०१८ रोजी राज्य सरकारला अधिनियमातील तरतुदीत आवश्यक दुरुस्ती करण्यासाठी तीन महिन्यांची मुदत देत अकोला, वाशिम, नंदुरबार, धुळे जिल्हा परिषदांची निवडणूक प्रक्रिया यथास्थिती ठेवण्याचा आदेश दिला. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात राखीव जागांच्या तरतुदीच्या कलमात दुरुस्ती करण्याच्या प्रस्तावावर शासनाचा कोणताच निर्णय झाला नाही. जिल्हा परिषद सदस्यांचा कालावधी ३० डिसेंबर २०१८ रोजी तर पंचायत समिती सदस्यांचा कालावधी २८ डिसेंबर २०१८ रोजी पूर्ण होत असल्याने त्यापुढील कालावधीत जिल्हा परिषद व पंचायत समित्यांचे कामकाज सुरळीत चालण्याच्या दृष्टिने चारही जिल्हा परिषदांनी ग्रामविकास विभागाकडे मार्गदर्शन मागविले होते. यावर निर्णय देताना, ग्रामविकास विभागाने स्पष्ट केले की, उपरोक्त चारही जिल्हा परिषद व त्याअंतर्गत असलेल्या पंचायत समित्या सदस्यांचा विहित कालावधी संपुष्टात येत असल्याने अशा परिस्थितीत सदर चारही जिल्ह्यातील विद्यमान जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत असलेल्या पंचायत समित्या कार्यरत राहतील. या निर्णयामुळे विद्यमान जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांना मुदतवाढ मिळाली असून, मोठा दिलासाही मिळाला. ग्रामविकास विभागाच्या या निर्णयाने जिल्हा परिषदेवर प्रशासक की मुदतवाढ यासंदर्भात असलेली संभ्रमावस्थाही संपुष्टात आणली आहे. नगर परिषद व जिल्हा परिषदांच्या आरक्षण नियमावलीत सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार येत्या तीन महिन्यांत दुरुस्ती करण्यात यावी, असा आदेश देत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अकोला व वाशीम जिल्हा परिषदांच्या निवडणुकीला यथास्थितीत ठेवण्याचा आदेश दिला होता.अकोला व वाशीम जिल्हा परिषद निवडणुकीत ५० टक्क्यांहून अधिक जागा आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे सदर आरक्षण हे सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाचा भंग करणारे असून, निवडणूक प्रक्रियेवर स्थगिती द्यावी, अशी विनंती करणारी याचिका विलास गवळी यांनी उच्च न्यायालयात दाखल केली होती. त्यावर सुनावणी करताना न्या. भूषण धर्माधिकारी आणि न्या. मुरलीधर गिरटकर यांच्या खंडपीठाने राज्य सरकारला नोटीस बजावली होती. याचिकाकर्त्यानुसार, जिल्हा परिषद व पंचायत समिती कायद्याच्या कलम १२ (२)(क) नुसार अकोला व वाशीम जिल्हा परिषदेतील जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत. परंतु, त्यामुळे एकूण जागांपेक्षा ५० टक्क्यांहून अधिक जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समिती कायद्यातील सदर तरतूद ही राज्यघटनेच्या कलम २४३ डी आणि २४३ टी यांचा भंग करणारा आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर मागासवर्गीयांकरिता ५० टक्के जागा आरक्षित असाव्या, असा निकाल सुप्रीम कोर्टाने दिला होता. त्यामुळे जिल्हा परिषद कायद्यात आवश्यक दुरुस्ती करण्यात येईल, अशी हमी राज्य सरकारने दिली होती. परंतु, कायद्यात दुरुस्ती करण्यात न आल्याने अकोला, वाशीम व नागपूर जिल्हा परिषदांमध्ये ५० टक्क्यांहून अधिक जागा आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद कायद्यातील तरतुदीत तातडीने दुरुस्ती करावी, तोवर निवडणुका घेण्यात येऊ नयेत, असे हायकोर्टात नमूद करण्यात आले होते. याचिकाकर्त्यांचा दावा योग्य ठरवित हायकोर्टाने जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या कायद्यात तीन महिन्यांत दुरुस्ती करण्याचा आदेश राज्य सरकारला दिला होता. तोवर निवडणुका यथास्थितीत ठेवण्यात याव्यात, असे नमूद करीत याचिका निकाली काढण्यात आल्या आहेत. याचिकाकर्त्यांतर्फे अॅड. मुकेश समर्थ, अॅड. अक्षय नाईक, अॅड. अनिल किलोर यांनी, तर निवडणूक आयोगातर्फे अॅड. जे. बी. कासट यांनी बाजू मांडली होती. राज्य सरकारच्या नवीन अधिसूचनेनुसार जिल्हा परिषदांच्या निवडणुकींसाठी आरक्षणाची सोडत काढताना आरक्षित जागा ५० टक्क्यांपेक्षा अधिक होत असल्याने  त्याला उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आले होते. त्या याचिकेवर न्या. भूषण धर्माधिकारी आणि न्या. मुरलीधर गिरटकर यांनी राज्य सरकारला तीन महिन्यात कायद्यात बदल करण्याचे आदेश दिले असून तोपर्यंत जाहीर झालेल्या निवडणुकांवर ‘जैसे थे’चे आदेश दिले होते. त्यामुळे कायद्यात बदल करेपर्यंत जिल्हा परिषद निवडणुकांवर एकप्रकारे स्थगिती राहणार आहे. नागपूर जिल्हा परिषद सदस्य यशवंत आष्टनकर यांच्यासह अकोला व वाशीम येथील सदस्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. याचिकाकर्त्यांनुसार, महाराष्ट्र जिल्हा परिषद कायद्याच्या कलम १२ (२) (क) अंतर्गत जिल्हा परिषद निवडणुकांसाठी आरक्षण निश्चित करण्यात येते. त्यानुसार अनुसूचित जाती (एस.सी.), अनुसूचित जमाती (एस.टी.) आणि मागासवर्गीयांसाठी आरक्षणाची सोडत होते. दरम्यान, इतर मागास प्रवर्गासाठी २७ टक्के आरक्षणाची तरतूद आहे. यासंदर्भात २७ जुलै २०१८ ला राज्य सरकारने एक अधिसूचना प्रसिद्ध करून एस.सी., एस.टी.सह इतर मागासवर्गीयांचे  आरक्षण ठरवण्यात आले. ते ५० टक्क्यांपेक्षा अधिक होते. तसेच सर्वोच्च न्यायालयाने २०१० मध्ये के. कृष्णमूर्ती विरुद्ध इतर या प्रकरणात निकाल देताना कोणतेही आरक्षण ५० टक्क्यांपेक्षा अधिक नसावे, असे स्पष्ट केले. त्यामुळे राज्य सरकारला जिल्हा परिषद कायद्यात दुरुस्ती केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही, अशी विनंती याचिकाकर्त्यांनी केली. यावर न्यायालयाने राज्य सरकारला तीन महिन्यांत कायद्यात दुरुस्ती करण्याचे आदेश दिले. तोपर्यंत निवडणुकांवर ‘जैसे थे’चे आदेश दिले होते.आष्टनकर यांच्यातर्फे अ‍ॅड. अक्षय नाईक, अकोला, वाशीमच्या प्रतिनिधींतर्फे अ‍ॅड. मुकेश समर्थ, निवडणूक आयोगातर्फे अ‍ॅड. जेमिनी कासट आणि राज्य सरकारतर्फे अ‍ॅड. निवेदिता मेहता यांनी बाजू मांडली होती. जिल्हा परिषद निवडणुकीत राखीव जागांचे आरक्षण ५० टक्क्यांपेक्षा जास्त असल्याने न्यायालयात याचिका दाखल केली होती़ त्यावर उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ कलम १२(२)(सी)मध्ये सुधारणा करण्याचे आदेश दिले आहेत. 

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील इतर मागासप्रवर्ग आरक्षण संपुष्टात येणार!

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील एस.सी., एस.टी.सह इतर मागासवर्गीयांचे आरक्षण ५० टक्क्यांपेक्षा अधिक आहे यामुळे नागपूर जिल्हा परिषद सदस्य यशवंत आष्टनकर यांच्यासह अकोला व वाशीम येथील सदस्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. याचिकाकर्त्यांनुसार, महाराष्ट्र जिल्हा परिषद कायद्याच्या कलम १२ (२) (क) अंतर्गत जिल्हा परिषद निवडणुकांसाठी आरक्षण निश्चित करण्यात येते. त्यानुसार अनुसूचित जाती (एस.सी.), अनुसूचित जमाती (एस.टी.) आणि मागासवर्गीयांसाठी आरक्षणाची सोडत होते. दरम्यान, इतर मागास प्रवर्गासाठी २७ टक्के आरक्षणाची तरतूद आहे. यासंदर्भात २७ जुलै २०१८ ला राज्य सरकारने एक अधिसूचना प्रसिद्ध करून एस.सी., एस.टी.सह इतर मागासवर्गीयांचे आरक्षण ठरवण्यात आले. ते ५० टक्क्यांपेक्षा अधिक होते. तसेच सर्वोच्च न्यायालयाने २०१० मध्ये के. कृष्णमूर्ती विरुद्ध इतर या प्रकरणात निकाल देताना कोणतेही आरक्षण ५० टक्क्यांपेक्षा अधिक नसावे, असे स्पष्ट केले. त्यामुळे राज्य सरकारला जिल्हा परिषद कायद्यात दुरुस्ती केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही, अशी विनंती याचिकाकर्त्यांनी केली. यावर न्यायालयाने राज्य सरकारला तीन महिन्यांत कायद्यात दुरुस्ती करण्याचे आदेश दिले. राज्य सरकारला कायद्यात बदल करताना एस.सी., एस.टी.सह इतर मागासवर्गीयांचे आरक्षणात कपात करावी लागेल. अनुसूचित जाती व जमातीच्या आरक्षणात कोणताही बदल राज्य सरकार करू शकत नाही. केवळ इतर मागासवर्गीयांचे आरक्षणात कपात करू शकते. मात्र इतर मागासवर्गीयांचे आरक्षणात कपात करणे राजकीयदृष्ट्या राज्य सरकारला निर्णय घेणे कठीण जाणार आहे. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर असा निर्णय कदापीही राज्य सरकार घेण्यास धजावणार नाही. न्यायालयीन लढाईत महाराष्ट्रात विविध आरक्षणावरून आधीच वाद विवाद सुरु आहेत. यामध्ये या संघर्षाची भर पडली आहे. कायद्यातील तरतुदीनुसार अनुसूचित जाती व जमातीच्या लोकसंखेच्या आधारावर आरक्षणाच्या जागा निश्चित होतात. ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील अनुसूचित जाती व जमातीच्या लोकसंख्या जास्त असेल तर या ठिकाणी निश्चित केलेले प्रमाणानुसार आरक्षित जागा निश्चित कराव्या लागतात. असे झाल्यास अनुसूचित जाती व जमातीकरिता 33 टक्के आरक्षण होते तर इतर मागासवर्गीयांचे आरक्षण २७ टक्के आहे. अनुसूचित जाती व जमातीच्या लोकसंखेचे प्रमाण अथवा टक्केवारी आरक्षित जागा निश्चित करताना गृहीत धरण्याची तरतूद कायद्याने आहे. ज्या ठिकाणी अनुसूचित जाती व जमातीच्या लोकसंखेचे प्रमाण 33 टक्के पेक्षा जास्त आहे अशा ठिकाणी लोकसंखेचे प्रमाण 1/३ ऐवजी 33 टक्के प्रमाणानुसार आरक्षित जागा निश्चित केल्या जातात. त्यामुळे  स्थानिक स्वराज्य संस्थांमधील एस.सी., एस.टी.सह इतर मागासवर्गीयांचे आरक्षण ५० टक्क्यांपेक्षा अधिक होते. हा मुद्दा कायदेशीररीत्या उपस्थित करून काही मान्यवर न्यायालयीन लढा देत आहेत. आता हा लढा संपुष्टात आणण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील इतर मागासप्रवर्ग आरक्षण संपुष्टात येणार अशी शक्यता वर्तवली जात आहे.


Mr. Chandrakant Bhujbal

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) 

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे


Friday 28 December 2018

लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील पहिला उमेदवार जाहीर; आमदार बळीराम शिरस्कार यांना लोकसभेची उमेदवारी

बुलडाणा लोकसभा मतदारसंघात भारिप बहुजनचे आ. बळीराम शिरस्कर यांना वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी


बुलडाणा लोकसभा मतदारसंघात भारिप बहुजनचे आ. बळीराम शिरस्कर यांना वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील पहिला उमेदवार जाहीर करण्यात आला असून त्यामुळे आगामी निवडणुकीच्या राजकीय हालचालींना वेग आला आहे. 
वंचित बहुजन आघाडीतर्फे बाळापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बळीराम शिरस्कार यांना लोकसभेची उमेदवारी शेगांव येथील वंचित माळी समजा राजकीय एल्गार परिषदेत जाहीर करण्यात आली आहे. अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सभेत ही घोषणा केली. वंचित बहुजन आघाडीसोबत काँग्रेसची चर्चा सुरू असून, आघाडीबाबत निर्णय अद्याप झालेला नाही. दरम्यान अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आज मोठी घोषणा करत बुलडाणा लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील पहिला उमेदवार जाहीर केला आहे. भारिप बहुजन महासंघाचे बाळापूर मतदारसंघाचे विद्यमान आमदार बळीराम सिरस्कार यांना वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी जाहीर केली. बुलडाणा लोकसभा मतदारसंघात सध्या शिवसेनेचे प्रतापराव जाधव हे खासदार आहेत. आमदार बळीराम सिरस्कार हे माळी समाजाचे आहेत. माळीकार्ड सोबतच एमआयएम, भारिपची व्होट बँक ही वंचित आघाडीची जमेची बाजू असून, काँग्रेसला हा मोठा धक्का आहे.1984 पर्यंत या मतदारसंघावर काँग्रेसची सत्ता होती. मात्र त्यानंतर काँग्रेसला हा गड राखणं जमलेलं नाही. 1984 मध्ये काँग्रेसचे मुकुल वासनिक खासदार म्हणून निवडून आले. 1989 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या सुखदेव नंदाजी काळे यांनी बाजी मारली. 1991 मध्ये मुकुल वासनिकांच्या रूपात काँग्रेसने पुन्हा विजय मिळवला. मात्र 1996 मध्ये आनंदराव अडसूळांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने या जागेवर आपलं स्थान बळकट केले.1998 मध्ये झालेल्या निवडणुकीत पुन्हा मुकुल वासनिक खासदार म्हणून निवडून आले. तर 1999 आणि 2004 मधील लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या आनंदराव अडसूळांची खासदार म्हणून वर्णी लागली. 2009 च्या निवडणुकीत शिवसेनेचे प्रतापराव जाधव खासदार म्हणून लोकसभेवर विजयी झाले. बुलढाणा जिल्ह्यामध्ये बुलढाणा, चिखली, सिंदखेडराजा, मेहकर, खामगाव, जळगाव जामोद आणि मलकापूर असे एकूण सात विधानसभा मतदार संघ येतात. त्यातील मलकापूर विधानसभा मतदारसंघ वगळता इतर सहा विधानसभा मतदारसंघांचा मिळून बुलढाणा लोकसभा मतदारसंघ तयार झाला आहे. 1977 ते 2009 पर्यंत हा मतदार संघ अनुसूचित जातीसाठी राखीव होता. 2009 मध्ये हा मतदारसंघ सर्वसाधारण झाला. 2009 मध्ये बुलढाणा मतदारसंघातली मतदार संख्या 13 लाख 82 हजार 736 एवढी होती. यामध्ये 7 लाख 21 हजार 215 पुरूष, तर 6 लाख 61 हजार 521 महिला मतदारांचा समावेश होता. हा मतदारसंघ भौगोलिक दृष्ट्या फार मोठा आहे. सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या आणि मध्यप्रदेशाच्या सीमेला लागून असलेल्या संग्रामपूर तालुक्यापासून सुरू होऊन, मराठवाडा सीमेला लागून असलेल्या लोणार तालुक्यापर्यंत हा मतदारसंघ आहे. विद्यमान खासदार प्रतापराव गणपतराव जाधव(शिवसेना) आहेत. सुमारे चार दशकं राखीव असलेला बुलढाणा मतदारसंघ पुनर्रचनेनंतर 2009 मध्ये खुला झाला. आणि शिवसेनेचे प्रतापराव जाधव खासदार म्हणून पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले. त्याआधी 1995 ते 2009 या कालावधीत मेहकर मतदारसंघातून प्रतापराव आमदार म्हणून निवडून आले होते.  2009 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे प्रतापराव गणपतराव जाधव यांना 3 लाख 53 हजार 671 मते मिळाली होती. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत बुलढाणा लोकसभा मतदासंघातून शिवसेनेच्या प्रतापराव जाधव यांनी विजय मिळवला. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कृष्णराव इंगले यांचा ५९ हजार ५७९ मतांनी पराभव केला होता. मतदारसंघामध्ये सध्या बुलढाणा जिल्ह्यामधील ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट आहेत यामध्ये बुलढाणा विधानसभा मतदारसंघ, चिखली विधानसभा मतदारसंघ, सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघ, मेहकर विधानसभा मतदारसंघ, खामगांव विधानसभा मतदारसंघ, जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघ यांचा समावेश होतो. 
कोण आहेत बळीराम सिरस्कार
* भारिप-बहुजन महासंघाचे विधानसभेतील एकमेव आमदार
* अकोला जिल्ह्यातील बाळापूर मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा आमदार
* पक्षाच्या कोअर समितीचे सदस्य.
* भारिप-बहुजन महासंघाचा माळी समाजाचा चेहरा
* अकोला जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष


POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे

=============0===========0==========0==========
पुस्तक घर पोहोच मिळावा
* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये
Click here Pay Now- 
https://imojo.in/prabindia

=============0===========0==========0==========








Thursday 27 December 2018

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्याने नगरमध्ये प्रथमच भाजपचा महापौर

महापौरपदी भाजपचे बाबासाहेब वाकळे




अहमदनगर महापालिकेच्या महापौरपदी भाजपचे बाबासाहेब वाकळे यांची निवड झाली आहे.  तर उपमहापौरपदी भाजपच्याच मालनताई ढोणे यांची निवड झाली आहे.  राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्याने नगरमध्ये प्रथमच भाजपचा महापौर निवडला गेला आहे. महापौर पदाच्या निवडणुकीत वाकळे यांना ३७ मते मिळाली. तर शिवसेने या निवडणुकीवर बहिष्कार टाकला. दरम्यान, वादग्रस्त नगरसेवक श्रीपाद छिंदम यांना महापालिका सभागृहात शिवेसना नगरसेवकांनी मारहाण केली. भाजप व राष्ट्रवादीने शिवसेनेला बदनाम करण्यासाठी छिंदमला सेनेला मत द्यायला लावले, असा आरोप शिवसेनेने केला आहे.राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिलेल्या अहमदनगर महानगरपालिकेतील महापौरपदासाठी आज निवडणूक पार पडली. या निवडणुकीसाठी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने युती केली आहे. महापालिकेतील त्रिशंकू परिस्थिती असल्यामुळे कोणत्या पक्षांची युती होणार, याची उत्सुकता सर्वांनाच होती. मात्र, आज सकाळी भाजप आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक एकाच गाडीतून आले. यानंतर भाजपचे महापौरपदाचे उमेदवार बाबासाहेब वाकळे व राष्ट्रवादीचे उमेदवार संपत बारस्कर यांनी हातात हात घालूनच महापालिकेत प्रवेश केला होता. यानंतर काही वेळातच राष्ट्रवादीच्या संपत बारस्कर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने बाबासाहेब वाकळे यांचा महापौरपदाचा मार्ग सुकर झाला. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन सकाळपासूनच नगरमध्ये ठाण मांडून होते. अहमदनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपचे १४ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे १८ नगरसेवक निवडून आले होते. तर २४ जागा मिळवत शिवसेना सर्वाधिक मोठा पक्ष ठरला होता. मात्र, याठिकाणी सेना-भाजपमधून विस्तवही जात नाही. सेनेचे नेते माजी आमदार अनिल राठोड व भाजपाचे खासदार दिलीप गांधी हे एकमेकांचे कट्टर विरोधक मानले जातात. त्यामुळे शिवसेना-भाजप एकत्र येण्याची शक्यता नव्हती.भाजपाच्या बाबासाहेब वाकळे यांना भाजपाची १४, राष्ट्रवादीची १८, बसप ४ आणि अपक्ष १ अशी ३७ मते मिळाली. शिवसेनेच्या २४ नगरसेवकांपैकी २३ नगरसेवक सभागृहात उपस्थित होते. शिवसेनेचे उमदेवार बाळासाहेब बोराटे यांना २३ मते मिळणार हे निश्चित झाल्यानंतर शिवसेने या निवडणुकीवर बहिष्कार घातला. त्यामुळे भाजपाचे बाबासाहेब वाकळे ३७ विरुद्ध ० मतांनी विजयी झाले. महापालिका निवडणुकीत काँग्रेसने बहिष्कार टाकला असून त्यांच्या ५ नगरसेवकांनी सभात्याग केला. कोणत्याही जातीयवादी पक्षासोबत जाणार नसल्याची भूमिका काँग्रेसने घेतली. महापौर पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीची माघार घेतली. महापौर पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार संपत बारस्कर यांनी माघार घेतली. छिंदम अपक्ष म्हणून निवडून आला आहे. तो कोणाला मतदान करणार याची उत्सुकता होती. त्याने सेनेने उमेदवार बाळासाहेब बोराटे यांना मतदान करण्यासाठी हात उंचावला. त्यावेळी सेनेच्या नगरसेवकांनी त्याला सभागृहातच मारहाण केली. सेनेने पुढील निवड प्रक्रियेवर बहिष्कार घालत सभात्याग केला. छिंदमला आम्ही सभागृहातच चोपले असा दावा सेनेने केला आहे. श्रीपाद छिंदमचे मत शिवसेनेच्या कोट्यात मोजण्यात आले आहे. सेनेला स्वत:चे २३ व छिंदमचे १ आणि सपाचे १ असे २५ मते मिळाली. छिंदमला मारहाण करणा-या नगरसेवकांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश पिठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांनी दिले आहेत. अहमदनगरमध्ये एकूण ६८ जागा असून बहुमतासाठी ३५ चे संख्याबळ आवश्यक होते. निवडणुकीत शिवसेना २४, राष्ट्रवादी १८, भाजप १४, काँग्रेस ५, बसपा ४, सपा १ व अपक्ष २ असे संख्याबळ होते. शिवसेना व भाजप एकत्र आल्यास इतर कोणाची आवश्यकता भासणार नव्हती. पण राज्यातील सत्तेत एकत्र असलेले सेना व भाजप या दोन पक्षांमध्ये मनपातील सत्तेसाठी संवादच घडला नाही. दोन्ही पक्षांच्या स्थानिक नेत्यांतील कटुता त्यांना एकत्र येण्यापासून रोखत होती. यात दोन्ही पक्षाचे नेते माजी आमदार अनिल राठोड (शिवसेना) व खासदार दिलीप गांधी (भाजपा) यांच्यातील वैयक्तिक वादाची स्वतंत्रपणे भर पडली होती. महापौरपद शिवसेनेला दिले तर भाजपा फक्त उपमहापौरपदावर समाधानी नव्हती. भाजपाची नजर स्थायी समितीवरही होती. त्यामुळे भाजपा- शिवसेना युती खोळंबली होती.अहमदनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची धूरा आ. अरुण जगताप, आ. संग्राम जगताप, माजी आमदार दादा कळमकर यांच्या खांद्यावर आहे. केडगाव येथे शिवसैनिकाची हत्या झाल्याने शिवसेना नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीकेची झोड उठवली होती. राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांवर गंभीर आरोप झाले. राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप, संदीप गुंजाळ, बाळासाहेब कोतकर व भानुदास कोतकर आदींवर गुन्हा दाखल करण्यात आला. यामुळे राष्ट्रवादीचे स्थानिक नेते आणि शिवसेना हे कट्टर विरोधक झाले.मागील निवडणुकीत भाजपा व राष्ट्रवादी एकत्र आले होते, मात्र ऐनवेळी भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी निवड सभेच्या सकाळी आदेश देऊन सेनेबरोबर जाण्यास सांगितले होते, त्यामुळे राष्ट्रवादी तोंडघाशी पडली होती. या निवडणुकीतही शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. अहमदनगर जिल्हा परिषदेत काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना एकत्र आले होते. तसाच काहीसा प्रयोग मनपामध्ये करण्याचा सेनेचा प्रयत्न होता. तर भाजपाला त्याची परतफेड मनपामध्ये करायची होती. दुसरीकडे राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांचाही शिवसेनेवर राग होता. त्यामुळे शिवसेनेविरोधात एकत्र येण्यासाठी ही कारणे दोन्ही पक्षांसाठी पुरेशी ठरली.


भाजपला मदत करणा-या नगरसेवकांना राष्ट्रवादीची नोटीस


अहमदनगर महापालिकेच्या महापौर निवडणुकीत भाजपला मदत करणा-या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना पक्षाने नोटीस बजावली आहे. पक्षाच्या आदेशाच्या विरोधात जात भाजपला मदत केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ही नोटीस पाठवली आहे. नगर महापौर निवडणुकीत सर्वांना धक्का देत भाजपने बाजी मारली आहे. पण भाजपच्या या विजयानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. कारण पक्षनेतृत्वाचा विरोध असतानाही राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी महापौर निवडणुकीत भाजपला साथ दिली आहे. 'या निवडणुकीत भाजपला मदत न करण्याचे आदेश प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्थानिक नेत्यांना दिले होते, अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी एका खासगी वाहिनीला दिली आहे. त्यामुळे पक्षाच्या आदेशाच्या विरोधात जात नगरमधील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजपला मदत केल्याचं उघड आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने केलेल्या मदतीमुळेच भाजपचा महापौर होऊ शकला आहे. अहमनगरच्या महापौरपदाचा फैसला काही वेळापूर्वीच झाला. या निवडणुकांमध्ये भाजपने शिवसेनेला धोबीपछाड केले आहे. शिवसेना हा सगळ्यात मोठा पक्ष असला तरी इतर सर्वपक्षीयांनी भाजप उमेदवाराला पाठिंबा दिला. त्यात राष्ट्रवादीच्या संपत बरस्कार यांनी आपला अर्ज मागे घेतला. त्यामुळे गिरीश महाजन यांची खेळी यशस्वी झाली आहे.


भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस एनडीएमध्ये येऊ शकते - रामदास आठवले


अहमदनगरमधील महापौरपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपच्या उमेदवाराला साथ दिल्याचे तीव्र पडसाद महाराष्ट्राच्या राजकारणात उमटले आहेत. लोकसभेची निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आली असताना, अशा पद्धतीने दोन विरोधी पक्षांनी एकमेकांना साह्य करणे सर्वांनाच आश्चर्यचकीत करणारे ठरणार आहे. या सगळ्या घडामोडी घडल्यानंतर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेचे कौतुक केले. राजकारणात काहीही होऊ शकते. भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस एनडीएमध्ये येऊ शकते, असे वक्तव्य त्यांनी केले. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकसभा निवडणुकीनंतर पुन्हा पंतप्रधानपदी बसविण्यासाठी शरद पवार यांनी मदत करावी, अशीही मागणी त्यांनी केली. 

बाबासाहेब वाकळे यांचे तिसरे अपत्य? न्यायालयात आव्हान

बाबासाहेब वाकळे यांचे तिसरे अपत्य हे विहीत मुदतीनंतर जन्मलेले असल्याने ते अपात्र ठरतात, असा मुद्दा सेनेचे पराभूत उमेदवार अर्जुन बोरुडे यांनी न्यायालयात उपस्थित केला आहे. या मुद्यात तथ्य असेल तर ती गंभीर बाब आहे. तथ्य नसेल तर तीही वाकळे यांची नाहक बदनामी आहे. मात्र, हा मुद्दा चर्चेत असताना त्यावर शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस यापैकी कुठलाही पक्ष बोलायला तयार नाही. शिवसेनेनेही बोरुडे यांच्या तक्रारीबाबत मौन धारण केले आहे. बाबासाहेब वाकळे यांच्या तिस-या अपत्याच्या जन्मतारखेबाबत डॉ. नानासाहेब अकोलकर यांनी दिलेल्या प्रमाणपत्रांवरुन गोंधळ वाढला आहे. अकोलकर यांनी दिलेले प्रमाणपत्र खरे असेल तर वाकळे अडचणीत सापडतात. मात्र हे प्रमाणपत्र आपण अनावधानाने दिले, असा अकोलकर यांचा दावा आहे. अकोलकर यांनी असे का केले? त्यांनी दिलेले प्रमाणपत्र खरे की खोटे? याची महापालिका आयुक्त शहानिशा करतील अशी अपेक्षा बोरुडे यांना आहे. 

महापौरपदाचे उमेदवार
बाबासाहेब वाकळे (भाजप)
संपत बारस्कर (राष्ट्रवादी)
बाळासाहेब बोराटे (शिवसेना)

उपमहापौरपदाचे उमेदवार
मालन ढोणे (भाजप)
रुपाली वारे (काँग्रेस)
गणेश कवडे (शिवसेना)

महापौर आणि उपमहापौर निवडणुकीचे अर्ज- 

महापौरपद
१.बाळासाहेब बोराटे (शिवसेना)-सूचक-पुष्पा बोरुडे व अनुमोदक-अनिल शिंदे
२.बाबासाहेब वाकळे (भाजप)-सूचक-रवींद्र बारस्कर व अनुमोदक-वंदना ताठे
३.संपत बारस्कर (राष्ट्रवादी)-सूचक-समद खान व अनुमोदक-शोभा बारस्कर
---
उपमहापौरपद
१.गणेश कवडे (शिवसेना)- सूचक- अशोक बडे व अनुमोदक-परशुराम गायकवाड
२.मालन ढोणे (भाजप)-सूचक-सोनाली चितळे व अनुमोदक-सोनाबाई शिंदे

३. रुपाली वारे (काँग्रेस)-सूचक-शीला चव्हाण व अनुमोदक- संध्या पवार


POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे

=============0===========0==========0==========
पुस्तक घर पोहोच मिळावा
* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये
Click here Pay Now- 
https://imojo.in/prabindia

=============0===========0==========0==========



अहमदनगर महापालिका निवडणुक २०१९ निकाल

पक्षीय बलाबल

पक्ष                  २०१३      २०१८

शिवसेना            १७          २४
भाजपा               ०९          १४
राष्ट्रवादी             १८          १८
काँग्रेस               ११           ०५
मनसे                ०४           ००
बसपा               ००           ०४
समाजवादी       ००           ०१
अपक्ष               ०९           ०२


'नोटा'ला झालेले प्रभागनिहाय मतदान :प्रभाग क्रमांक व 'नोटा'ला झालेले मतदान खालीप्रमाणे 

१ - ७६१
२ - १०१३
३ - ६९५
४ - १३०९
५ - १८६२
६ - १२४३
७ - ६६५
८ - १४७९
९ - १७९०
१० - ११९१
११ - १३३२
१२ - १३३०
१३ - १५३८
१४ - ८८२
१५ - ९५८
१६ - १३७९
१७ - ८५८

अहमदनगर मनपा निवडणूक २०१८ : विजयी उमेदवार यादी
पक्षीय बलाबल -2018
सेना- 24
राष्ट्रवादी-18
भाजपा - 14
काँग्रेस -05
बसपा - 04
अपक्ष-02
समाजवादी - 01



निवडणुकीतील विजयी उमेदवार


प्रभाग १-
सागर बोरूडे (राष्ट्रवादी ) - 4641
मीना चव्हाण (राष्ट्रवादी) -4571
दीपाली बारस्कर (राष्ट्रवादी) - 6224
संपत बारस्कर (राष्ट्रवादी) -5896

प्रभाग 2-
विनित पाउलबुद्धे (राष्ट्रवादी)
रुपाली वारे (काँग्रेस)
संध्या पवार (काँग्रेस)
सुनील त्रंबके (राष्ट्रवादी)

प्रभाग 3
समद खान (राष्ट्रवादी) -3467
रिझवाना शेख (काँग्रेस) -2243
मिनाज खान (अपक्ष) -4026
असिफ सुलतान (समाजवादी) -2329

प्रभाग 4
ज्योती गाडे (राष्ट्रवादी)
शोभा बोरकर (राष्ट्रवादी)
योगिराज गाडे (शिवसेना)
स्वप्नील शिंदे (भाजप)

प्रभाग 5
मनोज दुलम (भाजप)
सोनाबाई शिंदे (भाजप)
आशा कराळे (भाजप)
महेंद्र गंधे (भाजप)

प्रभाग 6
सारिका भुतकर (शिवसेना) -3780
बाबा वाकळे (भाजप) -5029
वंदना ताठे (भाजप) -3502
रवींद्र बारस्कर (भाजप) -3343

प्रभाग 7
रीता भाकरे (शिवसेना) -4353
अशोक बडे (शिवसेना) -4716
कमल सप्रे (शिवसेना) -4295
कुमार वाकळे (राष्ट्रवादी) -4822

प्रभाग 8
सुवर्णा बोरूडे (भाजप)
पुष्पा बोरूडे (शिवसेना)

प्रभाग 9 :
शीला चव्हाण(काँग्रेस) -3536
मालन ढोणे (भाजप) -6124
श्रीपाद छिदम (अपक्ष) -4532
सुप्रिया जाधव (काँग्रेस) -6484


प्रभाग 10 :
अक्षय उनवणे (बसपा) -3023
अश्विनी जाधव (बसपा) -5807
अनिता पंजाबी (बसपा) -3331
मुदस्सर शेख (बसपा) -5784

प्रभाग 11
रूपाली जोसेफ पारघे (राष्ट्रवादी)
अविनाश घुले (राष्ट्रवादी)
परवीन कुरेशी (राष्ट्रवादी)
शेख नजिर अहमद (राष्ट्रवादी)

प्रभाग 12
बाळासाहेब बोराटे (शिवसेना)
सुरेखा कदम (शिवसेना)
मंगल लोखंडे (शिवसेना)
दत्ता कावरे (शिवसेना)

प्रभाग 13
गणेश कवडे (शिवसेना) -5658
सोनाली चितळे (भाजप) -5463
सुवर्णा गेनप्पा (शिवसेना) -4266
सुभाष लोंढे (शिवसेना) -6306

प्रभाग 14
प्रकाश भागानगरे (राष्ट्रवादी) -4416
शीतल जगताप (राष्ट्रवादी) - 5100
गणेश भोसले (राष्ट्रवादी) -6348
मीना चोपडा (राष्ट्रवादी) -4534

प्रभाग 15
परसराम गायकवाड (शिवसेना) -3927
सुवर्णा जाधव (शिवसेना) -4096
विद्या खैरे (शिवसेना) -3120
अनिल शिंदे (शिवसेना) -2880

प्रभाग 16
शांताबाई शिंदे (शिवसेना) -4652
सुनीता कोतकर (शिवसेना) -4558
विजय पटारे (शिवसेना) -5421
अमोल येवले (शिवसेना) -5082

प्रभाग 17
राहुल कांबळे (भाजप)-3981
गौरी ननावरे (भाजप) -4399
लता शेळके (भाजप) -3873
मनोज कोतकर (भाजप) -5341


POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे


POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे





====================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा

* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

CLICK HERE PAY NOW- 


=====================================================================



प्रभागनिहाय मतदारांची एकूण संख्या आणि कंसात महिला आणि पुरुष मतदारांची संख्या पुढीलप्रमाणे- प्रभाग क्र.१ एकूण मतदार - १३४३१ (महिला-६३६९, पुरुष- ७०६१, इतर -१), प्रभाग क्र. 2- एकूण मतदार-१५९१३ (महिला-7606, पुरुष -8307), प्रभाग क्र. ३- एकूण मतदार-१३५३५ (महिला-६४७९, पुरुष- ७०५६), प्रभाग क्र.4- एकूण मतदार १३६६८ (महिला-६६८८, पुरुष- ६९१९, इतर-६१), प्रभाग क्र. ५- एकूण मतदार- १७०२३ (महिला-८३३१, पुरुष- ८६९२), प्रभाग क्र. ६- एकूण मतदार-१३३१६ (महिला-६५०५, पुरुष-६८११), प्रभाग क्र. ७- एकूण मतदार१२७७१ (महिला-५८६६, पुरुष- ६९०५), प्रभाग क्र. ८- एकूण मतदार- १४०२७ (महिला-६८३१, पुरुष-७१९५, इतर-१), प्रभाग क्र. ९- एकूण मतदार- १७५३३ (महिला-८७०७, पुरुष-८८२६), प्रभाग क्र. १०- एकूण मतदार- १६०५७ (महिला-७९६९, पुरुष- ८०८८), प्रभाग क्र. ११- एकूण मतदार- १७०१६ (महिला-८२१८, पुरुष-८७९८), प्रभाग क्र. १२- एकूण मतदार-१९५९१ (महिला-९६२६, पुरुष-९९६५) प्रभाग क्र. १३ - एकूण मतदार १८०७८ (महिला-९००१, पुरुष-९०७७), प्रभाग क्र. १४- एकूण मतदार १४७१६ (महिला-७०८७, पुरुष-७६२९), प्रभाग क्र. १५- एकूण मतदार-१२०७६ (महिला-५८९४, पुरुष-६१८२), प्रभाग क्र. १६- एकूण मतदार-१५५१२ (महिला-७४५१, पुरुष-८०६१), प्रभाग क्र.१७- एकूण मतदार-१२४५६ (महिला-५८९८, पुरुष-६५४९, इतर-९).


====================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा

* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

CLICK HERE PAY NOW- 



=====================================================================


































====================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा


* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये


CLICK HERE PAY NOW- 





=====================================================================



=====================================================================

अहमदनगर महापालिकेतील विद्यमान पदाधिकारी यादी खालीलप्रमाणे-







====================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा

* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

CLICK HERE PAY NOW- 




=====================================================================