शिवसेनेला सर्वाधिक जागा; भाजपला नाकारले; त्रिशंकू स्थिती
महापालिका निवडणुकीत ६८ जागांसाठी तब्बल ३३९ उमेदवार उभे होते. विद्यमान नगरसेवकांपैकी सुमारे ४७ जण पुन्हा रिंगणात उतरले होते. नगर महापालिकेत शिवसेनेने सर्वाधिक २४ जागा जिंकल्या असून त्या खालोखाल राष्ट्रवादी काँग्रेसने १४ जागा जिंकल्या आहेत. तर भाजपला अवघ्या १४ जागा मिळाल्या असून काँग्रेसला केवळ ५ जागांवर समाधान मानावे लागले आहे. या निवडणुकीत कोणत्याच पक्षाला बहुमत न मिळाल्याने नगर महापालिकेत त्रिशंकू अवस्था निर्माण झाली आहे. पालिकेत बहुमतासाठी ३८ जागांची गरज असून कोणत्याही पक्षाला हा आकडा गाठता न आल्याने पुन्हा एकदा नगर पालिकेत त्रिशंकू अवस्था निर्माण झाली आहे.
====================================================================
पुस्तक घर पोहोच मिळावा
* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये
CLICK HERE PAY NOW-
=====================================================================
पक्षीय बलाबल
पक्ष २०१३ २०१८
शिवसेना १७ २४
भाजपा ०९ १४
राष्ट्रवादी १८ १८
काँग्रेस ११ ०५
मनसे ०४ ००
बसपा ०० ०४
समाजवादी ०० ०१
अपक्ष ०९ ०२
मनसेचे इंजिन नगरमध्ये फेल;चार नगरसेवकांवरून झिरो;सपाने उघडले खाते
महापालिका निवडणुकीत यंदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पिछेहाट झाली आहे. मागील पंचवार्षिक निवडणुकीत पक्षाचे चार नगरसेवक निवडून आले होते. या वेळी मात्र पक्षास भोपळाही फोडता आला नाही. या निवडणुकीत मनसेला मतदारांनी साफ नाकारले. काही प्रभागांत पक्षाच्या उमेदवारांनी चांगली लढत दिली. राष्ट्रीय समाज पक्ष राज्यात सत्तेत सहभागी आहे. महापालिकेच्या निवडणुकीत सर्व जागांवर उमेदवार देण्याचे पक्षाने निश्चित केले होते. परंतु, चारच जागांवर उमेदवार देता आले. या पक्षाचीही कामगिरी समाधानकारक झाली नाही. पक्षाचा एकही उमेदवार निवडून आला नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर भारतीय कम्युनिस्ट पक्षाने निवडणूक लढवली. या पक्षाने तीन उमेदवारांना तिकीट दिले होते. पक्षाच्या उमेदवारांनी प्रचार केला खरा परंतु, विजय मिळवता आला नाही. बसपनेही अटीतटीच्या लढतीत चार जागांवर यश संपादन केले. या निवडणुकीत आम आदमी पक्ष पहिल्यांदाच उतरला होता. 'आप'ने ८ उमेदवारांना तिकीट दिले होते. या उमेदवारांनी निवडणुकीत प्रचार केला. परंतु, मतदारांनी या पक्षाकडे दुर्लक्ष केले. या पक्षास एकही जागा जिंकता आली नाही.
खासदारांचे पुत्र व सून पराभूत
महापालिकेत एकहाती सत्ता मिळविण्यासह महापौरपदाचे दावेदार असलेले खा.दिलीप गांधी यांचे पुत्र व विद्यमान नगरसेवक सुवेंद्र गांधी हे प्रभाग 11 मधून पराभूत झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक शेख नजीर अहमद यांनी त्यांचा पराभव केला. तर खा. गांधी यांची सून दीप्ती गांधी यादेखील प्रभाग 12 मधून पराभूत झाल्या आहेत. शिवसेनेच्या विद्यमान महापौर सुरेखा कदम यांनी त्यांचा पराभव केला.
'समाजवादी'ने उघडले खाते
या निवडणुकीत 4 जागांवर पहिल्यांदाच निवडणूक लढविणाऱ्या समाजवादी पक्षाने खाते उघडले आहे. प्रभाग तीन 'अ' मध्ये पक्षाचे उमेदवार आसिफ सुलतान यांनी २ हजार ३२९ मते मिळवून विजय मिळवला. उर्वरित प्रभागांत मात्र पक्षाच्या उमेदवारांना विजय मिळवता आला नाही.
अपक्ष उमेदवारांमध्ये घट
यंदाच्या महापालिका निवडणुकीत अपक्ष उमेदवार मोठ्या संख्येने होते. जवळपास सर्वच प्रभागांत अपक्षांची उपस्थिती होती. या निवडणुकीत तब्बल १०६ अपक्ष नशीब आजमावत होते. अपक्षांनी निवडणुकीत चांगली लढत दिली. काही जणांना अपक्ष डोकेदुखीही ठरले. अपक्षांनीही लढत दिली परंतु, १०६ पैकी २ अपक्षांना विजय मिळवता आला. मागील निवडणुकीत ९ अपक्ष उमेदवार विजयी झाले होते. यंदा मात्र दोनच उमेदवार विजयी झाले.
20 हजार मतदारांची ‘नोटा’ला पसंती
महापालिका निवडणुकीत तब्बल २० हजार २८० मतदारांनी 'नोटा' म्हणजेच 'यापैकी कोणीही नाही' हा पर्याय निवडला आहे. सतरापैकी अकरा प्रभागांमध्ये 'नोटा'ला एक हजारपेक्षा जास्त मते मिळाली आहेत. दरम्यान, महापालिका निवडणुकीत झालेल्या एकूण मतदानापैकी तब्बल बारा टक्के मते ही 'नोटा'ला मिळाली आहेत. महानगरपालिका, नगरपालिका, नगर पंचायत यांच्या सार्वत्रिक अथवा पोटनिवडणुकीत एखाद्या प्रभागातील सर्वाधिक मतदारांनी 'नोटा'चा पर्याय निवडला तर तेथे फेरनिवडणूक घेण्याचा आदेश राज्य निवडणूक आयोगाने ६ नोव्हेंबर २०१८ रोजी दिला आहे. या आदेशात 'नोटा' हा 'काल्पनिक उमेदवार' समजून फेरनिवडणूक घेण्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. नगर व धुळे महापालिका निवडणुकीत सर्वात प्रथम हा आदेश लागू झाला. त्याचा काही प्रमाणात परिणाम 'नोटा'चे मतदान वाढण्यात झाला आहे. महापालिकेच्या निवडणुकीत यंदा एकूण दोन लाख ५६ हजार ७१९ मतदारांपैकी एक लाख ७१ हजार ८०५ म्हणजेच सुमारे ६७ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यापैकी तब्बल २० हजार २८० मतदारांनी म्हणजे एकूण झालेल्या मतदानापैकी जवळपास बारा टक्के मतदारांनी 'नोटा'ला पसंती दिली आहे. प्रभाग क्रमांक 'एक', 'तीन', 'सात', 'चौदा', 'पंधरा' व 'सतरा' वगळता इतर सर्व प्रभागांमध्ये 'नोटा'ला एक हजारापेक्षा जास्त मते मिळाली आहेत. प्रभाग क्रमांक पाचमध्ये सर्वांत जास्त म्हणजे तब्बल १ हजार ८६२ मतदारांनी 'नोटा' पर्याय निवडला आहे. तर, प्रभाग क्रमांक सातमध्ये सर्वात कमी म्हणजेच ६६५ मतदारांनी 'नोटा'ला मतदान केले आहे.
====================================================================
पुस्तक घर पोहोच मिळावा
* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये
CLICK HERE PAY NOW-
=====================================================================
'नोटा'ला झालेले प्रभागनिहाय मतदान :प्रभाग क्रमांक व 'नोटा'ला झालेले मतदान खालीप्रमाणे
१ - ७६१२ - १०१३
३ - ६९५
४ - १३०९
५ - १८६२
६ - १२४३
७ - ६६५
८ - १४७९
९ - १७९०
१० - ११९१
११ - १३३२
१२ - १३३०
१३ - १५३८
१४ - ८८२
१५ - ९५८
१६ - १३७९
१७ - ८५८
अहमदनगर मनपा निवडणूक २०१८ : विजयी उमेदवार यादी
पक्षीय बलाबल -2018
सेना- 24
राष्ट्रवादी-18
भाजपा - 14
काँग्रेस -05
बसपा - 04
अपक्ष-02
समाजवादी - 01
निवडणुकीतील विजयी उमेदवार
प्रभाग १-
सागर बोरूडे (राष्ट्रवादी ) - 4641
मीना चव्हाण (राष्ट्रवादी) -4571
दीपाली बारस्कर (राष्ट्रवादी) - 6224
संपत बारस्कर (राष्ट्रवादी) -5896
प्रभाग 2-
विनित पाउलबुद्धे (राष्ट्रवादी)
रुपाली वारे (काँग्रेस)
संध्या पवार (काँग्रेस)
सुनील त्रंबके (राष्ट्रवादी)
प्रभाग 3
समद खान (राष्ट्रवादी) -3467
रिझवाना शेख (काँग्रेस) -2243
मिनाज खान (अपक्ष) -4026
असिफ सुलतान (समाजवादी) -2329
प्रभाग 4
ज्योती गाडे (राष्ट्रवादी)
शोभा बोरकर (राष्ट्रवादी)
योगिराज गाडे (शिवसेना)
स्वप्नील शिंदे (भाजप)
प्रभाग 5
मनोज दुलम (भाजप)
सोनाबाई शिंदे (भाजप)
आशा कराळे (भाजप)
महेंद्र गंधे (भाजप)
प्रभाग 6
सारिका भुतकर (शिवसेना) -3780
बाबा वाकळे (भाजप) -5029
वंदना ताठे (भाजप) -3502
रवींद्र बारस्कर (भाजप) -3343
प्रभाग 7
रीता भाकरे (शिवसेना) -4353
अशोक बडे (शिवसेना) -4716
कमल सप्रे (शिवसेना) -4295
कुमार वाकळे (राष्ट्रवादी) -4822
प्रभाग 8
सुवर्णा बोरूडे (भाजप)
पुष्पा बोरूडे (शिवसेना)
प्रभाग 9 :
शीला चव्हाण(काँग्रेस) -3536
मालन ढोणे (भाजप) -6124
श्रीपाद छिदम (अपक्ष) -4532
सुप्रिया जाधव (काँग्रेस) -6484
प्रभाग 10 :
अक्षय उनवणे (बसपा) -3023
अश्विनी जाधव (बसपा) -5807
अनिता पंजाबी (बसपा) -3331
मुदस्सर शेख (बसपा) -5784
प्रभाग 11
रूपाली जोसेफ पारघे (राष्ट्रवादी)
अविनाश घुले (राष्ट्रवादी)
परवीन कुरेशी (राष्ट्रवादी)
शेख नजिर अहमद (राष्ट्रवादी)
प्रभाग 12
बाळासाहेब बोराटे (शिवसेना)
सुरेखा कदम (शिवसेना)
मंगल लोखंडे (शिवसेना)
दत्ता कावरे (शिवसेना)
प्रभाग 13
गणेश कवडे (शिवसेना) -5658
सोनाली चितळे (भाजप) -5463
सुवर्णा गेनप्पा (शिवसेना) -4266
सुभाष लोंढे (शिवसेना) -6306
प्रभाग 14
प्रकाश भागानगरे (राष्ट्रवादी) -4416
शीतल जगताप (राष्ट्रवादी) - 5100
गणेश भोसले (राष्ट्रवादी) -6348
मीना चोपडा (राष्ट्रवादी) -4534
प्रभाग 15
परसराम गायकवाड (शिवसेना) -3927
सुवर्णा जाधव (शिवसेना) -4096
विद्या खैरे (शिवसेना) -3120
अनिल शिंदे (शिवसेना) -2880
प्रभाग 16
शांताबाई शिंदे (शिवसेना) -4652
सुनीता कोतकर (शिवसेना) -4558
विजय पटारे (शिवसेना) -5421
अमोल येवले (शिवसेना) -5082
प्रभाग 17
राहुल कांबळे (भाजप)-3981
गौरी ननावरे (भाजप) -4399
लता शेळके (भाजप) -3873
मनोज कोतकर (भाजप) -5341
POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे
POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे
====================================================================
पुस्तक घर पोहोच मिळावा
* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये
CLICK HERE PAY NOW-
=====================================================================
प्रभागनिहाय मतदारांची एकूण संख्या आणि कंसात महिला आणि पुरुष मतदारांची संख्या पुढीलप्रमाणे- प्रभाग क्र.१ एकूण मतदार - १३४३१ (महिला-६३६९, पुरुष- ७०६१, इतर -१), प्रभाग क्र. 2- एकूण मतदार-१५९१३ (महिला-7606, पुरुष -8307), प्रभाग क्र. ३- एकूण मतदार-१३५३५ (महिला-६४७९, पुरुष- ७०५६), प्रभाग क्र.4- एकूण मतदार १३६६८ (महिला-६६८८, पुरुष- ६९१९, इतर-६१), प्रभाग क्र. ५- एकूण मतदार- १७०२३ (महिला-८३३१, पुरुष- ८६९२), प्रभाग क्र. ६- एकूण मतदार-१३३१६ (महिला-६५०५, पुरुष-६८११), प्रभाग क्र. ७- एकूण मतदार१२७७१ (महिला-५८६६, पुरुष- ६९०५), प्रभाग क्र. ८- एकूण मतदार- १४०२७ (महिला-६८३१, पुरुष-७१९५, इतर-१), प्रभाग क्र. ९- एकूण मतदार- १७५३३ (महिला-८७०७, पुरुष-८८२६), प्रभाग क्र. १०- एकूण मतदार- १६०५७ (महिला-७९६९, पुरुष- ८०८८), प्रभाग क्र. ११- एकूण मतदार- १७०१६ (महिला-८२१८, पुरुष-८७९८), प्रभाग क्र. १२- एकूण मतदार-१९५९१ (महिला-९६२६, पुरुष-९९६५) प्रभाग क्र. १३ - एकूण मतदार १८०७८ (महिला-९००१, पुरुष-९०७७), प्रभाग क्र. १४- एकूण मतदार १४७१६ (महिला-७०८७, पुरुष-७६२९), प्रभाग क्र. १५- एकूण मतदार-१२०७६ (महिला-५८९४, पुरुष-६१८२), प्रभाग क्र. १६- एकूण मतदार-१५५१२ (महिला-७४५१, पुरुष-८०६१), प्रभाग क्र.१७- एकूण मतदार-१२४५६ (महिला-५८९८, पुरुष-६५४९, इतर-९).
====================================================================
पुस्तक घर पोहोच मिळावा
* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये
CLICK HERE PAY NOW-
=====================================================================
====================================================================
पुस्तक घर पोहोच मिळावा
* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये
CLICK HERE PAY NOW-
=====================================================================
धुळे महापालिकेतील विद्यमान नगरसेवक यादी खालीलप्रमाणे-
====================================================================
पुस्तक घर पोहोच मिळावा
* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये
CLICK HERE PAY NOW-
=====================================================================
अहमदनगर महापालिकेतील विद्यमान पदाधिकारी यादी खालीलप्रमाणे-
====================================================================
पुस्तक घर पोहोच मिळावा
* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये
CLICK HERE PAY NOW-
=====================================================================
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.