Friday 28 December 2018

लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील पहिला उमेदवार जाहीर; आमदार बळीराम शिरस्कार यांना लोकसभेची उमेदवारी

बुलडाणा लोकसभा मतदारसंघात भारिप बहुजनचे आ. बळीराम शिरस्कर यांना वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी


बुलडाणा लोकसभा मतदारसंघात भारिप बहुजनचे आ. बळीराम शिरस्कर यांना वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील पहिला उमेदवार जाहीर करण्यात आला असून त्यामुळे आगामी निवडणुकीच्या राजकीय हालचालींना वेग आला आहे. 
वंचित बहुजन आघाडीतर्फे बाळापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बळीराम शिरस्कार यांना लोकसभेची उमेदवारी शेगांव येथील वंचित माळी समजा राजकीय एल्गार परिषदेत जाहीर करण्यात आली आहे. अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सभेत ही घोषणा केली. वंचित बहुजन आघाडीसोबत काँग्रेसची चर्चा सुरू असून, आघाडीबाबत निर्णय अद्याप झालेला नाही. दरम्यान अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आज मोठी घोषणा करत बुलडाणा लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील पहिला उमेदवार जाहीर केला आहे. भारिप बहुजन महासंघाचे बाळापूर मतदारसंघाचे विद्यमान आमदार बळीराम सिरस्कार यांना वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी जाहीर केली. बुलडाणा लोकसभा मतदारसंघात सध्या शिवसेनेचे प्रतापराव जाधव हे खासदार आहेत. आमदार बळीराम सिरस्कार हे माळी समाजाचे आहेत. माळीकार्ड सोबतच एमआयएम, भारिपची व्होट बँक ही वंचित आघाडीची जमेची बाजू असून, काँग्रेसला हा मोठा धक्का आहे.1984 पर्यंत या मतदारसंघावर काँग्रेसची सत्ता होती. मात्र त्यानंतर काँग्रेसला हा गड राखणं जमलेलं नाही. 1984 मध्ये काँग्रेसचे मुकुल वासनिक खासदार म्हणून निवडून आले. 1989 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या सुखदेव नंदाजी काळे यांनी बाजी मारली. 1991 मध्ये मुकुल वासनिकांच्या रूपात काँग्रेसने पुन्हा विजय मिळवला. मात्र 1996 मध्ये आनंदराव अडसूळांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने या जागेवर आपलं स्थान बळकट केले.1998 मध्ये झालेल्या निवडणुकीत पुन्हा मुकुल वासनिक खासदार म्हणून निवडून आले. तर 1999 आणि 2004 मधील लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या आनंदराव अडसूळांची खासदार म्हणून वर्णी लागली. 2009 च्या निवडणुकीत शिवसेनेचे प्रतापराव जाधव खासदार म्हणून लोकसभेवर विजयी झाले. बुलढाणा जिल्ह्यामध्ये बुलढाणा, चिखली, सिंदखेडराजा, मेहकर, खामगाव, जळगाव जामोद आणि मलकापूर असे एकूण सात विधानसभा मतदार संघ येतात. त्यातील मलकापूर विधानसभा मतदारसंघ वगळता इतर सहा विधानसभा मतदारसंघांचा मिळून बुलढाणा लोकसभा मतदारसंघ तयार झाला आहे. 1977 ते 2009 पर्यंत हा मतदार संघ अनुसूचित जातीसाठी राखीव होता. 2009 मध्ये हा मतदारसंघ सर्वसाधारण झाला. 2009 मध्ये बुलढाणा मतदारसंघातली मतदार संख्या 13 लाख 82 हजार 736 एवढी होती. यामध्ये 7 लाख 21 हजार 215 पुरूष, तर 6 लाख 61 हजार 521 महिला मतदारांचा समावेश होता. हा मतदारसंघ भौगोलिक दृष्ट्या फार मोठा आहे. सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या आणि मध्यप्रदेशाच्या सीमेला लागून असलेल्या संग्रामपूर तालुक्यापासून सुरू होऊन, मराठवाडा सीमेला लागून असलेल्या लोणार तालुक्यापर्यंत हा मतदारसंघ आहे. विद्यमान खासदार प्रतापराव गणपतराव जाधव(शिवसेना) आहेत. सुमारे चार दशकं राखीव असलेला बुलढाणा मतदारसंघ पुनर्रचनेनंतर 2009 मध्ये खुला झाला. आणि शिवसेनेचे प्रतापराव जाधव खासदार म्हणून पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले. त्याआधी 1995 ते 2009 या कालावधीत मेहकर मतदारसंघातून प्रतापराव आमदार म्हणून निवडून आले होते.  2009 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे प्रतापराव गणपतराव जाधव यांना 3 लाख 53 हजार 671 मते मिळाली होती. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत बुलढाणा लोकसभा मतदासंघातून शिवसेनेच्या प्रतापराव जाधव यांनी विजय मिळवला. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कृष्णराव इंगले यांचा ५९ हजार ५७९ मतांनी पराभव केला होता. मतदारसंघामध्ये सध्या बुलढाणा जिल्ह्यामधील ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट आहेत यामध्ये बुलढाणा विधानसभा मतदारसंघ, चिखली विधानसभा मतदारसंघ, सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघ, मेहकर विधानसभा मतदारसंघ, खामगांव विधानसभा मतदारसंघ, जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघ यांचा समावेश होतो. 
कोण आहेत बळीराम सिरस्कार
* भारिप-बहुजन महासंघाचे विधानसभेतील एकमेव आमदार
* अकोला जिल्ह्यातील बाळापूर मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा आमदार
* पक्षाच्या कोअर समितीचे सदस्य.
* भारिप-बहुजन महासंघाचा माळी समाजाचा चेहरा
* अकोला जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष


POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे

=============0===========0==========0==========
पुस्तक घर पोहोच मिळावा
* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये
Click here Pay Now- 
https://imojo.in/prabindia

=============0===========0==========0==========








No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.