Saturday, 1 December 2018

विधान परिषदेच्या उपसभापतिपदाची निवडणूक लांबणीवर;शिवसेनेचे उपसभापतिपद हुकले;भाजपची खेळी!

विधान परिषदेच्या उपसभापतिपदाची निवडणूक लांबणीवर 


विधानसभेचे उपाध्यक्षपद देण्यात आले असले तरी विधान परिषदेचे उपसभापतिपद शिवसेनेला लगेचच देण्याबाबत भाजपचे नेते आग्रही नव्हते. यातूनच निवडणूक लांबणीवर पडल्याची चर्चा असून शिवसेनेचे उपसभापतिपद तूर्तास हुकले आहे यामागे भाजपची खेळी आहे अशी शक्यता वर्तवली जात आहे.  विधानसभेच्या उपाध्यक्षपदासह विधान परिषदेच्या उपसभापतिपदाची निवडणूक घेण्याची सत्ताधाऱ्यांची योजना होती. शिवसेनेला उपसभापतिपद देण्याची भाजपने तयारीही दर्शविली होती, पण  शेवटच्या दिवशी निवडणुकीचा कार्यक्रमच पुकारला गेला नाही. राष्ट्रवादीचा विरोध की भाजपची खेळी यामुळे शिवसेनेचे उपसभापतिपद हुकल्याचीच चर्चा होती. विधानसभेच्या उपाध्यक्षपदी शिवसेनेचेच विजय औटी यांची बिनविरोध निवड झाली. विधान परिषदेत सत्ताधारी अणि विरोधकांमध्ये फार अंतर नाही. उपसभापतिपदासाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करावा, असा शिवसेनेचा आग्रह होता. शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना नेत्यांनी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्याशी चर्चाही केली. उपसभापतिपदाच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा व्हावा म्हणून मुख्यमंत्री फडणवीस, राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पातळीवर परस्परांशी संपर्कही साधण्यात आला होता. पण उपसभापतिपदाची निवडणूक झालीच नाही. सभापतींनी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला नाही, असे शिवसेनेचे अनिल परब यांचे म्हणणे आहे. विधानसभेचे उपाध्यक्षपद देण्यात आले असले तरी विधान परिषदेचे उपसभापतिपद शिवसेनेला लगेचच देण्याबाबत भाजपचे नेते आग्रही नव्हते. यातूनच निवडणूक लांबणीवर पडल्याची चर्चा आहे. २०१४ साली भाजप-शिवसेनेचे सरकार सत्तेत आल्यापासून विधानसभेचे उपाध्यक्षपद रिक्त होते. अखेर चार वर्षांनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे पद शिवसेनेला दिले आहे. शिवसेनेनेही हे पद स्वीकारल्याने शिवसेना व भाजप यांच्यातील युतीची शक्यता अधिक दाट झाल्याचे बोलले जात आहे.

विधानसभेच्या उपाध्यक्षपदी शिवसेनेच्या विजय औटी बिनविरोध

अहमदनगरमधील पारनेरचे शिवसेनेचे आमदार विजय औटी यांची विधानसभेच्या उपाध्यक्षपदी  बिनविरोध निवड झाली. या निवडीनंतर औटी यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आभार मानले. तसेच बिनविरोध निवड झाल्याने सभागृहातील सर्व सदस्यांचे व विरोधकांचेही आभार मानले. विजय औटी हे सलग तीन वेळा पारनेरमधून विधानसभेवर निवडून गेले आहेत. विजय औटी यांच्यासह काँग्रेसच्या हर्षवर्धन सपकाळ आणि अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी विधानसभा उपाध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केले होते. मात्र, शुक्रवारी सकाळी ११ वाजता या दोघांना सत्ताधारी भाजप-शिवसेनेच्या नेत्यांनी अर्ज मागे घेण्याची विनंती केली. संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट आणि गिरीश महाजन आणि एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांसह आमदार सपकाळ व कडू यांना अर्ज घेण्याची विनंती केली. यानंतर सपकाळ व कडू यांनी अर्ज मागे घेतले. यानंतर दुपारी १२ वाजता विधानसभेचे अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी औटी यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली. आमदार औटी हे २००४ पासून सलग तीन वेळा पारनेरमधून शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आले आहेत. त्याआधी २००२ साली जिल्हा परिषदेवर निवडून गेले होते. त्यांचे वडिल भास्करराव औटीही हे सुद्धा आमदार राहिले होते. तसेच समाजवादी- डाव्या चळवळीतील विचारवंत व नेते म्हणून परिचित होते.२०१४ साली भाजप-शिवसेनेचे सरकार सत्तेत आल्यापासून विधानसभेचे उपाध्यक्षपद रिक्त होते.


POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे


====================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा

* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

CLICK HERE PAY NOW- 


=====================================================================

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.