कर्जत, मलकापूर, श्रीगोंदा, आरमोरी, महादुला या पाच नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी 27 जानेवारीला मतदान
कर्जत, मलकापूर, श्रीगोंदा, आरमोरी, महादुला नगरपरिषदासाठी निवडणूक जाहीर
आळंदी नगरपरिषद एका जागेसाठी पोट निवडणूक
कर्जत (जि. रायगड), मलकापूर (जि. सातारा), श्रीगोंदा (जि. अहमदनगर), आरमोरी (जि. गडचिरोली) या नगरपरिषदा व महादुला (जि. नागपूर) नगरपंचायतीच्या सार्वत्रिक; तसेच विविध नगरपरिषदा व नगरपंचायतींमधील 11 रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी 27 जानेवारी 2019 रोजी मतदान होणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे दिली. 2 ते 9 जानेवारी 2019 या कालावधीत नामनिर्देनपत्र स्वीकारली जातील. नामनिर्देनपत्रांची 10 जानेवारी 2019 रोजी छाननी होईल. मतदान 27 जानेवारी 2019 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 यावेळेत होईल. मतमोजणी 28 जानेवारी 2019 रोजी सकाळी 10 वाजता सुरू होईल. पोटनिवडणूक होत असलेली नगरपरिषद/ नगरपंचायतनिहाय जागा अशी: राजापूर (जि.रत्नागिरी)- 6अ, आळंदी (पुणे)- 9अ, फलटण (सातारा)- 12अ, दुधनी (सोलापूर)- 2ब, पन्हाळा (कोल्हापूर)- 8क, दिंडोरी (नाशिक)- 15, यावल (जळगाव)- 1अ, बीड- 11अ, बुलढाणा- 12ब, अर्जुनी (गोंदिया)- 14, गोरेगाव (गोंदिया)- 14.
प्रभाग क्रमांक नऊची पोटनिवडणूक
आळंदी नगरपरिषेदच्या प्रभाग क्रमांक नऊच्या अ-अनुसुचित जाती प्रवर्गाकरीता राखीव जागेसाठी पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असल्याचे मुख्याधिकारी समीर भूमकर यांनी सांगितले. नगरसेवक बालाजी कांबळे यांच्या हत्येनंतर ही जागा रिक्त झाली होती. कांबळे यांच्या जागी त्यांच्यात घरातील सदस्य उभा राहणार की? इतर कोण? याबाबतची चर्चा गेली चार महिन्यांपासून सुरू आहे. या पोटनिवडणुकीरीता सोमवार (दि. 31)ची मतदार यादी ग्राह्य धरण्यात येणार असून, बुधवारी (दि. 19) प्रभागनिय प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. प्रभागनिय मतदान अंतिम यादी शनिवारी (दि. 29) प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे
=============0===========0=========पुस्तक घर पोहोच मिळावा* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्येClick here Pay Now- https://imojo.in/prabindia
=============0===========0=========
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.