Monday, 10 December 2018

नगरपरिषद, नगरपंचायत निवडणूक निकाल 2018 ; भाजपचे वर्चस्व

नगरपरिषद व नगपपंचायत निवडणूक निकाल


====================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा

* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

CLICK HERE PAY NOW- 


=====================================================================

नगरपालिका निवडणूकीत भाजपचे वर्चस्व


राज्यातील ६  विविध नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणूकीत भाजपने सर्वाधिक ३७ जागा जिंकत बाजी मारली आहे . एकूण ३ ठिकाणी भाजपचे नगराध्यक्ष विजयी झाले आहे.यवतमाळ जिल्ह्यातील निर नबाबपूर नगरपालिकेत शिवसेनेचा तर चंद्रपूर मधिल ब्रम्हपूरी नगरपालिकेत कॅांग्रेसचा नगराध्यक्ष विजयी झाला आहे. राज्यातील विविध ६ ठिकाणच्या नगरपालिका, नगरपंचायतीच्या निवडणूकीचा निकाल आज जाहीर झाला आहे.  एकूण १०९ जागांपैकी भाजप ३७, शिवसेना १४, कॅांग्रेस २७, राष्ट्रवादी ६, अपक्ष ७ तर आघाड्यांना १८ जागा मिळाल्या आहेत.तर सहा पैकी ३ ठिकाणी भाजपचा,शिवसेना,कॅांग्रेस, आघाडीला प्रत्येकी १ नगराध्यक्षपद मिळविता आले आहे.जळगाव जिल्ह्यातील शेंदूर्णी नगरपालिकेच्या एकूण १७ जागांपैकी भाजप १३, राष्ट्रवादी ३, कॅांग्रेसला एक जागा मिळाली आहे.या ठिकाणी भाजपचा नगराध्यक्ष विजयी झाला आहे.नांदेड जिल्ह्यातील लोहा  नगरपालिकेच्या एकूण १७ जागांपैकी भाजपने १३ तर ४ जागा कॅांग्रेसने जिंकल्या आहेत. या ठिकाणी भाजपने नगराध्यक्षपदावर बाजी मारली आहे.यवतमाळ जिल्ह्यातील निर नबाबपूर नगरपालिकेच्या एकूण १८ जागांपैकी शिवसेनेला ९, कॅांग्रेसला ४, राष्ट्रवादीला ३ तर अपक्षांनी २ जागा जिंकल्या आहेत.या नगरपालिकेत नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या उमेदवाराने बाजी मारली आहे.वाशिम जिल्ह्यातील रिसोड नगरपालिकेच्या एकूण २० जागांपैकी वाशिम जिल्हा विकास आघाडीला ११ जागा, कॅांग्रेस शिवसेना आणि प्रत्येकी ३ जागा जिंकता आल्या. या ठिकाणीचे नगराध्यक्षपद वाशिम जिल्हा विकास आघाडीला मिळाले आहे.नागपूर मधिल मौदा नगरपालिकेत एकूण १७ जागांपैकी भाजप ८, कॅांग्रेस ५, शिवसेना आणि अपक्षांना प्रत्येकी २ जागा मिळाल्या आहेत. मौद्याचे नगराध्यक्षपदी भाजपचा उमेदवार विजयी झाला आहे.सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या आणि भाजपचा बालेकिल्ला असलेल्या ब्रम्हपूरी नगरपालिकेत कॅांग्रेसने १० जागा जिंकत बाजी मारली आहे. तर या ठिकाणी भाजपला केवळ ३ जागांवर समाधान मानावे लागले आहे. स्थानिक आघाडीला ७ जागेवर विजय प्राप्त करता आला असून येथिल नगराध्यक्षपदी कॅांग्रेसचा उमेदवार विजयी झाला आहे.


====================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा

* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

CLICK HERE PAY NOW- 


=====================================================================

लोहा नगरपरिषद (नांदेड)

एकूण जागा -17
भाजप - 13
काँग्रेस - 04
नगराध्यपद भाजपचे गजानन सूर्यवंशी विजयी, काँग्रेसचे सोनू संगेवार हे पराभूत


ब्रम्हपुरी नगरपरिषद (चंद्रपूर)

एकूण जागा - 20
काँग्रेस - 12
भाजप - 03
अपक्ष - 5
नगराध्यपद निवडणुकीत कांग्रेसच्या रीता उराडे 1600 मतांनी विजयी


वाशिम (रिसोड नगरपरिषद ) 

एकूण जागा - 20
काँग्रेस - 03
जनविकास आघाडी - 09
शिवसेना -भाजपा - 03
भारिप - 02
अपक्ष - 03
नगराध्यक्ष - विजयमाला  कृष्णा आसनकर (जनविकास आघाडी )  विजयी



====================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा

* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

CLICK HERE PAY NOW- 



=====================================================================

शेंदुर्णी नगरपंचायतीवर भाजपचा झेंडा 

जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्‍यातील शेंदुर्णी नगरपरिषदेच्या पहिल्याच निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने यश मिळविले आहे. नगराध्यक्षपदीही भाजपच्या उमेदवार विजया खलसे विजयी झाल्या आहेत. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आघाडीचा दारूण पराभव झाला आहे.भारतीय जनता पक्षाचे नेते व राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेर मतदार संघातील शेंदुर्णी नगरपंचायत स्थापन झाल्यानंतर ही पहिलीच निवडणूक होती. एकूण 17 जागा व नगराध्यक्षपदासाठी काल (ता.10)मतदान झाले. आज झालेल्या मतमोजणीत 17 जागापैकी 14 जागा जिंकूण भाजपने सत्तेसाठी बहुमत मिळविले आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसला दोन तर कॉंग्रेसला केवळ एक जागा मिळाली आहे. दोन्ही पक्षांनी आघाडी करूनही त्यांना मोठा पराभव पत्करावा लागला. नगराध्यक्षपदाच्या निवडणूकीत भारतीय जनता पक्षाच्या विजया अमृत खलसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आघाडीच्या उमेदवार क्षितीजा गरूड यांचा 2292 मतांनी पराभव केला आहे. 


लोहा नगरपरिषदेवर भाजपची सत्ता


लोहा नगरपरिषदेच्या 17 जागांपैकी 13 जागांवर भाजपने सत्ता स्थापन केली आहे तर फक्त 4 जागांवर काँग्रेसने विजय मिळवला आहे. नगरपरिषदेच्या अध्यक्षपदी भाजपचे गजानन सूर्यवंशी विजयी झाले आहेत तर काँग्रेसचे सोनू संगेवार हे पराभूत झाले आहेत. 


27 वर्षांनी काँग्रेसची सत्ता


चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी नगराध्यक्षपदी काँग्रेसच्या रिता उराडे 3600 मतांनी विजयी झाल्या. या नगरपरिषदेवर गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय जनता पार्टीचे वर्चस्व होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रभाव असलेला हा चंद्रपूर जिल्ह्यातील भाग आहे. त्यामुळे या नगरपरिषदेवर सातत्याने भाजपचा ताबा राहिला होता. ब्रम्हपुरीमध्ये तब्बल 27 वर्षांनी काँग्रेसचा नगराध्यक्ष निवडून आलेला आहे. रिता उराडे यांनी भाजपच्या यास्मिन लखानी यांचा पराभव केला. ब्रम्हपुरी नगरपरिषदेच्या 20 सदस्यीय सभागृहात काँग्रेसचे 12 नगरसेवकही निवडून आले आहेत. भाजपचे 3 नगरसेवक निवडून आले तर इतरांनी 5 जागा पटकाविल्या आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेसचे विजय वडेट्टीवार एकमेव आमदार आहेत. चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या वर्चस्वालाही एकप्रकारे धक्का बसल्याचे बोलले जात आहे. 



POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे





====================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा

* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

CLICK HERE PAY NOW- 


=====================================================================





No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.