Sunday, 16 December 2018

पाडापाडीमुळेच आमची माती झाली- माजी उपमुख्यमंत्री अजित पवार

भावी मुख्यमंत्री म्हटल्याने पाडापाडी होऊ शकते- आ.अजित पवार यांना भीती

"ह्याला गाढ त्याला गाढ" मुळेच झालेल्या नुकसानीची उपरती!


पाडापाडीमुळेच आमची माती झाली अशी कबुली माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देऊन मला भावी मुख्यमंत्री म्हटल्याने पाडापाडी होऊ शकते अशी भीती व्यक्त केली आहे. बारामती तालुक्यातल्या पणदरे येथील उत्कर्ष लॉन्सचं भूमीपूजन अजित पवार यांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत होते.  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्या स्पष्ट वक्तेपणासाठी प्रसिद्ध आहेत. कार्यकर्त्यांनी आपल्याला भावी मुख्यमंत्री किंवा शरद पवार यांचा भावी पंतप्रधान म्हणून उल्लेख करु नये असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून केले. आधी राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडीचे बहुमत कसे मिळेल याकडे लक्ष दिले पाहिजे. पदांच्या उल्लेखामुळेच पाडापाडीचे राजकारण होते आणि या पाडापाडीमुळेच आमची माती झाली आहे, असे ते म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. एका स्थानिक नेत्याने आपल्या भाषणात अजित पवार यांचा उल्लेख भावी मुख्यमंत्री म्हणून केला होता. तोच धागा पकडून अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना असा उल्लेख न करण्याची विनंती केली. भावी मुख्यमंत्री म्हटल्याने कोणाच्या भावना दुखावल्या जातात किंवा कोणाला पसंत पडत नाही. त्यातून पाडापाडी होऊ शकते. त्यामुळं यापुढं असं काहीही म्हणू नका आणि आघाडीला बहुमत कसं मिळवता येईल याकडे सर्वांनी लक्ष द्यावं, असे ते म्हणाले. वृत्तवाहिन्यांच्या कॅमेऱ्याकडे पाहत ते म्हणाले, अजित पवार काय बोलतात यावरच लक्ष असतं यांचं..अटेंशन.. ब्रेकिंग न्यूज.. असं त्यांनी म्हणताच उपस्थितांनी त्यांना हसून दाद दिली. यावेळी त्यांनी माजी खासदार निवेदिता माने यांच्या शिवसेना प्रवेशाबाबत भाष्य केले. कोणी काय करावं हा ज्याचा-त्याचा प्रश्न असल्याचे ते म्हणाले. यावेळी त्यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केली. जनतेच्या महत्त्वाच्या प्रश्नांवर सरकार थातूर मातूर उत्तरं देत आहे. पाच राज्यातील निवडणूक निकालात भाजपाची पिछेहाट झालीय. त्यामुळे कर्जमाफी देऊन गमावलेला जनाधार मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न भाजपाकडून सुरु असल्याचीही टीका त्यांनी केली.


POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे

=============0===========0==========0==========
पुस्तक घर पोहोच मिळावा
* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये
Click here Pay Now- 
https://imojo.in/prabindia








No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.