मराठा आरक्षणाविरोधात याचिका दाखल करणाऱ्या सदावर्तेंना कोर्टाबाहेर मारहाण
मुंबई हायकोर्टात आज मराठा समाज आरक्षण प्रकरणी दाखल झालेल्या याचिकेवर सुनावणी झाली. सुनावणी झाल्यानंतर याचिकाकर्ते वकिल गुणवर्ते सदावर्ते यांना मारहाण कऱण्यात आली. एक मराठा लाख मराठा घोषणा देत सदावर्ते यांना मारहाण करण्यात आली.सुनावणी झाल्यानंतर सदावर्ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. त्यावेळी अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत एक तरुणाने सदावर्ते यांच्यावर हल्ला केला आणि बेदम मारहाण केली. दरम्यान, तर सरकारनं आरक्षणासह जाहिराती देण्याची घाई केली, असं म्हणत या सुनावणीदरम्यान कोर्टानं सरकारला फटकारलं. राज्य सरकारनं विधेयक आणून शिक्षणामध्ये आणि नोकऱ्यांमध्ये मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण दिलंय. याबाबत सुनावणी आज होणार आहे. राज्य सरकारनं या संदर्भात संमत केलेल्या कायद्याविरोधात जयश्री पाटील यांनी याचिका दाखल केली आहे. या याचिकेसोबतच २०१४ साली त्यावेळच्या कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकांवरदेखील आज एकत्रितपणे सुनावणी होणार आहे. कोर्टात काय होते हे पाहून एमपीएससीने जाहिरात द्यायला हवी होती, असं कोर्टाने सरकारला सुनावले. या परीक्षेसाठी अनेक होतकरु व्यक्ती अर्ज करत असतात. त्याच वेळी बेरोजगारी मोठ्या प्रमाणात आहे, या दोन्हीचं आपण संतुलन ठेवलं पाहिजे, भान ठेवलं पाहिजे, असे सांगुन कोर्टात सुनावणी सुरु असताना एमपीएससी जाहिराताची घाई का ? असा सवाल हायकोर्टानं राज्य सरकारला विचारला. दरम्यान, कोर्टाने सांगितल्यास आम्ही मागासवर्ग आयोगाचा अहवाल जाहीर करण्याचा विचार करू पण तसं आम्ही आत्ताच अाश्वासन देऊ शकत नाही, असं स्पष्टीकरण राज्य सरकारनं दिलं आहे. गेल्या सुनावणी वेळी हायकोर्टानं आरक्षणाला अंतरिम स्थगिती देण्यास नकार दिला होता. मराठा समाजाला देण्यात आलेलं आरक्षण घटनात्मकदृष्ट्या योग्य नसून ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण देता येत नाही असा कायद्याला विरोध करणा-यांचा आक्षेप आहे. जयश्री पाटील यांच्या याचिकेवर काँग्रेस आमदार नितेश राणे यांनीदेखीस हस्तक्षेप याचिका दाखल केली आहे.मराठा आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करणारे अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना सोमवारी दुपारी दीडच्या सुमारास अज्ञातांनी मारहाण केली. मुंबई हायकोर्टाच्या बाहेर सदावर्ते यांना ही मारहाण झाली. मराठा आरक्षणाबाबत सोमवारी मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली. त्यासाठी सदावर्ते हे हायकोर्टात आले होते. सकाळी 12 वाजता सुनावणी झाल्यानंतर सदावर्ते दुपारी दीडच्या सुमारास बाहेर येत होते. सदावर्ते यांनी माध्यमांशी संवाद साधल्यानंतर ते आपल्या वकिल सहका-यांसह चालले असताना जालना जिल्ह्यातील वैजनाथ पाटील या तरूणाने सदावर्ते यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी सहकारी वकिलांनी पाटील याला ताब्यात घेत चोप दिला व पोलिसांच्या ताब्यात दिले. मारहाण करताना वैद्यनाथ पाटील याने ‘एक मराठा लाख मराठा’ अशा घोषणा दिल्या. मराठा आरक्षण न्यायप्रविष्ठ आहे. त्यामुळे सर्वसामान्य उमेदवारांचा अपेक्षाभंग होऊ देऊ नका. त्यामुळे नियोजित मेगा नोकरभरतीबाबत राज्य सरकारने पुन्हा विचार करावा, अशी सूचना मुंबई हायकोर्टाने फडणवीस सरकारला दिली आहे. मराठा आरक्षणाला आव्हान देणा-या याचिकेवर सोमवारी (ता. 10) मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली. मराठा आरक्षण 1 डिसेंबर रोजी लागू झाल्यानंतर 3 डिसेंबर रोजी अॅड. गुणरत्न सदावर्ते आणि जयश्री पाटील यांनी आरक्षणाच्या विरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. त्यानंतर 5 डिसेंबर रोजी मुंबई हायकोर्टाने सुनावणी घेत मराठा आरक्षणाला तातडीने स्थगिती देण्यास नकार दिला होता. मात्र, हायकोर्टाने 10 डिसेंबर रोजी यावर सुनावणी घेतली जाईल असे सांगितले होते. या सुनावणी घेताना आताची याचिका व 2014 च्या याचिकेवर एकत्रित सुनावणी घेतली जाईल असे कोर्टाने म्हटले होते. त्यानुसार आज मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली. त्यावेळी कोर्टाने राज्य सरकारला ही सूचना केली.
POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे
====================================================================
पुस्तक घर पोहोच मिळावा
* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये
CLICK HERE PAY NOW-
=====================================================================
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.