धुळे महापालिकेत भाजपाचा महापौर, काँग्रेस राष्ट्रवादीच्या उमेदवाराची माघार
धुळे महापालिकेत भाजपाची एकहाती सत्ता आली असून महापौरपदी चंद्रकांत सोनार यांची निवड झाली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवार मंगला अर्जुन यांनी महापौरपदाच्या निवडणुकीतून माघार घेतल्याने चंद्रकांत सोनार यांची बिनविरोध निवड झाली. महापौर, उपमहापौर निवडणुकीत आघाडीच्या उमेदवारांनी माघार घेतल्याने भाजपाचे महापौर, उपमहापौर निवडून आले आहेत.भाजपा आणि बंडखोर आमदार अनिल गोटे यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे प्रतिष्ठेच्या ठरलेल्या येथील महापालिका निवडणुकीत तीनवरून ५० जागांपर्यंत मुसंडी मारत भाजपाने आपले वर्चस्व प्रस्थापित केले. नाशिक, जळगाव या महापालिका ताब्यात घेणारे निवडणूक प्रभारी तथा जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी या निवडणुकीतही पर्यटनमंत्री जयकुमार रावल आणि संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्या जोडीने सर्व विरोधकांना चारीमुंडय़ा चीत केले. यानिमित्ताने महापालिका निवडणूक जिंकण्याचा ‘महाजन पॅटर्न’ पुन्हा यशस्वी झाला. धुळे महापालिका निवडणुकीत भाजपाने 50, काँग्रेसने सहा, राष्ट्रवादीने आठ आणि एमआयएमने चार जागा जिंकल्या. शिवसेना आणि समाजवादी पक्षाला प्रत्येकी दोन जागांवरच समाधान मानावं लागलं. लोकसंग्राम आणि बसपा प्रत्येकी एक जागा जिंकण्यात यशस्वी राहिले. दोन जागांवर अपक्ष उमेदवारांचा विजय झाला.
महापालिकेतील संख्याबळ
भाजप ५०काँग्रेस ६
शिवसेना १
राष्ट्रवादी ८
लोकसंग्राम १
एमआयएम ४
समाजवादी पक्ष २
बसप १
अपक्ष १
एकूण जागा – ७४
POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे
=============0===========0==========0==========
पुस्तक घर पोहोच मिळावा
https://imojo.in/prabindia
* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्येClick here Pay Now-
https://imojo.in/prabindia
=============0===========0==========0==========
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.