Thursday 27 December 2018

अहमदनगर जिल्ह्यातील राजकारणातील घराणेशाही; राजकीय पक्ष नेतृत्वांची घराणेशाहीकडून दिशाभूल!

घराणेशाहीतील पक्षांतर आणि नाते-गोत्यांचे राजकारण







राजकीय पक्ष नेतृत्वांची घराणेशाहीकडून दिशाभूल करण्यात अहमदनगर जिल्हा अग्रेसर मानला जातो कारण या जिल्ह्यात सर्वाधिक घराणेशाही व नात्यागोत्यात राजकारण खिळवून ठेवलेले पहावयास मिळत आहे. एकमेकांविरुद्ध छाट-छुट आरोप-प्रत्यारोप करून राजकीय पक्ष नेतृत्वांना व जनतेला प्रभावित करणे आणि सर्वच प्रमुख राजकीय पक्षांची उमेदवारी प्राप्त करून घेणे. आपापसातील लढत ही जनता व  राजकीय पक्षांसाठी खरी दर्शवली जाते यामधूनच राजकारणात यश मिळून कायम वर्चस्व राखण्यास मदत होते. या संकल्पनेचा कौशल्याने वापर केला जातो. गेल्या अनेक निवडणुकांमध्ये अशा लढती पहावयास मिळाल्या आहेत. प्रत्येक निवडणुकीत वेगवेगळा नात्यागोत्यातील उमेदवार निर्माण करून सहज यश मिळवणे. त्यातूनच राजकारणात आपली पक्कड मजबूत ठेवणे अशी जिल्ह्यातील घराणेशाहीची ख्याती आहे. विधानसभा विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे यांचे चिरंजीव डॉ. सुजय विखे यांचे साडू शेळके यांनी गेल्या वेळी खुद्द विखे-पाटील यांच्यात लढत ठरवून केली होती अशी चर्चा त्यावेळी केली गेली. आता आईवडील एखाद्या राजकीय पक्षात असतील तर मुलाने त्याच पक्षात राहिले पाहिजे असे थोडे असते असा विचार व्यक्त करून डॉ. सुजय विखे यांनी खासदारकी मिळविण्यासाठी काँग्रेस पक्षाचा त्याग करण्याचा निर्धार व्यक्त केला. काँग्रेस नसेल तर भाजप अथवा सेना अनेक पर्याय त्यांनी सत्तेसाठी खुले ठेवले आहेत. स्वतंत्र व्यक्तिमत्त्व असल्याने आपण दुसऱ्या पक्षात जाऊ शकतो, असे त्यांनी म्हंटले आहे. याला भरपूर प्रसिद्धी देखील माध्यमातून दिली गेली. प्रश्न असा आहे की या मतदारसंघात इतर सक्षम उमेदवार नाहीच काय? केवळ डॉ. सुजय विखे आहेत असा समज जनतेवर बिंबवण्याचा प्रयत्न केला जात आहे. नगर लोकसभा मतदारसंघातून खासदार होण्यासाठी डॉ. सुजय विखे हे आधीपासून तयारी करत आहेत. हा मतदारसंघ आघाडीच्या वाटपात राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. तो काँग्रेसकडे यावा यासाठी विखे यांनी जोरदार प्रयत्न केले. मात्र ते शक्य झाल्याचेडॉ. सुजय विखे यांच्या वक्तव्यावरून दिसून येत आहे. ते राष्ट्रवादीत जाण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळेच ते भाजपचा मार्ग धरण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. ते भाजपमध्ये आले तर विद्यमान खासदार दिलीप गांधी यांना उमेदवारी डावलली जाऊ शकते. मात्र पक्ष नेतृत्वांची घराणेशाहीकडून दिशाभूल होत आहे अशी देखील चर्चा आहे. डॉ. सुजय विखे पाटील यांचे आजोबा ८ वेळा खासदार झाले, वडील आमदार मंत्री झाले आता विरोधी पक्षनेते आहेत. मातोश्री जिल्हा परिषदेच्या दुसऱ्यांदा अध्यक्षा आहेत. स्वतः डॉ. सुजय हे पद्मश्री विखे-पाटील कारखान्याचे अध्यक्ष आहेत. दरम्यान सुजय, काँग्रेस पक्ष सोडून इतर कोणत्याही पक्षात जाणार नाही. देशाला काँग्रेस विचारांचीच गरज असून, हाच विचार तो पुढे घेऊन जाईल याबाबत माझ्या मनात कोणतीही शंका नाही, असे मत राज्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे- पाटील यांनी मांडले. आई- वडिल काँग्रेस पक्षात असले तरी मला कोणत्या पक्षात काम करायचे आणि कोणाचे नेतृत्व स्वीकारायचे याचे व्यक्तिस्वातंत्र आहे, असे वक्तव्य विखेंचे चिरंजीव डॉ. सुजय यांनी दोन दिवसापूर्वी नगरमध्ये केले होते. त्यावर विखें यांनी अखेर मौन सोडले. डॉ. सुजय हे दक्षिण अहमदनगरमधून लोकसभेची तीव्र इच्छुक आहेत. मात्र, ही जागा आघाडीच्या जागावाटप सूत्रानुसार राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. सुजय यांच्यासाठी ही जागा काँग्रेसने राष्ट्रवादीकडे मागितली आहे पण या बदल्यात राष्ट्रवादीने पुण्याची जागा सोडण्याचा आग्रह धरला आहे. सध्या या दोन्ही जागांसह राज्यातील 8 लोकसभा मतदारसंघाची अदला- बदलीबाबत आघाडीच्या नेत्यांत चर्चा सुरू आहे. मात्र, सुजय यांनी कोणत्याही परिस्थितीत लोकसभा निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे सुजय एक तर अपक्ष निवडणूक लढवतील किंवा भाजपच्या तिकीटावर अशी चर्चा मागील काही महिन्यांपासून सातत्याने होत आहे. या पार्श्वभूमीवर सुजय यांनी केलेल्या वक्तव्यामुळे अनेकांच्या भवया उंचावल्या होत्या. मात्र, विखें यांनी यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे

=============0===========0==========0==========
पुस्तक घर पोहोच मिळावा
* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये
Click here Pay Now- 
https://imojo.in/prabindia

=============0===========0==========0==========

अहमदनगर जिल्ह्यातील राजकारणातील घराणेशाही आणि नातेसंबंध

अहमदनगर शहर आणि जिल्ह्याचे राजकारण घराणेशाहीमधील नातेसंबंधांतील केंद्रस्थानी आहे. घराणेशाहीमध्ये बंदिस्त झालेल्या या राजकारणात अन्य घराणेबाह्य कार्यकर्त्याला अजिबात स्थान नाही. कितीही निष्ठावंत असला तरीही त्याने केवळ हुजरेगीरी करायची आणि छोट्या पदावर समाधानी राहायचे, अथवा कामाचा मोबदला म्हणून ठेकेदारीचे काम देऊन गुलामगिरीत ठेवायचे. घराण्यांचे हितसंबंध अडचणीत येऊ लागले की टोळी युध्द भडकते. सामान्य कार्यकर्त्याचा बळी दिला की राजकारण सोयीचे होते असा क्रम आहे. राजकारणातील सर्वच घराण्यांच्या टोळ्या शहरात सक्रीय आहेत. हितसंबंध जोपासण्यासाठी घराणेशाहीतील कर्तबगार मंडळी अशा टोळ्यांचे म्होरके आहेत. सर्वच राजकीय पक्षांमध्ये या घराणेशाहीतील मंडळीनी आपली पकड मजबूत ठेवली आहे. पक्षीय मर्यादा ओलांडून सुरू असलेली घराणेशाही राजकीय गुन्हेगारी पोसत असल्याचा निष्कर्ष देखील काढला जात आहे. अहमदगनर जिल्ह्यातील विखे आणि थोरात हे राज्याच्या राजकारणातील महत्त्वाकांक्षी घराणी आहेत. शहरामध्ये कोतकर-जगताप-कर्डिले हे नात्यात आहेत. ग्रामीण भागात थोरात-राख-राजळे आणि घुले-तनपुरे-काळे हे नात्यात आहे. यातील काही घराणी एकाच पक्षात तर काही वेगवेगळ्या पक्षात आहेत. राजकारणात सत्ता अबाधीत राखण्याकरीता बेटीव्यवहार करणे आणि घराण्यांचे संबध जोडले जाणे हे ऐतिहासिक काळा पासून होत आले आहे. तसेच ते महाराष्ट्रातील राजकारणातही होत आले आहे. जयंत पाटील यांची बहीण - माजी आमदार अहमदनगर जिल्ह्यातील प्रसाद तनपुरे यांची पत्नी आहे (मेहुणे) आहेत. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि पाथर्डीचे माजी आमदार राजीव राजळे हे मामा-भाचे आहेत. राजळे यांची आई त्या थोरात यांची बहीण आहे. तर राजीव राजळे यांची बहीण ही यशवंतराव गडाखांची सून आणि नेवासे येथील राष्ट्रवादीचे शंकरराव गडाख यांची पत्नी आहेत. आमदार डॉ. सुधीर तांबे हे थोरातांचे मेव्हणे व राजळेंचे मावसे आहेत. नाशिकचे राष्ट्रवादीचे नेते स्व. डॉ. वसंत पवार हे अहमदनगर जिल्ह्यातील माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांचे जावई आहेत. अहमदनगर जिल्ह्यात आबासाहेब निंबाळकर हे माजी मंत्री काँग्रेसचे नेते होते. त्याची नात ही खासदार निलेश राणे यांची पत्नी आहेत. कर्जत जामखेडचे काँगेसचे बापूसाहेब देशमुख व नारायण राणे हे दोघे व्याही आहेत. याबरोबरच राष्ट्रवादीचे नेते अजितदादा यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांचे सगेसोयरे अहमदनगर जिल्ह्यात आहेत. 

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे

=============0===========0==========0==========
पुस्तक घर पोहोच मिळावा
* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये
Click here Pay Now- 
https://imojo.in/prabindia

=============0===========0==========0==========

आगामी निवडणुकांसाठी अनेक महीला उमेदवार विविध राजकीय पक्षांकडून इच्छुक 

अहमदनगर जिल्ह्यातून यापूर्वी काही महिलांनी निवडणूक लढवली मात्र त्यांना यश मिळत नव्हते. २०१४ च्या निवडणुकीत विधानसभेवर २ महिलांनी यश मिळवले यामुळे आता जिल्ह्यातील राजकारणात महिलांचाही सहभाग वाढत असला तरी घराणेशाहीपुरता मर्यादितच आहे. आगामी निवडणुकांसाठी अनेक महीला उमेदवार विविध राजकीय पक्षांकडून इच्छुक आहेत. आमदार मोनिका राजळे यांना वडील माजी मंत्री अशोक डोणगावकर यांच्या रूपाने माहेरचा वारसा, तर सासरी माजी आमदार आप्पासाहेब राजळे यांच्या माध्यमातून राजकीय वारसा मिळाला आहे. श्रीगोंद्यातून अनुराधा नागवडे इच्छुक आहेत. तर दक्षिणेतील कर्जत-जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा मंजूषा गुंड व जिल्हा बॅंकेच्या विद्यमान संचालिका मीनाक्षी साळुंके या पदाधिकारी देखील आगामी काळात विधानसभा निवडणूक लढवू शकतात. तसेच नेवाशाच्या विद्यमान पंचायत समिती सभापती सुनीता गडाख या आप्पासाहेब राजळे यांच्या कन्या असून त्यांना माहेरचा, तर यशवंतराव गडाखांच्या सून व शंकरराव यांच्या पत्नी हा त्यांचा सासरकडील राजकीय वारसा आहे त्या देखील इच्छुक उमेदवार म्हणून मानल्या जातात. अकोला मतदारसंघातून सुनीता भांगरे सध्या भाजपच्या विधानसभेच्या उमेदवार म्हणून चर्चा आहे. दरम्यान चंद्रशेखर घुले यांच्या पत्नी व जिल्हा परिषदेच्या विद्यमान उपाध्यक्षा राजश्री घुले देखील  लोकसभा अथवा विधानसभा कोणत्याही निवडणुकीसाठी तयार आहेत. या बरोबरच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कार्यरत महीला देखील राजकीय महत्वकांक्षा बाळगून आहेत. राहाता नगराध्यक्षा ममता पिपाडा, श्रीरामपूरच्या नगराध्यक्ष अनुराधा आदिक, माजी नगराध्यक्षा उषाताई तनपुरे, शरयु देशमुख, जिल्हा बॅंकेच्या संचालिका चैताली काळे यांचा समावेश आहे. अहमदनगर जिल्हा परिषदेत माजी मंत्री बबनराव ढाकणे यांची स्नुषा प्रभावती ढाकणे आणि आमदार अरूण जगताप यांच्या स्नुषा सुवर्णा यांनी देखील यश मिळवलेले आहे. तसेच विधानसभेचे विरोधी पक्षनेते रामकृष्ण विखे पाटील यांच्या पत्नी शालिनी विखे पुन्हा जि.प.मध्ये अध्यक्ष पदावर कार्यरत आहेत.

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे

=============0===========0==========0==========
पुस्तक घर पोहोच मिळावा
* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये
Click here Pay Now- 
https://imojo.in/prabindia

=============0===========0==========0==========

स्थानिक स्वराज्य संस्थेतील नातेगोत्याचे राजकारण

भाजपचे खासदार दिलीप गांधी पुत्र सुवेंद्र गांधी, सुन दीप्ती गांधी, भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांची कन्या तथा राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांची पत्नी शीतल जगताप, कर्डिलेंची दुसरी कन्या ज्योती गाडे तसेच शिवसेनेच्या महापौर सुरेखा कदम, विरोधी पक्षनेते बाळासाहेब बोराटे यांनी नुकत्याच झालेला महापालिका निवडणुकीत आपले नशीब आजमावले. महापालिका निवडणुकीत प्रमुख लढतींमध्ये- माजी महापौर सुरेखा कदम विरुद्ध दीप्ती गांधी, विरोधी पक्षनेते बाळासाहेब बोराटे विरुद्ध संजय घुले, पुष्पा बोरुडे विरुद्ध सोनाली सुडके, श्रीपाद छिंदम विरुद्ध अनिता राठोड, सुरेश तिवारी, सभापती बाबासाहेब वाकळे विरुद्ध अर्जुन बोरुडे, सुवेंद्र गांधी विरुद्ध शेख नजीर अहमद, सभापती सारिका भुतकर विरुद्ध आरती बुगे,तसेच अनिल शिंदें विरुद्ध दत्ता गाडळकर, मनोज कोतकर विरुद्ध दिलीप सातपुते, शीतल जगताप विरुद्ध संगीता गांधी विरुद्ध सुरेखा भोसले, ज्योती गाडे विरुद्ध वंदना कुसळकर विरुद्ध कमल दरेकर यांच्यातील लढती लक्षवेधी ठरल्या होत्या.
===========0==========0============0=========
















POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे

=============0===========0==========0==========
पुस्तक घर पोहोच मिळावा
* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये
Click here Pay Now- 
https://imojo.in/prabindia

=============0===========0==========0==========




घराणेशाहीतील नाते संबंधित सोशल मिडियावरील व्हायरल होत असलेली पोस्ट खालीलप्रमाणे-



* महाराष्ट्रातील एकमेकाशी जोडली गेलेली राजकीय घराणी *
🔹शरद पवार – प्रा.एन.डी. पाटील.
🔹शंकरराव मोहिते-पाटील – बाळासाहेब देसाई.
🔹दिलीपराव देशमुख (विलासराव देशमुखांचे बंधू) – माजी राज्यमंत्री अजित घोरपडे
हे परस्परांचे साडू-बंधू
🔸अजित पवार यांची पत्नी – सुनेत्रा पवार या खासदार पद्मसिंह पाटील यांची धाकटी बहीण आहे.
🔸जयंत पाटील यांची बहीण – माजी आमदार अहमदनगर जिल्ह्यातील प्रसाद तनपुरे यांची पत्नी आहे. (मेहुणे)
जयंत पाटील – शिराळ्याचे सत्यजीत देशमुख (परस्परांचे साडू-बंधू).
🔸आमदार विलासराव शिंदे यांची बहीण – शिवाजीराव देशमुख (सभापती) यांची पत्नी आहे.
🔸आमदार शिवाजीराव नाईक (शिराळा) यांची पत्नी – सांगलीचे मंत्री मदन पाटील यांच्या मातोश्री ह्या सख्ख्या बहिणी आहेत.
🔸प्रमोद महाजन + गोपीनाथ मुंडे = मेहुणे.
(प्रमोद महाजनांची बहिण गोपीनाथ मुंडेंच्या सौ. आहे.)
🔸शरद पवार + बाळासाहेब ठाकरे = व्याही. (शरद पवारांची कन्या सुप्रिया सुळे ही बाळासाहेब ठाकरेंच्या सख्ख्या बहिणीची सूनबाई, भाचा सदानंद सुळे यांच्या सौभाग्यवती आहे.)
🔸सचिन पायलट + फारूक अब्दुल्ला = जावई.
(केंद्रीय मंत्री सचिन पायलट जम्मू काश्मिरचे फारूक अब्दुल्ला यांचे जावई).
🔸कलमाडी + निंबाळकर राजघराणे = व्याही.
(निंबाळकर घराण्याची मुलगी सुरेश कलमाडी यांच्या घराच्या सुनबाई).
🔸शरद पवार + सुशीलकुमार शिंदे = साडू-बंधू.
(शरद पवारांच्या सौ. प्रतिभा पवार आणि सुशीलकुमार शिंदे यांच्या सौ. उज्ज्वला शिंदे ह्या सख्ख्ख्या बहिणी).
🔸स्व. विलासराव देशमुख + डिसुझा + भागनानी + हुसैन = व्याही.
(विलासराव देशमुख यांच्या तीनही सुनबाई ३ वेगवेगळ्या धर्माच्या आहेत.
जेनेलिया डिसुझा क्रिस्तिअन, एक सुनबाई मुस्लिम कम हिंदू आणि एक सुनबाई हिंदू मारवाडी फिल्म डिरेक्टर वासू भागनानी यांची मुलगी).
🔸मोहिते-पाटील हे घराणे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठे घराणे समजले जाते.
विजयसिंह मोहिते-पाटलांची थोरली बहीण बाळासाहेब देसाईंच्या घरात दिल्याने शिवसेनेचे पाटणचे माजी आमदार शंभूराजे देसाई हे विजयसिंह यांचे भाचे आहेत.
विजयसिंह यांच्या मामांची मुलगी ही शंभूराजेंची पत्नी, तर मोहित्यांच्या मामांची दुसरी मुलगी ही विलासकाका पाटील-उंडाळकर यांची सून.
🔸विलासकाका पाटील हे फलटणचे माजी आमदार चिमणराव कदम यांचे सासरे.
(चिमणराव कदमांची मुलगी ही संभाजीराव काकडे यांची सून).
🔸पूर्वी पुणे जिल्ह्यात शरद पवार आणि संभाजीराव हे परस्परांचे मोठे विरोधक होते. त्या काकडेंचे भाऊ बाबालाल यांचीही मुलगी बाळासाहेब देसाई यांच्या घरात दिल्याने काकडे मोहिते यांचे नाते.
🔸शिवाय, विजयसिंहाची आत्या ती बाबालाल काकडे यांची पत्नी. इतकेच नव्हे तर विजयसिंहाची एक बहीण अॅड. विराज काकडे यांची पत्नी आहे.
🔸कोल्हापूरचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते दिग्विजय खानविलकर यांच्या मुलाला विजयसिंहांच्या भावाची मुलगी दिल्याने दोघेही सोयरे झाले…!
🔸दिग्विजय खानविलकरांची मुलगी कोल्हापूरच्या शाहूराजेंच्या घरात दिली असून काँगेसचे विद्यमान आमदार मालोजीराव यांची पत्नी.
🔸राष्ट्रवादी काँगेसचे नेते रामराजे नाईक-निंबाळकर यांची पत्नी आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची पत्नी या दोघी चुलत भगिनी.
🔸शरद पवार यांची एक मेहुणी ना.म.जोशींच्या घरात दिली असून त्याच घरात रामराजेंची बहीणही दिली आहे.
🔸पृथ्वीराज चव्हाणांची मावशी ही दादाराजे खडेर्कर यांची पत्नी. दादाराजे खडेर्कर यांची बहीण ही दिवंगत माजी मंत्री अभयसिंहराजे भोसले यांची पत्नी.
🔸दादाराजेंचे भाऊ बंटीराजे यांची मुलगी ही सातारचे शिवेंद्रराजे यांची पत्नी.
🔸कोल्हापूरचे सदाशिवराव मंडलिक याची बहीण चंदगडचे आमदार नरसिंग गुरुनाथ पाटील यांची पत्नी असल्याने दोघेही मेहुणे लागतात.
🔸कृषीमंत्री बाळासाहेब थोरात आणि काँग्रेसचे आमदार राजीव राजळे हे मामा-भाचे.
(राजळे यांची आई ती थोरातांची बहीण).
🔸राजीव राजळे यांची बहीण ही यशवंतराव गडाखांची सून आणि नेवासे येथील राष्ट्रवादीचे शंकरराव गडाख यांची पत्नी.
🔻नाशिकचे राष्ट्रवादीचे नेते स्व. डॉ. वसंत पवार हे अहमदनगर जिल्ह्यातील माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांचे जावई.
🔻अहमदनगर जिल्ह्यात आबासाहेब निंबाळकर हे माजी मंत्री काँग्रेसचे नेते होते. त्याची नात ही नारायण राणे पुत्र माजी खासदार निलेश राणे यांची पत्नी.
🔻कर्जत जामखेडचे काँगेसचे बापूसाहेब देशमुख व उद्योगमंत्री नारायण राणे हे दोघे व्याही.
🔻जालन्याचे अंकुशराव टोपे त्यांचे चिरंजीव व विद्यमान मंत्री राजेश टोपे आणि कर्जतचे निंबाळकर यांचे नातेसंबध असल्याने टोपे आणि राणे हेही सोयरे धायरे.
🔻भोकरदन भाजपा चे खा.रावसाहेब दानवे यांची मुलगी शिवसेना आ. हर्षवर्धन जाधव यांना दिलेली आहे…
👉हे सगळे एका ताटात🍵 जेवतात म्हणून कोणाकडेही सत्ता गेली तरी ती सत्ताधारी सारे एकच…!
👉वरिल नातेसंबंध समजुन घेवुन जनतेने आपला भाऊ/नातेवाईक/मित्र पहावा, राजकरणासाठी एकामेकांवर लाठ्या काठ्या घेवून डोकी फोडू 🔪नयेत.. यांच्यासाठी आपापसात भांडू नये..
राजकारण हा मोठा व्यवसाय झालाय,
⚫जो ते शिकला.. तोच टिकला..🔵



No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.