Monday 26 February 2018

कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी हातकणंगले मतदारसंघातून निवडणूक लढवली तर लाभ कोणाला?

हातकणंगले मतदारसंघातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या विरुद्ध कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत लोकसभा निवडणूक लढवणार 


माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीला लाभ तर खासदार राजू शेट्टी यांना या मतदारसंघात जखडून ठेवल्याने इतर ठिकाणी प्रमुख राजकीय पक्षांना लाभ


हातकणंगलेमधील जनतेला आता बहुजन चेहरा हवा आहे. बहुजन समाजातीलच व्यक्तीला हातकणंगले मतदारसंघातील जनतेला खासदार करायचं आहे असे सांगून मुख्यमंत्र्यांनी आदेश दिला तर हातकणंगले मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवणार असल्याचं वक्तव्य कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केले आहे. खर तर त्यांनी हातकणंगले मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवणार असल्याचं यापूर्वी देखील वारंवार स्पष्ट केले आहे. पुन्हा-पुन्हा वक्तव्य त्यांना करावे लागत आहे कारण राज्यातील विविध भागात सदाभाऊ खोत यांना विरोधाचा सामना करावा लागत आहे. नुकतेच कुर्डुवाडी येथील कार्यक्रमाला जात असताना काही शेतकरी आणि स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी सदाभाऊ खोत यांच्या ताफ्यावर दगडफेक केली होती तसेच त्यांना काळे झेंडे दाखवले होते. त्यापूर्वीही जालना जिल्ह्यातील दौऱ्या वेळी देखील सदाभाऊंना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या रोषाचा सामना करावा लागला होता. जालना दौऱ्यावेळी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी सदाभाऊंना काळे झेंडे दाखवत तीव्र विरोध दर्शवला होता, त्यामुळे  सदाभाऊंना आपला दौरा अर्धवट सोडावा लागला होता. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यावर ते सडकून टीका करीत आहेत. खासदार राजू शेट्टी यांच्यापासून व स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून वेगळे करण्यात सत्ताधारी भाजप व राष्ट्रवादीला यश आले आहे. सातत्याने राष्ट्रवादीचे नेते शरद पवार व अजितदादा पवार यांच्यावर टीका करून विरोधी वातावरण निर्माण करण्यात राजू शेट्टी यांना यश आले होते म्हणून खासदार राजू शेट्टी यांच्यापासून व स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून वेगळे करण्यात राष्ट्रवादीला देखील रस होता. खासदार राजू शेट्टी यांना या मतदारसंघात जखडून ठेऊन इतर ठिकाणी राजकीय लाभ घेण्याची भूमिका असावी, कर्तृत्व, कार्याच्या जोरावर निवडणुकीत यश मिळवणाऱ्या राजू शेट्टी यांना आता जातीयवादी राजकारणाला सामोरे जावे लागणार आहे. कारण ज्या जातीय वादी संघटनांच्या आधारावर हातकणंगलेमधील जनतेला आता बहुजन चेहरा हवा आहे, असे वक्तव्य कृषीराज्यमंत्री करीत आहेत त्यांची हि भूमिका निवडणुकीत निश्चितच त्यांनाच अडचणीत आणणारी आहे. हातकणंगले मतदारसंघात ठराविकच जातीय संघटनेची मक्तेदारी नसून हा मतदारसंघ जातीवर आधारित लोकप्रतिनिधींची निवड करीत नाही हे मागील सर्व निवडणुकांमधून सिद्ध झाले आहे. रयत क्रांती संघटना ही राजकीय संघटना नाही. शेतकऱ्यांचे व सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी ही संघटना आहे. आगामी लोकसभा अथवा विधानसभा निवडणुका मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस सांगतील तेथून माझ्यासह कार्यकर्ते भारतीय जनता पक्षाच्या तिकीटावर लढतील, अशी भूमिका कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी यापूर्वीच जाहीर केलेली आहे.शेट्टी यांचा सध्याचा हातकणंगले मतदारसंघ हा पारंपरिक काँग्रेस विचारांचा आहे. काँग्रेसच्या बाळासाहेब माने यांनी १९७७ ते १९९१ या काळात येथून पाच वेळा बाजी मारली. त्यानंतर काँग्रेसकडून कल्लाप्पा आवाडे यांनी दोनदा विजय मिळवला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर माने घराण्यातल्या निवेदिता माने हातकणंगल्यातून दोनदा खासदार झाल्या. सन २००९ मध्ये राजू शेट्टी यांनी पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव करून येथून दणदणीत विजय मिळवला. पुढे २०१४ च्या निवडणूक जागावाटपात ‘राष्ट्रवादी’ने हा मतदारसंघ पुन्हा काँग्रेसला बहाल केला. त्याही वेळी शेट्टी यांनी विजयी घोडदौड कायम राखली.मराठा, जैन आणि लिंगायत या तीन समूहांचे हातकणंगल्यात वर्चस्व आहे. जैन समाजाचे सुमारे दीड लाख मतदान या मतदारसंघात आहे. स्वतः जैन असलेल्या शेट्टींनी या मतपेढीसह ऊस उत्पादक शेतकऱ्यांची मते मोठ्या प्रमाणावर मिळवत आपले बस्तान बसवले आहे. प्रामाणिक प्रतिमा असलेल्या शेट्टींना सामान्य शेतकरी वर्गातून मिळणारे पाठबळ कायम आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघांपैकी चार शिवसेनेकडे आहेत. एक भाजपकडे आणि दुसरा राष्ट्रवादीकडे आहे. शेट्टींच्या पराभवासाठी कोल्हापूरचे पालकमंत्री, भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांतदादा पाटील यांनी कंबर कसली आहे. इस्लामपूरचे आमदार, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनाही शेट्टी नको आहेत.


कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी हातकणंगले मतदारसंघातून निवडणूक लढवली तर काय होऊ शकते?


कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत (रयत क्रांती संघटना) - गावापासून २०० किमी अंतरावर जाऊन माढा लोकसभा मतदारसंघात गतवेळची लोकसभा निवडणूक लढविली होती. तेव्हा मला पाच लाख मतदारांनी मते देत माझ्यावर मोठा विश्वास दाखविला होता. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत माझी हातकणंगले मतदारसंघातून उमेदवारी असणार आहे. त्यामुळे हातकणंगले हा तर माझा घरचा मतदारसंघ आहे. माझ्यासह कार्यकर्ते भारतीय जनता पक्षाच्या तिकीटावर लढतील, अशी भूमिका आहे. ज्या जातीय वादी संघटनांच्या आधारावर हातकणंगलेमधील जनतेला आता बहुजन चेहरा हवा आहे, असे वक्तव्य करीत आहे ते त्यांनाच अडचणीचे असेल. बहुजन चेहरा हि भूमिका + भारतीय जनता पक्षाच्या तिकीटावर उमेदवारी यामुळे सत्ता विरोधी मते आणि संघटनांच्या कार्यकर्त्यांची फुट याचा विपरीत परिणाम शक्य. 

खासदार राजू शेट्टी (स्वाभिमानी शेतकरी संघटना) - भारतीय जनता पक्ष विरहित इतर राजकीय पक्षांशी आघाडी केली तर यशाचा आशावाद कायम.

भारतीय जनता पक्ष- या मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली नसल्याने अंतर्गत सर्व विधानसभा मतदारसंघात प्रभाव नाही. संघटनात्मक अभाव, इचलकरंजी व शिराळा विधानसभा असल्या तरीही यापेक्षा इतर विरोधीपक्ष संघटनांची ताकद जास्त आहे. खासदार राजू शेट्टी यांना या मतदारसंघात जखडून ठेऊन इतर ठिकाणी राजकीय लाभ घेण्याची भूमिका, म्हणून मित्रपक्ष सहकारी यांना मदत करण्याची तयारी.  

शिवसेना - या मतदारसंघातील अंतर्गत ३ विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार असले तरी स्वतंत्रपणे उमेदवार देऊन यश मिळेल अशी राजकीय सद्यस्थिती नाही त्यामुळे भाजप विरोधी भूमिका घेऊन विद्यमान खासदार राजू शेट्टी यांना पाठींबा देऊन इतर ठिकाणी राजकीय लाभ घेण्याची भूमिका असेल. 

राष्ट्रवादी - सातत्याने राष्ट्रवादीचे नेते शरद पवार व अजितदादा पवार यांच्यावर टीका करून विरोधी वातावरण निर्माण करण्यात राजू शेट्टी यांना यश आले होते म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांना रोखण्यात राष्ट्रवादीला देखील रस होता. कारण माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे नेते शरद पवार लोकप्रतिनिधीत्व करीत असताना या मतदारसंघात अनेक वेळा आंदोलन करून जनविरोधी वातावरण निर्माण केले याचा परिणाम राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी निवडणूक न लढविण्याचा घेतलेला निर्णय होय, गेल्या २०१४ सार्वत्रिक निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून सदाभाऊ खोत यांना सदाभाऊ खोत(महायुती) 4,89,989 मते मिळाली होती तर विजयसिंह मोहिते पाटील(राष्ट्रवादी, आघाडी) 4,64,645 मते मिळवून केवळ २५ हजारांच्या फरकाने यश मिळाले होते. हातकणंगले मतदारसंघातून निवडणूक लढवण्याच्या सदाभाऊ खोत यांच्या निर्णयाचा माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीला निश्चितच लाभ मिळणार आहे. या निर्णयाने विरोधक राजू शेट्टी यांना रोखण्याची संधी राष्ट्रवादीला मिळेल. खासदार राजू शेट्टी यांना या मतदारसंघात जखडून ठेऊन इतर ठिकाणी राजकीय लाभ घेण्याची भूमिका असेल.

कॉंग्रेस - हातकणंगले मतदारसंघातून काँग्रेसला अनेकदा यश मिळाले आहे, जागावाटपात एक वेळ राष्ट्रवादीला देखील संधी या ठिकाणी दिली होती, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी आणि कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या उमेदवारीचा परिणाम मतांमधील विभाजनात होऊ शकतो आणि त्याचा लाभ कॉंग्रेसला मिळेल, भारतीय जनता पक्षाच्या तिकीटावर सदाभाऊ खोत लढतील यामुळे आघाडी केली तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेला देखील हि जागा सोडण्याची तयारी कॉंग्रेसची असू शकते.

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे





Ready to take on Raju Shetti, says Sadashiv Khot

(Written by Partha Sarathi Biswas| Pune | Published: February 27, 2018 5:25:38 pm)

Political analyst Chandrakant Bhujbal said that Khot standing from Hathkhanagale might restrict Shetti to his area only. “That will help the BJP in other constituencies as he will not be free to campaign across the state,” he said.
Hours after his convoy was attacked allegedly by members of the Swabhimani Shetkari Sanghatana in Solapur, Minister of State for Agriculture Sadashiv Khot indicated he was more than ready to take on his erstwhile leader and Swabhimani Shetkari Sanghatna founder, MP Raju Shetti. Speaking to The Indian Express, Khot said he will be ready to take on Shetti from the latter’s constituency of Hatkhanagale in Kolhapur.

“If the chief minister commands, I will be ready to fight the upcoming general elections from there,” the minister said. Khot said he would be fighting to represent the Bahujan Samaj in the area. When asked about his definition of Bahujan Samaj, Khot obliquely said it would include every section of the society and not just the dominant Maratha voters. Rayat Kranti Manch, the farmer outfit launched by Khot, would be facing elections in collaboration with the BJP. “The fine details will be worked out later,” he said.

Once considered the right hand man of Shetti, Khot was expelled from the Sanghatna last year for his alleged anti-party activities. The minister’s fortunes in the party has been on the wane since 2016 after he was inducted as a minister in the state cabinet. He was accused of cosying up with the BJP and turning a blind eye to the agrarian crisis in the state. During the farmers’ strike last year the minister was accused of trying to sabotage the strike. Khot had stood for elections from the Madha constituency in Soalpur in 2014 and had polled more than 5 lakh votes.

Spread across the districts of Sangli and Kolhapur, Hathkhanagale has seen high voltage battle of ballot over the two general elections. Shetti, a Jain, had trounced Nivedita Mane, a senior NCP leader from the Maratha community, in 2009 while he had made another senior NCP leader Kallappa Awade bite the dust in 2014. Awade was incidentally a Jain. Hathkhanagale has a healthy mixture of both Jains and Marathas.

Shetti’s victory in an otherwise strong Maratha belt is attributed to his strong grassroot level presence and his hold among the cane cultivators. Asked for his reaction to Khot’ statement, Shetti brushed it aside saying democratic principles allow people to stand for elections from anywhere. To Khot’s reference to the Bahujan Samaj, Shetti said such polarization was tried in the last two elections but to no avail. Post severing ties with BJP, Shetti has become a strong critic of both the state and central governments.

Political analyst Chandrakant Bhujbal said that Khot standing from Hathkhanagale might restrict Shetti to his area only. “That will help the BJP in other constituencies as he will not be free to campaign across the state,” he said.


======
साभार संदर्भ- शरद जोशी यांनी स्थापन केलेल्या पक्षाची भूमिका भाजपधार्जणिी असल्याच्या कारणावरून शेट्टी-खोत या दोघांनी स्वाभिमानीची वेगळी चूल मांडली. मात्र, साखर कारखानदारीवर असलेला काँग्रेस-राष्ट्रवादीचा पगडा मोडण्यासाठी भाजपचे गोपीनाथ मुंडे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत महाआघाडी एकत्र आली. यामध्ये स्वाभिमानीही सहभागी झाली. लोकसभा निवडणुकीवेळी हातकणंगले आणि माढा हे दोन मतदारसंघ स्वाभिमानीने घेतले. ही शेट्टी आणि खोत यांच्यासाठी राजकीय सोय होती. मात्र, कोणताही राजकीय वारसा नसताना खोत यांनी माढय़ात चांगली लढत दिली. आíथक बाजू कमकुवत असताना खोत यांनी चांगली धडक दिली असली तरी याच वेळी शेट्टी म्हणावे तसे लक्ष देत नाहीत असा खोत यांचा तक्रारीचा सूर होता. राजकीय तडजोडीतून विधानसभा निवडणुकीनंतर सत्तेतील वाटा म्हणून खोत यांना विधान परिषदेवर आणि रविकांत तुपकर यांना महामंडळ अशी वाटणी मिळाली. मात्र, सत्तेत एकेक पद मिळाले की, त्यावरील खुर्ची खुणावत राहते. यातच खोत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चांगले संबंध प्रस्थापित करून भाजपच्या कोटय़ातील मंत्री पद पटकावले. एकजण शेतकऱ्यांसाठी बांधावर लढाई लढत असताना साथीदार मात्र सत्तेच्या सावलीत विराजमान झाल्याने कार्यकर्तेही अस्वस्थ होत गेले. यातच शेतकरी कर्जमाफीसाठी पुणतांब्याच्या शेतकऱ्यांचा अभूतपूर्व संप सगळेच राजकीय संदर्भ बदलणारा ठरला. हा संप मोडीत काढण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप राज्यमंत्री खोत यांच्यावर होऊ लागला. ही भूमिका चळवळीला मारक असल्याचे लक्षात येताच खासदार शेट्टी यांनी विरोधी भूमिका घेत आपले अस्तित्व कायम ठेवण्यासाठी सरकारविरोधी भूमिका घेतली. यातच जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये खोत यांनी मुलगा सागर खोत याला राजकीय वारसदार म्हणून पुढे आणण्याचा केलेला प्रयत्न चळवळीला मारक ठरू शकतो हे लक्षात येताच खोत यांना सावधतेचा इशारा देत भाजपशी फारकत घेण्याचे सल्ले देण्यात आले. मात्र, खोत यांना मुख्यमंत्री फडणवीस यांचा सक्रिय पािठबा असल्याने खोत हे ऐकण्याच्या मन:स्थितीत नसल्याने हा संघर्ष तीव्र होत गेला. तो आता रस्त्यावर आला आहे. मने तर वर्षांपूर्वीच दुभंगली होती, आता प्रत्यक्ष हा संघर्ष दिसू लागला आहे. लहान संघटनांना सोबत घेऊन मतांची बेरीज वाढवायची आणि संघटना, राजकीय पक्ष गिळंकृत करायचे अशी काही राजकीय पक्षांची भूमिका राहिली आहे. असाच प्रकार स्वाभिमानीबाबत होण्याची लक्षणे दिसताच शेट्टी यांनी स्वतचे अस्तित्व राखण्यासाठी पावले उचलली. यासाठी सातत्याने टीकेचे लक्ष्य केला जाणाऱ्या राष्ट्रवादीशी सोयरीकही त्यांच्या दृष्टीने अस्पृश्य राहिलेली नाही. राज्यमंत्री खोत हे भाजपमध्ये जाण्यास तयारच होते. मात्र, त्यांना भाजपमध्ये घेतले तर त्याचा फारसा लाभ पक्षाला मिळाला नसता. यापेक्षा कृष्णा वारणा खोऱ्यात असलेला ऊस उत्पादक शेतकरी भाजपला हवा आहे. दोन जातींत ही संघटना विभागली झाली असली तर त्याचा राजकीय लाभ पक्षाला मिळू शकतो हे ओळखून खोत यांना स्वतंत्र संघटना काढण्याचा सल्ला देण्यात आला. यामुळेच स्वाभिमानीतून बाहेर पडून खोत यांनी रयत क्रांती ही संघटना जन्माला घातली. मात्र, कोणतीही संघटना ही संघर्षांतूनच उदयाला येते हा इतिहास आहे. मात्र, खोतांची संघटना सत्तेच्या सावलीत जन्माला आली असल्याने अपेक्षेने कार्यकत्रे जवळ आले आहेत. सर्वाच्या सर्व अपेक्षा एकाच वेळी पूर्ण करणे कोणालाही शक्य नाही. यामुळेच ही संघटना अद्याप बाळसे धरू शकली नाही. रयत क्रांती कोणत्याही निवडणुकीला सामोरे गेलेली नसल्याने संघटनेची ताकदही कळलेली नाही. मात्र, ज्या वेळी एखाद्या संघटनेचे उपद्रवमूल्य जितके असते त्याच वेळी त्या संघटनेच्या पदरात जास्त पडते हा साधा व्यवहार आहे.आज कोणत्याही निवडणुका नसल्या तरी सर्जा-राजाच्या वैयक्तिक संघर्षांत रस्त्यावरचा कार्यकर्ता मात्र, एकमेकांच्या विरोधात उभा ठाकला आहे. हा रस्त्यावरचा संघर्ष दोघांनाही नवीन नसला तरी एकाला सत्तेची ऊब तर, दुसऱ्याला आगामी राजकीय वाटचालीची गरज आहेच. यातूनच दोघांनाही करावा लागणारा संघर्ष हा स्वअस्तित्वासाठी आवश्यक असल्याने हा संघर्ष नजीकच्या काळात तीव्र झालेला पाहावयास मिळण्याची चिन्हे आहेत. मात्र, अस्तित्वाची लढाई काठावर बसून पाहण्याची मौज मात्र भाजप घेणार आहे. दुसऱ्या बाजूला खोत विधान परिषदेचे सदस्य असल्याने त्यांनाही फारशी राजकीय तडजोडीची सध्या गरज नाहीच, भाजपने सांगितले तर निवडणुकीचा फड रंगवायला जायचे अन्यथा, बरं चाललंय की, अशी भूमिका आहेच. मात्र, या राजकीय संघर्षांत शेतकऱ्यांचे प्रश्न कसे सुटणार? ऊस दराचे काय? हेच खरे प्रश्न आहेत.हातकणंगले मतदारसंघात शेट्टी यांना पर्याय शोधण्याचे प्रयत्न भाजपने सुरू केले आहेत. याला प्रत्युत्तर देण्यासाठीची रणनीती शेट्टी यांच्याकडून आखली जात आहे. जिल्ह्यातील वाळवा, शिराळा हे दोन विधानसभा मतदारसंघ हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये आहेत. सध्या वाळव्यात राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील आणि शिराळ्यात भाजपचे शिवाजीराव नाईक हे विधानसभेत प्रतिनिधीत्व करीत आहेत. मात्र, दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादीची ताकद आहेच, याचबरोबर स्वाभिमानीचीही ताकद आहे. हीच ताकद विभागण्याचा प्रयत्न सुरु आहे.

राजू शेट्टींची 'हात' मिळवणी! (19 march 2018) 


२०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने काँग्रेससोबत लढण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख खासदार राजू शेट्टी यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची दिल्लीत भेट घेतली. या भेटीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी राजू शेट्टी यांनी २९ मार्च रोजी दिल्लीत होणाऱ्या शेतकरी मेळाव्याचे निमंत्रणही राहुल गांधी यांना दिले. केंद्र सरकारवर टीडीपी आणि वायएसआर काँग्रेस या दोन पक्षांनी ‘अविश्वास’ ठराव दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या ठरावाला सर्वच पक्षांनी पाठिंबा दिला आहे. सर्व राजकीय पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) विरोधात एकवटले असताना स्वाभिमानीनेही यूपीएसोबत लढण्याचा निर्णय घेतला आहे. ‘आमचा पक्ष सध्या इतका मोठा नाही की आमदारांना निवडून आणू शकतो. राजकीय कारकिर्दीत काही धोरणात्मक निर्णय घ्यावे लागतात, असे खासदार राजू शेट्टी पत्रकारांशी बोलताना म्हणाले. दिल्लीत झालेल्या या भेटीला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश उपस्थित होते. एनडीए सरकारच्या काळात शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष झाले आहे. शेतकऱ्याविषयीच्या योजनांमुळे स्वाभिमानी सरकारवर नाराज आहे. असे असताना राजू शेट्टी यूपीएमध्ये आले तर त्यांचे स्वागतच आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण म्हणाले.



हातकणंगले मतदारसंघात ज्ञानेश्वर मुळे विरुद्ध राजू शेट्टींची लढत?

देशाच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या सचिवपदाची धुरा सांभाळणारे ज्ञानेश्वर मुळे हे मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील लाट या गावचे आहेत.प्रसिद्ध प्रशासकीय अधिकारी आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव डॉ. ज्ञानेश्वर मुळे हे येत्या लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याची शक्यता आहे.सध्या देशाच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या सचिवपदाची धुरा सांभाळणारे ज्ञानेश्वर मुळे हे मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील लाट या गावचे आहेत.त्यामुळे आपल्याच मतदारसंघातून ते लोकसभा निवडणूक लढवण्याची चिन्हं आहेत. जर त्यांनी निवडणूक लढवण्याचं निश्चित केलं, तर हातकणंगले मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांच्यासमोर ज्ञानेश्वर मुळे यांचं कडवं आव्हान असेल.मात्र याबाबत ज्ञानेश्वर मुळे यांनी अधिकृत होकार किंवा नकार दिलेला नाही.ज्ञानेश्वर मुळे यांच्या  'माती, पंख नि आकाश', 'पासपोर्ट मॅन ऑफ इंडिया', 'शांती की अफवांए', 'होतच नाही सकाळ',  ज्ञानेश्वर मुळे की कविताएः प्रातिनिधीक संकलन या पुस्तकांचं प्रकाशन, सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते करण्यात आलं.  पुण्यात झालेल्या या कार्यक्रमानंतर मुळे यांनी पत्रकारांशी गप्पा मारल्या.मोहन भागवत यांच्या हस्ते पुस्तकांचं प्रकाशन झाल्यामुळे, भाजप शहराध्यक्ष योगेश गोगावलेही यावेळी पत्रकार परिषदेला उपस्थित होते.ज्ञानेश्वर मुळे हे येत्या डिसेंबरमध्ये निवृत्त होत आहेत. त्यामुळे त्यांना राजकीय प्रवेशाबाबत विचारण्यात आलं.त्यावेळी मुळे म्हणाले, “मला वाटतं चांगल्या लोकांनी राजकारणात आलं पाहिजे. मी भाजपच्या जवळचा आहे, हा आरोप पूर्णत: चुकीचा आहे. मी सर्वपक्षांच्या नेत्यांना भेटत असतो. मी 2019 ची निवडणूक लढवण्याबाबतच्या चर्चेबद्दल बोलायचं झालंच, तर सध्य स्थितीला ना माझा होकार आहे ना नकार”

कोण आहेत ज्ञानेश्वर मुळे?
सध्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव म्हणून कार्यरत
साधी राहणी आणि उच्च विचारसरणी असलेला अधिकारी म्हणून परिचीत
कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील लाट या गावी जन्म
* 1983 मध्ये भारतीय परराष्ट्र सेवेत रुजू
* जपान, रशिया, मॉरीशस, सीरिया इत्यादी देशात महत्वाच्या हुद्द्यांवर काम.
* 2009 ते 2013 पर्यंत मालदीवमध्ये भारताचे उच्चायुक्त होते
* 2013 ते 2016 दरम्यान भारताचे अमेरिकेतील राजदूत म्हणून काम
* मुळे यांचं 'माती,पंख आणि आकाश' हे आत्मचरित्र तरुणांसाठी प्रेरणादायी
* जवळपास 15 पेक्षा जास्त पुस्तकांचं लेखन
* मुळे यांच्या पुस्तकांचं हिंदी, उर्दू, कन्नड, अरेबीत भाषांतर
* नागरिकांना जलद आणि सहज पासपोर्ट उपलब्ध करुन देण्याची संकल्पना मुळे यांचीच
* पासपोर्टची प्रक्रिया सुलभ करण्याचा काम मुळे यांनी केलं.

अधिक तपशीलवार माहितीसाठी- राज्यातील 48 लोकसभा व 288 विधानसभा मतदारसंघांतील अंतर्गत सर्वेक्षण पूर्ण: संबंधित सर्वेक्षणाचा अहवाल "प्राब" कडे उपलब्ध आहे.

Mr. Chandrakant Bhujbal


POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) 

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे

---0----0----0----0----0---0----0----0----0----0---0----0----0----0----0---0----0----0---


---0----0----0----0----0---0----0----0----0----0---0----0----0----0----0---0----0----0---

चंद्रकांत भुजबळ लिखित आणि पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) निर्मित

"महाराष्ट्रातील राजकारण" पुस्तक आगामी निवडणुकांसाठी उपयुक्त


HTTP://PRABINDIA.BLOGSPOT.IN/2018/02/BLOG-POST_19.HTML



अनुक्रमणिका

अ.क्र. तपशिल                      पान क्र.
1 महाराष्ट्र मतदार संघ पुर्नरचना  25
2 आजची संसद रचना व स्वरूप 27
3 निवडणूक संबंधीचे गुन्हे व त्यांची माहिती 31
4 लोकप्रतिनिधी कायद्यात महत्वपूर्ण सुधारणा 34
5 भारतातील निवडणूक कायदे 36
6 नकारात्मक मतदान अधिकार 39
7 निवडणूक लढविण्याची पुर्वतयारी व प्रभावी प्रचारतंत्र 40
8 हंगामी सरकार 1947 ते 1952 42
9 पहिली लोकसभा 1952 ते 1957 43
10 दूसरी लोकसभा 1957 ते 1962 46
11 तिसरी लोकसभा 1962 ते 1967 49
12 चवथी लोकसभा 1967 ते 1971 53
13 पाचवी लोकसभा 1971 ते 1977 56
14 सहावी लोकसभा 1977 ते 1980 58
15 सातवी लोकसभा 1980 ते 1984 61
16 आठवी लोकसभा 1984 ते 1988 63
17 नववी लोकसभा 1989 ते 1991 65
18 दहावी लोकसभा 1991 ते 1996 67
19 अकरावी लोकसभा 1996 ते 1998 69
20 बारावी लोकसभा 1998 ते 1999 72
21 तेरावी लोकसभा 1999 ते 2004 74
22 चौदावी लोकसभा 2004 ते 2009 77
23 पंधरावी लोकसभा 2009 ते 2014 80
24 सोळावी लोकसभा 2014 ते 2019 82
25 संयुक्त महाराष्ट्राची वाटचाल 85
26 पहिली विधानसभा 1960 विधानसभा अस्तित्वात 87
27 दूसरी विधानसभा 1962 ते 1967 नवनिर्मिती राज्याच्या राजकारणास प्रारंभ 88
28 तिसरी विधानसभा 1967 ते 1972 काँग्रेसला बहूमत 90
29 चौथी विधानसभा 1972 ते 1978 पुन्हा काँग्रेसला कौल 92
30 पाचवी विधानसभा 1978 ते 1980 काँग्रेसमध्ये फुट : पुलोदचे सरकार 95
31 सहावी विधानसभा 1980 ते 1985 इंदिरा काँग्रेसला बहुमत 97
32 सातवी विधानसभा 1985 ते 1990 काँग्रेसच्या मताधिक्यात घट 99
33 आठवी विधानसभा 1990 ते 1995 काँग्रेसला काठावरचे बहुमत 101
34 नववी विधानसभा 1995 ते 1999 भाजप-शिवसेना युतीचे सरकार 104
35 दहावी विधानसभा 1999 ते 2004 राष्ट्रवादीचा उदय 107
36 अकरावी विधानसभा 2004 ते 2009 काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे सरकार 109
37 बारावी विधानसभा 2009 ते 2014 मनसेचा उदय व आघाडीचे राजकारण 113
38 तेरावी विधानसभा 2014 ते 2019 भाजपला सर्वाधिक जागा 117
39 महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष 120
40 महाराष्ट्र विधानपरिषद सदस्यांची यादी 125
41 वृत्तपत्रांसाठी प्रेस कौन्सिलची मार्गदर्शिका 128
42 सोशल मिडियाचा प्रचारातील वापर व सूचना  130
43 पेड न्युज म्हणजे काय? व नियंत्रण 131
44 निवडणूक काळात होणारी फसवणूक 134
45 महाराष्ट्रातील जातवास्तव 144
46 महाराष्ट्रातील राखीव मतदारसंघ 147
47 गडचिरोली जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 148
48 भंडारा जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 151
49 गोंदिया जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 154
50 सिंधदुर्ग जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 157
51 नांदेड जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 160
52 चंद्रपूर जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 163
53 रत्नागिरी जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 166
54 लातूर जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 169
55 उस्मानाबाद जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 172
56 बीड जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 175
57 परभणी जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 178
58 नंदूरबार जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 181
59 अमरावती जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 184
60 यवतमाळ जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 187
61 सातारा जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 190
62 वर्धा जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 193
63 हिंगोली जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 196
64 बुलढाणा जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 199
65 रायगड जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 202
66 जालना जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 206
67 नागपूर जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 209
68 अकोला जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 212
69 धुळे जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 215
70 नाशिक जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 217
71 जळगाव जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 220
72 सोलापूर जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 223
73 वाशिम जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 226
74 औरंगाबाद जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 229
75 अहमदनगर जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 232
76 पुणे जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 235
77 ठाणे जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 238
78 सांगली जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 241
79 मुंबई उपनगर जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 244
80 कोल्हापूर जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 245
81 मुंबई जिल्ह्यातील धर्मनिहाय लोकसंख्येचे प्रमाण 248
82 मतदान पद्धत-मतदानात झालेले तीन बदल.. 249
83 लोकसभा निवडणुक 2014; महाराष्ट्रातील दृष्टीक्षेप 250
84 राज्यातील लोकसंख्येनुसार प्रमाण व सद्यस्थिती 251
85 राज्यातील लोकसभा व विधानसभा 2014 मधील पक्षनिहाय स्थिती व प्रमाण 252
86 महाराष्ट्र राज्यातील वयोगटाप्रमाणे मतदार संख्या व प्रमाण 253
87 विधानसभेच्या 234 मतदारसंघात महायुतीला आघाडी (निवडणूक-2014) 254
88 लोकसभा निवडणूक 2014; उमेदवारांची सामाजिक स्थिती 255
89 लोकसभा व विधानसभा मतदारसंघ दर्शविणारा महाराष्ट्र राज्याचा नकाशा 256
90 लोकसभा मतदार संघातील रचना, निवडणूक विश्‍लेषण, जातीय प्रमाण व प्रभाव, राजकीय सद्यस्थिती,             विधानसभा स्थिती, मतदारांची वर्गवारी (अनुक्रमे 1 ते 48 मतदारसंघ)
91 1. नंदूरबार लोकसभा मतदारसंघ  259
92 2. धुळे लोकसभा मतदारसंघ 264
93 3. जळगाव लोकसभा मतदारसंघ 269
94 4. रावेर लोकसभा मतदारसंघ 274
95 5. बुलढाणा लोकसभा मतदारसंघ 279
96 6. अकोला लोकसभा मतदारसंघ 284
97 7. अमरावती लोकसभा मतदारसंघ 289
98 8. वर्धा लोकसभा मतदारसंघ 294
99 9. रामटेक लोकसभा मतदारसंघ 299
100 10. नागपूर लोकसभा मतदारसंघ 304
101 11. भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघ 309
102 12. गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघ 314
103 13. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ 319
104 14. यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघ 324
105 15. हिंगोली लोकसभा मतदारसंघ 329
106 16. नांदेड लोकसभा मतदारसंघ 334
107 17. परभणी लोकसभा मतदारसंघ 339
108 18. जालना लोकसभा मतदारसंघ 344
109 19. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ 349
110 20. दिंडोरी लोकसभा मतदारसंघ 354
111 21. नाशिक लोकसभा मतदारसंघ 359
112 22. पालघर लोकसभा मतदारसंघ 364
113 23. भिवंडी लोकसभा मतदारसंघ 369
114 24. कल्याण लोकसभा मतदारसंघ 374
115 25. ठाणे लोकसभा मतदारसंघ 379
116 26. मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघ 384
117 27. मुंबई उत्तर पश्‍चिम लोकसभा मतदारसंघ 389
118 28. मुंबई उत्तर पुर्व लोकसभा मतदारसंघ 394
119 29. मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघ 399
120 30. मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ 404
121 31. मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघ 409
122 32. रायगड लोकसभा मतदारसंघ 414
123 33. मावळ लोकसभा मतदारसंघ 419
124 34. पुणे लोकसभा मतदारसंघ 424
125 35. बारामती लोकसभा मतदारसंघ 429
126 36. शिरूर लोकसभा मतदारसंघ 434
127 37. अहमदनगर लोकसभा मतदारसंघ 439
128 38. शिर्डी लोकसभा मतदारसंघ 444
129 39. बीड लोकसभा मतदारसंघ 449
130 40. उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ 454
131 41. लातूर लोकसभा मतदारसंघ 459
132 42. सोलापूर लोकसभा मतदारसंघ 464
133 43. माढा लोकसभा मतदारसंघ 469
134 44. सांगली लोकसभा मतदारसंघ 474
135 45. सातारा लोकसभा मतदारसंघ 479
136 46. रत्नागिरी-सिंधुदूर्ग लोकसभा मतदारसंघ 484
137 47. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ 489
138 48. हातकणंगले लोकसभा मतदारसंघ 494
139 थोडक्यात महत्वाचे 
लोकसभेत राज्यातील केवळ 5 महिला उमेदवार विजयी,लोकसभेत महिला खासदारांच्या प्रमाणात वाढ,लोकसभा निवडणुकीत 1,652 पक्षांना अपयश,आता मतदान यंत्रावर  उमेदवारांचा फोटो,मतदानाची मिळणार पोचपावती,राजकीय पक्षाप्रमाणेच आता नोटाचं स्वतंत्र चिन्ह!, 16व्या लोकसभेत केवळ तीनच अपक्ष उमेदवारांना संधी
140 महाराष्ट्र राज्यातील राज्यसभेतील खासदार 499
141 लोकसभा, विधानसभेचा कार्यकाल व आगामी निवडणूका 502
142 देशभरातील सर्व विधानसभांचा कार्यकाल व आगामी निवडणूका 503
143 राज्यातील आगामी काळातील महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुका 505
144 महाराष्ट्रातील विभागानुसार स्थानिक स्वराज्य संस्था दृष्टीक्षेप/आरक्षण स्थिती 507
145 राज्यातील महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांचे पक्षनिहाय निकाल 508
146 राज्यातील नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणुकांचे पक्षनिहाय निकाल 510
147 नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुक 2016 नगराध्यांची पक्षनिहाय संख्या 520
148 राज्यातील जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणुकांचे पक्षनिहाय निकाल 521
149 राज्यातील पंचायत समितींच्या सार्वत्रिक निवडणुकांचे पक्षनिहाय निकाल 523
150 निवडणूक आयोगाने उमेदवारांसाठी निर्धारित केलेली निवडणूक खर्च मर्यादा 525
151 नोंदणीकृत राजकीय पक्ष व निवडणूक चिन्ह, संक्षिप्त नावे 526
152 संदर्भ, तळ टिपा 529
153 पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब) संस्थेची माहिती व कार्य 531

अधिक माहितीसाठी संपर्क :
श्री.चंद्रकांत भुजबळ
पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब)
823/24, सदाशिव पेठ, गाडगीळ स्ट्रीट, पुणे 411030
फोन नं- 020-24481671 ई.मेल.- prab.election@gmail.com
वेबसाईट- prabindia.com / prabindia.org


================================================

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB)



POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
================================================

महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
================================================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
================================================

Saturday 24 February 2018

राज्यसभेच्या 58 जागांसाठी 23 मार्चला निवडणूक; कोणत्या राज्यातून कोणाला किती जागा मिळणार!

इतिहासात पहिल्यांदाच भाजप राज्यसभेत मोठा पक्ष

निवडणुकीआधीची स्थिती 

भाजप- 58

काँग्रेस- 54

निवडणुकीनंतरची स्थिती

भाजप - 69

काँग्रेस - 50

* 245 सदस्यांच्या राज्यसभेत 126 हा बहुमताचा आकडा आहे. या बहुमतापासून मात्र अजून बरेच दूर

* एनडीएच्या मित्रपक्षांची (टीडीपीला धरुन संख्या 17 होती) टीडीपी-6, शिवसेना-3, अकाली दल-3 पीडीपी-2 आणि काही छोटे पक्ष

* एकाचवेळी ज्या 59 जागांसाठी निवडणूक झाली त्यात भाजपने सर्वाधिक 28 जागा जिंकल्या, काँग्रेसच्या वाट्याला 10

१७ राज्यांमध्ये राज्यसभेच्या ५९ जागांची निवडणूक शुक्रवारी पूर्ण झाली. भाजपने २८ जागा जिंकल्या. १० राज्यांतील ३३ उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. ७ राज्यांतील २६ जागांवर शुक्रवारी मतदान झाले. यामध्ये उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, कर्नाटक, झारखंड, छत्तीसगड, केरळ व तेलंगणाचा समावेश आहे. उत्तर प्रदेशात सर्वाधिक १० जागा होत्या. भाजपने गोरखपूर-फुलपूर पोटनिवडणुकीतील पराभवाचा सूड घेत आपल्या सर्व ९ उमेदवारांना निवडून आणले. सपा-बसप आघाडीला अापले उमेदवार भीमराव आंबेडकर यांना विजय मिळवून देता आला नाही. क्रॉस व्होटिंगमुळे सुरुवातीस निवडणूक आयोगाने मतगणना रोखली होती. यानंतर दुसऱ्या पसंतीच्या मतांनी १० व्या जागेच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले. यामध्ये भाजपचे नववे उमेदवार अनिल अग्रवाल विजयी झाले. त्यांनी बसपच्या भीमराव आंबेडकरांना पराभूत केले.


राज्यसभा निवडणूक: भाजपच्या विजया रहाटकरांचा अर्ज मागे, महाराष्ट्रातील सहाही खासदार बिनविरोध


राज्यसभेसाठी भाजपच्या चौथ्या उमेदवार असलेल्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी आपला उमेदवारी अर्ज आज दुपारी माघारी घेतला. त्यामुळे यंदा महाराष्ट्रातून राज्यसभेवर जाणारे सहाही खासदार बिनविरोध निवडून गेले आहेत. भाजपकडून प्रकाश जावडेकर, नारायण राणे व व्ही. मुरलीधरन यांच्यासह शिवसेनेचे अनिल देसाई, राष्ट्रवादीच्या वंदना चव्हाण आणि काँग्रेस उमेदवार कुमार केतकर हे यंदा राज्यसभेवर गेले आहेत.राज्यसभेच्या सहा जागांसाठी सात उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याने या निवडणुकीत रंगत निर्माण होणार असे चित्र निर्माण झाले होते. मात्र, भाजपच्या चौथ्या उमेदवार असलेल्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.राज्यसभेच्या निवडणुकीसाठी विधानसभेचे सदस्य मतदान करतात. यंदा सहा जागांसाठी प्रत्येक उमेदवाराला किमान 42 मतांची गरज होती. मात्र, प्रत्येक पक्षाने आपापल्या विधानसभेतील संख्याबळानुसार उमेदवार दिल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली आहे. हे खासदार पुढील महिन्यात राज्यसभेत प्रवेश करतील.

रेखा-सचिनसह राज्यसभेतील 52 सदस्य निवृत्त 

राज्यसभेच्या 58 जागांसाठी 23 मार्चला निवडणूक
केरळच्या एका जागेसाठी पोटनिवडणुकही होणार

राणे अखेर भाजपचे उमेदवार म्हणून बिनविरोध

काँग्रेसला रामराम ठोकल्यावर माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे भाजपमध्ये प्रवेश करणार होते. पण शिवसेनेचा विरोध लक्षात घेता भाजपने त्यांना स्वतंत्र पक्ष काढण्याचा सल्ला दिला. त्यानुसार राणे यांनी वेगळ्या पक्षाची स्थापना केली होती. राज्यसभेसाठी राणे यांनी भाजपचे उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला. काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देऊन काही महिन्यांपूर्वी स्थापन केलेल्या स्वाभिमान पक्षाचा राजीनामा देत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी सोमवारी भाजपाकडून राज्यसभेच्या निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल केला. एखाद्या राजकीय पक्षाच्या संस्थापकानेच पक्षाचा राजीनामा देण्याची ही बहुधा पहिली वेळ असेल.







केंद्रीय मंत्री अरुण जेटली, जेपी नड्डा, रविशंकर प्रसाद, प्रकाश जावडेकर, कॉंग्रेस नेते प्रमोद तिवारी, राजीव शुक्‍ला, रेणुका चौधरी यांच्यासह अभिनेत्री रेखा आणि क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर राज्यसभेतून निवृत्त होणार आहेत.एप्रिल-मे 2018 मध्ये राज्यसभेतून निवृत्त होणाऱ्या खासदारांच्या जागांसाठी 23 मार्चला मतदान होणार आहे. यामध्ये 16 राज्यांतील राज्यसभेच्या 58 जागा असून महाराष्ट्रातील सहा जागांचा समावेश आहे.अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 12 मार्च आहे. 23 तारखेला सकाळी 9 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान होईल. त्याच दिवशी संध्याकाळी 5 वाजता मतमोजणीला सुरुवात होईल.

महाराष्ट्रातून निवृत्त होणारे खासदार


वंदना हेमंत चव्हाण  - राष्ट्रवादी
डी. पी. त्रिपाठी  - राष्ट्रवादी
रजनी पाटील  - काँग्रेस
अनिल देसाई  - शिवसेना
राजीव शुक्ला - काँग्रेस
अजयकुमार संचेती - भाजप

केंद्रीय मंत्री अरुण जेटली, जेपी नड्डा, रविशंकर प्रसाद, प्रकाश जावडेकर यांचा कार्यकाळ संपणार आहे. कॉंग्रेस नेते प्रमोद तिवारी, राजीव शुक्‍ला, रेणुका चौधरी यांच्यासह अभिनेत्री रेखा आणि क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर राज्यसभेतून निवृत्त होणार आहेत.

कोणत्या पक्षाचे किती खासदार?

भाजप -17
कॉंग्रेस - 12
समाजवादी पक्ष - 6
जदयू - 3
तृणमूल कॉंग्रेस - 3
तेलुगू देसम पक्ष - 2
राष्ट्रवादी कॉंग्रेस - 2
बीजद - 2
बसप - 1
शिवसेना - 1
माकप - 1
अपक्ष  - 1
राष्ट्रपती नियुक्‍त - 3

संख्याबळानुसार आता महाराष्ट्रात राज्यसभेवर सहापैकी भाजपचे 3 उमेदवार, तर शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी यांचा प्रत्येकी एक उमेदवार निवडून येऊ शकतो.

कोणत्या राज्यातील किती जागा?

आंध्र प्रदेश - 3
बिहार - 6
छत्तीसगड - 1
गुजरात - 4
हरियाणा - 1
हिमाचल प्रदेश - 1
कर्नाटक - 4
मध्य प्रदेश - 5
महाराष्ट्र - 6
तेलंगणा - 3
उत्तर प्रदेश - 10
उत्तराखंड - 1
पश्चिम बंगाल - 5
ओदिशा - 3
राजस्थान - 3
झारखंड - 2

याशिवाय केरळातील खासदार वीरेश कुमार यांच्या राजीनाम्यामुळे त्या जागेसाठीही पोटनिवडणूक होईल. नरेंद्र मोदी सत्तेत आल्यानंतर पहिल्यांदाच भाजपचं राज्यसभेत सर्वाधिक संख्याबळ आहे.

निवृत्त होणारे राज्यसभा सदस्य महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधी


.क्रसदस्यांचे नाव,            पक्ष,       सदस्यत्वाची मुदतसंपण्याचा दिनांक

(1) श्रीमती वंदना हेमंत चव्हाण      नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी    एप्रिल, 2018
(2) श्री.डी.पी.त्रिपाठी               नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी    2 एप्रिल, 2018
(3) श्रीमती रजनी अशोकराव पाटील   इंडियन नॅशनल काँग्रेस    2 एप्रिल, 2018
(4) श्रीअनिल यशवंत देसाई        शिवसेना                2 एप्रिल, 2018
(5) श्री.राजीव रामकुमार शुक्ला       इंडियन नॅशनल काँग्रेस    2 एप्रिल, 2018
(6) श्री.अजयकुमार शक्तीकुमार संचेती  भारतीय जनता पार्टी      2 एप्रिल, 2018

सन 2018 मध्ये निवृत्त होणार्या महाराष्ट्रातील सदस्यांची पक्षनिहाय संख्या


क्रमांक            पक्षाचे नाव           सदस्य संख्या
1.             नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी :       2
2.             इंडियन नॅशनल काँग्रेस :        2
3.             भारतीय जनता पार्टी :         1
4.             शिवसेना :                   1

               एकूण :                     6
===================================================== 
राज्यसभेचे वंदना चव्हाण आणि डी. पी. त्रिपाठी (राष्ट्रवादी), रजनी पाटील आणि राजीव शुक्ला (काँग्रेस), अनिल देसाई (शिवसेना), अजयकुमार संचेती (भाजप) हे सहा सदस्य निवृत्त होत आहेत. राज्यसभेवर निवडून येण्याकरिता पहिल्या पसंतीच्या ४२ मतांची आवश्यकता आहे. सदस्यसंख्येनुसार भाजपचे तीन, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा प्रत्येकी एक सदस्य निवडून येऊ शकतो. शिवसेनेकडे २१ मते अतिरिक्त असली तरी शिवसेना दुसरा उमेदवार उभा करण्याचे धाडस करेल का, यावर बरेच अवलंबून असेल.
===================================================== 

मतदान कशा प्रकारे होते ?

मतदान हे खुल्या पद्धतीने होते. यानुसार राजकीय पक्षांच्या आमदारांना पक्षाने नियुक्त केलेल्या प्रतिनिधींना आपली मतपत्रिका दाखवावी लागते. अपक्षांना मतपत्रिका दाखविण्याचे बंधन नसते. राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींऐवजी अन्य कोणाला मतपत्रिका दाखविल्यास मत बाद होते. अलीकडेच गुजरातमध्ये झालेल्या राज्यसभा निवडणुकीत दोन आमदारांनी मतपत्रिका अधिकृत प्रतिनिधींेऐवजी अन्य प्रतिनिधींना दाखविल्याने त्या दोन मतपत्रिका निवडणूक आयोगाने बाद ठरविल्या होत्या. खुल्या पद्धतीने मतदान होत असल्याने मते फुटण्यास वाव नसतो. कारण राजकीय पक्षांनी जारी केलेल्या पक्षादेशाच्या विरोधात मतदान केल्यास संबंधित आमदाराचे सदस्यत्व रद्द होऊ शकते.

मतांचा कोटा कसा ठरतो?

विधानसभेच्या सर्व २८८ सदस्यांना मतदानाचा अधिकार असतो. नामनियुक्त सदस्यांना मतदानाचा अधिकार नसतो. मतांचा कोटा खालीलप्रमाणे निश्चित केला जातो.
* एकूण मतदार : २८८
* एकूण जागा : ६
* २८८ भागिले एकूण जागा सहा अधिक एक = २८८ भागिले सात = ४१.१४
*  यानुसार पहिल्या फेरीतील विजयाकरिता ४११४ मते आवश्यक ठरतात.

===================================================== 

शिवसेनेचे अनिल देसाई, राष्ट्रवादीच्या वंदना चव्हाण यांना पुन्हा उमेदवारी

राज्यसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने अनिल देसाई तर राष्ट्रवादीने अ‍ॅड. वंदना चव्हाण या विद्यमान खासदारांनाच पुन्हा उमेदवारी जाहीर केली आहे. दोन्ही पक्षांकडे पहिल्या पसंतीची पुरेशी मते असल्याने दोघांचाही विजय निश्चित मानला जातो.विद्यमान खासदार वंदना चव्हाण यांनाच पुन्हा उमेदवारी देण्यात येत असल्याची घोषणा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केली. शिवसेनेने अनिल देसाई यांच्या नावाची घोषणा केली आहे. पक्षाने पुन्हा उमेदवारी दिल्याबद्दल खासदार देसाई यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आभार मानले. वंदना चव्हाण आणि डी. पी. त्रिपाठी या राष्ट्रवादीच्या दोन खासदारांची मुदत संपुष्टात येत आहे. पक्षाचे ४१ आमदार असल्याने एकच उमेदवार निवडून येणार आहे. पक्षाने पुण्याच्या माजी महापौर व गेले सहा वर्षे राज्यसभेत चांगली कामगिरी केलेल्या वंदना चव्हाण यांनाच पुन्हा संधी दिली आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी वंदना चव्हाण यांना पुन्हा संधी देण्याचा निर्णय घेतला. अनिल देसाई हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय असल्याने त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात होती. केंद्रात राज्यमंत्रिपदासाठीही त्यांचे नाव निश्चित झाले होते. शपथविधीसाठी ते दिल्लीत पोहचलेही होते, पण पक्षाने त्यांना थांबण्याचा सल्ला दिला होता. सहा जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत संख्याबळानुसार भाजपचे तीन, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा प्रत्येकी एक उमेदवार निवडून येऊ शकतो. भाजपचे १२२ आमदार असून, तिसरा उमेदवार निवडून येण्यात दहा मतांची आवश्यकता आहे. छोटे पक्ष आणि अपक्षांचा पाठिंबा असल्याने भाजपचे तीन उमेदवार सहजपणे निवडून येऊ शकतात. शिवसेनेकडे २१ मते अतिरिक्तअसली तरी आणखी २१ मते मिळविणे शिवसेनेला शक्य नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे जेमतेम मते असल्याने या दोन्ही पक्षांकडे दुसऱ्या पसंतीची मते देण्यासाठी वाव नाही. परिणामी शिवसेनेकडे अतिरिक्त मते असली तरी या मतांचा फायदा होणार नाही.
काँग्रेसमध्ये अनेक इच्छुक-राज्यातून ज्येष्ठ पत्रकार, संपादक आणि विचारवंत कुमार केतकर यांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे.काँग्रेसने सात राज्यातील दहा उमेदवारांची यादी जाहीर केली. राज्यसभा निवडणुकीसाठी अर्ज करण्याचा शेवटचा दिवस आहे. 



भाजप- भाजपने राज्यसभेसाठी 18 उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर काँग्रेसनेही एकूण 10 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. राज्यसभेसाठी भाजपने एकूण 18 उमेदवारांची यादी जाहीर केली. यापैकी महाराष्ट्रातून तीन नावं आहेत. नारायण राणे आणि केरळमधील भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष व्ही. मुरलीधरन यांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या कोट्यातून यावेळी प्रकाश जावडेकर, नारायण राणे आणि व्ही. मुरलीधरन राज्यसभेवर जातील.





नारायण राणे यांचा भाजपला काय उपयोग?

नारायण राणे आक्रमक चेहरा व मराठा नेतृत्व म्हणून ओळख असल्याने निर्माण होणार्या राजकीय सद्यस्थितीत त्यांचा उपयोग करता येईल.
* काँग्रेस व शिवसेना बंडखोराना त्यांच्या पक्षाची उमेदवारी देऊन मतविभाजनाचा लाभ भाजपला कसा मिळेल याचा विचार व नियोजन 
*  विरोधकांना प्रत्युत्तरादाखल राणे यांचा उपयोग भाजपला लाभकारक ठरेल.
* आरक्षण मुद्यावरून सामाजिक संघटनांशी असलेली जवळकीचा लाभ मिळेल असा आशावाद
* कोकणात भाजपला अपेक्षितपणे राजकीय फायदा शक्य.

नारायण राणे यांनी ऑफर का स्वीकारली ? 

* नारायण राणे यांना या राजकीय सद्यस्थितीत राज्यसभेवर जाण्याची ऑफर स्वीकारण्याचा शिवाय दुसरा पर्याय नव्हता.
*  राज्यसभेवर जाऊन आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित करण्यावर भर 
* आगामी निवडणुका पुढील वर्षी एकत्रितपणे होणार असल्याने मंत्रिपद मिळाले तरी थोड्या कालावधीत काही उपयोग होणार नाही 
* राज्यसभेवर जाण्याची ऑफर दिल्यानंतर नितेश राणे यांच्या ट्विटने (साहेबांनी राज्यसभा नव्हे तर विधानसभेत जावे, अशी आमची इच्छा आहे. राणेसाहेब आमची ही मागणी लक्षात घेतील, अशी आशा 

करतो. आम्ही त्यांच्या निर्णयाची प्रतिक्षा करत आहोत), असे म्हटले होते. या कृतीवर भाजप श्रेष्ठींची नाराजी होती. ती पुढील राजकीयदृष्ट्या लाभासाठी दूर करणे गरजेचे होते.


मुख्यमंत्री पदावर राहिलेल्या नारायण राणे यांना पुन्हा मंत्रिपद का मिळत नाही- 

* शिवसेनेतील बंडखोरी आणि सातत्याने शिवेनेवरील टोकावरील टीका यामुळे शिवसेनेचा मंत्रीमंडळ प्रवेशास विरोध
* नारायण राणे यांना मंत्रीमंडळात घेतल्यास शिवसेना मंत्रीमंडळातून बाहेर पडेल पाठींबा काढून घेतला जाईल अशी भाजपला भीती 
* भाजप मध्ये प्रवेशास स्थानिकांसह संघ पदाधिकारी यांचा विरोध; स्वतंत्र पक्ष स्थापन करून सलगीने राजकारण करण्याचा सल्ला.
* नारायण राणे याची भूमिका व त्यांच्या मुलांच्या भूमिकेत तफावत; वेगवेगळ्या प्रतिक्रियेमुळे संभ्रम; भाजप व संघ धोरण विरोधात मतप्रदर्शन त्यामुळे होणारा विरोध
* नारायण राणे यांचे राजकीय मूल्य हे वारंवार तडजोडीने कमी करण्यात भाजपला यश; राज्यसभेच्या प्रस्तावाने राज्य मंत्रीमंडळ प्रवेशाचे मार्ग बंद करण्यात भाजपला यश

==========================================
भाजपकडून राज्यसभेसाठी महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे तर नारायण राणे यांनी भाजपकडून राज्यसभेसाठी अर्ज भरला असून राज्यसभेत शेतकऱ्यांच्या व्यथा मांडणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 

भाजपकडून राज्यसभेसाठी चौथा उमेदवार: विजया रहाटकरही मैदानात; निवडणुकीत रंगत

महाराष्ट्रातून पुढील महिन्यात रिक्त होत असलेल्या राज्यसभेसाठी सहा जागांसाठी भाजपने आपला चौथा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवला आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या रूपाने भाजपने सातवा उमेदवार दिला आहे. आज दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. जर त्यांनी अर्ज मागे घेतला नाही तर राज्यसभेची बिनविरोध निवडणूक ढळणार आहे. दरम्यान, आपल्या पक्षाच्या एखाद्या उमेदवाराचा अर्ज रद्दबादल ठरू नये म्हणून खबरदारीचा उपाय रहाटकर यांचा अर्ज दाखल केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. मात्र, पुढील तीन तासात याबाबतचे चित्र स्पष्ट होईल. भाजपने यापूर्वीच नारायण राणे, प्रकाश जावडेकर, केरळ भाजपचे प्रदेशाध्यक्ष व्ही. मुरलीधरन यांना उमेदवारी दिली आहे. विधानसभेतील सदस्य संख्याबळानुसार भाजपचे तीनच उमेदवार निवडून येऊ शकतात. मात्र, भाजपने आता चौथा उमेदवार दिला आहे. तर काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी यांचा प्रत्येकी 1-1 उमेदवार निवडून येऊ शकतो. यासाठी काँग्रेसने ज्येष्ठ पत्रकार व विचारवंत कुमार केतकर यांना संधी दिली आहे तर, शिवसेना व राष्ट्रवादीने आपापले विद्यमान खासदार अनिल देसाई आणि वंदना चव्हाण यांना रिंगणात उतरवले आहे.

भाजपने संचेती यांना राज्यसभेची उमेदवारी नाकारली

नागपुरातील भाजपचे ज्येष्ठ नेते व विद्यमान राज्यसभा सदस्य अजय संचेती यांना पक्षाने पुन्हा राज्यसभेवर न पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाने आज महाराष्ट्रातून राज्यसभेवर पाठवणाऱ्या उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यात संचेती यांच्या नावाचा समावेश नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या गटातून बाहेर पडण्याचा प्रयत्न संचेती यांना महागात पडला आहे. गडकरी हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर संचेती यांचे पक्षात महत्त्व वाढले होते. गडकरी यांच्या प्रयत्नामुळेच संचेती यांना २०१२ मध्ये राज्यसभेची उमेदवारी मिळाली होती. राज्यात सत्ताबदल होऊन मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस विराजमान झाल्यानंतर संचेती यांचा कल फडणवीस यांच्याकडे दिसून आला. ते फडणवीस यांच्या प्रत्येक कार्यक्रमांत दिसू लागले होते. त्यामुळे गडकरी गटात नाराजी होती. त्याचा फटका संचेती यांना बसला आणि त्यांचे दुसऱ्यांदा राज्यभेत जाण्याचे स्वप्न भंगले आहे. महाराष्ट्रातून भाजपने चक्क केरळचे व्ही. मुरलीधरन यांना उमेदवारी दिली आहे.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बाळ आपटे यांच्या रिक्त झालेल्या जागेवर अजय संचेती यांना २०१२ मध्ये उमेदवारी देण्यात आली होती. यावेळी महाराष्ट्रातून भाजनपे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना राज्यभेची उमेदवारी दिली आहे.




 16 राज्यातील राज्यसभेच्या एकूण 58 जागांसाठी 23 मार्चला मतदान होणार आहे. सकाळी 9 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान झाल्यावर त्याच दिवशी संध्याकाळी 5 वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. एप्रिल महिन्यात राज्यसभेचे 58 खासदार निवृत्त होणार आहेत. उत्तर प्रदेशातील सर्वाधिक 10, तर महाराष्ट्रातील 6 जागांचा समावेश आहे. विधानसभेचे संख्याबळ पाहता, राज्यातील तीन जागांवर भाजपचा विजय निश्चित मानला जातो.प्रकाश जावडेकर हे विद्यमान केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री असून ते सध्या मध्य प्रदेशमधून राज्यसभेवर गेले आहेत. त्यामुळे आता ते होम ग्राऊंडवरुन म्हणजे महाराष्ट्रातून राज्यसभेत जातील. काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर नारायण राणेंनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष स्थापन करुन एनडीएत सहभाग घेतला. मात्र राज्यातील मंत्रिपदाच्या आशेवर असणारे राणे आता राज्यसभेच्या दिशेने कूच करत आहेत. एकनाथ खडसे आरोपांच्या जंजाळात अडकल्यापासून मंत्रिमंडळापासून दूर आहेत. त्यामुळे त्यांना दिल्लीत नेण्याच्या पक्षाच्या हालचाली होत्या, मात्र खडसे त्यासाठी अनुत्सुक होते.सचिन तेंडुलकर, रेखा, अनु आगा या तिघांचा कार्यकाळ संपणार आहे. त्यामुळे राष्ट्रपती नियुक्त तीन नवे खासदार कोण असणार याचीही उत्सुकता आहे.

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) PUNE

===================================================== 
सचिन तेंडुलकर--27 एप्रिल 2012 रोजी खासदार म्हणून नियुक्त. संसदेत काहीही बोलू शकला नाही. गेल्या हिवाळी अधिवेशनात बोलण्यासाठी 7 मिनिटे उभा राहिला पण गोंधळामुळे बोलू शकला नाही.22 लेखी प्रश्न विचारले. त्यापैकी 8 प्रश्न रेल्वेशी संबंधित होते. सरकारने सचिनला दोनच आश्वासने दिली.
रेखा --27 एप्रिल 2012 ला राज्यसभेत पाऊल ठेवले. एखही प्रश्न विचारला नाही. काहीही स्पेशल मेन्शन नाही. एकही प्रायव्हेट बिल सादर केले नाही. उपस्थितीत्या 78 टक्के राष्ट्रीय सरासरीशी तुलना करता त्या फक्त 5% काळ उपस्थित राहिल्या.
जया बच्चन--सपा खासदार म्हणून राज्यसभेवर 3 एप्रिल 2012 ला निवड. चर्चांमध्ये सहभाग, प्रश्न विचारल्यावर आणि स्पेशल मेन्शनअंतर्गत मुद्दे उचलण्याचा चांगला रेकॉर्ड. त्यांची संसदेमध्ये 77% टक्के उपस्थिती राहिली. 143 चर्चांमध्ये सहभाग घेतला, 143 प्रश्न विचाराले.
===================================================== 

कोणत्या पक्षाचे किती जण होणार निवृत्त

भाजप17
काँग्रेस11
सपा06
राष्ट्रपतींद्वारे नियुक्ती03
तृणमूल काँग्रेस03
बीजेडी02
जदयू02
राष्ट्रवादी काँग्रेस02
माकप01
बसप01
अपक्ष01
शिवसेना01
टीडीपी02


कोणत्या राज्यातून कोणाला किती जागा मिळणार

* महाराष्ट्र- राज्यातील राज्यसभेचे सहा सदस्य एप्रिलमध्ये निवृत्त होणार आहेत. रिक्त जागेपैकी दोन भाजपला तर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीला प्रत्येकी एक जागा मिळू शकते. सहाव्या जागेसाठी मोठी चुरस होण्याची शक्यता आहे. 
* उत्तर प्रदेश- सध्याच्या विधानसभेच्या स्थितीनुसार या राज्यातील राज्यसभेच्या 9 पैकी 7 जागा भाजपला तर काँग्रेसला चार जागा मिळतील. तर सपाला दोन जागा मिळतील.  
* मध्य प्रदेश- येथील राज्यसभेच्या पाच पैकी चार जागा भाजपला तर काँग्रेसला एक जागा मिळू शकते. 
* आंध्र प्रदेश- तीन पैकी दोन जागा तेलगु देशम पक्षाला तर एक जागा अन्य पक्षाला मिळू शकते. 
* कर्नाटक- येथील चार पैकी तीन जागा काँग्रेसला तर एक जागा भाजपला मिळू शकते. 
* पश्चिम बंगाल- राज्यातील चार पैकी तीन जागा तृणमूल काँग्रेसला तर एक जागा माकपला मिळण्याची शक्यता आहे. 
* गुजरात- राजसभेच्या चार पैकी दोन जागा भाजपला तर दोन काँग्रेसला मिळतील.  
* बिहार- येथील पाच पैकी 3 जागा जदयू-भाजपला तर 2 जागा राजद-काँग्रेस यांना मिळू शकते
* तेलंगणा- दोन पैकी एक टीआरएसला तर एक काँग्रेसला मिळू शकते.  
* राजस्थान- येथील तिन्ही जागा भाजपलाच मिळतील.
* ओडिसा- 3 पैकी दोन जागा बिजू जनता दल आणि एक जागा अन्य पक्षाकडे जाऊ शकते. 
* हरियाणा, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि छत्तीसगडमधील प्रत्येकी एक जागा रिक्त होणार आहे. या सर्व भाजपलाच मिळण्याची शक्यता आहे. 

उत्तर प्रदेशात सर्वाधिक जागा...

पुढील महिन्यात राज्यसभेच्या ज्या जागांसाठी निवडूक होणार आहे, त्यात उत्तर प्रदेशच्या सर्वाधिक 10 जागांचा समावेश आहे.अरुण जेटली हे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. टीम मोदीमधील ते महत्त्वाचे सदस्य आणि केंद्रीय अर्थमंत्री आहेत. त्यामुळे त्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर त्यांना पुन्हा एकदा उमेदवारी मिळणार हे नक्की आहे.राज्यसभेच्या जागांचा विचार केला तर सर्वाधिक जागा या उत्तर प्रदेशमध्ये आहेत. उत्तर प्रदेशातून राज्यसभेसाठी 10 जणांची निवड होणार आहे. उत्तर प्रदेशात भाजप पूर्ण बहुमतात आहे. विधानसभेच्या 403 जागांपैकी 312 जागा भाजपकडे आहेत. त्यामुळे येथून जेटली सहज विजयी होऊ शकतात. यानंतर महाराष्ट्र आणि बिहारमधील 6-6 जागी आणि पश्चिम बंगाल आणि मध्य प्रदेशात 5-5 जागी, गुजरात आणि कर्नाटकात 4-4 जागांसाठी, तर आंध्रप्रदेश, तेलंगाना, ओडिसा, राजस्थानच्या 3-3 जागी निवडणूक होणार आहे. त्याचप्रमाणे झारखंडमध्ये 2 जागी तर छत्तीसगड, हरियाणा, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या प्रत्येकी 1 जागेवर राज्यसभेसाठी निवडणूक होणार आहे.उत्तर प्रदेशातील 10 पैकी 9 जागांवरील खासदार 2 एप्रिलला निवृत्त होणार आहे. यात जया बच्चन (सपा) आणि प्रमोद तिवारी (काँग्रेस) यांचा देखील समावेश आहे. एक जागा मायावती यांनी राजीनामा दिल्यामुळे रिकामी झाली आहे.गुजरातमध्ये राज्यसभेसाठी ऑगस्ट 2017 मध्ये निवडणूक झाल्यानंतर 58 जागांसह भाजप राज्यसभेत सर्वात मोठा पक्ष बनला होता. सध्या राज्यसभेत काँग्रेसच्या 57 जागा आहेत.


जया बच्चन यांच्याकडे १ हजार कोटींची संपत्ती

बॉलिवूड अभिनेत्री आणि समाजवादी पार्टीच्या खासदार जया बच्चन या राज्यसभेतील सर्वात श्रीमंत सदस्या ठरू शकतात. त्यांनी राज्यसभेसाठी नामांकन अर्ज दाखल केला असून त्यात त्यांची संपत्ती १ हजार कोटी इतकी दाखवली आहे. त्यामुळे राज्यसभेवर निवडून आल्यास त्या सर्वात श्रीमंत राज्यसभा सदस्य ठरणार आहेत. जया बच्चन यांनी आज चौथ्यांदा राज्यसभेसाठी नामांकन अर्ज दाखल केला आहे. भाजचे राज्यसभा सदस्य रवींद्र किशोर सिन्हा यांनी २०१४ मध्ये त्यांची संपत्ती ८०० कोटी दाखविली होती. तर जया बच्चन यांनी आज सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात एकूण १ हजार कोटींची मालमत्ता दाखविली आहे. त्यामुळे राज्यसभेवर निवडून आल्या तर त्या सिन्हा यांना मागे टाकून सर्वात श्रीमंत खासदार बनणार आहेत. २०१२ मध्ये समाजवादी पार्टीकडून राज्यसभेसाठी नामांकन अर्ज भरताना जया बच्चन यांनी त्यांची एकूण संपत्ती ४९३ कोटी रुपये दाखविली होती. २०१२ मध्ये त्यांच्याकडे केवळ १५२ कोटी रुपये स्थावर आणि २४३ कोटी रुपये जंगम मालमत्ता होती. आज सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी त्यांची आणि पती अमिताभ बच्चन यांची एकूण स्थावर मालमत्ता ४६० कोटी रुपये दाखविली आहे. त्याशिवाय त्यांच्याकडे ५४० कोटी रुपयांची जंगम मालमत्ता असल्याचंही त्यांनी नमूद केलं आहे. प्रतिज्ञापत्रानुसार बच्चन दाम्पत्यांकडे एकूण ६२ कोटींचं सोनं आणि इतर दागिने आहेत. त्यात अमिताभ यांच्याकडे ३६ कोटींचे तर जया बच्चन यांच्याकडे २६ कोटींचे दागिने आहेत. या दोघांकडे १२ कार असून त्यांची किंमत १३ कोटी रुपये एवढी आहे. त्यात रोल्स रॉयस, तीन मर्सिडीज, एक पोर्श आणि एका रेंज रोव्हरचा समावेश आहे. अमिताभ यांच्याकडे एक टाटा नॅनो कार आणि एक ट्रॅक्टर सुद्धा आहे. शिवाय अमिताभ यांच्याकडे ३.४ कोटींच्या घड्याळ असून जया बच्चन यांच्याकडे असलेल्या घड्याळांची किंमत ५१ लाख रुपये एवढी आहे.

नऊ लाखाचा पेन 

अमिताभ यांच्याकडील एका पेनची किंमत ९ लाख रुपये इतकी आहे. बच्चन दाम्पत्यांकडे फ्रान्सच्या ब्रिगनॉगन प्लेज येथे ३,१७५ स्क्वेअर मीटर एवढे आलिशान घर आहे. त्याचप्रमाणे नोएडा, भोपाळ, पुणे, अहमदाबाद आणि गांधीनगरमध्येही त्यांची प्रॉपर्टी आहे. जया बच्चन यांच्या नावे लखनऊ येथील काकोरीमध्ये १.२२ हेक्टरची शेती आहे. त्याची किंमत २.२ कोटी इतकी आहे. तर अमिताभ यांच्या नावे बाराबंकी जिल्ह्यातील दौलतपूर येथे ३ एकरचा प्लॉट असून त्याची किंमत ५.७ कोटी इतकी आहे. 

दरम्यान, भाजपाकडून उमेदवारी अर्ज भरणारे नारायण राणे हे ८४ कोटी रुपयांचे धनी आहेत. विशेष म्हणजे राणेंपेक्षा त्यांची पत्नी जास्त श्रीमंत आहेत. ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांची संपत्ती अडीच कोटींच्या घरात आहेत. भाजपाचे केरळचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि उमेदवार व्ही. मुरलीधरन यांची मालमत्ता सर्वात कमी आहे. त्यांच्या ३३ हजार रुपयांची जंगम मालमत्ता असून पत्नीकडे एका गाडीसह सात लाखांची मालमत्ता आहे. त्यांच्या पत्नीकडे २० लाखांची जमीन देखील आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे पुण्यात दीड कोटींच्या राहत्या घरासह २६ लाखांचे दागिने व पत्नीकडे अडीच कोटींची जंगम मालमत्ता आहे.

केरळच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक...

केरळच्या एका राज्यसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. येथील खासदार विरेंद्र कुमार यांनी डिसेंबरमध्ये राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजिनामा दिला होता. त्यांचा कार्यकाळ एप्रिल 2022 पर्यंत होता


7 राज्यातील 26 जागांसाठी मतदान

राज्यसभेच्या 59 जागांसाठी शुक्रवारी सात राज्यांत मतदान होत आहे. आज सायंकाळी निकालही जाहीर होईल. 17 राज्यांत या जागा आहेत. परंतू अगोदरच 33 उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. त्यामुळे शुक्रवारी 7 राज्यांतील 26 जागांचे निकाल पाहणे आैत्सुक्याचे ठरेल. 7 राज्यांपैकी केरळमध्ये पोटनिवडणूक आहे. या निवडणुकीनंतर राज्यसभेत भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे येईल. त्यांना 12 ते 15 जागांचा फायदा होण्याची शक्यता आहे. पक्षाच्या 38 वर्षांच्या इतिहासात त्यांना प्रथमच 70 पेक्षा जास्त जागा मिळण्याची शक्यता आहे. भाजपची स्थापना 1980 मध्ये झाली होती.


8 पैकी 7 मंत्र्यांची पुन्हा निवड

मध्य प्रदेश : धर्मेंद्र प्रधान, थावरचंद गेहलोत, अजय प्रताप सिंह, कैलाश सोनी (भाजप), राजमणी पटेल (काँग्रेस).
बिहार : रविशंकर प्रसाद (भाजप), वशिष्ठ नारायण सिंह, महेंद्र प्रसाद (जदयू), मनोज झा, अशफाक करीम (राजद), अखिलेश सिंह (काँग्रेस).
गुजरात : पुरुषोत्तम रुपाला, मनसुख मांडविया (भाजप), नारायण राठवा, अमी याज्ञिक (काँग्रेस).
राजस्थान : किरोडी मीणा, भूपेंद्र यादव, मदन लाल (सर्व भाजप ).
आंध्र प्रदेश: सी. एम. रमेश, के. रवींद्र कुमार (टीडीपी), वेमीरेड्डी प्रभाकर रेड्डी (वायएसआर काँग्रेस).
आेडिशा : प्रशांत नंदा, सौम्य रंजन, अच्युत सामंत (बीजेडी).
उत्तराखंड: अनिल बलुनी (भाजप).
हरियाणा: सेवानिवृत्त लेफ्टनंट जनरल डी. पी. वत्स.
हिमाचल : जे. पी. नड्डा.


या राज्यात सुरु आहे निवडणूक

उत्तर प्रदेश : 10 जागांवर मतदान. त्यात केंद्रीय मंत्री अरुण जेटलीही. सपाचे तिकीट जया बच्चन यांना. 
झारखंड : येथे 2 जागा. एका जागेसाठी 28 मते हवीत. भाजपच्या 43 आणि सहकारी आजसूची 4 मते. भाजपला दुसरी जागा जिंकण्यासाठी आणखी 9 मतांची गरज. 
कर्नाटक : राज्यात 4 जागांवर मतदान. काँग्रेसचे 3 उमेदवार मैदानात. भाजप आणि जेडीएसचा एक-एक उमेदवार मैदानात. काँग्रेसला तिन्ही जागांवर विजय निश्चित. 
छत्तीसगड: एका जागेवर भाजप-काँग्रेस समोरासमोर. जिंकण्यासाठी 46 मतांची गरज. भाजपचे 49 तर काँग्रेसचे 39 आमदार आहेत. 
बंगाल : येथे 5 जागांवर मतदान. तृणमूलचे 4, काँग्रेस, माकपचा प्रत्येकी 1 उमेदवार. 
तेलंगण : राज्यात 3 जागांसाठी मतदान. टीआरएसचे 3, काँग्रेसचा एक उमेदवार मैदानात. 

केरळ : एका जागेसाठी यूडीएफ आणि एलडीएफ उमेदवार मैदानात.

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) 

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब)

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
================================================

महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
================================================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
================================================