Thursday 22 February 2018

भावाची माया आटली!; शिवसेना परळी मतदारसंघातून लढणार निवडणूक ; मतांचे विभाजन-शिवसेनेच्या निर्णयाचा लाभ राष्ट्रवादीला!

भावाची माया आटली!; शिवसेना परळी मतदारसंघातून लढणार निवडणूक ; मतांचे विभाजन-शिवसेनेच्या निर्णयाचा लाभ राष्ट्रवादीला!

ठाकरे कुटुंबीयांवर पवारांचा जिव्हाळा- मुलाखतीचा अंमल 




भावाची माया आटली!; शिवसेनेने परळी मतदारसंघातून लढणार निवडणूक लढणार असल्याचे ठरवले आहे. हा निर्णय ठाकरे कुटुंबीयांवर पवारांचा जिव्हाळा- मुलाखतीचा अंमल आहे असे दिसून येते.परळी मतदारसंघातून स्व. गोपीनाथ मुंडे प्रतिनिधित्व करीत होते युतीमुळे शिवसेनेला स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याचा प्रसंग आला नव्हता मात्र युती संपुष्टात आल्यानंतर स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनाने पंकज मुंडे यांना बहिण मानून शिवसेनेने उमेदवार दिला नव्हता. परंतु शिवसेनेच्या भूमिकेत बदल झाला असून त्याचा लाभ निश्चितच राष्ट्रवादीला होणार आहे व भाजपला नुकसान होईल हे मागील निवडणूक निकाल व राजकीय सद्यस्थिती वरून स्पष्ट होत आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर परळी विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत पंकजा मुंडे यांच्याविरोधात उमेदवार न देणाऱ्या शिवसेनेने आता आपली भूमिका बदलली आहे. शिवसेनेने आगामी विधानसभा निवडणुकीत याठिकाणी पक्षाचा उमेदवार उभा करायचे ठरवले आहे. त्यासाठी काही दिवसांपूर्वीच मातोश्रीवरून स्थानिक नेत्यांना चाचपणी करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार पक्षनिरीक्षक आमदार सुभाष साबणे यांनी परळी आणि आष्टी परिसराचा दौराही केला. यानंतर झालेल्या आढावा बैठकीत बोलताना त्यांनी परळीतून विधानसभा निवडणूक लढणार असल्याचे सांगितले. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना परळी विधानसभेची निवडणूक लढणार असल्याचा संदेश दिला आहे. यामुळे आपण तयारीला लागावे, असे त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले होते. शिवसेनेच्या या घोषणेनंतर परळी विधानसभा मतदारसंघात पंकजा मुंडे, धनंजय मुंडे आणि सुभाष साबणे यांच्यात तिरंगी लढत रंगण्याची चिन्हे आहेत. याविषयी पंकजा मुंडे यांना विचारले असता, कोणाही निवडणूक लढवावी, मी त्यासाठी सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले. जो कोणी असेल त्याला निवडणूक लढवावी लागेल, त्याशिवाय जिंकण्यात मजा नाही. मी मागच्या दाराने आलेले नाही, जनतेतून निवडून आले आहे, असे सांगत पंकजा यांनी धनंजय मुंडे यांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला. परळी हा महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांचा मतदारसंघ आहे. धनंजय मुंडे याच मतदारसंघातून निवडणूक लढवण्याच्या मुद्द्यावरुन भाजपमधून बाहेर पडले होते. तेव्हापासूनच या मतदारसंघात भाऊ-बहिणीत मोठी लढत पाहायला मिळते. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या अकाली निधनानंतर गेल्या निवडणुकीत शिवसेनेने परळी मतदारसंघातून उमेदवार उभा केला नव्हता.
जात-पात न मानणारा बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखा दुसरा एकही नेता या देशामध्ये झाला नाही, असं पुण्यातील मुलाखतीत सांगणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निशाणा साधला. २००० साली वयाच्या ७० व्या वर्षी बाळासाहेबांना अटक करताना त्यांच्याबद्दलची आपुलकी कुठे गेली होती, असा रोखठोक सवाल त्यांनी केला मात्र अटक करण्यात अग्रेसर असलेले छगन भुजबळ आज तुरुंगात आहेत. उद्धव ठाकरे यांनी निशाणा साधला असला तरी तो मुलाखती सारखा राजकारणाचाच भाग आहे हे परळी विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढविण्याचे निश्चीत केल्याने स्पष्ट होत आहे. पुण्यात काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शरद पवार यांची प्रकट मुलाखत घेतली. या मुलाखतीत पवार यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख केला होता. हाच धागा पकडून उद्धव यांनी आज पवार यांच्यावर निशाणा साधला. २००० साली बाळासाहेबांना अटक करण्याचा प्रयत्न केला. त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी कुणीही ठोस भूमिका घेतली नाही. त्यांची अटक रोखण्यासाठी कुणीही प्रयत्न केले नाहीत. तेव्हा कुणीही आपुलकी दाखवली नाही. उलट ते तुरुंगात कसे जातील हेच सगळ्यांनी पाहिले, असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.


पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब)

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
================================================

महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
================================================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
================================================

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.