Saturday 10 February 2018

ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व पोट निवडणुक कार्यक्रमात बदल ; २५ ऐवजी २७ फेब्रुवारी २०१८ ला मतदान

ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व पोट निवडणुक कार्यक्रमात बदल
२५ ऐवजी २७ फेब्रुवारी २०१८ ला मतदान : नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास मुदतवाढ

माहे मार्च 2018 ते मे 2018 या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापित ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत सरपंच पदासह सर्व पदांसह सर्व सदस्य पदांसाठी तसेच रिक्त पदांच्या पोट निवडणुकांसाठी निवडणुक कार्यक्रमामध्ये अंशत: बदल केल्याबाबतचे सुधारीत आदेश राज्य निवडणूक आयोगाने  काल ९ फेब्रुवारी २०१८ रोजी दिले आहेत. यापूर्वी आयोगाने २२ जानेवारीला व २ फेब्रुवारी २०१८ ला निवडणूक कार्यक्रमाचे निर्देशपत्रे जारी केले होते. यामध्ये मतदान दि. २५ फेब्रुवारी २०१८ रोजी घेण्यात येणार होते. निवडणुक कार्यक्रमामध्ये अंशत: बदल केल्याने आता मतदान २७ फेब्रुवारी २०१८ रोजी घेण्यात येणार आहे. नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची मुदत वाढवून सोमवार १२ फेब्रुवारी २०१८ करण्यात आली आहे.
 निवडणुकांसाठी संगणीकृत पद्धतीने दि. ५ फेब्रुवारी २०१८ ते १० फेब्रुवारी २०१८ या कालावधीत नामनिर्देशनपत्र भरून स्वीकृतीची प्रक्रिया नियोजित होती मात्र तांत्रिकदृष्ट्या अडचणीमुळे संबंधित ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी संगणीकृत पद्धतीने नामनिर्देशनपत्र भरण्यात अडचणी येत असल्याच्या तक्रारी पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) संस्थेसह संबंधित जिल्ह्यातील राजकीय पक्षांनी केल्या होत्या. या तक्रारींची दखल राज्य निवडणूक आयोगाने घेतली. निवडणूक कार्यक्रम निवड होत नसल्याने उमेदवार अर्ज भरण्यापासून वंचित राहिले होते. उमेदवाराचे रजिस्ट्रेशनच होत नसून रजिस्ट्रेशनकरिता निवडणूक कार्यक्रम निवड होत नसल्याने हि समस्या निर्माण झाली होती. निवडणुकांसाठी संगणीकृत पद्धतीने दि. ५ फेब्रुवारी २०१८ ते १२ फेब्रुवारी २०१८ या कालावधीत नामनिर्देशनपत्र भरून स्वीकृतीची प्रक्रिया  राबविण्यात येणार आहे.
ज्या ग्रामपंचायतीच्या संगणीकृत पद्धतीने नामनिर्देशनपत्र भरताना तांत्रिकदृष्ट्या अडचणी आल्या त्यांना पारंपारिक पद्धतीने भरलेली नामनिर्देशनपत्र स्वीकारण्यास यावीत असेही निर्देश आयोगाने दिले आहेत. सुधारीत आदेशाने ग्रामपंचायत निवडणुकीतील इच्छुकांना दिलासा मिळाला आहे.


नामनिर्देशनपत्रांसाठी संगणक प्रणाली

        नगरपरिषदांसाठी बहुसदस्यीय पद्धतीनुसार आणि थेट अध्यक्षपदांसाठी निवडणुका होतील; तर नगरपंचायतींच्या निवडणुका एकसदस्यीय पद्धतीने होतील. या निवडणुकांसाठी उमेदवारांना नामनिर्देशनपत्रे व शपथपत्रे सहजरितीने भरता यावे, यासाठी एक संगणक प्रणाली विकसित केली आहे. त्यासाठीच्या संकेतस्थळावरील नामनिर्देशनपत्रे आणि शपथपत्रात आवश्यक ती सर्व माहिती भरून त्याची प्रत काढावी (प्रिंट आऊट) आणि त्यावर सही करून ते निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे विहित वेळेत सादर करणे आवश्यक राहील

जात वैधता प्रमाणपत्राचा पुरावा

        राखीव प्रभागातून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे; परंतु जात वैधता प्रमाणपत्र उपलब्ध नसल्यास त्यासाठी पडताळणी समितीकडे केलेल्या अर्जाची पोच पावती नामनिर्देशनपत्रासोबत सादर करण्याची मूभा देण्यात आली आहे. अशा उमेदवारांना निवडून आल्याचे घोषित झाल्याच्या दिनांकापासून सहा महिन्यांच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे, अन्यथा त्यांची निवड भूतलक्षी प्रभावाने रद्द करण्याची संबंधित अधिनियमात तरतूद करण्यात आली आहे

माहे मार्च 2018 ते मे 2018 मध्ये मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूकीत सरपंचपदासह सर्व सदस्य पदांसाठी तसेच रिक्त पदांच्या पोट निवडणूकांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये राज्यभरातील ३१७ ग्रामपंचायतीच्या निवडणुका २७ फेब्रुवारी २०१८ रोजी होणार आहेत. ३१७ ग्रामपंचायतीमध्ये कोकण विभागातील ४२, नाशिक विभागातील ७५, पुणे विभागातील १३२, औरंगाबाद विभागातील ३५, अमरावती विभागातील ११, नागपूर विभागातील २२ ग्रामपंचायतीचा समावेश आहे. पुणे जिल्ह्यातील ३७ ग्रामपंचायतीचा समावेश आहे.तसेच राज्यभरातील रिक्त पदे असलेल्या ग्रामपंचायतीची संख्या ४१०१ असून त्यामधील ६८७१ रिक्तपदांकरिता देखील निवडणुक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता.

पुणे जिल्ह्यातील ३७ ग्रामपंचायतीच्या निवडणुका

पुणे जिल्ह्यातील ३७ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. याव्यतिरिक्त रिक्त पदे असलेल्या २७४ ग्रामपंचायतीमधील ५७६ सदस्यांच्या निवडणुकीसाठी २७ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. नामनिर्देशन अर्ज दिनांक ५ फेब्रुवारी २०१८ ते १२ फेब्रुवारी २०१८ पर्यंत दाखल करता येणार आहेत तर 14 फेब्रुवारी- उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात येईल. 16 फेब्रुवारी- उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असून २७ फेब्रुवारी २०१८ रोजी मतदान घेण्यात येणार असून २८ फेब्रुवारी २०१८ रोजी मतमोजणी होणार आहे. पुणे जिल्ह्यातील वेल्हे-1, मावळ-६, भोर-९, जुन्नर-1 मुळशी-७ खेड-६ आंबेगाव- ७ या ३७ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत.




cHANDRAKANT bHUJBAL 

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB)

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब)


No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.