Saturday 10 February 2018

पुणे महापालिकेच्या प्रभाग क्र २२-क या जागेसाठी एप्रिल 2018 मध्ये पोटनिवडणूक

पुणे महापालिकेच्या प्रभाग क्र २२-क या जागेसाठी एप्रिलमध्ये पोटनिवडणूक

मतदारयादीचा कार्यक्रम जाहीर; ८ मार्च २०१८ पर्यंत मतदार याद्या अधिप्रमाणित करण्याचे निदेश
पुण्याच्या माजी महापौर आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या विद्यमान नगरसेविका चंचला संदीप कोद्रे यांचे आकस्मित निधन झाल्याने प्रभाग क्र २२ मधील क हि जागा रिक्त झाली होती. पुणे महापालिकेच्या प्रभाग क्र २२ मधील क या जागेसाठी एप्रिलमध्ये पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे. या पोट निवडणुकीसाठी मतदारयादीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून ८ मार्च २०१८ पर्यंत मतदार याद्या अधिप्रमाणित करण्याचे निदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत.




पुण्याच्या माजी महापौर आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या विद्यमान नगरसेविका चंचला संदीप कोद्रे यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्‍याने निधन झाल्याने हि जागा रिक्त झाली आहे. चंचला कोद्रे यांनी आपला महापौर पदाचा कार्यकाळ अत्यंत संयतपणे हाताळला. सभागृहात विषय मांडणी आणि त्याचा पाठपुरावा त्या चिकाटीने करत असत. अखिल मुंढवा नवरात्र महोत्सवाच्या आणि अखिल मुंढवा दहीहंडी महोत्सवाच्या त्या अध्यक्षा होत्या. सगुणा महिला मंडळ संचलित महिला वसतिगृहाच्या त्या संचालिका होत्या. मूळच्या सातारा जिल्ह्यातील वाईच्या असलेल्या कोद्रे या लग्नानंतर पुण्यात आल्या. त्यांचे शिक्षण इंग्रजी विषयात एम.ए.पर्यंत झाले. पुणे महानगरपालिकेत 2012 मध्ये त्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तिकिटावर पहिल्यांदा नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या. पहिल्यांदाच निवडून आल्या असल्या तरी याच कारकीर्दीत त्यांना महापौर होण्याचा सन्मान मिळाला. सप्टेंबर 2013 ते सप्टेंबर 2014 या कालावधीत त्यांनी महापौर म्हणून काम पाहिले. पुणे कॅन्टोन्मेन्ट सहकारी बॅंक आणि सह्याद्री नागरी सहकारी पतसंस्था यांच्या माध्यमातून गरजू आणि तळागाळातील लोकांना आर्थिक सहाय्य केले. त्यांचे सासरे कैलासमामा कोद्रे यांनीही नगरसेवक म्हणून काम केले आहे. पती संदीप हे देखील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आहेत. त्यांच्या सहकार्याने चंचला यांनी मुंढवा भागातील नागरिकांच्या समस्या सोडवण्याचा सातत्याने प्रयत्न केला होता. सर्वसाधारण महिलांसाठी प्रभाग क्र २२-क जागा असून कैलासमामा कोद्रे यांच्या कुटुंबातील महिलेला संधी दिली जाईल असा अंदाज राष्ट्रवादी पक्षाकडून वर्तविला जात आहे.


Prabhag No. 22: Mundhwa - Magarpatta City
AChetan Viththal Tupe (NCP)
BHemlata Nilesh Magar (NCP)
CChanchala Sandip Kondre ( NCP)
DSunil Jaywant Gayakwad (NCP)




CHANDRAKANT BHUJBAL 

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB)

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब)



No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.