Thursday 31 October 2019

भारताचा अद्यावत नकाशा; आजपासून भारतात 28 राज्य आणि 9 केंद्रशासित प्रदेश; महत्वपूर्ण बदल पहा

जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये आजपासून झेंडा, हक्क, अधिकार, कायदा अस्तित्वात

भारताचा अद्यावत नकाशा; आजपासून भारतात 28 राज्य आणि 9 केंद्रशासित प्रदेश झालेले आहेत. झेंडा, हक्क, अधिकार, कायदे आदी जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये आजपासून या दहा गोष्टी बदलल्या आहेत. लोकसभेत मंजूर झालेल्या जम्मू-काश्मीर पूनर्रचना विधेयकानुसार जम्मू-काश्मीर आणि लडाख गुरुवारी (३१ ऑक्टोबर २०१९ च्या) मध्यरात्री १२ वाजल्यापासून केंद्रशासित प्रदेश झाले आहेत. भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीदिनी हा मोठा बदल करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता. ५ ऑगस्ट रोजी केंद्र सरकारने जम्मू काश्मीरमधून कलम ३७० आणि ३५ ए हटवण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयामुळे स्वतंत्र भारताच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच एखाद्या राज्याचे केंद्रशासित प्रदेश रुपांतर करण्यात आले आहे. आजपासून जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये नवे नियम लागू होणार आहेत. जाणून घेऊयात आजपासून या प्रदेशात होणाऱ्या दहा महत्वपूर्ण बदलाबद्दल माहिती खालीलप्रमाणे- 
१) जम्मू काश्मीरचे वेगळे संविधान राहणार नाही-
जम्मू-काश्मीर आणि लडाख केंद्रशासित प्रदेश झाल्याने या प्रदेशात भारतीय संविधान लागू झाले आहे. कलम ३७० मुळे जम्मू काश्मीर राज्याला विशेष दर्जा अंतर्गत वेगळे संविधान बहाल करण्यात आले होते. आजपासून ते रद्द होऊन तिथे भारतीय संविधान लागू होईल.
२)नागरिकत्व-
जम्मू-काश्मीर आणि लडाखमधील नागरिकांना आता औपचारिकरित्या केवळ भारताचे नागरिक असतील. कलम ३७० नुसार जम्मू-काश्मीरमधील नागरिकांना राज्याचे आणि भारताचे अशी दोन नागरिकत्व बहाल करण्यात आली होती. त्यामुळे आजपासून काश्मीरी लोकांकडे केवळ भारताचे नागरिकत्व असेल.
३)मालमत्तेचा हक्क-
जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये कोणत्याही भारतीयाला इतर राज्यांप्रमाणे जमीनीचे व्यवहार करण्याचा अधिकार असेल. कलम ३७० नुसार जम्मू-काश्मीरमध्ये फक्त स्थानिकांना मालमत्ता, जमीन खरेदी विक्रीचा अधिकार होता. आता भारतातील कोणत्याही नागरिकाला जम्मू-काश्मीरमध्ये मालमत्ता विकत घेता येईल.
४)वेगळा झेंडा-
जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये आजपासून भारताच्या राष्ट्रध्वज फडकेल. जम्मू-काश्मीरला याआधी राज्याचा वेगळा झेंडा होता. हा झेंडा या पुढे अस्तित्वात असणार नाही. जम्मू-काश्मीरमध्ये या पुढे केवळ भारताचा तिरंगाच फडकवला जाईल.
५)मूलभूत अधिकार-
जम्मू-काश्मीर आणि लडाखमधील नागरिकांना भारतीयांप्रमाणे सर्व मूलभूत अधिकार बहाल केले जातील. कलम ३७० मुळे जम्मू काश्मीरमधील नागरिकांना देशातील इतर नागरिंकाना मिळणारे अधिकार मिळत नव्हते. जम्मू काश्मीरमधील नागरिकांना काही अधिकारांपासून वंचित रहावे लागत होते. केवळ मालमत्तेसंदर्भात आणि राज्यातील अधिकार त्यांना होते. मात्र ३१ ऑक्टोबर २०१९ पासून त्यांना इतर भारतीय नागरिकांप्रमाणे सर्व अधिकार मिळतील.
६)वेगळे कायदे-
जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये भारतातील इतर राज्यांप्रमाणे कायदे लागू होतील. कलम ३७० नुसार जम्मू-काश्मीरमध्ये नागरिकत्व, मालमत्तेचा हक्क आणि मूलभूत अधिकारांसंदर्भात भारतीय कायद्यांऐवजी वेगळे कायदे अस्तित्वात होते. आजपासून हे कायदे आणि नियम संपुष्टात येऊन तेथे भारतीय कायदा लागू होईल.
७)केंद्राचे नियंत्रण-
जम्मू-काश्मीर आणि लडाखवर थेट केंद्र सरकारचे नियंत्रण असेल. कलम ३७० मुळे केंद्र सरकारला जम्मू-काश्मीरमध्ये अगदीच मर्यादित अधिकार होते. केंद्राला अगदी आर्थिक आणीबाणी घोषित करण्याचाही हक्क याआधी नव्हता. मात्र आता जम्मू-काश्मीर आणि लडाख केंद्रशासित प्रदेश झाल्यानंतर केंद्र सरकार जम्मू-काश्मीरमध्ये आर्थिक आणीबाणी आणि इतर निर्णय बाकी राज्यांप्रमाणेच घेऊ शकते.
८)भौगोलिक बदल-
जम्मू-काश्मीर आणि लडाख असे विभाजान झाले असून केंद्रशासित प्रदेशांची संख्या नऊ झाली आहे. आजपासून जम्मू-काश्मीर राज्याचे विभाजन होऊन जम्मू-काश्मीर आणि लडाख असे दोन केंद्रशासित प्रदेश अस्तित्वात. जम्मू व काश्मीरमध्ये मंत्रिमंडळ असेल परंतु या राज्याला केंद्रशासित राज्याचा दर्जा असेल.
९)लडाख-लडाख -
लडाख-लडाख हा संपूर्णपणे वेगळा केंद्रशासित प्रदेश आहे. आतापर्यंत लडाख जम्मू-काश्मीरचा हिस्सा होता. आजपासून लडाखचा प्रदेश हा मंत्रिमंडळ नसलेला केंद्रशासित प्रदेश असेल. लडाखला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्याची तिथल्या जनतेची बऱ्याच काळापासून मागणी होती.
१०)केंद्राचे कायदे-
जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये कायदा सुव्यवस्थेसंदर्भातील महत्वाचे निर्णय केंद्र सरकारला घेत येणार आहेत. कलम ३७० मुळे केंद्राला सतत जम्मू-काश्मीर सरकारच्या परवाणग्या घ्याव्या लागत असे. सुरक्षा, परराष्ट्र संदर्भातील निर्णय, आर्थिक आणि संपर्क क्षेत्राशील नियम वगळता इतर कोणत्याही कारणासाठी केंद्राला राज्य सराकराची परवाणगी घ्यावी लागायची. मात्र आता संसदेच्या माध्यमातून या प्रदेशामध्ये कोणताही कायदा लागू करु शकते. यामध्ये अगदी प्रदेशाच्या सीमा ठरवण्यापासून ते नामांतरणापर्यंत सर्वच गोष्टींचा समावेश होतो.

जम्मू-काश्मीर, लडाख केंद्रशासित प्रदेश आजपासून अस्तित्वात

सन १९४७ पासून भारताचा अविभाज्य भाग असलेले जम्मू-काश्मीरचे विभाजन करून दोन केंद्रशासित प्रदेश निर्माण करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतल्यानंतर, उद्या गुरुवारी नवा इतिहास घडला असून हे दोन्ही केंद्रशासित प्रदेश मध्यरात्रीपासून अस्तित्वात आले आहे. आयएएस अधिकारी गिरीशचंद्र मुर्मू आणि राधाकृष्ण माथुर यांना अनुक्रमे जम्मू-काश्मीर आणि लडाखच्या नायब राज्यपालपदी नियुक्त करण्यात आले. या दोन्ही नायब राज्यपालांचा श्रीनगर आणि लेह येथे गुरुवारी स्वतंत्र शपथ सोहळा होणार आहे. जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती गीता मित्तल या त्यांना शपथ देतील. जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० निष्प्रभ करून या राज्याचे विभाजन करण्याचा निर्णय पंतप्रधान मोदींच्या सरकारने घेऊन त्यावर संसदेची मोहर उमटवली. दोन नवीन केंद्रशासित प्रदेश स्थापन करून दहशतवादावर अंकुश ठेवण्यासाठी, तसेच विकास साधण्यासाठी केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरचा नकाशा बदलण्याचा निर्णय घेतला होता. जम्मू-काश्मीरच्या विलीनीकरणावर महाराज हरीसिंह यांनी २६ ऑक्टोबर १९४७ रोजी स्वाक्षरी केल्यानंतर तब्बल ७२ वर्षांनी तात्पुरत्या स्वरूपाचे हे कलम निष्प्रभ करण्यात आले. ५५० राज्यांचे भारतात यशस्वी विलीनीकरण करणारे देशाचे पहिले केंद्रीय गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीला दोन नवीन केंद्रशासित प्रदेश अस्तित्वात आले आहे. 
Mr. Chandrakant Bhujbal 
POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)
===================================================================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
==============================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
=============================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
==========================
======================

विधानसभेतील 50 टक्के आमदार नव्या दमाचे

50 टक्के विद्यमान आमदार पुन्हा विधानभवनात 

महाराष्ट्र विधानसभा-2019 निवडणुकीमध्ये 192 विद्यमान आमदार पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात होते. यामधील 48 आमदारांना मतदारांनी त्यांना घराचा रस्ता दाखवला आहे. विधानसभेतील 50 टक्के आमदार नव्या दमाचे मतदारांनी निवडून दिलेले आहेत तर 50 टक्के विद्यमान आमदार पुन्हा विधानभवनात कार्य करण्याची संधी मतदारांनी देऊन त्यांच्यावर विश्वास दाखवलेला आहे. राज्याच्या राजकारणात महायुतीला कौल देताना मतदारांनी विचारपूर्वक आमदारांची निवड केल्याचे दिसून येत आहे. विद्यमान 288 आमदारांपैकी काही जणांनी राजकीय सोय व लोकसभेत घेल्याने कुटुंबातील सदस्यांना संधी व उमेदवारी मिळवली तर काही आमदारांना उमेदवारीच राजकीय पक्षांनी दिली नाही मात्र ज्या आमदारांना पुन्हा उमेदवारी मिळाली त्यापैकी 144 आमदारांनी पुन्हा जनतेचा विश्वास संपादन करून यश मिळवले आहे. महाराष्ट्र विधानसभा-2019 निवडणुकीमध्ये 192 विद्यमान आमदार पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात होते. यामधील 48 आमदारांना पराभवास सामोरे जावे लागले आहे. महाराष्ट्र विधानसभा-2019 निवडणुकीमध्ये 192 विद्यमान आमदार पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात होते. काही आमदारांनी पदाचे राजीनामे देऊन पक्षांतर करून निवडणूक लढवीली होती. पुन्हा निवडणूक लढवीलेल्या 192 आमदारांच्या मध्ये भाजप व सेनेचे इतर पक्षांच्या तुलने सर्वाधिक होते. पक्षनिहाय संख्या भाजप-87, शिवसेना-47, कॉंग्रेस-23, राष्ट्रवादी-22, अपक्ष-6, शेकाप-2, बविआ-2, प्रहार जनशक्ती-1, सपा-1, एमआयएम-1 अशाप्रकारे आहे. पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या 192 आमदारांच्या मध्ये भाजपचे 87 आमदार असून यामध्ये 11 आमदारांनी पक्षांतर केलेले होते. कॉंग्रेस-5, राष्ट्रवादी-2, अपक्ष-3 तर रासप मधून आलेल्या 1 आमदाराचा समावेश आहे. तर २०१४ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी-1, भाजप-3, शिवसेना-2 प्रमाणे राजकीय पक्षांचे 6 आमदार उमेदवारी डावलल्याने बंड करून पुन्हा अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात होते. शिवसेनेत पक्षांतर केलेल्या 9 विद्यमान आमदारांना सेनेने उमेदवारी दिलेली होती ज्या पक्षातून आलेले आहेत यामध्ये कॉंग्रेस-3, राष्ट्रवादी-4, मनसे-1 आणि बविआ-1 यांना पुन्हा शिवसेनेतून निवडणुकीत संधी मिळाली होती.  पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या 192 आमदारांच्या मध्ये यामध्ये 5 आमदारांच्या मालमत्तांच्या सांपत्तिक स्थितीत मोठ्याप्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आली. या पाच आमदारांमध्ये मंगलप्रभात लोढा (भाजप), प्रशांत रामशेठ ठाकूर (भाजप), समीर मेघे (भाजप), प्रताप सरनाईक (शिवसेना), अबू आझमी (सपा) यांचा समावेश आहे. मंगलप्रभात लोढा (भाजप) मलबार हील या मतदारसंघातून पुन्हा निवडणूक लढवून यश मिळवले आहे. 

पुन्हा विधानसभेत निवडून आलेले आमदार
अ. क्र.
संघ क्र.
मतदारसंघ नाव
नवनिर्वाचित आमदार
पक्ष
1
1
अक्कलकुवा
एड. के.सी.पाडवी
काँग्रेस
2
3
नंदुरबार
विजयकुमार कृष्णराव गावीत
भाजप
3
6
धुळे ग्रामीण
कुणालबाबा रोहिदास पाटील
काँग्रेस
4
8
सिंदखेडा
जयकुमार जितेंद्रसिंह रावल
भाजप
5
9
शिरपूर
काशिराम वेचान पावरा
भाजप
6
12
भुसावळ
संजय वामन सावकारे
भाजप
7
13
जळगाव शहर
सुरेश दामू भोळे (राजूमामा)
भाजप
8
14
जळगाव ग्रामीण
गुलाबराव रघुनाथ पाटील
शिवसेना
9
18
पाचोरा
किशोर आप्पा पाटील
शिवसेना
10
19
जामनेर
गिरीश दत्तात्रय महाजन
भाजप
11
25
मेहकर
संजय भास्कर रायमुलकर
शिवसेना
12
26
खामगाव
आकाश पांडुरंग फुंडकर
भाजप
13
27
जळगाव
कुटे डा. संजय श्रीराम
भाजप
14
28
अकोट
प्रकाश गुणवंतराव भारसाकळे
भाजप
15
30
अकोला पश्चिम
गोवर्धन मांगीलाल शर्मा (ऊर्फ) लालाजी
भाजप
16
31
अकोला पूर्व
रणधीर प्रल्हादराव सावरकर
भाजप
17
32
मुर्तिजापूर
हरिष मारोतीआप्पा पिंपळे
भाजप
18
33
रिसोड
अमित सुभाषराव झनक
काँग्रेस
19
34
वाशिम
लखन सहदेव मलिक
भाजप
20
35
कारंजा
पाटणी राजेंद्र सुखानंद
भाजप
21
37
बडनेरा
रवि राणा
अपक्ष
22
39
तिवसा
एड. यशोमती चंद्रकांत ठाकूर
काँग्रेस
23
42
अचलपूर
बच्चू बाबाराव कडू
प्रहार
24
45
देवळी
रंजीत प्रतापराव कांबळे
काँग्रेस
25
46
हिंगणघाट
समीर त्र्यंबकराव कुणावार
भाजप
26
47
वर्धा
डा. पंकज राजेश भोयर
भाजप
27
49
सावनेर
केदार सुनिल छत्रपाल
काँग्रेस
28
50
हिंगणा
मेघे समिर दत्तात्रय
भाजप
29
52
नागपूर दक्षिण-पश्चिम
देवेंद्र गंगाधरराव फडणवीस
भाजप
30
54
नागपूर पूर्व
कृष्णा पंचम खोपडे
भाजप
31
55
नागपूर मध्य
विकास शंकरराव कुंभारे
भाजप
32
58
कामठी
सावरकर टेकचंद श्रावण
भाजप
33
64
तिरोड़ा
विजय भरतलाल रहांगडाले
भाजप
34
67
आरमोरी
गजबे कृष्णा दामाजी
भाजप
35
68
गडचिरोली
डा. देवराव मादगुजी होळी
भाजप
36
69
अहेरी
अत्राम धर्मरावबाबा भगवंतराव
राष्ट्रवादी
37
72
बल्लारपूर
मुनगंटीवार सुधिर सच्चिदानंद
भाजप
38
73
ब्रम्हपुरी
विजय नामदेवराव वडेट्टीवार
काँग्रेस
39
74
चिमुर
बंटी भांगडीया
भाजप
40
76
वणी
संजीवरेड्डी बापुराव बोदकुरवार
भाजप
41
77
राळेगांव
अशोक रामजी वूईके (उईके)
भाजप
42
78
यवतमाळ
मदन मधुकर येरावार
भाजप
43
79
दिग्रस
राठोड संजय दुलिचंद
शिवसेना
44
91
मुखेड
तुषार गोविंदराव राठोड
भाजप
45
94
हिंगोली
तान्हाजी सखारामजी मुटकुळे
भाजप
46
96
परभणी
डा. राहुल वेदप्रकाश पाटील
शिवसेना
47
99
परतूर
बबनराव दत्तात्रय यादव (लोणीकर)
भाजप
48
100
घनसावंगी
राजेशभैय्या टोपे
राष्ट्रवादी
49
102
बदनापूर
कुचे नारायण तिलकचंद
भाजप
50
103
भोकरदन
संतोष रावसाहेब दानवे
भाजप
51
104
सिलोड
अब्दुल सत्तार अब्दुल नबी
शिवसेना
52
106
फुलंब्री
बागडे हरिभाऊ किसनराव
भाजप
53
108
औरंगाबाद पश्चिम
संजय पांडुरंग शिरसाट
शिवसेना
54
109
औरंगाबाद पूर्व
अतुल मोरेश्वर सावे
भाजप
55
110
पैठण
भुमरे संदिपानराव आसाराम
शिवसेना
56
111
गंगापूर
बंब प्रशांत बन्सीलाल
भाजप
57
115
मालेगाव बाह्य
भूसे दादाजी दगडू
शिवसेना
58
119
येवला
छगन भुजबळ
राष्ट्रवादी
59
122
दिंडोरी
झिरवाळ नरहरी सिताराम
राष्ट्रवादी
60
124
नाशिक मध्य
देवयानी सुहास फरांदे
भाजप
61
125
नाशिक पश्चिम
सीमा महेश हिरे (सीमाताई)
भाजप
62
132
नालासोपारा
क्षितीज हितेंद्र ठाकूर
बविआ
63
133
वसई
हितेंद्र विष्णु ठाकूर
बविआ
64
134
भिवंडी ग्रामीण
शांताराम तुकाराम मोरे
शिवसेना
65
136
भिवंडी पश्चिम
चौगुले महेश प्रभाकर
भाजप
66
139
मुरबाड
किसन शंकर कथोरे
भाजप
67
140
अंबरनाथ
डा. किणीकर बालाजी प्रल्हाद
शिवसेना
68
142
कल्याण पूर्व
गणपत काळू गायकवाड
भाजप
69
143
डोंबिवली
चव्हाण रविंद्र दत्तात्रय
भाजप
70
146
ओवळा-माजीवडा
प्रताप बाबुराव सरनाईक
शिवसेना
71
147
कोपरी-पाचपाखाडी
एकनाथ संभाजी शिंदे
शिवसेना
72
148
ठाणे
केळकर संजय मुकुंद
भाजप
73
149
मुंब्रा-कळवा
आव्हाड जितेंद्र सतीश
राष्ट्रवादी
74
151
बेलापूर
मंदा विजय म्हात्रे
भाजप
75
153
दहिसर
चौधरी मनिषा अशोक
भाजप
76
154
मागाठणे
प्रकाश राजाराम सुर्वे
शिवसेना
77
156
विक्रोळी
राऊत सुनिल राजाराम
शिवसेना
78
159
दिंडोशी
सुनील प्रभू
शिवसेना
79
160
कांदिवली पूर्व
अतुल भातखळकर
भाजप
80
161
चारकोप
योगेश सागर
भाजप
81
162
मालाड पश्चिम
अस्लम रमजानअली शेख
काँग्रेस
82
163
गोरेगाव
विद्या जयप्रकाश ठाकूर
भाजप
83
164
वर्सोवा
डा. भारती लव्हेकर
भाजप
84
165
अंधेरी पश्चिम
अमीत भास्कर साटम
भाजप
85
166
अंधेरी पूर्व
रमेश लटके
शिवसेना
86
167
विलेपार्ले
अळवणी पराग
भाजप
87
169
घाटकोपर पश्चिम
राम कदम
भाजप
88
171
मानखुर्द शिवाजीनगर
अबू आसिम आजमी
सपा
89
173
चेंबूर
प्रकाश वैकुंठ फातर्पेकर
शिवसेना
90
174
कुर्ला
मंगेश कुडाळकर
शिवसेना
91
175
कलिना
संजय गोविंद पोतनीस
शिवसेना
92
177
वांद्रे पश्चिम
एड. आशिष बालाजी शेलार
भाजप
93
178
धारावी
गायकवाड वर्षा एकनाथ
काँग्रेस
94
179
सायन कोळीवाडा
कॅप्टन आर तामिल सेल्वन
भाजप
95
180
वडाळा
कालीदास निळकंठ कोळंबकर
भाजप
96
181
माहिम
सदा सरवणकर
शिवसेना
97
183
शिवडी
अजय विनायक चौधरी
शिवसेना
98
185
मलबार हिल
मंगल प्रभात लोढा
भाजप
99
186
मुंबादेवी
अमीन पटेल
काँग्रेस
100
188
पनवेल
प्रशांत रामशेठ ठाकूर
भाजप
101
194
महाड
गोगावले भरत मारुती
शिवसेना
102
196
आंबेगाव
दिलीप दत्तात्रय वळसे पाटील
राष्ट्रवादी
103
199
दौंड
एड. राहुल सुभाषराव कुल
भाजप
104
200
इंदापूर
दत्तात्रय विठोबा भरणे
राष्ट्रवादी
105
201
बारामती
अजित अनंतराव पवार
राष्ट्रवादी
106
203
भोर
संग्राम अनंतराव थोपटे
काँग्रेस
107
205
चिंचवड
जगताप लक्ष्मण पांडूरंग
भाजप
108
207
भोसरी
महेश (दादा) किसन लांडगे
भाजप
109
211
खडकवासला
भिमराव(अण्णा) धोंडिबा तापकीर
भाजप
110
212
पर्वती
माधूरी सतिश मिसाळ
भाजप
111
217
संगमनेर
थोरात विजय ऊर्फ बाळासाहेब भाऊसाहेब
काँग्रेस
112
218
शिर्डी
विखे पाटील राधाकृष्ण एकनाथराव
भाजप
113
222
शेवगाव
मोनिका राजीव राजळे
भाजप
114
225
अहमदनगर शहर
संग्राम अरुणकाका जगताप
राष्ट्रवादी
115
228
गेवराई
पवार लक्ष्मण माधवराव
भाजप
116
235
लातूर शहर
अमित विलासराव देशमुख
काँग्रेस
117
238
निलंगा
निलंगेकर संभाजी दिलीपराव पाटील
भाजप
118
240
उमरगा
चौगुले ज्ञानराज धोंडीराम
शिवसेना
119
245
माढा
शिंदे बबनराव विठ्ठलराव
राष्ट्रवादी
120
248
सोलापूर शहर उत्तर
देशमुख विजयकुमार सिद्रामप्पा
भाजप
121
249
सोलापूर शहर मध्य
शिंदे प्रणिती सुशीलकुमार
काँग्रेस
122
251
सोलापूर दक्षिण
देशमुख सुभाष सुरेशचंद्र
भाजप
123
252
पंढरपूर
भालके भारत तुकाराम
राष्ट्रवादी
124
255
फलटण
दिपक प्रल्हाद चव्हाण
राष्ट्रवादी
125
256
वाई
मकरंद लक्ष्मणराव जाधव (पाटील)
राष्ट्रवादी
126
258
माण
जयकुमार भगवानराव गोरे
भाजप
127
259
कराड उत्तर
बाळासाहेब ऊर्फ शामराव पांडुरंग पाटील
राष्ट्रवादी
128
260
कराड दक्षिण
चव्हाण पृथ्वीराज दाजीसाहेब
काँग्रेस
129
261
पाटण
देसाई शंभुराज शिवाजीराव
शिवसेना
130
262
सातारा
भोसले शिवेंद्रसिंह अभयसिंहराजे
भाजप
131
264
गुहागर
भास्कर भाऊराव जाधव
शिवसेना
132
266
रत्नागिरी
उदय रविंद्र सामंत
शिवसेना
133
267
राजापूर
राजन प्रभाकर साळवी
शिवसेना
134
268
कणकवली
नितेश नारायण राणे
भाजप
135
269
कुडाळ
नाईक वैभव विजय
शिवसेना
136
270
सावंतवाडी
दिपक वसंतराव केसरकर
शिवसेना
137
272
राधानगरी
आबिटकर प्रकाश आनंदराव
शिवसेना
138
273
कागल
मुश्रीफ हसन मियालाल
राष्ट्रवादी
139
281
मिरज
डा. सुरेश (भाऊ) दगडू खाडे
भाजप
140
282
सांगली
धनंजय उर्फ सुधीर हरी गाडगीळ
भाजप
141
283
इस्लामपूर
जयंत राजाराम पाटील
राष्ट्रवादी
142
285
पळूस खडेगाव
कदम विश्वजीत पतंगराव
काँग्रेस
143
286
खानापूर
अनिलभाऊ बाबर
शिवसेना
144
287
तासगाव-कवठेमहाकाळ
सुमनवहिनी आर.आर. (आबा) पाटील
राष्ट्रवादी

 Mr. Chandrakant Bhujbal 

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)
===================================================================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
==============================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
=============================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
==========================
======================