Wednesday, 2 October 2019

विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाला सहा जागा निश्चित – रामदास आठवले

चार उमेदवारांची नावे जाहीर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशी मागील तीन दिवस झालेल्या सलग चर्चेत आज अंतिम निर्णय होऊन भाजपा-शिवसेना महायुतीचा घटक म्हणून रिपब्लिकन पक्षाला विधानसभेच्या सहा जागा सोडण्यात आल्या आहेत अशी माहिती रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली आहे. सातारा जिल्ह्यातील फलटण; सोलापुरातील माळशिरस; विदर्भातील भंडारा; मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातील नायगाव; परभणी जिल्ह्यातील पाथरी तसेच मुंबईतील मानखुर्द शिवाजीनगर या ६ जागा रिपाईला सोडण्यात आल्या असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले आहे. माळशिरसची जागा रिपब्लिकन पक्षाला सोडण्यात आली आहे. त्यामुळे या मतदारसंघात उमेदवाराचे नाव निश्चित करण्याचा निर्णय विजयसिंह मोहिते पाटील घेणार आहेत. त्यांनी माळशिरसमध्ये रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्याला उमेदवारी निश्चित करावी. तसे होणार नसेल तर माळशिरसची जागा बदलून पुणे कॅन्टोन्मेंट ही जागा देण्यात यावी अशी मागणी रामदास आठवले यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशी मागील 3 दिवस झालेल्या सलग चर्चेत आज अंतिम निर्णय होऊन भाजप शिवसेना महायुतीचा घटक म्हणून रिपब्लिकन पक्षाला विधानसभेच्या 6 जागा अधिकृत सोडण्यात आल्या आहेत. त्यात सातारा जिल्ह्यातील फलटण, सोलापुरातील माळशिरस, विदर्भात भंडारा, मराठवाड्यात नांदेड जिल्ह्यातील नायगाव, परभणी जिल्ह्यातील पाथरी आणि मुंबईतील मानखुर्द शिवाजीनगर या 6 जागा रिपाइंला सोडण्यात आल्याची अधिकृत घोषणा आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी बांद्रा संविधान निवासस्थानी पत्रकार परिषदेत केली आहे. माळशिरसची जागा रिपब्लिकन पक्षाला सोडण्यात आली आहे. त्यामुळे या मतदारसंघात उमेदवाराचे नाव निश्चित करण्याचा निर्णय विजयसिंह मोहिते पाटील घेणार आहेत. मात्र, त्यांनी माळशिरसमध्ये रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्याला उमेदवारी निश्चित करावी, तसे होणार नसेल तर माळशिरसची जागा बदलून पुणे कॅन्टोन्मेंट ही जागा देण्यात यावी अशी सूचना आज रामदास आठवलेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे. काँग्रेस राष्ट्रवादीचे अनेक नेते भाजप शिवसेनेत प्रवेश करत आहेत. रिपाइंसाठी आनंदाची बाब म्हणजे भाजप मधील काही कार्यकर्ते रिपब्लिकन पक्षात प्रवेश करत आहेत. त्यानुसार नांदेड मधील भाजपचे नेते राजेश पवार यांनी रिपब्लिकन पक्षात प्रवेश केला असून त्यांना रिपब्लिकन पक्षाची अधिकृत उमेदवारी नायगाव विधानसभा मतदारसंघातून दिली आहे. तसेच परभणीचे भाजप नेते आमदार मोहन फड यांनी रिपाइंमध्ये प्रवेश केला असून त्यांना रिपब्लिकन पक्षाची अधिकृत उमेदवारी पाथरी विधानसभा मतदारसंघातून देण्यात आली आहे. मानखुर्द शिवाजी नगर मतदारसंघ शिवसेनेच्या कोट्यात आहे तरी शिवसेनेने सामाजिक दृष्ट्या विचार करून ती जागा रिपाइंला सोडायला हवी. याबाबत शिवाजी नगर मानखुर्द मतदारसंघ रिपाइंला सोडण्यात आला असून शिवसेनेच्या उमेदवाराला उमेदवारी मागे घेण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणार असल्याचे आश्वासन दिले आहे. रिपाइंचे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघातून रिपाइंचे अधिकृत उमेदवार असल्याचे रामदास आठवले म्हणाले.

रिपाईच्या उमेदवारांची नावे :-

मानखुर्द शिवाजीनगर – रिपाईचे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे

फलटण – दिपकभाऊ निकाळजे

पाथरी – मोहन फड

नायगाव – राजेश पवार

ही नावे निश्चित झाली असून माळशिरस; भंडारा या दोन जागांची नावे लवकरच जाहीर करू असे रामदास आठवले यांनी सांगितले आहे.

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

===============================

Maharashtra Assembly Election 2019 Opinion Poll PRAB; प्राब संस्थेचा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकपूर्व जनमत चाचणी सर्वेक्षण (ओपिनियन पोल) अहवाल उपलब्ध

VIDHAN SABHA 2019 ; महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 मतदानपूर्व अंदाज

भाजप व शिवसेना युती न झाल्यास मिळणाऱ्या संभाव्य जागा, मतांचे प्रमाण व विश्लेषण

युती झाल्यावर संभाव्य जागा; आघाडीला मिळणाऱ्या संभाव्य जागा, मतांचे प्रमाण  व विधानसभा मतदारसंघनिहाय  कल

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब) संस्थेचा सर्वेक्षण अहवाल खालील लिंकवर उपलब्ध - 

(A survey report of the Political Research and Analysis Bureau (PREB) organization is available at the following link)
https://www.instamojo.com/bhujbalchandrakant/maharashtra-assembly-election-2019-opinion-p/?ref=store

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

====================================================================


No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.