Tuesday, 15 October 2019

ईव्हीएमबाबत चुकीची माहिती पसरवल्यास कारवाई होणार, निवडणूक आयोगाचे आदेश

मतदानाच्या दिवशी ‘एक्झिट पोल’वर बंदी

ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटबाबत सोशल मीडियावरुन अफवा किंवा चुकीची माहिती पसरवणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश मुख्य निवडणूक अधिकारी यांनी दिले आहेत. सोशल मीडिया निवडणूक अधिकारी यांनी या संदर्भात राज्यातील सर्व पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक यांच्यासाठी परिपत्रक काढलं आहे. फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअॅप या सोशल मीडियाच्या माध्यमातून ईव्हीएमबाबत अफवा पसरवणे हे चुकीचे आहे. असं कृत्य करताना कुणी आढळल्यास संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्याचे निर्देश सोशल मीडिया निवडणूक अधिकारी डॉ. बाळसिंग राजपूत यांनी दिले आहेत. त्यानुसार आचारसंहितेशी संबंधित सोशल मीडियाच्या माध्यमातून देखरेख करताना एखादी आक्षेपार्ह पोस्ट, फोटो किंवा व्हिडीओ आढळल्यास किंवा त्याबाबतची तक्रार मिळाल्यास कारवाई केली जाईल, असं निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर ईव्हीएमवरुन मोठा वाद निर्माण झाला होता. अनेक राजकीय पक्षांनी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटबाबत आक्षेप घेतले होते. विरोधी पक्षांनी तर ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी अशी मागणीही केली होती. त्यामुळे ईव्हीएमबाबत नकारात्मक प्रचार सोशल मीडियावर दिसून येत होता. या पार्श्वभूमीवर मतदारांमध्ये ईव्हीएमबाबत चुकीचा संदेश जाऊ नये यासाठी निवडणूक आयोगाने खबरदारी घेतली आहे.

मतदानाच्या दिवशी ‘एक्झिट पोल’वर बंदी

भारतीय निवडणूक आयोगाने मंगळवारी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक मोठा निर्णय जाहीर केला आहे. २१ ऑक्टोबर रोजी, महाराष्ट्र व हरियाणा या दोन्ही राज्यांमधील विधानसभा निवडणुकांसह १७ राज्यांमधील ५१ विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकांसाठी तसेच, महाराष्ट्रातील सातारा व बिहारमधील समस्तीपुर येथील लोकसभेच्या जागेसाठी देखील मतदान होणार आहे. यादिवशी सकाळी ७ ते सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत मतदानोत्तर चाचण्यांचे कल दाखवण्यास (एक्झिट पोल) बंदी घालण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या प्रवक्त्या शेफाली शरण यांनी यांसदर्भात ट्विट केले आहे. २१ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुका पाहता, त्या दिवशी सकाळी ७ ते सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत एक्झिट पोल दाखवले जाऊ शकणार नाहीत. असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. महाराष्ट्र व हरियाणा येथील विधानसभा निवडणुकीसह अरुणाचल प्रदेश, आसम, बिहार, छत्‍तीसगड, गुजरात, हिमाचल प्रदेश, केरळ, मध्‍यप्रदेश, मेघालय, ओदिशा, पुद्दुचेरी, पंजाब, राजस्‍थान, सिक्कि‍म, तामिळनाडू, तेलंगणा, उत्‍तरप्रदेश या १७ राज्यांधील ५२ विधानसभा मतदारसंघात व महाराष्ट्रातील सातारा आणि बिहारमधील समस्तीपुर लोकसभा मतदार संघात पोटनिवडणुक होणार आहेत. तर, २४ ऑक्टोबर रोजी निवडणुकीचा निकाल लागणार आहे. निवडणूक आयोगाकडून मतदानाच्या दिवशी मतदानाचा कल (ओपिनियन पोल), अन्य कल तसेच सर्वे दाखवण्यावर देखील बंदी घालण्यात आली आहे.
Mr. Chandrakant Bhujbal 

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

=========================================
===================================================================================================================

Maharashtra Assembly Election 2019 Opinion Poll PRAB; प्राब संस्थेचा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकपूर्व जनमत चाचणी सर्वेक्षण (ओपिनियन पोल) अहवाल उपलब्ध

VIDHAN SABHA 2019 ; महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 मतदानपूर्व अंदाज

भाजप व शिवसेना युती न झाल्यास मिळणाऱ्या संभाव्य जागा, मतांचे प्रमाण व विश्लेषण

युती झाल्यावर संभाव्य जागा; आघाडीला मिळणाऱ्या संभाव्य जागा, मतांचे प्रमाण  व विधानसभा मतदारसंघनिहाय  कल

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब) संस्थेचा सर्वेक्षण अहवाल खालील लिंकवर उपलब्ध - 

(A survey report of the Political Research and Analysis Bureau (PREB) organization is available at the following link)
https://www.instamojo.com/bhujbalchandrakant/maharashtra-assembly-election-2019-opinion-p/?ref=store

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

====================================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
==============================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
=============================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
==========================
======================



No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.