Friday 4 October 2019

258 माण विधानसभा मतदारसंघात युतीत बेबनाव; सख्या भावांना भाजप व सेनेकडून स्वतंत्र उमेदवारी

जयकुमार गोरे यांना भाजपची तर शेखर गोरे यांना शिवसेनेची उमेदवारी



सातारा जिल्ह्याच्या पूर्व भागात असणारे माण विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार जयकुमार गोरे यांनी भाजपमध्ये पक्षांतर करून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. भाजपने अधिकृत उमेदवारी देऊनही शिवसेनेने या मतदारसंघातून गेल्यावेळी रासपमधून निवडणूक लढवलेले मात्र पराभव पत्करावा लागलेले शेखर गोरे यांना अधिकृत उमेदवारी दिली असल्याने युतीतील बेबनाव उघड झालेला आहे. राज्यात अशास्वरुपाच्या किती घटना घडल्या आहेत हे 2 दिवसांत स्पष्ट होईलच. 258 माण विधानसभा मतदारसंघात दोन्ही सख्या भावांना भाजप व सेनेकडून स्वतंत्र उमेदवारी दिलेली आहे. त्यामुळे राज्यात युती झालेली असताना या मतदारसंघात मात्र स्वतंत्रपणे उमेदवारी दिल्याने कार्यकर्ते व मतदारांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे. माण विधानसभा निवडणूक २०१४ मध्ये काँग्रेसकडून जयकुमार गोरे यांना ७५,७०७ प्रथम क्रमांकाची मते मिळालेली होती तर प्रतिस्पर्धी पराभूत उमेदवार रासपचे शेखर गोरे ५२,३५७ मते मिळालेली होती. गेल्या 5 वर्षात या मतदारसंघात राजकीय वातावरण बदलून गेलेले आहे. लोकसभा निवडणुकीत येथील विद्यमान आमदार जयकुमार गोरे यांनी भाजप उमेदवाराचे काम केले होते तेव्हापासूनच भाजपमध्ये पक्षांतर करण्यावर त्यांनी शिक्कामोर्तब केले होते. सोलापूर येथे अमित शहांच्या उपस्थित त्यांचा पक्ष प्रवेश झालेला होता तर भाजपने देखील त्यांना या मतदारसंघातून अधिकृत उमेदवारी दिलेली असताना शिवसेनेने शेखर गोरे यांना एबी फॉर्म देऊन संभ्रम निर्माण केलेला आहे. शेखर गोरे यांचाही राजकीय प्रवास वेडावाकडा राहिलेला आहे. गेल्यावेळी रासप नंतर पक्षांतर राष्ट्रवादीतून विधानपरिषद उमेदवारी मात्र पराभव झाल्याने ते अस्वस्थ होते. त्यांना वारंवार पक्षांतून डावलल्याने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सभेत गोंधळ घातल्याने शेखर गोरे पुन्हा चर्चेत आले होते. राजकीय व सामाजिकदृष्ट्या वादग्रस्त व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख असून त्यांच्या वर अनेक गंभीर स्वरूपाचे खटले दाखल आहेत. सख्या भावाबरोबर असलेले वैर त्यांना स्वस्थ बसू देत नाही त्यामुळे शिवसेनेची उमेदवारी मिळवून राजकींय महत्व पुन्हा या मतदारसंघात अधोरेखित केले आहे.  माण - खटाव विधानसभा मतदार संघात आज अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी विविध इच्छुक उमेदवारांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करीत आपले उमेदवारी अर्ज निवडणुक निर्णय अधिकारी अश्विनी जिरंगे यांच्याकडे दाखल केले. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी शिवसेनेकडुन शेखर गोरे, वंचित बहुजन आघाडीकडुन डॉ. प्रमोद गावडे तर आमच ठरलय मधुन माजी विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, अनिल देसाई व रणजीतसिंह देशमुख या सर्व उमेदवारांनी अर्ज दाखल केले. राज्यात शिवसेना व भाजपची युती असताना देखील माण - खटाव या मतदारसंघात या दोन्ही पक्षांनी आपले अधिकृत उमेदवार एकमेकांसमोर उभे केले असुन याठिकाणी मैत्री पुर्ण लढत होणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

===================================================================================================================

Maharashtra Assembly Election 2019 Opinion Poll PRAB; प्राब संस्थेचा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकपूर्व जनमत चाचणी सर्वेक्षण (ओपिनियन पोल) अहवाल उपलब्ध

VIDHAN SABHA 2019 ; महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 मतदानपूर्व अंदाज

भाजप व शिवसेना युती न झाल्यास मिळणाऱ्या संभाव्य जागा, मतांचे प्रमाण व विश्लेषण

युती झाल्यावर संभाव्य जागा; आघाडीला मिळणाऱ्या संभाव्य जागा, मतांचे प्रमाण  व विधानसभा मतदारसंघनिहाय  कल

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब) संस्थेचा सर्वेक्षण अहवाल खालील लिंकवर उपलब्ध - 

(A survey report of the Political Research and Analysis Bureau (PREB) organization is available at the following link)
https://www.instamojo.com/bhujbalchandrakant/maharashtra-assembly-election-2019-opinion-p/?ref=store

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.