Saturday 5 October 2019

उमेदवारी नाकारलेल्या भाजप नेत्यांवर स्टार प्रचारक म्हणून जबाबदारी

एकनाथ खडसे-विनोद तावडे भाजपचे स्टार प्रचारक ; काँग्रेस-राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक नावे पहा 

विधानसभा निवडणुकीत तिकीट नाकारल्यानंतर आता माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे व उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांना स्टार प्रचारक म्हणून नियुक्ती केली आणि महायुतीच्या निवडणूक प्रचाराची जबाबदारी सोपवली आहे. भाजपने स्टार प्रचारकांची नावे जाहीर केली असून एकनाथ खडसे 25 व्या क्रमांकावर तर विनोद तावडे 27 व्या क्रमांकावर आहेत. निवडणूक प्रचारासाठी भाजप आणि काँग्रेसने आपापल्या स्टार प्रचारकांची यादी निवडणूक आयोगाला सादर केली आहे. भाजपच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदींसह पक्षाध्यक्ष अमित शहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा समावेश आहे. तर काँग्रेसने स्टार प्रचारक म्हणून हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, राहुल गांधी, प्रियंका गांधी यांची नावे दिली आहेत.

भाजपचे स्टार प्रचारक-

भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादीत चंद्रकांत पाटील, रावसाहेब दानवे-पाटील, सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडे, गिरीश महाजन, आशीष शेलार, रणजीत पाटील, विजयराव पुराणिक, पूनम महाजन-राव, विजया रहाटकर, माधवी नाईक, सुजितसिंग ठाकूर, पाशा पटेल, भाई गिरकर, प्रसाद लाड यांचा समावेश आहे.

काँग्रेसचे स्टार प्रचारक-

मल्लिकार्जुन खरगे, गुलाब नबी आझाद, ज्योतिरादित्य शिंदे, बाळासाहेब थोरात, सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, कमलनाथ, भूपेश बघेल, मुकुल वासनिक, अविनाश पांडे, राजीव सातव, रजनी पाटील, सचिन पायलट, शत्रुघ्न सिन्हा, अभिनेत्री नगमा, विजय वडेट्टीवार, मधुकर भावे, नाना पटोले, आर. सी. खुंटीया, नितीन राऊत, माणिकराव ठाकरे, एकनाथ गायकवाड, सचिन सावंत, हुसेन दलवाई, नसीम खान, बसवराज पाटील, यशोमती ठाकूर, विश्वजीत कदम, अमर राजूरकर, सुश्मिता देवी, कुमार केतकर, चारुलता टोकस, उदित राज, नदीम जावेद हे काँग्रेसचे स्टार प्रचारक आहेत.

राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक- 

राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणूकीच्या अनुषंगाने आपल्या ४० स्टार प्रचारकांची यादी आज (शनिवार) जाहीर केली आहे. यामध्ये राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, ज्येष्ठ नेते आमदार छगन भुजबळ, विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, खासदार सुनिल तटकरे, खासदार सुप्रियाताई सुळे, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक, माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, आमदार शशिकांत शिंदे, आमदार हसन मुश्रीफ, आमदार जितेंद्र आव्हाड, माजी आमदार अनिल देशमुख, शेतकरी नेते अण्णा डांगे, आमदार राजेश टोपे, खासदार डॉ.अमोल कोल्हे, खासदार वंदना चव्हाण, खासदार माजिद मेमन, प्रदेश सरचिटणीस अमोल मेटकरी, वर्षा पटेल, आमदार प्रकाश गजभिये, आमदार किरण पावसकर, आमदार सतिश चव्हाण, आमदार विक्रम काळे, आमदार रामराव वडकुते,राष्ट्रीय महिला अध्यक्षा फौजिया खान, शब्बीर विद्रोही, सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष जयदेव गायकवाड, नरेंद्र वर्मा, महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे, नसीम सिद्दीकी, शेख सुबान अली, अविनाश धायगुडे, प्रदीप सोळंके, सुषमा अंधारे, युवती प्रदेशाध्यक्षा कुमारी सक्षणा सलगर आदींचा यामध्ये समावेश आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारणी समितीचे सदस्य व पक्षाचे स्थायी राष्ट्रीय सचिव एस. आर. कोहली यांनी प्रचारकांची ही यादी पक्षाच्यावतीने जाहीर केली आहे.

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

====================================================================================================

Maharashtra Assembly Election 2019 Opinion Poll PRAB; प्राब संस्थेचा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकपूर्व जनमत चाचणी सर्वेक्षण (ओपिनियन पोल) अहवाल उपलब्ध

VIDHAN SABHA 2019 ; महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 मतदानपूर्व अंदाज

भाजप व शिवसेना युती न झाल्यास मिळणाऱ्या संभाव्य जागा, मतांचे प्रमाण व विश्लेषण

युती झाल्यावर संभाव्य जागा; आघाडीला मिळणाऱ्या संभाव्य जागा, मतांचे प्रमाण  व विधानसभा मतदारसंघनिहाय  कल

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब) संस्थेचा सर्वेक्षण अहवाल खालील लिंकवर उपलब्ध - 

(A survey report of the Political Research and Analysis Bureau (PREB) organization is available at the following link)
https://www.instamojo.com/bhujbalchandrakant/maharashtra-assembly-election-2019-opinion-p/?ref=store

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.