Saturday 5 October 2019

चिंचवडमध्ये राष्ट्रवादी उमेदवार प्रशांत शितोळे यांचा अर्ज बाद

चिंचवडमध्ये राष्ट्रवादी उमेदवार प्रशांत शितोळे यांचा अर्ज बाद


चिंचवड विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रशांत शितोळे यांचा उमेदवारी अर्ज छाननी प्रक्रियेमध्ये अवैध ठरविण्यात आला आहे. त्यामुळे भोसरी विधानसभा मतदारसंघ प्रमाणेच चिंचवड विधानसभा मतदारसंघात देखील आता राष्ट्रवादीचा अधिकृत उमेदवार नाही. शहरातील तीन विधानसभा मतदारसंघात पैकी दोन विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार नसल्याने पक्षाच्या अडचणीत वाढ झाली आहे. चिंचवड विधानसभा मतदार संघात निवडणूक आयोगाने दिलेल्या मुदतीत एकूण 19 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी शनिवारी झालेल्या छाननी प्रक्रियेमध्ये राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक प्रशांत शितोळे यांच्यासह पाच जणांचे उमेदवारी अर्ज अवैध ठरविण्यात आले आहेत. चिंचवड विधानसभा मतदारसंघात भाजप-शिवसेना महायुतीचे अधिकृत उमेदवार विद्यमान आमदार लक्ष्मण जगताप हे आहेत. शितोळे यांचा अर्ज बाद झाल्याने बड्या राजकीय पक्षाचा कोणताही उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात उरलेला नाही. मात्र चिंचवडमध्ये शिवसेनेचे गटनेते व विद्यमान नगरसेवक राहुल कलाटे यांनी बंडखोरी करत अर्ज दाखल केलेला आहे. राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा अर्ज झाल्याने राष्ट्रवादीकडून राहुल कलाटे यांना पुरस्कृत केले जाण्याची शक्यता आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीकरिता प्रशांत शितोळे यांचा काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचा उमेदवारी अर्ज बाद झाला आहे. पक्षाचा अधिकृत एबी फॉर्म दिला नसल्यामुळे शितोळे यांचा अर्ज बाद झाला आहे. विधानसभा निवडणुकीसाठी चिंचवड मतदारसंघात शुक्रवारी (दि. 4) या अंतिम मुदतीत 19 उमेदवारांनी 28 अर्ज दाखल केले आहेत. या अर्जांची आज (शनिवारी) छाननी झाली. त्यामध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार प्रशांत शितोळे यांनी दाखल केलेला अर्ज बाद झाला. पक्षाचा अधिकृत एबी फॉर्म दिला नसल्यामुळे शितोळे यांचा अर्ज बाद झाला आहे. त्यांच्यासोबत शंकर पाडुरंग जगताप, विजय निवृत्ती वाघमारे, राजकुमार घनश्याम परदेशी, प्रकाश भाऊराव घोडके अशा पाच उमेदवारांचे अर्ज छाननीत बाद झाले आहेत. नामनिर्देशन पत्र लोकप्रतिनिधित्व अधिनियमातील नियम 33 नुसार हे अर्ज बाद करण्यात आल्याचे, निवडणूक निर्णय अधिकारी मनीषा कुंभार यांनी सांगितले. चिंचवड विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादीचे उमेदवार प्रशांत शितोळे यांचा उमेदवारी अर्ज छाननीत बाद ठरला आहे त्यामुळे प्रशांत शितोळे यांनी राष्ट्रवादी शहर कार्याध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. मला पक्षाने एबी फॉर्म वेळेत सादर करून दिल्याने माझा बाद झाला आहे त्यामुळे मी आपल्या पदाचा राजीनामा देत असल्याची माहिती प्रशांत शितोळे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. चिंचवड मतदारसंघात राष्ट्रवादीचे चांगले दिवस असताना राष्ट्रवादीचा उमेदवार नाही पक्षाची नाचक्की आहे असे यावेळी प्रशांत शितोळे यांनी सांगितले.

पर्वती विधानसभा मतदारसंघातून एक अर्ज बाद 

​पर्वती विधानसभा मतदारसंघातून गुरुवार आणि शुक्रवार असे दोन दिवसात सोळा उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्यातील एक अर्ज नामंजूर झाल्याने सध्या पंधरा उमेदवार रिंगणात आहे. पर्वती विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दाखल केलेल्या दीपक घुबे यांचा अर्ज अपुर्ण असल्याने नामंजूर करण्यात आला. घुबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. माधुरी मिसाळ यांचा अर्ज मंजूर झाला आहे. काँग्रेसचे नगरसेवक आबा बागुल यांनी बंडखोरी करीत दाखल केलेला अपक्ष अर्ज मंजूर झाला आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अश्विनी कदम यांचे पती नितीन कदम यांनी अपक्ष म्हणून दाखल केलेला अर्जही मंजूर झाला आहे. आघाडीचे अधिकृत उमेदवार अश्विनी कदम असणार आहे. आपकडून संदीप सोनवणे, बहुजन समाज पक्षाकडून रवींद्र क्षीरसागर, बहुजन मुक्ती पार्टीचे शतायु भागले, वंचित बहुजन आघाडीचे ऋषिकेश नांगरे-पाटील यांचे अर्ज मंजूर झाले आहेत. आबा बागुल, परमेश्‍वर जाधव, अरविंद करमरकर, नितीन कदम, जयदेव इसवे, राहुल खुडे, निखिल शिंदे, सुरेश चौधरी, दीपक घुबे यांनी अपक्ष अर्ज दाखल केले होते.

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

===================================================================================================================

Maharashtra Assembly Election 2019 Opinion Poll PRAB; प्राब संस्थेचा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकपूर्व जनमत चाचणी सर्वेक्षण (ओपिनियन पोल) अहवाल उपलब्ध

VIDHAN SABHA 2019 ; महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 मतदानपूर्व अंदाज

भाजप व शिवसेना युती न झाल्यास मिळणाऱ्या संभाव्य जागा, मतांचे प्रमाण व विश्लेषण

युती झाल्यावर संभाव्य जागा; आघाडीला मिळणाऱ्या संभाव्य जागा, मतांचे प्रमाण  व विधानसभा मतदारसंघनिहाय  कल

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब) संस्थेचा सर्वेक्षण अहवाल खालील लिंकवर उपलब्ध - 

(A survey report of the Political Research and Analysis Bureau (PREB) organization is available at the following link)
https://www.instamojo.com/bhujbalchandrakant/maharashtra-assembly-election-2019-opinion-p/?ref=store

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.