Tuesday, 1 October 2019

विधानसभा निवडणुकीत मनसेचे इंजिन धावणार; २७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

 मनसेकडून २७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर


महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत मनसेचे इंजिन देखील धावणार असून मनसेची पहिली यादी आज जाहिर झाली असून त्यात २७ जणांना उमेदवारी जाहीर केली आहे. यात महत्त्वाच्या नेत्यांना स्थान दिले असले तरी पहिल्या यादीत वरळी विधानसभेत कोणाच नाव जाहीर केलं नाही. आज पहिली यादी जाहीर केली असून उद्यापासून उमेदवारांना एबी फॉर्म दिले जातील. वरळीतून शिवसेना नेते आदित्य ठाकरे उभे असले तरी उमेदवार द्यायचा की नाही त्याबाबत अंतिम निर्णय मनसे अध्यक्ष राज ठाकरे घेतील असे मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी सांगितले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने ही यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. मनसे विधानसभा निवडणूक लढविणार की नाही याबद्दल संशयाचे वातावरण होते. उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध केल्याने मनसेदेखील विधानसभेत लढणार आहे. धर्मा पाटील यांचे चिरंजीव नरेंद्र धर्मा पाटील यांना सिंदखेडामधून उमेदवारी देण्यात आली आहे. तर प्रमोद पाटील यांना कल्याण ग्रामीणमधून, प्रकाश भोईर यांना कल्याण पश्चिममधून, माजी नगरसेवक संदीप देशपांडे यांना माहीममधून उमेदवारी देण्यात आली आहे. या शिवाय मनसेच्या विद्यार्थी संघटनेचे नेते गजानन काळे यांना बेलापूरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. कसबा पेठेतून मनसेचे शहराध्यक्ष अजय शिंदे, हडपसरमधून पुणे महापालिकेतील मनसेचे गटनेते वसंत मोरे, कोथरूडमधून अॅड. किशोर शिंदे आणि शिवाजीनगरमधून सुहास निम्हण यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मनसेने निवडणूक लढवावी यासाठी कार्यकर्ते, नेते आग्रही होते. मनसेच्या पहिल्या उमेदवार यादीवर नजर टाकल्यास मनसेने शहरी भागावर लक्ष केंद्रीत केल्याचे स्पष्ट होते. राज ठाकरे दादारमध्ये राहतात. त्या माहिम विधानसभा मतदारसंघातून त्यांनी मनसेचे नेते संदीप देशपांडे यांना उमेदवारी दिली आहे. तर मनसेच्या विविध आंदोलनाचा चेहरा असलेले अविनाश जाधव यांना ठाण्यातून उमेदवारी जाहीर झाली आहे. कल्याण ग्रामीणमधून प्रमोद पाटील तर कल्याण पश्चिमेतून प्रकाश भोईर नाशिक पूर्वमधून माजी महापौर अशोक मुर्त़डक यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पुण्यात हडपसरमधून वसंत मोरे, कोथरुडमधून किशोर शिंदे, नाशिकमध्यमधून नितीन भोसले, कसाब पेठमधून अजय शिंदे, चेंबूरमधून कर्णबाळा दिनबुळे यांना उमेदवारी दिली आहे. दहिसर, दिंडोशी, कांदिवली, गोरेगाव, वर्सोवा, घाटकोपर पश्चिम, वांद्रे पूर्वेमधून मनसेने उमेदवार जाहीर केले आहेत.

मनसेचे पहिल्या यादीतील उमेदवार

1 प्रमोद पाटील – कल्याण ग्रामीण
2 प्रकाश भोईर – कल्याण पश्चिम
3 अशोक मुर्तडक – नाशिक पूर्व
4 संदीप देशपांडे – माहिम
5 वसंत मोरे – हडपसर
6 किशोर शिंदे – कोथरुड
7 नितीन भोसले – नाशिक मध्य
8 राजू उंबरकर – वणी
9 अविनाश जाधव – ठाणे
10 नयन कदम – मागाठाणे
11 अजय शिंदे – कसबा पेठ, पुणे
12 नरेंद्र धर्मा पाटील – सिंदखेड
13 दिलीप दातीर – नाशिक पश्चिम
14 योगेश शेवेरे- इगतपुरी
15 कर्णबाळा दुनबळे – चेंबूर
16 संजय तुर्डे – कलिना
17 सुहास निम्हण – शिवाजीनगर
18 गजानन काळे – बेलापूर
19 अतुल बंदिले – हिंगणघाट
20 प्रशांत नवगिरे – तुळजापूर
21 राजेश वेरुणकर – दहीसर
22 अरुण सुर्वे – दिंडोशी
23 हेमंत कांबळे – कांदिवली पूर्व
24 वीरेंद्र जाधव – गोरेगाव
25 संदेश देसाई – वर्सोवा
26 गणेश चुक्कल – घाटकोपर पश्चिम
27 अखिल चित्रे- वांद्रे पूर्व

मनसेची 45 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर


महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मंगळवारी 27 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. दुसर्‍या यादीची मनेसे कार्यकर्ते वाट पहात असतानाच आज मनेसेकडून 45 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे.
मनसेने जाहीर केलेल्या उमेदवारांची नावे
1. डोंबिवली
 मंदार हळबे
2. धुळे (शहर)
 श्रीमती प्राची कुलकर्णी
3. जळगांव (शहर)
 जमील देशपांडे
4. जळगांव (ग्रामीण)
 मुकूंद रोटे
5. अमळनेर
 अंकलेश पाटील
6. जामनेर
 विजयानंद कुलकर्णी
7. अकोट
 रविंद्र फाटे
8. रिसोड
 डॉ. विजयकुमार उल्‍लामाळे
9. कारंजा
 सुभाष राठोड
10. पुसद
 अभय गेडाम
11. नांदेड (उत्‍तर)
 गंगाधर फुगारे
12. परभणी
 सचिन पाटील
13. गंगाखेड
 विठ्ठल जवादे
14. परतुर
 प्रकाश सोलंकी
15. वैजापूर
 संतोष जाधव
16. भिवंडी (पश्‍चिम)
 नागेश मुकादम
17. भिवंडी (पूर्व)
 मनोज गुडवी
18.कोपरी-पाचपखाडी
 महेश कदम
19. ऐरोली
 निलेश बाणखेले
20. अंधेरी (पश्‍चिम)
 किशोर राणे
21. चांदिवली
 सुमित भारस्कर
22. घाटकोपर (पूर्व)
 सतीश पवार
23. अणुशक्‍तीनगर
 विजय रावराणे
24. मुंबादेवी
 केशव मुळे
25. श्रीवर्धन
 संजय गायकवाड
26. महाड
 देवेंद्र गायकवाड
27. सावंतवाडी
 प्रकाश रेडकर
28. श्रीरामपूर
 भाऊसाहेब पगारे
29. बीड
 वैभव काकडे
30. औसा
 शिवकुमार नगराळे
31. मोहोळ
 हनुमंत भोसले
32. अक्‍कलकोट
 मधुकर जाधव
33. माळशिरस
 श्रीमती मनिषा आप्पासाहेब करचे
34. गुहागर
 गणेश कदम
35. उमरेड
 मनोज बाव्वनगडे
36. राजूरा
 महालिंग कंठाडे
37. राधानगरी
 युवराज येडूरे
38. अंबरनाथ
 सुमेत भंवर
39. डहाणू
 सुनिल निभाड
40. बोईसर
 दिनकर वाढान
41. शिवडी
 संतोष नलावडे
42. विलेपार्ले
 श्रीमती जुईली शेंडे
43. किनवट
 विनोद राठोड
44. फुलंब्री
 डॉ. अमर देशमुख
45. उमरखेड
 अ‍ॅड. रामराव वानखेडे

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

===============================

Maharashtra Assembly Election 2019 Opinion Poll PRAB; प्राब संस्थेचा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकपूर्व जनमत चाचणी सर्वेक्षण (ओपिनियन पोल) अहवाल उपलब्ध

VIDHAN SABHA 2019 ; महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 मतदानपूर्व अंदाज

भाजप व शिवसेना युती न झाल्यास मिळणाऱ्या संभाव्य जागा, मतांचे प्रमाण व विश्लेषण

युती झाल्यावर संभाव्य जागा; आघाडीला मिळणाऱ्या संभाव्य जागा, मतांचे प्रमाण  व विधानसभा मतदारसंघनिहाय  कल

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब) संस्थेचा सर्वेक्षण अहवाल खालील लिंकवर उपलब्ध - 

(A survey report of the Political Research and Analysis Bureau (PREB) organization is available at the following link)
https://www.instamojo.com/bhujbalchandrakant/maharashtra-assembly-election-2019-opinion-p/?ref=store

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

====================================================================

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.