आदित्यनगर सोसायटीच्या स्वच्छता अभियानाला उस्फुर्त प्रतिसाद
महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून आदित्यनगर गृहनिर्माण सहकारी सोसायटीच्या वतीने परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले या स्वच्छता अभियानाला संस्थेच्या सभासदांनी सहकुटुंब सहभाग घेऊन उस्फुर्त प्रतिसाद दिला. हडपसर येथील आदित्यनगर सहकारी गृहनिर्माण संस्था सोसायटीने स्वच्छता अभियानाचे आयोजन केले होते आज 2 ऑक्टोबर 2019 रोजी सकाळी 9 वाजता या अभियानास सुरुवात करण्यात आली यावेळी संस्थेच्या सभासदांनी सहकुटुंब सहभाग घेतला. सामूहिकरीत्या परिसरातील प्लास्टिकच्या वस्तू, कचरा, निरुपयोगी सायकल, टाकाऊ वस्तू, कचरा, झाडांचा साठलेला कचरा व इमारतीच्या टेरेसवर निरुपयोगी वस्तू व कचरा निर्मूलन करण्यात आले. सोसायटीच्या वतीने परिसरात स्वच्छता अभियान यापुढेही सुरूच राहणार असून आजच्या प्रमाणे पुढील काळात देखील सर्वांनी सहभाग व सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी आदित्यनगर सहकारी गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष सुहास शहा व सचिव सोपान बारवकर यांनी केले. आगळेवेगळे अभिनव उपक्रम सातत्याने राबविणारी सहकारी संस्था म्हणून नावाजलेली आदित्यनगर सहकारी गृहनिर्माण संस्था आहे. पुणे महापालिका व सहकार विभागासह व राज्य शासनाने केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यामध्ये आबालवृद्धांसह सर्व स्तरातील घटकांनी सहभाग नोंदवून स्वच्छतेचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला. परिसरातील संस्थाचे या अभियानामुळे नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. स्वच्छता अभियानात सहभाग घेतल्याबद्दल सर्वांचे आभार सोसायटीच्या कार्यकारिणी सदस्यांनी व अध्यक्ष सुहास शहा यांनी मानले.
POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब)
==============================================
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.