Friday, 4 October 2019

पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या मतदार याद्या नव्याने तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर

पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठी मतदार नोंदणीचे आवाहन


पुणे पदवीधर मतदारसंघ व पुणे शिक्षक मतदार संघासाठी मतदार याद्यांचा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने घोषित केला असून पदवीधर व शिक्षक नागरिकांनी ६ नोव्हेंबर २०१९ पर्यंत मतदार नोंदणी करावी, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केले आहे. पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या मतदार याद्यांच्या पुनरिक्षण कार्यक्रमाबाबत माहिती देण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपायुक्त संजयसिंह चौहान उपस्थित होते. भारत निवडणूक आयोगाने पदवीधर व शिक्षक मतदार संघाची मतदार याद्या तयार करण्याच्या संदर्भात सुधारित सर्वसमावेशक सूचना दिलेल्या आहेत. त्यानुसार पदवीधर व शिक्षक मतदार संघासाठी नव्याने मतदार याद्या (de-novo) तयार करावयाच्या आहेत. तसेच दिनांक १ नोव्हेंबर, २०१९ या अर्हता दिनांकावर आधारीत अमरावती व नाशिक विभागातील पदवीधर व औरंगाबाद, कोकण व नागपूर विभागातील शिक्षक मतदार संघांसाठी मतदार याद्यांचा पुनरिक्षण कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने दिनांक ५ सप्टेंबर, २०१६ च्या पत्रानुसार घोषित केला आहे. मतदार नोंदणी अधिनियम १९६० चे कलम ३१ (३) अन्वये जाहीर सूचना प्रसिध्द करण्याचा दिनांक मंगळवार दि. १ ऑक्टोबर २०१९, मतदार नोंदणी अधिनियम १९६० चे कलम ३१ (४) अन्वये वर्तमानपत्रातील नोटीसीची प्रथम पुर्नप्रसिध्दी मंगळवार दि. १५ ऑक्टोबर २०१९, मतदार नोंदणी अधिनियम १९६० चे कलम ३१ (४) अन्वये वर्तमानपत्रातील नोटीसीची द्वितीय पुर्नप्रसिध्दी शुक्रवार दि.२५ ऑक्टोबर २०१९, नमूना १८ किंवा १९ द्वारे दावे व हरकती स्वीकारण्याचा अंतिम बुधवार दि.६ नोव्हेंबर २०१९, हस्तलिखिते तयार करणे व प्रारुप मतदार याद्यांची छपाई मंगळवार दि. १९ नोव्हेंबर २०१९, प्रारुप मतदार याद्यांची प्रसिध्दी शनिवार दि.२३ नोव्हेंबर २०१९, दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी शनिवार दि.२३ नोव्हेंबर २०१९ ते सोमवार दि. ९ डिसेंबर २०१९, दावे व हरकती निकाली काढण्याचा दिनांक व पुरवणी यादी तयार करणे व छपाई करणे गुरुवार दि. २६ डिसेंबर २०१९, मतदार यादीची अंतिम प्रसिध्दी सोमवार दि.३० डिसेंबर २०१९. शिक्षक मतदार संघासाठी अर्हता अशी जी व्यक्ती भारताची नागरीक आहे, आणि त्या मतदार संघातील सर्वसाधारण रहिवासी आहे आणि 1 नोंव्हेंबर, 2019 च्या लगत पूर्वीच्या सहा वर्षामध्ये किमान तीन वर्ष इतक्या एकूण कालावधीकरिता माध्यमिक शाळेच्या दर्जापेक्षा कमी दर्जाची अशी विनिर्दिष्ट केलेली नसेल अशा, राज्यातील कोणत्याही शिक्षक संस्थेमध्ये अध्यापन करीत आहे अधी प्रत्येक व्यक्ती, मतदार यादीत तीचे नाव अतर्भूत केले जाण्यास पात्र आहे. अशाप्रकारे विनिर्दिष्ट केलेल्या शिक्षक संस्थांची यादी पहिल्या अनुसूचीमध्ये नमूद केलेल्या अधिकाऱ्याकडे उपलब्ध आहे. पदवीधर मतदारसंघ नाव नोंदणीसाठी अर्हता- प्रत्येक व्यक्ती जी भारताची नागरीक आहे, त्या मतदारसंघातील सर्वसाधारण रहिवाशी आहे आणि ती व्यक्ती दिनांक 01 नोव्हेंबर 2019 पूर्वी( म्हणजे अर्हता दिनांक ) किमान 3 वर्षे भारतातील विद्यापीठाचा पदवीधर असेल किंवा त्याच्याशी समकक्ष असलेली अर्हता धारण करीत असेल अशी प्रत्येक व्यक्ती मतदारयादीमध्ये नाव समाविष्ट करण्यास पात्र आहे. उक्त समकक्ष अर्हतांची सूची यासोबतच्या पहिल्या अनुसूचिमध्ये नमूद केलेल्या अधिकाऱ्यांकडे उपलब्ध आहे. तीन वर्षाचा कालावधी हा ज्या दिनांकास अर्हता कारी पदवी परीक्षेचा निकाल जाहिर करण्यात आला असेल आणि तो विद्यापीठ किंवा अन्य संबंधीत प्राधिकरण यांच्याकडून प्रसिध्द करण्यात आला असेल त्या दिनांकापासून मोजण्यात येईल. पुणे विभाग पदवीधर मतदार संघ व शिक्षक मतदार संघाच्या प्रत्येक निवडणुकीपूर्वी नव्याने मतदार याद्या तयार करणे आवश्यक असल्याने पूर्वीच्या पदवीधर मतदार संघाच्या यादीमध्ये नाव असले तरीसुध्दा अशा व्यक्तींनी मतदार नोंदणीसाठी नव्याने अर्ज करणे बंधनकारक आहे. तसेच उपविभागीय अधिकारी अथवा तहसिलदार कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

===================================================================================================================

Maharashtra Assembly Election 2019 Opinion Poll PRAB; प्राब संस्थेचा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकपूर्व जनमत चाचणी सर्वेक्षण (ओपिनियन पोल) अहवाल उपलब्ध

VIDHAN SABHA 2019 ; महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 मतदानपूर्व अंदाज

भाजप व शिवसेना युती न झाल्यास मिळणाऱ्या संभाव्य जागा, मतांचे प्रमाण व विश्लेषण

युती झाल्यावर संभाव्य जागा; आघाडीला मिळणाऱ्या संभाव्य जागा, मतांचे प्रमाण  व विधानसभा मतदारसंघनिहाय  कल

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब) संस्थेचा सर्वेक्षण अहवाल खालील लिंकवर उपलब्ध - 

(A survey report of the Political Research and Analysis Bureau (PREB) organization is available at the following link)
https://www.instamojo.com/bhujbalchandrakant/maharashtra-assembly-election-2019-opinion-p/?ref=store

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.