कन्या अॅड. रोहिणी खडसे खेवलकर यांना उमेदवारी मिळणार!
भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना पहिल्या यादीत उमेदवारी दिलेली नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली असताना आता त्यांना दुसऱ्या यादीतही स्थान देण्यात येणा नाही, असे सांगितले जात आहे. त्यामुळे खडसे यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या कन्या तसेच जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षा अॅड. रोहिणीताई खडसे-खेवलकर यांना जळगावच्या मुक्ताईनगर मतदारसंघातून उमेदवारी दिली जाणार आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचं नाव भाजपच्या पहिल्या उमेदवारी यादीत न आल्याने राजकीय वर्तुळाला आश्चर्याचा धक्का बसला. मात्र धक्कादायक बाब म्हणजे त्यांना दुसऱ्याही उमेदवारी यादीत स्थान मिळणार नाही किंबहुना त्यांना भाजप उमेदवारी देणार नसल्याची शक्यता वर्तवली जात आहे. पहिल्या यादीत स्थान न मिळाल्याने खडसे चांगलेच नाराज झाले आहेत. त्यांची नाराजी त्यांनी बोलून दाखवली आहे. मात्र असे असले तरी एकनाथ खडसेंनी मंगळवारी आपला विधानसभेसाठीचा अर्ज भरला आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना भाजपच्या दुसऱ्या यादीतही तिकीट मिळण्याची शक्यता कमीच आहे. कारण, त्यांची कन्या रोहिणी खडसे खेवलकर यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजपच्या पहिल्या यादीत नाव न आल्यानंतर खडसे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. खडसेंचं नाव पहिल्या यादीत नसल्यामुळे त्यांचे कार्यकर्ते कालपासून रस्त्यावर उतरले आहेत. मुक्ताईनगर येथील खडसेंच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांनी जमा होत जोरदार घोषणाबाजी केली. खडसेंना तिकीट न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा कार्यकर्त्यांकडून देण्यात आला आहे. दरम्यान भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा मुक्ताईनगर मतदारसंघ मिळवण्यासाठी शिवसेनेचे स्थानिक नेते प्रयत्नशील आहेत. मात्र खडसेंसाठी ताे भाजपकडेच राहिला तर पक्षाचा राजीनामा देऊन अपक्ष निवडणूक लढवण्याची तयारी शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.२०१४ मध्ये युती ताेडण्याचा निर्णय खडसेंनी जाहीर केला हाेता. त्यामुळे स्थानिक शिवसैनिकांत खडसेंविषयी राग आहे. त्यातच खडसे व पाटील यांच्यात राजकीय हाडवैर आहे. म्हणूनच २०१४ मध्ये पाटील हे खडसेंविराेधात उभे हाेते. काँग्रेस आणि राष्ट्रवादीनेही त्यांना मदत केली, मात्र पाटील पराभूत झाले. यंदाही खडसेंविरुद्ध सर्वांनी एकत्रित सक्षम उमेदवार द्यावा म्हणून पाटील प्रयत्नशील हाेते. तसे झाल्यास भाजपचा एक गटही त्यांना मदतीच्या तयारीत असल्याचे सांगितले जाते. दरम्यान, एक तर राष्ट्रवादीने काेणताही नवखा उमेदवार दिल्यास त्याला शिवसैनिक मदत करण्याच्या तयारीत आहेत किंवा पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढवून त्यांना सगळे खडसेविराेधक मदत करतील, असेही आडाखे बांधले जात आहेत. मात्र राष्ट्रवादीने जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील यांनाच उमेदवारी दिली तर या लढतीत शिवसेनेला रस नसेल अशी स्थिती आहे.कोण आहेत रोहिणी खडसे?
1 डिसेंबर 1982 रोजी जन्मलेल्या रोहिणी खडसे यांचं शिक्षण मुंबई आणि पुण्यात झाले आहे. 36 वर्षीय रोहिणी खडसे यांनी मुंबई विद्यापीठातून बीकॉम आणि एलएलबीचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर पुण्यातून एलएलएमपर्यंतच शिक्षण घेतले आहे. रोहिणी खडसे या एकनाथ खडसे यांच्या द्वितीय कन्या आहेत. मोठ्या कन्या शारदा गृहिणी आहेत. तर रोहिणी खडसे सक्रिय समाजकार्यात सहभागी असतात. सध्या त्या जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील कोठली इथे वास्तव्यास आहेत. एकनाथ खडसेंच्या राजकीय वारसदार म्हणून ही त्यांच्याकडे पहिले जाते.भूषवत असलेली पदे-
1. अध्यक्षा जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक जळगाव, (16 मे 2015 पासून आजपर्यंत)
2. उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघ मुंबई (मार्च 2015 पासून आजपर्यंत)
3. अध्यक्षा आदिशक्ती मुक्ताई सहकारी सूतगिरणी मुक्ताईनगर (जुलै 2013 पासून आजपर्यंत)
4. उपाध्यक्षा संत मुक्ताई शुगर अँड एनर्जी लि, मुक्ताईनगर (ऑक्टोबर 2013 पासून आजपर्यंत)
5. अध्यक्षा मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटी (14 ऑगस्ट 2017 पासून आजपर्यंत)
6. सरचिटणीस भारतीय जनता पक्ष जळगाव जिल्हा (2016 पासून आजपर्यंत)
7. सदस्या नियामक मंडळ, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई (जानेवारी 2018 पासून आजपर्यंत)
8. अध्यक्षा अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा जळगाव (9 एप्रिल 2015 पासून आजपर्यंत)
9. अध्यक्षा संवेदना फाउंडेशन मुक्ताईनगर (फेब्रुवारी 2015 पासून आजपर्यंत)
प्राप्त पुरस्कार-
1. जाणीव सांस्कृतिक अभियान नाशिकतर्फे "राज्यस्तरीय जाणीव पुरस्कार 2015
2. तरुण भारत जळगावतर्फे "खान्देशरत्न पुरस्कार 2015"
3. त्रिमूर्ती फाऊंडेशन आणि त्रिमूर्ती शिक्षण संस्था जळगावतर्फे "त्रिमूर्ती सन्मान 2015"
4. आपले परिवार सार्वजनिक वाचनालय भुसावळतर्फे उत्कृष्ट सामाजिक कार्यासाठी "समाजरत्न पुरस्कार 2015"
5. स्वयंभू प्रतिष्ठान व महिला मंडळ चाळीसगावतर्फे "मुक्तांगण पुरस्कार 2016"
6. राजमाता जिजाऊ महिला मंडळ पारोळातर्फे "कर्तृत्ववान महिला पुरस्कार 2017"
7. शिवचरण फाउंडेशन मुक्ताईनगरतर्फे "कर्तृत्ववान महिला पुरस्कार 2017"
8. ग्लोबल लेवा फाउंडेशन जळगावतर्फे "लेवा आयकॉन्स पुरस्कार 2019"
सेल्फीचा आहे छंद
* रोहिणी यांनी एलएल.एमपर्यंत शिक्षण घेतले आहे.* रोहिणी यांना गाणी ऐकण्याबरोबर वाचनाचीही आवड आहे.
* प्रवासात असताना रोहिणी त्यांचे हे छंद पूर्ण करतात.
* महिलांसाठी काम करण्याची रोहिणी यांची इच्छा होती. मात्र त्या नकळत इकडे ओढले गेले, असे सांगतात.
* अॅड. रोहिणी खडसे-खेवलकर या जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षा आहेत.
* बँकेच्या 100 वर्षाच्या इतिहासात रोहिणी या पहिल्या महिला अध्यक्ष ठरल्या आहेत.
* रोहिणी या सामाजिक कार्यात वडिलांसोबत सक्रीय असतात. गरीब आणि गरजू लोकांसाठी त्या काम करतात.
* रोहिणी यांचे सहकार क्षेत्रात चांगले काम आहे.
POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब)
===============================
Maharashtra Assembly Election 2019 Opinion Poll PRAB; प्राब संस्थेचा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकपूर्व जनमत चाचणी सर्वेक्षण (ओपिनियन पोल) अहवाल उपलब्ध
VIDHAN SABHA 2019 ; महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 मतदानपूर्व अंदाज
भाजप व शिवसेना युती न झाल्यास मिळणाऱ्या संभाव्य जागा, मतांचे प्रमाण व विश्लेषण
युती झाल्यावर संभाव्य जागा; आघाडीला मिळणाऱ्या संभाव्य जागा, मतांचे प्रमाण व विधानसभा मतदारसंघनिहाय कल
पॉलिटीकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) संस्थेचा सर्वेक्षण अहवाल खालील लिंकवर उपलब्ध -
(A survey report of the Political Research and Analysis Bureau (PREB) organization is available at the following link)https://www.instamojo.com/bhujbalchandrakant/maharashtra-assembly-election-2019-opinion-p/?ref=store
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.